शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 253

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई दि. २८ :- मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासह शास्वत मत्स्यपालन विकास करण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी दोन्ही विभागाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, मच्छिमारांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे, स्वच्छ व प्रथिनयुक्त पोषक अन्नाचा पुरवठा करणे आणि ग्रामरोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 31 मार्च 2025 रोजी तसेच, मंगळवार दि. 1 आणि बुधवार दि. 2 एप्रिल 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 1 एप्रिल 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्यव्यवसाय विभागाचा महत्वाचा वाटा आहे. आर्थिकदृष्टया मागासलेल्या लोकांकरिता रोजगार मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय क्षेत्र हा महत्वाचा स्त्रोत आहे. विविध क्षेत्रात आधुनिक प्रामाणित तंत्रज्ञान आत्मसात करुन मत्स्यव्यवसायाचा विकास करणे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला औद्योगिक विकास लक्षात घेता बंदरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून या बंदरांचा विकास करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असून यासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागांतर्गत घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहेत. याविषयी मंत्री श्री. राणे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु.२५५५ कोटी विमा नुकसान भरपाई – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे 

मुंबई, दि.२८ : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा  निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

या अंतर्गत खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी रु. २.८७ कोटी, खरीप २०२३ साठी रु. १८१ कोटी, रब्बी २०२३-२४ साठी रु. ६३.१४ कोटी आणि खरीप २०२४ साठी रु. २३०८ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. एकूण रु. २५५५ कोटी रकमेचा लाभ राज्यातील ६४ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्यासाठी इचलकरंजीत क्रीडा संकुल उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • पुरुष गटात कोल्हापूरचा संघ प्रथम, महिला गटात धाराशिव संघ प्रथम विजेता
  • किशोर गटात कोल्हापूर संघ प्रथम, किशोरी गटात सांगलीचा संघ प्रथम विजेता 

कोल्हापूर, दि.27 (जिमाका): इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी इचलकरंजीला क्रीडासंकुल निश्चितपणे मंजूर करुन देईन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजी वासियांना दिला.

इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला येथे कल्लाप्पा आवाडे क्रीडानगरीत आयोजित केलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2024-25 बक्षीस वितरण व निरोप सभारंप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राहूल आवाडे, आमदार अशोकराव माने,  माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, माजी आमदार राजेश पाटील, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, खो-खो या पारंपरिक खेळाला अधिक मोठ्या व्यासपीठावर नेणाऱ्या  कै.भाई नेरूरकर यांचे महाराष्ट्रात खो-खो च्या विकासासाठी दिलेले योगदान अमुल्य आहे. या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने कै. भाई नेरूरकर यांच्या कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरणही त्यानित्ताने होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात खो-खो या खेळाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय स्पर्धेला 25 लाखाची वाढ करुन एक कोटी केली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, स्पर्धा म्हटलं की हार-जीत होत असते. परंतु जिंकण्या बरोबरच हार स्वीकारण्याचीही ताकद हवी. सगळ्या खेळाडूंच्या वर्तनामुळे खेळ आणि खेळाडू दोघांचाही गौरव वाढला पाहिजे. त्याचबरोबर आपली क्षमता पूर्णपणे पणाला लावून तुम्ही सगळ्यांनी खेळलं पाहिजे.  खो-खो हा वेगाचा, चपळतेचा खेळ असून या खेळाचं दर्जेदार दर्शन आपल्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने इचलकरंजीच्या परिसरातल्या क्रीडा रसिकांना मिळालं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांनी खेळाडूवृत्ती जोपासली पाहिजे.

इचलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो-खो  स्पर्धा आयोजन केल्याबद्दल आयोजकाचे तसेच या स्पर्धेला संजीवनी देणारे सर्व क्रीडाप्रेमी, रसिकांचे, सगळ्या टीमचे तसेच  सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करुन उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, आपण सर्व मिळून खो-खो च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि भारताला जागतिक स्तरावर अधिक मोठे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया. जानेवारीमध्ये भारताने जिंकलेल्या संघातील सर्वात लहान वयाची खेळाडू वैष्णवी पवार हिचेही विशेष कौतुक त्यांनी केले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यामध्ये क्रीडा कामगिरीत कोल्हापूर जिल्ह्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, या जिल्ह्याने आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, अनेक खेळाडू, अनेक नामवंत, म्हणजे खाशाबा जाधव पासून ते हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे, गणपतराव आंधळकर, दादू चौगुले, याच भूमीतील ऑलिंपिक जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, टेबल टेनिस खेळाडू शैलेजा साळुंखे, नेमबाज स्वप्नील कुसाळे अशा अनेक खेळाडूंनी या जिल्ह्यामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी राज्यातील अनेक खेळाडू करत आहेत, त्यांना पाठिंबा देणे व त्यांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. जे खेळाडू देश पातळीवर, चांगल्या प्रकारचे खेळ करतात त्यांना नोकरीत 5 टक्के आरक्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचा गौरव करणाऱ्या प्रतिभावंत खेळाडूंना शासन सेवेमध्ये थेट नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. साधारणतः 216 खेळाडूंना नियुक्ती दिलेली आहे तसेच लवकरच 32 खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात येणार आहे, असे सांगून त्यांनी आयोजकांचे व  सर्व खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, या स्पर्धेसाठी 17 जिल्ह्यातील 40 संघ खो खो स्पर्धेत सहभागी झाले होते. इचलकरंजी येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी शासनाकडून 75 लाखाचा निधी मिळाला तसेच जिल्ह्यातील आमदार महोदयांनी 50 लाखाचा निधी उपलब्ध करुन दिल्याने ही स्पर्धा यशस्वी करता आली. या निधीमधून  खो-खो स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसाठी समितीने उत्तम व्यवस्था केली होती. जिल्ह्यातील आमदारांनी आमदार निधीमधून निधी उपलब्ध करुन दिल्याने सर्व खेळाडूंना अधिक चांगल्या पध्दतीने सुविधा देण्यामध्ये मदत झाली. तसेच सर्व खेळाडूंना ट्रॅक सूट पाण्याची बॉटल आणि स्मार्ट वॉच हे सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आल्याचे सांगून  त्यांनी मदत देणाऱ्या आमदारांचे आभार मानले.

यावेळी आमदार राहूल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आपले मनोगते व्यक्त केली.

विजेते पदासाठी पुरुष गटात कोल्हापूर विरुध्द मुंबई उपनगर संघामध्ये अत्यंत चुरशीच्या सामना रंगला. पहिल्या फेरीत समान गुण झाल्याने दुसरी फेरी खेळवण्यात आली. यामध्ये कोल्हापूर संघाने मुंबई उपनगर संघावर मात करुन स्पर्धेचे विजेते पद पटकावले. कोल्हापूर संघाला 3 लाख 40 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले.

 मुंबई उपनगर उपविजेत्या संघाला 2 लाख 55 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तृत्तीय पुणे संघाला 1 लाख 70 हजार, 4 था विजेता सांगली संघाला 1 लाख 19 हजार,  5 वा विजेता ठाणे संघाला 85 हजार, 6 वा विजेता  सोलापूर संघाला 51 हजार देण्यात आले.

महिला गटामध्ये धाराशिव जिल्हा विजेता ठरला त्यांना 3 लाख 40 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. पुणे उपविजेत्या संघाला 2 लाख 55 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तृत्तीय ठाणे संघाला 1 लाख 70 हजार, 4 था विजेता कोल्हापूर संघाला 1 लाख 19 हजार,  5 वा विजेता सांगली संघाला 85 हजार, 6 वा विजेता  नाशिक संघाला 51 हजार देण्यात आले.

किशोर गटामध्ये प्रथम क्रमांक विजेता कोल्हापूरचा संघ ठरला. त्यांना 1 लाख 70 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. व्दितीय सांगली संघाला 1 लाख 36 हजार, तृत्तीय धाराशिव संघाला 1 लाख 2 हजार, 4 था विजेता सातारा संघाला 68 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले.

किशोरी गटामध्ये प्रथम क्रमांक विजेता सांगली संघ ठरला. त्यांना 1 लाख 70 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले. व्दितीय पुणे संघाला 1 लाख 36 हजार, तृत्तीय ठाणे संघाला 1 लाख 2 हजार, 4 था विजेता धाराशिव संघाला 68 हजाराचा धनादेश व स्मृतीचिन्ह देण्यात आले.

