मंगळवार, जुलै 29, 2025
Home Blog Page 819

महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे सायकल रॅली              

मुंबई उपनगरदि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तरमुंबई उत्तर पश्चिममुंबई उत्तर पूर्वमुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी सकाळी 6.30 वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगबाईक्स मुंबईमुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने ही सायकल रॅली काढण्यात येईल. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयवांद्रे (पूर्व)मुंबई येथून सायकल रॅलीला सुरवात होईल. त्यानंतर ही रॅली वेगवेगळ्या मार्गाने दक्षिण मुंबईएनसीपीएअंधेरी क्रीडा संकुलबोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृहमुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर या चार ठिकाणी रॅलीचा समारोप होईल.

लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा राष्ट्रीय महोत्सव आहे. या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही सायकल रॅली काढण्यात येईल. या रॅलीत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी गुगल फॉर्म भरावयाचा आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विश्वनाथ अय्यर यांच्या मोबाईल क्रमांक 9619444027 व कमल गाडा यांच्या मोबाईल 9821025381 क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधावाअसे आवाहन संयोजकांनी केले आहे.

000

मुंबई उपनगर जिल्हा माध्यम कक्षास माध्यम प्रतिनिधींनी दिली भेट

मुंबई उपनगरदि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयवांद्रे (पूर्व)मुंबई येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण कक्षास विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देवून पाहणी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ यांच्या सहकार्याने माध्यम कक्ष तथा माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरीष्ठ सहाय्यक संचालक तथा दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे समन्वय अधिकारी केशव करंदीकर हे मुख्य समन्वयक आहेत.

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी भेट देवून माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. मुख्य समन्वयक श्री. करंदीकर यांनी माध्यम कक्षाचे कामकाजमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे कामकाज याविषयीची सविस्तर माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली. यावेळी टीव्ही मॉनिटरिंगसोशल मीडिया मॉनिटरिंग आदींची माहिती त्यांनी जाणून घेतली. माध्यम कक्षाचे चाललेले कामकाजप्रशासन आणि प्रसारमाध्यमे यामध्ये दुवा म्हणून माध्यम कक्षाकडून मिळणारी माहिती सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींना उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया माध्यम प्रतिनिधींनी दिली.

०००

निवडणूक यंत्रणेची आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर नजर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा 16 मार्च 2024 रोजी करण्यात आली. त्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात साडेपाचशेहून अधिक पथके अहोरात्र 24×7 असे काम करीत आहेत. लोकसभेच्या चारही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यावेळी त्यांना जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीची माहिती दिली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले की, 26 एप्रिलपासून निवडणूकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि एक मे या सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्याची मुदत 3 मेपर्यंत असून 4 मे रोजी अर्जाची छाननी होईल. दिनांक 6 मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 20 मे रोजी मतदान आणि 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरु  इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत भरावयाची माहिती, त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे याची माहिती करुन घ्यावी. याबाबत काहीही शंका असल्यास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी एकाचवेळी गर्दी होणार नाही, यासाठी मतदान केंद्रस्तरीय आराखडा तयार करण्यात आला आहे. कमीत कमी वेळात मतदार मतदान करुन मतदान केंद्राच्या बाहेर पडेल, असे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी तेथील विविध मतदार केंद्रांना कलर कोड देण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याशिवाय, त्यासाठी मतदारांना सहाय्य करण्यासाठी मतदारदूत यांची नेमणूक केली जाणार आहे.

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणार

निवडणूक कालावधीत आदर्श  आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये व्हीडिओ सनियंत्रण पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हीडिओ व्हिविंग पथक, भरारी पथकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चारही लोकसभा  मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी साडेपाचशेहून अधिक पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके 24×7 आचारसंहिता भंग होणार नाही यासाठी दक्ष आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणुका निष्पक्ष आणि शांततेच्या वातावरणात होतील यादृष्टीने जिल्हा निवडणूक यंत्रणेने पावले उचलली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न

जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य सरासरी इतके मतदान व्हावे यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय, मतदानाच्या दिवशी मतदारांना कमीत कमी वेळेत मतदान करुन परत जाता यावे, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, जेथे शक्य असेल तेथे बैठक सुविधा, मतदान केंद्रांवर दिशादर्शक असणार आहेत. 

