मंगळवार, जुलै 15, 2025
Home Blog Page 187

‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

सातारा दि.24:  सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे.  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या पर्यटन महोत्सवाच्या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या क्षमा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे आदी उपस्थित होते.

महापर्यटन महोत्सव 2025 हा महाबळेश्वर होत असून  या 2 ते 4 मे या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवास राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणार आहेत.  त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय राखून आपापली जबाबदारी चोखपणे राबवावी.  येणाऱ्या समस्या सोडवाव्यात. वाहतूक, कायदा व सुव्यवस्था अंत्यत उत्कृष्ट राहील याबाबत काटेकोर दक्षता घ्यावी.

या कार्यक्रमामध्ये यामध्ये हेलिकॉप्टर राईड, लेसर शो, स्वरोत्सव, साहसी उपक्रम, फुड फेस्ट आणि आनंदयात्रा, लहान मुलांसाठी विविध खेळ, कार्निवल परेड, उत्सव महाराष्ट्राचा समृध्द परंपरेचा, किल्ला प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, साहसी व मर्दानी खेळ, टेंटसिटी, ड्रोन शो, योग, वाद्यसंगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बोट प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार असून याबाबत व एकूणच महोत्सवाच्या आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

000

 

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करा – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगर दि.24: सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासह त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा तसेच 100  दिवस आराखड्यातील सात कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. गावडे बोलत होते. याप्रसंगी अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, नगरविकास विभागाचे देविदास टेकाळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे  दैनंदिन जीवन अधिक सुकर तसेच सुलभ व्हावे यासाठी राज्य शासनाने १०० दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. कृती आराखड्यामध्ये तयार करण्यात आलेला सात कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि उद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी, आपल्या कार्यालयांचे अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध सेवांचे सुसूत्रीकरण करण्यात यावे. नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी प्रशासन म्हणून आपण तत्पर असायला हवे, असे श्री गावडे म्हणाले. गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वांनी करावेत. उद्योजकांची कुठेही अडवणूक होणार नाही, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

‘सुंदर माझे कार्यालय’ या संकल्पनेअंतर्गत शासकीय विभागातील प्रत्येक कार्यालय स्वच्छ, सुटसुटीत, आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवावी, यासाठी कार्यालयीन अभिलेख अद्ययावत करण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे.

कार्यालयात नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, कार्यालयातील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे, अभ्यागत कक्ष निर्माण करावा,  कार्यालयाची रंगरंगोटी व सुशोभीकरण यावर भर देण्यात यावा. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे,  दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा, तसेच क्षेत्रीय भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी दिल्या.

100 दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण, सुकर जीवनमान, गुंतवणुकीस प्रोत्साहन, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निराकरण, कार्यालयीन सोयी व सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याबाबतही विभागनिहाय आढावा घेण्यात आला.

यावेळी विभागीय पातळीवरील कार्यालयांचे प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली.

००००

सभापती प्रा.राम शिंदे यांचेकडून विधानपरिषदेच्या समित्यांचे प्रमुख आणि समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई, दि. 24  :महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पद्धतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक प्रभावीपणे अंमलात येत असते. समिती सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

(अ) संयुक्त समित्या : –

एक : अंदाज समिती (विधानपरिषद नियम 208)

(1) श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

(2) श्री.सदाशिव खोत, वि.प.स.

(3) श्री.हेमंत पाटील, वि.प.स.

(4) श्री.सतिश चव्हाण, वि.प.स.

(5) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

(6) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

दोन : लोकलेखा समिती (विधानपरिषद नियम 207)

(1) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

(2) श्री.संजय खोडके, वि.प.स.

(3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(4) ॲड. अनिल परब, वि.प.स.

(5) रिक्त

विशेष निमंत्रित

श्री.परिणय फुके, वि.प.स.

 

तीन : सार्वजनिक उपक्रम समिती (विधानपरिषद नियम 209)

(1) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.

(2) श्री.चंद्रकांत रघुवंशी, वि.प.स.

(3) श्री.शिवाजीराव गर्जे, वि.प.स.

(4) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(5) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

चार : पंचायत राज समिती (विधानपरिषद नियम 212)

(1) श्री.परिणय फुके, वि.प.स.

(2) डॉ.मनिषा कायंदे, वि.प.स.

(3) श्री.विक्रम काळे, वि.प.स.

