शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 722

मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी – अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे निर्देश

मुंबई, दि. २७ :- मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत सखोल चौकशी करावी, असे निर्देश अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले.

संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावी, असे अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी सांगितले.

या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झाले, तथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे. केवळ जरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलविता धनी शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

 

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

मुंबई, दि. २७: विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीसाठी सदस्य सर्वश्री योगेश सागर, दीपक चव्हाण आणि अमीन पटेल यांची तालिका अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले.

००००

अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार मदत देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ : राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या भागातील शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार शासन मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मिस वर्ल्डच्या टीमने पाठिंबा दिल्याने जगभरात वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागृती होईल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबईदि. 26 : जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे ताडोबा फेस्टिव्हल’ दिनांक १ ते ३ मार्च दरम्यान होत आहे. त्याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ७१ व्या मिस वर्ल्डच्या टीमने राज्य सरकारच्या सेव्ह द टायगर’ मोहिमेला पाठिंबा जाहीर केला. ११२ देशातून आलेल्या विश्वसुंदरींनी पाठिंबा जाहीर केल्याने वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात अधिक जागृती होईलअशी भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आणि त्यातील स्पर्धकांना यावेळी निमंत्रण दिले. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीमिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जूलिया मॉरली,  २०२३ या वर्षाची मिस वर्ल्ड विजेती कॅरोलिनाजमिल सैदी यावेळी उपस्थित होते.

 मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेवाघांची संख्या २०१६ मध्ये ३८९० होतीजी २०२३ मध्ये ५५७५ वर पोहोचली आहे. त्यातही भारत आणि नेपाळ दुप्पट आकड्यांसह आघाडीवर आहेत. मिस वर्ल्ड टीमचा जागतिक प्रभाव लक्षात घेता त्यांचे आदरातिथ्य करणे वाघांच्या संरक्षणाचे निरंतर यश जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे वाटतेजेणे करून आगामी अनेक पिढ्यांपर्यंत वाघ जंगलात राहू शकतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वाघाच्या संवर्धनासाठी ताडोबा अभयारण्यात झालेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जूलिया मॉरली म्हणाल्याआम्ही स्वतः सकारात्मक बदलाच्या ॲम्बेसेडर असल्यामुळे अशा विशिष्ट संदेशाचा प्रचार करणाऱ्या समारंभात आम्हाला आमंत्रित करण्यात आलेयाचा आम्हाला अभिमान वाटतो. वाघ म्हणजे केवळ सौंदर्य आणि ताकदीचे प्रतीक नाहीतर आपल्या पृथ्वीतलावर पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे. या सुंदर प्राण्यांना स्थिर भविष्य देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न पाहून आम्हाला आनंद झाला आहे.

या अभियानाचा उद्देश त्यांच्यापासून त्यांचे निवासस्थान हिरावून घेणेत्यांची अवैध शिकार करणे आणि मनुष्य आणि वन्य जीवनातील संघर्ष यामुळे वाघांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकण्याचा आहे. वाघांच्या संख्येत यशस्वीरित्या झालेली वाढ हा आसपास राहणाऱ्या समुदायांत आणि वन्यजीवांमध्ये सहजीवनास प्रोत्साहन देण्याबाबत सरकारच्या रणनीतींचा परिणाम आहे. हे यश साजरे करण्यासाठी ताडोबा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

१ ते ३ मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव; वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी महोत्सवाचे आयोजन – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबईदि. 26 : वन्यजीव संरक्षणशाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली.  ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा महोत्सव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे. ताडोबा उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर वन्यजीवांसोबत स्थानिक समुदायांची भूमिका देखील अधोरेखित करतो. पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाच्या संधीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यटनाला चालना देणेऔद्योगिक विकासाला चालना देणे या सर्व बाबी वन्यजीवांच्या अधिवासांचे संरक्षण सुनिश्चित करते, असे ते म्हणाले

या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रेदुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

निसर्ग प्रश्नमंजुषा. पारंपरिक नृत्य सादरीकरणलघुपट सादरीकरण आणि श्रेया घोषालचे गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीफोटोग्राफी कार्यशाळाचॅरिटी रनचर्चासत्रेआणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. रिकी केज सारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलचेल राहणार आहे.

