रविवार, मे 18, 2025
Home Blog Page 1629

जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची दर महिन्याला लोकांसमवेत बैठक घेण्याच्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

जनता दरबारच्या धर्तीवर होणार आयोजन

मुंबई, दि.29 : तालुक्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी11वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे निर्देश शासन परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबारच्या धर्तीवर अधिकाऱ्यांना या विशेष सूचना केल्या आहेत.

प्रत्येक शुक्रवारी होणाऱ्या या सभेत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सभेबाबत ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी 8 दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे. या सभेअंतर्गत होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना देखील परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. लोकांना या बैठकीस उपस्थित राहून थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडता येणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या बैठकीच्या माहितीचे संकलन करायचे आहे. ही संकलित माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवायची असून, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सर्व माहितीचा तपशील ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे सादर करायचा आहे. त्यामुळे राज्यभरात होणाऱ्या या बैठकांचे नियंत्रण थेट मंत्री आणि सचिव स्तरावरुन केले जाणार आहे.

जनेतच्या प्रश्नांबाबत शासन संवेदनशील असून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तातडीने होण्याच्या दृष्टीने या सूचना देण्यात आल्या आहेत. जनता आणि पंचायत समिती यांच्यामधील संवाद वाढणेही आवश्यक असून या बैठकीच्या माध्यमातून लोकांना ती संधी प्राप्त होऊ शकेल. गटविकास अधिकाऱ्यांनी या बैठका चांगल्या प्रकारे घेऊन लोकांच्या अडचणींना प्रतिसाद द्यावा,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचा मी स्वत: आढावा घेणार असून लोकांनी याचा लाभ घेऊन गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधावा,असे आवाहन मंत्री श्री.मुश्रीफ यांनी केले आहे.

0000

इर्शाद बागवान/विसंअ/दि.२९.०२.२०२०

असा होता आठवडा (दि. २३ ते २९ फेब्रुवारी, २०२०)

गेल्याआठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा(न्यूज डायजेस्ट)

दि. 23 फेब्रुवारी 2020

मंत्रीमंडळ निर्णय

· नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आकृतीबंध सुधारित करून बळकटीकरण करण्याचा निर्णय. संचालनालयाच्या २७४ पदांच्या प्रचलित आकृतीबंधातील १३८ पदे निरसित करून ५५० पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता, आकृतीबंधानुसार १०८ पदे मुख्यालय स्तरावर,११७ पदे विभागीय स्तरावर आणि ३२५ पदे जिल्हास्तरावर असतील. सहआयुक्त व उपायुक्त या वरिष्ठ पदावर संचालनालय व मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती.

·         

  अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्वसंध्या मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद:-महत्वाचे मुद्दे- उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार,गृहमंत्री श्री. अनिल देशमुख,संसदीय कार्य मंत्री  श्री.अनिल परब,राज्यमंत्री श्री. सतेज पाटील,राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे उपस्थित.महात्मा जोतिराव फुले शेतकरी योजनेंतर्गत राज्यातील सुमारे 35 लाख कर्जखात्यांची माहिती  प्राप्त, या योजनेतील पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवार दि. 24 रोजी जाहीर करणार. दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी 28 फेब्रुवारीपासून लावण्यात येणार.शिवभोजन योजना सुरू केल्यानंतर या योजनेतील थाळीची संख्या तसेच केंद्रांची संख्या वाढवणार. गिरणी  कामगारांना घरे देण्यासाठी 1 मार्च रोजी सोडत (लॉटरी)  काढण्यात येणार. सर्व गिरणी कामगारांना घरे देणार, महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा करणार, मराठा आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण ताकदीने करणार.

·   थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस, मातोश्री  निवासस्थानी, मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याद्वारे पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

·         भारतीय मुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल टेकनोव्हा इमेजिंग सिस्टिम्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रणव पारीख यांना राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई मुद्रक संघाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.

·  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर चीनसह अन्य 9 देशांतून आलेल्या48 हजार प्रवाशांची आतापर्यंत तपासणी केल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·         विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार कुमारी आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्द.

·   मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बीडीडी चाळीसंदर्भात बैठक.नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे,  परिवहन मंत्री श्री. अनिल परब उपस्थित. ना. म. जोशी मार्गावरील  बीडीडी चाळीतील, ज्या रहिवाशांनी पुनर्विकासाच्या कामासाठी घरे मोकळी करून दिली अशा 260 रहिवाशांना म्हाडामार्फत 15 मार्च 2020 रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये नवीन घरे देण्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे निर्देश.

·         मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक. नगविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे,पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे उपस्थित. महत्वाचे मुद्दे :- बॉम्बे डाईंग, श्रीनिवास,बॉम्बे डाईंग सप्रिंग या गिरण्यांच्या  कामगारांच्या 3835घरांसाठी  एक  मार्च2020रोजी सोडत काढण्यात येईल, ‘एमएमआरडीए’कडून प्राप्त होणाऱ्या1244  घरांसाठी  1  एप्रिल 2020रोजी  सोडत काढण्यात  येईल,  गिरणी  कामगारांच्या वारसांना जास्तीत  जास्त प्रमाणात मुंबईत घरे उपलब्ध व्हावीत,  यासाठी  शासन प्रयत्नशील,  मुंबई शहर तसेच उपनगरात वापरात नसलेल्या 70एकर जमिनीची पाहणी केली जाईल. या जमिनीवर35हजार घरे देण्यात येतील. मुंबईतील संग्रहालयासाठी असलेल्या सहा एकर जागेपैकी  काही जागा घरांसाठी देण्यात येईल. एक लाख 74 हजार गिरणी कामगारांना घरे देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

दि.24 फेब्रुवारी, 2020

· विधानपरिषदेचे सभागृहनेते म्हणून उपमुख्यमंत्री श्री. अजित अनंतराव पवार यांची नियुक्ती.

