शुक्रवार, जुलै 4, 2025
Home Blog Page 724

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव विजयी

बुलढाणा, दि. ४ : बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 49 हजार 867 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र दगडू खेडेकर यांना 3 लाख 20 हजार 388 मते मिळाली. 29 हजार 479 मतांनी श्री. जाधव विजयी झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते श्री. जाधव यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.

गौतम मघाडे (बहुजन समाज पार्टी) -8 हजार 218

प्रतापराव जाधव (शिवसेना) – 3 लाख 49 हजार 867

नरेंद्र खेडेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) -3 लाख 20 हजार 388

असलम शाह हसन शाह (महाराष्ट्र विकास आघाडी) – 6 हजार 153

मच्छिंद्र मघाडे (सोशालिस्ट पार्टी इंडिया) – 5 हजार 258

माधवराव बनसोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) – 2 हजार 455

मोहम्मद हसन इनामदार (मायनॉरिटीज डेमोक्रॅटक पार्टी) – 4 हजार 978

वसंतराव मगर (वंचित बहुजन आघाडी) – 98 हजार 441

विकास नांदवे (भीम सेना) – 2 हजार 331

प्रा. सुमन तिरपुडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया) – 1 हजार 511

संतोष इंगळे (रिपब्ल‍िकन पार्टी ऑफ इंडिया) – 2 हजार 530

अशोक हिवाळे (अपक्ष) – 15 हजार 436

उध्दव आटोळे (अपक्ष) – 1 हजार 968

गजानन धांडे (अपक्ष) -4 हजार 854

दिनकर संबारे (अपक्ष) -4 हजार 564

नंदु लवंगे (अपक्ष) – 5 हजार 713

प्रताप पाटील (अपक्ष) – 2 हजार 561

बाळासाहेब इंगळे (अपक्ष) – 3 हजार 931

रविकांत तुपकर (अपक्ष) – 2 लाख 49 हजार 963

रेखा पोफळकर (अपक्ष) – 1 हजार 540

संदीप शेळके (अपक्ष) – 13 हजार 050

नोटा – 3 हजार 786

एकूण वैध मते – 11 लाख 9 हजार 496

पोस्टल बॅलेटमधील अवैध मते – 110

अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी

अमरावती, दि. 04 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 07-अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी हा निकाल जाहीर केला.

 उमेदवार श्री. वानखडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सामान्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथांन तसेच मतमोजणी निरीक्षक अंजना पंडा उपस्थित होत्या.

उमेदवार निहाय एकूण मतदान याप्रमाणे : बळवंत बसवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 5 लक्ष 26 हजार 271, नवनीत रवि राणा (भारतीय जनता पार्टी) 5 लक्ष 6 हजार 540, दिनेश गणेशराव बुब (प्रहार जनशक्ती पक्ष) 85 हजार 300, आनंदराज यशवंत आंबेडकर(रिपब्लिकन सेना) 18 हजार 793, संजयकुमार फत्तेसींग गाडगे (बहुजन समाज पार्टी) 4 हजार 513, इंजी. अविनाश हरिषचंद्र धनवटे (पिपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक) 730,  गणेश नानाजी रामटेके (अखिल भारतीय परीवार पार्टी) 629, गाजी सादोद्दीन जहीर अहमद (राष्ट्रीय ओलमा कौंसिल) 331, दिगांबर वामन भगत (नकी भारतीय एकता पार्टी) 762,  नरेंद्र बाबुलाल कठाणे (देश जनहित पार्टी) 422, भाऊराव संपतराव वानखडे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) 329, ॲड राजू मधुकरराव कलाने (बहुजन भारत पार्टी) 495, सुषमा गजानन अवचार (जय विदर्भ पार्टी) 659, अनिल ठवरे ऊर्फ अनिलकुमार नाग बौद्ध (अपक्ष) 1 हजार 206, अरुण यशवंतराव भगत (अपक्ष) 2 हजार 88, किशोर भीमराव लबडे (अपक्ष) 4 हजार 524, किशोर ज्ञानेश्वर तायडे (अपक्ष) 2 हजार 72, गौतम उर्फ अनंता रामदास इंगळे (अपक्ष) 1 हजार 570, तारा सुरेश वानखडे (अपक्ष) 527, प्रभाकर पांडुरंग भटकर (अपक्ष) 365, प्रमोद रामकृष्ण चौरपगार (अपक्ष) 1 हजार 307, ॲड. पृथ्वीसम्राट मुकिंदराव दीपवंश (अपक्ष) 337, भरत चंपतराव यांगड (अपक्ष) 441, मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे (अपक्ष) 871, मानकर ज्ञानेश्वर काशीराव (अपक्ष) 539, रवी गुणवंत  वानखडे (अपक्ष) 288, राजू महोदवराव सोनोने (अपक्ष) 232, राजेश तुळशीराम खडे (अपक्ष) 239, वर्षा भगवंत भगत (अपक्ष) 443, श्रीकृष्ण सखाराम क्षीरसागर (अपक्ष) 510, सतीश यशवंतराव गेडाम (अपक्ष) 943, श्रीमती. सुमित्रा साहेबराव गायकवाड (अपक्ष) 2 हजार 690, सुरज धनराज नागदवने (अपक्ष) 1 हजार 818, सुरेश पुंडलीक मेश्राम (अपक्ष) 1 हजार 52, सोनाली संजय मेश्राम (अपक्ष) 272, संदीप बाबुलाल मेश्राम (अपक्ष) 257, हिमंत भीमराव ढोले (अपक्ष) 670, तर नोटा 2 हजार 544 असे एकूण 11 लक्ष 73 हजार 579 असे वैध मते ठरले. तसेच अवैध मते 1 हजार 200 तर टेंडर मते 59 होते.

