बुधवार, जुलै 30, 2025
Home Blog Page 818

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५३.५१ टक्के मतदान

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. ८ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

➡️ वर्धा – ५६.६६ टक्के

➡️ अकोला – ५२.४९  टक्के

➡️ अमरावती – ५४.५० टक्के

➡️ बुलढाणा –  ५२.२४ टक्के

➡️ हिंगोली –  ५२.०३ टक्के

➡️ नांदेड –  ५२.४७ टक्के

➡️ परभणी -५३.७९ टक्के

➡️ यवतमाळ – वाशिम – ५४.०४ टक्के

०००

वंदना थोरात/विसंअ/

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

मुंबई, दि. २६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली आहे, असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात आली आहे.

३ मे २०२४ पर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही प्रस्तावकाला दाखल करता येईल.

‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, खोली क्रमांक, २०५, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.

तसेच ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जुने जकात घर, पहिला मजला, कक्ष क्रमांक १३२, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.

४ मे २०२४ रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. ६ मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

* निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख – २६ एप्रिल २०२४

* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ – ३ मे २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

* नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख – ०४ मे २०२४

* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख व वेळ – ०६ मे २०२४ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

* मतदानाची तारीख व वेळ – २० मे २०२४, सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

* मतमोजणीची तारीख – ०४ जून २०२४

* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – ६ जून २०२४

०००

शैलजा पाटील/विसंअ/

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वर्धा – ४५.९५ टक्के, अकोला -४२.६९ टक्के, अमरावती – ४३.७६ टक्के, बुलढाणा –  ४१.६६  टक्के, हिंगोली –  ४०.५० टक्के, नांदेड –  ४२.४२ टक्के, परभणी -४४.४९ टक्के, यवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के

०००

वंदना थोरात/विसंअ/

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १  वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती – ३१.४०टक्के

बुलढाणा –  २९.०७ टक्के

हिंगोली –  ३०.४६ टक्के

नांदेड –  ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के

000

निलेश तायडे / वि.स.अ

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८३ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदारसंघात सकाळी  ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – १८.३५ टक्के

अकोला -१७.३७ टक्के

अमरावती – १७.७३ टक्के

बुलढाणा –  १७.९२ टक्के

हिंगोली –  १८.१९ टक्के

नांदेड –  २०.८५ टक्के

परभणी -२१.७७ टक्के

यवतमाळ – वाशिम – १८.०१ टक्के

0000

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात  सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी  ९ वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – ७.१८ टक्के

अकोला – ७.१७ टक्के

अमरावती -६.३४ टक्के

बुलढाणा – ६.६१ टक्के

हिंगोली – ७.२३ टक्के

नांदेड – ७.७३ टक्के

परभणी – ९.७२ टक्के

यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के

0000

शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना

१८ लाख ३६ हजार ०७८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अमरावती, दि. २५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.

जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री. शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. अमरावती मतदारसंघाकरिता ईव्हीएम गोडावून न.1 (लोकशाही भवन) विद्यापीठ रोड येथून वितरण झाले. तिवसा मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर, सातरगाव रोड तिवसा, दर्यापूर मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर,दर्यापूर, मेळघाट मतदारसंघाकरिता फातिमा कान्वेंट हायस्कुल हॉल तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम्, कोर्ट रोड या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात 354 सर्वाधिक मतदान केंद्र मेळघाटात असून सर्वात कमी 309 मतदारसंघात अचलपूर येथील आहे. बडनेरा मतदारसघांत 337 मतदानकेंद्र, अमरावती मतदारसंघात 322, तिवसा मतदारसंघात 319, दर्यापूर मतदारसंघात 342 याप्रमाणे एकूण 1 हजार 983 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र (पिंक बुथ), एक दिव्यांग मतदान केंद्र, युवा अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. तसेच बडनेरा मतदारसंघातील मतदान केंद्र 257 – मनपा उर्दु प्राथमिक मुलांची शाळा क्र.10 खोली क्र.4 जुनी वस्ती बडनेरा हे इंद्रधनुष्य (Rainbow) या थीमवर असणार आहे. आणि धामणगाव रेल्वे येथील जि.प.प्रायमरी मराठी शाळा खोली क्र.1 उसळगव्हाण हे मतदान केंद्र आदिवासी मतदान केंद्र या थीमवर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहेत. जिल्ह्यातील 993 मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व  सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.

०००

निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्‍ज; मोठ्या संख्‍येने मतदान करण्‍याचे आवाहन

नांदेड दि. २५ :  अठराव्‍या लोकसभेसाठी जिल्हा प्रशासनाची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून उद्या शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. आज दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व पोलींग पार्ट्या मतदान केंद्रावर सुखरुप पोहोचल्‍या आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील एकूण 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार असून २३ उमेदवार रिंगणात आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्‍येने आपल्‍या मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आला आहे.

जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्‍हावाशियांना आवाहन करतांना आपल्‍या संदेशात जनतेने मोठ्या संख्‍येने मतदान केंद्रावर पोहोचावे, अशी विनंती केली आहे. मतदान केंद्रावर उन्‍हापासून बचावासाठी प्रतिक्षालय उभारण्‍यात आली असून पिण्‍याच्‍या पाण्‍यासह आवश्‍यकतेनुसार आरोग्‍य विषयक उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. गेल्‍या ७५ दिवसांपासून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी कार्यरत असून उद्या शुक्रवारची सुटी मतदानासाठीच उपयोगात आणा असेही त्‍यांनी आपल्‍या संदेशात म्‍हटले आहे. उद्या संनियंत्रण कक्षातून  जिल्‍ह्यातील सर्व यंत्रणेवर आपले लक्ष राहणार असून निर्भय होऊन आपला मताधिकार वापरण्‍याचे सांगितले आहे.

18 लक्ष 51 हजार मतदार

नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (294409), नांदेड उत्तर (346886), नांदेड दक्षिण (308790), नायगाव (301299), देगलूर (303943), मुखेड (296516) असे एकूण 18 लक्ष 51 हजार 843 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये 9 लक्ष 55 हजार 84 पुरुष तर 8 लक्ष 96 हजार 617  महिला तर 142 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.

10 हजार 637 कर्मचारी कार्यरत

नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी 10 हजार 637 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष 2766, इतर मतदान अधिकारी 7921, क्षेत्रीय अधिकारी 242, याशिवाय मायक्रो ऑब्जर्वर 39, होम वोटींग करीता 50, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे.

7 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी

नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये पोलीस बंदोबस्‍तासाठी एक जिल्‍हा पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक, 12 पोलीस उपअधीक्षक, 245 अधिकारी, 4272 अंमलदार, 2500 होमगार्ड याशिवाय 6 सीआरपीएफ कंपन्‍या असा तगडा पोलीस बंदोबस्‍त लावण्‍यात आलेला आहे.

मोबाईल वापरावर बंदी

आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक पोलिस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्राच्‍या परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. त्‍यामुळे मोबाईलशिवाय मतदान करावे. मतदार, निवडणूक कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रावर प्रतीक्षालय

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान करावे असे आवाहन करताना जिल्हा प्रशासनाने यावेळी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय उभारले आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सावलीची व्यवस्था, रांगेविरहित मतदान, व्हीलचेअरची व्यवस्था, हिरकणी कक्ष व पाळणा घर, आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे.

महिला सखी केंद्र तयार

जिल्‍ह्यात 16 ठिकाणी महिला व्यवस्थापनातील मतदान केंद्र आहेत. ते आजच सायंकाळी मतदारांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज झाले आहे. यामध्‍ये भोकर येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नुतन इमारत, बारड येथील जिल्‍हा परिषद कन्‍या शाळा, उत्‍तर नांदेड मधील वसंत नगर येथील राजर्षी शाहु बालक मंदिर, नांदेड दक्षिण मधील धनेगाव येथील मधुबन महाराज हायस्‍कूल, नायगाव येथील कृषीउत्‍पन्‍न बाजार समिती, देगलूर येथील सावित्रीबाई हायस्‍कूल नवी इमारत, मुखेड येथील गुरुदेव विद्यामंदिर, गुजराती हायस्‍कूल वजिराबाद, नांदेड आदिंचा सहभाग आहे. दिव्यांगांसाठी विशेष अशा सहा मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. 100 टक्के युवक अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती असणारे 16 केंद्र आहेत. इको फ्रेंडली मतदान केंद्राची संख्या 6 आहे तर  5 शाडो मतदान केंद्र आहेत.

32 संवेदनशील केंद्र

जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांची यादी नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार 62 मतदान केंद्र असून त्यापैकी 32 मतदान केंद्र संवेदनशील केंद्र म्हणून घोषीत केली आहेत. 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात 5 केंद्र हे संवेदनशील आहेत. यामध्ये केंद्र क्रमांक 139 राजर्षी शाहू विद्यालय वसंतनगर, केंद्र क्रमांक 202 विवेक वर्धिनी हायस्कूल यशवंतनगर, केंद्र क्रमांक 205 नांदेड क्लब स्नेहनगर, केंद्र क्रमांक 241 शासकीय औद्योगिक पी.एस. हॉल नंबर 4, केंद्र क्रमांक 333 इस्लाहुल आलमी माध्यमिक बॉईज स्कूल, रुम नंबर 4, नांदेड दक्षिण मतदान संघात एकूण 10 केंद्र संवेदनशील आहेत. मध्ये 192- गांधी राष्ट्रीय हायस्कूल गाडीपुरा, 115- जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा वर्ग आठवी ब, 161- जिल्हा परिषद वाजेगाव उत्तरेकडील रुम, 234- जिल्हा परिषद हायस्कूल बळीरामपूर मतदान केंद्र रुम नंबर २, मतदान केंद्र २८९- जिल्हा परिषद सोनखेड, 295- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवडी बाजार, मतदान केंद्र 212- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौफाळा, मतदान केंद्र १३५- महानगरपालिका हॉस्पिटल करबला, 132- जिल्हा परिषद मतदान केंद्र गर्ल स्कूल गाडीपुरा, 310- जिल्हा परिषद मतदान केंद्र कारेगाव. लोहा विधान मतदार संघात ३ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 2, नंदगाव, 37- कांजाळा तांडा व मतदान केंद्र 321- कदमाची वाडी. नायगाव विधानसभा मतदारसंघात 6 केंद्र आहेत. यामध्ये मतदान केंद्र 3 काळगाव, 109- गोळेगाव, 110- गोळेगाव, 292- पिंपळगाव, 293- पिंपळगाव, 301- मांजराम वाडी, देगलूर मध्ये मतदान केंद्र 408- अंगणवाडी ईमारत पुंजारवाडी हे केंद्र संवेदनशील आहे. मुखेड मध्ये ७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये मतदान केंद्र 144 चांडोळा, 298- हसनाळ (पीएम), गोजेगाव येथे मतदान केंद्र क्रमांक 339, 340 व 341, मतदान केंद्र क्रमांक 34 व 35 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (नि) हे 16 नांदेड मतदार संघात 29 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.

