सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 372

आयआयएम नागपूर आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या चर्चासत्राचे राज्यपालांच्या ई-उपस्थितीत उद्घाटन

मुंबई, दि. २३ : नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम नागपूर) यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील एक दिवसीय पश्चिम विभागीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडले.

या परिषदेला आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

०००

 

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची  तयारी सुरू आहे.  विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने  दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून आज २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असून २९ ऑक्टबर नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबर रोजी होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

०००

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/10/Nominations-and-Candidates-Data_as-on-22.10.2024-1.pdf” title=”Nominations and Candidates Data_as on 22.10.2024 (1)”]

 

मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध – अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अश्विनी जोशी

मुंबई, दि. २२ : मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाल्या की, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे,  दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधा पुरविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथके तैनात करण्यात आली असून यासाठी क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी संजय यादव

सर्व निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, भयमुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे. मतदान केंद्रांवर मतदाराना अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेवून प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतीक्षा कक्ष, टोकन सिस्टीम याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मतदारांना मतदान केंद्राची माहिती व्हावी, यासाठी बीएलओमार्फत घरोघरी मतदार चिट्टीचे वाटप करण्याची मोहीम सुरू आहे. मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र हा अभिनव उपक्रम मुंबई शहर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

भारत निवडणूक आयोगाने  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई शहर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी, यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

  • निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबचा दिनांक – 22 ऑक्टोबर 2024
  • नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटचा दिनांक – 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
  • नामनिर्देशन पत्र छाननी दिनांक – 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
  • नामनिर्देशन पत्र परत घेण्याचा शेवटचा दिनांक – 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार)
  • मतदान – 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार)
  • मतमोजणी – 23 नोव्हेंबर 2024 (शनिवार)

मुंबई शहर जिल्ह्याबाबत माहिती

एकूण मतदान केंद्र – 2 हजार 537

  • उत्तुंग इमारतीमधील (High rise Building) मतदान केंद्र – 156
  • सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र 100,
  • झोपडपट्टी परिसरात मतदान केंद्र 313
  • मुंबई शहर जिल्ह्यात मंडपातील मतदान केंद्र 75

विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या

धारावी-  2 लाख 61 हजार 012

सायन-कोळीवाडा- 2 लाख 81 हजार 462

वडाळा –  2 लाख 05 हजार 12

माहिम- 2 लाख 25 हजार 415

वरळी –  2 लाख 63 हजार 697

शिवडी-  2 लाख 74 हजार 472

भायखळा- 2 लाख 58 हजार 12

मलबार हिल – 2 लाख 60 हजार 672

मुंबादेवी –   2 लाख 41 हजार 454

कुलाबा – 2 लाख 64 हजार 931

अशी एकूण 25 लाख 36 हजार 139 मतदार संख्या आहे

  • महिला – 11 लाख 72 हजार 944
  • पुरुष- 13 लाख 62 हजार 951
  • तृतीयपंथी 244
  • ज्येष्ठ नागरिक (85+) 54 हजार 033
  • नवमतदार संख्या (18-19 वर्ष) 38 हजार 325
  • दिव्यांग मतदार – 6 हजार 344
  • सर्व्हीस वोटर – 392
  • अनिवासी भारतीय मतदार – 406

मतदारांच्या माहितीसाठी

https://voters.eci.gov.in/  या संकेतस्थळावरुन मतदार यादीतील नावासंदर्भात माहिती उपलब्ध आहे या संकेत स्थळाला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी  हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.

Voter helpline App – मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल. KYC App-  उमेदवारांबाबत माहिती या app वर उपलब्ध होऊ शकेल. C vigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार करता येते त्यानंतर त्यावर केलेल्या कारवाईची माहिती  100 मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचते. जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्र.-  022-2082 2781, निवडणूक नियंत्रण कक्ष – 7977363304

सुविधा पोर्टल

उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्र व शपथपत्र भरण्याकरता व निवडणूकीच्या अनुषंगाने विविध परवानग्या मिळणेसाठी अर्ज करण्याकरिता सुविधा या पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध आहे.

C-Vigil app

दि.15 ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत  सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 14 तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर NGSP पोर्टलवर 101 तक्रारी प्राप्त झाल्या असून 67 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे.