          या मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणी लोकशाही भवन, अमरावती येथे आज सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला. मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून सी.जी. रजनीकांथांन हे बडनेरा, अमरावती व तिवसा विधानसभा मतदार क्षेत्राकरिता तसेच अंजना पंडा यांनी अचलपूर, दर्यापूर व मेळघाट विधानसभा मतदार क्षेत्राकरिता काम पाहिले.

          मतमोजणीचे अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी 10 टेबलवर व ईव्हीएम वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्येकी 18 टेबल वर करण्यात आली.

00000

अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी

अकोला, दि.४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 06- अकोला मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप संजय धोत्रे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी हा निकाल जाहीर केला.

उमेदवार श्री. धोत्रे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मतमोजणी निरीक्षक रामप्रतापसिंह जाडोन व प्रतुलचंद्र सिन्‍हा उपस्थित होते.

उमेदवार निहाय मतदान पुढीलप्रमाणे : अनुप धोत्रे (भारतीय जनता पार्टी)  एकूण मते 4 लाख ५७ हजार ३० , अभय पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) ४ लाख १६ हजार ४०४ एकूण मते, काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी) २ हजार ७६० एकूण मते, रविकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी) १ हजार ७३४ एकूण मते, प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) २ लाख ७६ हजार ७४७ एकूण मते, ॲङ नजीब शेख (इंडियन नॅशलन लिग) ३ हजार ३०० एकूण मते, प्रिती प्रमोद सदांशिव (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) ५३६ एकूण मते, बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी) ५३७ एकूण मते, मो. एजाज मो. ताहेर (आझाद अधिकार सेना) ५६८ एकूण मते, अशोक थोरात (अपक्ष) ५८१ एकूण मते, आचार्यद‍िप गणोजे (अपक्ष) १ हजार ६१८ एकूण मते, उज्वला राऊत (अपक्ष) १ हजार ३०६ एकूण मते, द‍िलीप म्हैसने (अपक्ष) ८६२ एकूण मते, धमेंद्र कोठारी (अपक्ष) १ हजार २४० एकूण मते, मुरलीधर पवार (अपक्ष) २ हजार ६६ एकूण मते, एकूण नोटा (५ हजार ७८३).

या मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणी महाराष्‍ट्र वखार महामंडळ येथे सकाळी 8 पासून सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण २८ फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला. मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून अकोट, बाळापूर व  अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार क्षेत्राकरिता रामप्रतापसिंह जाडोन तसेच अकोला (पूर्व), मुर्तिजापूर (अ.जा.) व रिसोड विधानसभा मतदार क्षेत्राकरिता प्रतुलचंद्र सिन्‍हा यांनी काम पाहिले.

मतमोजणीचे अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी 16 टेबलवर व ईव्हीएम वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्‍येकी 14 टेबल वर करण्‍यात येणार आली.

०००

 

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख विजयी

यवतमाळ/वाशिम, दि.4 जून (जिमाका) यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रावर झाली. एकून 30 फेरीमध्ये झालेल्या या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उत्तमराव देशमुख विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी डा.पंकज आशिया यांच्याहस्ते त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
मतमोजणी केंद्रावर पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीस टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर मतपेट्या असलेली स्ट्रागरुम उघडी करून मशीनची मोजणी करण्यात आली. एकून 30 फेऱ्यांमध्ये मतदारसंघाची मतमोजणी झाली. त्यात सर्वाधिक मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना 5 लाख 94 हजार 807 मते मिळाली.
उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे, राजश्री हेमंत पाटील महल्ले (शिवसेना) 5 लाख 334 मते, हरिसींग (हरिभाऊ) नसरू राठोड (बहुजन समाज पार्टी) 17 हजार 396 मते, अनील जयराम राठोड (समनक जनता पार्टी) 56 हजार 390 मते, अमोल कोमावार (हिंदराष्ट्र संघ) 3 हजार 377, उत्तम ओंकार इंगोले (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया- डेमोक्रॅटीक) 2 हजार 975 मते, धरम दिलीपसिंग ठाकूर (सन्मान राजकीय पक्ष) 4 हजार 555 मते मिळाली.
अपक्ष उमेदवारांना पुढीलप्रमाणे मते मिळाली. त्यात डा.अर्जुनकुमार सिताराम राठोड (अपक्ष) 1 हजार 863 मते, प्रा.किसन रामराव अंबुरे 1 हजार 720 मते, गोकुल प्रेमदास चव्हाण 1 हजार 94 मते, दिक्षांत नामदेवराव सवाईकर 1 हजार 103 मते, नुर अली मेहमुद अली शाह 1 हजार 958 मते, मनोज महादेवराव गेडाम 2 हजार 794 मते, रामदास बाजीराव घोडाम 6 हजार 781 मते, विनोद पंजाबराव नंदागवळी 6 हजार 298 मते, संगिता दिनेश चव्हाण 7 हजार 180 मते, संदीप संपत शिंदे 5 हजार 514 मते मिळाली.
एकून 9 हजार 391 मतदारांनी नोटाला मतदान केले तर टपाली मतपत्रिकेतील एकून 71 मते अवैध ठरली. मतमोजणी संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी संजय उत्तमराव देशमुख विजयी झाल्याची घोषणा केली व त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. संपुर्ण मतमोजणीची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली.
                                                                                                                           00000000000

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १३ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार

मुंबई, दि. ४ : राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून निवडणूक लढविली गेल्यास 25 जून 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1)(कार्यभार) व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सह सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मेघना तळेकर किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मोहन सदाशिव काकड यांच्यापुढे दि. 13 जून 2024 पर्यंत सार्वजनिक सुटी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कक्ष क्रमांक 145, पहिला मजला, विधानभवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई-400032 येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्र याच ठिकाणी व याच वेळेत मिळू शकतील.

नामनिर्देशन पत्रांची छाननी 14 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवाराकडून देण्यात आलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा त्याच्या निवडणूक एजंटला वर उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात 18 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. तसेच निवडणूक लढविली गेल्यास 25 जून 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1)(कार्यभार) व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी कळविले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

राज्यातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू

मुंबई दि. ४: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सर्व मतमोजणी केंद्रावर सुरळीतपणे मतमोजणी सुरू असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत  कळविण्यात आले आहे.

राज्यातील एकूण ४८ मतदार संघासाठी ३९ ठिकाणी मतमोजणी  सुरू आहे.

00000

भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची रंगीत तालीम

ठाणे, दि. ३ जिमाका : 23-भिवंडी  लोकसभा मतदार संघातील मतमोजणी के.यू. डी.  कंपाउंड, कल्याण सापे पडघा रोड, सावद गाव, पो. आमणे, ता.भिवंडी  येथे होणार असून मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार असून आज मतमोजणी केंद्रात केंद्रीय निवडणूक निरीक्षक राजनवीर सिंग कपूर, राजेशकुमार साह व निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम पार पडली.