खो-खो स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये पुरुष विजेत्या ठरलेल्या कोल्हापूर संघातील खेळाडू रोहण कोरे याला अष्टपैलु खेळाडू म्हणून त्यांना 20 हजाराचा धनादेश व सौरभ आढावकर याला आक्रमक खेळाडू म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले. उपविजेत्या मुंबई उपनगर संघातील खेळाडू ओंकार सोनवणे या खेळाडूला उत्कृष्ट सरंक्षक म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले.

 

महिला गटातील धाराशिव  संघातील अश्विनी शिंदे या खेळाडुला अष्टपैलु खेळाडू म्हणून 20 हजाराचा धनादेश व संध्या सुरवसे या खेळाडूला उत्कृष्ट सरंक्षक म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले.  पुणे संघातील प्रियंका इंगळे या खेळाडूला आक्रमक खेळाडू म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले.

किशोरी गटातील सांगली संघातील अनुष्का तामखडे या खेळाडुला अष्टपैलु खेळाडू म्हणून 15 हजाराचा धनादेश व श्रावणी तामखडे या खेळाडूला उत्कृष्ट सरंक्षक म्हणून 10 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले. पुणे संघातील अर्पणा वर्धे या खेळाडूला आक्रमक खेळाडू म्हणून 10 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले.

किशोर गटातील सांगली संघातील सार्थक हिरेकुंभे या खेळाडुला अष्टपैलु खेळाडू म्हणून 15 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर संघातील रुद्र यादव या खेळाडूला उत्कृष्ट सरंक्षक व अमोल बंडगर या खेळाडूला आक्रमक खेळाडू म्हणून प्रत्येकी 10 हजाराचा धनादेश देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमांचे आभार क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांनी मानले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी, पंच, खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

बॉबकार्डच्या महिला आर्थिक साक्षरता व सायबर सुरक्षा उपक्रमाचे राज्यपालांकडून कौतुक 

मुंबई, दि. २७ : महिलांमध्ये तसेच शालेय व महाविद्यालयीन मुलींमध्ये सायबर सुरक्षा व आर्थिक साक्षरता वाढावी यासाठी बॉबकार्डने हाती घेतलेले जनजागृती अभियान कौतुकास्पद असून या अभियानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होईल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी  केले. 

राज्यपालांच्या हस्ते बॉबकार्डच्या स्त्री टेक प्रगती‘ अभियाना अंतर्गत शक्ती समृद्धी‘ व लक्ष्मी समृद्धी‘ या उपक्रमांचे उदघाटन यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते. 

या उपक्रमांतर्गत महिला बचत गट तसेच शालेय व महाविद्यालयातील मुलींमध्ये सायबर सुरक्षा व आर्थिक साक्षरता याबाबत जनजागृती केली जाणार आहे.  बॉबकार्डच्या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून आहान फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

आज जगात सर्वाधिक आर्थिक डिजिटल देवाण घेवाण भारतात होत आहेत. अशावेळी डिजिटल यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असणे आवश्यक आहे. या दृष्टीने सर्वच समाज घटकांमध्ये सायबर सुरक्षा व आर्थिक साक्षरता होणे गरजेचे आहे असे सांगून आदिवासी महिलांच्या उन्नतीसाठी आगामी काळात आपण राज्यातील अधिकाधिक आदिवासी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून विद्यापीठांच्या दीक्षांत समारोहात १० पैकी सात पदके मुली जिंकत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण होत असताना कुटुंब व्यवस्था पूर्वीप्रमाणेच बळकट राहणे आवश्यक आहे. महिला बचत गटांमामुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती होत असून विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे व त्यात अनुसूचित जातीजमातीइतर मागास जाती सर्वांचा विकास झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी शासनाच्या महिला विषयक योजनांची माहिती दिली. 

राज्यपालांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील निवडक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या डिजिटल लॅबसाठी संगणक वाटप करण्यात आले तसेच प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाला बॉबकार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र रायआहान फाउंडेशनच्या विश्वस्त शिल्पा चांडोलकरराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेउपसचिव एस. राममूर्तीबॉबकार्डचे सीएसआर प्रमुख रवी खन्ना यांसह विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि बचत गटांचे सदस्य उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor launches Women Empowerment, Cyber Security Initiatives of BOBCARD

Mumbai, 27th March : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan launched the BOBCARD’s Tech Pragati programme for Women Empowerment and Financial Literacy through Cyber Awareness at Y B Chavan Auditorium in Mumbai  on Thursday (27 Mar).

The programme is being run by BOBCARD as part of its CSR responsibility with the help of Ahaan Foundation.

