सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 596

‘जर जरी जर बक्ष दर्गाह उरूस’ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या – जिल्हा पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर, दि.29 (जिमाका) –  खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या उरूस यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा, पाणी, वीज, एसटी बस,  स्वच्छतागृह त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जर जरी जर बक्ष उरुस यात्रेनिमित्त सुविधांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, खुलताबाद तहसीलदार स्वरूप कंकाळ, नगरपालिका मुख्याधिकारी विक्रम दराडे, उरुस समिती  अध्यक्ष मोहमद याजाज, इमरान जागिरदार,  बैठकीस उपस्थित होते.

मंत्री सत्तार म्हणाले की जर जरी बक्ष उरुसासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच खुलताबाद येथील ऐतिहासिक दरवाज्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे खुलताबाद येथील  ऐतिहासिक वारसाचे  जतन  व संवर्धन केले जाणार आहे.

00000

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसह पालकमंत्र्यांनी घेतला विविध योजनांचा आढावा

अनुदानाची रक्कम बँकेने कपात करू नये- पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर दि.29 (जिमाका) –  ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीककर्ज  यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान  कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना द्यावे, असे निर्देश पणन, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक प्रतिनिधीना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा योजना, बळीराजा वीज सवलत योजना,वयोश्री आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांचा आढावा बैठकीमध्ये घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार,कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे, जिल्हा महिला बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  पांडुरंग वाबळे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे व त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहेत ती रक्कम कोणत्याही शुल्काच्या बाबतीत कपात न करता पूर्ण अनुदान अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.  कौशल्य  विकास, रोजगार व स्वयंरोजगार उद्योजकता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व युवक आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून या विभागांनी काम करण्याची सूचना श्री. सत्तार यांनी केली.

बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत 7.5 क्षमतेच्या पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिलात पूर्णपणे माफी देण्यात आली असून जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा. पीक कर्ज आणि पीक विमा याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत बँकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्व प्रस्ताव मंजूर करून जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांचे आधार सीडिंग आणि ई-केवायसी अपूर्ण असल्याकारणाने त्यांना पीक विमा आणि पीक कर्ज मिळत नाही,  या अनुषंगाने बँक, कृषी विभाग आणि महसूल या विभागाने एक मोहीम हाती घेऊन उर्वरित शेतकऱ्यांचे ईकेवायसी व आधार सीडींग करावे. शासनामार्फत अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना  शेतजमिनीचे वाटप करण्यात येते. या शेतजमिनीचे पोट खराबी नोंद असलेला हा सातबारा मध्ये बदल करून कसणाऱ्या जमिनीची नोंद घेवून लाभार्थ्यांना कर्ज आणि अनुदान मिळण्यासाठीची प्रक्रिया ही महसूल प्रशासनाने हाती घ्यावी. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी, गोरगरीब, गरजू जनतेला आवश्यक असलेले अन्नधान्याचे वितरण, पुरवठा, वेळेत विभागामार्फत करावा.  तसेच आदर्श बँक प्रकरणातील ठेवीदारांच्या त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी फास्टट्रॅक वर मोहीम राबवावी व आदर्श बँकेच्या मालमत्त्ताची विक्री करून ही टप्प्याटप्प्यात खातेदारांना त्यांची  मूळ मुद्दल रक्कम ही उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाने कार्यवाही पंधरा दिवसाच्या आत करण्यात यावी.  असे निर्देशित केले.

सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये मिरची पिकावर रोगाचे प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या नुकसानीचे तात्काळ पंचनामे कृषी विभागाने करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याच्या प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर या चार तालुक्यांमध्ये पिकविमा ची रक्कम काही कारणास्तव वितरित झालेली नाही या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पिकविमा कंपनीसाठी कृषी विभागाने पाठपुरावा करावा व तात्काळ याबाबत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी दिले.

00000

 

धूळगावसह राजापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी – मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

नाशिक, दिनांक : 29 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा) : येवला तालुक्यातील धूळगावसह राजापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना परिसरातील गावांसाठी अत्यंत महत्वाची आहे.  त्यामुळे संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत योजनेची कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले.

राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व धुळगावसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा आढवा मंत्री श्री. भुजबळ यांनी येवला येथील संपर्क कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

धूळगावसह राजापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना

राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजनेतील जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनी, वीज पंपाच्या कामांना तातडीने गती देत लवकरात लवकर पाणीपुरवठा होईल, असे नियोजन करावे. वीज वितरण कंपनीने वीज तारांच्या स्थलांतरासह नवीन जोडणीच्या कामांचे आठवडाभरात नियोजन करून उर्वरित कामे मार्गी लावावीत. तसेच या दोन्ही योजनांची कामे विहित कालावधीत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या योजनांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंबादास बनकर, वसंत पवार, साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे, डॉ.मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे,भगवान ठोंबरे, भूषण लाघवे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाची पाहणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य असा शिवसृष्टी प्रकल्प येवला शहरांमध्ये साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाची पाहणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. भुजबळ यांनी आज केली. यावेळी अंतिम टप्प्यात असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे असे सूचना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

०००००

 

८.९ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.९ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. २३ सप्टेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि. २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. २४ सप्टेंबर,  २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

००००

वंदना थोरात,वि.स.अ.

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी धरण कालव्याचे जलपूजन संपन्न

मांजरपाडा प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे जलयुक्त : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. : २९ ऑगस्ट २०२४ (जिमाका वृत्तसेवा) : मांजरपाडा धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते डोंगरगाव या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरणासाठी मंजूर निधी २४२ कोटी असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे जलयुक्त होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी कालव्याचे जलपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नांदूरमध्यमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे, सरपंच दत्तुपंत डुकरे, दत्तुकाका रायते, माजी जि. प. सदस्य भाऊसाहेब भवर, ज्ञानेश्वर जगताप, बाळासाहेब गुंड, माजी प.स. सदस्य नवनाथ काळे, मोहन शेलार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ते यावेळी म्हणाले, या कालव्याच्या अस्तरीकरण कामामुळे अतिशय कमी वेळात दरसवाडी ते डोंगरगाव ८८ किलोमीटर पैकी ६३ किलोमीटर नगरसुल शिवारपर्यंत पाणी पोहचले आहे. ९० क्युसेस वेगाने पाणी कालव्यातून सोडण्यात आले असून लवकरच पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचून बंधारे भरण्यास सुरुवात होईल. येणाऱ्या काळात दरसवाडी धरणात येणाऱ्या सांडव्याची उंची वाढविण्यात येईल त्याचप्रमाणे कालवा परिसरातील शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार रस्ते व पुलांची कामेही त्वरीतच मार्गी लावली जाणार असल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी ग्रामस्थांना अश्वस्थ केले.

००००००

 

महाराष्ट्र शासनाचे ११, १६, २१ आणि २६ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे 11 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या अकरा  वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ३ सप्टेंबर,  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् ३ सप्टेंबर, २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ४ सप्टेंबर,  २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असून, रोख्यांचा  कालावधी ४ सप्टेंबर,  २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ४ सप्टेंबर, २०३५  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी मार्च ४ आणि सप्टेंबर ४ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे 16 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या सोळा  वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ३  सप्टेंबर,  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् ३ सप्टेंबर, २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते  11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी  10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान  ४ सप्टेंबर,  २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १६ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी  ४ सप्टेंबर, २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ४ सप्टेंबर, २०४०  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी मार्च ४ आणि सप्टेंबर ४ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे 21 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या 21  वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री  16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ३  सप्टेंबर,  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् ३ सप्टेंबर, २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते  11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी  10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान  ४ सप्टेंबर,  २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी २१ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी  ४ सप्टेंबर, २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ४ सप्टेंबर, २०४५ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी मार्च ४ आणि सप्टेंबर ४ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे 26 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या 26 वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री  16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. ३  सप्टेंबर,  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् ३ सप्टेंबर, २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते  11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी  10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान  ४ सप्टेंबर,  २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी २६ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी  ४ सप्टेंबर, २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची  परतफेड दिनांक ४ सप्टेंबर, २०५०  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या  रोख्यांवरील  दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी मार्च ४ आणि सप्टेंबर ४ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि.29 : शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महावाचन उत्सव -2024 बाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांची मुलाखत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखतीत प्रकल्प संचालक आर. विमला यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित ‘महावाचन उत्सव 2024’ च्या आयोजनामागची भूमिका, उपक्रमाचे स्वरुप, विद्यार्थ्यांचा सहभाग व उपक्रमाची व्याप्ती याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुकवार दि.30 आणि शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक शिवानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

—— 000 —-

केशव करंदीकर/व.स.सं

‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला उत्साहात सुरुवात

प्रदर्शन आणि विक्री २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान सुरू राहणार

नवी दिल्ली, 29 : दिल्लीतील प्रसिद्ध ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्रीची सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात 6 इंच ते 3 फुट उंचीच्या विविध आकारांच्या आठशेहून अधिक गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तीची किंमत 500 रूपयांपासून 26 हजार रूपयांपर्यंत असून हे प्रदर्शन 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या कलेला राजधानीत प्रोत्साहन मिळावे, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दिल्लीतील गणेशभक्तांपर्यंत पोहोचवणे हे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे.

दिल्ली परिक्षेत्रातील 30 गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये अमराठी भक्तांचाही मोठा सहभाग असतो. गेल्या 25 वर्षांपासून ठाणे येथील मूर्तिकार मंदार सूर्यकांत शिंदे हे आपल्या उत्कृष्ट शाडूच्या गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी ‘मऱ्हाटी’ एम्पोरियममध्ये सहभागी होत आहेत. याशिवाय, मुंबईच्या नीता भोसले यांनी मार्बल, फायबर आणि रेडियमच्या शिवाजी महाराज, गणपती, कृष्ण, विठ्ठल रुक्मिणी यांच्यासह विविध मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

‘बाबा खडकसिंह मार्गावरील ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरु राहणार असून, अधिक माहितीसाठी 011-23363888 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

0000

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि.२९ : नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंत्री श्री. सावे यांनी केले.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) यांच्यावतीने ‘द रिअल इस्टेट फोरम २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे करण्यात आले. यावेळी नारडेकोचे अध्यक्ष प्रशांत शर्मा, चेअरमन किशोर भतिजा, संदिप रुणवाल, राजेश दोषी, गृहनिर्माण विभागाच्या सचिव वल्सा नायर, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या सदस्यांनी सहकार्य करावे.

राज्य शासनाने महिलांना गृहखरेदीमध्ये १ टक्के मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केलेली आहे. याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार आहे. मुद्रांक शुल्क अर्ज प्रक्रियेचे डिजिटायझेन करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

राज्यात येत्या वर्षभरात १ लाख घरे देण्याचा आपला संकल्प आहे. प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे दीड लाख घरे बांधण्यात येणार आहेत. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यात पुढील पाच वर्षांत ३५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी अर्थसंकल्पात ७४२५ कोटींची तरतूद केली आहे. यासाठी नरडेकोने पुढे यावे. आजच्या चर्चासत्राद्वारे केल्या जाणाऱ्या सूचनांचा नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये समावेश करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे मंत्री श्री.सावे म्हणाले.

0000

शैलजा पाटील/वि.सं.अ

राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त

मुंबई, दि. 29 : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेच्या वारशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, तसेच आधुनिक भारतीय नौदलासमवेतचा ऐतिहासिक दुवा अधोरेखित करण्यासाठी सिंधुदुर्गात प्रथमच आयोजित नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून 04 डिसेंबर 2023 रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या प्रकल्पाची संकल्पना भारतीय नौदलाने तयार केली होती आणि राज्य सरकारच्या समन्वयाने त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. आता शिवरायांचा पुतळा लवकर पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व उपायांमध्ये मदत करण्यासाठी भारतीय नौदल कटीबद्ध आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

0000

ताज्या बातम्या

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...