(4) श्री.जयंत आसगावकर, वि.प.स.

(5) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

विशेष निमंत्रित

श्री.योगेश टिळेकर, वि.प.स.

 

पाच : रोजगार हमी योजना समिती (विधानपरिषद नियम 213)

(1) श्री.योगेश टिळेकर, वि.प.स.

(2) श्री.किशोर दराडे, वि.प.स.

(3) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

(4) रिक्त

(5) रिक्त

 

सहा : उपविधान समिती (विधानपरिषद नियम 206)

(1) श्रीमती उमा खापरे, वि.प.स.

(2) श्री.संजय खोडके, वि.प.स.

(3) श्री.जयंत आसगावकर, वि.प.स.

(4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

(5) रिक्त

 

सात : अनुसूचित जाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 210)

(1) श्री.अमित गोरखे, वि.प.स.

(2) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

(3) डॉ.प्रज्ञा सातव, वि.प.स.

(4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

 

आठ : अनुसूचित जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 211)

(1) श्रीमती उमा खापरे, वि.प.स.

(2) श्री.इद्रिस नायकवडी, वि.प.स.

(3) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

(4) श्री.सुनिल शिंदे , वि.प.स.

 

नऊ : विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214)

(1) श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, वि.प.स.

(2) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

(3) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

(4) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

 

दहा : महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 अ)

(1) श्रीमती चित्रा वाघ, वि.प.स.

(2) डॉ.प्रज्ञा सातव, वि.प.स.

(3) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

(4) रिक्त

 

अकरा : इतर मागासवर्ग कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 ब)

(1) श्री.विक्रांत पाटील, वि.प.स.

(2) श्री.पंकज भुजबळ, वि.प.स.

(3) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

(4) रिक्त

 

बारा : अल्पसंख्याक कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 क)

(1) श्री.वसंत खंडेलवाल, वि.प.स.

(2) श्री.इद्रिस नायकवडी, वि.प.स.

(3) डॉ.प्रज्ञा सातव, वि.प.स.

(4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

 

तेरा : मराठी भाषा समिती (विधानपरिषद नियम 214 ड)

(1) श्री.संजय केनेकर, वि.प.स.

(2) श्री.रामराजे नाईक-निंबाळकर, वि.प.स.

(3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

 

(ब) विधानपरिषदेच्या समित्या :- 

एक : विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती (विधानपरिषद नियम 195)

 

समिती प्रमुख

(1) प्रा. राम शिंदे, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद तथा समिती प्रमुख.

 

सदस्य

(2) श्री.देवेंद्र फडणवीस, मा.मुख्यमंत्री

(3) श्री.एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री

(4) श्री.अजित पवार, मा. उप मुख्यमंत्री

(5) श्री.चंद्रकांत (दादा) पाटील,मा. संसदीय कार्य मंत्री.

(6) श्री.अंबादास दानवे, मा.विरोधी पक्ष नेता

(7) श्री.प्रविण दरेकर, वि.प.स.

(8) श्री. सतेज पाटील, वि.प.स.

(9) श्री. विक्रम काळे, वि.प.स.

 

विशेष निमंत्रित

(1) डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

(2) ॲङ. अनिल परब, वि.प.स.

(3) श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(4) श्री. हेमंत पाटील, वि.प.स.

(5) श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

(6) श्री. प्रसाद लाड, वि.प.स.

 

*पत्रक भाग क्रमांक 69/77 नुसार दिनांक 9 डिसेंबर, 2024 रोजी सदरहू समिती गठित करण्यात आली आहे.

 

दोन : विशेष हक्क समिती (विधानपरिषद नियम 245) –

 

(1) समिती प्रमुख

श्री. प्रसाद लाड, वि.प.स. सदस्य

(2) श्री.राजहंस सिंह, वि.प.स.

(3) श्री.विक्रांत पाटील, वि.प.स.

(4) श्री.परिणय फुके, वि.प.स.

(5) डॉ. मनिषा कायंदे, वि.प.स.

(6) श्री.संजय खोडके, वि.प.स.

(7) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

(8) ॲड.अनिल परब, वि.प.स.

(9) रिक्त

(10) रिक्त

(11) रिक्त

 

तीन : विनंती अर्ज समिती (विधानपरिषद नियम 238 (1))

 

(1) समिती प्रमुख

डॉ.नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

 

सदस्य

(2) श्री.अमरीशभाई पटेल, वि.प.स.

(3) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

(4) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(5) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

 

चार : आश्वासन समिती (विधानपरिषद नियम 221 (1))

(1) समिती प्रमुख

श्री.प्रविण दरेकर, वि.प.स. सदस्य

(2) श्रीमती चित्रा वाघ, वि.प.स.

(3) श्री.धर्मगुरु राठोड, वि.प.स.

(4) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

(5) श्री.विक्रम काळे, वि.प.स.

(6) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(7) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

(8) श्री.अरुण लाड, वि.प.स.

(9) रिक्त

 

पाच : नियम समिती (विधानपरिषद नियम 218)

(1) समिती प्रमुख

प्रा. राम शिंदे, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

 

सदस्य

(2) श्री.प्रविण दरेकर, वि.प.स.

(3) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.

(4) श्रीमती भावना गवळी, वि.प.स.

(5) श्री.रामराजे नाईक निंबाळकर, वि.प.स.

(6) श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, वि.प.स.

(7) ॲङ.अनिल परब, वि.प.स.

(8) रिक्त

(9) रिक्त

विशेष निमंत्रित

श्रीमती उमा खापरे, वि.प.स.

 

सहा : अशासकीय विधेयके व ठराव समिती (विधानपरिषद नियम 201 (1))

 

(1) समिती प्रमुख

डॉ.नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

सदस्य

(2) श्री.प्रसाद लाड, वि.प.स.

(3) श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

(4) श्री.अमरीशभाई पटेल, वि.प.स.

(5) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(6) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

(7) रिक्त

 

सात : सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवणेबाबत तदर्थ समिती

 

(1) समिती प्रमुख

डॉ.नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

सदस्य

(2) श्री.दादाराव केचे, वि.प.स.

(3) श्री.संदिप जोशी, वि.प.स.

(4) श्री.राजहंस सिंह, वि.प.स.

(5) श्री.इद्रिस नायकवडी, वि.प.स.

(6) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

(7) रिक्त

(8) रिक्त

  • मा.संसदीय कार्य मंत्री,मा.विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद व मा.संसदीय कार्य राज्यमंत्री हे या समितीवर विशेष निमंत्रित राहतील.
  • मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन, मंत्रालय हे या समितीवर सदस्य म्हणून राहतील.
  • सचिव (1),महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय हे या समितीचे सदस्य सचिव (Member Secretary) म्हणून राहतील.

 

(क) अधिनियमानुसार संयुक्त समिती :-

 

एक : सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती (1956 चा अधिनियम क्रमांक 49 कलम 8) 

(1) श्री.वसंत खंडेलवाल, वि.प.स.

(2) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

(3) श्री.शिवाजीराव गर्जे, वि.प.स.

(4) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(5) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

 

दोन : विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती (1977 चा अधिनियम क्रमांक 1 कलम 5)

(1) श्री.राजहंस सिंह, वि.प.स.

(2) श्रीमती भावना गवळी, वि.प.स.

(3) श्री.पंकज भुजबळ, वि.प.स.

(4) श्री.जयंत आसगावकर, वि.प.स.

(5) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

 

(ड) तदर्थ संयुक्त समित्या :- 

 

एक : ग्रंथालय समिती  

(1) समिती प्रमुख.

प्रा. राम शिंदे,मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

 

(2) सह समिती प्रमुख.

ॲड. राहुल नार्वेकर, मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.

सदस्य

(3) श्री.अमित गोरखे, वि.प.स.

(4) डॉ.मनिषा कायंदे, वि.प.स.

(5) श्री.शिवाजीराव गर्जे, वि.प.स.

(6) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

(7) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

विशेष निमंत्रित

श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

 

दोन : आमदार निवास व्यवस्था समिती 

(1) श्री.विक्रांत पाटील, वि.प.स.

(2) श्री.किशोर दराडे, वि.प.स.

(3) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

(4) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

(5) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

 

तीन : आहार व्यवस्था समिती 

(1) श्री.सदाशिव खोत, वि.प.स.

(2) श्री.विक्रम काळे, वि.प.स.

(3) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

(4) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

चार : “धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे” या संदर्भातील तदर्थ संयुक्त समिती

(1) श्री.प्रविण दरेकर, वि.प.स.

(2) श्री.हेमंत पाटील, वि.प.स.

(3) श्री.सतिश चव्हाण, वि.प.स.

(4) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

(5) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

विशेष निमंत्रित

श्री.प्रसाद लाड, वि.प.स.

पाच : “एड्स” या रोगावर प्रभावीरित्या आळा घालण्यासाठी विधीमंडळ सदस्यांचा समावेश असलेल्या “चर्चापीठा” ची (FORUM) समिती

मुख्य आश्रयदाते

प्रा. राम शिंदे, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

ॲड. राहुल नार्वेकर, मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.

अध्यक्ष

श्री.देवेंद्र फडणवीस, मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सदस्य

श्री.चंद्रकांत पाटील, मा.संसदीय कार्य मंत्री

श्री.अंबादास दानवे, मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद

मा.संसदीय कार्य राज्यमंत्री – (रिक्त)

(1) श्री.रणजितसिंह मोहिते पाटील, वि.प.स.

(2) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

(3) श्री.सतिश चव्हाण, वि.प.स.

(4) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

 

सहा : वातावरणीय बदलासंदर्भातील संयुक्त तदर्थ समिती

समिती प्रमुख

प्रा. राम शिंदे, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

सह समिती प्रमुख

ॲड. राहुल नार्वेकर, मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.

सदस्य

(1) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.

(2) श्री.रामराजे नाईक निंबाळकर, वि.प.स.

(3) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

(4) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

   विशेष निमंत्रित

(1) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

(2) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ.

(3) संचालक, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

  • मा.सभापती,महाराष्ट्र विधानपरिषद हे या समितीचे समिती प्रमुख राहतील.
  • मा.अध्यक्ष,महाराष्ट्र विधानसभा हे या समितीचे सह समिती प्रमुख राहतील.
  • मा.पर्यावरण मंत्री,महाराष्ट्र राज्य तसेच मा.पर्यावरण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे या समितीवर पदसिध्द सदस्य म्हणून राहतील.

०००

ज.सं.अ.विधिमंडळ

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली

२३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान

मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद

मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय

मुंबई, दि. 24 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडियाच्या दोन विशेष विमानाची व्यवस्था पर्यटकांसाठी केली होती, त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकूणच स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतील, तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असे त्यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्‍या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.

काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणाऱ्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. उद्या काश्मिरातून येणाऱ्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

००००

‘चिल्ड्रेन्स एड् सोसायटी’ला आवश्यक सहकार्य करण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध – मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई, दि.24 :- प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून सेवा करण्याची संधी असते. चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबदल  जिल्हा प्रशासन संवेदनशील असून या संस्थेस आवश्यक ते सहकार्य करण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनाच्या हीरक महोत्सवानिमित्त चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या उमरखाडी येथील निरीक्षणगृह/बालगृह येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बालगृहातील मुलांसमवेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जिल्हाधिकारी श्रीमती गोयल पुढे म्हणाल्या की, ‘पंडित दीनदयाळ यांच्या एकात्म मानव दर्शनाचे महत्त्व तसेच मानवाकडून जीवनात झालेल्या चुका दुरुस्त करण्याच्या संधीचे महत्त्व सांगून त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यावरील अनुभवाचे कथन केले.

यावेळी या सोसायटीकडून करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला व बालनिरीक्षणगृहातील मुलांकडून करण्यात येत असलेल्या कौशल्याभिमूख कामकाजाची माहिती  घेऊन परिसराची पाहणी केली.

या प्रसंगी मुंबई शहर उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश सांगळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, डोंगरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ठाकूर, तसेच संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, जिल्हा महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

00000

काशीबाई थोरात/विसंअ

धुळे एमआयडीसीसाठी जागेची अडचण दूर करणार – महसूल मंत्री बावनकुळे

मुंबई, दि. २४ : धुळे एमआयडीसी विस्तारासाठी रावेर शिवार येथील २०७७ एकर जागा वनविभागाच्या अडचणी दूर करून हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच, या जागेवर होत असलेल्या अनधिकृत गौण खनिज उत्खननावर कठोर कारवाई दंड वसुलीचे तसेच आवश्यकता वाटल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले.