०००

 

चौथा टप्पा; शेवटच्या दिवसापर्यंत ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल

मुंबई, दि. २५ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नंदुरबार लोकसभा मतदार संघात 18 उमेदवारांचे 31 अर्ज, जळगाव- 24 उमेदवारांचे 36 अर्ज, रावेर- 31 उमेदवारांचे 45 अर्ज, जालना -47 उमेदवारांचे 68 अर्ज, औरंगाबाद- 51 उमेदवारांचे 78 अर्ज, मावळ- 38 उमेदवारांचे 50 अर्ज, पुणे – 42 उमेदवारांचे 58 अर्ज, शिरूर- 46 उमेदवारांचे 58 अर्ज, अहमदनगर- 43 उमेदवारांचे 55 अर्ज, शिर्डी- 31 उमेदवारांचे 40 अर्ज आणि बीड लोकसभा मतदारसंघात 76 उमेदवारांचे 99 अर्ज दाखल झाले आहेत.

०००

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

चंद्रपूर, दि. २५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  – 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले. या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे.

सन 2019 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावा, लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबविले. तरुण मतदारांमध्ये रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् बाबत असलेली प्रचंड उत्सुकता पाहता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी ‘माय व्होट इज माय फ्युचर, पॉवर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करणे, तसेच ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या थीमवर आधारीत मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करून फोटो अपलोड करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात नियोजन भवन येथे पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लकी ड्रा काढतांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते.

हे आहेत स्पर्धेतील विजेते मतदार :

मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करणे

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र देवराव पोहाणे, रा. तुकुम चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत मधुकर गेडाम, रा. मूल यांना तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक ऋषी बारसागडे, रा. चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

रिल्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडे, रा. टिळक वॉर्ड, बालाजी मंदीरजवळ, चिमूर यांना, द्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकर, रा. पालगाव, पो. आवाळपूर, ता. कोरपना यांना, तृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमील ज्ञानेश्वर मडावी, रा. वॉटर सप्लाय कॉर्टर, गोपालनगर, तुकुम, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

पोस्टर्स स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश यशवंत निकोडे, रा. नेहरू नगर, नवीन वस्ती, डीआरसी रोड, चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल राजू धोगडे, रा. शासकीय कन्या वसतीगृह, भिवकुंड (विसापूर) यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी राजू मिलमिले, रा. तिलक वॉर्ड, बोर्डा, ता. वरोरा यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

मिम्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन संतोष येलमुले, रा. सुब्बई, ता. राजुरा यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय बाबुराव सोनुने, रा. हुडको कॉलनी, अमर चौक, चंद्रपूर यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप रंगलाल शाहा, रा. मच्छीनाला, मुक्तीकॉलनी, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

 ०००

ताज्या बातम्या

राजधानीत अखिल भारतीय शिक्षा समागम – २०२५

0
नवी दिल्ली, 29 : भारतीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात मोलाचा बदल ठरलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला पाच वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने 'अखिल भारतीय शिक्षा...

भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट

0
मुंबई, दि. २९ : भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थान येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य...

अटी, शर्तीचा भंग झाल्यास कार्यवाहीचा अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि. 29 : मूळ भाडेपट्टा करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित संस्थेकडून दंडाची रक्कम निश्चित करून त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल तातडीने सादर...

पवई येथील भूखंडसंदर्भात दाखल निवेदनाबाबत अभ्यासानंतर कार्यवाही – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि. 29 : पवईतील पासपोली येथील भूखंडाबाबत दाखल निवेदनासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चा व विहित नियमावलीच्या अभ्यासानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल, असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे...

मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी – मंत्री संजय राठोड

0
मुंबई, दि. 29 : मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत...