बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 1651

स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ, महाराणी सिल्विया यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 4 : स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ (सोळावे)आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, अशोक हिंदुजा, संजीव बजाज, स्वीडनमधील भारताच्या राजदूत श्रीमती मोनिका मोहते उपस्थित होते.

यावेळी उभय देशातील सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली. मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव श्री. मेहता यांनी राज्यातील औद्योगिक परिस्थिती संदर्भात माहिती दिली. उपस्थित उद्योगपतींसोबतही यावेळी अनौपचारिक चर्चा झाली.

००००

अर्चना शंभरकर/वि.सं.अ./4012.19

स्वीडन के राजा कार्ल गुस्ताफ और महारानी सिल्विया ने राज्यपाल से की मुलाकात

मुंबई, दि. 4 : स्वीडन के राजा कार्ल गुस्ताफ (सोलहवें) और महारानी सिल्विया ने राजभवन में राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से मुलाकात की।

इस दौरान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मि ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, प्रमुख सचिव अजय मेहता, उद्योगपति कुमार मंगलम बिड़ला, अशोक हिंदुजा, संजीव बजाज, स्वीडन में भारत के राजदूत, श्रीमती मोनिका मोहते उपस्थित थे। इस दौरान दोनों देशों के सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक सद्भाव को बढ़ाने के लिए इस पर चर्चा की गई।  मंत्री सुभाष देसाई और प्रमुख सचिव श्री. मेहता ने राज्य में औद्योगिक स्थिति की जानकारी दी। उपस्थित व्यवसायियों के साथ अनौपचारिक चर्चा भी हुई।

००००

Swedish King Carl Gustaf and Queen Silvia visited the Governor

Mumbai, date.4th: Swedish King Carl Gustaf (XVI) and Queen Silvia visited the Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan.

Chief Minister Uddhav Thakare, Smt. Rashmi Thakare, Minister Subhash Desai, Chief Secretary Ajoy Mehta, Businessman Kumar Manglam Bila, Ashok Hinduja, Sanjiv Bajaj and Ambassador of India to Sweden Smt. Monika Mohta were present at the time.

Discussions were made to strengthen cultural, industrial and social ties between both countries. Minister Subhash Desai and Chief Secretary Shri. Mehta gave the information about industrial situations in the state. An informal discussion was also held with present industrialists.

0000

स्वीडनचे राजे कार्ल आणि राणी सिल्विया यांची डोअर स्टेप शाळेला भेट

मुंबई, दि. 4 : स्वीडनचे राजे कार्ल व राणी सिल्विया यांनी कफ परेड येथील डोअर स्टेप शाळेला भेट देऊन शाळेतील मुलांसोबत संवाद साधला. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डोअर स्टेप शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात.

चालती फिरती शाळाम्हणून शाळेच्या बसमध्ये क्लासरूमची सुविधा उपलब्ध असून मुलांना या बसमध्येदेखील शिक्षण दिले जाते. ज्या ठिकाणी शाळाबाह्य मुले असतात, तिथे ही बस जाऊन थांबते आणि जी मुले शाळेत जात नाहीत, त्या मुलांना शिकविले जाते. त्यामुळे मुलांना शाळेची आवड निर्माण होऊन मुले शाळेत जायला सुरुवात करतात. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम या शाळेच्या वतीने राबविण्यात येतो. या उपक्रमामुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळते आणि साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत होते, अशी माहिती डोअर स्टेप शाळेच्या संचालिक बिना शेठ लष्करी यांनी दिली.

000

काशिबाई थोरात/वि.सं.अ./4.12.19

Swedish King Carl and Queen Silvia visited Door Step School.

Mumbai, date.4th: Swedish King Carl and Queen Silvia visited Door Step School at Cuff Parade and communicated with the school students. Door Step School implements various programmes to create an interest in learning and encourage children who don’t go to school.

A classroom is made available in the school bus of ‘Chalti Firti Shala (Mobile School) and education is given to the children in this bus too. The bus stops where there are children not going to school and they are given education. As a result, children start liking school and they go to school. This school implements such an innovative initiative. Children without access to the school can get an education through this initiative and the literacy ratio increases, informed the Director of Door Step School Bina Seth Lashkari.

0000

स्वीडन के राजा कार्ल और रानी सिल्विया

ने किया डोर स्टेप स्कूल का दौरा

मुंबई, दि.4: स्वीडन के राजा कार्ल और क्वीन सिल्विया ने कफ परेड में डोर स्टेप स्कूल का दौरा करते हुए स्कूली बच्चों के साथ बातचीत की।स्कूल से बाहर के बच्चों को शिक्षित किया जाना चाहिए, उन्हे प्रोत्साहित करने के लिए डोर स्टेप स्कूल की ओर से विभिन्न गतिविधियाँ कार्यान्वित की जाती हैं।

स्कूल बसों में ‘चालती फिरती शाळा’  के रूप में कक्षाएँ उपलब्ध हैं और इन बसों में बच्चों को पढ़ाया भी जाता है। जहां स्कूल से बाहर के बच्चे होते हैं, वहां यह बस रुकती है और उन बच्चों को पढ़ाया जाता है जो स्कूल नहीं जाते हैं। परिणामस्वरूप, बच्चे स्कूल के बारे में जानकारी मिलते ही उत्साहित हो जाते हैं और स्कूल जाने लगते हैं। यह अभिनव पहल इस स्कूल की ओर से लागू की गई है। यह पहल स्कूली बच्चों को शिक्षा प्राप्त करने और साक्षरता बढ़ाने में मदद करती है। डोर स्टेप स्कूल के निदेशक  बिना सेठ लष्करी  ने कहा कि इस पहल से स्कूली बच्चों को शिक्षा प्राप्त करने और साक्षरता बढ़ाने में मदद मिलती है।

महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी कोलकाता येथे भव्य रोड शोचे आयोजन

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्रातील पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीने कोलकाता येथे नुकतेच भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोच्या माध्यमातून तेथील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्राचा समृद्ध पर्यटन वारसा तिथे सादर करण्यात आला.

रोड शोला पर्यटन संचालक दिलीप गावडे, औरंगाबाद विभागीय पर्यटन उपसंचालक श्रीमंत हरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटनावर आधारित सादरीकरण, बी टू बी चर्चासत्रे व प्रश्नोत्तरे तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. पर्यटकांनी महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

पर्यटनाशी निगडीत सुमारे८०व्यवसायिक, सहल आयोजक व नामांकित ट्रॅव्हल एजन्ट यांच्यासमवेत चर्चा करुन त्यांना महाराष्ट्रातील पर्यटन संधींची माहिती देण्यात आली.

पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले की, महाराष्ट्राला प्राचीन, सांस्कृतिक आणि नैसर्गिक असा फार मोठा पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. राज्यातील पर्यटनाला विकासाच्या दिशेने नेताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पर्यटन संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येतात. राज्यात समुद्र किनारा, किल्ले, लेण्या, गुंफा अशी बरीच पर्यटनस्थळे आहेत. या सर्व पर्यटनस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांना व्हावी व त्यांनी या स्थळांना भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणजे देशांतर्गत रोड शोचे आयोजन केले जाते. कोलकाता येथे झालेल्या रोड शोला चांगला प्रतिसाद लाभला. पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट देण्यासाठी मोठा रस दाखवला.

        

देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटकांना, सहल आयोजकांना व पर्यटन व्यवसायिकांना राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणे, पर्यटनाशी निगडीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, पारंपरिक कला-संस्कृती, हस्तकला, पाककृती आदींची ओळख करून देणे व त्यांच्याशी व्यवसायिक संबंध वृद्धिंगत करून विविध राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करणे हा रोड शोचा मुख्य उद्देश होता, असे पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले.

0000

महाराष्ट्र में पर्यटन विकास के लिए कोलकाता में विशाल रोड शो

मुंबई, दिनांक 4: महाराष्ट्र में पर्यटन को बढ़ावा देने के लिए राज्य पर्यटन निदेशालय की ओर से हाल ही में कोलकाता में एक विशाल रोड शो का आयोजन किया गया था। इस रोड शो के माध्यम से यहां के पर्यटकों को महाराष्ट्र की तरफ आकर्षित करने का प्रयास किया गया। महाराष्ट्र की समृद्ध पर्यटन विरासत को यहां पर प्रस्तुत किया गया था।

इस कार्यक्रम में महाराष्ट्र में पर्यटन पर आधारित प्रस्तुतियां, बी टू बी चर्चासत्र और प्रश्न-उत्तर के साथ ही साथ महाराष्ट्र का सांस्कृतिक कार्यक्रम को पेश किया गया था। पर्यटकों ने महाराष्ट्र के भोजन का भी स्वाद लिया हैं।

पर्यटन से सम्बंधित लगभग80 व्यावसायिक, पर्यटन (टूर) आयोजक व नामित ट्रैवल एजेंटों के साथ चर्चा करने के बाद, इन लोगों को महाराष्ट्र में पर्यटन के अवसरों के बारे में जानकारी दी गई।

पर्यटन निदेशक दिलीप गावड़े ने कहा कि महाराष्ट्र के पास प्राचीन, सांस्कृतिक और प्राकृतिक पर्यटन की एक विशाल विरासत है। राज्य में पर्यटन के विकास की दिशा में पर्यटन निदेशालय द्वारा राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर कई नए उपक्रम आयोजित किये जाते हैं। राज्य में समुद्र तट, महल, गुफाएँ जैसे कई पर्यटन स्थल है। इन सभी पर्यटन स्थलों के बारे में देश-विदेश के पर्यटकों को जानकारी उपलब्ध कराई जानी चाहिए ताकि वे इन जगहों का दौरा कर आंनद उठा सकें। इस बाबत विभिन्न माध्यमों से जानकारी दी जानी  चाहिए। इसी का एक भाग देश में रोड शो का आयोजन है। कोलकाता में आयोजित रोड शो को अच्छा प्रतिसाद मिला है। पर्यटकों ने महाराष्ट्र जाने के लिए बड़े पैमाने पर रुचि दिखाई।

           देश के विभिन्न राज्यों के पर्यटकों, पर्यटन (टूर) आयोजकों और पर्यटन उद्यमियों को पर्यटन स्थलों की जानकारी देने, पर्यटन से संबंधित लागू किये जा रहे विविध उपक्रम,  पारंपरिक कला, संस्कृतियों, शिल्प, भोजन बनाने का कौशल आदि से संबंधित विभिन्न गतिविधियों की पहचान करके देने के लिए और उनके साथ व्यापार संबंध बढ़ाने के लिए विभिन्न राज्यों के पर्यटक को महाराष्ट्र के प्रति आकर्षित करना ही इस रोड शो का लक्ष्य था, पर्यटन निदेशक श्री दिलीप गावडे ने कहा।

इस रोड शो में पर्यटन निदेशक दिलीप गावड़े, औरंगाबाद विभागीय पर्यटन उपनिदेशक, श्रीमंत हरकर आदि ने हिस्सा लिया था।

००००

A big roadshow in Kolkata for tourism development in Maharashtra

Mumbai, Date4:In order to promote tourism in Maharashtra, a big roadshow was recently organized in Kolkata by the State Tourism Directorate. Tourists can be attracted to Maharashtra from here through this road show. A presentation of the rich tourism heritage of Maharashtra was made here.

A presentation on the Maharashtra’s tourism was made in the event. In addition to this, a B to B discussion and question-answer as well as Maharashtra’s cultural program were also organised. Tourists have also tasted the food of Maharashtra.

After having a discussion with80entrepreneurs-pertaining to tourists, tour organizers and famous travel agents, they were informed about the tourism opportunities in Maharashtra.

Director of Tourism, Dilip Gavade said that Maharashtra has a huge heritage of ancient, cultural and natural tourism. In the direction of development of tourism in the state, several new initiatives are taken by the Directorate of Tourism at the national and international level. The state has many tourist spots like beaches, palaces, caves. Information about all these tourist places should be made available to tourists from the country as well as abroad so that they can visit and enjoy these places. Information pertaining to this should be given through various means. It was a part of this exercise to organize road shows in the country. Roadshow in Kolkata has received good response. Tourists have showed great interest in visiting Maharashtra.

Giving information pertaining to tourist spots and destinations in Maharashtra, various activities related to tourism, traditional arts, cultures, crafts, food cooking skills etc to the people of the various states of the country was the principal goal of this road show, stated by Director of Tourism, Dilip Gavade.

This road show was attended by Tourism Director Dilip Gavade, Aurangabad Divisional Tourism Deputy Director, Srimant Harkar and others.

0000

स्वीडनचे राजे आणि महाराणी यांची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट

मुंबई, दि. 4 : स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ (सोळावे)आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, अशोक हिंदुजा, संजीव बजाज, स्वीडनमधील भारताच्या राजदूत श्रीमती मोनिका मोहते उपस्थित होते.          

यावेळी उभय देशातील सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली. मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव श्री. मेहता यांनी राज्यातील औद्योगिक परिस्थितीसंदर्भात माहिती दिली. उपस्थित उद्योगपतींसोबतही यावेळी अनौपचारिक चर्चा झाली.

स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ यांनी साधला मुंबईतील विद्यार्थिनींशी संवाद

मुंबई, दि. 4 : मुलींनी शालेय स्तरावरच तंत्रज्ञानाचे आणि विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन स्वत:ची प्रगती साधावी. असे सांगत स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा या उद्देशाने स्वीडीश शासन आणि भारत सरकारच्या नीती आयोगामध्ये करार करण्यात आला आहे. केंद्र सरकारद्वारे भारतात अटल इनोव्हेशन अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत सुरू असलेल्या अटल टिंकरिंग लॅबने एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट) येथे दोन दिवसीय टेक्ला महोत्सवांतर्गत विद्यार्थिनींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि राणी सिल्विया यांनी भेट दिली.

यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी नीती आयोगाच्या कार्यक्रम संचालिका इशिता अग्रवाल, आरोग्य आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्य सचिव डॉ. माया फेजस्टेड, स्वीडन रॉयल इन्स्टिट्यूटच्या मेडलिन सिओस्टेड, स्वीडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष सिस्लोनिथ कार्लसॉन, स्वीडन दूतावासाचे सचिव व्हिगो बारमॅन, आदींसह स्वीडनच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अटल इनोव्हेशन अभियानांतर्गत देशात ७०० जिल्ह्यातील शाळांत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित या विषयावर आधारित अटल टिंकरिंग लॅब हा कार्यक्रम राबविला जातो. अटल टिंकरिंग लॅब राज्यात ४०० शाळांत कार्यरत असून, मुंबईत २७ शाळांत कार्यरत आहे. मुंबईच्या अंजुमन इस्लाम हायस्कूल, सैफ तय्यबजी मुलींची शाळा, कुलाबा महानगरपालिका शाळा, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या शाळांमधील १५ विद्यार्थिनींचा या कार्यशाळेत सहभाग होता. यामध्ये त्यांना विद्युत उपकरणे त्यांची माहिती, विद्युत पुरवठा, वीज निर्मिती, पीसीबी वापरणे, आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.

दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली

स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि राणी सिल्विया यांनी हॉटेल ताज येथे भेट दिली.  २६ नोव्हेंबर २००८रोजी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या कर्मचारी आणि पर्यटकांना त्यांनी आदरांजली अर्पण केली.

०००

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रंगला नौदलाचा ‘बिटींग रिट्रीट’ सोहळा

मुंबई, दि. 4 : तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेले गेट वे ऑफ इंडिया’, नौदलाच्या चेतक आणि सी-किंग हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, ‘मार्कोसमरीन कमांडोंची प्रात्यक्षिके, कान तृप्त करणारे भारतीय तसेच रशियन नौदलाचे बॅण्डवादन आणि सुंदर नृत्याविष्कार, नौदल जवानांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे संचलन आणि सी कॅडेट कॉर्प्सचे नृत्य ही आजच्या बिटींग रिट्रीटकार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.

भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडतर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे नौदल दिनानिमित्त आयोजित‘बिटींग रिट्रीटआणि टॅटू सेरेमनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पश्चिम कमांडचे प्रमुख व्हॉईस ॲडमिरल अजित कुमार यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

1971 च्या भारत- पाक युद्धादरम्यान 4 डिसेंबर रोजी कराची बंदरावर हल्ल्याचे‘ऑपरेशन ट्रायडन्टभारतीय नौदलाने राबविले होते. या हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. ऑपरेशन ट्रायडन्टदरम्यान रशियन नौदलाचे सहाय्य मिळाले होते. रशियन नौदलाच्या बँड पथकाने यावर्षीच्या बिटींग रिट्रीट सोहळ्यात सहभाग घेतल्याने आजचा सोहळा अधिकच आकर्षक ठरला.

नौदलाच्या‘चेतकआणि सी-किंगहेलिकॉप्टरने विविध रचनांमध्ये हवाई कसरती केल्या. गेट वे ऑफ इंडियाच्या मागून सी-किंगहेलिकॉप्टर झेपावले आणि त्यातून दोरीवरुन लटकत जवानांनी तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी केलेली पुष्पवृष्टी तसेच लाल- गुलाबी रंगांची उधळण डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.

हेलिकॉप्टरवरुन दोरीच्या सहाय्याने लटकत जवानांनी दाखविलेल्या कसरती, ‘मार्कोसकमांडोंनी दाखविलेली दहशतवादी हल्ला परतविण्याची तसेच बचावकार्याची प्रात्यक्षिके ही बिटींग रिट्रीट कार्यक्रमाची  वैशिष्ट्ये ठरली. नौदलाच्या बॅण्डपथकाने लयबद्ध आणि शिस्तबद्धरित्या संचलन करत केलेले वादन उपस्थितांची क्षणाक्षणाला दाद मिळवत होते. नौदल बँडचे सादरीकरण होत असतानाच ताजमहल पॅलेस हॉटेलच्या टेरेसवर ट्युबुलर बेलचे वादन झाल्यावर सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले.

मॅजिकल लाईट टॅटू ड्रमर्स पथकाने वादन करताना अंधाराच्या पार्श्वभूमीवर वाद्यांना लावलेल्या रंगीत दिव्यांची हालचाल दर्शकांना मंत्रमुग्ध करत होती. यावेळी जवानांनी बंदुकांसह कवायती केल्या.‘सी-कॅडेट कॉर्प्सचा सुंदर नृत्याविष्कार यावेळी पहायला मिळाला.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 4.12.2019

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई

मुंबई,दि.3: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात,यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला. यंदा दरवर्षीपेक्षा जास्त अनुयायी येण्याची शक्यता गृहित धरून त्याप्रमाणे नियोजन करावे. तसेच अनुयायांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

          

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत श्री. देसाई यांनी राज्य शासन,पोलीस,बृहन्मुंबई महानगरपालिका,बेस्ट यांनी केलेल्या तयारीसंदर्भात माहिती घेतली.

          

महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी  व शिवाजी पार्क येथे अनुयायांसाठी विविध सोयी देण्यात येतात. चैत्यभूमी,अशोक स्तंभ,भीमज्योत यासह संपूर्ण परिसराची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.  तसेच दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सहा डिसेंबर रोजी शासकीय मानवंदना देण्यात येणार असून, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

          

राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क येथे निवासासाठी मंडप टाकण्यात येत आहे. तसेच येथे एलईडी स्क्रिन,भोजन मंडपाची व्यवस्था,पिण्याच्या पाण्यासाठी16टँकर व380नळांची व्यवस्था, 18मोबाईल शौचालय व120फायबर शौचालये, 260स्नानगृह,परिसरात विद्युत दिव्यांची सोय,समुद्र किनाऱ्यावर48जीव रक्षकांची नेमणूक,मंडपामध्ये300मोबाईल चार्जिंग पॉइंट आदी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात3वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार असून11रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. या ठिकाणी आरोग्य तपासणी व औषधाचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

पोलीस दलाच्या वतीने परिसरात योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच100सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून, शिवाजी पार्क व चैत्यभूमी येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्री. देसाई म्हणाले,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाने योग्य तयारी केली आहे. अनुयायांना कोणतीही कमतरता भासू नये,यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष सूचना दिल्या आहेत. महापालिकेनेही चांगले नियोजन केले आहे. राज्य शासनाच्या वतीने शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेची संख्या पन्नास हजारावरून दीड लाख करावी. जेणेकरून सर्व अनुयायांना ती सुलभपणे मिळू शकेल. तसेच इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे चित्र परिसरात लावण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

विविध संस्था,संघटनांतर्फे शिवाजी पार्कवर देण्यात येणाऱ्या अन्नदानाचा दर्जा चांगला असावा व ते सुरक्षित असेल,यासाठी अन्न व औषध प्रशासनाने काळजी घ्यावी,असेही मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.

आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेने इंदू मिल येथील स्मारकाचे छायाचित्र चैत्यभूमी परिसरात लावावे तसेच पावसाची शक्यता गृहित धरून आपत्कालीन व्यवस्था योग्य रितीने करावी,अशी सूचना केली.

यावेळी आमदार भाई गिरकर,माजी आमदार सचिन अहिर,अर्जुन डांगळे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे,उपाध्यक्ष महेंद्र साळवे,सिद्धार्थ कासारे,रवी गरूड तसेच मनोज संसारे यांच्यासह विविध विभागाचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/3.12.2019

महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर चैत्यभूमी पर आने वाले अनुयायियों के लिए सभी सुविधा– मंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 3 : महामानव भारत रत्न डॉ बाबासाहब अम्बेडकर को महापरिनिर्वाण दिवस पर अभिवादन करने के लिए दादर स्थित चैत्यभूमी पर आने वाले अनुयायियों को उपलब्ध कराई जाने वाली सुविधाओं के लिए राज्य सरकार और मुंबई महानगरपालिका द्वारा की गई व्यवस्था की समीक्षा मंत्री सुभाष देसाई ने की है। इस साल हर साल की तुलना में अधिक अनुयायी आने वाले हैं, और उसी के अनुसार योजना बनाएं। इसी तरह से अनुयायियों को प्रदान किए जाने वाले भोजन की गुणवत्ता को बनाए रखने के लिए उचित कार्रवाई करने का निर्देश श्री देसाई ने दिया है।

सह्याद्री अतिथि गृह में आयोजित की गई इस बैठक में श्री देसाई ने राज्य सरकार, पुलिस, मुंबई महानगर पालिका, बेस्ट द्वारा की गई तैयारियों के बारे में जानकारी ली।

मुंबई महानगर पालिका द्वारा चैत्यभूमि और शिवाजी पार्क पर अनुयायियों के लिए विभिन्न सुविधाएं मुहैया कराई जाती है। चैत्यभूमि, अशोक स्तंभ, भीमज्योत सहित पूरे क्षेत्र का मरम्मत और रंगरोगन किया गया है। एक नियंत्रण कक्ष स्थापित किया गया है। साथ ही दुर्लभ तस्वीरों का प्रदर्शन भी लगाया जाएगा। 6 दिसंबर को सरकार द्वारा श्रद्धाजंलि अर्पित किया जाएगा और हेलीकॉप्टर द्वारा पुष्प वर्षा किया जाएंगा।

राज्य भर से आने-वाले अनुयायियों के लिए शिवाजी पार्क में एक मंडप स्थापित किया जा रहा है। एलईडी स्क्रीन, भोजन मंडप की व्यवस्था, पीने के पानी के लिए 16 टैंकर और 380 नलों की व्यवस्था, 18 मोबाइल शौचालय और 120 फाइबर शौचालय, 260 स्नान गृह, परिसर में बिजली के लैंप की व्यवस्था, समुद्री किनारों पर 48 जीवन रक्षकों को तैनात किया गया हैं, मंडप में 300 मोबाइल चार्जिंग पॉइंट मुहैया किया गया है। शिवाजी पार्क और चैत्यभूमि क्षेत्र में तीन चिकित्सा कक्ष स्थापित किए जाएंगे और 11 एम्बुलेंस तैनात किया जाएगा। उन्होंने कहा कि इस स्थलों पर स्वास्थ्य जांच और दवाएं उपलब्ध कराई जाएंगी, यह जानकारी भी दी गई।

पुलिस बल द्वारा इस परिसर में उचित बंदोबस्त की व्यवस्था की गई है। इसी तरह से 100 सीसीटीवी से निगरानी के साथ-साथ शिवाजी पार्क और चैत्यभूमि पर नियंत्रण कक्ष स्थापित किया गया है। सम्बंधित अधिकारियों ने यह जानकारी दी है।

श्री देसाई ने कहा, महामहिम डॉ बाबासाहब अम्बेडकर का अभिवादन करने के लिए आने वाले अनुयायियों के लिए प्रशासन ने अच्छी तैयारी की है। अनुयायियों को किसी भी तरह की कमी न महसूस होने पाए, इस बाबत मुख्यमंत्री ने विशेष निर्देश दिए हैं। महानगर पालिका ने भी अच्छी योजना बनाई है। राज्य सरकार की ओर से शिवाजी पार्क पर डॉ बाबासाहब अम्बेडकर के जीवन पर एक फिल्म दिखाई जाएगी। मुंबई महानगर पालिका द्वारा जारी की गई सूचना पुस्तकों की संख्या पचास हजार से बढ़ाकर डेढ़ लाख की जानी चाहिए। ताकि सभी अनुयायी इसे आसानी से प्राप्त कर सकें। इसी तरह से इंदु मिल में बनाए जाने वाले बाबासाहेब अम्बेडकर का स्मारक का चित्र परिसर में लगाया जाए। उन्होंने इस तरह का सुझाव दिया है।

विभिन्न संस्था और संगठनों द्वारा शिवाजी पार्क में दिए जाने वाले भोजन की गुणवत्ता अच्छी रहे और सुरक्षित रहे। श्री देसाई ने खाद्य और औषधि प्रशासन को यह भी ध्यान रखना चाहिए।

विधायक श्री आदित्य ठाकरे ने मुंबई महानगर पालिका को सुझाव दिया कि महानगर पालिका इंदु मिल के स्मारक की फोटो को चैत्यभूमि में लगाए, साथ ही बारिश की संभावना को भी ध्यान में रखते हुए आपातकालीन व्यवस्था को उचित तरीके से ठीक करना चाहिए।

इस अवसर पर विधायक आदित्य ठाकरे, विधायक भाई गिरकर, पूर्व विधायक सचिन अहीर, अर्जुन डांगले, डॉ बाबासाहब अंबेडकर महापरिनिर्वाण दिवस समन्वय समिति के महासचिव नागसेन कांबले, उपाध्यक्ष महेंद्र सालवे, सिद्धार्थ कासारे, रवि गरुड और मनोज संसारे, विभिन्न विभागों के सचिव, वरिष्ठ पुलिस अधिकारी और मुंबई महानगर पालिका के अधिकारी उपस्थित थे।

0000

उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला चार राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि.3 :अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील3दिव्यांग व्यक्ती आणि  दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका संस्थेला आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले.

नवी मुंबई येथील वनिता अय्यर यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला कर्मचाऱ्याचा पुरस्कार, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील डॉ. भावेश भाटिया यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्कार आणि मुंबई येथील मानसी जोशी यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी मुंबईच्या मालाड(पश्चिम) येथील रायजींग फ्लेम संस्थेला सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने आज जागतिक अपंग दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात देशातील दिव्यांग व्यक्ती आणि  दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार- 2019’ प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विविध14श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना एकूण65पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, कृष्णपाल गुर्जर, रतनलाल कटारिया आणि मंत्रालयाच्या सचिव शकुंतला डोले गॅमलीन यावेळी उपस्थित होत्या.

राज्यातीलतीन दिव्यांगांचा सन्मान 

             

नवी मुंबईच्या घणसोली परिसरातील वनिता अय्यर यांना जन्मत: बहिरत्व आहे.  या दिव्यंगत्वावर मात करत त्यांनी सामान्य मुलांच्या शाळेत व महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले, या काळात त्यांनी शिष्यवृत्तीही मिळविली. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन विषयात अंभियांत्रिकी पदवी मिळवून वनिता अय्यर या सध्या ‘न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनी’ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.वनिता अय्यर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला कर्मचारी’पुरस्काराने गौरविण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील 49 वर्षीय डॉ. भावेश भाटिया हे जन्मांध आहेत. दिव्यांगत्वावर मात करत भाड्याच्या हातगाडीवर मेणबत्त्या विकून त्यांनी उद्योजकतेकडे वाटचाल केली. डॉ. भाटिया यांनी ‘सनराईज कँडल्स’ ही मेणबत्ती उत्पादक कंपनी उभारली.  या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ.भाटिया आता65देशांमध्ये  आपले  उत्पादन  निर्यात करीत आहेत.डॉ.भाटिया यांनी पीएचडी मिळवली असून ते भारतातील  पहिले पीएचडीधारक अंध व्यक्ती  ठरले आहेत.  डॉ.भाटिया यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुंबईच्या बॅलार्ड एस्टेट परिसरातील मानसी जोशी यांचा वयाच्या22व्या वर्षी एका अपघातात एक पाय निकामी झाला.बॅडमिंटन खेळाडू असलेल्या मानसी जोशी यांनी दिव्यांगत्वावर मात करत क्रीडा क्षेत्रातील वाटचाल सुरुच ठेवली.यानंतर,त्यांनी 19आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेवून25पदक मिळवीली.तर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवून2पदके अर्जित केली.मानसी जोशी यांनी वर्ष2015आणि2017च्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेतही सहभाग घेतला.मानसी जोशी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडू’पुरस्काराने गौरविण्यात आले.

 रायजिंगफ्लेमठरलेसर्वोत्तम दिव्यांगपूरक संकेतस्थळ

दिव्यांगपूरक  संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून तीन संस्थांना आज सन्मानित करण्यात आले.खाजगी  क्षेत्रातून मुंबईच्या मालाड(पश्चिम)येथील रायजिंग फ्लेम या संस्थेच्या संकेतस्थळाला सर्वोत्कृष्ट दिव्यांग सुगम संकेतस्थळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संस्थेच्या संस्थापक संचालक निधी गोयल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.विविध दिव्यांग व्यक्तींना सोयीचे ठरेल अशा प्रकारे हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.संकेतस्थळाच्या वरच्या  उजव्या बाजूस देण्यात आालेला टॅब हे या संकेतस्थळाचे खास वैशिष्ट्य  आहे.

00000

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.261/  दिनांक03.12.2019 

महाराष्ट्रातील सहा शैक्षणिक संस्थांना ‘स्वच्छता रँकिंग पुरस्कार’

महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये पहिले तीनही पुरस्कार राज्यातील महाविद्यालयांना

नवी दिल्ली,3 :महाराष्ट्रातील सहा शैक्षणिक संस्थांना आज तिसऱ्या‘स्वच्छता रँकिंग’पुरस्काराने गौरविण्यात आले.महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये पहिले तीनही पुरस्कार राज्यातील महाविद्यालयांनी पटकाविले आहेत. 

केंद्रीय मनुष्यबळ  विकास मंत्रालयाच्या वतीने येथील  एआयसीटीई  सभागृहात  आयोजित सभारंभात आज मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव आर.सुब्रमन्यम यांच्या हस्ते‘स्वच्छता रँकिंग पुरस्कार’  प्रदान करण्यात आले.

‘स्वच्छ भारत’कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने देशभर राबविण्यात आलेल्या‘स्वच्छता रँकिंग’पुरस्कारामध्ये देशातील27विद्यापीठ आणि20महाविद्यालयांना एकूण8श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

      

राज्यातील तीन महाविद्यालयांनी राखले अग्रक्रम

देशातील महाविद्यालयांना चार श्रेणींमध्ये‘स्वच्छता रँकिंग’पुरस्कार प्रदान करण्यात आले.भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून मान्यताप्राप्त अनिवासी(विनावसतिगृह)महाविद्यालयांच्या श्रेणीत पहिले तीनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले.नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.कोल्हापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला दुसऱ्या क्रमांकाच्या तर पुण्यातील निगडी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या श्रेणीत एकूण  5महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

पहिल्या10मध्ये राज्यातील2विद्यापीठ

विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताप्राप्त निवासी(वसतिगृह)विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण10विद्यापीठांना स्वच्छता रँकिंग पुरस्काराने गौरविण्यात आाले.महाराष्ट्रातील2विद्यापीठांना या श्रेणीत सन्मानित करण्यात आले.या श्रेणीत पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला तिसऱ्या क्रमांकाचा तर याच शहरातील डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाला9व्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताप्राप्त अनिवासी(विनावसतिगृह)विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण5विद्यापीठांना स्वच्छता रँकिंग पुरस्काराने गौरविण्यात आले.यात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला चौथ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वच्छता रँकिंग  पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून देशभरातील6हजार900शैक्षणिक संस्था यात सहभागी झाल्या होत्या.   

   

 000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.262/  दिनांक03.12.2019

विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी घेतला पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा

मुंबई, दि. 3: राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास थांबवणार नाही असे स्पष्ट करतानाच, उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकास कामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

कुठलाही विकास प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केलं जातं मात्र कामाची  प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणाऱ्या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढावून घेतोय का याचाही विचार केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनातदेखील समृद्धी आली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

अजय जाधव..३.१२.१९

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...