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच  विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 टेबल  तर मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 21 टेबल लावण्यात आले आहेत.  तर टपाली मतदान मतपत्रिका  मोजणीसाठी स्वतंत्र 14 टेबल लावण्यात आले आहेत.  टपाली मतपत्रिकेची मतमोजणी ही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार कोष्टी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्याअधिपत्याखाली त्यांच्या अधिपत्याखाली टपाली मतपत्रिकेचे मोजणी होणार आहे.

134 भिवंडी   ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी 25  फेऱ्या, 135 शहापूर विधानसभा मतदारसंघासाठी 24 फेऱ्या, 136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी 22 फेऱ्या, 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी 23 फेऱ्या, 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी  29 फेऱ्या, आणि 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी 25 फेऱ्या होणार आहेत.

प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक निरीक्षक,  एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई, केंद्रीय सूक्ष्म निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत, केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे दोन निरीक्षकांची नियुक्ती या मतमोजणीसाठी करण्यात आलेली आहे.. मतमोजणीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच सर्व सहाही  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील सर्व कर्मचारी असे  एकूण 550 अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 500 हून अधिक पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच पासधारक माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र माध्यम कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज झालेल्या रंगीत तालीम दरम्यान मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रियेची सर्व माहिती देण्यात आली. तसेच मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, सोयीसुविधा याचा आढावा  निवडणूक निर्णय अधिकारी  संजय जाधव यांनी घेतला.

०००

 

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची रंगीत तालीम

ठाणे, दि. ३ ( जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी उद्या, 4 जून 2024 रोजी होणार आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे होणार असून सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून आज या संपूर्ण प्रक्रियेची रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली असल्याची ‍ माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी  दिली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या रंगीत तालीम दरम्यान 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकारी सुनिल भुताळे, 146 ओवळा  माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव मस्केपाटील, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील, 150 ऐरोली मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी अडकुणे, तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण एक हजार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर एकूण 650 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 या प्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2 मतमोजणी सहाय्यक व 1 सूक्ष्म निरीक्षक (Microbserver)असणार आहेत. तर प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी सुपरवायझर,1 पर्यवेक्षक व 1 मतमोजणी सहायक, 1 शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँगरुममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाली मतपत्रिकेच्या मोजणीसाठी देखील स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पासधारक माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र माध्यम कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज झालेल्या रंगीत तालीम दरम्यान मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रियेची सर्व माहिती देण्यात आली. तसेच मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, सोयीसुविधा याचा आढावा  निवडणूक निर्णय अधिकारी  मनिषा जायभाये-धुळे यांनी घेतला.

०००

नांदेड जिल्हा प्रशासनाची मतमोजणीसाठी जय्यत तयारी

  • सकाळी ८ पासून सुरु होईल मतगणना
  • पहिल्या फेरीचा निकाल 11 वाजेपर्यंत

नांदेड दि. ३ :  १६ – नांदेड मतदार संघातील २३ उमेदवारांपैकी अठराव्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून कोण जाणार याचा निवाडा उद्या मतमोजणी प्रक्रियेद्वारे होणार आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने मतमोजणी प्रक्रियेची जय्यत तयारी केली असून आज दोन्ही निवडणूक निरीक्षक तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम घेण्यात आली. उद्या सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल कळेल तर सायंकाळी उशिरापर्यंत अंतिम निकाल येईल अशी शक्यता आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. नांदेड जिल्हयात एकूण 18 लाख 51 हजार 843 मतदार होते. यात 9 लाख 55 हजार 84 पुरुष तर 8 लाख 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयाचा समावेश होता. जिल्हयामध्ये ६०.९४ टक्के मतदान झाले एकूण ११ लक्ष २८ हजार ५६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज निवडणूक निरीक्षक शशांक मिश्न, समीरकुमार ओ. जे. यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवडणूक निरीक्षकासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

८० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम

१६ मार्च पासून उदया ४ जून असे एकूण ८० दिवस प्रशासन निवडणूक प्रक्रीयेत व्यस्त होते.  नांदेड जिल्‍ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍यात आली. नांदेड दक्षिण मतदार संघातील विष्णुपुरी येथे पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन केले होते. विविध मान्यवरांनी या केंद्राला भेटी दिल्या. महिला सखी मतदान केंद्र, वजीराबाद नांदेड येथे गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले होते. तसेच प्रशासनाने केलेली तयारी आणि आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी २६ एप्रिल 2024 रोजी मतदानाला भरभरुन प्रतिसाद दिला. यात महिला, पुरुष, नवमतदार, दिव्यांग, तृतीयपंथ यांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 60.94 टक्के मतदान झाले.

उद्या स्ट्राँग रूम उघडणार

मतदानाच्या मतपेट्या तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्ट्राँगरूममध्ये २५ एप्रिलपासून ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम सिलबंद करण्यात आले आहे. यांची 24 तास इनकॅमेरा निगराणी ठेवण्यात आली होती. उदया सकाळी ७ वाजता स्ट्राँग रूम निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे.

२३ उमेदवाराचे भवितव्य उद्या ठरणार

लोकसभेसाठी विविध पक्ष व अपक्ष म्हणून लढलेल्या 23 उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.

तळ व पहिल्या माळ्यावर प्रत्येकी ३ केंद्र

तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या तळमजल्यावर भोकर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे तर पहिल्या मजल्यावर नायगाव,देगलूर व मुखेड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळ्यावरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय थाटण्यात आले असून या ठिकाणावरून सहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचा एकत्रित फेरी निहाय निकाल निवडणूक आयोगाला तसेच जनतेला कळविण्यात येणार आहे.

अतिरिक्त मंडप व पायाभूत सुविधा

याठिकाणी सर्व पायाभूत सुविधा पूर्णतः कार्यरत झाल्या आहेत. मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात तयार करण्यात आल्या आहेत. मतमोजणी कक्षामध्ये आवश्यक ती बैठक व्यवस्था तसेच कर्मचारी व मतमोजणी एजंट यांच्यासाठी उभी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी पिण्याचे पाणी तसेच खानपानाची व्यवस्था देखील प्रशासनाने केली आहे.

स्ट्रॉंग रूम परिसरात बंदोबस्त

शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीनस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात असून प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू असून मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जात आहे. उद्या सकाळी सात वाजता स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार आहे.जवळपास 500 कर्मचारी आतमध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत.. तेवढेच पोलीस अधिकारी -कर्मचारी सुरक्षा यंत्रणे संदर्भात काम करणार आहे.

सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ

सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर व या वर्षी घरी जाऊन घेण्यात आलेल्या ज्येष्ठांच्या मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल. साधारणतः साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षित आहे. मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते. यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडतात. 4 जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.

प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी

नांदेड जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. एका विधानसभासाठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी १२ टेबल आहेत. थोडक्यात नांदेड जिल्ह्याची मतमोजणी 96 टेबलवर होणार आहे.

कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम

प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतात. यामध्ये मायक्रो ऑब्झर्वर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक , दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिटंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक आणि चौथा असतो एक शिपाई सहाय्य करण्यासाठी. या प्रत्येक पदाचे जवळपास प्रत्येकी 100 कर्मचारी कार्यरत असतात. आज या सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळच्या सत्रात रंगीत तालीम पूर्ण केली आहे सकाळी सहा वाजता हे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर पोहोचणार आहेत.

नांदेडमध्ये २६ फेऱ्याची मतमोजणी

नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 23 तर सर्वात अधिक 26 फेऱ्यानंतर पूर्ण निकाल लागेल.एका फेरीला साधारण अर्धा तास लागतो. मात्र मतमोजणी कर्मचाऱ्यांना पुढे पुढे सराव झाल्यामुळे त्यापेक्षा कमी वेळ लागतो. जितके मतदान केंद्र तितके गुणेला १४ टेबल त्यामुळे उत्तर नागपूरला 23 तर सर्वात अधिक देगलूर नांदेडमध्ये २६ फेऱ्या होतील. साधारणतः आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा अंदाज निकाल दहा -साडेदहा ते ११ पर्यंत येईल, असा अंदाज आहे.

