शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 746

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 22 : राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा, शांती व करुणेची शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक आहे. आज ही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे.

बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी मी भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करतो व सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. बैस यानी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Maharashtra Governor greets people on Buddha Pournima

Mumbai, 22nd May : The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people on the occasion of Buddha Pournima. In his message, the Governor has said:

“Bhagwan Buddha’s teachings of non-violence, peace and compassion have always guided mankind, societies and nations on the path of righteousness. These teaching are more relevant today than ever. I offer my pranams to Bhagwan Buddha and extend my heartiest greetings to the people on the auspicious occasion of Buddha Pournima.”

0000

भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मुंबई, दि. 21 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशी, सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तालयाच्या ddinfor@gmail.com या ई-मेलवर कळविण्यात याव्यात, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.

 

क्युआर कोड

 

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

 

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना मंत्रालयात अभिवादन

????????????????????????????

मुंबई, दि. २१ :  माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी श्रीमती कदम पाटील यांनी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी अवर सचिव राजेंद्र गायकवाड, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००

धोंडिराम अर्जुन/स.सं

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी    ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे- ५६.६१ टक्के
दिंडोरी-  ६२.६६ टक्के
नाशिक –  ५७.१० टक्के
पालघर- ६१.६५ टक्के
भिवंडी-५६.४१ टक्के
कल्याण –  ४७.०८ टक्के
ठाणे –   ४९.८१  टक्के
मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के
मुंबई उत्तर मध्य – ५१.४२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के
मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के
0000

नैसर्गिक आपत्ती, पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी – विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड

छत्रपती संभाजीनगर, दि. २० (विमाका) : यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून यापूर्वीची काही भागातील अतिवृष्टी व पुरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर विभाग मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत, लातूर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून  दूरदृश्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कर्नल ऋषिकेश सुर्यवंशी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त जगदिश मिनीयार, नयना बोंदार्डे, सुरेश वेदमुथा, ॲलीस पोरे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले की, पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने नागरिकांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रीबाबत नियोजनपुर्वक व्यवस्था करावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने तत्परतेने नियोजन करावे. जिल्हा व तालुकास्तरावर असलेला नियंत्रण कक्ष 24×7 नेहमी कार्यान्वित ठेवावा. आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत, तसेच हे क्रमांक नेहमी सक्रीय असतील याची दक्षता घ्यावी. एसडीआरएफ तसेच एनडीआरएफची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घेण्यासोबतच जिल्हानिहाय या यंत्रणेत प्रत्येक वर्षी 100 ने वाढ करावी. महानगरात असलेले मोठे नाले, नदी यावर ये-जा करण्यासाठी असलेला लोखंडी मार्ग चांगला आहे किंवा कसे याबाबत तपासणी करावी, आवश्यकता असेल तिथे तातडीने बदल करावा. महानगरातील नाल्यांची सफाई कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण इमारती, पूलांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबतही तत्परतेने तपासणी करावी. महानगरातील ज्या भागात पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्यासाठी तेथील नागरिकांचे स्थलांतर कुठे करावे याबाबत पूर्वतयारी करावी. अशा सूचनाही विभागीय आयुक्त श्री अर्दड यांनी दिल्या.

घाटकोपर, मुंबई येथे जाहिरात फलक कोसळण्याची घटना घडली आहे. मान्सून पूर्व कालावधीत व अन्य कालावधीत होणाऱ्या दुर्घटनामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी शहरी भागातील व महामार्गावरील लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांची रचनात्मक तपासणी करण्यात यावी. तपासणीअंती आढळून आलेले अवैध जाहिरात फलकाबाबत संबधितावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. आपल्या अधिनस्त क्षेत्रात जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांची मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारीबाबत जिल्हानिहाय जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी बैठकीत माहिती दिली.

यावेळी आपत्ती विभागाशी सबंधित विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

०००

१३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ४८.६६ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे-  48.81 टक्के

नाशिक – 51.16 टक्के

दिंडोरी- 57.06 टक्के

ठाणे – 45.38 टक्के

कल्याण – 41.70 टक्के

पालघर- 54.32 टक्के

भिवंडी- 48.89 टक्के

मुंबई उत्तर – 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के

मुंबई दक्षिण – 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

०००

 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान

मुंबई, दि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे-  39.97 टक्के

दिंडोरी- 45.95 टक्के

नाशिक – 39.41 टक्के

पालघर- 42.48 टक्के

भिवंडी- 37.06 टक्के

कल्याण – 32.43 टक्के

ठाणे – 36.07 टक्के

मुंबई उत्तर – 39.33 टक्के

मुंबई उत्तर मध्य – 37.66 टक्के

मुंबई उत्तर पूर्व – 39.15 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – 39.91 टक्के

मुंबई दक्षिण – 36.64 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के

0000

राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे दक्षिण मुंबईत मतदान

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. राजभवन येथील भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनीही मतदान केले.

००००

Lok Sabha Elections 2024: Governor Ramesh Bais casts vote in South Mumbai

Mumbai Dated 20 : Maharashtra Governor Ramesh Bais cast his vote for the Lok Sabha election at the Raj Bhavan Club polling both at Malabar Hill coming under South Mumbai Lok Sabha constituency. Wife of the Governor, Rambai Bais also cast her vote at the polling booth.

0000

१३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान

मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७ वा.पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक – २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण – २२.५२ टक्के
ठाणे – २६.०५ टक्के
मुंबई उत्तर – २६.७८ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के

०००

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक – १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण – ११.४६ टक्के
ठाणे – १४.८६ टक्के
मुंबई उत्तर – १४.७१ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...