शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
Home Blog Page 816

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा; लोकशाही समृद्ध करण्याचा संकल्प करु या- विभागीय आयुक्त मधुकर अर्दड  

छत्रपती संभाजीनगर, दि. (जिमाका):- मतदान करणे हा आपला हक्क असून मतदान करुन आपण आपली लोकशाही अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करु या,असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी आज मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज देवगिरी पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. नंतर शानदार संचलन होऊन मानवंदना देण्यात आली.

या सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस पदक सन्मान व आदर्श तलाठी पुरस्कार

या सोहळ्यात विभागीय आयुक्त अर्दड यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व पदक देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात पोलीस अधीक्षक संदीप पालवे, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, कृष्णचंद्र केशवराव शिंदे, सहा. पोलीस उपनिरीक्षक अशोक गंगावणे, कैलास कामठे, संदेश किर्तीकर, संतोष उफाडे, सहा. फौजदार अनिल भावसार, सुरेश नवले, विश्वास शिंदे, हवलदार विजय कुरकुरे, नवनाथ खांडेकर, सिद्धार्थ थोरात, नदीम शेख, नामदेव शिरसाठ, शरद झोंड, कासिम शेख, ज्ञानेश्वर पगारे, किशोर काळे, राजकुमार जोनवाल, पोलीस नाईक मिलिंद इपर, हवलदार भिमराज जिवडे, विजय कर्पिले, शिपाई गौरव जोगदंड, विलास सुंदर्डे, नितीष घोडके, रविंद्र खरात, गोपाल सोनवणे यांचा समावेश होता. तसे योगेश लक्ष्मणराव पंडीत माळीवाडा तलाठी यांना आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विभागीय माहिती कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. याप्रसंगी माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे, सहायक अधीक्षक प्रविण भानेगावकर, प्रदर्शन सहायक राजेंद्र वाणी आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण; महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा  

नाशिक, दिनांक १ मे, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे  यांनी ध्वजारोहण केले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, सर्व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, महाराष्ट्र राज्याला फार मोठा ऐतिहासिक, क्रांतिकारी, सांस्कृतिक, सामाजिक, पुरोगामी वारसा लाभला असून तो आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मराठी असल्याचा अभिमान जागृत करते.

प्रारंभी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदि वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या महाराष्ट्र गीत व अन्य स्फूर्तीदायक गीतांच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 20 मे रोजी नाशिक जिल्ह्यात मतदान होत असून, प्रत्येक नाशिककराने मतदान करावे, असे आवाहन करत उपस्थितांना शपथ दिली.

000

माध्यम प्रतिनिधी, अभ्यासक, विश्लेषकांना उपयुक्त नाशिक जिल्हा संदर्भ पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन  

नाशिक, दिनांक मे, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमिवर उपजिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, नाशिकच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नाशिक जिल्हा संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनाचे औचित्‍य साधून आज या संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व मान्यवरांच्या उपस्थितीत हस्ते आज संपन्न झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संदर्भ पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, सहाय्य‍क जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, नाशिक महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, तहसीलदार शाम वाडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा संदर्भ पुस्तिका लोकसभा निवडणक वार्तांकन करणारे सर्व प्रकारचे माध्यम प्रतिनिधी, अभ्यासक व विश्लेषकांना उपयुक्त व मोलाची ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुक संदर्भातील वार्तांकन करतांना माध्यमांना मागील निवडणुकीचे संदर्भ वेळोवेळी लागतात. या पुस्तिकेत विविध स्वरुपाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 1951 ते 2019 या कालावधीतील निवडणुकीतील विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते, मतदानाशी निगडीत आकडेवारी, जिल्ह्यातील महत्त्वाचे अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, पुरुष व महिला मतदार, मतदान केंद्र, आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची कार्यपद्धती, पेड न्यूज, प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे आदि माहिती समाविष्ट करण्यात आली आहेत.

या पुस्तिकेची संकल्पना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची आहे. त्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह (भा. पो. से), विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे मार्गदर्शन लाभले. या संदर्भ पुस्तिकेच्या निर्मितीसाठी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, नाशिक विभागाचे उपसंचालक (माहिती) ज्ञानोबा इगवे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

संदर्भ पुस्तिकेचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी केले असून, माहिती संकलन व संपादनासाठी माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक किरण डोळस व वरिष्ठ लिपिक जालिंदर कराळे यांनी परिश्रम घेतले.

