मंगळवार, जुलै 15, 2025
Home Blog Page 188

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबई, दि.२४ : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अधिक गुणवत्तापूर्ण कामे करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक मंत्रालयात परिषद सभागृह येथे राज्यमंत्री श्री.नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येत असलेल्या सर्व कामांमध्ये दर्जा राखण्यावर संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष द्यावे असे राज्यमंत्री श्री.नाईक यांनी सांगितले. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विविध कामांचा, प्रगतीपथावर असलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

००००

वंदना थोरात/विसंअ

अन्न व औषध प्रशासनात दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावेत – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

मुंबई, दि. २४: भेसळयुक्त अन्न शोधून त्यावर कारवाई करीत सामान्य नागरिकांचे आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने काम करतो. त्यामुळे विभागाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्न व औषध प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावे, त्यासाठी मनुष्यबळ नियुक्त करण्यात यावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले.

मंत्रालयात अन्न औषध प्रशासन विभागाच्या विविध विषयांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री श्री.झिरवळ बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर, उपसचिव अनिल अहिरे, सहआयुक्त (विधी) दा. रा गहाणे, सह आयुक्त ( अन्न ) उल्हास इंगवले, कक्ष अधिकारी साईनाथ गालनवाड आदी उपस्थित होते.

गुप्त वार्ता आणि दक्षता विभागात पदानुसार कामकाज वाटप करावे. स्वतंत्र विभाग केल्यामुळे कामकाज गतिमान होऊन आलेल्या तक्रारींवर विनाविलंब कारवाई करणे सोपे होईल. तसेच ॲनॉलॉग पनीर बाबत केंद्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे कारवाई करावी. या पनीर संदर्भात विशिष्ट वजन आणि आकार असावा, अशा सूचनाही मंत्री श्री.झिरवळ यांनी दिल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ

हिंगणघाट शहरातील कामगारांना घर मिळवून द्यावे – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. 24 : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात सुत गिरण्यांसह काही उद्योगधंदे आहेत. त्यामुळे शहरात रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. कामगारांना परवडणाऱ्या किमतीमध्ये हक्काचे घर दिल्यास त्यांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपळगांव येथे अत्यल्प उत्पन्न गटाकरीता बांधण्यात आलेली घरे कामगारांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

पिंपळगांव (ता. हिंगणघाट जि. वर्धा) येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटाकरीता सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत. यापैकी विक्री न झालेल्या सदनिकांबाबत मंत्रालयात गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी मुख्य अभियंता शिवकुमार आडे, उपसचिव अजित कवडे, अवर सचिव रवींद्र खेतले आदी उपस्थित होते.

पिंपळगांव येथील सदनिकांची रंगरंगोटी करावी. त्यानंतर सदनिकांची परवडणाऱ्या किमतीला विक्री करावी. कामगारांना घरे देण्यासाठी हिंगणघाट शहरातील उद्योजकांचे सहकार्य घ्यावे. कामगारांना घर खरेदी करण्यासाठी मिळणारे अनुदान, त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना याबाबत पडताळणी करावी. त्यानुसार कामागरांना घर खरेदी करून देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या. बैठकीत पिंपळगांव येथील सदनिकांबाबत राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

००००

निलेश तायडे/विसंअ

दिव्यांग उमेदवारांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र अनिवार्य; १ मे पासून नव्या अटींची अंमलबजावणी

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने २७ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून वितरित होणारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व भरती प्रक्रियेत १ मे २०२५ पासून करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीत दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांच्या खात्यात युडीआयडी कार्ड क्रमांक नोंदविण्याची व त्यास स्वावलंबन पोर्टलवरून वैधता (Validation) मिळविण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उमेदवारांकडे जर स्वावलंबन पोर्टलचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड दोन्ही असतील, तर ते तपशील खात्यात नोंदवणे अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांकडे सद्यस्थितीत स्वावलंबन पोर्टलवरुन वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र नाही. तथापि राज्य शासनाच्या एसएडीएम पोर्टलवरुन वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांनी एसएडीएम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी केल्याचा क्रमांक (Enrolment Number) अनिवार्य असेल तथापि उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल.

उमेदवाराचे नाव, दिव्यांगत्वाचा प्रकार, स्थिती इत्यादी तपशील पडताळल्यानंतरच माहिती वैध ठरवली जाईल. खात्यातील आणि युडीआयडी कार्डवरील जन्मदिनांक एकसारखे असणे आवश्यक आहे.

कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज करताना दिव्यांग तपशील वैध असल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे सर्व दिव्यांग उमेदवारांनी ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.

००००००००

राजू धोत्रे/विसंअ

मुंबईच्या ‘वेव्हज्’ परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर

मुंबई, दि. 24 : केंद्र सरकारच्यावतीने जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्राकरिता ‘वेव्हज् 2025 परिषद’ मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. दि. 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या परिषदेस विविध देशांचे मंत्री, धोरणकर्ते, उद्योगपती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग वेगाने वाढत असून रोजगारनिर्मितीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज् परिषदेचे आयोजन होत असून या परिषदेत चर्चासत्रे, उद्योगक्षेत्रात गुंतवणूक आणि विविध कार्यक्रम होणार आहे.

या परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत व महाराष्ट्र पॅव्हिलियन’ आणि वेव्हज प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा व सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रिएटोस्पिअरचे उद्घाटन आणि ‘वेव्हज बझार’, वेव्हज एक्सलेटर इत्यादींचा प्रारंभ होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक मीडिया संवाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद तसेच क्रिएट इन इंडिया चॅलेन्जेसची अंतिम फेरी होणार आहे. या परिषदेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांबरोबरच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

000

संजय ओरके/विसंअ

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मोठ्या धरणाच्या पाणलोट (कॅचमेन्ट) क्षेत्राबाहेरील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण करण्याचे व नवीन साठवण तलाव बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन – ‘मित्र’ या संस्थेच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार राणा जगजीतसिंह, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी आवश्यक धोरणे तयार करण्यासाठी उपाययोजना संदर्भात श्री. परदेशी यांनी यावेळी सादरीकरण केले. तसेच महास्ट्राईड प्रकल्प, महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प आदींचा आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाला सादर करावयाच्या प्राथमिक प्रकल्प अहवालच्या मानक कार्य प्रणालीला(एसओपी) यावेळी मान्यता देण्यात आली.

जागतिक बँक आणि बाह्य सहाय्यद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या ‘एसओपी’मध्ये दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे सादरीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी दरवर्षी राज्याचे सकल उत्पन्न (जीडीपी) 14.5 टक्के करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राज्य आधार सामग्री प्राधिकरण (स्टेट डेटा पॉलिसी) मधून साधन सामग्री तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

शासकीय कामकाजात गतिमानता येण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी मित्र संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत युनिर्व्हसल ‘ए आय’ विद्यापीठाशी सामंजस्य करार केला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शासकीय कामकाजात वापर वाढविण्यासाठी मित्र व भारतीय प्राद्यौगिक संस्था, मुंबई (आयआयटी मुंबई ), वोआरजीपीडिया यासंस्थेबरोबरही सामंजस्य करार झाला.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ

सौर उर्जा प्रकल्पातील विकासकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.24 : शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2025 वर्षात सात हजार मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील विकासकांना 100 दिवसाला 690 मेगावॅटचा लक्ष्यांक केंद्र सरकारने दिलेला असताना 746 मेगावॅट सौर उर्जा निर्मिती करण्यात आली असून यामध्ये दिलेल्या मुदतीपेक्षा अगोदर लक्ष्यांक पूर्ण केला आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी विकासकांना वन, पर्यावरण, सुरक्षेबाबतच्या अडचणी असल्याने त्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राधाकृष्णन बी. यांच्यासह सौरऊर्जा कंपनीचे राज्यातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सौर उर्जा प्रकल्पामध्ये महाराष्ट्राने देशात सर्वोत्कृष्ट काम केले आहे. विकासकांना जिल्हास्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करून जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिन्यातून एकदा बैठक घेऊन प्रशासकीय व तांत्रिक अडचणी सोडवाव्यात. आदिवासी शेतकऱ्यांना सौर कृषी ऊर्जा प्रकल्पाचा लाभ मिळण्यासाठी त्यांना देण्यात आलेले वनपट्टे कायदेशीर होण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. हा इको फ्रेंडली प्रकल्प असल्याने वन जमीन इतर कामासाठी वापरण्यास देण्याबाबत आणि शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करून वन आणि पर्यावरण विभागाने तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सप्टेंबर 2026 अखेर सर्व सौर उर्जा फीडरचे काम होण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हास्तरीय यंत्रणा, उर्जा विभाग, सौर उर्जा विकासक यांचे अभिनंदन केले.

प्रकल्पात अडचणी आणल्यास थेट कारवाई

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक कामात अडचणी आणत असल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

ग्रामपंचायतीच्या ‘ना हरकत’ ची गरज नाही

सौर उर्जा प्रकल्पासाठी गावातील खासगी किंवा शासकीय जमिनीबाबत राज्य शासनाने ना हरकत दिली असल्याने पुन्हा ग्रामपंचायतीच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. याबाबत सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

यावेळी विकासकांनी मांडलेल्या समस्या, अडचणी समजून घेवून जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

खासगी जमीन घेतानाही मुद्रांक शुल्क माफ

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी सरकारी जमिनीसाठी सरकारने मुद्रांक शुल्क माफ केले आहे. आता खासगी जमीन घेतानाही मुद्रांक शुल्क माफ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आतापर्यंत 2 लाख 14 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा

सौर उर्जा योजनेच्या अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्याच्या आधारे सर्व कृषी फीडर चालविण्यात येणार आहेत. राज्यात 15 हजार 284 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे काम चालू आहे. एकूण 16 हजार मेगावॅट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. आतापर्यंत राज्यात 1359 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झाले असून त्यामुळे 2 लाख 14 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होऊ लागल्याची माहिती अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला यांनी सादरीकरणात दिली.