·      अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी, सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याद्वारे विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री श्री. गोपीकिसन बाजोरिया,डॉ. सुधीर तांबे,श्री. अनिकेत तटकरे,प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती.

·      सर्व पालकांच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शुल्क नियामक समित्या 8 विभागीय ठिकाणी व एका पुनरीक्षण समितीच्या स्थापनेस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची मान्यता.

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात,नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण,कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे,सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील,मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार,पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे,उपस्थित.योजनेंतर्गत ३४ लाख ८३ हजार ९०८ शेतकरी खात्यांची माहिती प्राप्त.१५ दिवसांच्या आत या माहितीचे लेखापरिक्षणपूर्ण. १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध.योजनेची अंमलबजावणी संगणकीय पद्धतीने, शेतकऱ्यांच्या मान्यतेनंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार, आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्याला नोंद पावती दिली जाणार.

·      विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्याद्वारे विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदांची घोषणा, सदस्य सर्वश्री संजय शिरसाट,चिमणराव पाटील,अनिल भाईदास पाटील,संग्राम थोपटे,कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती.

·      विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे सुरक्षाविषयक उपकरण बसविण्यासदंर्भातील बैठक. विधानभवनातील सुरक्षाव्यवस्था अद्ययावत करण्याचे श्री. पटोले यांचे सूतोवाच.

·      कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन जण निरीक्षणाखाली असून  ८३ प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाचा 45 व्या वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न.  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री श्री.यशोमती ठाकूर  उपस्थित.

‘माविम’ स्थापित बचत गटातील महिलांच्या प्रेरणादायी कन्यांना ‘तेजस्विनी कन्या’ या पुरस्काराने  सन्मानित,  सामाजिक क्षेत्रामध्ये स्त्री सक्षमिकरणासाठी भरीव योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान ‘तेजश्री फायनान्शीअल सर्व्हिसेस’ या महिलांकरीता योजनेचा शुभारंभ, योजनेसाठी माविमला एकूण रु.६८.५८ कोटी निधी मंजूर, या वित्तीय वर्षाकरीता पहिला हप्ता रु. ३१कोटी 3 लाख रुपयांचा निधी हस्तांतरित.

·      19जिल्ह्यांतील सुमारे1हजार570ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी29मार्च2020रोजी मतदान;  30मार्च2020रोजी मतमोजणी.

·      वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करुन पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात जलआराखड्यात दुरुस्ती करणे तसेच अनुषंगिक विषयांसंदर्भात,विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

·      विधीमंडळात विविध विभागांच्या २४,७२३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर.

·      इंदुमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे,उपस्थित. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याचे विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांचे निर्देश.

·      शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत किसान काँग्रेसच्या विविध मागण्यासंदर्भात विधानभवनात विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

·      ज्येष्ठ सिनेअभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या‘अँड देन वन डे’या आत्मचरित्राचा मराठी  अनुवाद करणा-या प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांना2019वर्षाचा साहित्य अकादमीचा भाषांतर पुरस्कार जाहीर.

·      पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसंदर्भात तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांबाबत विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

दि.25 फेब्रुवारी, 2020

·      राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मच्छिमारांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मच्छिमारांच्या विकासात्मक कामासाठी निधी कमी पडू देणार, नसल्याची सार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम वगळून) मंत्री श्री. अशोक चव्हाण यांची माहिती.

·      कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून खत तयार करणाऱ्या नागपूर येथील हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची, नगरविकास मंत्री     श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती.

·      नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तर नाशिक, धुळे, परभणी व ठाणे या चार महानगरपालिकांतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 9 मार्च 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार.

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची बैठक.  बैठकीस पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे उपस्थित. मुख्यमंत्र्यांचे निर्देश :- शिर्डी विमानतळाच्या विकासामुळे तेथील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. विदेशामध्ये धार्मिक ठिकाणचे विमानतळ पाहता तेथील अध्यात्मिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन थीम बेस्ड पद्धतीने विमानतळांचा शिर्डी, नांदेड विमानतळांसाठी थीम बेस्ड विकास करा. पर्यटनवृद्धीसाठी पर्यटन शिर्डी विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा एप्रिलपासून कार्यान्वित करा. विमानतळांचा विकास करताना तेथील शहरांशी चांगली दळणवळण यंत्रणा (कनेक्टिव्हिटी), मार्गावरील उद्योग, शहरविकासासाठी नगरनियोजन तसेच परिसरातील पर्यटन विकास साध्य करण्यासाठी नगरविकास विभाग, सिडको, एमएडीसी, एमटीडीसी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांनी समन्वयाने काम करावे. चिपी विमानतळ (जि. सिंधुदूर्ग) लवकरात लवकर कार्यान्वित होईल यासाठी गतीने कार्यवाही करा. या विमानतळालगतच्या परिसराचे नियोजित पद्धतीने शहर नियोजन करा.

