शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 725

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी

नांदेड दि. ४ जून:- १६- नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण विजयी झाले आहेत.वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना एकूण ५ लक्ष २८ हजार८९४ मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला.

४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणीला शांततेत सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीपासून आघाडीवर राहत वसंतराव चव्हाण यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली.  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांना २७ व्या फेरीनंतर त्यांना विजयी घोषित करुन प्रमाणपत्र बहाल केले.

तत्पूर्वी आज सकाळी ७.३० च्या सुमारास  निवडणूक निरीक्षक शंशाक मिश्र आणि समीरकुमार ओ. जे. व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विविध पक्षाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत स्ट्राँगरुम  उघडण्याची कार्यवाही केली. ८ वाजता स्ट्राँगरुम उघडून मतमोजणीला सुरुवात केली. सर्वप्रथम पोस्टल मत मोजणीला सुरुवात झाली. या सुमारास ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीला ही सुरुवात झाली. शासकीय तंत्रनिकेतनच्या तळमजल्यावर तीन विधानसभा मतदारसंघ तर पहिल्या माळ्यावर तीन मतदार संघ अशा पद्धतीने सहा विधानसभा क्षेत्रात ही मतमोजणी पार पडली.

सकाळी साडेदहाच्या सुमारास पहिला फेरीचा निकाल आला.पहिल्या मतमोजणी फेरीत भाजपाचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांनी १९ हजार ५४३ मते घेऊन १ हजार 386 मतांची आघाडी घेऊन पुढे होते. तर दुसऱ्या फेरीपासून काँग्रेसचे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी आघाडीवर कायम ठेवत शेवटच्या फेरीला ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले.

सकाळी आठ वाजता पासून सुरू झालेल्या मतमोजणीला रात्री वाजता २७ व्या फेरीच्या नंतर विराम मिळाला. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात. मतमोजणीसाठी विविध विभागाचे पाचशे कर्मचारी तर पोलीस विभागाचे 500 कर्मचारी असे जवळपास 1000 कर्मचारी मतमोजणीच्या कार्यात कार्यरत होते. नांदेड जिल्हा प्रशासनाने यावेळी मतदान प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी व मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी आद्ययावत व्यवस्था केली होती. त्यामुळे प्रचंड उन्हाचा दिवस असतानाही अतिशय गतीने विना अडथळा मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी केंद्राच्या बाहेर विस्तृत माध्यम केंद्र उभारण्यात आले होते. जिल्ह्यातील शंभरावर माध्यम प्रतिनिधी वृत्त संकलनासाठी या माध्यम केंद्रात गर्दी करून होते. नांदेड सह देशभरातील निवडणुकीचे निकाल विशाल एलईडी स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने केली होती.

 ११.२८ लक्ष मतांची मोजणी

नांदेड लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. नांदेड जिल्हयात एकूण 18 लाख 51 हजार 843 मतदार होते. यात 9 लाख 55 हजार 84 पुरुष तर 8 लाख 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयाचा समावेश होता. जिल्हयामध्ये ६०.९४ टक्के मतदान झाले एकूण ११ लक्ष २८ हजार ५६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज या सर्व मतांची मोजणी करण्यात आली.

 5315 टपाली मते

या निवडणुकीमध्ये 5315 टपाली मते मोजण्यात आली. यामध्ये निवडणुकीसाठी कार्यरत असणारे कर्मचारी, सैन्य दलात असणारे कर्मचारी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. आज झालेल्या मतमोजणी मध्ये विजयी उमेदवार वसंतराव चव्हाण यांना 2029 तर भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना २ हजार तर लढतीत तिसऱ्या क्रमांकावर न आलेले वंचित बहुजन आघाडीचे भोसीकर यांना 422 टपाली मते मिळाली.

 २७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी

नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्राच्या संख्येवरून प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या फेऱ्या ठरतात. जिल्हामध्ये नांदेड दक्षिण सर्वात मतदान केंद्र असणारा मतदारसंघ असल्याने या ठिकाणी 23 फेऱ्या झाल्या नायगाव व देगलूर मतदारसंघासाठी 25 फेऱ्या झाल्या तर भोकर  व मुखेड मतदार संघासाठी 26 फेऱ्या झाल्या तर नांदेड उत्तर मसदार संघासाठी  27 फेऱ्या घेण्यात आल्या.२७ फेऱ्यानंतर अंतिम निकाल घोषित करण्यात आला.

23 उमेदवारांची अंतिम आकडेवारी

यामध्ये चव्हाण वसंतराव बळवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस)- 528894 , चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी)-469452, पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी) -6901, अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी) -1510, अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी) – 92512, कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग) -1215, राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी) -737, रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) -903, सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी) -1890, हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) -878, तर अपक्षामध्ये कदम सुरज देवेंद्र (अपक्ष) -799, कल्पना संजय गायकवाड (अपक्ष) -1310, गजानन दत्तरामजी धुमाळ (अपक्ष) -950, जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष) -963, देविदास गोविंदराव इंगळे (अपक्ष) -1471, नागेश संभाजी गायकवाड (अपक्ष) -3318, निखिल लक्ष्मणराव गर्जे (अपक्ष) -4325, भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष) -2080, महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष) -913, राठोड सुरेश गोपीनाथ (अपक्ष) -808, लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष) -923, साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष) -1193, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे (अपक्ष) -681 तर नोटा मिळालेली मते 3628 अशी  अंतिम आकडेवारी आहे.

१६ तासांची अखंड धडपड

आज निवडणूक निरीक्षक शशांक मिश्न, समीरकुमार ओ. जे. यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकाळी ६ वाजतापासून निवडणूक कार्यात झोकून दिले होते. गेल्या 80 दिवसांपासून कर्मचारी या कार्यात कार्यरत असून मतमोजणीने निवडणूक कार्याला पूर्ण केल्याचे समाधान कर्मचाऱ्यांकडे होते.

 

000

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. शिवाजी काळगे विजयी

लातूर, दि. 04 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी घोषित करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

लातूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून रोजी लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे पार पडली. मतदान यंत्रावरील मत मोजणीच्या २८ फेऱ्या आणि टपाली मतमोजणीची एक फेरी झाली. यामध्ये डॉ. काळगे यांना सर्वाधिक ६ लाख ९ हजार २१ मते मिळाली. तसेच भारतीय जनता पार्टीचे सुधाकर तुकाराम श्रंगारे यांना ५ लाख ४७ हजार १४० मते मिळाली. त्यामुळे डॉ. काळगे हे ६१ हजार ८८१ मताधिक्याने विजयी झाले.

21- नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी घोषित

नाशिक, दिनांक 4 जून, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ ची २१ नाशिक लोकसभा मतदार संघाची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम, अंबड, नाशिक येथे शांततेत पार पडली. अंतिम निकाल जाहीर करताना निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांना विजयी घोषित केले.

२१ नाशिक लोकसभा मतदार संघात एकूण १२ लाख, ३१ हजार १९ वैध मतदान झाले. ४०९ मते अवैध ठरली. तर नोटा (NOTA) साठी ६ हजार १८५ मतदान झाले असल्याचे श्री. शर्मा यांनी सांगितले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत, भयमुक्त व पारदर्शी वातावरणात पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल श्री. शर्मा यांनी संबंधित सर्व यंत्रणा व पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त केले. प्रारंभी उपस्थितांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

विधानसभा मतदारसंघ निहाय अनुक्रमे कंट्रोल युनिट मते, पोस्टल मते व एकूण मते असा निकाल पुढीलप्रमाणे –
1) श्री. अरुण मधुकर काळे
१२० सिन्नर ६१९
१२३ नाशिक पूर्व १५४०
१२४ नाशिक मध्य १०५७
१२५ नाशिक पश्चिम १९३२

१२६ देवळाली १४१४
१२७ इगतपुरी ११३६
evm मते ७६९८
पोस्टल मते ५३
एकूण मते ७७५१

2) श्री. गोडसे हेमंत तुकाराम
१२० सिन्नर ३१२५४
१२३ नाशिक पूर्व १००३११
१२४ नाशिक मध्य ८४९०६
१२५ नाशिक पश्चिम १२४८२७
१२६ देवळाली ५४०६४
१२७ इगतपुरी ५८०५२
evm मते ४५३४१४
पोस्टल मते १३१४
एकूण मते ४५४७२८

3) श्री. राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे
१२० सिन्नर १५९४९२
१२३ नाशिक पूर्व ८९९११
१२४ नाशिक मध्य ८८७१२
१२५ नाशिक पश्चिम ९३६१७
१२६ देवळाली ८१२००
१२७ इगतपुरी १०१५८५
evm मते ६१४५१७
पोस्टल मते २२१२
एकूण मते ६१६७२९

4) श्री. अमोल संपतराव कांबळे
१२० सिन्नर ९९२
१२३ नाशिक पूर्व ६२८
१२४ नाशिक मध्य ३९६
१२५ नाशिक पश्चिम ५४२
१२६ देवळाली ७६०

१२७ इगतपुरी १६५९
evm मते ४९७७
पोस्टल मते १७
एकूण मते ४९९४

5) श्री. कमलाकर बाळासाहेब गायकवाड
१२० सिन्नर ३३०
१२३ नाशिक पूर्व १७७
१२४ नाशिक मध्य १२५
१२५ नाशिक पश्चिम १४६
१२६ देवळाली ३०२
१२७ इगतपुरी ५५९
evm मते १६३९
पोस्टल मते ७
एकूण मते १६४६

6) श्री. करण पंढरीनाथ गायकर
१२० सिन्नर ३३१८
१२३ नाशिक पूर्व ७७४३
१२४ नाशिक मध्य ४५७८
१२५ नाशिक पश्चिम ११५५४
१२६ देवळाली १०६०४
१२७ इगतपुरी ९३१७
evm मते ४७११४
पोस्टल मते ७९
एकूण मते ४७१९३

7) श्री. कांतीलाल किसन जाधव
१२० सिन्नर १९९
१२३ नाशिक पूर्व १००
१२४ नाशिक मध्य ७६
१२५ नाशिक पश्चिम १४२
१२६ देवळाली ३७४

१२७ इगतपुरी ११५६
evm मते २०४७
पोस्टल मते ८
एकूण मते २०५५

8) श्री. कैलास मारुती चव्हान
१२० सिन्नर २९४
१२३ नाशिक पूर्व १९२

१२४ नाशिक मध्य ११३
१२५ नाशिक पश्चिम १७७
१२६ देवळाली ३९१
१२७ इगतपुरी ५१९
evm मते १६८६
पोस्टल मते १७
एकूण मते १७०३

9) श्रीमती जयश्री महेंद्र पाटील
१२० सिन्नर ३९४
१२३ नाशिक पूर्व २९४
१२४ नाशिक मध्य २१९
१२५ नाशिक पश्चिम ३०९
१२६ देवळाली ४०९
१२७ इगतपुरी ७७३
evm मते २३९८
पोस्टल मते २८
एकूण मते २४२६

10) ॲङ झुंजार म्हसुजी आव्हाड
१२० सिन्नर २११
१२३ नाशिक पूर्व १६९
१२४ नाशिक मध्य ९४
१२५ नाशिक पश्चिम १२९
१२६ देवळाली २३१

१२७ इगतपुरी ३७१
evm मते १२०५
पोस्टल मते ५
एकूण मते १२१०

11) श्रीमती दर्शना अमोल मेढे
१२० सिन्नर ८३३
१२३ नाशिक पूर्व ४४३
१२४ नाशिक मध्य ३७३
१२५ नाशिक पश्चिम ४२३
१२६ देवळाली ७४४

१२७ इगतपुरी १९१४
evm मते ४७३०
पोस्टल मते ६
एकूण मते ४७३६

12) श्रीमती भाग्यश्री नितीन अडसुळ
१२० सिन्नर १९५
१२३ नाशिक पूर्व ११२
१२४ नाशिक मध्य ६९
१२५ नाशिक पश्चिम ९०
१२६ देवळाली १९५
१२७ इगतपुरी ५८१
evm मते १२४२
पोस्टल मते २
एकूण मते १२४४

13) श्री. यशवंत वाळु पारधी
१२० सिन्नर ३३९
१२३ नाशिक पूर्व १४९
१२४ नाशिक मध्य ९२
१२५ नाशिक पश्चिम ११५
१२६ देवळाली ३२५

१२७ इगतपुरी ८४७
evm मते १८६७
पोस्टल मते ७
एकूण मते १८७४

14) श्री. वामन महादेव सांगळे
१२० सिन्नर ८३४
१२३ नाशिक पूर्व २२३
१२४ नाशिक मध्य १७८
१२५ नाशिक पश्चिम १६३
१२६ देवळाली ५७६
१२७ इगतपुरी १८८७
evm मते ३८६१
पोस्टल मते ०
एकूण मते ३८६१

15) श्री. आरीफ उस्मान मन्सुरी
१२० सिन्नर ३६०
१२३ नाशिक पूर्व २६२
१२४ नाशिक मध्य २४९
१२५ नाशिक पश्चिम २७७
१२६ देवळाली ४१३
१२७ इगतपुरी ९७७
evm मते २५३८
पोस्टल मते ५
एकूण मते २५४३

16) श्री. कनोजे प्रकाश गिरधारी
१२० सिन्नर ६०३
१२३ नाशिक पूर्व ३५७
१२४ नाशिक मध्य २१७
१२५ नाशिक पश्चिम २४३
१२६ देवळाली ७९६
१२७ इगतपुरी १७०१
evm मते ३९१७

पोस्टल मते ३
एकूण मते ३९२०

17) श्री. कोळप्पा हनुमंत धोत्रे
१२० सिन्नर २१४
१२३ नाशिक पूर्व १२४
१२४ नाशिक मध्य १००
१२५ नाशिक पश्चिम १४२
१२६ देवळाली २३२
१२७ इगतपुरी ३८६
evm मते ११९८
पोस्टल मते २
एकूण मते १२००

18) श्री. गणेश बाळासाहेब बोरस्ते
१२० सिन्नर ३००
१२३ नाशिक पूर्व ३३९
१२४ नाशिक मध्य २५६
१२५ नाशिक पश्चिम ४००
१२६ देवळाली ५०१
१२७ इगतपुरी ६०७
evm मते २४०३
पोस्टल मते १
एकूण मते २४०४

19) श्री. चंद्रकांत केशवराव ठाकूर
१२० सिन्नर १९६९
१२३ नाशिक पूर्व ४९९
१२४ नाशिक मध्य ४९६
१२५ नाशिक पश्चिम ५६८
१२६ देवळाली ११९०
१२७ इगतपुरी १८८५
evm मते ६६०७
पोस्टल मते १
एकूण मते ६६०८

20) श्री. चंद्रभान आबाजी पुरकर
१२० सिन्नर ४८३
१२३ नाशिक पूर्व १५३
१२४ नाशिक मध्य १११
१२५ नाशिक पश्चिम १४९
१२६ देवळाली ३२०
१२७ इगतपुरी ६७२
evm मते १८८८
पोस्टल मते २
एकूण मते १८९०

21) श्री. जितेंद्र नरेश भाभे
१२० सिन्नर १९५
१२३ नाशिक पूर्व ७८९
१२४ नाशिक मध्य ४७४
१२५ नाशिक पश्चिम ८२४
१२६ देवळाली ४९१
१२७ इगतपुरी ३५२
evm मते ३१२५
पोस्टल मते ७
एकूण मते ३१३२

22) श्रीमती तिलोत्तमा सुनिल जगताप
१२० सिन्नर ९५
१२३ नाशिक पूर्व १०९
१२४ नाशिक मध्य ५९
१२५ नाशिक पश्चिम ८१
१२६ देवळाली १२०
१२७ इगतपुरी १९०
evm मते ६५४
पोस्टल मते २
एकूण मते ६५६

 

23) श्री. दिपक गायकवाड
१२० सिन्नर ८१
१२३ नाशिक पूर्व ७३
१२४ नाशिक मध्य ६०
१२५ नाशिक पश्चिम ९१
१२६ देवळाली १३९
१२७ इगतपुरी १९६
evm मते ६४०
पोस्टल मते २
एकूण मते ६४२

24) श्री. देविदास पिराजी सरकटे
१२० सिन्नर ४७
१२३ नाशिक पूर्व ५८
१२४ नाशिक मध्य ३४
१२५ नाशिक पश्चिम ४७
१२६ देवळाली ७१
१२७ इगतपुरी १३५
evm मते ३९२
पोस्टल मते २
एकूण मते ३९४

25)श्री. धनाजी अशोक टोपले
१२० सिन्नर १०७
१२३ नाशिक पूर्व १३०
१२४ नाशिक मध्य ७६
१२५ नाशिक पश्चिम १३८
१२६ देवळाली ४७४
१२७ इगतपुरी ४५१
evm मते १३७६
पोस्टल मते ०
एकूण मते १३७६

 

26)श्री. शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज
१२० सिन्नर ७३८९
१२३ नाशिक पूर्व ७८३१
१२४ नाशिक मध्य २६१७
१२५ नाशिक पश्चिम ८२९८
१२६ देवळाली १३०६३
१२७ इगतपुरी ५२१७
evm मते ४४४१५
पोस्टल मते १०९
एकूण मते ४४५२४

27)श्री. सचिनराजे दत्तात्रेय देवरे
१२० सिन्नर ९२
१२३ नाशिक पूर्व ५९
१२४ नाशिक मध्य ४०
१२५ नाशिक पश्चिम ५३
१२६ देवळाली १२२
१२७ इगतपुरी १८३
evm मते ५४९
पोस्टल मते २
एकूण मते ५५१

28)श्री. सिध्देश्वरानंद सरस्वती
१२० सिन्नर ३१३
१२३ नाशिक पूर्व २२९
१२४ नाशिक मध्य २१२
१२५ नाशिक पश्चिम ४३९
१२६ देवळाली ४५८
१२७ इगतपुरी ७२७
evm मते २३७८
पोस्टल मते १०
एकूण मते २३८८

 

29)श्री. सुधीर श्रीधर देशमुख
१२० सिन्नर ५१०
१२३ नाशिक पूर्व ३२३
१२४ नाशिक मध्य २१५
१२५ नाशिक पश्चिम २५२
१२६ देवळाली ५६६
१२७ इगतपुरी १२९६
evm मते ३१६२
पोस्टल मते ५
एकूण मते ३१६७

30)श्रीमती सुषमा अभिजित गोराणे
१२० सिन्नर ४३७
१२३ नाशिक पूर्व १३१
१२४ नाशिक मध्य १३४
१२५ नाशिक पश्चिम १२७
१२६ देवळाली ३६१
१२७ इगतपुरी १०६८
evm मते २२५८
पोस्टल मते २
एकूण मते २२६०

31) श्री. सोपान निवृत्ती सोमवंशी
१२० सिन्नर १५३
१२३ नाशिक पूर्व १०४
१२४ नाशिक मध्य ८१
१२५ नाशिक पश्चिम ११०
१२६ देवळाली २६१
१२७ इगतपुरी ५०१
evm मते १२१०
पोस्टल मते १
एकूण मते १२११

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू शहाजी छत्रपती तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी

दोन्ही ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पूर्ण

कोल्हापूर, दि.04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू शहाजी छत्रपती 1 लाख 54 हजार 964 मतांनी तर हातकणंगले मधून धैर्यशील माने 13 हजार 426 मतांनी विजयी झाले. दोन्ही लोकसभा मतदारसंघात दिनांक 7 मे रोजी मतदान झाले होते. कोल्हापूरमधून एकुण 23 उमेदवारांनी तर हातकणंगलेमधून 27 उमेदवारांनी निवडणूक लढवली.

47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रमणमळा व 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील शासकीय धान्य गोदाम इमारतींमध्ये शांततेत पार पडली. कोल्हापूर मतदारसंघांमध्ये निवडून आलेले शाहु शहाजी छत्रपती यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार धैर्यशील माने यांना संजय शिंदे यांच्या हस्ते विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मतमोजणी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 271 चंदगड – मल्लिकार्जुन माने, 272 राधानगरी -वसुंधरा बारवे, 273 कागल – सुशांत बनसोडे, 274 कोल्हापूर दक्षिण – हरिष धार्मिक, 275 करवीर – वर्षा शिंगण, 276 कोल्हापूर उत्तर – संपत खिलारी, 277 शाहूवाडी – समीर शिंगटे, 278 हातकणंगले – शक्ती कदम, 279 इचलकरंजी – मोसमी चौगुले, 280 शिरोळ – मोहिनी चव्हाण, 283 इस्लामपूर – श्रीनिवास अर्जुन व 284 शिराळा – रघुनाथ पोटे यांनी काम पाहिले. कोल्हापूरसाठी मतमोजणी निरीक्षक रोहित सिंग व अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक श्रीमती के.पोर्कोडी यांनी काम पाहिले. तर हातकणंगलेसाठी मतमोजणी निरीक्षक संदीप नांदुरी व अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक मदन लाल नेहरा यांनी काम पाहिले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी ठिकाणी व मतमोजणीबाहेरील सार्वजनिक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी, कर्मचारी तसेच निवडणूक व मतमोजणी प्रक्रियेबाबत चांगली प्रसिद्धी दिल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले.

४७ कोल्हापूरसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबलवरुन चंदगड २८, राधानगरी ३१, कागल २६, कोल्हापूर दक्षिण २४, करवीर २६ आणि कोल्हापूर उत्तरची २३ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण झाली.

४८ हातकणंगलेसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबलवरुन शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी २४, इचलकरंजी १९, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी २१ तर शिरोळसाठी २४ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण झाली. टपाली मतमोजणीसाठी 18 टेबल होते. आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच-पाच व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी करण्यात आली. यासाठी ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ३४९ तर ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ३३७ कर्मचारी असे एकुण ६८६ कर्मचारी नियुक्त केले होते. या व्यतिरिक्त अतिरिक्त १० टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव होते. दोन्ही ठिकाणी ६००-६०० पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले होते.

उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची संख्या

48 कोल्हापूर – शाहू शहाजी छत्रपती, (इंडियन नॅशनल काँग्रेस) – 754522 , संजय भिकाजी मागाडे, (बहुजन समाज पार्टी)-4002 , संजय सदाशिवराव मंडलिक, (शिवसेना)-599558 , संदिप भैरवनाथ कोगले, (देश जनहित पार्टी, अपक्ष)-2975 , बसगोंडा तायगोंडा पाटील, (भारतीय जवान किसान पार्टी)-1107 , अरविंद भिवा माने, (भारतीय राष्ट्रीय दल अपक्ष) -570 , शशीभूषण जीवनराव देसाई, (अखिल भारत हिंदू महासभा,अपक्ष)-651 , सुनील नामदेव पाटील, (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी)- 633, संतोष गणपती बिसुरे, (अपनी प्रजाहित पार्टी)-639 , इरफान आबुतालिब चांद, (अपक्ष) -597 , कुदरतुल्ला आदम लतिफ, (अपक्ष) -467, कृष्णा हणमंत देसाई, (अपक्ष)-604, कृष्णाबाई दिपक चौगले (अपक्ष)-3063 , बाजीराव नानासो खाडे, (अपक्ष)-3512 , नागनाथ पुंडलिक बेनके, (अपक्ष)-1227 , माधुरी राजू जाधव, (अपक्ष) -3508 , मुश्ताक अजीज मुल्ला, (अपक्ष)-3824 , मंगेश जयसिंग पाटील, (अपक्ष)-653 , ॲड. यश सुहास हेडगे-पाटील, (अपक्ष)-2459 , राजेंद्र बाळासो कोळी, (अपक्ष)-1044 , सलीम नुरमंहमद बागवान, (अपक्ष)-335, सुभाष वैजू देसाई, (अपक्ष)-849 , संदिप गुंडोपंत संकपाळ, (अपक्ष)-544 तर नोटाला 5983 एवढे मत मिळाली. अवैद्य मतदान 844 तर टेंडर्ड मतदान 36 आहे. अशा प्रकारे एकुण 13 लाख 94 हजार 170 मतदान झाले.

48 हातकणंगले – रवींद्र तुकाराम कांबळे (बहुजन समाज पार्टी)-4033 , धैर्यशील संभाजीराव माने (शिवसेना)- 520190 , सत्यजित बाबासाहेब पाटील -सरुडकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)-506764 , इम्रान इकबाल खतीब, (पक्ष- बहुजन मुक्ती पार्टी)-3190 , डॉ. ईश्वर महादेव यमगर, (भारतीय लोकशक्ती पार्टी)-1537 , दिनकरराव तुळशीदास चव्हाण (पाटील), (अपक्ष)-679 , धनाजी जगन्नाथ गुरव (शिवारेकर) (लोकराज्य जनता पार्टी)-1061 , दादगोंडा चवगोंडा पाटील (वंचित बहुजन आघाडी)-32696 , रघुनाथ रामचंद्र पाटील (भारतीय जवान किसान पार्टी)-2174 , राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (स्वाभिमानी पक्ष)-179850 , शरद बाबुराव पाटील, (नेशनल ब्लॅक पँथर पार्टी)-1361 , संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी)-1701 , अस्लम ऐनोद्दिन मुल्ला, (अपक्ष)-6111 , आनंदराव तुकाराम थोरात, (अपक्ष)-3499 , आनंदराव वसंतराव सरनाईक, (अपक्ष)-4955 , जावेद सिंकदर मुजावर, (अपक्ष)-1852 , लक्ष्मण श्रीपती डवरी (अपक्ष)-1009 , लक्ष्मण शिवाजी तांदळे, (अपक्ष)-4789 , प्रा. परशुराम तम्मान्ना माने, (अपक्ष)-4477 , मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष)-1066 , महंमद मुबारक दरवेशी (अपक्ष)-361 , अरविंद भिवा माने (अपक्ष)-424 , देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष)-560 , राजेंद्र भिमराव माने, (अपक्ष)-940 , रामचंद्र गोविंदराव साळुंखे (अपक्ष)-618 , शिवाजी धोंडीराम संकपाळ (अपक्ष)-1392 , सत्यजित पाटील (अपक्ष)-3632 तर नोटाला 5103 एवढे मत मिळाली. अवैद्य मतदान 1258 तर टेंडर्ड मतदान 7 आहे. अशा प्रकारे एकुण 12 लाख 97 हजार 282 मतदान झाले.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी

4250 मतदारांनी केला नोटाचा वापर

7953 मतदारांनी केले टपाल मतपत्रिकेतून मतदान

धाराशिव दि.04 (माध्यम कक्ष) 40 -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज 4 जून रोजी सकाळी 8 वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव येथे सुरुवात झाली.एकूण 30 फेरीनंतर निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर हे 3 लक्ष 29 हजार 846 एवढ्या मताधिकक्याने विजयी झाले. श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या उमेदवार सौ अर्चना पाटील यांचा पराभव केला.श्री.राजेनिंबाळकर या 7 लक्ष 48 हजार 752 मते पडली.

निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या 31 उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे. सौ.अर्चना राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)(4 लक्ष 18 हजार 906),ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (7 लक्ष 48 हजार 752),संजयकुमार भागवत वाघमारे,बहुजन समाज पार्टी (5 हजार 615),आर्यनराजे किसनराव शिंदे, राष्ट्रीय समाज दल (आर) (1887),भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर,वंचित बहुजन आघाडी (33 हजार 402),नेताजी नागनाथ गोरे,देश जनहित पार्टी (2 हजार 336), नवनाथ विश्वनाथ दुधाळ,विश्व शक्ती पार्टी (1 हजार 135),नितेश शिवाजी पवार,हिंदराष्ट्र संघ (1 हजार 79),ॲड. विश्वजीत विजयकुमार शिंदे, आदर्श संग्राम पार्टी (865),शामराव हरीभाऊ पवार, समनक जनता पार्टी (1509),शेख नौशाद इकबाल,स्वराज्य शक्ती सेना (1686), सिध्दीक इब्राहीम बौडीवाले उर्फ गोलाभाई, ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (2060),ज्ञानेश्वर नागनाथ कोळी,समता पार्टी (6472), अर्जुन (दादा) सलगर,अपक्ष ( 1935), उमाजी पांडूरंग गायकवाड,अपक्ष (3095),काका फुलचंद कांबळे, अपक्ष(4811),काकासाहेब संदिपान खोत,अपक्ष (5715),गोवर्धन सुब्राव निंबाळकर,अपक्ष (18966), नवनाथ दशरथ उपळेकर,अपक्ष (2108), नितीन नागनाथ गायकवाड,अपक्ष (731), ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे,अपक्ष (677),नितीन खंडू भोरे,अपक्ष (1204) मनोहर आनंदराव पाटील,अपक्ष (1190), योगीराज आनंता तांबे,अपक्ष (1336), राजकुमार साहेबराव पाटील,अपक्ष (593),राम हनुमंत शेंडगे,अपक्ष (3263),विलास भागवत घाडगे,अपक्ष (610),शायनी नवनाथ जाधव,अपक्ष (782),समीरसिंह रमेशचंद्र साळवी,अपक्ष (594), सोमनाथ नानासाहेब कांबळे- अपक्ष (1268), हनुमंत लक्ष्मण बोंदर, अपक्ष (2172) आणि नोटा (4298)असे मतदान झाले.एकूण 12 लक्ष 81 हजार 52 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये टपाल मतपत्रिकेच्या 7953 मतांचा समावेश आहे.

निवडणूकीत विजयी झालेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी विजयी झाल्याबद्दल भारत निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र दिले.

***

रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी

रायगड , दि. ४ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी विजयी झाले. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करून विजय मिळवला. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता. अलिबाग येथील मतमोजणी केंद्रावर आज सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरु झाली, 29 फेर्‍यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.

लोकसभा निवडणुकीत मतमोजणी झालेल्या एकूण 10 लाख 13 हजार 272 मतांपैकी उमेदवारनिहाय  मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.

1) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 425568 मते

2)श्री.सुनिल दत्तात्रेय तटकरे, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) – 508352 मते

3) श्रीमती कुमोदिनी रविंद्र चव्हाण, (वंचित बहुजन आघाडी) – 19618 मते

4) श्री. श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती, (अपक्ष) – 9394 मते

5) श्री.अमित श्रीपाल कवाडे,(अपक्ष) – 5634 मते

6) श्री.अनंत बाळोजी गिते (अपक्ष) – 3515 मते

7) श्री.नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष) – 2560 मते

8) श्री.पांडुरंग दामोदर चौले, (अपक्ष) – 2417 मते

9) श्री.अनंत पद्मा गिते (अपक्ष) – 2040 मते

10) श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी) – 1939 मते

11) श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष) – 1820 मते

12) श्री.अजय यशवंत उपाध्ये, (अपक्ष) – 1795 मते

13)श्रीमती अंजली अश्विन केळकर,(अपक्ष) – 1350 मते

14) नोटा – 27 हजार 270 मते.

०००

हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत; हिंगोलीतून आष्टीकर पाटील नागेश बापूराव विजयी घोषित

हिंगोली, दि. 04 (जिमाका): 15- हिंगोली लोकसभा मतदार संघातून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार आष्टीकर पाटील नागेश बापूराव हे 1 लाख 8 हजार 602 मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित करत त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले.

यावेळी विशेष मतमोजणी निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, एम. पी. मारोती, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह निवडणूक यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

विजयी उमेदवार श्री. आष्टीकर यांनी 26 व्या फेरीअखेरीस टपाली मतदानासह त्यांना 4 लाख 92 हजार 535 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दुस-या क्रमांकावर बाबुराव कदम कोहळीकर यांना 3 लाख 83 हजार 933 मते मिळाली. तर तिस-या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण यांना 1 लाख 61 हजार 814 मते मिळाली.

गजानन धोंडबा डाळ (बहुजन समाज पार्टी) यांना 7,465, विजय रामजी गाभणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) यांना 14,644, अनिल देवराव मोहिते (अखिल भारतीय परिवार पार्टी) यांना 3,374, ॲड. अलताफ अहेमद (इंडियन नॅशनल लीग) यांना 2,950, देवसरकर वर्षा शिवाजीराव (बहुजन मुक्ती पार्टी) यांना 4,099, देशा श्याम बंजारा (समनक जनता पार्टी) यांना 2,063, प्रकाश मेशराम रणवीर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ए) यांना 2,102, रवी रामदास जाधव-सवनेकर (अभिनव भारत जनसेवा पक्ष) यांना 1,602, सुनिल दशरथ इंगोले (भीमसेना) यांना 1,027, हेमंत राधाकिशन कनाके (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी) यांना 1,800, त्रिशला मिलिंद कांबळे (बहुजन समाज पार्टी-आंबेडकर) यांना 2,150, अशोक पांडुरंग राठोड (अपक्ष) यांना 2,906, आनंद राजाराम धुळे (अपक्ष) यांना 9,817, अंबादास सुकाजी गाडे (अपक्ष) यांना 14,742, अ. कदिर मस्तान सय्यद (गोरेगावकर) (अपक्ष) यांना 3,713, दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी (अपक्ष) यांना 7,239, देवजी गंगाराम आसोले (अपक्ष) यांना 1,483, बाबुराव आनंदराव कदम (अपक्ष) यांना 4,482, भवर गोविंदराव फुलाजी (अपक्ष) यांना 2,146, महेश कैलास नप्ते (अपक्ष) यांना 2,299, ॲड. रवि शिंदे (अपक्ष) यांना 2,701, रामप्रसाद नारायण बांगर (अपक्ष) यांना 4,525, ॲड. रामराव आत्माराम जुंबडे (अपक्ष) यांना 2,103, वसंत किसन पाईकराव (अपक्ष) यांना 593, विजय ज्ञानबा राऊत (अपक्ष) यांना 1,126, विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर (अपक्ष) यांना 1,859, ॲड. शिवाजीराव जाधव (अपक्ष) यांना 2,214, सत्तार पठाण (अपक्ष) यांना 2,463, सर्जेराव निवृत्ती खंदारे (अपक्ष) यांना 5,014आणि सुनिल मोतीराम गजभार (अपक्ष) 3,192 यांना तर नोटाला 26 व्या फेरीअखेरीस टपाली मतदानासह 3,123 मतदारांनी पसंती दर्शविली असून 11 लाख 59 हजार 298 मते वैध ठरली आहेत. अवैध मते 446 आणि 15 टेंडर्ड मते पडली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित केले आहे.

या निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी क्रांति डोंबे, डॉ. सखाराम मुळे, डॉ. सचिन खल्लाळ, अविनाश कांबळे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यासह सर्व पथकप्रमुख सहभागी झाले होते. 15- हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले होते.
**

सातारा लोकसभा मतदार संघात मतमोजणी शांततेत पूर्ण; श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विजयी घोषित

सातारा दि.4 : 45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा 32 हजार 771 इतकी मते अधिक मिळाली. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धिरण व आर अर्जुन यांच्या सह अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते.
उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची संख्या पुढीलप्रमाणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले – 5 लाख 71 हजार 134, शशिकांत जयवंतराव शिंदे – 5 लाख 38 हजार 363, आनंद रमेश थोरवडे – 6 हजार 485, प्रशांत रघुनाथ कदम – 11 हजार 912, तुषार विजय मोतलिंग – 1 हजार 301, सयाजी गणपत वाघमारे – 2 हजार 501, डॉ. अभिजित वामनराव आवाडे बिचुकले – 1 हजार 395, सुरेशराव दिनकर कोरडे – 4 हजार 712, संजय कोंडिबा गाडे -37 हजार 62, निवृत्ती केरू शिंदे – 2 हजार 674, प्रतिभा शेलार – 1 हजार 123, सदाशिव साहेबराव बागल – 958, मारुती धोंडीराम जानकर – 3 हजार 951, विश्वजित पाटील – उंडाळकर – 3 हजार 438, सचिन सुभाष महाजन – 2 हजार 15, सीमा सुनिल पोतदार – 3 हजार 458, नोटा – 5 हजार 522 या प्रमाणे मते मिळाली आहेत. तसेच अवैध मतांची संख्या एकूण 2 हजार 180 आहे.  प्रदत्त मते – 25 आहेत.
मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण यंत्रणेने सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल जि्ल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी यांनी संपूर्ण यंत्रणेचे आभार मानले. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेबद्दल पोलीस यंत्रणेचेही आभार मानले.
00000

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव विजयी

बुलढाणा, दि. ४ : बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 49 हजार 867 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र दगडू खेडेकर यांना 3 लाख 20 हजार 388 मते मिळाली. 29 हजार 479 मतांनी श्री. जाधव विजयी झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते श्री. जाधव यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.

गौतम मघाडे (बहुजन समाज पार्टी) -8 हजार 218

प्रतापराव जाधव (शिवसेना) – 3 लाख 49 हजार 867

नरेंद्र खेडेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) -3 लाख 20 हजार 388

असलम शाह हसन शाह (महाराष्ट्र विकास आघाडी) – 6 हजार 153

मच्छिंद्र मघाडे (सोशालिस्ट पार्टी इंडिया) – 5 हजार 258

माधवराव बनसोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) – 2 हजार 455

मोहम्मद हसन इनामदार (मायनॉरिटीज डेमोक्रॅटक पार्टी) – 4 हजार 978

वसंतराव मगर (वंचित बहुजन आघाडी) – 98 हजार 441

विकास नांदवे (भीम सेना) – 2 हजार 331

प्रा. सुमन तिरपुडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया) – 1 हजार 511

संतोष इंगळे (रिपब्ल‍िकन पार्टी ऑफ इंडिया) – 2 हजार 530

अशोक हिवाळे (अपक्ष) – 15 हजार 436

उध्दव आटोळे (अपक्ष) – 1 हजार 968

गजानन धांडे (अपक्ष) -4 हजार 854

दिनकर संबारे (अपक्ष) -4 हजार 564

नंदु लवंगे (अपक्ष) – 5 हजार 713

प्रताप पाटील (अपक्ष) – 2 हजार 561

बाळासाहेब इंगळे (अपक्ष) – 3 हजार 931

रविकांत तुपकर (अपक्ष) – 2 लाख 49 हजार 963

रेखा पोफळकर (अपक्ष) – 1 हजार 540

संदीप शेळके (अपक्ष) – 13 हजार 050

नोटा – 3 हजार 786

एकूण वैध मते – 11 लाख 9 हजार 496

पोस्टल बॅलेटमधील अवैध मते – 110

अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी

अमरावती, दि. 04 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 07-अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी हा निकाल जाहीर केला.

 उमेदवार श्री. वानखडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सामान्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथांन तसेच मतमोजणी निरीक्षक अंजना पंडा उपस्थित होत्या.

उमेदवार निहाय एकूण मतदान याप्रमाणे : बळवंत बसवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 5 लक्ष 26 हजार 271, नवनीत रवि राणा (भारतीय जनता पार्टी) 5 लक्ष 6 हजार 540, दिनेश गणेशराव बुब (प्रहार जनशक्ती पक्ष) 85 हजार 300, आनंदराज यशवंत आंबेडकर(रिपब्लिकन सेना) 18 हजार 793, संजयकुमार फत्तेसींग गाडगे (बहुजन समाज पार्टी) 4 हजार 513, इंजी. अविनाश हरिषचंद्र धनवटे (पिपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक) 730,  गणेश नानाजी रामटेके (अखिल भारतीय परीवार पार्टी) 629, गाजी सादोद्दीन जहीर अहमद (राष्ट्रीय ओलमा कौंसिल) 331, दिगांबर वामन भगत (नकी भारतीय एकता पार्टी) 762,  नरेंद्र बाबुलाल कठाणे (देश जनहित पार्टी) 422, भाऊराव संपतराव वानखडे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) 329, ॲड राजू मधुकरराव कलाने (बहुजन भारत पार्टी) 495, सुषमा गजानन अवचार (जय विदर्भ पार्टी) 659, अनिल ठवरे ऊर्फ अनिलकुमार नाग बौद्ध (अपक्ष) 1 हजार 206, अरुण यशवंतराव भगत (अपक्ष) 2 हजार 88, किशोर भीमराव लबडे (अपक्ष) 4 हजार 524, किशोर ज्ञानेश्वर तायडे (अपक्ष) 2 हजार 72, गौतम उर्फ अनंता रामदास इंगळे (अपक्ष) 1 हजार 570, तारा सुरेश वानखडे (अपक्ष) 527, प्रभाकर पांडुरंग भटकर (अपक्ष) 365, प्रमोद रामकृष्ण चौरपगार (अपक्ष) 1 हजार 307, ॲड. पृथ्वीसम्राट मुकिंदराव दीपवंश (अपक्ष) 337, भरत चंपतराव यांगड (अपक्ष) 441, मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे (अपक्ष) 871, मानकर ज्ञानेश्वर काशीराव (अपक्ष) 539, रवी गुणवंत  वानखडे (अपक्ष) 288, राजू महोदवराव सोनोने (अपक्ष) 232, राजेश तुळशीराम खडे (अपक्ष) 239, वर्षा भगवंत भगत (अपक्ष) 443, श्रीकृष्ण सखाराम क्षीरसागर (अपक्ष) 510, सतीश यशवंतराव गेडाम (अपक्ष) 943, श्रीमती. सुमित्रा साहेबराव गायकवाड (अपक्ष) 2 हजार 690, सुरज धनराज नागदवने (अपक्ष) 1 हजार 818, सुरेश पुंडलीक मेश्राम (अपक्ष) 1 हजार 52, सोनाली संजय मेश्राम (अपक्ष) 272, संदीप बाबुलाल मेश्राम (अपक्ष) 257, हिमंत भीमराव ढोले (अपक्ष) 670, तर नोटा 2 हजार 544 असे एकूण 11 लक्ष 73 हजार 579 असे वैध मते ठरले. तसेच अवैध मते 1 हजार 200 तर टेंडर मते 59 होते.

          या मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणी लोकशाही भवन, अमरावती येथे आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला. मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून सी.जी. रजनीकांथांन हे बडनेरा, अमरावती व तिवसा विधानसभा मतदार क्षेत्राकरिता तसेच अंजना पंडा यांनी अचलपूर, दर्यापूर व मेळघाट विधानसभा मतदार क्षेत्राकरिता काम पाहिले.

          मतमोजणीचे अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी 10 टेबलवर व ईव्हीएम वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्येकी 18 टेबल वर करण्यात आली.

00000

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...