मतदान केंद्रांवर सुविधा

प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी,पंखे आदी निश्चित किमान सुविधा यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात येथील सुविधांचा फलक मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक  फलक लावण्यात येणार आहेत.

मनुष्यबळ

मुंबई शहर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघ असून एकूण 2537 मतदान केंद्र आहेत. ह्या मतदार केंद्राला प्रत्येकी एक असे 2537 बीएलओ आहेत. एकूण 364 क्षेत्रीय अधिकारी (Z.O) आहेत. जवळपास 12 हजार 500 पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध आहे.

मतदारांना आवाहन

प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात येत आहे. नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. ज्या मतदारांचा संपर्क होत नाही त्यांना दूरध्वनी, एसएमएस, व्हाट्सअप अशा माध्यमातून संपर्क करण्यात येवून मतदार केंद्राची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

राजकीय जाहिरातींवर असणार ‘एमसीएमसी’ चा वॉच

सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून करून घेणे बंधनकारक आहे. अशा राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देणारा लेख…

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) –

सर्वोच्च न्यायालयाने दि. 13 एप्रिल 2004 रोजी दूरचित्रवाणी आणि केबल वाहिनीवरील राजकीय स्वरूपाच्या जाहिरातींबाबत दिलेल्या निर्णयात अशा जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करण्यात यावे असे नमूद केले आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरून मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 एप्रिल, 2004 रोजीच्या पत्राने पूर्वप्रमाणिकरणाच्या अनुषंगाने समित्या स्थापन करावयाचे आदेश दिले आहेत. त्यात वेळोवेळीच्या सूचनांद्वारे अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भर पडली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 24 ऑगस्ट, 2023 च्या पत्रान्वये माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीची (एमसीएमसी) रचना, जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण तसेच पेड न्यूजबाबत यापूर्वीची सूचना, पत्रे, आदेश एकत्रित करुन सर्वंकष निर्देश जारी केले आहेत. त्यामध्ये एमसीएमसीची पुढीलप्रमाणे महत्त्वाची कामे नमूद करण्यात आली आहेत. त्यामध्ये राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण, पेड न्यूज संबंधित कामकाज, निवडणूक खर्चाच्या दृष्टीकोनातून जाहिरातींकडे लक्ष ठेवणे यांचा समावेश आहे.

राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण –

प्रत्येक नोंदणीकृत/अनोंदणीकृत राष्ट्रीय/राज्यस्तरीय राजकीय पक्ष/ निवडणूक लढविणारा उमेदवार/अन्य व्यक्ती यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रसारित करावयाची राजकीय स्वरूपाची जाहिरात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. हा आदेश केवळ निवडणूक कालावधीपुरता मर्यादित नसून, इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रसारित करावयाच्या राजकीय जाहिरातींसाठी वर्षभर लागू आहे.

कोणत्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण आवश्यक ?

 1) टीव्ही, केबल नेटवर्क / केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, आकाशवाणी, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे इ.वर टेलिकास्ट/ब्रॉडकास्ट करावयाच्या प्रस्तावित राजकीय जाहिराती एमसीएमसी समितीकडून प्रमाणित करून घेणे.

2) तसेच मतदानाच्या (दि. 20 नोव्हेंबर 2024) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. 19 नोव्हेंबर 2024) रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचेही समितीकडून पूर्वप्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे.

अर्ज कोठे करावा ?

जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती, माध्यम कक्ष, जिल्हा माहिती कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सांगली, वेळ – कार्यालयीन वेळेत.

अर्ज सादर करण्यासाठी कालावधी

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिराती

१) नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष किंवा निवडणूक लढविणारा उमेदवार किंवा प्रतिनिधी यांच्याकडून जाहिरात प्रसारित करण्याच्या दिनांकाआधी अर्ज किमान तीन दिवस आधी सादर करणे अपेक्षित.

२) स्वतंत्र व्यक्ती किंवा अनोंदित राजकीय पक्ष यांच्यासाठी किमान सात दिवस आधी अर्ज सादर करणे अपेक्षित.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींसाठी चेकलिस्ट

१) विहित नमुन्यातील अर्ज (ॲनेक्झर ए).

२) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (पेन ड्राईव्ह, सीडी इ.) प्रस्तावित जाहिरातीच्या दोन स्वसाक्षांकित प्रती व प्रस्तावित जाहिरातीची स्वसाक्षांकित संहिता.

३) जाहिरातीच्या निर्मितीचा खर्च व प्रसारणाचा खर्च.

मुद्रित माध्यमातील जाहिराती (केवळ दि. 19 व 20 नोव्हेंबर 2024 रोजीच्या जाहिराती)

मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वृत्तपत्रात मतदानाच्या (दि. 20 नोव्हेंबर 2024) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. 19 नोव्हेंबर 2024) प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीही प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष किंवा निवडणूक लढविणारा उमेदवार/संस्था/व्यक्ती यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या दिनांकाआधी अर्ज किमान दोन दिवस सादर करावयाचा आहे.

समिती संहितेमध्ये बदल सूचवू शकते

समितीने सूचविलेले संहितेतील बदल किंवा संहितेतील आक्षेपार्ह भाग वगळणे/फेरफार आदिंबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी करणे संबंधितास बंधनकारक असून, समितीकडून तसा पत्रव्यवहार झाल्यानंतर संबंधित राजकीय पक्ष/उमेदवार/स्वतंत्र व्यक्ती यांनी अपेक्षित कार्यवाही करून 24 तासात फेरअर्ज सादर करणे आवश्यक आहे.

सोशल मीडियाचाही समावेश

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्यात लोक आपल्या कल्पना, माहिती, मते यांची सोशल मीडियाच्या आभासी समुदायामध्ये (व्हर्च्युअल कम्युनिटी) एकमेकांबरोबर देवाणघेवाण करतात. गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर वाढला असून निवडणूक काळात राजकीय आणि सामाजिक गटांमधून प्रचार प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाची मागणी वाढत आहे.

निवडणूक मोहिमेशी संबंधित असलेल्या कायदेशीर तरतुदी, या इतर कोणत्याही प्रसार माध्यमाचा वापर करणाऱ्या निवडणूक मोहिमेच्या कोणत्याही इतर स्वरुपाला ज्या पध्दतीने लागू होतात त्याच पध्दतीने सोशल मीडियालाही लागू होतात. त्यामुळे सोशल मीडियावरील जाहिरातींचेही पूर्वप्रमाणिकरण बंधनकारक आहे.

इंटरनेटद्वारे प्रचार करण्याबाबतचा खर्च

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चाच्या विवरणपत्रात सामाजिक प्रसार माध्यमावरील जाहिरातींवर झालेल्या खर्चाचा देखील समावेश आहे. इतर बाबींसहित यामध्ये जाहिरात प्रसिध्दी करण्यासाठी इंटरनेट कंपन्या व वेबसाईट यांना केलेल्या प्रदानांचा आणि तसेच प्रचाराशी संबंधित कार्यात्मक खर्च, सृजनशील मजकूर विकसीत करण्यावर झालेला कार्यात्मक व्यवहार खर्च, वेतनांवरील व्यवहार खर्च आणि अशा उमेदवारांकडून आणि राजकीय त्यांची सामाजिक प्रसारमाध्यम खाते इत्यादी सांभाळण्याकरिता सेवा नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रदान केलेल्या मंजुरीचा देखील समावेश असेल.

जाहिरातीत काय टाळावे?

अशी जाहिरात जी देशाच्या कायद्याला धरून नाही, नैतिकता व सभ्यतेमध्ये क्षोभ निर्माण करते, जिच्या अवलोकनाने वेदना होतील किंवा जी धक्कादायक, उबक आणणारी, विद्रोहक असेल, धार्मिक भावना दुखावणाऱ्या किवा वंश, जात, वर्ण, पंथ व राष्ट्रीयत्त्वाचा उपहास करणाऱ्या, भारतीय संविधानाच्या कोणत्याही तरतुदीविरूद्ध आहे व गुन्हा करण्यास, शांतताभंग किंवा हिंसा करण्यास किंवा कायदाभंग करण्यासाठी लोकांना चिथावणी देऊन प्रवृत्त करणाऱ्या, हिंसेचा गौरव करणाऱ्या, कोणत्याही मार्गाने अश्लिलता दाखवणाऱ्या कोणत्याही जाहिरातीला परवानगी देण्यात येणार नाही. विशिष्ट व्यक्तिच्या नावे बदनामी, न्यायालयाचा अवमान, अन्य देशांवर टीका करता येणार नाही.

