शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 491

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील सोयी-सुविधांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

  • सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश

  • देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

  • महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी

मुंबई, दि. ३ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयी सुविधांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिकमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.गोविंदराजगृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंगसामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेकोकण विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुखमुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यांसह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरभदंत डॉ.राहुल बोधीसंबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना भोजन, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या सुविधा पुरविताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे, त्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेत, अशा सुचनाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिल्या.

माजी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, दरवर्षी चांगली सुविधा देण्यात येते. यावर्षीही कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. भोजन, आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच सुरक्षा आदी सुविधा दर्जेदार द्याव्यात. स्थानिक समित्यांचे नेहमीच सहकार्य राहते. त्यांच्या सूचनांही योग्य प्रकारे अमलात आणाव्यात. संवेदनशीलता ठेवून चांगल्या प्रकारे नियोजन करावे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रारंभी चैत्यभूमी परिसरात आजपर्यंत झालेल्या सोयी सुविधांच्या कामांचा आढावा घेतला. ज्येष्ठ व्यक्तींना रांगेत बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय असावी, यासाठी परिसरातील गुरूद्वारांना आवाहन करावे, त्याचप्रमाणे रेल्वेस्थानकावरून चैत्यभूमीपर्यंत बसची शटल सेवा सुरू ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले. यासह दिशादर्शक फलक, रात्री पुरेशा लाईटची सुविधा, रेल्वेस्थानक परिसर अनधिकृत फेरीवालेमुक्त करणे, जीवरक्षक बोटींची व्यवस्था, पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था, वैद्यकीय पथके, समन्वय कक्ष आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री.गगराणी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक, आदींनी त्यांच्या यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. भदंत डॉ.बोधी, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदींनी शासनामार्फत करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

पीकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ३ : राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन  अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना  होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश  ठेऊन राज्यांतर्गत  पीकस्पर्धा  योजना राबविण्यात येत आहे.

पिकस्‍पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्‍हा व राज्‍य पातळीवर राबविण्‍यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके – ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस (एकूण ०५ पिके)

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या  स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा अर्जासोबत सादर करावा.

रब्‍बी  हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५०/- राहील.

तालुका पातळी :  पहिले बक्षिस पाच हजार रुपये, दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस दोन हजार रुपये.

जिल्हा पातळी  : पहिले बक्षिस दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस सात हजार रुपये, तिसरे बक्षिस  पाच हजार रुपये

राज्य पातळी : पहिले बक्षिस ५० हजार रुपये, दुसरे बक्षिस ४० हजार रुपये, तिसरे बक्षिस  ३० हजार रुपये

नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  पिकस्‍पर्धेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्‍यात येत आहे. पिकस्‍पर्धेबाबत अधिक माहितीसाठी  शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र  शासन कृषी  विभागाचे संकेतस्‍थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी खालील QR कोड स्कॅन करावा.

                   

शासन निर्णय                                       मार्गदर्शक सुचना

बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन  

मुंबई, दि. ३ : भारतात सन २०५० पर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. यादृष्टीने राज्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, नोकरीच्या समन्यायी संधी निर्माण करणे व तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करणे गरजेचे असून या क्षेत्रात अधिक गुंतवणूकीवर भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते युनिसेफच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट – २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य’ या विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले, महाराष्ट्रासह आसाम, ओडिशा, प. बंगाल व इतर काही राज्यांना पर्यावरण विषयक आव्हानांना सामोरे जावे लागेल. पर्यावरण बदल तसेच जैवविविधता व नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेल, असे ‘युनिसेफ’च्या अहवालात म्हटले आहे.

पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून राज्यपालांनी महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन आणि ग्रीन क्लब या पर्यावरण उपक्रमांना तसेच पर्यावरण योद्ध्यांना त्यांच्या कामाबद्दल कौतुकाची थाप दिली. पर्यावरण विषयक अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये सुरु करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये पर्यावरण विषयक अभ्यासक्रम राबविण्याची विनंती केली.

महाविद्यालयीन पर्यावरण योद्धे गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

0000

Maharashtra Governor releases UNICEF

State of World’s Children Report

 

Mumbai, 3rd Dec : Maharashtra Governor  C. P. Radhakrishnan released the UNICEF ‘State of the World’s Children Report – 2024 : The Future of Childhood in a Changing World’ in presence of two young climate champions at Raj Bhavan Mumbai on Mon (2 Dec).

This year’s report presents a perspective on how three major factors – demographic changes, climate and environmental crises, and breakthrough technologies – are likely to impact children’s lives by 2050 and beyond.

Chief of UNICEF Maharashtra Sanjay Singh, UNICEF officers Yusuf Kabir and Swati Mahapatra and climate champions Gurpreet Kaur and Pooja Vishwakarma were present.

0000

 

‘नीरी’चे अतुल वैद्य यांची एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई, दि. २ : सीएसआयआर ‘नीरी’चे संचालक डॉ अतुल नारायण वैद्य यांची नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी डॉ अतुल वैद्य यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल त्या तारखेपर्यंत) करण्यात आली आहे.

डॉ अतुल वैद्य (जन्म ४ डिसेंबर १९६४) यांनी रसायन अभियांत्रिकी विषयात एलआयटी नागपूर येथून एम एस्सी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच डी प्राप्त केली आहे. सन १९९० पासून त्यांनी ‘नीरी’ येथे कनिष्ठ वैज्ञानिक पदापासून संचालक पदापर्यंत कार्य केले आहे. डॉ. वैद्य यांना संशोधन, अध्यापन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.

एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरु पदावर नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ आशिष लेले, ‘द इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी हैद्राबादचे माजी कुलगुरु प्रा. ई. सुरेश कुमार तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.

0000

Director of NEERI Atul Vaidya appointed as Vice-Chancellor of LIT University

The Governor of Maharashtra and Chancellor of universities C P Radhakrishnan has appointed the Director of NEERI Nagpur Dr. Atul Narayan Vaidya as the Vice-Chancellor of the Laxminarayan Innovation Technological University, Nagpur.

Dr Atul Vaidya has been appointed as vice chancellor for a term of five years with effect from the date he assumes the charge of his office or till he attains the age of 65 years, whichever is earlier.

Dr. Atul Vaidya (b. 4 Dec. 1964) holds an MSc in Chemical Engineering from LIT Nagpur and obtained his PhD from the Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University.

Starting as Junior Scientist at NEERI in 1990, Dr Vaidya has been working as Scientist at various levels at NEERI. He has extensive experience of research, teaching and administration.

The Governor constituted a selection committee under the chairmanship of former Director of CSIR Dr Raghunath Mashelkar to appoint the Vice Chancellor of LIT University. Dr Ashish Lele, Director of National Chemical Laboratory, Prof. E. Suresh Kumar, former Vice Chancellor of ‘The English and Foreign Languages University Hyderabad  and Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Higher and Technical Education were members of the Committee.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची उद्या मुलाखत

 

मुंबई. दि. २ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महापरिनिर्वाणदिना’निमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञशिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञतत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली, देशाला एक सर्वंकष संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार‘ असेही संबोधले जाते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवरही मुलाखत प्रसारित होणार आहे.  निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची ५ आणि ६ डिसेंबरला मुलाखत

मुंबई. दि. २ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात महापरिनिर्वाणदिना’ निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञशिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. 

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. ५ आणि शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञतत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली आणि देशाला एक सर्वंकष संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार‘ असेही संबोधले जाते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा उद्या महाराष्ट्र दौरा 

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकपूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

नवी दिल्ली २ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार असूनमुंबई येथे विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

यावेळी उपराष्ट्रपती श्री. धनखड भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतचभारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शताब्दी स्तंभाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेज्यामध्ये कृषी तज्ज्ञसंशोधकतसेच इतर मान्यवर उपस्थित राहतील.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 148दि.02.12.2024

महापरिनिर्वाणदिनी येणाऱ्या अनुयायांच्या सोयी-सुविधांचे नियोजन करावे – कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख     

पूर्वतयारी आढावा बैठक        

मुंबई, दि. २ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावेअसे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झाली.

या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादवकोकण विभागीय उपायुक्त विवेक गायकवाडडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेसमन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. देशमुख म्हणाले कीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त नियंत्रण कक्षरुग्णवाहिकाबेस्टएसटी यांची परिवहन व्यवस्थासीसीटीव्हीची व्यवस्थाआरोग्य सेवापिण्याच्या पाण्याची व्यवस्थाभोजन व्यवस्था  इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छतासाफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत नियोजन करण्यात यावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील आपत्कालीन व्यवस्थेसहआरोग्य सुविधाचैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावटमहापरिनिर्वाण दिन मानवंदना शासकीय कार्यक्रम याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई.दि.1 आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही राज्यांना निसर्ग संपदेचे वरदान लाभले आहे.  देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या-त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे व तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल. यास्तव नागरिकांनी उभय राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत नागालँड (१ डिसेंबर) व आसाम (२ डिसेंबर) राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राजभवनतर्फे एसएनडीटी महिला विद्यापीठ व ‘ईश्वरपूरम पुणे’ या उत्तर पूर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी  कार्य करणाऱ्या संस्थेच्या सहयोगाने करण्यात आले.

राज्य स्थापना दिवस साजरे करताना आपल्याला विविधतेतून समान भारतीय मूल्ये दिसून येतात. त्या – त्या प्रदेशांचे गीत, नृत्य, लोककला व खाद्य संस्कृतीची माहिती होते.

आज देशातील केंद्र शासनातर्फे विविध राज्यांमधील युवकांना इतर राज्य जाणून घेण्याची संधी दिली जात आहे. अलीकडेच आपण ‘वतन को जानो’ व ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत जम्मू काश्मीर तसेच ओडिशा येथील युवकांना भेटलो असे सांगून केंद्र सरकारच्या या उपक्रमांमुळे युवकांना भारताची विविधता व संपन्नता पाहण्यास मिळते असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी ‘ईश्वरपूरम’ संस्थेतील नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध बांबू नृत्य सादर केले, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी संथाली नृत्य व आसामी लोकगीत सादर केले.

राज्यपालांच्या हस्ते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, प्र.कुलगुरु रुबी ओझा, ईश्वरपूरम संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, संस्थापक सदस्य प्रशांत जोशी यांसह उपस्थित विद्यार्थी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Nagaland Day and Assam Day celebrated in Maharashtra 

Maharashtra Governor C P Radhakrishnan presided over the joint celebration of the Nagaland (1 Dec) and Assam (2 Dec) State Formation Days at Raj Bhavan in Mumbai on Sun (1 Dec).

The Nagaland and Assam State Formation Day was celebrated as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of Government of India.

Congratulating the people of Nagaland and Assam on their State Formation Days, Maharashtra Governor Radhakrishnan said Nagaland and Assam have made tremendous strides in education, employment, and tourism since their formation. He said both states are blessed with unparalleled natural beauty and resources, and their progress is a source of pride for the entire nation.

Stating that in order to understand and appreciate a state and its people, one must visit that State and experience its culture firsthand. The Governor called upon the people of the State to visit Nagaland and Assam and to live among the people. This according to him will foster the spirit of friendship and unity that is essential for national integration.

The State Formation Day was organised by Maharashtra Raj Bhavan in association with the SNDT Women’s University and ‘Ishwarpuram’ an organisation working for the education and empowerment of youths from the North Eastern States.

Students from Nagaland and Arunachal Pradesh performed the famous bamboo dance under the aegis of Ishwarpuram. The students of SNDT Women’s University performed the Santhali dance and sang the Assamese folk song on the occasion.

The Governor felicitated Prof. Ujwala Chakradeo, Vice Chancellor of SNDT Women’s University, Prof Ruby Ojha, Vineet Kuber, President of ‘Ishwarpuram’ Prashant Joshi, Founder Member ‘Ishwarpuram’ and students and artists.

महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; कोची येथील गोलमेज परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

मुंबई :  दि. 1 सार्वजनिक मोहिमेच्या  अंमलबजावणी, नियोजन आणि मूल्यमापनात महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय मोहीम यशस्वी होऊ शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची आहे असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

कोची येथे राजकीय महिलांचे नेटवर्क गोलमेज परिषदचे  आयोजिन  करण्यात आली होते.  दि. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या दोन दिवसीय परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ‘महिला सक्षमीकरणासाठी खासदार आणि आमदार महिलांचे राजकीय नेटवर्क तयार करण्याची भूमिका आणि पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन करुन गोलमेज परिषदेचा समारोप केला.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, 1) लैंगिक समानतेच्या दृष्टीकोनातून प्रतिसाद देणारे आणि जबाबदार नेतृत्व

2) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत जाळे विकसित करण्यासाठी, दर्जेदार वेळ आणि कामावर आधारित निर्णय घेण्यासाठी मापदंड.

3) भारतीय राजकारणातील विविध क्षेत्रांसाठी बहुलता (Plurality) आणि विविधतेसाठी जागा

4) कायदेशीर बाबी, धोरणात्मक निर्णय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी यावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक  ही महिला सक्षमीकरणासाठी आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची आहे. असे सांगून  डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, चार दशकांहून अधिक काळ एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी माझ्या सर्व कार्यात नेहमीच महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. “सरकारने सुरू केलेल्या विविध कृती, कल्याणकारी योजना, उपक्रम यांचे महत्त्व लक्षात घेता तळागाळात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज संस्थामध्ये तसेच भारतीय संसदेत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. लोकसंख्येतील महिलांचे प्रमाण लक्षात घेता, हा संसदेतील महिलांच्या आरक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय एक स्वागतार्ह पाऊल आहे.

महिला खासदार, आमदार, याबाबत  धोरण बनवण्याच्या टप्प्यावर, त्याच्या योग्य अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि शाश्वत विकासासाठी पुरेसा निधीची  विशेष तरतूद करण्यात यावी.  विधिमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंच देखील या दिशेने अधिक योगदान देऊ शकतो. तसेच जागतिक महिला आयोगाचे ६९ सत्र आणि बीजिंग + 30 थीमसाठी निवडून आलेल्या सदस्यांमध्ये आणि त्यांच्या मतदारसंघांमध्ये अधिक जागरूकता होणे आवश्यक आहे.

जागतिक ते स्थानिक पातळीवर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात महिला आघाडीवर आहेत. महिला गटांचे डिजिटलायझेशन आणि क्षमता निर्माण कार्यक्रमाची गरज आहे. संसद आणि विधान मंडळांनी सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणविषयक समस्यांवर प्रत्येक सत्रात आपापल्या सभागृहात अर्थपूर्ण आणि परिणामाभिमुख चर्चा केली पाहिजे.”

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या महिला सबलीकरणाचा राष्ट्रीय आढावा आरोग्य, शिक्षण, महिला आणि मुलींची सुरक्षा यावर विशेष लक्ष केंद्रित करून महिला आमदारांची राष्ट्रीय गोलमेज परिषद आयोजित केली जावी. महिलांचा आर्थिक विकास आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्टे एकत्रित करण्याची गरज आहे.

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले गेले आणि त्यामुळे अनेक मतदारसंघात विजय मिळवला गेला. या सर्व महिला मतदार निश्चितपणे शाश्वत विकासाच्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या पुरस्कर्त्या बनल्या आहेत . असे ही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महिला लोकप्रतिनिधींच्या नेटवर्क संदर्भात निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...