शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 747

१३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ४८.६६ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे-  48.81 टक्के

नाशिक – 51.16 टक्के

दिंडोरी- 57.06 टक्के

ठाणे – 45.38 टक्के

कल्याण – 41.70 टक्के

पालघर- 54.32 टक्के

भिवंडी- 48.89 टक्के

मुंबई उत्तर – 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के

मुंबई दक्षिण – 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

०००

 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान

मुंबई, दि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे-  39.97 टक्के

दिंडोरी- 45.95 टक्के

नाशिक – 39.41 टक्के

पालघर- 42.48 टक्के

भिवंडी- 37.06 टक्के

कल्याण – 32.43 टक्के

ठाणे – 36.07 टक्के

मुंबई उत्तर – 39.33 टक्के

मुंबई उत्तर मध्य – 37.66 टक्के

मुंबई उत्तर पूर्व – 39.15 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – 39.91 टक्के

मुंबई दक्षिण – 36.64 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के

0000

राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे दक्षिण मुंबईत मतदान

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. राजभवन येथील भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनीही मतदान केले.

००००

Lok Sabha Elections 2024: Governor Ramesh Bais casts vote in South Mumbai

Mumbai Dated 20 : Maharashtra Governor Ramesh Bais cast his vote for the Lok Sabha election at the Raj Bhavan Club polling both at Malabar Hill coming under South Mumbai Lok Sabha constituency. Wife of the Governor, Rambai Bais also cast her vote at the polling booth.

0000

१३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान

मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७ वा.पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक – २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण – २२.५२ टक्के
ठाणे – २६.०५ टक्के
मुंबई उत्तर – २६.७८ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के

०००

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक – १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण – ११.४६ टक्के
ठाणे – १४.८६ टक्के
मुंबई उत्तर – १४.७१ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- ६.९२ टक्के
दिंडोरी- ६.४० टक्के
नाशिक – ६.४५ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के
कल्याण – ५.३९ टक्के
ठाणे – ५.६७ टक्के
मुंबई उत्तर – ६.१९ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के

ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात विविध सोयी सुविधा उपलब्ध – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि. २० (जिमाका) – ठाणे जिल्ह्यातील २३ भिंवडी, २४ कल्याण, २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघाच्या विविध मतदान केंद्रांवर २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदारांना आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.

जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात मिळून 6604 मतदान केंद्रे आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना सोईचे व्हावे, यासाठी सर्वच मतदान केंद्रे तळमजल्यावर आणली आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, फर्निचर व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक फलक, मतदान केंद्रावर सावली, पाळणाघर, मार्गदर्शक फलक, मतदान सहाय्यता केंद्र, प्रथमोपचार पेटी, रांगेचे व्यवस्थापन आदी व्यवस्था जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे.

मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी १:१२ उतार असलेला रॅम्प उभारण्यात आले आहे, जेणेकरुन जेष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे होईल. मतदान केंद्रावर नळाचे शुध्द पाणी उपलब्ध होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 100 लिटर थंड पिण्याचे पाणी व पाणी पिण्यास पर्यावरण पूरक ग्लास ठेवण्यात येणार असून यासाठी एका स्वयंसेवकाची नेमणूक केली आहे.

मतदान केंद्रावर महिला मतदार व पुरुष मतदार यांच्यासाठी स्वतंत्र, पक्के, स्वच्छ व पुरेशा  पाण्याची सोय असलेले स्वच्छतागृह उपलब्ध असणार आहेत. जेथे पक्क्या स्वरुपाचे स्वच्छतागृह उपलब्ध नसेल तेथे मोबाईल टॉयलेट व्हॅन संबंधित महानगरपालिका / नगरपालिका /नगरपरिषद यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी मतदानाच्या दिवशी स्वच्छता कर्मचारी याठिकाणी उपस्थित असणार आहेत.

उमेदवार प्रतिनिधींसाठी त्याचबरोबर निवडणुकीचे कामकाज करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी पुरेशा प्रमाणात टेबल, खुर्च्या व रांगेतील उभा असणाऱ्या मतदारांना बसण्यासाठी मतदान केंद्रावर पुरेसे खुर्च्या / बाक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर पुरेशी प्रकाश व्यवस्था व पंखे उपलब्ध केले जाणार आहे तसेच मतदान केंद्रावरील वीज कनेक्शन सुरु असल्याबाबत खात्री करण्यात आली आहे.

