शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 595

मतदार आणि उमेदवारांकरिता विविध ॲप्लिकेशन्स…‘सी-व्हिजिल ॲप’ आता मराठीमध्ये देखील उपलब्ध

भारत निवडणूक आयोगाने मतदार आणि उमेदवारांकरिता सी-व्हिजिल, सुविधा ॲप, ॲफिडेविट पोर्टल, व्होटर टर्नआऊट ॲप, व्होटर हेल्पलाइन ॲप, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांकरिता सक्षम ॲप, केवायसी ॲप आणि 1950 क्रमांकाची हेल्पलाईन आदी आयटी ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून सुविधा दिल्या आहेत, त्यांची थोडक्यात माहिती…

सी-व्हिजिल (cVIGIL)

सी-व्हिजिल हे ॲप हे आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्याकरिता एक अभिनव असे मोबाइल ॲप्लिकेशन आहे. ज्याद्वारे प्रत्येक नागरिकाला निवडणुकीच्या वेळी आपल्या स्मार्टफोनचा उपयोग करून छायाचित्रे, श्राव्य, किंवा दृक चित्रण अपलोड करता येते. ‘सी-व्हिजिल’ चा अर्थ ‘सतर्क नागरिक’ असा आहे.  हे ॲप आता मराठी भाषेत पण उपलब्ध आहे.या ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल झाल्यानंतर आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे ठिकाण शोधण्यासाठी जी.पी.एस.चा उपयोग  करता येतो.तक्रारीच्या स्थितीचा मागोवा  घेवून 100 मिनिटांत स्थितीची माहिती देते.

सी-व्हिजिल ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक. गुगल प्लेस्टोअरमध्ये  https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil&hl=en_IN ॲपल स्टोअर  https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541  वर उपलब्ध  आहे.

सुविधा ॲप 2.0

भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे. सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणे, प्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणे, अर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. त्याचबरोबर या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.

गुगल प्ले स्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.

ॲफिडेविट पोर्टल

‘ॲफिडेविट पोर्टल’ निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनाची संपूर्ण यादी पाहता येते. कोणताही नागरिक ‘ॲफिडेविट पोर्टल’चा उपयोग करून उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र पाहू शकतो व डाउनलोड ही करू शकतो. नागरिकांच्या सुविधेसाठी नामांकन दाखल, स्वीकारले, नाकारले, मागे घेतले, उमेदवार स्पर्धेत आहे याची माहिती मिळते.

पोर्टलची लिंक : https://affidavit.eci.gov.in

व्होटर टर्नआऊट ॲप

व्होटर टर्नआऊट ॲप प्रत्येक राज्य, जिल्हा आणि मतदारसंघासाठी अंदाजित मतदानाच्या टक्केवारीची दर दोन तासांनी माहिती देते. हे अॅप्लिकेशन फक्त विधानसभा, लोकसभा आणि पोटनिवडणुकीच्या वेळी सक्रिय होते.

‘व्होटर टर्नआऊट’ ॲपमध्ये प्रत्येक राज्य, जिल्हा आणि मतदारसंघाची अंदाजित मतदान टक्केवारी दाखवते.भारत निवडणूक आयोगाच्या सर्व्हर वरून ‘रिअल-टाइम’ डेटाचा उपयोग  करण्यात येतो.निवडणूक प्रकार, राज्य, जिल्हा आणि मतदारसंघानुसार यामध्ये मतदानाच्या टक्केवारीची माहिती मिळते.एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील मतदानाचा अंदाज मिळवण्याचा हा एक जलद आणि सोपा असा पर्याय आहे

‘व्होटर ट्रर्नआऊट अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN

ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882

व्होटर हेल्पलाइन ॲप

मतदारांना आपले मतदार यादीत नाव आहे याची माहिती व्होटर हेल्पलाईन ॲप मध्ये मिळते. हे ॲप प्रत्येकासाठी अधिक सोयीस्कर  आणि महत्त्वाचे आहेत. व्होटर हेल्पलाईन ॲपमध्ये मतदारयादीत नावाची शहानिशा करणे,नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे, दुस-या मतदारसंघात स्थलांतरित करणे,परदेशात राहणारे मतदार, मतदारयादीतील नाव हटवणे किंवा आक्षेप घेणे,नोंदींची दुरुस्त करणे,तुमच्या क्षेत्रातील निवडणुकीचे वेळापत्रक शोधणे, सर्व उमेदवार त्यांचे प्रोफाइल, उत्पन्न विवरण, मालमत्ता, गुन्हेगारी प्रकरणे शोधणे, बीएलओ, ईआरओ, डीईओ आणि सीईओ यांची माहिती मिळवता येते व संपर्क साधता येतो

व्होटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक :गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&hl=mr&pli=1

ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

सक्षम ॲप

भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता  हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.

सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.

गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp

ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568

 

केवायसी  ॲप :- (know your Candidate)

मतदारांना त्यांच्या उमेदवारांबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती इत्यादी पाहता येऊ शकते.

गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.ksa

ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/kyc-eci/id1604172836

1950 क्रमांकाची हेल्पलाईन

निवडणूक विषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

 संध्या गरवारेविभागीय संपर्क अधिकारी,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

००००

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत परराज्यातील दारू, ४ वाहनांसह ४० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. ८ :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील दारू तसेच ४ वाहनांसह ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क, मुंबई विभागाचे आयुक्त  डॉ.विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक, चरणसिंग राजपूत, उप-अधीक्षक, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डी विभागाकडून २७ ऑक्टोबर २०२४ रोजी घोटावडे गावच्या हद्दीत, आंबटवेट रोडवर दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा लावून टाटा कंपनीचे एस गोल्ड या प्रकाराचे चारचाकी वाहन क्र. MH १२ TV५१२२ पकडले. या वाहनामधून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारूचे एकूण १८ बॉक्स (८६६ सिलबंद बाटल्या) तसेच महाराष्ट्र राज्याचे बनावट लेबल असा एकूण ३ लाख ५५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीस ३ दिवस एक्साईज कोठडी मंजूर केली. पुढील तपासात ४ नोव्हेंबर २०२४ रोजी कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ तपासाकामी छापा टाकला असता सदर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे विविध बॅन्डचे विदेशी मद्याचे एकूण १०,००० नग बनावट लेबलसह सापडले आहे. याची एकूण किंमत ८८,१६० रुपये आहे. या गुन्ह्यातील पुढील तपासात दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी शनिवार पेठ, येथून बनावट लेबल छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मशीनसह एकूण ३० लाख २ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात एकूण ३४ लाख ४५ हजार ५५० रुपयांच्या मुद्देमालासह एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग सचिन श्रीवास्तव, ई विभागाचे निरीक्षक, शैलेश शिंदे, स.दु.नि. स्वप्नील दरेकर, स.दु.नि.सागर धुर्वे, जवान श्री. गजानन सोळंके, जवान श्री. संजय गोरे, यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असून पुढील तपास निरीक्षक, सचिन श्रीवास्तव करीत आहेत.

या विभागाने १ ऑक्टोबर २०२४ पासून आजपर्यंत एकूण ३१ गुन्हे नोंद करून ३१ आरोपींना अटक करून ४ वाहनांसह एकूण ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गावठी दारू ९९१ लिटर, कच्चे रसायन १६०० लिटर, ताडी २२७ लिटर, देशी दारू ३३.०० ब. लि., बिअर २५५ ब. लि. व परराज्यातील गोवा निर्मित मद्य एकूण १५५.८८ ब. लि. यांचा समावेश आहे. ही कारवाई विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी, गणपती थोरात, श्रीमती शीतल देशमुख जवान श्रीमती वृषाली भिटे यांनी केली केली.

0000

 

 

ग्रामीण भागासह शहरी भागातील मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांवर भर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर,दि.7 :  ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वास्तव्यास असलेल्या मतदारांचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील मतदान शहरी भागापेक्षा अधिक दिसून येते. प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा हक्क आपल्या राज्यघटनेने बहाल केला आहे. प्रत्येक मतदाराचे मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी नागपूर येथून नोकरीनिमित्त बाहेर स्थलांतरीत झालेले मतदार मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचे कर्तव्य बजावतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. अपर्णा कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मतदारांना अधिक सोयीचे व्हावे, आपल्या बुथबाबत त्यांना माहिती कळावी यासाठी बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर अधिकृत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बीएलओ हे घरोघरी मतदान चिठ्ठी पोहोचविणार आहेत. निवडणूक विभाग मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असून या प्रयत्नांना मतदारांनी मतदान करुन मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

सोशल इन्फ्ल्युएंसर मतदान जनजागृतीसाठी सरसावले

विविध समाज माध्यमांद्वारे सोशल मीडियावर सातत्याने कार्यमग्न असणाऱ्या सोशल इन्फ्ल्युएंसर यांची संख्या नागपूर मध्ये अधिक आहे. अनेक चांगल्या प्रकारच्या रिल्स, मिम्स, पोस्ट आपल्यामार्फत समाजापर्यंत पोहोचल्या आहेत. मतदान जागृती लोकशाहीच्या सक्षमतेसाठी आवश्यक असून आपण मतदार साक्षरतेसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केले. नागपूर महानगरातील व ग्रामीण भागातील सोशल इन्फ्ल्युएंसर यांच्या बैठकीत ते बोलत होते. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत आम्ही ही जनजागृती राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून जबाबदारीने पार पाडू, असे सर्वांनी सांगितले.

‘सक्षम ॲप’ ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान

आगामी विधानसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे.

या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये “सक्षम ECI” ॲप डाऊनलोड करून लाभ घेता येणार आहे.

दिव्यांग (PWDs) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेल्या सक्षम ॲपवर विविध सुविधा दिल्या आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम दिव्यांग मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये सक्षम ॲप डाऊनलोड करून घ्यावे.

निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.

सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.

दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे महत्वाचे असून हे ॲप वापरण्यास अतिशय सोपे आहे. ज्यामुळे दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी नोंदणी करणे, त्याचे मतदान केंद्र शोधणे आणि त्यांचे मत देणे सोपे होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्ती व वयोवृद्ध नागरिकांनी सक्षम ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून यामध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा. हे ॲप खऱ्या अर्थाने दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे, यात शंकाच नाही..!

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

तथा नोडल अधिकारी, एकत्रित मीडिया कक्ष आणि

सदस्य सचिव माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, ठाणे

चिखली विधानसभा मतदारसंघात पाच मतदान केंद्राची वाढ; आता ३१७ मतदान केंद्र

बुलडाणा, (जिमाका) दि.7:  विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करणे सोईचे व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघात मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार 23- चिखली विधानसभा मतदारसंघात पाच नवीन मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली असून आता चिखली मतदारसंघात 317 मतदान केंद्र झाले आहेत.

मतदान केंद्राच्या रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी ज्या मतदान केंद्रांवर मर्यादेपेक्षा जास्त मतदार आहेत  किंवा दोन गावातील मतदार एकाच मतदान केंद्रांना जोडण्यात आलेले होते, असे सर्व मतदान केंद्र मिळून जिल्ह्यात नव्याने 23 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये चांधई, कोलारी, गिरोला व चिखली येथे मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात 317 मतदान केंद्र झाले असून शहरी भागात 51 तर ग्रामिण भागात 266 मतदान केंद्र आहेत. नवीन मतदान केंद्राच्या निर्मितीमुळे कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहेत.

लोकसभेला जिल्ह्यात 2 हजार 265 मतदान केंद्रे होती. यात 23 नवीन मतदान केंद्रांची वाढ होऊन 2 हजार 288 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्र सुसूत्रीकरणांतर्गत मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे.

मतदारसंघात पाच नवीन मतदार केंद्राची वाढ

  1. चांधई येथील मतदारांना 41-धोडप येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी दोन कि.पेक्षा जास्त अंतर जावे लागत असल्याने 42-चांधई जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे नविन मतदान केंद्र तयार करण्यात आले.
  2. कोलारी गावातील मतदारांना 43-ब्रम्हपूरी येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी दोन कि.पेक्षा जास्त अंतर जावे लागत असल्याने 45-कोलारी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे नविन मतदान केंद्र तयार करण्यात आले.
  3. गिरोला गावातील मतदारांना 83- हातनी येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी दोन कि.पेक्षा जास्त अंतर जावे लागत असल्याने 86-गिरोला येथील मतदारांचे गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा परिषद मराठी पुर्व माध्यमिक शाळा, गिरोली येथे नविन मतदान केंद्र तयार करण्यात आले.
  4. 184-चिखली नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर 1 हजार 400 पेक्षा जास्त मतदार झाल्यामुळे 188-नगर परिषद व्यायाम शाळा गांधीनगर चिखली येथे मतदान केंद्र तयार करण्यात आले.
  5. 194- चिखली जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा मतदान केंद्रावर 1 हजार 400 पेक्षा जास्त मतदार झाल्यामुळे मतदान केंद्र क्रमांक 199-चिखली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील खोली क्रमांक 2 येथे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार 7 हजार 499 नवमतदार

 23-चिखली मतदारसंघात 3 लक्ष 5 हजार 718 मतदार असून त्यामध्ये 1 लक्ष 57 हजार 170 पुरुष तर 1 लक्ष 48 हजार 546 महिला व 2 तृतीयपंथी मतदार आहेत. 85पेक्षा जास्त वयोमान असलेले मतदार 5 हजार 632 असून 2 हजार 85 पुरुष तर 3 हजार 547 महिला मतदार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणारे 7 हजार 499 नवमतदार असून 4 हजार 885 पुरुष तर 2 हजार 614 महिला नवमतदार आहेत.

मतदान यादीत नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी- जिल्हाधिकारी

भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार केंद्र जाणून घेण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मतदार नोंदणी किंवा मतदान केंद्राची माहिती शोधण्याच्या बाबतीत काही मदत हवी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांक किंवा चिखली मतदारसंघासाठी हेल्प लाईन क्रमांक 18002336363 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत – उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार

पुणे, दि.7 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत; या दृष्टीने स्वीप अंतर्गत मतदान जागृती उपक्रमांवर भर द्यावा, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार यांनी आज विभागातील निवडणूक यंत्रणांना दिले. मतदारांना मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविल्या जातील यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

पुणे येथे आयोजित विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, प्रधान सचिव अविनाश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे उपसचिव सुमनकुमार, अवर सचिव अनिलकुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

शहरी भागात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे सांगून श्री. हिरदेश कुमार म्हणाले, मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी सर्व साधनांचा अवलंब करावा. मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के आणि वेळेत वाटप करावे. पुणे जिल्ह्यात ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या- नो युवर पोलींग स्टेशन’ उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला जात असून त्याप्रमाणे विभागातील इतर जिल्ह्यातही राबविला जावा. मतदारांना मोबाईल ॲपद्वारे मतदान केंद्रांची माहिती कशा प्रकारे पहावी याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी.

सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, विद्युत पुरवठा, सावली, दिव्यांग मतदार व ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवावी. आपल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राहील याची दक्षता घ्यावी. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने वाहनांची कसून तपासणी करावी. अवैध मद्य, अंमली पदार्थ, रोकड, मौल्यवान वस्तू आदींच्या वाहतुकीवर नजर ठेऊन आवश्यक तेथे ताब्यात घेण्याची, जप्तीची कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

विभागातील सर्व निवडणूक निरीक्षकांनी नेमून दिलेल्या मतदार संघात भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही हिरदेश कुमार यांनी दिल्या.

श्री. सुमनकुमार म्हणाले, सायंकाळी लवकर अंधार पडत असल्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांनी आपल्या क्षेत्रातील विद्युतपुरवठा नसलेल्या मतदान केंद्रावर विद्युतपुरवठ्याची व्यवस्था करावी. पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. मतदानावेळी गर्दी होऊ नये यासाठी मतदारांच्या रांगाचे व्यवस्थापन करावे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्षांना सर्व टप्प्यांवर आवश्यक ती माहिती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले, मतदान केंद्रांवर आवश्यक ते सर्व दिशादर्शक, ठिकाणदर्शक फलक (सायनेजेस) असावेत. मतदारांना आपले मतदान केंद्र माहित असावे, यासाठी प्रयत्न करावेत. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी भरावयाचे सर्व नमुने, अहवाल व्यवस्थितरित्या भरुन वेळेत पोहोचतील आदी बाबींबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या उपलब्ध करुन द्याव्यात. मतदानासाठी घरुन येण्यासाठी व जाण्यासाठी वाहनाची मागणी केलेल्या दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही ते म्हणाले.

निवडणुकीत उभे असलेलले उमेदवार, राजकीय पक्ष यांना निवडणूक प्रक्रियेची वेळोवेळी माहिती देऊन पारदर्शकता राहील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सूचना घ्याव्यात, तक्रारींचे वेळेत निराकरण होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे पुणे जिल्ह्यातील तयारीबाबत सादरीकरण करताना म्हणाले, जिल्ह्यात मतदार चिठ्ठ्याचे शंभर टक्के वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर समसमान मतदारसंख्या असेल अशी रचना करण्यात आली आहे. मतदानावेळी रांगाच्या व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आवश्यक तेथे राखीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक तसेच पोलीस निवडणूक निरीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. इतर पाच जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक, सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सातारचे समीर शेख, सोलापूरचे अतुल कुलकर्णी, कोल्हापूरचे महेंद्र पंडीत, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह निवडणूक प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

0000

‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ गेटवे ऑफ इंडिया येथे उद्या ८ नोव्हेंबर  रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या मतदान पूर्वतयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, संचालक पंकज श्रीवास्तव, प्रधान सचिव अविनाश कुमार, सचिव सुमन कुमार, अवर सचिव  अनिल कुमार हे शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ होईल. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एकाच वेळी मतदार जनजागृती अभियानाची सुरुवात होणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्हा यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील या शुभारंभास उपस्थित राहणार आहेत.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, सिने कलाकार अर्जुन कपूर, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, गायक मिलिंद इंगळे, गायिका वैशाली माडे, गायक राहुल सक्सेना यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच दिव्यांग अधिकार क्षेत्रातील विराली मोदी, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत याप्रसंगी उपस्थित राहतील.

या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी सुनिश्चित करणे हा आहे. त्यादृष्टीने या शुभारंभ कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.

यामध्ये मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात येणार आहे. तर, डाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण केले जाईल. त्याचप्रमाणे मतदान करण्याविषयी शपथ देण्यात येईल. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात येणार आहे. मतदार जागृती रॅली, मतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण, फ्लॅश मॉब देखील यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.

गेट वे ऑफ इंडिया ते कुलाब्यापर्यंत मतदार जागृती रॅली

या कार्यक्रमानंतर गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली आयोजित करण्यात येईल. यामध्ये नागरिकांना मतदान प्रक्रियेतील महत्त्व आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जागरूक केले जाईल.

०००

 

आचारसंहिता भंगाच्या ३११२ तक्रारी निकाली; ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. ७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३१२८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३११२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

सोबत : जिल्हानिहाय तक्ता

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/11/seizure-all-distwise-report-2024-11-07-1730961852.pdf”]

सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती

सातारा दि. ६:  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपोडे बुद्रुक व नांदवळ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपोडे बु. येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेत मजुरांना मतदान हक्क बजावण्या बाबत दिली माहिती.   २० नोव्हेंबर  होणाऱ्या मतदान प्रक्रीयेचे पटवून देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव यांनी सांगितले.

नांदवळ मध्ये गृहभेटीद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी अंगणवाडी सेविका मदतनिस, तलाठी, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) उपस्थिती होते.

०००

आदिवासी विकास विभागाच्या पदांसाठी अर्ज करण्यास १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई दि. ६ : आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे.

आदिवासी विकास विभागाने ५ ऑक्टोबर २०२४ ला विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर ठेवली होती. त्यास आता १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच २३ नोव्हेंबर २०२३ रोजी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.  त्यानुसार अर्जाचे शुल्क विभागाने परत करण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती. त्याला १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, जुना आग्रा रोड नाशिक येथे अथवा  टोल फ्री 1800 267 0007 या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...