शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 493

‘विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको’- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन 

मुंबई, दि. २७ : देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथील सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते.

चर्चासत्राचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज संस्थेने ‘कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी’,  नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एनआयटी वारंगल आदी संस्थेच्या सहकार्याने केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  मात्र कधी-कधी पर्यावरण विषयांवर ताठर भूमिका घेतली जाते. दक्षिण भारतातील एका मार्गावरील चार झाडांच्या रक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. या महामार्गावर पंधरा वर्षात जवळजवळ तीन हजार लोकांचे बळी गेले, असे सांगून चार झाडे कापणे आवश्यक असेल तर त्याऐवजी २५ नवी झाडे लावण्यासारखी सकारात्मक अट घातली गेली पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

देशात जलसंवर्धन व नदीजोड प्रकल्पांचे काम झाल्यास देशातील अन्नधान्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढेल व भारत संपूर्ण जगासाठी अन्नधान्य उत्पादन करू शकेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृतीमध्ये नदी, पर्वतराजी व वृक्षवल्लीची पूजा केली जाते. आपण निसर्गाचे व नैसर्गिक संपदेचे मालक नसून विश्वस्त आहोत ही भूमिका भारतीय विचारातून अधोरेखित केली जाते. वसुंधरा आपल्या विविधतेसह पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी भारतीय विचारधारेतील पाण्याचा, अन्नधान्याचा व ऊर्जेचा जबाबदारीने विनियोग याबाबतचे चिंतन यावर भाष्य केले तसेच प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली.

उद्घाटन सत्राला भारतीय नदी परिषदेचे सदस्य, ‘रिव्हर मॅन ऑफ इंडिया’ रमण कांत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor inaugurates Conference on ‘Lifestyle for Environment’

‘We should not be environmentally fanatic’: Governor C P Radhakrishnan

 

Mumbai, 27th Nov : Maharashtra Governor C P Radhakrishnan has said that there is a need to strike a fine balance between development and environment concerns. Stating that protection of the environment is receiving high priority, he said we should not be ‘environmentally fanatic’ when it comes to addressing the real problems of the people.

The Governor was speaking at a Conference on ‘Lifestyle for Environment: Bharatiya Perspective on Sustainability’ at National Stock Exchange Convention Centre in Mumbai on Wed (27 Nov).

The Conference was organised by the Govardhan Eco Village in association with Kotak School of Sustainability,  IGBC, NIT Warangal and other organisations.

The Governor said, Indian spirituality and festivals underscore sustainable practices. Worshiping rivers, mountains, and trees is not mere ritualism but a reminder of their indispensable role in sustaining life.

The Governor said Indian culture teaches us that we are not the owner of this planet but merely its trustee. He said the earth is not to be owned but nurtured and passed on, in all its richness, to future generations.

According to him, this perspective of trusteeship aligns beautifully with the principles of sustainability and forms the foundation of a holistic approach to development.

‘Riverman of India’ Raman Kant and Director of Govardhan Eco Village Gauranga Das were prominent among those present.

००००

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

नाशिक, दि. २६ (जिमाका): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी  नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी व केलेले काम उल्लेखीनय आहे, अशा शब्दात मख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी कौतुक केले.

यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह 15 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष व ई-उपस्थित होते.

श्री. एस.चोक्कलिंगम यांनी  जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संवाद साधत निवडणूक कामकाज संदर्भात आलेला अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले.

०००

 

आगामी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक नियोजन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक, दि.26 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा): आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने अंतिम आराखडा तयार  करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी आवश्यक बाबींचा सार्वांगीण विचार करून समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या.


आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, त्रंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले सन २०२७ मध्ये नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा महत्त्वाचा सोहळा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे  सर्व यंत्रणांचा सहभाग महत्वाचा असून सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात बैठक होणार असून या बैठकीत प्रत्येक यंत्रणांनी केलेल्या कार्यपूर्तीचा आढावा घेतला जाणार आहे. या प्रत्येक बैठकीस संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य  असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिका व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी तयार केल्याल्या आराखड्याचे सादीकरण बैठकीत केले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आराखड्यात आणखी समाविष्ठ करावयाच्या बाबी व करावयाचे बदल याबाबत मार्गदर्शन केले.  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा, आवश्यक सूचना जाणून घेण्यासाठी लवकरच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधु महंत, आखाडा प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत सांगितले.
0000000

महाराष्ट्रासह १५ राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी

नवी दिल्ली  26 : आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देत, महाराष्ट्रासह 15 राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमताबांधणीसाठी एकूण 1 हजार 115.67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने  15 राज्यांमध्ये भूस्खलन जोखीम शमन प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून महाराष्ट्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतच, सर्व राज्यांतील नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी 115.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी समितीने हिमनदी उद्रेक पूर जोखीम व्यवस्थापनासाठी 150 कोटी रुपये आणि सात शहरांमध्ये नागरी पूर व्यवस्थापनासाठी 3 हजार 75.65 कोटी रुपये मंजूर केले होते.

आपत्ती व्यवस्थापनासाठी तसेच अनुषंगिक कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने या वर्षांतर्गत 21 हजार 476 कोटी रुपयांहून अधिक निधी विविध राज्यांना वितरित केला आहे. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, राज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी यांतील तरतुदींचा समावेश आहे.

00000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 146, दि.26.11.2024

संविधान दिनानिमित्त राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

मुंबई, दि. २६ : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

0000

Maharashtra Governor reads out Preamble on ‘Constitution Day’

Mumbai, 26th Nov : The Governor of Maharashtra  C P Radhakrishnan  read out the preamble of the Constitution of India on the occasion of the Constitution Day at Raj Bhavan.

Officers and staff of Raj Bhavan and Police personnel posted in Raj Bhavan reiterated the resolve of the nation to constitute India into a Sovereign, Socialist, Secular and Democratic Republic on the occasion.

0000

 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली. पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे.

या सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे सचिव डॉ. श्री. एन. रामास्वामी उपस्थित होते. प्रोत्साहनपर बक्षिस रूपये दोन लाखाचे चार क्रमांक, दुसरे बक्षिस रूपये पाच लाख पाच क्रमांक, तिसरे बक्षिस रूपये एक लाख पाच क्रमांक व त्यापुढे रू. १०,०००/- हुन कमी रकमेची १०,४२८ बक्षिसे लागली आहेत. असे एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रू. २,२०,५०,०००/- इतकी आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी असे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी कळविले आहे.

0000

विभागीय आयुक्तालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

अमरावती, दि. 26 :  संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

यावेळी अपर आयुक्त संजय पवार, उपायुक्त गजेंद्र बावणे, संतोष कवडे, राजू फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मुल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी सर्वांना माहिती होण्यासाठी शासनाने जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केले असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना श्रीमती पाण्डेय यांनी उजाळा दिला.

0000

मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

मुंबई, दि. २६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज (दि. २६ नोव्हेंबर) राजभवन, मुंबई येथे  भेट घेऊन त्यांना आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.

यावेळी मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे व इतर देखील  उपस्थित होते.

0000

CM, Dy CMs meet Governor; CM tenders own, cabinet resignation

Mumbai, 26th Nov : Chief Minister Eknath Shinde accompanied by Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar met Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai on Tue (26 November).

The Chief Minister tendered the resignation of his post and that of his cabinet to the Governor on this occasion.

The Governor has asked the Chief Minister Eknath Shinde to continue to hold the charge of his post till alternate arrangements are made.

Ministers Deepak Kesarkar and Dadaji Bhuse were  also present.

0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात केले संविधान उद्देशिकेचे वाचन

मुंबई, दि. २६ :  संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

२६ नाव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. शासनाने विविध जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केली असल्याचे सांगून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला.

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यासाठी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

0000

दहशतवादी हल्ल्यातील पोलीस हुतात्मांना राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई, दि. २६ : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी  दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पोलीस जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हुतात्म्य पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.

१६ व्या हुतात्मा स्मृतीदिनी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे शहीद पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस दलामार्फत आदरांजली अर्पण करण्यात आली.  पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ तसेच ‘बिगुलर्स लास्ट पोस्ट’ वाजविले. यावेळी पोलीस अधिकारी व जवानांनी हुतात्म्यांना सलामी देत अभिवादन केले. राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.

0000

Maharashtra Governor, CM, Dy CM pay tribute to police martyrs on 26 /11 anniversary

Mumbai Date, 26 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan placed a wreath at the Police Martyrs’ Memorial in the premises of the Mumbai Police Commissionerate on the occasion of the 16th anniversary of the martyrdom of police officers and jawans during the Mumbai terrorist attack (26th Nov 2008).

Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar also placed wreaths at the Police Martyrs’ Memorial.

A Police platoon presented the Salami Shastra and played the Bigulars’ Last Post even as all dignitaries, uniformed officers and family members of martyrs saluted the police martyrs.

Soon after the salutation ceremony, the Governor met the family members of the police martyrs and senior retired and serving officers present on the occasion.

Guardian Ministers Deepak Kesarkar and Mangal Prabhat Lodha, Chief Secretary Sujata Saunik, DGP Rashmi Shukla,Additional chief Secretary Dr I S Chahal, Police Commissioner Vivek Phansalkar and others were present.

 

0000

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...