कोणत्याही धार्मिक स्थळांचा वापर, धार्मिक मजकूर, बोधचिन्हे, घोषवाक्य यांचा वापर टाळावा.

संरक्षण विभागातील अधिकारी, व्यक्ती, (डिफेन्स पर्सनल) व त्यांचा सहभाग असलेल्या समारंभाचे फोटो टाळावेत. कोणाचेही खाजगी आयुष्य, अन्य पक्ष, त्यांचे कार्यकर्ते यांच्यावरील असत्यापित (unverified) टीकाटिपण्णी, विकृती यांचा समावेश टाळावा.

विवक्षित कार्यक्रम/जाहिरातीच्या प्रक्षेपणामुळे धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय किंवा सामाजिक किंवा इतर कोणत्याही कारणावरून विविध वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गटामध्ये, जातींमध्ये किंवा समाजांमध्ये अशांती, शत्रुत्त्व भाव, द्वेष किंवा तणाव निर्माण होण्याचा संभव असेल किंवा सार्वजनिक शांततेचा भंग होण्याचा संभव असेल तर लोकहिताच्या दृष्टीने अशी जाहिरात प्रसारित करण्यास मनाई आहे.

कारवाई

भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार पूर्व प्रमाणिकरण न केलेली जाहिरात प्रसारीत केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यास असा प्रकार न्यायालयाचा अवमान ठरेल. असा प्रकार आढळल्यास केबल टेलिव्हिजन नेटवर्कस् (रेग्युलेशन) ॲक्ट 1995 नुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधितास नियमांचे उल्लंघन थांबविण्याचे निर्देश द्यावेत. तसेच उपकरणे जप्त करण्याचीही तरतूद आहे.

संकलन – संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सांगली

 सात मतदारसंघासाठी नियुक्त दोन निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल; खर्च निरीक्षकांकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा

रायगड जिमाका दि. 22 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 7 मतदार संघामध्ये निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व सदैव दक्ष राहून पार पाडावी, असे निर्देश पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी दोन निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त केले आहेत. पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील 2005 च्या तुकडीचे अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदार संघांसाठी भारतीय महसूल सेवेतील 2015 च्या तुकडीच्या अधिकारी ज्योती मीना  यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे आज रायगड येथे आगमन झाले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आज या दोन्ही खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक रविकिरण कोले, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री राजेश कुमार यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली व अशा भागात विशेष उपाययोजना राबविण्याबाबत उत्पादन शुल्क विभाग, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचना दिल्या. तसेच निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या.   इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिध्द होणा-या जाहिरातींकडे लक्ष देण्याबाबत जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या नोडल अधिका-यांना निर्देश दिले.

निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिका-यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणा-या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही निर्देश खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले.

निवडणूक खर्च निरीक्षक यांनी ज्योती मीना यांनी सहकारी बँका मार्फत होणारे व्यवहार तसेच राष्ट्रीयकृत बँका मार्फत होणारे व्यवहार यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले. पेड न्युज वर देखील विशेष लक्ष ठेवावे असेही सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार प्रत्येक यंत्रणेनी कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या. यावेळी सर्व कार्यान्वयीन यंत्रणानी केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.

यावेळी खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि आढावा घेतला.

निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांची जिल्हा माध्यम कक्षास भेट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करिता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी जिल्हा माध्यम कक्षात भेट देऊन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आले असून उमेदवारांच्या प्रचार जाहिरातीचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते.  यासह निवडणुकीची मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये या कक्षाचा सहभाग आहे या बाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली.

 राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम द्वारे प्रसिद्धी, तसेच विविध दैनंदिन अहवाल बाबत पाहणी त्यांनी केली. निवडणूक निरीक्षक राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिली. तसेच पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे. उमेदवाराच्या प्रचारावर आणि प्रसिद्धी साहित्यावर होणारा खर्च, खर्च पथकाला विहित नमुन्यात सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे आदी उपस्थित होते.