येत्या दोन दिवसात निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात येणार

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी 6 खर्च निरीक्षक, 4 जनरल निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था यासाठीचे 2 निरीक्षक भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केले आहेत. येत्या 2-3 दिवसात खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल होऊन निवडणूक प्रक्रिया आणि खर्चाचा आढावा घेतील.

000

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल

मुंबई उपनगरदि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात 16 मार्चपासून ते आतापर्यंत 245 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील 135 तक्रारींचा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणेया तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी-व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून 135 तक्रारींचे निवारण केले. उर्वरित 183 तक्रारींचा मुदतीत निपटारा करण्यात आला.

जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र काढावे आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावेअसे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारींचे स्वरूप

अंधेरी पूर्व-16, अंधेरी पश्चिम-8, अणूशक्तीनगर-7, भांडूप पश्चिम-5, बोरीवली-13, चांदिवली-26, चारकोप-14, चेंबुर-14, दहिसर-8, दिंडोशी-5, घाटकोपर पूर्व-3, घाटकोपर पश्चिम-2, गोरेगाव-10, जोगेश्वरी पूर्व-5, कलिना-8, कांदिवली पूर्व-8, कुर्ला-5, मागठाणे-24, मालाड पश्चिम –11, मानखुर्द शिवाजीनगर-1, मुलुंड –16, वांद्रे पूर्व-7, वांद्रे पश्चिम-8, वर्सोवा-3, विक्रोळी-16, विलेपार्ले-5 अशा एकुण 245 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

०००

लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे            

मुंबईदि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावेअसे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षउमेदवारांनी पालन करावयाचे नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरातसमन्वय अधिकारी तुषार मठकरवरिष्ठ लेखाधिकारी राजू रामनानीउपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना श्री.पानसरे म्हणाले, 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत असून 26 एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेनिवडणूक खर्च नोंदी यासह इतर महत्वाच्या बाबींविषयी यावेळी श्री. पानसरे यांनी मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. नामनिर्देशन पत्रे भरण्यापासून प्रचार विषयक नियमनिवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.थोरात यांनी टपाल मतपत्रिकाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. श्रीमती खातू यांनी उमेदवारांनी निवडणूक खर्चाविषयी ठेवण्याच्या नोंदी आणि त्याबाबतच्या नियमांविषयी माहिती दिली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

एनजीएसपी पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सात हजार 914 नागरिकांनी कॉलद्वारे म्हणणे मांडले होते. त्यापैकी सहा हजार 928 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीशी संबंधित आणि गैर-निवडणूक-संबंधित तक्रारी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टलद्वारे (NGSP) नोंदविता येतात. या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त तक्रारींपैकी ९४२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, तर ३६ तक्रारींच्या निराकरणाचे काम सुरू आहे. आठ तक्रारी निराकरणाच्या प्राथमिक प्रक्रियेत आहेत.

नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले हे पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात. https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर अथवा https://tmp.eci.gov.in/electors या लिंकवर तक्रारी स्वीकारल्या जात आहेत.

या संदर्भातील तक्रारी करू शकता

मतदार नोंदणी, मतदान केंद्राची ठिकाणे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम), निवडणूक खर्च, निवडणूक गैरव्यवहार, यासंदर्भातील तक्रारी नागरिक या पोर्टलद्वारे करू शकतात. आयोगाच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये पोर्टल उपलब्ध आहे. हे पोर्टल निवडणूक-संबंधित आणि गैर-निवडणूक-संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना तक्रारी नोंदवणे सुलभ झाले आहे. पोर्टलवर प्राप्त तक्रारींची तातडीने चौकशी केली जाईल याची खात्री नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नागरिक त्यांचा मोबाईल क्रमांक वापरून पोर्टलवर नोंदणी करू शकतात आणि त्यांचे प्रोफाइल तयार करू शकतात. हे पोर्टल एखाद्या नागरिकाने त्याच्या प्रोफाइलमध्ये नोंदवलेल्या सर्व तक्रारींची नोंद ठेवते. तक्रार नोंदवल्यानंतर, संदर्भ आयडी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ई- मेल आयडीवर पाठविला जातो. तक्रार दाखल केल्यानंतर ती योग्य निवडणूक अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी सोपवली जाते. अधिकाऱ्याने कालबद्ध कालावधीत तक्रारीला प्रतिसाद देणे आवश्यक असते.