मतदारांना मतदान केंद्र सापडावे, यासाठी किमान 4 दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. हे दिशादर्शक फलक संबंधित मतदान केंद्रात नोंदणी असलेल्या मतदार राहत असलेल्या ठिकाणी प्रमुख चौकात लावण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या ठिकाणाचा ले आऊट व सुविधा जसे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, मतदान सहाय्यता केंद्र असे फलक लावण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर रांगेतील उभ्या मतदारांना ऊन लागू नये यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणी पाळणाघर असावे या उद्देशाने मतदान केंद्रावर मुलांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदारांच्या माहितीसाठी मतदार सहाय्यता केंद्र

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचा यादीतील नाव, भाग क्रमांक, अनुक्रमांक तसेच कोणते मतदान केंद्र आहे हे कळावे यासाठी बीएलओ व त्याची टिम मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. मतदार सहाय्यता केंद्रातही पुरेशा प्रमाणात सुविधा देण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रावर पुरेश्या औषध साठ्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सध्या उष्णतेची लाट असल्याने पुरेसे ओआरएस (ORS) व ग्लुकोज (Glucose) पावडर याठिकाणी उपलब्ध असणार आहे. तसेच हिट स्ट्रोक (Heat stroke) टाळण्यासाठी काय करावे, याचे माहितीपत्रक सर्व निवडणूक विषयक कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. सेक्टर ऑफिसर सोबतही एक आरोग्य कर्मचारी, प्रथमोपचार पेटी (Medical Kit) सह उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात प्रत्येक एक तासांनी प्रत्येक मतदार केंद्रावर पोहचेल, अश्या पध्दतीने एक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

मतदारांना सोबत डोक्यावर ओला रुमाल, कपडा आणण्यासाठी व शक्यतो लहान मुलांना सोबत घेऊन येऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

 

 

 

‍25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील नाविन्यपूर्ण मतदार केंद्रे

ठाणे,दि. १९ (जिमाका) :  ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानासाठी 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त  नागरिकांनी मतदान करावे असे  आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग आणि युवा ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत

सखी मतदान केंद्रे : 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 436 (रॉयल कॉलेज), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 439 (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. 2 तळमजला), 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 199 (नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क, ओपन स्पेस पार्टीशन 1 रोड नं. 22 वागळे इस्टेट, ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 265 (एनकेटी महाविद्यालय, खारकर आळी, तळमजला सभागृह ठाणे), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 152 (सरस्वती हायस्कूल, तळमजला, सेक्टर 5, ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 124 (सेव्हनडे ॲडव्हेटेन्ज हायर सेकंडरी स्कूल,सेक्टर 8 सानपाडा) येथे सखी मतदान केंद्रे असणार आहेत.

दिव्यांग मतदान केंद्रे-  145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 191 (बिशॉप इंटरनॅशनल स्कूल), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 326 (टीएमसी जिद्द शाळा, तळमजला वसंतविहार, ठाणे ) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 306 (विठ्ठल रुक्मिणी सेवा संघ, कमल तलावासमोर, पार्टीशन नं 2 गांधी नगर रोड, गांधीनगर ठाणे ), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 283 (सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, तळमजला, पाचपाखाडी), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 141 (दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी ग्राऊंड फ्लोअर, ऐरोली सेक्टर 16), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 205 (स्किल ॲण्ड ॲबॅलीटी बॉईज स्कूल, सेकटर 11 प्लॉट नं. 9 नेरुल नवी मुंबई) येथे ती असणार आहेत.

युवा मतदान केंद्रे  – 145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 196 (भाईंदर सेकंडरी स्कूल, तळमजला रुम नं 1), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 332 (शिवाई विद्यालय, शिवाई नगर, ठाणे) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 170 (ठाणे मॅन्युफॅक्चर असोसिएशन, जे.के. ऑडीटोरीयम हॉल, वागळे इस्टेट ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 353 (विद्याप्रसारक मंडळ कॉमर्स ॲन्ड आर्टस कॉलेज, बि नं 3, बांदोडकर कॉलेज ऑफ कॉमर्स, ठाणे ), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 169 (जमनाबाई जनार्दन माधवी नवी मुंबई महापालिका शाळा क्र 48 तळमजला, सेक्टर 7 दिवा गांव ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 28 (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी) येथे तयार करण्यातआली आहेत.

000

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क

ठाणे, दि. १९ (जिमाका)   ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. आज या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात येत आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे –

  • 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघ – एकूण मतदार – 2087604 (पुरुष मतदार-1129714, महिला मतदार-957191, तृतीय पंथी मतदार-339, सेवा मतदार-360).