कार्यक्रमाच्या ऱ्या दिवशीसहभागींना ट्रेझर हंट स्पर्धासायक्लोथॉनचित्रकला स्पर्धावन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सीएसआर कॉन्क्लेव्ह यासह विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी  यांच्या समूहाचा गंगा बॅले कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

000

 

दीपक चव्हाण/विसंअ/

नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याचा निर्णय

मुंबई ता.२६ : ‘बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडू, प्रशिक्षकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा आयोजित करता याव्या, यासाठी राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यास आला. तसेच संकुलाचे अद्ययावतीकरण व नुतनीकरणासाठी ७४६.९९ कोटीच्या सुधारीत अंदाजपत्रकास दि. २५ रोजी मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर विभागीय क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण व नुतनीकरण करण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार स्विमिंग पूल, स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, आर्चरी रेंज, हॉकी, फुटबॉल पॅव्हेलियन इ. खेळांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भातील खेळाडू, प्रशिक्षकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार आहे.

नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी राज्य योजनेतून यापूर्वी रु. ५१. २० कोटी, जिल्हा नियोजन समितीकडून क्रीडांगण विकास योजनेस १२  कोटी असा एकूण ६३.२० कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता नागपूर विभागीय क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरण व नुतनीकरणासाठी रु.६८३.७९ कोटीचे अंदाजपत्रक प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे नागपूर विभागीय क्रीडा संकुलास शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देवून संकुलामध्ये नवीन सुविधा उभारण्यासाठी ७४६.९९ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली, असे मंत्री श्री. बनसोडे म्हणाले.

०००

कल्याण –शिळ रस्त्यास वै.ह.भ.प.श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव

मुंबई दिनांक २६:  कल्याण ते शिळ या रस्त्यास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या दि. २५ फेब्रुवारीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात मागणी केली होती.

भिवंडी-कल्याण-शिळफाटा या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करून तो सहापदरी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्त्यांपैकी कल्याण ते शिळ या रस्त्यास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत येत असलेल्या कल्याण शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात झालेली वाढ तसेच रस्त्याचे डांबरीकरणा ऐवजी क्राँक्रीटीकरणाने सहापदरीकरण करणे यानुषंगाने या प्रकल्पासाठी यापूर्वीच सुधारित बांधकाम खर्चापोटी रु.५६१.८५ कोटीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सध्या रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

०००

लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना स्वयंरोजगार मिळेल – मुख्य सचिव डॉ. नितीन करीर

मुंबई, ‍‍दि. २६ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्यातील २५ हजार युवकांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे युवकांना स्वयंरोजगार मिळणार असल्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी सांगितले.

लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय मुंबई येथे आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. करीर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन १ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

या कार्यक्रमास आमदार सरोज आहिरे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संजय खामकर उपस्थित होते.

श्री. करीर म्हणाले की, महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

सचिव श्री.भांगे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचाच भाग म्हणून आज राज्यातील 25 हजार उमेदवारांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे. महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजना राबविल्या जात आहेत.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. गजभिये म्हणाले, चर्मोद्योग व्यवसायवाढीसाठी लिडकॉम नेहमीच पुढाकार घेते. रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क व देवनार येथे लेदर पार्क उभारण्यात येणार आहे. राज्यात क्लस्टर धोरण असावे यासाठी लिडकॉमच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोल्हापूरी चपलांना जी.आय. नामाकंन मिळाले आहे. महामंडळाच्या कोल्हापूरी चपलांकरिता ब्लॉक चैन अंतर्गत क्यूआर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याचे आज अनावरण करण्यात आले. देवनार येथे लेदर पार्क, बेसलाईन सर्वेक्षण करण्यासाठी सीएलआरआय (CLRI) चेन्नई यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच महामंडळाच्या नवीन लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एम.सी.ए.डी. मार्फत २५ हजार विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पिता राणे यांनी केले. लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

०००

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि.  २६ : राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह राज्यभरात होणाऱ्या औद्योगिक दुर्घटना विषयी उपाय योजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस देविदास गोरे, संचालक, औद्यागिक सुरक्षा विभाग, मुंबई, डॉ अविनाश ढाकणे सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, पुणे शहर, प्रदीप जांभडे पाटील, अति आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा, संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड, रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प पुणे ,कैलास केंद्रे मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद, संतोष वारीस, संचालक फायर ब्रिगेड सेवा महाराष्ट्र, कळसकर उपायुक्त परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर आदी उपस्थित होते.

