रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 731

महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ

मुंबई, दि. २९ : केंद्रिय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्व राज्यांना मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत  अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले होते. महाराष्ट्रातील मतदान आकडेवारीत ही दोन्ही उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य, यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ ही   पाच टप्प्यात घेण्यात आली. त्यामध्ये एकूण  ६१.३३  इतके टक्के मतदान झाले.यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ही ३ कोटी ६ लाख ५६ हजार ६११ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या २ कोटी ६३ लाख ४८ हजार ७१७ इतकी आहे. तर इतर मतदार यामध्ये १ हजार ४५० जणांनी मतदानाचा हक्क बजावला.   २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत एकूण मतदार ५ कोटी ३८ लाख ३८ हजार ३८९ मतदारांनी मतदान केले होते त्याची  टक्केवारी  ६०.७१ इतकी होती.

प्रत्येक मतदान केंद्रासाठी केंद्राध्यक्षाकडील फॉर्म – १७ – सी नुसार झालेल्या मतदानाची माहिती त्या केंद्रावरील मतदान प्रतिनिधींना पुरवली जाते व अंतिमतः मतमोजणीच्या वेळेस त्याच आकडेवारीशी मतदार यंत्रावरील मतदानाचे आकडे पडताळून पाहिले जातात.

Encore या ECI च्या पोर्टल नुसार मतदारसंघ निहाय मतदानाची सविस्तर आकडेवारी सोबत जोडली आहे.

 

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/05/end_of_poll-_state-maharashtra_21-05-2024_1716304391-1.pdf” title=”end_of_poll-_state-maharashtra_21-05-2024_1716304391 (1)”]

0000

वंदना थोरात/विसंअ/

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

मुंबईदि. २९ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधरकोकण विभाग पदवीधरनाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार२६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत काही सूचना असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दि.३० मे पर्यंत त्या लेखी स्वरुपात मुख्य निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांना सादर कराव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले.

मंत्रालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत श्री.चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती संबंधितांना दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, सहनिवडणूक अधिकारी मनोहर पारकर यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. एस.चोक्कलिंगम यांनी सांगितले की,  विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ)निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दि.७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. या निवडणुकीकरिता शुक्रवार,  ७ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार१० जून २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार१२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६  जून २०२४ रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जूलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जूलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि.२४ मे २०२४ रोजी या निवडणूकीसाठीचे प्रसिद्धीपत्र जारी केले आहे. हे प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून तात्काळ संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. मुबंई पदवीधर तसेच कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त,कोकण विभाग, हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त, नाशिक तर मुबंई शिक्षक मतदारसंघासाठी विभागीय आयुक्त,कोकण विभाग निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.                                  

शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची आकडेवारी

या विधान परिषदेच्या निवडणूकांकरिता अंतिम मतदार यादी दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांकापर्यंत दि.७ जून २०२४ पर्यंत या यादीमध्ये सुधारणा करता येईल. त्यासाठी या दिनांकापूर्वी दहा दिवस आधी म्हणजे दि. २८ मे २०२४ पर्यंत  प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जातील.  दि.१ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात मुंबई मतदारसंघात  दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार  १४,५१५ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही १,४०४ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ रोजीची  एकूण मतदारसंख्या १५,९१९ इतकी आहे. यामध्ये मुंबई शहर २,७४८ मतदारसंख्या तर मुंबई उपनगरमध्ये १३,१७१ इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये मुंबई मतदारसंघात एकूण मतदार संख्या  १०,१७० इतकी होती.

नाशिक मतदार संघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार  ६४,८०२ इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही  १,७५५  इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यंत रोजीची एकूण मतदारसंख्या ६६,५५७ इतकी आहे. यामध्ये नाशिक २४,९६५ मतदारसंख्या तर धुळे ८,१६५, नंदुरबार ५,४९५, जळगांव १३,११४अहमदनगर १४,८१८  इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये नाशिक मतदारसंघात एकूण मतदार संख्या  ५३,८९२ इतकी होती.

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची आकडेवारी

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मुंबई मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण मतदारसंख्या ९१,२६३  इतकी संख्या असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही २५,६६० इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यंत रोजीची  एकूण मतदारसंख्या १,१६,९२३ इतकी आहे. यामध्ये मुबंई शहर मध्ये ३१,२२९ तर मुबंई उपनगरमध्ये ८५,६९४ इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची मुंबई या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही ७०,५१३ इतकी होती.

कोकण मतदारसंघात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण मतदारसंख्या १७,७५१० इतकी असून निरंतर अद्यतनामुळे झालेली वाढ ही  ३६,४०७ इतकी असून यानुसार दि.२८ मे २०२४ पर्यत रोजीची  एकूण मतदारसंख्या २,१३,९१७ इतकी आहे. यामध्ये पालघर मध्ये २५,११५  तर ठाण्या मध्ये ९५,०८३रायगडमध्ये ५३,५४३रत्नागिरी २२,२०५, सिंधुदुर्ग १७,९७१  इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची कोकण या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही १,०४,४८८ इतकी होती.

राज्यसभेवरील रिक्त झालेल्या पदासाठीच्या निवडणुकीबाबत

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांनी राज्यसभेवर निवड केलेल्या प्रफुल्ल पटेल,राज्यसभा सदस्य यांनी त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने दि. २७ मे २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्राद्वारे निवडणूक कार्यक्रम घोषित केला आह. दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे पद रिक्त झाले असून या पदाचा कालावधी दि. ४ जूलै, २०२८ पर्यंत  होता.या रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुरवारदि. ६ जून २०२४ रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक)नामनिर्दैशन पत्र दाखल करण्याचा अतिम दिनांक दि.१३ जून, २०२४, गुरवार आहे. दि.१४ जून २०२४, शुक्रवार रोजी नामनिर्दैशन पत्र छाननी करण्यात येईल तर दि.१८ जून, २०२४, मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहील.

मतदानाचा दिनांक २५ जून, २०२४ मंगळवार असून या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. दि.२५ जून मंगळवार रोजी सायं.५ वा. मतमोजणी केल्या जाईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवारदि. २८ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या निवडणूकीसाठी जितेंद्र भोळे, सचिव, (१) प्रभारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. अशी माहिती यावेळी श्री.चोक्कलिंगम यांनी दिली.

000

वंदना थोरात/विसंअ/

शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्षांची स्थापना

बीड, दि. 29 (जिमाका) : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्ष  २०२४-२५ मध्ये कृषि निविष्ठा वियाणे, खते व किटकनाशके योग्य दर्जाचे, योग्य वेळी व योग्य किमतीत मिळण्याच्या दृष्टीने तसेच तालुका निहाय पुरवठा होणाऱ्या निविष्ठांची विक्री सुरळीतपणे होण्यासाठी कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

कृषि निविष्ठा कक्ष हा खरीप हंगामसाठी दिनांक १५ मे ते दिनांक १५ ऑगस्ट व रब्बी हंगामासाठी दिनांक  १५  सप्टेंबर ते दिनांक १५ नोव्हेंबर या कालावधी आपल्याकडील मुळ पदभार सांभाळुन  आदेशान्वये देण्यात आलेले काम नियमीत पार पाडण्याचे सांगीतले आहे.

तक्रार निवारण कक्षात तक्रार निवारणा-या नोंदणीसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. शेतक-यांकडुन तक्रारी प्राप्त होताच नोंदवही मध्ये तक्रारदार शेतकऱ्यांचे नावे, तक्रारीच स्वरूपात तक्रार प्राप्त दिनांक, वेळ संपुर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक इ.असणे आवश्यक आहे. तक्रार प्राप्त होताच तात्काळ उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यासाठी खालील अधिकाऱ्यांची नावे दिलेली आहेत. त्यांना सकाळी 10 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत दिलेल्या संपर्क क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष दिलेल्या पत्त्यावर अर्ज  देऊन तक्रार नोंदवावी.

संपर्क अधिकाऱ्यांची नावे, पत्ता व संपर्क क्रमांक

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड,  के.एस. अंबुरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जि.अ.कृ.अ. कार्यालय बीड मो.नं.९०७५८७१७२७ , पी.एस. सोनवणे कृषि साहयक जि.अ.कृ.अ. कार्यालय बीड. कृषि विकास अधिकारी, जि.प.बीड श्री.एस.डी.गरंडे कृषि विकास अधिकारी, जि.प.बीड मो.न. ९४२३६९०८६,४ श्री. भंडारी ए. बी कृषि विस्तार अधिकारी, जि.प.बीड.  तालुका कृषि अधिकारी, बीड मो.नं. ९४२२७४४७४८, श्री.जी.एस. नागरगोजे कृषी अधिकारी, ताकृअ, बीड मो.न. ९४२३९८२३१९, तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, बीड  श्री. अनिरुध्द सानप कृषि अधिकारी, पं.स.वीड मो.नं.९८५०७८९९१८,  तालुका कृषि अधिकारी, पाटोदा, श्री.जी.यु. हिवराळे कृ.अ. ताकृअ.पाटोदा गो.नं.९४०४८५८८७२ तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, पंचायत पाटोदा. श्री. उदधव नेटके कृषि अधिकारी, पं.स.पाटोदा मो.नं.७५८८६३४८४५, तालुका कृषि अधिकारी, शिरुर कासार,  श्री.एन.बी. गर्जे कृषी अधिकारी, ता.कृ.अ. शिरूर (का) मो.न ९४२२१६२८४० तालुका शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, शिरुर.कासार श्री.बी. के. खेडकर कृषि अधिकारी, शिरूर पं.स.बीड मो.न. ७५८८३४१५८३,  तालुका कृषि अधिकारी, आष्टी,  श्री.जी.यु. हिवराळे कृ.अ. ताकृअ. पाटोदा मो.नं.९४०४८५८८७२तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, आष्टी,  श्री.एस.एन. राऊत कृषी अधिकारी, पं.स. आष्टी मो.न ९४२०४२२२३२,  तालुका कृषि अधिकारी, माजलगाव,  श्री.जे.एल. खेडकर कृषी अधिकारी, ता.कृ.अ. माजलगाव मो.न ९४२२३७४७९०,  तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, माजलगाव, श्री.एस.जे.हजारे कृषि अधिकारी, पंचायत समिती  माजलगाव मो.न. ७५८८६३४६९०,  तालुका कृषि अधिकारी, गेवराई, श्री. रवि मुंडे कृषी अधिकारी, ता.कृ.अ. गेवराई मो.न ८६२३०५६२९८, तालुका शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, गेवराई,  श्री.एस.यु.सुरडकर कृषि अधिकारी, पंचायत  समिती  गेवराई, मो.न. ९४२२७४३५८५, श्री. चेतन कांबळे, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी धारूर,  गो.न ९४०४७७६,८६७, पंचायत समिती, धारूर श्री. अमोल डाके, कृषि अधिकारी, पं.रा. धारूर गो.न. ९४२१८६५९५१, तालुका  कृषि अधिकारी, वडवणी, श्री.एस.आर.बांगर कृषी अधिकारी, ता.कृ.अ. वडवणी मो.न ९४२२६१८२००,  तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, वडवणी, श्री.एस.डी. घुगरे कृषि अधिकारी, पं.रा. वडवणी मो.न. ९९७०७६९५६३, तालुका कृषि अधिकारी, अंबाजोगाई, श्री. सुरेश ढाकणे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई मो.न ९४२३७७५२६३ तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, अंबाजोगाई श्री प्रविण मोरे,  कृषि अधिकारी, पं.स. अंबाजोगाई मो.न. ९४२२०८७०८१,  श्री. विकास अंभोरे तालुका कृषि अधिकारी, केज मो.न ७५६४३४२७१५ तालुका  शाखेचा कर्मचारी श्री. राठोड. पंचायत समिती, केज, कृषि अधिकारी, पं.स. केज मो.न. ९४०४२०१५६७, तालुका कृषी अधिकारी  परळी कोमल मोरे कृषी अधिकारी मो.न ७९७२७२८०३७,  तालुका कृषी अधिकारी, परळी,  तालुका  शाखेचा कर्मचारी,  पंचायत समिती, परळी श्री साखरे कृषि अधिकारी, पं.स. परळी मो.न. ९४०४२०१५६७

000

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

मुंबई, दि. २९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतर्वासिता (इंटर्नशिप) करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इच्छुकांना दि. १५ जून २०२४ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहे.

महासंचालनालयाद्वारे शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना मुद्रित, दृकश्राव्य, वेब, समाज माध्यम अशा विविध माध्यमांतून प्रसिद्धी दिली जाते. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे.

आंतर्वासिता कालावधी 3 महिन्यांचा असेल. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही. विद्यार्थ्यांच्या पात्रता/कौशल्यानुसार त्यांना मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी विविध शाखांमध्ये काम दिले जाईल. कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी असेल तथापि, संबंधित शाखांच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेतला जाईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणला जाईल. यशस्वीरित्या आंतरवासिता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

इथे करा अर्ज

इच्छुकांनी संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहिती, नमुन्यातील माहिती, पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी. पाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ आहे. अर्जाच्या नमुन्यासाठी महसंचालनालयाच्या महासंवाद या पोर्टलवर पुढील लिंकवर http://13.200.45.248/?p=127837  जाहिरात पहावी.

०००

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित माध्यम, दृक श्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे ;

  • आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा असेल.
  • विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार/कौशल्यानुसार विविध शाखांमध्ये काम देण्यात येईल. (मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी)
  • सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामकाजाची वेळ असेल. मात्र संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल
  • विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणण्यात येईल.
  • आंतरवासिता उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्ज कोठे करावा?

  1. इच्छुकांनी संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा. अथवा,
  2. ro.dgipr@maharashtra.gov.in या ई-मेलवर पीडीएफ (pdf) स्वरुपात पाठवावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहिती, नमुन्यातील माहिती, पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी. पाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ ही असेल.

या उपक्रमासंदर्भातील सर्वाधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राखून ठेवत आहे.

000

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/05/आंतरवासिता-2024-1-pdf.pdf” title=”आंतरवासिता 2024-1 pdf”]

पर्यटन संचालनालयाचे कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित

मुंबई, दि २८ : राज्यातील पर्यटन वृद्धीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे नरिमन भवन येथील मुख्यालय दि. ०६/०५/२०२४ पासून साखर भवन, चौथा मजला, रामनाथ गोएंका मार्ग, नरिमन पॉइंट मुंबई ४०००२१ येथे स्थलांतरित झाले आहे.

तरी, पर्यटन क्षेत्राशी निगडीत सर्व संस्था/ भागधारक, पर्यटक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १३२ व्या सत्राचा प्रवेश कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. २८ : सन २०२४-२०२५ या चालू होणाऱ्या वर्षातील दिनांक ०१ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३२ व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.

या प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थींकडून प्रतिमहिना ४५० रुपये व दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून १०० रुपये शुल्क आकारले जात असून या प्रशिक्षणासाठी, पात्र प्रशिक्षणार्थी निकष पुढीलप्रमाणे आहेत.

प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे, प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक / आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थींचा अर्ज विहित नमुन्यात परिपूर्ण असावा व त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई- ६१ येथे दिनांक २० जून २०२४ पर्यंत सादर करावेत.

अधिक माहिती करिता सचिन भालेराव, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो. 9920291237 व जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक मो. 7507988552 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

मुंबई, दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्वा. सावरकर यांना अभिवादन केले.

००००

Birth Anniversary of Swatantryaveer Savarkar

Governor Bais offers tributes to Veer Savarkar

 

Mumbai Dated 28 : Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of Veer Vinayak Damodar Savarkar on the occasion of the birth anniversary of Veer Savarkar at Raj Bhavan, Mumbai on Tue (28 May).

Officers and staff of Raj Bhavan also offered their respects to Veer Savarkar on the occasion.

0000

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.२८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

यावेळी उपसचिव रोशनी कदम पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

०००

धोंडिराम अर्जुन/स.सं

 

डॉ. भगवान पवार यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार

मुंबई, दि. २७ : जिल्हा परिषदेचे तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्याविरुद्ध विविध तक्रारी प्राप्त होत्या. यामध्ये आर्थिक भ्रष्ट्राचार, लैंगिक छळ आदींचा समावेश होता. या प्रलंबित तक्रारींची दखल राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने घेऊन सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार डॉ. पवार यांचे निलंबन महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार करण्यात आले आहे, असे उपसंचालक, आरोग्य सेवा यांनी स्पष्टीकरणात कळविले आहे.

डॉ. भगवान पवार यांना बडतर्फ नव्हे तर निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात चौकशी अधिक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी त्यांना नंदुरबार येथे मुख्यालय देण्यात आले आहे. या चौकशीदरम्यान त्यांना आणि संबंधित तक्रारदारांना आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी असणार आहे.

डॉ. भगवान पवार यांच्याविरुद्ध कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याशिवाय अनियमित कामकाज, अधिकारी/कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे, आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप अशा स्वरुपाच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. सतत तक्रारी प्राप्त होत असल्याने २९ एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाने सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असलेली तीन सदस्य‍ीय चौकशी समिती स्थापन केली होती.

डॉ. पवार यांच्या विरुद्ध असणाऱ्या तक्रारीसंदर्भात सखोल चौकशी करुन समितीने अहवाल दिला. त्यानुसारच डॉ. पवार प्रथमदर्शनी दोषी आढळून आले व त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. डॉ. पवार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 (1) (अ) मधील तरतुदीनुसार निलंबित करण्यात यावे तसेच निलंबन कालावधीत डॉ. पवार यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, नंदूरबार येथे ठेवण्यात यावे अशी चौकशी समितीने शिफारस केली व त्यानुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे, तसेच पुढील सविस्तर चौकशी व विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. यात कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ. पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तीचे पालन करणे आवश्यक असताना त्यांनी त्याचा भंग केला असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/

ताज्या बातम्या

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...