शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 488

लोकअदालतीत सेवा विषयक १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली

मुंबई, दि. ९: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षात प्रथमच लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५४२ सेवा विषयक प्रकरणांपैकी १३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यात आला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकअदालतीसाठी तीन पॅनल आयोजित करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, सेवानिवृत्त सदस्य (न्या) ए. पी. कुन्हेकर, आर. बी. मलिक यांनी काम पाहिले. नितीन गद्रे (नागपूर), विजयकुमार (औरंगाबाद), विजया चौहान, संदेश तडवी, आर. एम. कोलगे आणि एम.बी. कदम यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. अदालतीत बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मणचेकर यांनी तपासणी केली.

या लोकअदालतीमध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही खंडपीठातील ५४२ प्रकरणांपैकी १३८ निकाली निघाली. यामध्ये मुंबई खंडपीठाच्या- २३८ प्रकरणांपैकी ३९ तर नागपूर- खंडपीठाच्या १५० पैकी ६३ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या १५४ प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

तीन प्रकरणांमध्ये १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

लोकअदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषी विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी माजी सैनिक उमेदवार मिळू शकले नाही. त्यामुळे लोकअदालतीत तडजोडीनंतर उर्वरीत रिक्त जागा इतर उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. या निर्णयामुळे १२६ उमेदवारांना शासकीय नोकरी मिळू शकणार आहे. या निर्णयामुळे माजी सैनिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.

लोकअदालत यशस्वी करण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील सचिव यांच्यासह न्यायाधिकरणामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, मुख्य सादरकर्ता अधिकारी, न्यायाधिकरण बार असोसिएशनमधील सर्व वकील, शासनाचे सर्व नोडल अधिकारी यांनी सहकार्य केले.

०००

 

विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय  

लोणार विकास आराखड्यातील विकासकामांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती, दि. 8 : लोणार विकास आराखड्यातील विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासह विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे निर्देश लोणार विकास आराखडा समिती अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले.

लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व कामांच्या प्रगतीचा आढावा डॉ. पाण्डेय यांनी शनिवारी (ता.7 डिसेंबर) लोणार येथे घेतला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समितीचे सदस्य तथा न्यायालयीन मित्र ॲड. एस. सान्याल, ॲड. दिपक ठाकरे, ॲड. कप्तान, ॲड. परचुरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, वनविभाग, नगरपरिषद, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्यातील बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. हे स्थळ जैवविविधतेने सपन्न असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकास तसेच परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे 369 कोटी 78 लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील नियोजि कामे पूर्णत्वास जाण्यासाठी समितीव्दारे नियमितपणे आढावा घेण्यात येतो. आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आरखड्यातील विकासकामे गतीने पूर्ण होण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. विकास आराखड्यांतर्गत येणारी लोणार सरोवर व परिसरातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

प्रत्यक्ष स्थळ पाहणी दरम्यान समिती सदस्यांद्वारे लोणार सरोवर, अन्नछत्र, वेट वेल प्रसाधान गृह,  गोमुख परिसर इत्यादी ठिकाणी भेटी देण्यात आल्या. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या गोमुख परिसरात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सुलभरित्या पोहोचणे सोईचे होण्यासाठी रॅम्पची व्यवस्था त्याठिकाणी करण्यात यावी. प्रसाधनगृहाचा योग्यरीत्या वापर होण्यासाठी पाण्याची व्यवस्था नियमित ठेवावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने योग्य ते नियोजन पुढील बैठकीदरम्यान सादर करावे, असेही त्यांनी सांगितले.

गोमुख परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची लिंक पोलीस विभागाला देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाला लक्ष ठेवणे सोयीचे होईल. तसेच पोलीस व भारतीय पुरातत्व विभाग यांनी परिसरात कुठलिही अनुचित घटना घडू नये यादृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावे. यावेळी तारांगण व संग्रहालय स्थापन करण्याकरिता पर्यटन विभागाच्या सादरीकरणाला एकमताने समितीव्दारे मंजूरी देण्यात आलेली आहे. वेडी बाभूळ निष्काशनाबाबत प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणाच्या आधारे सॅम्पल प्लॉट निवडून नियमानुसार योग्य ती कार्यवाही पूर्ण करावी व तसा अहवाल फेब्रुवारी-2025 पर्यंत समितीस सादर करावा, असे निर्देश वनविभागाला देण्यात आले.

000

राजधानीत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, दि. 8 : संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमात संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

संत संताजी जगनाडे महाराज यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि. ८ (जिमाका) : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यासह अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रा.डॉ. नरेंद्र जाधव यांच्या मुलाखतीचे १० डिसेंबरला प्रसारण

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’  कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ही मुलाखत  मंगळवार दि. 10 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

26 नोव्हेंबर 2024 रोजी देशभरात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत, प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीच्या पहिल्या भागातून डॉ. जाधव यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, इतिहास, वैशिष्टे आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान या विषयावर माहिती दिली. त्या अनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. जाधव यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे. या भागात डॉ.आंबेडकर यांचे लेखन व साहित्य या विषयावर त्यांनी माहिती दिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे विविध संवर्गाचा निकाल जाहीर

अनुवादक (मराठी), गुणवत्ता यादी जाहीर

 मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, या पदाच्या मुलाखती दिनांक 05 व 06 डिसेंबर, 2024 रोजी घेण्यात आल्या होत्या.

 या संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

000

सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक,

दापचारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा संवर्गाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, गट-अ, या संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाकरिता आरक्षित पदे वगळून प्रस्तुत संवर्गाच्या मुलाखती दिनांक 01 सप्टेंबर,2023 रोजी घेण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने या पदाचा निकाल यापूर्वीच दिनांक 20 ऑक्टोबर, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

चाळणी परीक्षेअंती पात्र ठरलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 28 फेब्रुवारी,2024 रोजी घेण्यात आल्या असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाकरिता आरक्षित पदांचा समावेश करुन प्रस्तुत संवर्गाचा सुधारित निकाल प्रसिध्द करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

000

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024

या परीक्षेच्या प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 01 डिसेंबर, 2024 रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक 1 व प्रश्नपुस्तिका क्रमांक 2 या विषयांच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकांच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची मुदत दिनांक 10 डिसेंबर, 2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु असून ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support-online@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

000

सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

 वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (अलिबाग)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (अलिबाग) या पदाच्या मुलाखती दिनांक 12 व 13 नोव्हेंबर, 2024 रोजी घेण्यात आल्या होत्या. विचाराधीन पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 5 डिसेंबर, 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

0000

तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ या पदाच्या मुलाखती दिनांक ०५ डिसेंबर, २०२४ ते ०६ डिसेंबर, २०२४ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

0000

कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील उमेदवारांची शासनाकडे शिफारस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे कर सहायक परीक्षा-२०१६  कर सहायक गट क संवर्गाच्या  प्रतीक्षायादीमधून अराखीव सर्वसाधारण वर्गवारीचे एक पद व भ.ज. (क) वर्गवारीचे एक पद अशी दोन पदे राखून ठेवून उर्वरीत ४० पदांकरिता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. राखून ठेवलेल्या दोन पदाबाबत शासनाचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर या पदांच्या शिफारशीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रतीक्षायादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

00000

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब,

चाळणी परीक्षा -२०२४ सुधारित निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १८ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब,  या परीक्षेचा निकाल दिनांक १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता.  काही उमेदवारांनी केलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने निकाल सुधारित करुन आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

त्यानुसार नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

००००

विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १०६ सदस्यांनी सदस्यपदाची घेतली शपथ  

महाराष्ट्र विधिमंडळ विशेष अधिवेशन २०२४

मुंबई, दि. ८ : विधानसभेच्या  विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

 

शपथ घेतलेल्या सदस्यांची यादी

  1. नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
  2.  राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील
  3. दिलीप गंगाधर सोपल
  4. मंगलप्रभात गुमानमल लोढा
  5. भास्कर भाऊराव जाधव
  6.  डॉ. नितीन काशिनाथ राऊत
  7. विजय नामदेवराव वडेट्टीवार
  8.  चंद्रशेखर बावनकुळे
  9. जितेंद्र सतीश आव्हाड
  10. अब्दुल नबी सत्तार
  11. अमित विलासराव देशमुख
  12. असलम रमजानअली शेख
  13. डॉ. तानाजी जयवंत सावंत
  14. आदित्य उद्धव ठाकरे
  15. विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख
  16. सुरेश रामचंद्र धस
  17. विश्वजीत पतंगराव कदम
  18. सुनील वामन प्रभू
  19. डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
  20. कृष्णा पंचमजी खोपडे
  21. अमित सुभाषराव झनक
  22. अमीन अमीरअली पटेल
  23. प्रशांत बन्सीलाल बंब
  24. रवी गंगाधरराव राणा
  25. प्रताप बाबुराव सरनाईक
  26. दिलीपराव शंकरराव बनकर
  27. प्रकाश आनंदराव आबिटकर
  28. अजय विनायक चौधरी
  29. डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील
  30. संजय गोविंद पोतनीस
  31. आकाश पांडुरंग फुंडकर
  32. सुनील राजाराम राऊत
  33. महेश (दादा) किशन लांडगे
  34. नारायण गोविंदराव पाटील
  35. बालाजी देविदासराव कल्याणकर
  36. विकास पांडुरंग ठाकरे
  37. नितीनकुमार भिकनराव देशमुख
  38. शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक
  39. रोहित पवार
  40. कैलास बाळासाहेब पाटील (घाडगे)
  41. डॉ. किरण यमाजी लहामटे
  42. संदीप रवींद्र क्षीरसागर
  43. जितेश रावसाहेब अंतापूरकर
  44. अनुपभैय्या ओमप्रकाश अग्रवाल
  45. राहुल प्रकाश आवाडे
  46. हिकमत बळीराम उढाण
  47. संजय उपाध्याय
  48. हेमंत भुजंगराव ओगले
  49. ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके
  50. रमेश काशीराम कराड
  51. मनोज देवानंद कायंदे
  52. बाबाजी रामचंद्र काळे
  53. देवेंद्र राजेश कोठे
  54. अमोल धोंडीबा खताळ
  55. सिद्धार्थ रामभाऊ खरात
  56. राजू ज्ञानू खरे
  57. हारून खान
  58. श्याम रामचरण खोडे
  59. मनोज भीमराव घोरपडे
  60. शंकर पांडुरंग जगताप
  61. अमोल हरिभाऊ जावळे
  62. चरणसिंग बाबूलालजी ठाकूर
  63. प्रवीण वसंतराव तायडे
  64. आनंद शंकर तिडके
  65. प्रवीण प्रभाकरराव  दटके
  66. संजय नीलकंठराव देरकर
  67. करण संजय देवतळे
  68. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख
  69. सत्यजित शिवाजीराव देशमुख
  70. अनंत (बाळा) भि. नर
  71. डॉ. मिलिंद रामजी नरोटे
  72. राजन बाळकृष्ण नाईक
  73. मुरजी (काका) पटेल
  74. साजिद खान पठाण
  75. गोपीचंद कुंडलिक पडळकर
  76. विक्रम बबनराव पाचपुते
  77. अभिजीत धनंजय पाटील
  78. अमोल चिमणराव पाटील
  79. राघवेंद्र (रामदादा) मनोहर पाटील
  80. रोहित सुमन आर.आर. आबा पाटील
  81. शिवाजी शट्टूप्पा पाटील
  82. सचिन पाटील
  83. आमश्या फुलजी पाडवी
  84. विजयसिंह शिवाजीराव पंडित
  85. राजेश भाऊराव बकाने
  86. सुहास अनिल बाबर
  87. हरिश्चंद्र सखाराम भोये
  88. अतुलबाबा सुरेश भोसले
  89. देवराव विठोबा भोंगळे
  90. रामदास मलुजी मसराम
  91. दलितमित्र डॉ. अशोकराव (बापू) माने
  92. संजय नारायणराव मेश्राम
  93. राजेश गोवर्धन मोरे
  94. अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर
  95. शंकर हिरामण मांडेकर
  96. उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर
  97. हेमंत नारायण रासने
  98. गजानन मोतीराम लवटे
  99. विठ्ठल वकीलराव लंघे
  100. राजेश श्रीरामजी वानखडे
  101. किसन मारोती वानखेडे
  102. सुमित वानखेडे
  103. राजेश उत्तमराव विटेकर
  104. किरण उर्फ भैय्या सामंत
  105. महेश बळीराम सावंत
  106. प्रवीण वीरभद्रया स्वामी

000

संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन  

मुंबई, दि. ८ : संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखन करण्याबरोबरच मानवता व लोककल्याणाची शिकवण दिली. त्यांच्या कार्याला कोटी कोटी नमन आहे. यावेळी शासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

000

संत संताजी जगनाडे महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ८: संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले.

000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी प्रा.डॉ. नरेंद्र जाधव यांच्या मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’  कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ही मुलाखत  मंगळवार दि. 10 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

26 नोव्हेंबर 2024 रोजी देशभरात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत, प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीच्या पहिल्या भागातून डॉ. जाधव यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, इतिहास, वैशिष्टे आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान या विषयावर माहिती दिली. त्या अनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. जाधव यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे. या भागात डॉ.आंबेडकर यांचे लेखन व साहित्य या विषयावर त्यांनी माहिती दिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

ताज्या बातम्या

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना...

अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरातून राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १६ विधेयके मंजूर...

0
मुंबई, दि. १८ : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकासह महत्त्वाची १६ विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरामध्ये महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट...

विधानसभा प्रश्नोत्तर

0
रोबोटिक मशीनद्वारे स्वच्छतेसाठी निधी कमी पडू देणार नाही -  उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. १८ : राज्यात हाताने मैला स्वच्छ करणे अथवा डोक्यावर महिला वाहून नेण्याचे काम संपुष्टात...

विधानपरिषद कामकाज

0
लोणार सरोवर, कोकण किनारा व खुलताबाद येथील पर्यटन प्रकल्पांना गती - पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी शासन स्तरावर महत्वपूर्ण पावले...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
विधिमंडळ सदस्यांच्या समितीद्वारे मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहांच्या पाहणी करणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि. १८ :- मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील सोयीसुविधा आणि मेसच्या पाहणीसाठी...