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

  • 134-भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 324046 (पुरुष मतदार-168329, महिला मतदार-155638, तृतीय पंथी मतदार-11, सेवा मतदार-68).

  • 135-शहापूर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 279176 (पुरुष मतदार-143402, महिला मतदार-135735, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-39).

  • 136-भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 304975 (पुरुष मतदार-176499, महिला मतदार-128338, तृतीय पंथी मतदार- 122, सेवा मतदार-16)

  • 137-भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 336124 (पुरुष मतदार-198044, महिला मतदार-137887, तृतीय पंथी मतदार- 179, सेवा मतदार-14)

  • 138-कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 400278 (पुरुष मतदार-212612, महिला मतदार-187514, तृतीय पंथी मतदार- 12, सेवा मतदार-140).

  • 139-मुरबाड विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 443005 (पुरुष मतदार-230828, महिला मतदार-212079, तृतीय पंथी मतदार- 15, सेवा मतदार-83).

24-कल्याण लोकसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 2082800 (पुरुष मतदार-1117414, महिला मतदार-964021, तृतीय पंथी मतदार-786, सेवा मतदार-579).

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

  • 140 – अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 353661 (पुरुष मतदार-189844, महिला मतदार-163654, तृतीय पंथी मतदार- 56, सेवा मतदार-107).

  • 141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 257477 (पुरुष मतदार-139848, महिला मतदार-117422, तृतीय पंथी मतदार- 97, सेवा मतदार-110).

  • 142-कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 299518 (पुरुष मतदार-159289, महिला मतदार-139684, तृतीय पंथी मतदार- 407, सेवा मतदार-138).

  • 143-डोंबीवली विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 275172 (पुरुष मतदार-143196, महिला मतदार-131914, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-62).

  • 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 453221 (पुरुष मतदार-248124, महिला मतदार-204902, तृतीय पंथी मतदार- 123, सेवा मतदार-72)

  • 149-मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 443751 (पुरुष मतदार-237113, महिला मतदार-206445, तृतीय पंथी मतदार- 103, सेवा मतदार-90).

25 – ठाणे लोकसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 2508072 (पुरुष मतदार-1348163, महिला मतदार-1159002, तृतीय पंथी मतदार-207, सेवा मतदार-700).

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

  • 145- मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार  – 457391 (पुरुष मतदार-242966, महिला मतदार-214389, तृतीय पंथी मतदार- 4, सेवा मतदार-32)

  • 146-ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 509346  (पुरुष मतदार-273272, महिला मतदार-235928, तृतीय पंथी मतदार- 27, सेवा मतदार-119).

  • 147-कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 328185 (पुरुष मतदार-175561, महिला मतदार-152472, तृतीय पंथी मतदार- 21, सेवा मतदार-131)

  • 148-ठाणे विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 357684 (पुरुष मतदार-185857, महिला मतदार-171681, तृतीय पंथी मतदार- 7, सेवा मतदार-139).

  • 150-ऐरोली विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 457611 (पुरुष मतदार-257611, महिला मतदार-199715, तृतीय पंथी मतदार- 130, सेवा मतदार-155).

  • 151- बेलापूर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 397855 (पुरुष मतदार-212896, महिला मतदार-184817, तृतीय पंथी मतदार- 18, सेवा मतदार-124).

 

००००००

निवडणूक साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले

धुळे, दि. १९ (जिमाका) :  निवडणूकीचा उत्सव अर्थात 18 वी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतदान प्रकिया सात टप्प्यात पार पडत आहे. राज्यातील पाचव्या टप्प्यात 02-धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज सोमवार, 20 मे, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त व राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण 17 हजार 341 मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयापासून रविवार सकाळी मतदान साहित्य घेवून अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचले आले. आज सोमवार, दि. 20 रोजी सकाळी 7 वाजेपासून सहा विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचेसह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

02-धुळे लोकसभा मतदार संघात 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक मतदानासाठी पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रकिया पार पडणार आहे. जिल्ह्यात धुळे मतदार संघात 1 हजार 969 मतदान केंद्रांवर संबधीत विधानसभा क्षेत्रनिहाय इव्हिएम, बॅलेट मशीन, व्हिव्हीपॅट, बॅटरी युनिट, मतदान कक्ष बॉक्स आदी मतदान साहित्यासह नेमून दिलेल्या एसटी बस, स्कूल बस वा अन्य नियोजित वाहनाने नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहोचले आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात 1969 मतदान केंद्र