या सोप्या पद्धतीने तक्रार करू शकतात

NGSP या संकेतस्थळावर गेल्यानंतर “रजिस्टर कंप्लेंट” बटणावर क्लिक करावे. त्यांनतर तुम्हाला कोणत्या प्रकारची तक्रार नोंदवायची आहे ते निवडावे. तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करा, जसे की तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क माहिती. त्यांनतर तुमच्या तक्रारीचा तपशील द्यावा. कोणतेही समर्थन दस्तऐवज अपलोड करा (असल्यास). “सबमिट” बटणावर क्लिक करा. एकदा तुम्ही तुमची तक्रार सबमिट केल्यानंतर, तुम्हाला ई- मेल पुष्टीकरण मिळेल. तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती ऑनलाइन देखील ट्रॅक करू शकता. पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी https://eci-citizenservices.eci.nic.in/ या लिंकचा वापर करू शकता, असेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

०००

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात २५८ उमेदवार रिंगणात

मुंबई, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 317 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 258 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड 13, बारामती 38, धाराशीव (उस्मानाबाद) 31, लातूर 28, सोलापूर 21, माढा 32, सांगली 20, सातारा 16, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 9, कोल्हापूर 23, हातकणंगले 27 अशी आहे.

००००

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. २२ : मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नावनोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक हे २३ एप्रिल पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही ओळखपत्राविना स्व-घोषणापत्राद्वारे नाव नोंदवू शकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. काही कारणास्तव ज्या मतदारांचे नाव नोंदवायचे राहीले असेल त्यांनी तातडीने २३ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा मतदाता हेल्पलाईन ॲपच्या सहाय्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी किंवा आपल्या क्षेत्रातील मतदार दुतांची मदत घ्यावी.

व्होटर आयडी व्यतिरिक्त इतरही ओळखपत्रे वैध

मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे २० मे रोजी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळख पत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, विशिष्ठ दिव्यांगांचे ओळखपत्र, केंद्र सरकार/राज्य सरकार/  सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, पासपोर्ट, बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे, श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्ड, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदाना दिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.

बेघर, देहव्यवसाय करणारे ओळखपत्राशिवाय नाव नोंदवू शकतात

नव्याने नाव नोंदवू इच्छिणाऱ्या बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसेल तर त्यांनी स्व-घोषणापत्र शासनास सादर करावे. स्व-घोषणापत्राद्वारेही मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. हे स्व-घोषणापत्र भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Default.aspx  या लिंकवर उपलब्ध आहे.

000

कुर्ला वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम

मुंबई उपनगर, दि. 22 : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुर्ला- नेहरूनगर आगार येथे सूचना केंद्रातून बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे 2024 रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करा!! अशी उद्घोषणा देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सातत्याने मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची गावी जाण्याची लगबग आणि त्यात १७४ कुर्ला (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ कुर्ला- नेहरूनगर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार बस स्थानकावरील ही उदघोषणा सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होती.

बस स्थानकावर साधारण दहा हजाराच्या आसपास नागरिकांची वर्दळ रोजच असते. आपल्या गावी जाण्यासाठी बसची वेळ, मार्ग आणि बस कुठे लागली आहे. याबाबत आगारच्या सूचना केंद्रामधून सर्वसामान्य प्रवाशांना सातत्याने उद्घोषणा करून मार्गदर्शन करण्यात येते. या सूचना केंद्रामधून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगार प्रमुख आणि तेथील अधिकारी व कर्मचारी हे ‘सुजाण आणि जागरूक मतदार व्हा, लोकशाहीचे रक्षण करा’ तसेच ‘मतदान’ आपली जबाबदारी आपला अधिकार, मजबूत लोकशाहीचा आधार’ अशा नावीन्यपूर्ण उद्घोषणा देऊन प्रवासी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यास नक्कीच मदत होणार आहे.

कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे- फडतरे  यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला नेहरूनगर आगार येथे हा उपक्रम राबविण्यात आला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे, स्वीप पथक प्रमुख सागर खुटवड, तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक थविल यांनी आगार प्रमुख आणि तेथील अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या. आगार व्यवस्थापक दीपक हेतंबे, आगार प्रमुख दीपक जाधव व वाहतूक नियंत्रक कडवईकर यांच्या समन्वयाने सूचना केंद्रातून ही उद्घोषणा करण्यात येत आहे.

000

दिव्यांग आणि वयोवृद्धांना मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा पुरविणार – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई उपनगर, दि. 22 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना 26 एप्रिल रोजी जारी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मतदानाची टक्केवारी ही राष्ट्रीय व राज्य सरासरीपेक्षा जास्त असावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्ग क्षीरसागर यांनी केले आहे. या निवडणुकीत मतदारांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये आणि लवकरात लवकर मतदान केंद्रांवर मतदान करुन जाता येईल, या दृष्टीने नियोजन केल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम. 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरवात होईल. या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी पूर्णत्वास आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले की, लोकसभेच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभेच्या 26 मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाख 7 हजार 879 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 39 लाख 82 हजार 590, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 24 हजार 477 एवढी आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या 812 एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 15 हजार 958, तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 98 हजार 174 आहे. या चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे 1 हजार 83 असून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 353 एवढी आहे. 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्यापर्यंत मतदान कर्मचारी पोहोचले असून त्यांच्याकडून पर्याय भरुन घेण्यात आले आहेत. एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास 26 एप्रिल 2024 पासून सुरुवात होईल. 3 मे 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 मे 2024 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 6 मे 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 20 मे 2024 रोजी मतदान होईल, तर 4 जून 2024 रोजी नेस्को, गोरेगाव व उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे मतमोजणी होईल. याबरोबरच प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी एका केंद्रांचे संपूर्ण संचलन महिला कर्मचारी, एका मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन तरुण अधिकारी आणि तिसऱ्या मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन दिव्यांग कर्मचारी करतील. मतदान केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मंगळवार 23 एप्रिल 2024 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

तर मतदारांच्या सोयीसाठी विशेष कलर कोड

पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र ज्या ठिकाणी असतील तिथे मतदारांच्या सोयीसाठी रंगसंगतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्र मतदारांसाठी सुलभ होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर पाणी, वीज, सावलीची सुविधा असेल. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी बेस्टसह प्रवासी वाहतुकदारांशी समन्वय साधला जात आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या मार्गावर ही वाहने मोफत चालविली जातील.

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु

मुंबई उपनगर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्या दिवसापासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. फिरते पथक, बैठे पथक, व्हीडिओ व्हीजिलिंग पथक, व्हीडिओ व्ह्यूइंग पथक, खर्च सनियंत्रण पथकासह विविध 550 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांच्या कामाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यास्तरावर एक खिडकी कक्ष विविध परवानग्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. सी- व्हीजिल ॲपवर 188 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारी वेळेत निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच ग्रीव्हन्स ॲपवर 2251 तक्रारी, विचारणा करण्यात आली होती. या सर्वांचेही निराकरण करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

0000

ताज्या बातम्या

‘दिलखुलास’मध्ये महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक संतोष वॉरिक यांची ३०, ३१ जुलै तसेच १...

0
मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालनालयाचे संचालक संतोष वॉरिक यांची विशेष मलाखत प्रसारित होणार आहे....

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

0
मुंबई, दि. 29 : पुणे येथील टाटा मोटर्स या कंपनीतील कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विधानसभा उपाध्यक्ष...

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई, दि. २९ : ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे...

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाची वाटचाल देशात आदर्श ठरली आहे. राज्यात वन विभागाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली आहे. आज आपण केवळ व्याघ्रसंवर्धन करत नाही, तर वन...

आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा – उपमुख्यमंत्री अजित...

0
मुंबई, दि. 29 : आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा, तसेच त्याबाबतच्या मागणीचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने...