बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 472

महाराष्ट्र शासनाचे १०, १५, २० व २५ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे 10 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २७ ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस्  २७ ऑगस्ट २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २८ ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १० वर्षांचा असून, रोख्यांचा  कालावधी  २८ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २८ ऑगस्ट २०३४  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी फेब्रुवारी २८ आणि ऑगस्ट २८ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे 15 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या पंधरा  वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २७ ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस्  २७ ऑगस्ट २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २८ ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १५ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २८ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २८ ऑगस्ट २०३९  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी फेब्रुवारी २८ आणि ऑगस्ट २८ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे 20 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या वीस  वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २७ ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस्  २७ ऑगस्ट २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २८ ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी २० वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २८ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २८ ऑगस्ट २०४४  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी फेब्रुवारी २८ आणि ऑगस्ट २८ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे 25 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या पंचवीस  वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २७ ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस्  २७ ऑगस्ट २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २८ ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी २५ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २८ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २८ ऑगस्ट २०४९  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी फेब्रुवारी २८ आणि ऑगस्ट २८ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची ५.६८ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 5.68 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.22 सप्टेंबर, 2024 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि.23 सप्टेंबर, 2024 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. २३ सप्टेंबर,  २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 5.68 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस “प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

००००

वंदना थोरात/वि.स.अ.

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

मुंबई दि. ०१ : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  ही स्पर्धा  जाहीर केली आहे. महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझाछायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ होती. या स्पर्धेत सहभागासाठी मुदतवाढ देण्यात आली असून ही तारीख आता १५ सप्टेंबर २०२४ अशी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र माझाया संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जलसंधारण, जलसंपदा, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि पर्यावरण, वने आदी योजनांशी संबंधित छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील.

निवड झालेल्या छायाचित्र, रिल्स आणि लघुपटांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्राप्त झालेल्या छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच रिल्स आणि लघुपटांना शासनाच्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी देण्यात येईल. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची, प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.

स्पर्धेची नियमावली

छायाचित्रण स्पर्धा :

* छायाचित्रे १८x३० इंच HD च्या मानक आकाराची असावीत.

* छायाचित्राची संकल्पना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुचविलेल्या संकल्पनेशी सुसंगत असावी.

* छायाचित्र ही स्वतःची सर्जनशीलता असावी.

* छायाचित्रांमध्ये कोणतेही अनुचित दृश्य नसावेत.

* कोणतीही कॉपीराईट सामग्री वापरली जाऊ नये.

* छायाचित्राचे तपशीलवार वर्णन अपेक्षित आहे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे छायाचित्रांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे असतील.

रिल्स स्पर्धा :

* रिल्ससाठी वेळ मर्यादा कमाल १ मिनिटांपर्यंत असावी.

* असभ्य भाषा, आक्षेपार्ह शब्द याचा वापर यामध्ये करता येणार नाही.

* कोणतेही स्वामित्व अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* स्पर्धा १८ वर्षे आणि त्यावरील सर्वांसाठी खुली असेल.

* मानक रिल्स स्वरूप अपेक्षित आहे.

* रिल्स नवीन असणे आवश्यक आहे आणि विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केले पाहिजे.

* स्पर्धेत भाग  सादर केलेल्या रील्सचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे असतील.

लघुपट स्पर्धा :

* लघुपटाचा अवधी किमान ३ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे इतका असावा.

* या स्पर्धेत १८ वर्षावरील कुणीही भाग घेऊ शकतात.

* लघुपट नवीन असणे आवश्यक आहे. लघुपट विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केलेला असावा.

* अभद्र भाषा, हिंसा, आक्षेपार्ह अपशब्द वापरला जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.

* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या संकल्पना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे लघुपट सादर करणे आवश्यक आहे.

* कोणतेही स्वामित्व अधिकाराचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* मानक व्हिडिओ स्वरूप MP४ HD १९२० * १०८० अपेक्षित आहे. स्वतंत्र YouTube स्वरूप / X स्वरूप असावे.

* लघुपट मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत बनवला आहे, याची खात्री करावी.

* लघुपट HD format मध्ये सबमिट करावा.

 भाग घेतलेल्यांचे लघुपटांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे असतील.

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत  स्पर्धेनुसार छायाचित्र, रिल्व किंवा लघुपट पाठवावीत. सोबत आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाइल नंबर आणि छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे, याची माहिती देणे आवश्यक आहे.

०००००

स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयी मंत्री समूहाची तिसरी बैठक राजधानीत; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

नवी दिल्ली, दि. २२ : स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्यांवर, मंत्री समूहाची तिसरी बैठक नॉर्थ ब्लॉक येथे आज बोलविण्यात आली होती. गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बाल विकास मंत्री, आदिती तटकरे सहभागी झाल्या होत्या.

या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, सुरेश खन्ना (अर्थमंत्री, उत्तर प्रदेश), हरपाल एस चीमा (अर्थमंत्री, पंजाब), कनुभाई देसाई (अर्थमंत्री, गुजरात) आणि के एन बालगोपाल (अर्थमंत्री, केरळ) उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने या बैठकीत कु. तटकरे उपस्थित होत्या. या बैठकीत स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर विशेषत: जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास (स्वयं-पुनर्विकास किंवा विकासकामार्फत) आणि झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन या विविध विषयांवर त्यांनी राज्याच्या वतीने मुद्दे मांडले असल्याचे त्यांनी बैठकीनंतर सांगितले.

या बैठकीत पर्यटन प्रकल्पासाठी जमिनीच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावरील कर आकारणीच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्र्यांच्या समूहाने (GoM) कु. तटकरे यांनी मांडलेल्या मुद्यांची दखल घेतली गेली असल्याचे तसेच यावर सकारात्मक विचार करण्याचा तसेच पुढील बैठकीत अधिक तपशिलांसह त्यावर अधिक चर्चा करण्याचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले.

०००

शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंधासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 22 : मुलींच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यासंदर्भात शालेय शिक्षण, गृह विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, नगरविकास, आदिवासी विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करणार असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी शासन कार्यरत असून समाजाच्या सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर शाळेमधील स्वच्छता रक्षकाने अत्याचार केल्याचे समजताच उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी बदलापूरला भेट दिली. पॉक्सोच्या संदर्भातल्या ज्या मुलींच्या केसेस आहेत, त्याच्यात मुलींच्या वयानुसार त्यांच्याशी संवेदनशील पद्धतीने बोलून तक्रार नोंदवण्यासाठी विविध वयाच्या मुलींच्या परिस्थितीनुसार त्याचे एसओपी व त्याच्यावर पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

तक्रार नोंदविण्यास विलंब होणे तसेच शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे वागणे, तक्रार करणाऱ्या लोकांच्या खच्चीकरणाचा प्रकार अतिशय गंभीर आहे. यासंदर्भात विविध शैक्षणिक संस्थांशी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची अधिक माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय सक्रिय असून संवेदनशील पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि यामध्ये वेगवेगळ्या घटकांशी बोलून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

पोलीस कोठडी ऐवजी त्याला कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये, याबद्दल डॉ. गोऱ्‍हे यांनी पोलिसांशी चर्चा केली आहे. मुलींना बाल समुपदेशकांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करावा. ज्यामुळे त्यांच्या मनावर जो आघात झालाय तो दूर करण्याचे प्रयत्न होतील, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांना केल्या आहेत.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट, २०२४ रोजीची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

मुंबई, दि.२३ : राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पद भरतीकरीता दि. २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवार, दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. यासंदर्भात आज दि. २२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ

‘किसान क्रेडीट कार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई दि. २२ : मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे.

शेततळे प्रति हेक्टर सर्वजाती मत्स्यपालन पाच लाख रूपये कर्ज दर निश्च‍ित करण्यात आला आहे. नदी, तलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने मासेमारी ८० हजार रूपये, निमखारे पाण्यातील सर्वजाती मत्स्यपालन प्रति हेक्टर तीन लाख रूपये, निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रतिहेक्टर तीन लाख रूपये, टॉलर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, पर्सिसीन मच्छीमार नौका तीन लाख रूपये, गील नेटर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, बिगर यांत्रिक मच्छीमार नौका ८० हजार रूपये, यांत्रिक मच्छीमार नौका एक लाख ५० हजार रूपये, शोभीवंत मत्स्यपालन एक लाख रूपये, गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय दोन लाख रूपये, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन ५० हजार रूपये अशा एकूण १४ घटकांना कर्जदर निश्च‍ित करण्यात आलेला आहे.

राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

श्रध्दा मेश्राम/स.सं

पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

RAJU DONGRE Mantralay Mumbai

निती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

सात क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून २०३० पर्यंत मुंबईचा जीडीपी २६ लाख कोटी होणार

             मुंबई, दि. २२ : मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो त्याचदृष्टीने राज्यात कामे सुरू आहेत. उद्योजकांची देखील महाराष्ट्राला पसंती असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

RAJU DONGRE Mantralay Mumbai

वर्षा निवासस्थानी निती आयोगासमवेत झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, निती आयोगाचे ओ. पी. अग्रवाल, प्रधान आर्थिक सल्लागार ॲना रॉय, शिरीष संखे, यांच्यासह मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

यावेळी निती आयोगाचे श्री. संख्ये यांनी मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाबाबत सादरीकरण केले. निती आयोग १३ राज्यांसाठी व्हीजन तयार करीत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी सांगितले. राज्याच्या विकासासोबतच शहरांच्या आर्थिक विकासावर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगर परिसर, सुरत, वाराणसी, विशाखापट्टणम या चार महानगरांवर पथदर्शी प्रकल्प म्हणून निती आयोग काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

निती आयोगाने केलेल्या अभ्यासात मुंबई महानगरासह पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या परिसराच्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. सध्या या परिसराचे सकल देशांतर्गत उत्पादन १२ लाख कोटी (१४० बिलियन डॉलर) असून ते उत्तरप्रदेश राज्याच्या ८० टक्के एवढे आहे. मुंबई आणि महानगर परिसराचा जीडीपी २०३० पर्यंत २६ लाख कोटी (३०० बिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे श्री. सुब्रमण्यम् यांनी  सांगितले. मुंबईत सध्या सुमारे १ कोटी रोजगार असून सुमारे ३० लाख रोजगार अजून निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निती आयोगाने नमूद केले आहे. त्यासाठी सात विकास क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून त्यामध्ये  खासगी क्षेत्रामध्ये १० ते ११ लाख कोटी गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून शहरांना ग्रोथ इंजिन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राच्या एक तृतीयांश जीडीपी या पाच जिल्ह्यातून येत असल्याचे सांगत मुंबईत ग्लोबल सर्विसेस हब करणे, परवडणाऱ्या घरांना चालना देणे, एमएमआर परिसराला जागतिक पर्यटन केंद्र बनविणे, एमएमआरमधील बंदरांचा एकात्मिक विकास करून उद्योग आणि लॉजिस्टीक हब करणे, सुनियोजित शहरांचा विकास, सर्वसमावेशकता आणि शाश्वतता तसेच जागतिक दर्जाच्या नागरी पायाभूत सुविधा अशा सात बाबींच्या आधारे एमएमआर परिसराचा विकास डोळ्यासमोर ठेऊन आर्थिक वृद्धीचा वेग वाढविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, मुंबईसह महानगर परिसरात असलेल्या संधीचा लाभ घेऊन एकात्मिक विकासासाठी नियोजन निती आयोगाने केले आहे. त्यासाठी परवडणाऱ्या घरांची उभारणी करणे, रोजगार निर्मितीवर भर देणे, नवी मुंबईत डेटा सेंटरला प्राधान्य देणे त्याचबरोबर अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोअरच्या उभारणीला वेग देण्यात येत आहे. नुकतेच महाराष्ट्रात सुमारे ८० हजार कोटींच्या गुंतवणुक प्रकल्पांना मान्यता दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्याचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने उपयोग करून घेण्यासाठी देखील प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

राज्य सांस्कृतिक पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ अनुराधा पौडवाल यांना प्रदान

  • राज्याच्या १३ कोटी जनतेच्या वतीने देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार अनमोल –  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
  • चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित
  • ५८ व ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा
मुंबई दि. २१ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वरळी येथील एन एस सी आय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना ,  प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ शिवाजी साटम,  चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ आशा पारेख यांना तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ एन चंद्रा यांना प्रदान करण्यात आले.
तसेच यावेळी पुढील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले ५८ वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे –
सर्वोत्कृष्ट कथा :-  शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ),
पटकथा :- मकरंद माने, विठ्ठल काळे  (बापल्योक ),
उत्कृष्ट संवाद :-  शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )
उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक)
उत्कृष्ट संगीत: –  राहुल देशपांडे ( मी वसंतराव )
उत्कृष्ट पार्श्वसंगीत:-  विजय गवंडे ( बापल्योक ),
उत्कृष्ट पार्श्वगायक:-  राहुल देशपांडे ( मी वसंतराव )
उत्कृष्ट पार्श्वगायिका:-  प्राची रेगे ( गोदाकाठ )
उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :-  सुजितकुमार (चोरीचा मामला )
उत्कृष्ट अभिनेता:-  राहुल देशपांडे ( मी वसंतराव )
उत्कृष्ट अभिनेत्री :-  मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )
उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी ( चोरीचा मामला )
सहाय्यक अभिनेता :-  विठ्ठल काळे ( बापल्योक ),
सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे ( फनरल),
प्रथम पदार्पण अभिनेता:- ऋतुराज वानखेडे ( जयंती),
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-  पल्लवी पालकर ( फास )
 ५९ वे राज्य चित्रपट पुरस्कार  खालीलप्रमाणे –
सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशी, अर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी),
उत्कृष्ट पटकथा :- रसिका आगासे ( तिचं शहर होणं ),
उत्कृष्ट संवाद :-   नितीन नंदन ( बाल भारती )
उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी ( गोदावरी )
उत्कृष्ट संगीत: – अमित राज ( झिम्मा)
उत्कृष्ट पार्श्वसंगीत :-  सारंग कुलकर्णी ( कारखानीसांची वारी),
उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहुल देशपांडे ( गोदावरी ),
उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी ( रंगिले फंटर),
उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :- फुलवा खामकर ( लक डाऊन be positive )
उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,)
उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी ( तिचं शहर होणं ),
उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू )
सहाय्यक अभिनेता :-  अमेय वाघ ( फ्रेम )
सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ),
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :-  योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )’
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमणध्वनी),
उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :- निर्मिती सावंत ( झिम्मा )
००००

मणिपूर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीनी ‘युजीसी’ची परवानगी घेऊन सुधारित प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

मुंबई दि. २१ : मणिपूर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हे स्वायत्त विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात  आदिवासी भागात कौशल्य निर्मितीवर आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवश्यक त्या सर्व परवानगी घेऊन विद्यापीठाने सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूर विद्यापीठ संदर्भात ऑनलाईन बैठक झाली.

बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे,उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर,(ऑनलाइन) मणिपूर विद्यापीठाचे कुलगुरू हरिकुमार पल्लाथाडका(ऑनलाइन) उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नँक मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तसेच   विद्यापीठाने  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कतर्फे प्रकाशित होणाऱ्या अहवालात विद्यापीठाचा समावेश असावा यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर इतर राज्यात शैक्षणिक शाखा सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या

आवश्यक त्या सर्व परवानगी घ्यावी,आणि  सुधारित प्रस्ताव  राज्य शासनाकडे पाठवावा. राज्य शासन याबाबत सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

राज्यातील प्रमाणित शल्य चिकित्सकांची संख्या वाढवा – राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

0
मुंबई, दि. १४ : राज्यातील कामगारांची संख्या लक्षात घेता त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी असलेले प्रमाणित शल्यचिकित्सक यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे प्रमाणित शल्यचिकित्सकांची संख्या...

धरणातील गाळ काढण्यासंदर्भात राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

0
मुंबई, दि. १४: धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्र राज्याचे याबाबतचे धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्वसमावेशक असे नवीन धोरण...

‘नाबार्ड’ अर्थसहाय्यित सिंचन प्रकल्पांची कामे निश्चित कालमर्यादेत व्हावीत – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

0
मुंबई, दि. १४: ‘नाबार्ड’च्या अर्थ सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या जलसिंचन प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत होण्यासाठी प्रकल्पनिहाय करण्यात येत असलेल्या कामाचा कृती आराखडा तयार करून...

पावसाळ्यापूर्वी पिटसई कडक्याची गणी गावातील नागरिकांचे निवारागृहात स्थलांतर करा – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : तळा तालुक्यातील पिटसई कडक्याची गणी आदिवासी वाडी येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे आणि पूरस्थिती निर्माण होते . त्यामुळे मान्सूनपूर्व सतर्कतेचा...

पवना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : पवना प्रकल्पामुळे बाधित धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात मावळ...