०००००००

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ९१० प्राप्त तक्रारींपैकी ८९९ निकाली

मुंबई, दि. २२ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ९१० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य शासन व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

०००

नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी : निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर

निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला विधानसभा निवडणुकीचा आढावा

धुळे, दि. 22 (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाची निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे निर्देश पाचही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी दिले.

भारत निवडणूक आयोगाने धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून रामा नाथन आर यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे धुळे येथे आगमन झाले असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्वाती काकडे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वराजंली पिंगळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडीत यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. निवडणूकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चावर नोडल अधिकारी तसेच सहाय्यक खर्च निरीक्षकांनी लक्ष ठेवून दैनंदिन अहवाल विहीत वेळेत सादर करावेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचे मूल्यमापन करण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित करावा. तसेच सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सहाय्यक खर्च निरीक्षकांक्षी समन्वय ठेवावा, माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या, जाहिरातींवर एमसीएमसी कमिटीने बारकाईने लक्ष ठेवावे, पक्ष व उमेदवारांच्या प्रत्येक प्रचार जाहिरातींचा समावेश खर्चात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नलावडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. धिवरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वराजंली पिंगळे यांनी आपल्या विभागाची माहिती पीपीटीद्वारे दिली.  उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी प्रास्ताविकात धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाच्या रचनेविषयी माहिती दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गावंडे यांनी आभार मानले. बैठकीस आयकर, वस्तु व सेवा कर विभागाचे उपायुक्त, बँक, रेल्वे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

माध्यम सनियंत्रण समितीने पेड न्यूजवर बारकाईने लक्ष ठेवावे

भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीत माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची भूमिका महत्वाची आहे. या समितीने माध्यमांचे सनियंत्रण करताना पेड न्यूजवर बारकाइने लक्ष ठेवावे, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी आज दिले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता धुळे जिल्ह्यातील पाचही विधान मतदारसंघासाठी जिल्हा माहिती कार्यालयात पहिल्या मजल्यावर माध्यम नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या मीडिया सेंटरला आज सकाळी निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी विलास बोडके, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर उपस्थित होते.

निवडणूक खर्च निरीक्षक श्री. रामा नाथन आर म्हणाले, निवडणूक कालावधीत पेड न्यूजवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. पेड न्यूज आढळून आल्यास तत्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी. समितीच्या निर्णयानुसार पेड न्यूजचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करावा. तसेच स्थानिक केबल नेटवर्कवरील पेड न्यूज, जाहिरातींचेही सनियंत्रण करावे. सोशल मीडियावर पाचही विधानसभा निवडणूकीत ऊभे राहणाऱ्या उमेदवाराच्या फेसबुक, एक्स, इन्स्ट्राग्राम तसेच इतर सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या जाहिराती, पोस्टवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा माहिती अधिकारी तथा मिडीया कक्षाचे नोडल अधिकारी श्री. बोडके यांनी मीडिया सेंटरच्या कामकाजाची माहिती दिली. मिडीया कक्षातील कामकाजाबाबत निवडणुक खर्च निरिक्षक यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कक्षात उपसंपादक संदीप गावित, वरीष्ठ लिपिक बंडु चौरे, लिपिक चेतन मोरे, इस्माईल मनियार, ऋषीकेश येवले यांच्यासह मीडिया सेंटरमध्ये नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांची बैठे पथकास भेट

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाकरीता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी आज पारोळा चौफुली व नगाव चौफुली येथील बैठे पथकास (एसएसटी) भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर, 2024 रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुका निर्भयपणे पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च निरिक्षक रामा नाथन आर यांची नियुक्ती केली असून निरिक्षकांचे धुळ्यात आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्च निरीक्षक श्री. रामा नाथन आर यांनी आज पारोळा चौफुली व नवाग चौफुली येथील एसएसटी पथकास भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील कामकाजाची माहिती जाणून घेऊन वाहन नोंदवहीचीही तपासणी केली.

यावेळी खर्च निरीक्षक श्री. रामा नाथन आर यांनी बैठे पथक यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबादारी काळजीपूर्वक पार पाडावी, या मार्गाने येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करुन वाहनांच्या नोंदी नोंदवहीत घ्याव्यात, असेही सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर हे उपस्थित होते.

000000

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबईदि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी निवडणूक यंत्रणा सज्ज’ याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

राज्यात 15 ऑक्टोबर 2024 पासून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीनिवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्थामाध्यम प्रमाणीकरण समितीचे कामकाजसर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा याबाबत श्री. एस. चोक्कलिंगम यांनी दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात श्री. चोक्कलिंगम यांच्या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी तसेच दुसरा भाग मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. तर दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 23, गुरूवार दि. 24, शुक्रवार दि. 25 आणि शनिवार दि. 26 ऑक्टोबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच

मुंबई, दि. 21 : लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती कळविलेली असून ती खालीलप्रमाणे आहे :

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील एकूण मतदार 9 कोटी 29 लाख 43 हजार 890 होते. 20 ऑक्टोबरपर्यंत 36 लाख 31 हजार 279 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे आणि 20 ऑक्टोबर रोजी एकूण 9 कोटी 65 लाख 5 हजार 958 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर, 2024 मसुदा मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी दुसऱ्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (SSR-2024) प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर, वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी उपलब्ध होता आणि या दावे आणि हरकतींचा योग्य विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली.

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी नियमानुसार योग्य प्रक्रिया अवलंबली आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1950, मतदार नोंदणी नियम, 1960 आणि भारत निवडणूक आयोगाच्या 11 ऑगस्ट 2023 च्या पत्रातही मतदार यादीबाबत तरतुदी नमूद केल्या आहेत. या तरतुदींनुसार, फॉर्म क्रमांक 6 सादर करून मतदार यादीतील नाव नोंदले जाऊ शकते आणि फॉर्म क्रमांक 7 सादर करून वगळले जाऊ शकते. फॉर्म क्रमांक 8 सादर करून मतदाराच्या नोंदीमध्ये कोणताही बदल (नाव, पत्ता, बदलणे इ.) करता येईल आणि हे सर्व फॉर्म ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. दावे आणि हरकतींसाठी सात दिवसांची नोटीस देण्याची तरतूद आहे. आक्षेपांचा योग्य विचार केल्यानंतर, मतदार नोंदणी आधिकारी योग्य ते निर्णय घेतात. महाराष्ट्र राज्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांबाबतची खालील आकडेवारी स्वयं-स्पष्ट आहे. 

संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 (SSR-2019)

मसुदा मतदार यादी

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 (Electors at Draft Publication of 1st SSR 2019) ( 1-09-18)

अंतिम मतदार यादी

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 (Electors at Final Publication of 1st SSR 2019)

( 31-01-19)

वाढ (Addition) वगळले

(Deletion)

निव्वळ फरक (Net Difference )
8,44,87,905 8,73,29,910 35,74,067 7,32,062 28,42,005

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (1ST SSR-2024)

मसुदा मतदार यादी

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Draft Publication of 1st SSR 2024) ( 23-10-24)

अंतिम मतदार यादी

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Final Publication of 1st SSR 2024) ( 23-01-24)

वाढ (Addition) वगळले (Deletion) निव्वळ फरक (Net Difference)
9,08,32263 9,12,44679 24,33,766 20,21,350 4,12,416

 

दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (2ND SSR-2024)

मसुदा मतदार यादी

दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Draft Publication of 2st SSR 2024) ( 06-08-24)

अंतिम मतदार यादी

दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Final Publication of 2nd  SSR 2024)

( 30-08-24)

वाढ (Addition) वगळले

(Deletion)

निव्वळ फरक (Net Difference )
9,36,75,934 9,53,74302 20,78,081 3,79,713 16,98,368

0000

                                                                                  Press Note Dated: 21.10.2024

            There was allegation of registration of electors around 10,000 per Assembly Constituency after Lok Sabha Election by Some Political Parties. The procedure of updating of Electoral Roll is done strictly as per prescribed rules. The factual position related to the issues is as follows :

At the time of Lok Sabha Elections, total electors in State were 9,29,43890. There is net increase of 36,31,279 electors till 20th Oct and electors on 20th Oct are 9,65,05958. After Lok Sabha Elections, 2024 Draft Electoral Roll was published on 06-08-2024 during 2ND SSR-2024, Thereafter, period of nearly 14 days was available for submitting claims and objections as per schedule and after due consideration of these claims and objections, final Electoral Roll was published.