मोबाईल नेण्यास प्रतिबंध

मतमोजणी केंद्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय माध्यम प्रतिनिधी असो किंवा लोकप्रतिनिधी असो कोणालाही केंद्राच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्वांनी आपले मोबाईल सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

लाऊडस्पिकर्सची व्यवस्था

शासकीय तंत्रनिकेतन परिसरात रस्त्यावर ऐकू येईल अशा पद्धतीने लाऊड स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना देखील या परिसरात लाऊड स्पीकरवर फेरीनिहाय निकाल ऐकता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने या परिसरात नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे.

माध्यम केंद्राची उभारणी

नागरिकांना कळावे यासाठी निवडणूक आयोगाने ज्या पत्रकारांना प्रवेशिका दिल्या आहेत अशाच पत्रकारांना या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत उद्याच्या मतमोजणीचे वृत्तांकण होणार आहे. महादेव दालमिलकडील गेटमधून हा प्रवेश पत्रकारांना दिला जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाड्यांची पार्किंग करता येणार आहे.

०००

नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज – जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक, दि. ३ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नाशिक जिल्ह्यात २० दिंडोरी व २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात दि. २० मे रोजी मतदान झाले असून, मंगळवार, दि. ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आज दिली.

जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा म्हणाले, २० दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी एकूण १ हजार ९२२ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. तर २१ नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी १ हजार ९१० मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी  केंद्रीय वखार महामंडळ गोदाम, अंबड, नाशिक येथे सकाळी ८ वाजल्यापासून होणार आहे. त्यासाठी नियुक्त मतमोजणी कर्मचाऱ्यांची तीन वेळा सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली आहे. तसेच, मजमोजणीसाठी नियुक्त मनुष्यबळाचे तीन वेळा प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच, मतमोजणीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा म्हणाले, दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबलवर अशा सहा मतदारसंघांसाठी एकाच वेळी एका लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८४ टेबलवर ईव्हीएमची मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक व एक शिपाई असे एकूण ४ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा म्हणाले, ईटीपीबीएमएस स्कॅनिंग आणि पोस्टल मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी १० टेबल असणार आहेत. तर पोस्टल मतमोजणीसाठी एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एक पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक अशा पाच मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा म्हणाले, २० दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १२२ दिंडोरी (अ. ज.) विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक २६ फेऱ्या तर २१ नाशिक लोकसभा मतदारसंघात १२५ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक ३० फेऱ्या होणार आहेत.

२० दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या पुढीलप्रमाणे – ११३ नांदगाव – २४ फेऱ्या, ११७ कळवण (अ. ज.) – २५ फेऱ्या, ११८ चांदवड – २२ फेऱ्या, ११९ येवला – २३ फेऱ्या, १२१ निफाड – २० फेऱ्या आणि १२२ दिंडोरी (अ. ज.) – २६ फेऱ्या

२१ नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या पुढीलप्रमाणे – १२० सिन्नर – २३ फेऱ्या, १२३ नाशिक पूर्व – २४ फेऱ्या, १२४ नाशिक मध्य – २२ फेऱ्या, १२५ नाशिक पश्चिम – ३० फेऱ्या, १२६ देवळाली (अ. जा.) – २० फेऱ्या आणि १२७ इगतपुरी – त्र्यंबक ( अ. ज.) – २१ फेऱ्या

०००

 

ताज्या बातम्या

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक सतीशकुमार खडके यांची मुलाखत

0
मुंबई दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'आपत्ती पूर्व व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन व अंमलबजावणी' या विषयासंदर्भात राज्य आपत्ती...

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

0
मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे....

विधानसभा प्रश्नोत्तर

0
राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू - वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ४ : गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी कांदळवन आहेत. या कांदळवनांचे...

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान – केंद्रीय मंत्री जीतन...

0
मुंबई, दि. ४ : भारत जगातील चौथी विकसित अर्थव्यवस्था आहे. भारताच्या सकल उत्पन्नात (जीडीपी) सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगाचे (एमएसएमई) ३०.१ टक्के, उत्पादन क्षेत्राचे ३५.४ टक्के तर...

नंदुरबार जिल्ह्यातील भरोसा सेल आणि दामिनी पथकांची कामगिरी उत्तम – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा...

0
नंदुरबार, दिनांक 04 जुलै, 2025 (जिमाका) : जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत जिल्ह्यात भरोसा सेल आणि दामिनी पथकांचे काम उत्तमरित्या सुरू आहे, तसेच बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि...