गुरूवार, जुलै 31, 2025
Home Blog Page 817

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहभेट उपक्रम

मुंबई उपनगरदि. 30 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात आता ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत गृहभेट उपक्रम राबविण्यात येत आहेत्यास मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई उपनगर जिल्हा जनगणनेनुसार देशातील सर्वात मोठा जिल्हा आहेया जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या 93.56 लाख असून जिल्ह्यात 87 गावांचा समावेश आहेहीच बाब विचारात घेवून लोकशाही शासनव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपले एक मत किती बहुमोल आहेहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयमुंबई उपनगर यांच्या माध्यमातून सांगण्यासाठी ‘गृहभेट‘ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वीपचे नोडल अधिकारी डॉसुभाष दळवी यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहेमतदारांमधील मतदानाबाबतची उदासीनता दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहेया उपक्रमांतर्गत मतदारांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहेगृहभेटीमध्ये मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामुळे देशाचा आणि ओघाने आपला (मतदारांचाकसा फायदा होणार आहेहे सांगणे मतदान केंद्र पातळीवर तयार करण्यात आलेल्या पथकाचे मुख्य काम आहे.

या उपक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीसआरोग्य सेविका व आशा सेविकाग्रामसेवकपोल पाटीलतलाठीमहानगरपालिकेच्या नियोजन विभागाचे कम्युनिटी ऑर्गनायझर (CO), कर निर्धारण आणि संकलन विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारीघनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता उपक्रमांमध्ये क्षेत्रीय स्तरावर काम करणारे कनिष्ठ अवेक्षक व महानगरपालिका मुकादम, ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान‘ योजनेचे संस्थाचालकराष्ट्रीय सेवा योजनाराष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांसह नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांचा समावेश आहेएका मतदान केंद्रावर अंदाजे १२०० मतदार आहेतहे गृहीत धरून कमीतकमी तीन ते चार जणांचे पथक तयार करण्यात आले आहेतएका पथकाने किमान ३०० कुटुंबियांना भेट देवून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहेया गृहभेटीत प्रामुख्याने ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

०००

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

मुंबई, दि. 30 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा  लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मतप्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.

राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होत असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत असलेली तयारीमतदारांच्या सोयीसाठीच्या विविध ॲपची माहितीत्याचसोबत आचारसंहिता बाबतची  सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली आहे. यासोबतच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची विश्वासार्हतास्वीप उपक्रमयापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अभ्यासक,पत्रकार वाचकांच्या सुलभ संदर्भासाठी या अंकात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

तसेच वाचकांसाठी हा विशेषांक dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महासंचालनालयाच्या महासंवाद या ब्लॉग समाजमाध्यमावर ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ/

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांची ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. ३०  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमातून लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ लातूर जिल्हा प्रशासन सज्ज या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. १ मे २०२४ आणि गुरुवार दि. २ मे

२०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. लातूरच्या  जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही. मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी माहिती दिली आहे. तर जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. १ मे  रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.  महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३० : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी यावेळी पुष्पहार अर्पण केला. कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी रवींद्र बच्छाव, नितीन राणे  आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 369 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 71 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 298 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : नंदुरबार 11, जळगाव 14, रावेर 24, जालना 26, औरंगाबाद 37, मावळ 33, पुणे 35, शिरुर 32, अहमदनगर 25, शिर्डी 20, बीड  41 अशी आहे. या 11 मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे

००००

मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सात नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात चार उमेदवारांची सात नामनिर्देशनपत्रे दाखल

 

मुंबई, दि. २९ : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३१- मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज २९ एप्रिल रोजी चार उमेदवारांनी सात नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत.

आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये मोहम्मद माहताब अख्तर हुस्सेन शेख (बहुजन मुक्ती पार्टी)(१ अर्ज), डॉ. मयुरी संतोष शिंदे (अपक्ष)(१ अर्ज), अरविंद गणपत सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१+३ अर्ज), सबिहा बानो  (अपक्ष)(१ अर्ज) यांचा समावेश आहे.

****

 

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांची सात नामनिर्देशनपत्रे दाखल

 

मुंबई, दि. २९ : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’  लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज २९ एप्रिल रोजी दोन उमेदवारांनी सात नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत.

आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये अनिल देसाई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१+२ अर्ज), राहुल शेवाळे (शिवसेना) (१+३ अर्ज) यांचा समावेश आहे.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

मुंबई उत्तर पूर्व-२८ लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारी अर्ज दाखल – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई, दि. 29 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई  उपनगर जिल्ह्यातील २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 26 एप्रिल रोजी अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरवात झाली. आज दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी  1 ) भवानी हिरालाल चौधरी (सरदार वल्लभ भाई पटेल पार्टी) (2) बबन सोपान ठोके (अपक्ष) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात  मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत  155 – मुलुंड, 156 – विक्रोळी, 157 – भांडुप पश्चिम, 169 – घाटकोपर पश्चिम, 170 – घाटकोपर पूर्व, 171 – मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे 2024 रोजी दुपारी 3.00 पर्यंत आहे. 4 मे रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात येईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ६ मे २०२४ आहे. दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे आणि 4 जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे करण्यात येणार आहे.

000

श्रद्धा मेश्राम/ससं/

मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका

मुंबई, दि. 29 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली MH03EM ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी MH03EN नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.

ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल, त्यांना विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) (REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI) (EAST) किंवा आरटीओ, मुंबई (पूर्व) (RTO MUMBAI) (EAST) यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह 2 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करावा.

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या 8 मे 2016 च्या अधिसुचनेनुसार नियमित शुल्का व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास हा नोंदणी क्रमांक देण्यात येईल. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वत: कार्यालयात जावून अर्ज करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ 

लातूरदि. २९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी (स्वीप) कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत आज लातूर शहरात पार पडलेल्या हाके व पांढरे परिवाराच्या लग्न सोहळ्यात नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींनी ७ मे रोजी मतदान करण्याची शपथ घेतली.

 श्रीनिवास मंगल कार्यालय येथे उत्तम हाके यांचे चिरंजीव दिनेश व किसनराव पांढरे यांची कन्या पूजा यांच्या शुभविवाहाचे औचित्य साधून लातूर जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी रामदास कोकरे, स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा यांनी नवदाम्पत्यासह लग्न सोहळ्यास  उपस्थित वऱ्हाडी मंडळींना लोकसभेच्या निवडणुकीत ७ मे २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याविषयी आवाहन केले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच विविध समारंभाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. याप्रसंगी शिक्षक सुनिल हाके यांच्या सह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच स्वीप कक्षाचे सदस्य उपस्थित होते.

*****

दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

मुंबई, दि. २९ :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता व मतदानाबाबत जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत शासन मान्यताप्राप्त दिव्यांग शाळांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०-दक्षिण मध्य मुंबई’ व ‘३१-मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २० मे, २०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांसाठी शाळांतर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमात मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी, पालक यांच्यासमवेत मेळावे, बैठका, चर्चासत्र घेऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदान जागृतीसाठी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. प्रभात फेऱ्यांद्वारे दिव्यांग मतदारांनी मतदानाच्या दिवशी १०० टक्के मतदान करण्याबाबतचे आवाहन विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. या उपक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील माहिम येथील शिवाजी पार्क लायन्स डेफ स्कूल, दादर येथील श्रीमती कमला मेहता अंधशाळा, माटुंगा येथील मीरा विद्यालय विशेष मुलांची शाळा, शिवडी येथील जय वकील ऑटिझम सेंटर, माहीम येथील लायन्स स्कूल फॉर डेफ, सीपी टॅंक येथील ए.के. मुन्शी योजना स्कूल, नॅब वर्कशॉप फॉर ब्लाइंड या दिव्यांगासाठी कार्यरत शाळा व संस्था सहभागी झाल्या.

दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांग व्यक्तींची गृह भेट घेऊन त्यांना मतदानाच्यादिवशी व्हीलचेअर, मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहन सुविधा उपलब्धतेबाबत माहिती दिली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यक असलेले साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यकतेनुसार मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा (रिक्षा, टॅक्सी तसेच व्हीलचेअर युक्त वाहने) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाकरिता दिव्यांग मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, स्वच्छतागृहे, व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंध मतदारांना मतदान केंद्रावर ब्रेल लिपीमध्ये बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार व वय वर्षे ८५ व अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट म्हणजे घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांना उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधेची माहिती देण्यासाठी कर्णबधिर प्रवर्गाच्या शाळांनी सांकेतिक भाषेमध्ये रिल्स बनवून समाज माध्यमांद्वारे जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे, असे सुनीता मते, जिल्हा समन्वय अधिकारी दिव्यांग सुगम्यता, मुंबई शहर यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद, उच्च ध्येय गाठण्याचे केले आवाहन

0
गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका): आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी...

‘पीएम जनमन’ आणि ‘धरती आबा’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आदिवासी विकासाला गती द्या – आदिवासी...

0
आदिवासी संस्कृतीचे आदर्श दर्शन, प्रदर्शन आणि सादरीकरण व्हावे  गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका):  गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी 'पीएम जनमन' आणि 'धरती आबा' या केंद्र सरकारच्या...

‘धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन

0
गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका):  आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या 'धरती आबा' आणि 'पीएम जनमन' या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ शेवटच्या...

शिक्षण हेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना साध्य होण्याचे साधन  – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
पुणे, दि. ३०: संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अर्थात 'वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार...

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरण योजनेतर्गत पहिल्या प्रस्तावाला मंजुरी

0
छत्रपती संभाजीनगर, दि.३०, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरण योजनेतर्गत प्राप्त प्रस्तावाला महानगर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त जितेंद्र...