Before and after SSR, proper procedure of addition and deletion has been followed by the concerned Electoral Registration Officers for updating Electoral Roll. Provisions regarding addition and deletion in Electoral Roll are specified in Representation of People Act, 1950, Electoral Registration Rules, 1960 and also in ECI’s letter dated 11-08-2023. As per these provisions, the name in the voter list can be added by submitting form no 6 and deleted by submitting form no 7, Any change in the voter (name, address, shifting, etc.) can be done by submitting form no 8 and all these forms are available online also. There is provision of seven days’ notice for claims and objections. After due consideration of the objections, the ERO takes the decision. The details about Maharashtra State SSR 2019 SSR -1 2024, SSR – 2 2024 given below and the data is self-explanatory.     

SSR-2019,

Electors at Draft Publication of 1st SSR 2019 ( 1-09-18) Electors at Final Publication of 1st SSR 2019 ( 31-01-19) Addition Deletion Net Difference
8,44,87,905 8,73,29,910 35,74,067 7,32,062 28,42,005

1ST SSR-2024

Electors at Draft Publication of 1st SSR 2024 ( 23-10-24) Electors at Final Publication of 1st SSR 2024 ( 23-01-24) Addition Deletion Net Difference
9,08,32263 9,12,44679 24,33,766 20,21,350 4,12,416

2ND SSR-2024

Electors at Draft Publication of 2st SSR 2024 ( 06-08-24) Electors at Final Publication of 2nd  SSR 2024 ( 30-08-24) Addition Deletion Net Difference
9,36,75,934 9,53,74302 20,78,081 3,79,713 16,98,368

Press Note given by Office of the Chief Electoral Officer, Maharashtra

                                          ————————————–

बेल्ज‍ियमचे आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार : बेल्ज‍ियम वाणिज्यदूतांची माहिती

मुंबई, दि. २१ :  बेल्ज‍ियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जीयम येथील व्यापार – उद्योजकांचे आर्थिक शिष्टमंडळ (बेल्ज‍ियन इकॉनॉमिक मिशन) येत्या मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी मिशनचे सदस्य दिल्लीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्ज‍ियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी आज येथे दिली.

वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

बेल्ज‍ियमचा महाराष्ट्र आणि गुजरातशी हिऱ्यांचा मोठा व्यापार आहे. बेल्ज‍ियम आता भारताशी लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सेमीकंडक्टर व्यापाराबद्दल देखील चर्चा होऊ शकते असे वाणिज्यदूतांनी सांगितले.

बेल्ज‍ियम आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रेसर असून या क्षेत्रात आपण सहकार्य वाढविणार असल्याचे  फ्रॅंक गिरकेंस  यांनी  सांगितले. भारत युरोप व्यापार वाढविण्याबाबत फेडरेशन ऑफ युरोपिअन बिझनेसेस इन इंडिया (फेबी) काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य वर्धन या क्षेत्रात देखील बेल्ज‍ियम महाराष्ट्रातील कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण लवकर मंजूर झाल्यास त्याने उभयपक्षी व्यापार दुपटीने वाढेल असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

Belgian Economic Mission to visit Mumbai : Princess Astride to lead the Mission

Belgium keen to enhance cooperation in logistics, manufacturing and health care

Mumbai, 21st Oct : The Consul of Belgium in Mumbai Frank Geerkens today informed that Belgian Economic Mission to be led by Princess Astride, the sister of King Philippe of Belgium, will visit India in the month of March. He said apart from the existing trade in diamond and other commodities, emphasis will be laid on enhancing cooperation in logistics, manufacturing and healthcare.

The Consul General was speaking to Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai on Monday (Oct 21).

The Consul General said Belgium has a large diamond trade with Maharashtra and Gujarat. Stating that Belgium is the hub of healthcare, he said efforts are being made to increase cooperation in this field also.

He informed the Governor that the Federation of European Businesses in India (FEBI) is working to increase India-Europe trade. He said that Belgium is also cooperating with the Skill agency in Maharashtra to promote skill development.

Maharashtra Governor Radhakrishnan expressed the hope that free trade agreement between India and Europe when signed will double the multilateral trade.

0000

 

ताज्या बातम्या

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार

0
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या...

सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 12: सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ' प्रकरणे...

राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक; अधिक समन्वयाने काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १२ - भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा...

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...