Under the programme, Cyber Awareness and financial literacy will be created among women’s self help groups and girl students of Schools and Colleges.

Minister of State for Women & Child Development Meghna Bordikar, MD & CEO of BOBCARD Ravindra Rai, Trustee of Ahaan Foundation Shilpa Chandolkar, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Deputy Secretary S Ramamoorthy, HR and CSR Head of Bobcard Ravi Khanna, principals of schools, members of Self Help group were present.

The Governor handed over computers to the Principals of selected Schools in Thane district for their digital labs.

0000

हजारो शोकाकुलांनी दिला शहीद वीर जवान अर्जून बावस्कर यांना वरणगावात अखेराचा निरोप

जळगाव दि. 27 ( जिमाका वृत्तसेवा ) – सैन्यदलाचा वीर जवान अर्जून बावस्करला दि २४ मार्च  रोजी अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेखास्थित डोपावा येथे कर्तव्य बजावीत असताना विरमरण आले होते.  आज दि २७ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो शोकाकुल नागरिकांनी ‘वीर जवान अमर रहे’ घोषणा देत अखेरचा निरोप देत त्यांच्या दोघा मुलांनी अग्नी डाग देऊन शासकीय इतमात अंतिम संस्कार करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष भेटून कुटुंबाचे सांत्वन केले.
सिध्देश्वर नगर परिसरातील सम्राट नगर मधील व भारतीय सैन्य दलातील जवान अर्जून लक्ष्मण बावस्कर (३५) यांना अरुणाचल प्रदेशात धोपावा या ठिकाणी कर्तव्यावर विरमरण आले होते. लष्करी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे आज गुरुवार दि २७ मार्च रोजी सकाळी लष्करी वाहनाने घरी आणण्यात आले. त्यावेळी सोबत 10 महार रेजिमेंटचे सुभेदार जरनेल सिंग होते. तसेच संभाजीनगर वरून 97 आर्टिलरी ब्रिगेडचे लेफ्टनंट अमित शहा आलेले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांच्या अंतिमयात्रेसाठी हार व फुलांनी सजविण्यात आलेल्या वाहनात तिरंग्यात चिरनिद्रेत ठेवून अंत्ययात्रा निघाली. सिध्देश्वर नगर, वामन नगर, बस स्थानक चौक, प्रतिभा नगर मार्गे  जात असताना ‘वीर जवान अमर रहे, भारत माता  की जय’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी बस स्थानक चौकातील तिरंगा ध्वजाजवळ मानवंदना देण्यात आली.
उप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिम यांत्रा पोहचल्या नंतर वीर जवनाला लष्कर, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, विविध राजकिय पक्ष, सामाजिक संघटना, नगर परिषद प्रशासन, माजी नगर सेवेक, पंचक्रोशीतील माजी सैनिक व नागरिकांनी पुष्पचक्र अपर्ण करीत श्रद्धांजली वाहिली.  लष्करी जवानांनी व पोलीस प्रशासनाने हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. त्यांच्या पार्थीव देहावर शासकीय अंतिम संस्कार करताना त्यांच्या दोन्ही मुलांनी अग्नी डाग दिला.
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेटून सांत्वन केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश प्रकाश पाटील, उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी सचिन राऊत, सह पोलीस निरिक्षक जनार्धन खंडेराव, एस सिद्धीचे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक परिवार यांची उपस्थिती होती.

राज्य ग्राहक हेल्पलाईन ‘राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन’ मध्ये विलीन

मुंबईदि. २७ : अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे राज्य ग्राहक हेल्पलाईन‘ हे ३१ मार्च २०२५ रोजी मध्यान्हानंतर बरखास्त करून ” मध्ये विलीन करण्यात येत आहे. या हेल्पलाइनकडे राज्यातील सर्व ग्राहकांनी १ एप्रिल २०२५ पासून आपल्या समस्या व तक्रारी मांडाव्यातअशी जाहीर सूचना कक्ष अधिकारी ईशा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यात “कंझ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडियामुंबई” या संस्थेच्या मदतीने “राज्य ग्राहक हेल्पलाईन” ची  २१ ऑक्टोबर २०१० च्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली होती. उपभोक्ता मामले विभागभारत सरकार यांच्या सुचनेनुसार२६ मार्च २०२५ रोजीच्या शासननिर्णय क्र. संकिर्ण-२०२५/प्र.क्र१०/ग्रासं-२ अन्वये “राज्य ग्राहक हेल्पलाईन” ही ३१ मार्च २०२५ मध्यान्हानंतर पासून बरखास्त करुन “राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन” मध्ये विलिन करण्यात आली आहे. तरीराज्यातील सर्व ग्राहकांस विनंती आहे की१ एप्रिल२०२५ पासून सर्व ग्राहकांनी आपल्या समस्या व तक्रारी “राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन” कडे मांडाव्यात.

याकरीता पुढील माध्यमांचा वापर करावा. ई-मेल आय डी: nch-ca@gov.inटोल फ्री क्रमांकः १८००११४००० किंवा १९१५ (सार्वजनिक सुट्टया सोडुन इतर सर्व दिवशी -सकाळी ०८:०० ते रात्री ०८:००)https://consumerhelpline.gov.in/user/signup.php या वेब पोर्टलद्वारेएसएमएस तसेच व्हाट्सअपद्वारे ८८००००१९१५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच NCH APP द्वारेग्राहक UMANG APP द्वारे आपल्या तक्रारींची नोंद करु शकतातअसेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

००००

भविष्यातील २५ वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इचलकरंजी महानगरपालिकेला सूचना

शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार कामे करा

कोल्हापूर, दि.२७ : इचलकरंजी महानगरपालिकेने भविष्यातील २० ते २५ वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे – शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच महसूल व महानगरपालिकेतील अधिकारी उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले.

नागरिकांचे हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार पद्धतीने कामे करा, अशा सूचना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचे वितरण होणे आवश्यक असणाऱ्या राज्यातील इचलकरंजीसह अन्य महानगरपालिकांनाही या अनुदानाचे वितरण होण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आवश्यक असणारे अग्निशमन वाहन खरेदीच्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे मुख्य सचिव गोविंदराज यांना त्यांनी बैठकीतूनच फोनद्वारे दिल्या.

पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाचे काम दर्जेदार होण्यासाठी चांगला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करा. शक्य असल्यास घाटाचे बांधकाम आरसीसी मध्ये करा, जेणेकरुन नदी घाटावरील दगड मोकळे होणार नाहीत. इचलकरंजी प्रवेशद्वार उभारताना या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची उंची लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रवेशद्वाराचे डिझाईन बनवा. तसेच भाजी मार्केट व अन्य नवीन इमारतींचा बांधकाम आराखडा बनवताना व्यापारी व स्थानिक नागरिकांचा विचार करा, असे त्यांनी सांगितले. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीने राबवा, अशा सूचना देऊन आरोग्य, शिक्षण, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आदी बाबतीत महानगरपालिकेने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्या त्या विभागांच्या सचिवांशी बैठकी मधूनच फोनवर बोलून संबंधित प्रस्तावांवर आवश्यक ती कार्यवाही करुन मंजुरी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

इचलकरंजी महानगरपालिकेला वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचे वितरण व्हावे. पंचगंगा नदी बारमाही प्रवाहित ठेवावी, जेणेकरुन हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये पाणीटंचाई भासणार नाही तसेच नदी प्रदूषणही रोखले जाईल. तसेच अमृत योजनेअंतर्गत मोठ्या तळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच कट्टी मुळा पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध व्हावा, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनना साठीचा प्रलंबित निधी लवकरात लवकर मेळावा, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.

जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रशासक अमोल येडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेतील कामांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

*****

पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग, दिनांक 27 (जिमाका) :-  सामान्य नागरिकाचं प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी आज मी ‘पालकमंत्री कक्षा’त उपलब्ध आहे. यापुढेही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा मी ‘पालकमंत्री कक्षा’त सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’त जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर पोलिस अधिक्षक तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित असल्याने सामान्य नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सुटण्यास मदत झाली.

‘पालकमंत्री कक्षा’त आपल्या समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नागरिक आलेले होते. आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने काही वेळानंतर जिल्हा नियोजन सभागृहात तक्रारी स्विकारण्यात आल्या. अनेक तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना थेट सूचना देत प्रश्न तात्काळ निकाली काढले.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, पालकमंत्री म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस या कक्षामध्ये उपलब्ध राहणार असून त्याबाबत जनतेला वेळोवेळी कळविण्यात येणार आहे. जेणेकरुन नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्याकडे  येतील आणि त्यांची प्रलंबित कामे मी पूर्ण करुन देईल. जनतेची कामे अधिक गतीमान पध्दतीने व्हावीत हा या पालकमंत्री कक्ष स्थापनेमागचा मुख्य उद्देश असल्याचेही ते म्हणाले.

प्रलंबित कर देयक असलेल्या सार्वजनिक उपक्रमांना (पीएसयू) कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. २७ : सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसोबत (पीएसयू) जीएसटीपूर्व कर कालावधीसाठी दीर्घकाळ चालणाऱ्या कर विवादांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभय योजना – २०२५ ची घोषणा केली आहे.

“जीएसटीपूर्व कर कायद्यांसाठी महाराष्ट्राच्या अभय योजना २०२५” अंतर्गत कर थकबाकी निकाली काढणारी हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही महाराष्ट्रातील पहिली सार्वजनिक उपक्रम ठरली आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (एमजीएसटीडी) विभागासाठी एक मोठी प्रगती म्हणून, मेसर्स हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही महाराष्ट्र कर, व्याज, दंड किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांद्वारे देय) कायदा, २०२५ अंतर्गत दीर्घकाळ प्रलंबित कर थकबाकी यशस्वीरित्या निकाली काढणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) बनली आहे. या योजनेंतर्गत एचएएल ने २,४७०.९७ कोटी रुपयांची एकाच वेळी भरपाई केली. ९,७५२.५३ कोटी रुपयांच्या एकूण थकबाकीची ही विक्रमी निवारण महाराष्ट्राच्या कर इतिहासातील एक मोठी एकत्रित वसुली ठरली आहे, जी राज्याच्या कर पालनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि दीर्घकाळाच्या वादांचे समाधान करण्यासाठीच्या वचनबद्धतेला दृढ करते.

 विवादाचा कालावधी आणि तडजोडीचे फायदे

या योजनेंतर्गत निकाली काढलेले कर विवाद ३५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होते, काही प्रकरणे १९८६ पासूनची होती. ही तडजोड जीएसटीपूर्वीच्या विविध कर प्रणालींच्या अंतर्गत उभ्या राहिलेल्या वादांचे समाधान झाले, ज्यात बॉम्बे सेल्स टॅक्स (बीएसटी), सेंट्रल सेल्स टॅक्स (सीएसटी) आणि महाराष्ट्र व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स (एमव्हीएटी) अधिनियमांचा समावेश आहे.

जीएसटीपूर्व कर कायद्यांतर्गत प्रलंबित कर देयक असलेल्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (पीएसयू) या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले जाते (केवळ सार्वजनिक उपक्रमांसाठी आणले आहे जिथे ३१ मार्च २००५ पर्यंतच्या कालावधीसाठी प्रलंबित कर थकबाकीच्या फक्त ३० टक्के आणि ०१ एप्रिल २००५ ते ३० जून २०१७  या कालावधीतच्या थकबाकीवर ५० टक्के कराची भरपाई करावी लागेल आणि व्याज आणि दंडाची पूर्णपणे माफी मिळेल) आणि ३१ डिसेंबर २००२५ या अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे दीर्घ थकबाकी निकाली काढू शकतात. अधिक माहितीसाठी, करदात्यांनी www.mahagst.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा त्यांच्या जवळच्या एमजीएसटीडी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई, दि. २७ : विधानसभेचे नवनियुक्त उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच शिवाजी पार्क येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

0000

गजानन पाटील/ससं/

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवेदन

0
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) शहराचे नामांतर "ईश्वरपूर" करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार - संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि. १८ : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, (ता....

विधानपरिषद कामकाज

0
परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार - उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम  मुंबई, दि. १८ : देशातील टेस्लाचे पहिले शोरुम मुंबईमध्ये...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. १८ : कराडजवळील कृष्णा कालव्याच्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी...

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

0
मुंबई, दि. 18 : केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या (CGHS) दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल, अशी ग्वाही...

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. 18 : शासन निधी देवून नवनवीन लोकाभिमुख उपक्रम राबविते. इस्कॉनसारख्या मूल्याधारित संस्थांनी शासनासोबत भागीदारी केल्यास शासनाचे कौशल्य विकास उपक्रम फक्त तांत्रिक शिक्षणापुरते न राहता, व्यक्तिमत्व घडविणारे...