मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 830

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘लोकसभा निवडणूक-२०२४’निमित्त विशेष मुलाखत

           मुंबई दि. 28 : निवडणुकीमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक वाहिन्या, समाज माध्यमे तसेच ती माध्यमे वापरणाऱ्या सर्वांनी जबाबदारीने ती हाताळावीत आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकारेपणे पालन करावे, असे आवाहन राज्य माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाचे, नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले.

            लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘माध्यमांची भूमिका आणि नागरिकांची जबाबदारी’ यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या अनुषंगानेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पेड न्यूजच्या संदर्भात तक्रारीसाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर समिती स्थापन केली आहे. तसेच प्रत्येक राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांना आपल्या जाहिरातीचे प्रमाणीकरण (प्री सर्टिफिकेशन) करण्यासाठी जिल्हा तसेच राज्य पातळीवर जाहिरात प्रमाणीकरण समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत कशा प्रकारे कामकाज करण्यात येणार आहे तसेच माध्यमांनी आणि नागरिकांनी मुक्त व निर्भिड वातावरणात राज्यातील निवडणूक पार पडण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबत डॉ. कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत सोमवार दि. १, मंगळवार दि. २ आणि बुधवार दि. ३ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

००००

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार

मुंबई, दि. 28 : मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी 29 ते 31 मार्च 2024 या कालावधीत चालू ठेवण्यात येणार आहेत, असे मुंबई विभाग नोंदणी उपमहानिरीक्षक राजू थोटे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी व 1 एप्रिल रोजी दरवर्षी वार्षिक बाजारमूल्य दर प्रसिद्ध होत असल्यामुळे मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होत असते तसेच आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या कामकाजासाठी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी सर्व दुय्यम निबंधक कार्यालये वरील दिवशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी व नोंदणी कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी चालू राहणार असल्याने या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांनी केले आहे.

००००

किरण वाघ/विसंअ/

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या १५ वर्षे मुदतीच्या दोन हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री १६ मे २०१९ रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २ एप्रिल २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस्  २ एप्रिल २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान  ३ एप्रिल २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १५ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ३ एप्रिल २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३ एप्रिल २०३९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ऑक्टोबर ३ आणि एप्रिल ३ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ

महाराष्ट्र शासनाचे १७ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या १७ वर्षे मुदतीच्या दोन हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री १६ मे २०१९ रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २ एप्रिल २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस्  २ एप्रिल २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान  ३ एप्रिल २०२४  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १७ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ३ एप्रिल २०२४ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३ एप्रिल २०४१ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ऑक्टोबर ३ आणि एप्रिल ३ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि.  २७ : महाराष्ट्र शासनाच्या १८  वर्षे मुदतीच्या दोन हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री १६ मे २०१९ रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २ एप्रिल २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस्  २ एप्रिल २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान  ३ एप्रिल २०२४  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १८ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ३ एप्रिल २०२४ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३ एप्रिल २०४२  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ऑक्टोबर ३ आणि एप्रिल ३ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल

मुंबई, दि. २७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा  शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ पर्यंत २२९अर्ज दाखल झाले आहेत.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक ५१, नागपूर ६२, भंडारा- गोंदिया ४९, गडचिरोली- चिमूर १९ आणि चंद्रपूर ४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

0000

राजू धोत्रे/विसंअ

नांदेड जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात; उमेदवारांना ४ एप्रिलपर्यत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत

नांदेड दि. २७ :- नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये उद्या दिनांक २८ मार्चपासून नाम निर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. तर नांदेड लोकसभा निवडणुकीत नेमके किती उमेदवार हे आठ तारखेच्या रात्री निश्चित होईल.

 

नांदेड लोकसभा संघाची निवडणूक २६ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. त्यामुळे उद्यापासून तर २६ एप्रिलपर्यत निवडणुकीची लगबग सुरू असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किंवा त्यांच्या सूचकाला नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी नांदेड यांच्याकडे गुरुवार ४ एप्रिलपर्यत (सार्वजनिक सुट्टी व्यक्तीरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

नामनिर्देशनपत्राची छाननी शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवार 8 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत देता येईल.

नांदेड जिल्हयात २६ लक्ष ९७ हजार २८७ मतदार
नांदेड जिल्ह्यामध्ये २२ मार्च पर्यंत नोंदीनुसार एकूण मतदारांची संख्या २६ लाख ९७ हजार २८७ आहे. एकूण ३ हजार ८१ मतदान केंद्र यासाठी सज्ज झाले आहे. त्यापैकी भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, या सहा विधानसभा क्षेत्रातील 18.43 लक्ष मतदार नांदेड लोकसभा मतदारसंघात 2 हजार 62 मतदान केंद्रावरून मतदान करणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 9 लक्ष 50 हजार 976 पुरुष, तर 8 लक्ष 92 हजार 129 महिला व 139 तृतीय पंथी आपला मताधिकार बजावणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये 25 हजार 14 मतदार हे 85 वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रावर यायची क्षमता नसेल त्यांना बॅलेट पेपरने मतदान करता येणार आहे. प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

तर जिल्ह्यातील किनवट व हदगाव विधानसभा क्षेत्रातील 05.57 लक्ष मतदार 649 केंद्रावरून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत. याशिवाय लोहा विधानसभा क्षेत्रातील 02.92 लक्ष मतदार ३३० मतदार केंद्रावरून लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.

 निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीची घोषणा : 16 मार्च 2024
निवडणुकीची अधिसूचना : 28 मार्च नामनिर्देशनाची अंतिम तारीख : 4 एप्रिल 2024
छाननी : 5 एप्रिल 2024
अर्ज मागे घेण्याची तारीख : 8 एप्रिल 2024
मतदान :26 एप्रिल 2024
मतमोजणी :4 जून 2024
0000

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक  पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन सभागृहात हा आढावा घेण्यात आला.

महावितरणचे सह व्यवस्थापक राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, अपर आयुक्त रणजीत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीत नोडल अधिकाऱ्यांच्या सोबविलेल्या जबाबदाऱ्यानुसार कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यात आचारसंहिता, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक साहित्य मागणी- वितरण, वाहतुक व्यवस्था, संगणक कक्ष, कम्युनिकेशन प्लॅन, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र, खर्च निरीक्षण, मतपत्रिका, डमी , टपाली मतपत्रिका, मिडिया, संपर्क कक्ष, मतदार यादी कक्ष, मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष, निवडणूक निरीक्षक, मतदारांना मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधा (शहरी व ग्रामिण) मतमोजणी, वेबकास्टिंग इ. विविध विषयांनुसार आढावा  घेण्यात आला.

०००००

 

प्रतिबंधात्मक कारवाई महसूल-पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे राबवावी – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. तथापि, ही कारवाई करतांना महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील सर्व उपविभागीय,तहसील कार्यालयातील, पोलीस स्टेशन मधील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  स्वामी म्हणाले की, कायद्याने दिलेल्या अधिकाराचा सुयोग्य वापर करून  कोणावरही अन्याय होईल असे वर्तन पोलीस प्रशासन किंवा महसुल दंडाधिकारी कार्यालयाकडून होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये कारणे दाखवा नोटीस बजावणे आवश्यक असुन यात उपविभागीय व तालुकादंडाधिकाऱ्यांनी खात्री करणे आवश्यक आहे. कलम १४४ अंतर्गत येणाऱ्या कारवाईत तातडीने आपल्या  हद्दीतील आदेश निर्गमित करण्यात यावेत. गुन्हेगारांबाबतची  स्थानिक पातळीवर माहिती घेण्यात यावी. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाची ही संयुक्त जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी परस्पर समन्वय राखावा. आपले कर्तव्य बजावण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत निर्दोष पद्धतीने कामकाज पार पाडण्यासाठी  संवाद आणि समन्वय सर्व यंत्रणेत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे काटेकोर पालन; विविध माध्यमातून कार्यवाही सुरु

            जळगाव दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही सुरू केली असून त्यात शस्त्र जप्ती,रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू आहे.

शस्त्र जप्ती

            जिल्ह्यात एकूण 1246 परवनाधारक शस्त्र आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि.26 मार्च रोजी दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 05  विनापरवानाशस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमांतर्गत 1 हजार 73 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. सी आर पी सी अंतर्गत आतापर्यंत 786 जणांना अटक करण्यात आली आहे.

दारूबंदी

            आचासंहिता (16मार्च पासून) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपशिल खालीलप्रमाणे.

  1. एकूण गुन्हे – 78
  2. जप्त मुद्देमाल (लिटर)- 33506.18
  3. जप्त मुद्देमाल किंमत (रू) – 11,69,825

सार्वजनिक तक्रार निवारण:

            व्होटर हेल्पलाइनद्वारे प्राप्त झालेल्या 53 कॉलचे समाधान करण्यात आले आहे. एकूण 53 कॉल निकाली काढण्यात आले आहेत. वोटर हेल्पलाइन वर प्राप्त होणाऱ्या कॉल्स पैकी बहुतांश तक्रार या मतदान कार्ड न मिळाल्याबाबतीत असल्याने कॉल करणाऱ्या नागरिकांना संबंधित निवडणूक अधिकारी तसेच तहसील कार्यालयांशी संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.

CVIGIL:

            CVIGIL अर्जाद्वारे 34 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या प्रमुख तक्रारी परवानगीशिवाय पोस्टर्स/बॅनरशी संबंधित आहेत. प्राप्त बहुतांशी तक्रारी या ठिकठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर बॅनर्स वॉल पेंटिंग याच्याशी संबंधित असल्याने संबंधित प्राप्त तक्रारींची दखल घेत संबंधित विभागांना सुचित करण्यात आले आहे.

मीडिया:

            आता पर्यंत  एकूण 2 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी 2 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

एन्कोर (ENCORE) अँप

            ENCORE अंतर्गत  परवानग्यांसाठी 01अर्ज प्राप्त झाला होता तथापि अर्जासंदर्भात त्रुटी पूर्तता करण्यास सूचित करण्यात आले आहे.

00000

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या रुग्णांसाठी आशेचा किरण

0
राज्यातील गरजू नागरिकांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. या निधीतून केवळ वैद्यकीय मदतच...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-२)

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी...

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...