 

000

मुंबई शहर जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद     

मुंबईदि. १ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज 1 मे 2024 रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत विविध वयोगटातील 450 पेक्षा  अधिक सायकलस्वार  या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

मुंबईतील वांद्रे म्हाडा कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. वांद्र्याच्या म्हाडा कार्यालयापासून चार विविध मार्गांवर ही रॅली काढण्यात आली. वांद्रे ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवलीवांद्रे ते अंधेरी क्रीडा संकुलवांद्रे ते एनसीपीए नरिमन पॉईंट आणि वांद्रे ते कालिदास सभागृहमुलुंड अशा चार मार्गांवर ही रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान विविध ठिकाणी सहभागी सायकलस्वारांनी नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला. सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदारांना जागृत करण्यात मदत होत आहे. सहा वर्षांच्या सायकलस्वारापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत यात हौशी तसेच व्यावसायिक सायकलस्वारांचा उत्साहपूर्ण सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुंबईत जनजागृती करण्यात येत आहे.

नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाने सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यांतील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वीप’ च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. रॅलीत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीकर्मचारी तसेच स्वीप चे पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीच्या समारोपप्रसंगी निवडक प्रतिनिधींना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

***

शैलजा पाटील/विसंअ/

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर, दि. 1 : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. लोकशाहीला अधिक मजबूत बनविण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी होऊन 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावू या, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, चेतना कॉलेज जवळ सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवुन करण्यात आली. या रॅली मध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी किरण महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त विश्वास मोटे, उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, स्वीप चे नोडल अधिकारी डॉ.सुभाष दळवी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार आणि जिल्ह्यातील सायकल ग्रुपचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

मुंबई उपनगर जिल्ह्यात 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज महाराष्ट्र दिनी या  बीवायसीएस, मुंबई व मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथून सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. त्यानंतर ही रॅली वेगवेगळ्या मार्गाने मार्ग बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, अंधेरी क्रीडा संकुल, एनसीपीए, दक्षिण मुंबई आणि मुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर  येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि मतदानाचे आपले कर्तव्य बजावण्याचा संकल्प केला. यावेळी स्वीपच्या माध्यमातून ‘मी मतदान करणार’ अशी प्रतिज्ञाही सर्वांनी घेतली.

 

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा

मुंबईदि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आज गौरवगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शिवाजी पार्क येथील मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.

 

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदेउपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळेसहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गायनाने करण्यात आली. महानगरपालिकेच्या संगीत अकादमीच्या वाद्यवृंदाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे वाद्य संगीताच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी राज्यपालांनी संगीत अकादमीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.

००००

पवन राठोड/विसंअ/

६५ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस : राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण            

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले.  राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

००००

65th Maharashtra State Foundation Day:

Governor Ramesh Bais hoists national flag at Raj Bhavan

Mumbai, May 1 : Maharashtra Governor Ramesh Bais hoisted the national tricolor on the occasion of the 65th Maharashtra State Foundation Day at Raj Bhavan, Mumbai on Wed (1 May).

The Governor saluted the national flag even as the national anthem and Maharashtra Rajya Geet were played on the occasion.

      Officers and staff of Raj Bhavan, State Reserve Police Force and Mumbai Police were present.

0000

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण  

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, तहसिलदार प्रज्ञा काकडे,  जिल्हा नियोजन अधिकारी श्री बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माविमचे जिल्हा व्यवस्थापक नितीन काळे, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक श्री.दामले, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण        

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या स्थापना दिन सोहळ्याप्रसंगी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपवनसंरक्षक निता कट्टे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी सर्वश्री डॉ. विकास खरात, राजीव शिंदे, अजयकुमार पवार, दादासाहेब कांबळे,  डॉ. स्नेहल कनिचे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनात पोलीस, पोलीस बँड, श्वान, निर्भया, बीडीडीएस, आदी पथकांचा समावेश होता.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

सोलापूर, दिनांक 1(जिमाका):- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. व जिल्ह्यात विविध धर्माचे, पंथाचे, वंशाचे, जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने, सलोख्याने एकतेच्या भावनेने नांदत असल्याचे सांगून सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करुया, असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.

 या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक, पत्रकार उपस्थित होते.

 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन. याच दिवशी महाराष्ट्राचा मंगलकलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे  राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या 105 हुतात्मांना ही श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात महान विभूतींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केले.

000

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल

0
राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कृषी खाते श्री. दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व...

शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व स्वावलंबनासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प क्रांतीकारी-कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
पुणे, दि. ३१: जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना...

गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडू – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. ३१ : सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठरावीक मर्यादेची शिथिलता...

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत

0
मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित...

स्वमग्न प्रकारातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळांकडून विविध सवलती – मंडळाच्या सचिवांचे स्पष्टीकरण

0
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र...