धुळे लोकसभा मतदारसंघात 1 हजार 948 मुळ मतदान केंद्र तर 21 सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण 1 हजार 969 मतदान केंद्र आहेत. त्यात धुळे ग्रामीण 375, धुळे शहर 280, सहाय्यकारी मतदान केंद्र 8, शिंदखेडा 338, मालेगाव मध्य 343 सहाय्यकारी मतदान केंद्र 2, मालेगाव बाहृय 337, सहाय्यकारी मतदान केंद्र 6, तर बागलाण विधानसभा मतदार संघात 288 मतदान केंद्र सहाय्यकारी मतदान केंद्र 5 आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वितरीत करण्यात आले. 986 मतदान केंन्द्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 13 मतदान केंद्र शॅडो मतदान केंद्र आहेत.  याठिकाणी वॉकीटॉकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी 153 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून 17 अतिरिक्त अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहे.

सहा मतदारसंघात 20 लक्ष 22 हजार 61 मतदार

धुळे लोकसभा मतदार संघात एकूण 20 लक्ष 22 हजार 61 मतदार आहेत. त्यात धुळे ग्रामीण  विधानसभा मतदार संघात 2 लाख 3 हजार 939 पुरुष मतदार तर 1 लाख 89 हजार 558 महिला मतदार व 1 तृतीयपंथी तसेच 1067 सैनिक मतदार आहेत. तर धुळे शहर विधानसभा मतदार संघात 1 लाख 79 हजार 568 पुरुष मतदार तर 1 लाख 64 हजार 226 महिला मतदार व 27 तृतीयपंथी तसेच 332 सैनिक मतदार आहेत. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात 1 लाख 69 हजार 648 पुरुष मतदार तर 1 लाख 62 हजार 196 महिला मतदार व 1 तृतीयपंथी तसेच 530 सैनिक मतदार आहेत. मालेगांव मध्य विधानसभा मतदारसंघात 1 लाख 57 हजार 512 पुरुष मतदार तर 1 लाख 44 हजार 871 महिला मतदार तर 8 तृतीयपंथी तसेच 75  सैनिक मतदार आहेत. मालेगांव बाहृय विधानसभा मतदारसंघात 1 लाख 89 हजार 468 पुरुष मतदार तर 1 लाख 71 हजार 339 महिला मतदार व 8 तृतीयपंथी तसेच 689 सैनिक मतदार आहेत. तर बागलाण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 51 हजार 793 पुरुष मतदार तर 1 लाख 37 हजार 896 महिला मतदार व 2 तृतीयपंथी तसेच 521 सैनिक मतदार आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघात 12 हजार 76 दिव्यांग मतदार असून या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच मदतीसाठी  1 हजार 48 स्वंयसेवकाची नियुक्ती केली आहे.

मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आरोग्य व अत्यावश्यक सुविधा

निवडणूक मतदानासाठी प्रशासन सर्वतोपरी सिद्ध झाले आहे. मतदार संघात तापमानाची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ, गर्भार महिला, लहान बालकांच्या माता असलेल्या महिला मतदारांसाठी व लहान मुलांसाठी पाळणाघर आदी व्यवस्था असून अंगणवाडी, बालवाडी सेविका, मदतनीस तैनात केलेल्या आहेत. तसेच अन्य मतदारांसाठी उन्हाचा त्रास होउ नये म्हणून सावलीसाठी मंडप, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, आपत्कालीन प्रसंगी रूग्णवाहिका आदी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघामधून 18 उमेदवार निवडणूक रिंगणात

धुळे लोकसभा मतदार संघात 18 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हीएम चा वापर केला जाणार आहे.

24 आदर्श, सखी महिला, युवा, दिव्यांग मतदान केंद्राची निर्मिती

या निवडणूकीत मतदार संघातील विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी एक आदर्श, सखी महिला, युवा, दिव्यांग मतदान केंद्र याप्रमाणे संपूर्ण लोकसभा मतदार संघात 24 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी मतदान केंद्रानुसार, महिला, युवा व दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे शहरात मतदान केंद्र क्रमांक 121 गरुड प्राथमिक शाळा पारोळा रोड, धुळे दक्षिणेकडील इमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक दोन येथे आदर्श मतदान केंद्र, मतदान केंद्र क्रमांक 51 उन्नती शाळा देवपूर धुळे पुर्वेकडील खोली क्र 3 येथे महिला संचलित मतदान केंद्र, मतदान केंद्र क्रमांक 9  एकविरा विद्यालय देवपूर,धुळे उत्तरेकडील इमारत पश्चिमेकडून खोली क्रमांक2 येथे युवा संचलित मतदान केंद्र, मतदान केंद्र क्रमांक 70 महाराणा प्रताप शाळा देवपूर धुळे दक्षिणेकडील इमारत खेाली क्रमांक 1 येथे दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापित केले आहे.

मतदान केंद्रांवर मोबाईलला बंदी

 मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कार्डलेस फोन, वायरलेस सेटसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरास, बाळगण्यास निर्बंध आहेत. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. त्यामुळे समूहाने मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेरच ठेऊन जावे लागणार आहे. किंवा एकमेकांजवळ सांभाळायला द्यावे लागणार आहे.

सर्व सोयींनी परिपूर्ण असणार मतदान केंद्र

   धुळे लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात उभारण्यात आलेल्या 1969 मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मतदान केंद्रावर परिपूर्ण सोयी करण्यात आल्या आहेत. त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, उन्हाळयातील वाढते तापमान लक्षात घेऊन प्रथमोपचार पेट्या, आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी ओआरएसचे पाकिटे तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था

सोमवारी 20 मे रोजी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुव्यवस्थितरित्या व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून देखील पुर्ण तयारी करण्यात आली आहे. यात प्रत्येक ईव्हीएम मशीन सोबत एक पोलीस आणि होमगार्ड तैनात आहेत. तसेच मतदान केंद्राच्या बाहेर 100 मिटर अंतरावर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याशिवाय बाहेरील कर्नाटक तसेच केरळ राज्यातून अतिरिक्त पोलीस कुमक बंदोबस्तासह मुंबई लोहमार्ग पोलीस बलासह अन्य जिल्ह्यातून देखील पोलीस व होमगार्डस पथक दाखल झाले आहेत. सर्व विधानसभा मतदार संघात पोलीस दलाचा रुटमार्च करण्यात आला आहे. क्रीटीकल व गर्दीच्या मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गृहभेटीद्वारे जनजागृती व मतदार चिठ्ठीचे वाटप

या निवडणूकीत मतदानाचा टक्क वाढावा, याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशान नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाच्या सुचनांनुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात तर धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात अधिकारी, कर्मचारी यांनी गृहभेटीद्वारे नागरीकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली असून या मतदार संघात बीएलओ मार्फत 19 लाख 18 हजार 831 मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले असून 4 लाख 80 हजार 877 घरांना वोटर गाईडचे वाटप करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी देखरेखीसाठी वॉर रुमची व्यवस्था

धुळे लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी मतदानाच्या दिवसाचे अहवाल, ईव्हीएमबाबतचे अहवाल, कंट्रोल रुम, मिडीया कंट्रोल रुम, मतदार समस्या निवारण कक्ष (1950 टोल फ्री), आचारसंहिता कक्ष, वेब कास्टिंग, जीपीएस मॉनिटरिंग कंट्रोल रुम, सायबर सेल, तक्रार हाताळण्याची व्यवस्था (सी व्हीजील कक्ष) आदि तैनात ठेवण्यात आले आहे. याद्वारे संपूर्ण मतदार संघातील घडामोडींवर नजर ठेवण्यात येणार आहे.

1853 गृह मतदान, अत्यावश्यक सेवा व इटीपीबीएमएस मतदारांनी केले मतदान

निवडणूक आयोगाने या निवडणूकीपासून प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार मतदार संघात 390 गृह मतदार, 1275 अत्यावश्यक सेवेतील मतदार तर 188 इटीपीबीएमएस असे एकूण 1853 मतदारांना आतापर्यंत मतदान केले आहे.

नागरिकांनी निर्भयपणे मतदानाला यावे

02-धुळे लोकसभा मतदार संघात आज दि. 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे. प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या सोबतच जिल्ह्यात निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आपला हक्क बजवावा व मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

०००

ताज्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
नवी दिल्ली १२: भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक...

हॉटेल मालकांनी संप न करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. १२: हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन (आहार संघटना) यांनी 14 जुलै रोजी एक दिवसीय लाक्षणीय संप करण्याचे निवेदन दिले...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. १२: केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना केली असून त्याची अधिसूचना जाहीर केली आहे. राज्यातील...

जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विमानतळाच्या प्रगतीपथावरील कामांचा आढावा  रायगड, दि. १२(जिमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी

0
बारामती, दि.१२: तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे,  तसेच मंजूर कामांचा आराखडा तयार करताना...