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महानगर पालिका, औद्योगिक सुरक्षा, गृह, पर्यावरण विभाग यांच्या एकत्रित समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या धोकादायक पदार्थांचे नियमन होणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त रसायन साठा ठेऊन होणाऱ्या दुर्घटनावर काही प्रमाणात बंधन आणणे शक्य होईल, तसेच या रसायनांचा मर्यादित साठा व आवश्यक तो योग्य वापर होत असल्याबाबत खात्री करता येईल. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने उद्योगांमध्ये अंतर्गत भागात सीसीटीव्ही बसवावेत, उद्योगांपर्यंत जाणारे रस्ते अग्निशमन यंत्रणा पोहचेल असे असावेत. ग्रामीण भागासाठी लहान अग्निशमन यंत्रणा खरेदी कराव्यात,लहान अग्निशमन केंद्रे स्थापन करावीत. सर्व जिल्ह्यांनी त्यांची आपत्ती व्यवस्थापन कार्य प्रणाली संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, १०८ रुग्णवाहिका धर्तीवर अग्निशमन यंत्रणा उभी करण्याबाबत आराखडा तयार करावा. कामगारांना सुरक्षा किट पुरविण्यात यावे. सुरक्षेबाबत महिला कामगारांमध्ये जनजागृती करावी. महिला बचत गटही अनेक प्रकारचे  उत्पादन घेत असतात. त्यांच्यामध्येही जनजागृती करावी. मोठ्या गृहनिर्माण संस्था, मोठे उद्योग यांनी आपल्या परिसरासाठी अग्नी शमन यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत. या यंत्रणांचा आपत्कालीन परिस्थिती मध्ये नक्की  फायदा होऊ शकतो. राज्यातील असुरक्षित औद्योगिक क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणातून बेकायदेशीर कारखान्यांची माहिती संकलित होईल. यामध्ये कोणत्या प्रकारचे उद्योग कोणत्या क्षेत्रात जास्त आहेत. तसेच कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते याची परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणातून तयार होईल. त्याचा फायदा कृती आराखडा तयार करता होणार आहे. वाढत्या शहरांमध्ये तसेच विकास प्राधिकरणांमध्ये उद्योगांच्या नियमनासाठी काय उपाययोजना करता येतील याचाही समावेश कृती आराखड्यामध्ये असावा.

उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, प्रत्येक उद्योग आस्थापना यांना त्यांचे उद्योगामध्ये  महिला कामगारांच्या लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा, सर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडीट करावे, सर्व  कामगारांना कारखान्यातर्फे विमा संरक्षण पुरविण्यात यावा, अपघातामध्ये मृत व जखमी कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे, अपघातग्रस्त कुटुंबांना तात्काळ कारखान्याने आर्थिक मदत करावी. अपघातबाधित मुलांचे व मुलींचे शिक्षणात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्सपो २०२४’ ला भरघोस प्रतिसाद