धुळे एमआयडीसीच्या विस्तारासाठी मौजे रावेर शिवार येथील २०७७ एकर जागा फूड पार्क, टेक्सटाईल पार्क, इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स पार्कसाठी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, अतिरिक्त मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर यांची उपस्थिती होती. धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

धुळे जिल्ह्यातून सात महामार्ग जातात. जिल्हात विकासकामांना चालना मिळत आहे. तथापि या विकासात उद्योग वाढीस लागणेही गरजेचे आहे. यासाठी सध्या असलेल्या एमआयडीसीचा विस्तार होणे आवश्यक आहे. लोकहिताच्या दृष्टीने रावेर येथील जागा एमआयडीसीकरिता उपलब्ध करुन देण्याची मागणी मंत्री श्री.रावल यांनी केली.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करून धुळे एमआयडीसीसाठी ही जागा उपलब्ध करून दिली जाईल. धुळे येथील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे फूड पार्क, टेक्सटाईल पार्क आणि इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स पार्कसारख्या प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

अनधिकृत खनिज उत्खननावर कारवाईचे आदेश

सद्यस्थितीत मौजे रावेर शिवारातील या जागेवर काही सोसायट्यांच्या माध्यमातून विनापरवाना गौण खनिज उत्खनन आणि शर्तभंगाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने कारवाई करून संबंधितांवर दंड आकारावा आणि वसुलीसाठी नोटिसा बजावाव्यात, असे स्पष्ट आदेश महसूलमंत्र्यांनी दिले. यामुळे अनधिकृत कारवायांना आळा बसेल आणि जागेचा योग्य वापर सुनिश्चित होईल.

औद्योगिक विकासाला चालना

धुळे एमआयडीसीच्या विस्तारामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. फूड पार्कमुळे शेती आधारित उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, तर टेक्सटाईल आणि इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स पार्कमुळे तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल.

वनविभागाच्या अडचणी दूर झाल्यानंतर लवकरात लवकर जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि वनविभाग यांच्यात समन्वय साधला जाईल. तसेच, अनधिकृत खनिज उत्खनन प्रकरणी तपास तीव्र करून कायदेशीर कारवाईला गती दिली जाणार आहे. या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. स्थानिक नागरिक आणि उद्योजक याकडे उत्साहाने पाहत असून, लवकरात लवकर प्रकल्प कार्यान्वित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

भिवंडीजवळील बापगाव येथील जागा ‘मल्टी मॉडेल हब’साठी पणन मंडळाला देण्याचा निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश

मुंबई, दि. २४ : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील पणन महामंडळाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. ही जागा अतिक्रमणमुक्त करुन त्याठिकाणी मल्टी मॉडेल हब करण्याचा पणन विभागाचा प्रस्ताव असून यासाठी आणखी जागेची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव १५ दिवसात सादर करावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सहकार व पणन विभागाचे अधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, बापगाव येथील जागेवर मल्टी मॉडेल हब करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता असून पणन मंडळाने जागेची मागणी केली आहे. ही जागा सध्या पणन मंडळाच्या ताब्यात असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. या ठिकाणी ५२ झोपड्या आणि १७८ इतर अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे काढून टाकण्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करावी.

पणन मंत्री श्री.रावल म्हणाले, अतिक्रमण काढण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी सर्वच विभागांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच या परिसरात आणखी काही शासकीय आणि खासगी जमीन आहे. ही जमीन देखील पणन मंडळास देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

या मागणीचा सकारात्मक विचार करत पणन मंडळास देण्यात येणाऱ्या जागेचे पणन मंडळाने संरक्षण करावे. त्याबरोबरच त्याठिकाणी मल्टी मॉडेल हब उभारण्याबाबत प्रस्ताव १५ दिवसात सादर करण्याचे आदेशही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

महाडमधील पशुसंवर्धनची जागा कुणबी, बुरुड समाजास देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई दि. २४ – महाड नवेघर येथील २५ एकर जमिनीपैकी तीन गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड समाजाला समाज मंदीर आणि विद्यार्थी वसतिगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील १५ दिवसात प्रस्ताव देण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, बुरुड समाजाने सामाजिक कामासाठी जागा मागितली आहे. ही जागा ही जिल्हा परिषदेची असून ती पशुसंवर्धन विभागाला २००८ साली देण्यात आली आहे. ती जागा पशुसंवर्धन विभागाने विकसित केलेली नसून सध्या ही जागा बुरुड समाजाला आवश्यक असल्याने त्यांना देण्यात यावी. त्याच्या बदल्यात रायगड जिल्हाधिकारी यांनी महाड शहरात महसूल विभागाची उपलब्ध असलेली जागा पशुसंवर्धन विभागाला द्यावी, असे आदेशही मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले.

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले, पशुसंवर्धन आणि महसूल विभागाने या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेतला हे महत्त्वपूर्ण आहे. विकासाच्या दृष्टीने असे निर्णय योग्य ठरतात. जिल्हाधिकारी यांनी तातडीने याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा.

जागेची अदलाबदली आणि बुरुड समाजाला अटी शर्तींवर जागा उपलब्ध करुन देण्याबाबत असे दोन प्रस्ताव सादर करण्यात यावेत, अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

 

00000

बी.सी.झंवर/विसंअ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४: भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध शहरांची निर्मिती गरजेची आहे. बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थेसोबतच रोजगार निर्मितीवर भर, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा. अशा शहरांच्या निर्मितीसाठी सिडकोची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी’ निर्माण करण्याचे निर्देश दिले. या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी सुविधा असणारे हे देशातील पहिलेच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामान्य विमान वाहतुकीची व्यवस्था सर्वप्रथम निर्माण करण्याचे सूचित करीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगभरातून लोक मुंबईमध्ये विमाने आणत असतात. त्यामुळे पार्किंगची चांगली सुविधा या विमानतळावर उपलब्ध असायला पाहिजे. यासोबतच विमान दुरुस्तीची सुविधाही विमानतळावर असावी. विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुक ‘कनेक्टिव्हिटी’ ची कामे वेळेत पूर्ण करावीत.

नैना प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने करण्यात यावी. या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात येणारे रस्त्यांची रुंदी भविष्यातील वाहतुकीचा भार लक्षात घेऊन निर्धारित करण्यात यावी. भविष्यात सुरू होणाऱ्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांचा कालावधी निश्चित करण्यात यावा. यापुढे पायाभूत सोयी सुविधा निर्मितीच्या कामांबाबत निविदेमध्येच कालावधीची सक्ती करण्यात यावी. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना कुठलेही काम जास्त कालावधीसाठी रेंगाळणे योग्य नाही. त्यामुळे कामांचा कालावधी हा निश्चित करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

मेट्रो स्टेशन पासून विमानतळापर्यंत बहुपर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात यावी. याबाबत नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. घरकुल आणि गृहनिर्माणच्या बाबतीत कामे दर्जेदार करण्यात यावी. याबाबतही कालावधीची मर्यादा ठेवावी. नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्यासाठी सिडकोने पुढाकार घेत कार्यवाही करावी. नवी मुंबई परिसरात क्रीडा सुविधांचे कामे सुरू आहे. त्यामुळे या भागामध्ये क्रीडा सुविधांचा चांगला विकास होत आहे. खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री अतिथिगृह येथे सिडकोच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अप्पर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिडकोची भविष्यातील प्रस्तावित कामे

कमर्शियल कॉम्प्लेक्स, बिझनेस सेंटर आणि शॉपिंग मॉल समाविष्ट असलेले 270 हेक्टर जागेवर एरोसिटी, 155 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क खारघर, 389 हेक्टर वरील इंटरग्रेटेड लॉजिस्टिक पार्क, 102 हेक्टर जागेवर एज्युसिटी आणि 105.5 हेक्टर जागेवर मेडिसिटी.

००००

निलेश तायडे/विसंअ

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

मुंबई दि. २४ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येत्या २५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांची असून,   मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात शुक्रवार दिनांक २५ एप्रिल, २०२५ रोजी पहिल्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. तर याच दिवशी उस्ताद शाहिद परवेझ यांचाही शास्त्रीय गायनाचा कार्यकम होणार आहे. शनिवार दिनांक २६ एप्रिल, २०२५ रोजी दुसऱ्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता डॉ. भरत बलवल्ली तसेच विदुषी मंजुषा पाटील यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यकम होईल. रविवार दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ज्येष्ठ गायक पं. आनंद भाटे आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

उपरोक्त शास्त्रीय संगीत महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामुल्य ठेवण्यात आलेला आहे. विनामुल्य प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर-प्रभादेवी, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर आणि यशवंत नाट्य मंदिर-माटुंगा येथे उपलब्ध आहेत.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

ताज्या बातम्या

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक...

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

0
यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत...