
जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
शिर्डी, दि.१२ – केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थान मंदिराचेही दर्शन घेतले.
श्री साईबाबा संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीचे अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
शिर्डी, दि.१२ – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतले.
त्यांच्यासमवेत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील होते.
श्री साईबाबा संस्थानच्यावतीने श्री.शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.
तत्पूर्वी श्री.शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक
मुंबई,दि.11 : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे कौतुक केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिथल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आमंत्रण दिले होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी 9 जानेवारी रोजी नवी दिल्लीत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुंबईचे महापालिका आयुक्त आणि मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मतदान केंद्र व्यवस्थापन, तेथील पायाभूत सुविधा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी समाज माध्यमांचा उपयोग आणि माध्यम देखरेख आणि नियंत्रण समितीच्या कामकाजाविषयी राज्याच्या कामकाजाची माहिती दिल्लीतील अधिकाऱ्यांना दिली. या कार्यशाळेला दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाझ, विविध जिल्हा निवडणूक अधिकारी, रिटर्निंग ऑफिसर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पीआयबीच्या मुंबई च्या उपसंचालक जयदेव पुजारी, आकाशवाणीचे वृत्त संपादक जीवन भावसार, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यम तज्ञ पल्लवी जाधव यावेळी उपस्थित होते.
00000
जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे अभिवादन
मुंबई, दि. 12 : जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्यासह उपस्थित मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
वाहतुकीच्या नियमांचे पालन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे, दि.11 (जिमाका) :- दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे मोटार वाहन विभाग आयोजित रस्ता सुरक्षित अभियान अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन संपन्न झाले. यानिमित्ताने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमास अप्पर परिवहन आयुक्त मुंबई श्री.भरत कळसकर, जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार, सहायक आयुक्त शैलेश कामत, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, ठाणे जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे व नितीन डोसा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात हा कार्यक्रम होत असतो. आज राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्ह्यात होत आहे, यानिमित्त उपस्थित सर्वांचे स्वागत आणि अभिनंदनही. वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. परदेशात अपघाताचे प्रमाण का कमी आहे, याचा आपण अभ्यास करणे आवश्यक आहे. परदेशात ठिकठिकाणी रिफ्लेक्टर्स लावले जातात, जागोजागी सूचना फलक लावले जातात. जेणेकरुन वाहन चालवित असताना वाहनचालकांना नेमके कुठे जायचे, याचा बोध होतो. या विभागाकडून वाहतूकीच्या निकषात अधिक सुधारणा केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. वाहतुकीची शिस्त पाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अपघात आणि मृत्यू प्रमाण कमी किंवा शून्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. यापुढे पार्किंग व्यवस्था नसेल तर नवीन वाहन नोंदणी केली जाणार नाही. यासाठी महापालिकेकडून भाडेतत्वावर नवीन वाहन पार्किंगसाठी मंजुरी मिळाली तर वाहन नोंदणी करणे शक्य होईल. यासाठी निकष व नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागानेही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लघंन होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते दोन माहिती पुस्तिकांचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी रस्ता सुरक्षा कार्यक्रम तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती दिली.
प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे, दि.11 (जिमाका) :- आज ठाण्यातील खोपट बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना 2025 चे व नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ, राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नितीन मैंद, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, उपमहाव्यवस्थापक श्री.मांडके, ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, लवकरच एस.टी च्या ताफ्यामध्ये 2 हजार 640 लालपरी नव्याने दाखल होत आहेत. या नव्या वर्षामध्ये राज्याच्या प्रत्येक कानाकोपाऱ्यात नव्या लालपरी दिमाखात धावताना दिसतील. याबरोबरच भाडेतत्वावरील 5 हजार इलेक्ट्रिक बसेस आपण घेत आहोत. एवढेच नव्हे तर 2 हजार 500 नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव एस.टी. ने शासनाकडे पाठविला असून त्याचा देखील पाठपुरावा करुन पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत या बसेस एस.टी.च्या ताफ्यात दाखल होतील असे प्रयत्न केले जातील.
ते म्हणाले, आज 17 बसेसच्या सेवेचे उद्घाटन झाले आहेत. परंतु ज्या 150 बसेस येणार त्यातील मी सांगितले की, ठाणे शहरांमध्ये 40 आणि मीरा भाईंदरमध्ये 10 अशा एकूण 50 बसेस सुरुवातीच्या काळात मंजूर करुन घेतल्या आहेत. आणि उर्वरित बसेस या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येणार आहेत.
जे मार्ग बंद पडलेले आहे ते मार्ग आधी सुरु करावेत. बसेस वेळेवर कशा धावतील याची तांत्रिक गोष्टी सांभाळून काळजी घ्यावी, असे आवाहन करून परिवहन मंत्री पुढे म्हणाले की, प्रवाशांना सुखसुविधा देत असताना चालक व वाहकाच्याही सुखसुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा देणे आपले परम कर्तव्य आहे. रस्ते वाहतुकीची समस्या आपल्यापुढे एक आव्हान आहे. त्यातून काही प्रमाणात रस्ते अपघात होतात. ते होवू नयेत यासाठी मात्र रस्ता सुरक्षाविषयक निकष व नियम तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
श्री.सरनाईक म्हणाले की, वेगमर्यादा केवळ सीसीटीव्हीत न पाहता किमान दोन किलोमीटर अंतर पाहून हा मर्यादित वेग प्रति तास 80 किमी पेक्षा जास्त असू नये, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. रस्त्यावरील वळणे व तत्सम बाबींविषयी ठिकठिकाणी सूचनाफलक लावावेत. वाहतूकीचे नियम लोकांकडून योग्य प्रकारे पाळले गेले तर अपघातांची संख्या फार कमी होईल, असा विश्वास मला वाटतो.
यावेळी त्यांनी बसस्थानकावरील शौचालय व प्रतिक्षागृहाची पाहणी केली असता वाहक व चालक यांना आराम करण्याची, गरम व थंड पाण्याची व्यवस्था, प्रतिक्षागृह चांगले असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सर्वांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, मला भरपूर काही निर्णय घ्यायचे आहेत. चालक व वाहक यांच्यासंदर्भात माध्यमांतून काही प्रतिक्रिया दिसून येतात, तेव्हा अतिशय वाईटही वाटते. आपण लोकप्रतिनिधी म्हणून चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांनाही सुविधा द्यायला हव्यात, या मताचा मी आहे. माझ्यावर ही जबाबदारी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली असून या जबाबदारीचे भान ठेवून या राज्य परिवहन महामंडळाच्या परिवाराचे अजून चांगले करण्यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न करीन. माझ्या एस.टी कर्मंचाऱ्याला सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे आणि त्यातले पहिले पाऊल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागासाठीही शंभर दिवसाचा कार्यक्रम आखून दिला आहे. या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच काही चांगले निर्णय घेतले जाणार आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महात्मा फुले जनआरोग्य सुविधेअंतर्गत मोफत आरोग्य उपचारांसाठी प्रयत्न करु या. प्रवाशांना चांगल्या प्रकारची सेवा, कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार, बोनस, एस.टी. सेवा तोटयातून बाहेर काढणे, ही परिवहन मंत्री या नात्याने माझी जबाबदारी आहे.
भविष्यात “प्रवाशांची सुरक्षितता” हे आपले कर्तव्य करताना त्यांना सांभाळणे, प्रवासी हे आपले देव, हाच आपला विठ्ठल, असे मानून प्रवाशांना उत्तम सेवा देत आपण पुढे वाटचाल करु या, असेही ते शेवटी म्हणाले.
लुईसवाडी येथील एक महिला तिची पर्स बसमध्ये विसरली होती. परंतु त्या बसचे चालक विक्रम जाधव यांनी त्या महिलेचा शोध घेतला आणि त्यांना त्यांची पर्स परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसेच संबधित पर्स सापडलेली महिला अंजली गांगल यांनीही वैयक्तिक पाच हजार रुपयांचे बक्षीस संबंधित बसचालक विक्रम जाधव यांना दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर म्हणाले की, चालक व वाहक यांनी स्वतःची तसेच प्रवाशांची सुरक्षा महत्वाची आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आपली बस अन् बसस्थानक स्वच्छ ठेवणे. आपली सेवा अपघातमुक्त असणे आवश्यक आहे. यासाठी यांत्रिक अडचणीची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी चालक व वाहक यांच्यासाठी पालकदिन सुरु केला आहे. चालक व वाहक यांना त्यांच्या मानसिक अडीअडचणी दूर करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील.
वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले की, वाहतूकीचे सर्व नियम पाळले पाहिजे.आपण सर्वांनी सिट बेल्ट लावणे, हेल्मेट वापरणे, मद्यपान न करणे, अपघात होवू न देणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी नितीन मैद यांनी 01 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा-2025 बाबत माहिती विषद करुन कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बळकटीकरणासाठी प्रयत्न – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
लातूर, दि. ११ : सहकार विभागाच्या माध्यमातून गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या संस्थांना आर्थिक सहाय्य देवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी गोडावून उभारणी, विविध सेवांचा पुरवठा, कामकाजाचे संगणकीकरण आदी कामांसाठी मदत करण्यात येत असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे अंतर्गत रस्ते विकास कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी कुदळ मारून सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन केले. उपसरपंच विठ्ठल बोडके, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, धनराज बोडके, चंद्रप्रकाश हंगे, श्रीहरी चाटे यांच्यासह सुनील वावळे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र कांबळे, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
आपल्या राज्याच्या विकासात सहकारी संस्थांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पुढील काळात सहकार चळवळ अधिक बळकट करून तळागळातील व्यक्तीला या चळवळीसोबत जोडण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच अडचणीतील सहकारी संस्थांना मदत करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार नवीन संस्थांची उभारणी देखील करण्यात येईल. सहकार चळवळीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती ना. पाटील यांनी यावेळी दिली. तसेच किनगाव मधील अंतर्गत रस्त्यांच्या कामासोबतच गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.