ठाणे, दि. २६ (जिमाका) : महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याकरिता एरोस्पेस ॲण्ड डिफेन्स मॅन्युफॅक्चरींग धोरण नव्याने अद्यावत केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. तर सप्लाय चैन वर भर देवून नागपूर, शिर्डी, पुणे व रत्नागिरी या चार ठिकाणी डिफेन्स क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मंत्री उद्योग सामंत यांनी केले. या डिफेन्स एक्पोमध्ये कोकण विभागातील २४ उद्योग घटकांनी आपला सहभाग नोंदविला. या घटकांना कोकण विभागीय उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ, ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सीमा पवार, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या, रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक  प्रकाश हणबर आणि पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आर्थिक बळकटी देण्यासाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत संरक्षण, संशेधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सहकार्याने महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणा-या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी मोशी येथील इंटरनॅशनल एक्झीबिशन ॲण्ड कन्वेनशन सेंटर येथे भरविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्सपो  २०२४’  प्रदर्शनाचे उद्घाटन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफट्नंट जनरल अजय कुमार सिंह, एअर मार्शल विभास पांडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, निबे लिमिटेडचे अध्यक्ष गणेश निबे, कोकण विभागीय उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ हे मान्यवर उपस्थित होते.

डिफेन्स एक्सपोमध्ये डिफेन्स्‍ स्टार्टअप, उद्योजकांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी, संरक्षण क्षेत्राशी निगडीत धोरणे इ. विषयावर चर्चासत्र व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्राशी निगडीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे उत्पादन घेणा-या उद्योजकांचे विविध दालनांमध्ये प्रदर्शन करण्यात आले.

या प्रदर्शनामध्ये ठाणे जिल्हयातील प्रिसीहोल आर्म्स प्रा. लि., डबीर इंडस्ट्रीज, मॅग-5 इनोवेशन्स प्रा. लि., मे. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड, क्रुगर व्हेंटिलेशन इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि., फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया, एस.एस. नातू इंजिनियरींग प्रा. लिमिटेड, एच.डी. फायर प्रोटेक्ट प्रा. लिमिटेड, एल फॉण्ड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्कर इक्विपमेंट्स प्रा. लि., स्टॅम्प आयटी सोल्युशन्स प्रा. लि., मेयर इंडस्ट्रीज प्रा. लि., स्टीम एरिट्रिक कंट्रोल इ. 13 घटकांनी सहभाग घेतला तसेच पालघर जिल्हयातून सनराईज इंडस्ट्रीज, ओरिगा मार्केट, पद्मा इंडस्ट्रीज, महालक्ष्मी इंजिनियरींग वर्कस्, साई ल्युमिनस आणि कास्टिंग इ. याशिवाय रायगड जिल्हयातून आहिल प्रॉडक्ट्स कंपनी लि., मे. ॲम्प्ट्रॉनिक्स टेक्नो प्रा. लि., एस.एच.एम. शिप केयर प्रा. लि., सुनील फोर्जिंग आणि स्टील इंडस्ट्रीज, जयश्री गल्वा प्रा. लि., टाटा स्टील लिमिटेड अशा प्रकारे कोकण विभागातून एकूण 24 उद्योग घटकांनी उस्फूर्त सहभाग घेतला. या उद्योग घटकांनी आपल्या उत्पादनांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

या प्रदर्शनातील विविध दालनांना नामांकित उद्योजक, शासकीय अधिकारी, इंजिनियरींग/बी-टेक महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी  भेटी दिल्या. संरक्षण क्षेत्रीतील उद्योगांच्या मागणीप्रमाणे 1 हजार एकर जागा उपलब्ध करुन देण्याचे उद्योग मंत्री  श्री. सामंत यांनी ग्वाही दिली असल्याने व एमएसमई साठी अधिक सुविधा आणि सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात येण्यात असल्याने सर्वच उद्योजकांना आशेची नवीन किरणे जागी झाली आहेत, ज्यामुळे उदयोगांचे विस्तारीकरण व विकास होण्यास मदत होणार आहे.

०००

 

रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला

मुंबई, दि. २६ :  ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. हृदयात थेट पोहचणारी अशी त्यांची गायकी होती, त्यांच्या निधनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की,  पंकज उधास यांनी अनेक चित्रपटांसाठी विविध प्रकारची गाणी गायली. त्यांनी गायिलेल्या गजलांनी तीन पिढ्यांच्या हृदयावर राज्य केले. आजही ‘चिठ्ठी आयी है’ हे गाणं लागतं तेव्हा मन कातर होतं. त्यांची गाण्याची वेगळी शैली होती. मैफीलीत त्यांचे गाणे अधिक खुलून यायचे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

०००

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...