प्रकल्प व्यवस्थापन पोर्टलचे अनावरण

सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प विकासकांना परवाने देण्यापासून ते वीज निर्मिती बिलांच्या पेमेंटपर्यंत सर्व कामांची प्रभावीपणे देखरेख करता यावी. यासाठी महावितरणच्या सोलर ॲग्रो कंपनीने ‘प्रकल्प व्यवस्थापन पोर्टल’ विकसित केले आहे. पोर्टलचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. हे पोर्टल महावितरण, महापारेषण, महाऊर्जा, विद्युत निरीक्षक, सोलार ॲग्रो कंपनी, सर्व सौर ऊर्जा प्रकल्प विकासकांना उपलब्ध आहे. अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कार्यवाही, घ्यावयाची दक्षता व आवश्यक मार्गदर्शन करण्यास ते सक्षम आहे. ज्यामुळे नियोजित सर्व प्रकल्प विक्रमी काळात पूर्ण होण्यास व व्यवस्थापनाची कामे वेळेत आणि सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

000

धोंडिराम अर्जुन/स.सं

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे तर १५ वर्षे मुदतीचे १ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या 14 वर्षे मुदतीच्या 1,500 कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२९ एप्रिल , २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २९ एप्रिल, २०२५ रोजी  संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 30 एप्रिल, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 30 एप्रिल, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची  परतफेड दिनांक 30 एप्रिल, २०३९  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा  लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑक्टोबर 30 आणि एप्रिल 30 रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

०००००

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाच्या १५ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२९ एप्रिल , २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २९ एप्रिल, २०२५ रोजी  संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 30 एप्रिल, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १५ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 30 एप्रिल, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची  परतफेड दिनांक 30 एप्रिल, २०४०  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा  लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑक्टोबर 30 आणि एप्रिल 30 रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

०००००

वंदना थोरात/विसंअ

महाराष्ट्र शासनाचे १२ व १३ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२९ एप्रिल, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २९ एप्रिल, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ३० एप्रिल, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ३० एप्रिल, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३० एप्रिल, २०३७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा  लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑक्टोबर ३० आणि एप्रिल ३० रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

०००००

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२९ एप्रिल , २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २९  एप्रिल, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर प्रणालीनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ३० एप्रिल, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३  वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ३० एप्रिल, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ३० एप्रिल, 2038  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा  लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑक्टोबर ३० आणि एप्रिल ३० रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

०००००

वंदना थोरात/विसंअ

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कारा’ने सन्मानित; हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल

नवी दिल्ली 24 : राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशातील विविध ग्रामपंचायतींना व तसेच संस्थांना  केलेल्या  उत्कृष्ट  कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीला हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार वर्ष  2023-24 साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय पंचायत राज दिन-2025 निमित्त मधुबनी, बिहार येथे पंचायती राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात प्रथमच हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार, आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP) या श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.  हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केली असून, सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार ग्रामपंचायतच्या सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी प्रधानमंत्री याच्या हस्ते स्वीकारला.  पुरस्काराचे स्वरुप एक कोटी रुपये रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.

हवामान बदलावर मात करणारी डव्वा/स ग्रामपंचायत ठरली देशात आदर्श

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रभावी पावले उचलत हवामान बदल विरुद्ध त्यांनी प्रभावीरित्या राबवलेल्या उपाययोजना राष्ट्रीय पातळीवर आदर्श ठरल्या आहेत.

डव्वा/स ग्रामपंचायतीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे गावात पर्यावरणपूरक जीवनशैली रुजवली आहे. गावातील प्रत्येक घरात सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आले असून, प्लास्टिक व फटाक्यांवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे गावाचा कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरित्या कमी झाला आहे.

निसर्गातील पंचतत्त्वांचे – पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश – संवर्धन करण्यासाठी जैवविविधता जपणारे उपक्रम प्रभावीपणे राबविले गेले. ग्रामपंचायतीच्या या यशामागे सरपंच योगेश्वरी चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी सिंधू सूर्यवंशी यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. गावकऱ्यांनी एकजुटीने या उपक्रमांमध्ये सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी घेतली. या सर्व उपक्रमांची दखल घेत 11 एप्रिल 2025 रोजी केंद्र शासनाच्या निरीक्षण पथकाने ग्रामपंचायतीची पाहणी केली.

इतर पुरस्कार विजेते

हवामान कृषी विशेष पंचायत पुरस्कार अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील बिरदहल्ली ग्रामपंचायतीने मिळवला असून त्यांना 75 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. तर तिसरा क्रमांक बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर ग्रामपंचायतीला मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

यासोबत आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार अंतर्गत तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मल ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून एक कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील हातबदरा ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला, तर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गोल्लापुडी ग्रामपंचायतीला तिसरा क्रमांक मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.

पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार अंतर्गतही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. या श्रेणीत प्रथम क्रमांक केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन, केरळ यांना देण्यात आला असून त्यांनी एक कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. दुसरा क्रमांक ओडिशातील राज्य ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेला मिळाला असून त्यांना 75 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. तिसऱ्या क्रमांकावर आसाममधील राज्य पंचायत आणि ग्रामीण विकास संस्था असून त्यांना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

००००

ताज्या बातम्या

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक...

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

0
यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत...