शनिवार, मे 17, 2025
Home Blog Page 1636

सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी शासन कटिबद्ध – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई, दि. 20 : सर्वसामान्य गोरगरीब माणसांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विकासकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केले. सी.आय.आय. रिअल इस्टेट परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मंत्री श्री.आव्हाड म्हणाले, गृहनिर्माण क्षेत्रात विकासकांच्या काही समस्या असतील तर त्यांनी शासनाकडे मांडाव्यात. त्या समस्यांचे त्वरित निराकरण केले जाईल आणि सरकारतर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल. निर्धारित वेळेत आता विकासकांना यापुढे सर्व परवानग्या देण्यात येतील. ‘म्हाडामध्ये जास्त दिवस फाईल प्रलंबित राहू नये अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

मंत्री श्री.आव्हाड म्हणाले, मुंबईतील कामाठीपुराचा नियोजनबद्ध पुनर्विकास करण्याचे शासनाने ठरवले आहे. कामाठीपुरा हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेले असून त्यालगतच ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, जे.जे. रुग्णालय, ग्रँट रोड स्टेशन यासारखे महत्त्वाचे भाग आहेत. कामाठीपुराचा विकास करून तेथे मुंबईतील सर्वात मोठे व्यापारी केंद्र उभे करण्यात येईल. यापुढे ‘म्हाडाचे जे मोठमोठे प्रकल्प आराखडे राहतील, त्यामध्ये‘म्हाडाची संयुक्त भागीदारी असेल, असेही श्री.आव्हाड म्हणाले.

००००

देवेंद्र पाटील/विसंअ/20.2.2020

कौशल्य विद्यापीठांच्या स्थापनेच्या अनुषंगाने समिती गठित – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. 20 : राज्यात अर्थसहाय्यित, स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त या समितीच्या अध्यक्षपदी असून समितीवर इतर 6 सदस्य आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील युवक, युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरुपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता पोषक वातावरणनिर्मिती करण्यासाठी, त्याचबरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करुन त्यांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात अर्थसहाय्यित तसेच स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीचे सदस्य म्हणून उच्च तंत्र शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, विधी व न्याय विभागाचे प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु विजय खोले, मुंबई येथील एच.आर.कॉलेजच्या माजी प्राचार्य डॉ. श्रीमती इंदु सहानी, वेलींगकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्चचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहसचिव डॉ. श्रीमती सुवर्णा खरात या सदस्य सचिव म्हणून समितीचे कामकाज पाहणार आहेत.

या विद्यापीठांच्या अधिनियमाचे प्रारुप तयार करणे, संस्थांमार्फत सुरु असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांना प्रमाणपत्र, पदविका, पदवी याबाबतची मान्यता देण्याबाबत अधिनियमामध्ये तरतूद करणे, अधिनियमांतर्गत स्थापन करावयाच्या अभिमत विद्यापीठांकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्तावांची शिफारस करण्याबाबत तरतूद करणे आदीबाबत समितीची कार्यकक्षा आहे. यासंदर्भातील अहवाल समितीने 15 दिवसात शासनास सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

००००

इर्शाद बागवान/विसंअ/दि.20.2.2020

विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शैक्षणिक संवादाचे आयोजन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 20 : विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विभागानुसार शैक्षणिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तसेच विद्यार्थांच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात संबंधित विभांगांची एकत्र बैठक घेऊन तांत्रिक अडचणी सोडवण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालये यांच्यासाठी सुलभ होऊन त्या माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. तसेच यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आयोजित आढावा बैठकीत श्री.सामंत यांनी दिले.

महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ अंतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET), प्रवेश नियामक प्राधिकरण (ARA) आणि शुल्क नियामक प्राधिकरणाची (FRA) रचना करण्यात आली. या कायद्यांतर्गत ज्या सामाईक परीक्षा झाल्या त्यासाठी विद्यार्थ्यांकडून चुकीचा अर्ज, दोनवेळा अर्ज किंवा तांत्रिक अडचणींमुळे दोनवेळा शुल्क आकारणी केली गेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ते शुल्क परत करण्याचे निर्देशही यावेळी श्री.सामंत यांनी दिले.

श्री.सामंत म्हणाले, विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेऊन शैक्षणिक धोरणं निश्चित केली पाहिजेत, विशेषतः विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करण्यासाठी संबंधित परीक्षा लक्षात घेऊन मार्गदर्शक आणि तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात येईल. तसेच सामाईक परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन अर्जप्रणाली सुलभ आणि सोपी बनवावी. शैक्षणिक वर्षाची सुरूवात होत असताना विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाची व्यवस्था तयार करून विशिष्ट वेळेच्या मर्यादेत विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश श्री.सामंत यांनी दिले.

यावेळी प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी. डांगे, आयुक्त संदीप कदम, संचालक कलाशिक्षण, राजीव मिश्रा, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालक डॉ.तात्याराव लहाने, तंत्रशिक्षण सह संचालक डॉ.सुभाष महाजन तसेच विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/20.2.2020

सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी धरला ठेका

आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आवाहन

नंदुरबार, दि.20 : भगदरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यात सहभागी होत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ढोलच्या तालावर ठेका धरला. पालकमंत्री के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, खासदार हिना गावित, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि माजी आमदार नरेंद्र पाडवी हे देखील नृत्यात सहभागी झाले.

या कार्यक्रमात होळी नृत्य, लग्नातील पारंपरिक आदिवासी नृत्य, ढोल नृत्य, पारंपरिक आदिवासी नृत्याद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. कार्यक्रमात सामाजिक संदेशही देण्यात आले. राज्यपाल महोदयांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. ते म्हणाले, आपल्या संस्कृतीचे संवर्धन केल्यास देश महान होईल. दुर्गम भागातील घरे लहान असू देत, माणसे गरीब असू देत, यांचे हृदय शुद्ध आणि पवित्र आहे. आदिवासी मुलांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे. त्यामुळे राज्यात आदिवासी बांधवांसाठी 4 क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी एक नंदूरबार येथे उभारण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि मातृभाषेवर प्रभुत्व संपादन करावे. तरच जीवनात यशस्वी होता येईल. आपली भाषा, प्रदेश आणि संस्काराचा अभिमान बाळगावा. जीवनात चांगल्या संस्काराच्या आधारे यश संपादन करावे, अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. श्री.कोश्यारी यांनी चांगले कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांना 25 हजाराचे पारितोषिक जाहीर केले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊसाठी 11 हजार रुपये देणार असल्याचे ते म्हणाले. शाळेच्या आवश्यक गरजांसाठी प्रस्ताव आल्यास सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्री म्हणाले, राज्यपाल महोदय आदिवासी संस्कृतीशी समरस झाले, त्यांनी संस्कृती जपण्याचा सल्ला दिला ही महत्त्वाची बाब आहे. दत्तक गावाबद्दल त्यांना असलेली आस्था पाहता भगदरीचा विकास अधिक वेगाने होईल. या गावात अनेक विकासकामे चांगल्याप्रकारे झाली आहेत. अशी कामे इतरत्र होणे गरजेचे आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्यपाल महोदयांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्वाचे ठरेल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मुलांना चांगले शिक्षण देऊन प्रशासकीय सेवेत आदिवासी युवकांनी यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शाळांमधून गुणवत्ता शोध सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

यावेळी खासदार गावित, जि. प.अध्यक्ष वळवी यांनी आपले विचार व्यक्त केले. तत्पूर्वी श्री.कोश्यारी यांच्या हस्ते पशु संवर्धन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी पेरू बाग, आंबा बाग आणि पॉली हाऊसच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. आदिवासी बांधवांसोबत खाटेवर बसून त्यांनी बागेतील फळांचा आस्वाद घेतला. गावात वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी केले, तर जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी आभार मानले.

00000

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची पोषण पुनर्वसन केंद्रास भेट

नंदुरबार, दि.20 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ग्रामीण रुग्णालय मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्रास भेट दिली. त्यांच्या समवेत पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, खासदार हिना गावीत, राजभवनचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये उपस्थित होते.

श्री.कोश्यारी यांनी केंद्रातील महिलाशी संवाद साधला आणि बालकांना चॉकलेट भेट दिले. पोषण पुनर्वसन केंद्रात दिल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती त्यांनी घेतली. महिलाशी संवाद साधून औषधे व उपचार व्यवस्थित मिळतात का याबाबत विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देन रुग्णांशी संवाद साधला. परिसरातील नागरिकांशीही त्यांनी यावेळी चर्चा केली.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मोलगी येथील सातपुडा नैसर्गिक भगर प्रक्रिया उद्योगाला श्री.कोश्यारी यांनी भेट दिली. त्यांनी भगर प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी राणी काजल लोक संचलित साधन केंद्र अक्कलकुवाच्या महिलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्यास्तू आणि उत्पादनाची त्यांनी माहिती घेतली तसेच बचतगटाच्या महिलाशी संवाद साधला.

00000

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशला भेट देऊन घेतली दिशा कायद्याची माहिती

मुंबई, दि. 20 : महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून कठोर कायदा आणण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी आणि गृहमंत्री श्रीमती मेखाथोटी सुचरिता आणि तेथील पोलीस महासंचालकांशी चर्चा करून ‘दिशा’ कायद्याची माहिती घेतली.

आंध्र प्रदेशने महिलांवरील अत्याचाराचे खटले जलद गतीने चालवून निकाली काढण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने ‘दिशा’ कायदा केला आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी वेगाने खटला चालविणे, 21 दिवसात निकाल देणे आणि गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना मोठा पायबंद बसण्याची शक्यता आहे. या कायद्याची माहिती घेण्यासाठी आज श्री. देशमुख यांनी अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक अस्वती दोरजे यांच्यासह आंध्र प्रदेशला भेट दिली.

या भेटीविषयी माहिती देताना गृहमंत्री म्हणाले, दिशा कायद्याविषयी सांगोपांग माहिती घेऊन अहवाल देण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती दोरजे यांच्या नेतृत्वाखाली 5 अधिकाऱ्यांचे पथक केले आहे. ते पुढील आठवड्याभरात अहवाल देतील. त्यावर चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येईल. तसेच अधिवेशनात याबाबतचा कायदा आणण्याचा प्रयत्न करू.

या भेटीदरम्यान त्यांनी विजयवाडा येथे मुख्यमंत्री श्री. रेड्डी यांच्यासह आंध्र प्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री तनेती वनिता, आंध्र प्रदेशच्या मुख्य सचिव नीलम साहनी, पोलीस महासंचालक गौतम सवांग, अपर पोलीस महासंचालक ए. रविशंकर यांच्याशी चर्चा करून कायद्याविषयी माहिती घेतली.

0000

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांकडून जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. 31 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी 2020 हे वर्ष सर्वांना सुख, समाधान आणि भरभराटीचे जावो. आपले राज्य तसेच आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीच्या वाटेवर निरंतर अग्रेसर राहो. 2020 या नवीन वर्षासाठी मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.   0000

Governor wishes people Happy New Year 2020

Mumbai Dated 31:The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has extended his greetings to all on the occasion of the New Year 2020.

In his greetings, the Governor has said, “Wishing all a Happy New Year 2020. May the New Year bring happiness, peace and prosperity to the people. May our State and our Nation continue to march on the path of progress and development.”

००००

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचे अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

मुंबई, दि. 31 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनासन २०१८-१९ या सालासाठी जास्तीत जास्तशेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी विम्याचा लाभ द्यावा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

विधानभवनात आज अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत समस्यांचे निराकरण करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनीही यासंदर्भात अधिक माहिती दिली.

श्री. पटोले म्हणाले, पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती निर्माण करावयाची गरज असून, संबंधित विभागाने त्यासंदर्भात कारवाई करावी. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना रब्बी हंगाम २०१८ अंबिया व मृगबहाराची नुकसान भरपाई जास्तीत जास्त शेतक-यांना देण्यात यावी. तसेच जे शेतकरी पाहणी न झाल्याने आणिकमी तापमान या निकषावर नुकसान भरपाईपासून वंचित राहिले अशा शेतकऱ्यांनाही न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने पीक विम्याची भरपाई द्यावी, असे निर्देश श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी भविष्यात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीस विस्तार व प्रशिक्षण मंडळाचे संचालक एन.टी.शिदोळे, मुख्य सांख्यिकी उदय देशमुख, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अशोक मानकर, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/31.12.19

नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. 31 : नवीन वर्षाचे स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करुया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, एकविसाव्या शतकातील पहिली 19 वर्षे कशी गेली, कोणत्या गोष्टी साध्य झाल्या अन्‌ कोणत्या राहिल्या हे बाजूला ठेवूया आणि महाराष्ट्राला आनंदी, सुखी-समाधानी बनविण्यासाठी प्रयत्न करूयात. येणारे वर्ष महाराष्ट्रासाठी नवीन आशा, आकांक्षा आणि नवी उमेद घेऊन आले असून सर्वांनी मिळून आपल्या राज्याला आणखी पुढे नेऊया. राज्याला प्रगतीपथावर नेताना गोरगरीब आणि दुर्बल लोकांना हाताला धरून पुढे नेऊया. पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच शेतकरी, कामगार, रोजीरोटी कमावणारा मजूर आनंदी होण्यासाठी प्रयत्न करुया. महिला, मुलं सुरक्षित आणि समाधानी असण्याबरोबरच प्रत्येकाच्या हाताला रोजगार, जगातले सर्वोत्तम शिक्षण, सर्वांना परवडणारे आणि सहज उपलब्ध होणारे आरोग्य देण्यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करूया. 00000

नव वर्ष के अवसर पर सीएम ने

राज्य की जनता को दीं शुभकामनाएं

मुंबई, दिनांक 31 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने राज्य की जनता को नए साल की शुभकामनाएं देते हुए कहा है कि हम सभी लोग नए साल का स्वागत आनंद और उत्साह के साथ करें।

अपने संदेश में मुख्यमंत्री कहते हैं कि इक्कीसवीं सदी का पहला 19 साल कैसे गुजर गया है, इसमें क्या हासिल हुआ है और क्या छूट गया है। उसे पीछे छोड़कर हमें महाराष्ट्र को खुशहाल, सुखी और समाधानी बनाने का प्रयास करना चाहिए। आने वाला वर्ष महाराष्ट्र के लिए नई आशाएं, आकांक्षाएं और नई उम्मीद लेकर आया है और हम सभी  को मिलकर अपने राज्य को और आगे लेकर जाना हैं। राज्य को प्रगति के पथ पर ले जाते समय हमें गरीब और कमजोर लोगों के हाथों को पकड़ कर आगे लेकर जाएं।  बुनियादी ढाँचे के विकास के साथ-साथ, किसानों, श्रमिकों, रोजी-रोटी कमाकर जीवन निर्वाह करने वाले मजदूरों को खुशी प्रदान करने का प्रयास करें। महिलाओं और बच्चों को सुरक्षित और संतुष्ट रखने के साथ-साथ सभी को रोज़गार प्रदान करने के लिए, दुनिया में सबसे अच्छी शिक्षा, सभी को सस्ता और सहजता से उपलब्ध होने वाली स्वास्थ्य व्यवस्था प्रदान करने के लिए अच्छी व्यवस्था करें।

००००

On the occasion of New Year,

CM wishes the people of the state

Mumbai, Date 31: Chief Minister Uddhav Thackeray, while wishing the people of the state a happy new year, has said that we all should welcome the new year with joy and enthusiasm.

In his message, the Chief Minister said that how the first 19 years of the twenty-first century have passed, what has been achieved and what is left in it. Leave it behind. We should try to make Maharashtra happy and prosperous. The coming year has brought new hopes and aspirations for Maharashtra and we all have to take our state further. While taking the state on the path of progress, we should hold the hands of poor and weak people. Along with the development of infrastructure, try to provide happiness to the farmers, laborers and the persons, who earn their livelihood. Evolve a good arrangements to keep women and children safe and satisfied. Besides this, provide employment to all, avail the best education in the world to all and affordable and readily available healthcare to all.

0000

मंत्री ॲड. अनिल दत्तात्रय परब यांचा परिचय

  • नाव                        : अॅड. अनिल दत्तात्रय परब
  • जन्म                       : 31 डिसेंबर 1964.
  • जन्मठिकाण             : मुंबई,
  • शिक्षण                    :   बी. कॉम. एलएल.बी.
  • ज्ञात भाषा           : मराठी, हिंदी व इंग्रजी.
  • वैवाहिक माहिती      : विवाहित, पत्नी श्रीमती सुनिता.
  • अपत्ये                    : एकूण 2 (दोन मुली).
  • व्यवसाय                 : उद्योग.
  • पक्ष                          : शिवसेना.
  • मतदारसंघ              : महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा निर्वाचित.
  • इतर माहिती              : संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्य;गरीब, गरजु विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप;गरीब रुग्णांना सर्वतोपरी मदत, दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव कार्यक्रमांचे आयोजन, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीरांचे आयोजन; सामान्य माणसांना कायदेविषयक मोफत सल्ला; विविध क्रीडा स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; बांद्रा येथील शासकीय वसतीगृहाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न; स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन;2001 पासून शिवसेना विभाग प्रमुख, पक्षाच्या कायदेविषयक कामाची जबाबदारी, पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग; 2004-2010, 2012-2018 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद ; जुलै 2018 मध्ये विधानपरिषदेवर फेरनिवड.

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम...

0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर विद्यापीठास भेट देऊन स्मारकाचा घेतला आढावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ५० लाखांचा निधी जाहीर सोलापूर, दि. 16- पुण्यश्लोक...

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न ठाणे,दि.16(जिमाका):- आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे. जनतेच्या हिताच्या कामांसाठी...

‘भारत माता की जय’च्या गजरात दुमदुमली कामठी नगरी – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर कामठीत तिरंगा...

0
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग; तिरंगा यात्रेत हजारो लोकांची गर्दी नागपूर  दि. 16 : पाकिस्तान विरोधातील 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशानंतर भारतीय लष्कराचे आभार आणि त्यांच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे...

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई करणार –  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या नाल्यांवरील अतिक्रमणांबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय नागपूर,दि. 16 : शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टीकोनातून शासनाने पीककर्ज...

बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न ठाणे,दि.16(जिमाका):- बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे. त्याच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे, पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी गटशेती,...