·      राज्यसभेत महाराष्ट्रातील प्रतिनिधीत्वाच्या 7 जागांसाठी 26 मार्च 2020 ला निवडणूक होणार असून याच दिवशी  निकाल जाहीर.

·      श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची भेट. घेतली. नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे उपस्थित.

·      वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासंदर्भातील बैठक. सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे उपस्थित.  स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग तीन व वर्ग चारची रिक्त पदे भरण्यासाठीची आवश्यक ती कार्यवाही वैद्यकीय शिक्षण विभागाने तात्काळ सुरु करण्याचे श्री. देशमुख यांचे निर्देश.

·      कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केवळ एक जण निरीक्षणाखाली असल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·      अस्वच्छ परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे विधानभवनात झालेल्या बैठकित निर्देश.      

· ईस्त्रायलचे भारतातील राजदूत डॉ.रॉन मल्का यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथी गृह येथे भेट. राजशिष्टाचार, पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे उपस्थित. कृषी, जलव्यवस्थापन, सिंचन क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी ईस्त्रायलशी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची सूचना.

·  राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेविषयी उपाययोजना करण्याबाबत आज विधानभवनात सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक. उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित. महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी अधिवेशनामध्ये दिशा कायद्याच्या धर्तीवर कायदा आणण्याचे निर्देश.

·      कदाचित अजूनहीया मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांचा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरव.

· केंद्रीय सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी, राजस्थानचे राज्यपाल श्री. कलराज ‍मिश्र, मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. गोविंद कवडे उपस्थित.

दि.26 फेब्रुवारी, 2020

·   राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करणार, यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार असल्याची, शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांची माहिती.

·      अर्थसंकल्पीय अधिवेशनात‘दिशा’कायद्याच्या धर्तीवर कायदा मांडणार असल्याची  गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांची माहिती. महत्वाचे मुद्दे :- येत्या तीन महिन्यात राज्यभरातील1150पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावणार. बलात्कार,बालकांवरील लैंगिक अत्याचार,ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना मनोधैर्य योजनेंतर्गत  अर्थसहाय्य देण्यात येते. यापुढे ज्वलनशील पदार्थांमुळे बळी पडलेल्यांना मदत करणार.महिला अत्याचार प्रतिबंध आणि समुपदेशनासंदर्भात पुणे पोलिसांमार्फत‘भरोसा सेल’स्थापन करण्यात आला आहे. या योजनेच्या यशस्वीतेनंतर राज्यभरात अंमलबजावणी करणार. तक्रारींच्या नोंदणीसाठी सीसीटीएनएस या प्रणालीद्वारे ऑनलाइन तक्रारींची सुविधा उपलब्ध, मुंबईत सध्या पाच  हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असून आणखी पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावणार, नवीन तसेच जुन्या इमारतीत सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करणार.

·      महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची,शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची घोषणा.

·      स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याद्वारे आदरांजली अर्पण.

·      महाराष्ट्र विधानमंडळ सभागृहाच्या कामकाजाची फिनलँड संसदीय शिष्टमंडळाद्वारे पाहणी.

·      सातारा-देवळाईनगर परिषद औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केल्यानंतर येथील विकासकामांवर भर देण्यात येत असल्याची, पोईसर (कांदिवली) पूर्व येथील भूखंड हे विकास आराखड्यानुसार सन2034पर्यंत सार्वजनिक उद्दिष्टांसाठी आरक्षित असून प्राथमिक,माध्यमिक शाळा,क्रीडांगण व नियोजित रस्ता यासाठीचे आरक्षण कायम ठेवणार असल्याची आणि नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक, शिक्षकेतरांना थकबाकी नसल्याची नगर विकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत माहिती.

·      रायगड जिल्ह्यातील साळावा- रेवदंडा खाडीवर नवीन पूल बांधणार असल्याची सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांची माहिती.

·      महाज्योती संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथील सामाजिक न्याय भवनाच्या नवीन इमारतीत स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिल्याची बहुजन कल्याण मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांची माहिती.

·      महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु,68गावांतील15हजार358कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आल्याची सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांची विधानसभा आणि विधानपरिषदेत माहिती.

·      अभिजात भाषेच्या दर्जासाठी शासनाचे प्रयत्न, मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा असल्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेत प्रतिपादन.

·      कोरोना विषाणू : इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी, राज्यात निरिक्षणाखालील सर्व ९१ प्रवासी कोरोना निगेटिव्ह असल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·      वित्तीय संस्थांच्या निधीतून कोस्टल रोडच्या कामाला प्राधान्य  देणार असल्याची  उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची विधानसभेत माहिती. 

·      ‘वन नेशन वन रेशन कार्ड’योजना राज्यात राबविणार असल्याची अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी विधानसभेत माहिती.

·      ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात केंद्र शासनाचा कायदा अंतिम टप्प्यात;आवश्यकता भासल्यास महाराष्ट्राचा स्वतंत्र कायदा करण्याची अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची विधानसभेत माहिती.

·      स्वयंचलित वाहन निरिक्षण, तपासणी केंद्रासाठीमहिन्याभरात निविदा काढणार असल्याचे परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची विधानसभेत माहिती.

·      खाजगी शाळांच्या शुल्क वाढीच्या नियंत्रणासाठीविभागीय समित्यांची लवकरच स्थापना करणार असल्याचीशालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांची विधानसभेत माहिती.

·      माजी विधानसभा सदस्य श्री. नामदेवराव भोईटे यांनाविधानसभेत आदरांजली.

·      ‘मराठी भाषा गौरव दिन’महाविद्यालये,विद्यापीठात विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भातच्या परिपत्रकाद्वारे सर्वांना सूचना देण्यात आल्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती.

·      विधानभवनात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत अस्वच्छ परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी बैठक.

दि.27 फेब्रुवारी, 2020

·      मराठी भाषा विभागातर्फे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मराठी भाषा दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, मराठी भाषामंत्री श्री. सुभाष देसाई,राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित. मराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध झाल्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन.

·      राज्य मराठी विकास संस्थेने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वरळी सी फेस येथे प्रभात फेरीचे आयोजन.बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे उपस्थित.

·      राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळात ‘इये मराठीचिये नगरी’ या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन. विधानपरिषद सभापती श्री. रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, उपसभापती श्रीमती निलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते (विधानपरिषद) श्री. प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते (विधानसभा) श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित.  मुख्यमंत्र्यांद्वारे विधानमंडळ प्रांगणात ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन.

·      उच्चदाब वितरण प्रणालीवरील जोडण्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची विधानसभेत माहिती

·      कर्जमुक्ती योजनेची रक्कम तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करणार असल्याची उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची विधानसभेत माहिती.

·      येत्या शैक्षणिक वर्षापासून सामजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांसाठी मध्यवर्ती भोजनालय योजना राबविणार असल्याची  सामाजिक न्यायमंत्री  श्री. धनंजय मुंडे यांची विधानसभेत माहिती.

·      कोरोना विषाणू : 93 जणांना रुग्णालयातून घरी सोडले असल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·      उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम संपन्न. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे,सर्व अभिमत विद्यापीठे,सर्व स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे आणि सर्व शासकीय/अशासकीय,अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये यामध्ये“मराठी भाषा गौरव दिन” साजरा करणे अनिवार्य करण्यात आल्याची श्री. सामंत यांची माहिती.

·      मंत्र्यांच्या निवासस्थानांना ऐतिहासिक गड किल्ल्यांची नावे देण्याची, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती.

·      मत्स्य दुष्काळाबाबत समिती स्थापन करणार असल्याची मत्स्यविकास मंत्री श्री. अस्लम शेख यांची विधानपरिषदेत माहिती.

·      नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे यांची विधानपरिषदेत माहिती.

·      माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रकाशित करण्यात येत असलेल्या‘आपलं मंत्रालय’या गृहपत्रिकेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांच्या हस्ते संपन्न.

·      महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने अंमलबजावणी सुरू असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांच्याद्वारे आढावा.156गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणाचे काम मुख्यमंत्री पेयजल योजनेत समाविष्ट करण्याचे निर्देश.

·      कोरेगाव भीमा,मराठा आरक्षण आणि नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात येत असल्याची गृहमंत्री     श्री.अनिल देशमुख यांची विधानपरिषदेत माहिती, कोरेगाव भीमातील348,मराठा आरक्षणातील460तर नाणार आंदोलनातील3गुन्हे मागे;उर्वरित गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू.

·      फिनलँड संसदेच्या वित्तीय समिती शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांची भेट.

·      मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, विधान परिषद व विधानसभेत ठरावाद्वारे केंद्राकडे शिफारस.

·      उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक. कामगार मंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील,राज्यमंत्री श्री. बच्चू कडू उपस्थित. माथाडी कामगारांच्या घरकुलांची प्रक्रिया गतिमान करणार;मंडळाच्या नावावर छळवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे सूतोवाच.

·      राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे उत्तर. महत्वाचे मुद्दे – मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन, महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रमानुसार कामे, रंगभूमिचा इतिहास सांगणारे दालन मुंबईत उभारणार.

दिनांक28फेब्रुवारी2020

·      भविष्यकालीन कृषी धोरणांवर नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत कृषी मंत्री श्री.दादाजी भुसे यांची चर्चा.

·      ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी वीज जोडणीचे अर्ज केले असतील ते पूर्ण करण्यासाठी कमी उच्चदाबाच्या वाहिनीवरुन देण्याबाबत प्रयत्न केले जातील,अशी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची विधानसभेत माहिती.

·      न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांच्या अध्यक्षतेखालील व्यापारी शिष्टमंडळाद्वारे राजभवन येथे राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांची भेट.

·      छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स,बलून,उंच जाणारे फटाके,हलक्या वस्तू,पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) सोडून विमानांच्या  लँडींग,टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिनांक18एप्रिल, 2020पर्यंतच्या कालावधीसाठी जारी.

·      दहशतवादी तसेच राष्ट्रविरोधी घटकांकडून कोणत्याही प्रकारे हवाई आक्रमण किंवा अन्य प्रकारे सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी दिनांक 24 मार्च 2020 पर्यंत बृहन्मुंबई हवाई क्षेत्र अतिलघु विमाने,ड्रोन आदींसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.

·      विद्यार्थ्यांनी बनविलेल्या रोबोटिक्स आणि वैज्ञानिक प्रतिकृतींच्या फिरत्या प्रदर्शनाचे कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन.

·      पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट. नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे,उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई,कृषिमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री  श्री. दादाजी भुसे उपस्थित. ाभेभेससि

·      वाढवण बंदराबाबत सर्वांची बाजू विचारात घेऊन निर्णय घेण्याचे श्री. ठाकरे यांचे सूतोवाच.

·      नागरिक आणि प्रशासनासाठी उपयुक्त असलेली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ निर्मित‘डिरेक्टरी 2020चे माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकाशन.

·      धुळे महिला रुग्णालयाला निधी उपलब्ध करून देणार असल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती.

·      केंद्र शासनाचे निकष आणि समितीच्या शिफारसीनुसार ट्रॉमा केअर सेंटर्सना मंजुरी देण्याची आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती.

·      आरोग्य संस्थांचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी एशीयन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून निधी देण्याची आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची माहिती.

·      आरोग्य विभागात विशेषज्ञांची ५७४ पदे तीन महिन्यात भरण्याची आणि राज्यातील ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची माहिती .

·      लोकसंत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना समर्पित ‘शब्दसृष्टी’ या हिंदी-मराठी द्विभाषिक त्रैमासिक पत्रिकेच्या विशेषांकचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकाशन.

·      आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय गरीब ऊसतोड व वीटभट्टी महिला मजूर यांना शेळीपालन प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्याकरिता आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय मजुरांसाठी शेळीपालन व्यवसाय स्वतंत्र योजना राबविण्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री. धनंजय मुंडे यांचे सूतोवाच.

·      उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत जे निर्देश दिले आहेत, त्या दृष्टीने यावर्षीचे शैक्षणिक प्रवेश सुरु होण्यापूर्वी कायदा करून त्यांची अंमलजबजावणी करण्याची, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची विधानपरिषदेत माहिती.

·      प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांचे आज विधानपरिषदेत प्रतिपादन.

·      अनुदानास पात्र घोषित केलेल्या उच्च माध्यमिक शाळ/वर्ग तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरु असल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत माहिती.

·      माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे एखाद्या शाळेतील शिक्षकाचे पद वाढत असल्यास, असे वाढीव पद अटींच्या अधिन राहून अतिरिक्त शिक्षकासह त्या शाळेला उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षण संचालकांना कळविले असल्याची शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.नरीमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंट येथे सीएनबीसी टीव्ही 18 इंडियातर्फे आयोजित, इंडियन बिजनेस लिडर ॲवार्ड कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला स्टेट ऑफ द इयरपुरस्कार प्रदान, उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांच्याद्वारे पुरस्काराचा स्वीकार. पर्यटन, पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री श्री.आदित्य ठाकरे उपस्थित.

·      सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण यांच्याद्वारे विधानसभेत देण्यात आलेली माहिती –  वनक्षेत्रांतर्गत पोलिसांच्या गृहसंस्थांसाठी 850 कोटी निधी उपलब्ध करून देणार, धोकादायक असलेल्या इमारती निष्कासित करणार, संबंधित कामासाठी कंत्राटदारांची निवड करताना अटी व नियमांचे कठोर पालन करणार, अपूर्णावस्थेत असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत बंद असलेली कामे प्राधान्याने सुरु करणार, कोकणातील कोस्टल रोड प्रामुख्याने पूर्ण करणार, रेतीचे घाट असतील तेथील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार, व्हीजिलन्स आणि क्वालिटी कंट्रोल यावर कटाक्षाने लक्ष देणार, माहिम कॉजवेचे स्ट्रक्चरल ऑडीट करून प्राधान्याने हे काम पूर्ण करणार.

·      तेलंगणा शासनाने हैदराबाद येथील मराठी महाविद्यालयास सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी अनुदानित हा दर्जा बदलून स्वयंअर्थसहाय्यित दर्जा  दिला आहे. या संदर्भात तेलंगणा राज्याचे  मुख्यमंत्री  आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची भेट घेणार असल्याची, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांची माहिती. हैदराबाद येथील मराठी महाविद्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्राची सर्वोतोपरी मदत,

·      अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी अकोला शहरातील सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी भानुप्रताप मडावी आणि प्रणिता कराडे यांना निलंबित आणि  पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आल्याची, गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांची विधानसभेत घोषणा.

·      नाशिक विभागातील कळवण आगाराच्या बसला झालेल्या अपघातातील एस.टी.बसच्या प्रवाशांना दहा लाख रुपयांची आणि ऑटोरिक्षातील प्रवाशांना दोन लाख रुपयांची मदत विशेष बाब म्हणून देण्याची, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा.

·      मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्गला सुरू करणार असल्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांची  विधानपरिषदेत माहिती. उपकेंद्रासाठी स्वतंत्र संचालक येत्या दोन महिन्यात नेमणार.

·      धुळे शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात 100 खाटांच्या महिला रुग्णालयासाठी निधीची तरतूद करण्याची, आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची विधानसभेत घोषणा.

·      शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी नवीन आजारांचा समावेश करण्याचा निर्णय, आता हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट यांचा समावेश करण्यात आल्याची आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची विधानसभेत घोषणा, या उपचारांपूर्वी 25 टक्के रक्कम कमाल मर्यादेच्या अधीन राहून अग्रीम मंजूर करण्यासाठी मान्यता, उपचारांच्या कमाल मर्यादा : यकृत, हृदय, फुप्फुस प्रतिरोपण प्रत्येकी 15 लाख रुपये, हृदय व फुप्फुस प्रतिरोपण (एकत्र) 20 लाख रुपये. बोन मॅरो ट्रान्सप्लांट 8 लाख रुपये. कॉक्लिअर इम्प्लांट 6 लाख रुपये.

·      सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली, अर्थसहाय्य प्राप्त मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी बैठक. सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित, मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे श्री.मुंडे यांचे सूतोवाच.

·      इतर मागासवर्गीयांची जनगणना होण्यासाठी राज्याने आग्रह धरला पाहिजे, यासाठी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घ्यावी किंवा आवश्यकता वाटल्यास तामिळनाडुच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जनगणना करण्यात यावी, असे विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांचे राज्य शासनाला निर्देश.

·      नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा, विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या मार्फत आढावा, नगरविकासमंत्री श्री.एकनाथ शिंदे, बहुजन कल्याणमंत्री श्री.विजय वडेट्टीवार उपस्थित.

·      जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते दिल्लीत प्रधानमंत्री यांची भेट घेणार असल्याची, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांची  विधानसभेत घोषणा.

·      उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शालेय पोषण आहारासंदर्भात बैठक, जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील, महसूलमंत्री श्री.बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री.सुनिल केदार, आदिवासी विकास मंत्री श्री.के.सी.पाडवी उपस्थित. महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन शालेय पोषण आहारात महानंदच्या टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याबाबत प्रयत्न करण्याचे श्री.पवार यांचे निर्देश.

·      लोकसंत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना समर्पित‘शब्दसृष्टीया हिंदी-मराठी द्विभाषिक त्रैमासिक पत्रिकेच्या विशेषांकाचे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकाशन.

·      वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री.अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, सोलापूरच्या वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध अडचणींबाबत बैठक, या वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सुधारणा करण्याबरोबरच व्हेंटिलेटर्सची संख्या वाढविण्याचे श्री.देशमुख यांचे  निर्देश.

दि. २९ फेब्रुवारी, २०२०

·      मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या मार्फत मुंबई-मेट्रो मालिका-3 मधील कामांची पाहणी.

·      उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत, लायन ताराचंद बापा हॉस्पिटलचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम संपन्न.

·      बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी परम बीर सिंह यांची नियुक्ती.

· मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची, सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ श्री.मुकूल रोहतगी यांच्यासोबत बैठक, मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा, समितीचे सदस्य नगर विकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे, कामगार मंत्री श्री.दिलीप वळसे पाटील उपस्थित.

· तालुक्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे ग्रामविकास मंत्री श्री.हसन मुश्रीफ यांचे निर्देश. जनता दरबारच्या धर्तीवर होणार आयोजन.

·    महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर.

0000

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाच्या कामावर मुख्यमंत्री समाधानी

सहार स्टेशन कामाची प्रत्यक्ष पाहणी

मुंबई,दि.29: मेट्रो-3मार्गिकेतील पॅकेज6अंतर्गत  सहार रोड स्थानकाची पाहणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून समाधान व्यक्त केले याशिवाय काही सूचना देखील केल्या.

यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे,परिवहन मंत्री अनिल परब,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव,मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल,संचालक (प्रकल्प),मुं.मे.रे.कॉ.एस.के.गुप्ता व आर.रामनाथ उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी कॉर्पोरेशनच्या अधिकारी व अभियंत्यांकडून सध्या सुरू असलेल्या मेट्रो-3च्या कामाचा आढावा घेतला व त्यावर समाधान व्यक्त केले. त्यांनी मेट्रोसाठी खोदलेल्या मोठ्या बोगद्यात फिरून कामाची पहाणीही केली.

सहार रोड स्थानकाचे भुयारीकरण48% पूर्ण झाले असून पॅकेज -6चे एकूण काम59% पूर्ण झाले आहे. सहार रोड स्थानकाची लांबी218मीटर असून रुंदी30मीटर आहे. मेट्रो मार्गिकेच्या ट्रॅकचे आंतर बदल (inter change)व्हावे यासाठी सहार रोड ते सीएसएमआय ए आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानका दरम्यान भूमिगत सीझर क्रॉस ओव्हर बांधण्यात येणार येत आहे.266मीटर लांब16मीटर रुंद असलेल्या सीझर क्रॉस ओव्हरचे बांधकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीद्वारे करण्यात येत आहे. पॅकेज -6चे एकूण59% काम तर73% भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

00000

Colaba-Bandra-SEEPZ Metro-3 Corridor

CM visits on-going work at Sahar Road Station

Mumbai, February 29,  Chief Minister Uddhav Thackeray, today, witnessed the on-going work of Colaba-Bandra-SEEPZ Metro-3 corridor at Sahar Road Station, package 6.

He was accompanied by Guardian Minister Aaditya Thackeray, Minister of Transport Anil Parab, MMRDA Commissioner R.A Rajeev, MMRC MD Ranjit Singh Deol,  SK Gupta, Director (Projects), MMRC, Mr. A.A. Bhatt, Director (Systems) MMRC and Mr. R Ramana, ED (Planning) MMRC.

CM interacted with the MMRC officials and expressed satisfaction about the project.

Sahar Road Station has completed 48 percent tunneling till now and the overall package work has been completed 59 percent.  The length of the Sahar Road station is 218 meters and the width is 30 meters. An underground Scissor cross over tunnel section will be constructed between Sahar Road Station to CSMIA International Airport Station Scissor Cross over to facilitate Metro Line Track Interchange. The length of Scissor Cross over is 266 meters and width is 16 meters, which will be constructed through New Austrian Tunneling Method (NATM). The overall work of Package 6 has been completed by 59% and 73% tunneling of this has been completed.

000

न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 28 : न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांच्या अध्यक्षतेखालील व्यापारी शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

श्री.कोश्यारी म्हणाले, भारतातील महाराष्ट्र राज्य हे विविध क्षेत्रामध्ये प्रगतीशील राज्य आहे.या ठिकाणी उद्योग, वाणिज्य यासह पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत.भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये व्यापार, वाणिज्य यासह पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रात संबंध वाढावेत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा असलेल्या गड-किल्ल्यांबद्दल माहिती दिली.

यावेळी भारतातील उद्योग क्षेत्र, लोकशाही व्यवस्था, संसदीय कार्यपद्धती, महाराष्ट्राने विविध क्षेत्रामध्ये केलेली प्रगती, न्यूझीलंड देशातील उद्योग व वाणिज्य क्षेत्र, लोकसंख्या आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

न्यूझीलंडमध्ये जवळपास अडीच लाख भारतीय नागरिक विविध क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच न्यूझीलंड येथील नागरिक भारतामध्ये कार्यरत आहेत. यामुळे आजवर दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे संबंध राहिले आहेत, असे श्री. विस्टन पिटर्स यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी उपप्रधानमंत्री श्री.पिटर्स यांना गेट ऑफ इंडियाची प्रतिमा भेट म्हणून दिली.

००००

प्रवीण भुरके/28.2.2020

विधानपरिषद लक्षवेधी

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात गठित समितीला 1 मेपर्यंत मुदतवाढ – शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई,  दि. 28- राज्यातील सर्व खाजगी, अनुदानित,  विनाअनुदानित अंशतः अनुदानित व तुकड्यांवर टप्पा अनुदानावर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला 1 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विक्रम काळे यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्रीमती गायकवाड बोलत होत्या. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होते.  तर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर(20, 40, 60 आणि 80 टक्के) असलेल्या शाळांमध्ये नियुक्ती झालेल्या शाळांना परिभाषित अंशदान योजना लागू होते. 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षक व शिक्षकेतर वर्गातून करण्यात आली आहे.  ही मागणी लक्षात घेता अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समिताचा अहवाल आल्यानंतर शिक्षक आमदार आणि वित्तमंत्र्यांशी चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री प्रा. अनिल सोले, डॉ. सुधीर तांबे, नागो गाणार, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, भाई गिरकर यांनी भाग घेतला. 

००००

नाशिक जिल्ह्यातील बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

मुंबई, दि. 28 : नाशिक विभागातील कळवण आगाराच्या बसला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या  बसमधील प्रवाशांच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर ऑटोरिक्षातील प्रवाशांना दोन लाख रुपयांची मदत विशेष बाब म्हणून देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कळवण आगाराच्या बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. परब बोलत होते. नाशिक विभागातील कळवण आगाराच्या बसचा 28 जानेवारीला ॲपे रिक्षाशी अपघात झाला होता. बसमधून एकूण 50 प्रवासी व चालक, वाहक 2 असे एकूण 52 व्यक्ती प्रवास करीत होते. त्यापैकी 16 प्रवासी व 1 चालक असे 17 व ॲपे रिक्षामधील 8 प्रवासी व 1 चालक असे एकूण 26 व्यक्ती मृत पावले होते. बसमधील मृत प्रवाशांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. तर ॲपेतील 9 मृत व्यक्तींच्या वारसांना 2 लाख रुपये विशेष बाब म्हणून मदत देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितले.

      

एस.टी. महामंडळाच्या शिवशाही बसेस नवीन आहेत. जुन्या बसेसचे इंजिन वापरून एकही जुनी बस नव्या शिवशाही बसच्या स्वरुपात वापरात नसल्याचे श्री. परब यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. लक्षवेधीवरील चर्चेत अनिकेत तटकरे, जयंत पाटील यांनी भाग घेतला.

००००

सिंधुदुर्गला मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 28 : कोकणातील विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधुदुर्गला सुरू करण्यात येणार आहे. या उपकेंद्राला स्वतंत्र संचालक येत्या दोन महिन्यात नेमण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

       

सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. सामंत बोलत होते. कोकण विद्यापीठासंदर्भात तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात समितीमध्ये प्राचार्य, पालकांचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काळात विद्यार्थी या सर्व प्रक्रियेचा केंद्रबिंदू असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही यात समावेश केला जाणार आहे. कोकण विद्यापीठाचा निर्णय हा विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा कल पाहून घेतला जाणार आहे. भविष्यात कोकण विद्यापीठाची निर्मिती झाल्यास या समितीमध्ये रायगडचा समावेश केला जाणार नाही. केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी येथील उपकेंद्र अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

       

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री कपिल पाटील, जयंत पाटील, नागो गाणार, अनिकेत तटकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रकाश गजभिये, श्रीमती हुस्नबानो खलिफे  यांनी भाग घेतला.

०००००

नवनिवार्चित सदस्यांचा परिचय

विधानपरिषदेमध्ये नवनिवार्चित सदस्य दुष्यंत चतुर्वेदी यांचा उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते अजित पवार यांनी परिचय करुन दिला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

मुंबई, दि. 28 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) सोडून विमानांच्या  लँडींग, टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिनांक 18 एप्रिल, 2020 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जारी केले आहेत. विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडींग), विमानाच्या उ्डडाणात (फ्लाईट), उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. विमान उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./28-2-2020

वाढवण बंदराबाबत सर्वांची बाजू विचारात घेऊनच निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 28 : वाढवण बंदराबाबत केंद्र सरकारचा प्रस्ताव आल्यास केंद्र सरकार आणि स्थानिक नागरिक या दोघांची बाजू विचारात घेऊनच निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात वाढवण येथे बंदर उभारल्यास येथील मच्छिमार आणि शेतकरी उद्ध्वस्त होतील, त्यामुळे हे बंदर होऊ नये या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने विधान भवन येथे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार राजेंद्र गावित, विनायक राऊत, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची ‘डिरेक्टरी २०२०’ प्रकाशित

मुंबई,दि. 28: राज्यातील गरजू नागरिक आणि प्रशासनासाठी उपयुक्त असलेली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ निर्मित’डिरेक्टरी 2020’चे माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

या डिरेक्टरीत राज्य व केंद्र शासन-प्रशासनातील महत्त्वाचे घटक, राज्य शासनाचे मंत्री, तसेच, राज्यातील पोलीस यंत्रणा, मंत्रालयाच्या सर्व विभागांतील सहसचिव व उपसचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, राज्यातील माहिती आयुक्त, अन्य राज्यांचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची माहिती, त्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट आहेत.

गरजू नागरिकांसाठी डिरेक्टरीची उपयुक्तता वाढावी यासाठी सर्व खातेप्रमुख, महामंडळे, पोलीस अधीक्षक, राज्याचे लोकायुक्त, निवडणूक आयुक्त, प्रमुख रुग्णालये, शासकीय विश्रामगृहे, प्रमुख शहरांचे एसटीडी कोड व जिल्हा मुख्यालयांचे पिन कोड, मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची कार्यालये, प्रमुख वृत्तपत्रे, राज्यातील पर्यटन स्थळे, राज्यातील एस टी डेपोंचे दूरध्वनी क्रमांक त्याचबरोबर, पारदर्शक व संवेदनशील प्रशासनासाठी कार्यसंस्कृती/पगारात भागवा अभियान, महासंघाचे पदाधिकारी, संलग्न खातेनिहाय संघटनांची माहिती तसेच राज्य शासनातील विविध विभागांची संकेतस्थळे आदी माहितीही समाविष्ट केलेली आहे.

मंत्रालयात झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमास राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे, मंत्रालय अधिकारी महासंघाचे अध्यक्ष रामचंद्र धनावडे, महासंघाचे उपाध्यक्ष विष्णू पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस.एम. पाटील, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, सहचिटणीस मुख्यालय सुदाम टाव्हरे, राज्य संघटक रमेश जंजाळ आदी उपस्थित होते.

विधानसभा प्रश्नोत्तरे

धुळे महिला रुग्णालयाला निधी उपलब्ध करून देणार

– आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि. २८: धुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालयाला आवारात १०० खाटांच्या महिला रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली आहे. या अधिवेशनामध्ये रुग्णालयासाठी निधीची तरतूद केली जाईल आणि यावर्षी रुग्णालयाचे काम पूर्ण होईल. यासाठी प्रयत्न केले जातील,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले. यासंदर्भात सदस्य अमीन पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ०००००

केंद्र शासनाचे निकष आणि समितीच्या शिफारसीनुसार

ट्रॉमा केअर सेंटरना मंजुरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि. २८: केंद्र शासनाचे निकष आणि राज्यात गठित केलेल्या समितीच्या शिफारशी या धोरणानुसार राज्यातील आवश्यकता असलेले ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण केले जातील. भविष्यात अशा सेंटरना या धोरणानुसारच मंजुरी दिली जाईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य शेखर निकम यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले,राज्यात असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर ज्या उद्देशाने सुरू करण्यात आले ते पूर्ण होताना दिसत नाही. त्याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. ट्रॉमा केअर सेंटरबाबत केंद्र शासनाने केलेले निकष आणि समितीच्या शिफारशीनुसार गरजेच्या असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरना पूर्ण केले जाईल.

यावेळी झालेल्या एका उपप्रश्नाच्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री यांनी सांगितले की राज्यात आरोग्य संस्थांमध्ये विशेषज्ञ भरण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. महाड येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भूलतज्ञ तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनील प्रभू,संजय सावकारे,अमित झनक,भास्कर जाधव यांनी भाग घेतला.

००००

अजय जाधव..२८.२.२०२०

 

आरोग्य संस्थांची अर्धवट बांधकामे पूर्ण करण्यासाठी

एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून निधी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि. २८: राज्यातील आरोग्य संस्थांचे अर्धवट बांधकाम एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होणार आहे, त्यातून पूर्ण करण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाले आहे अशी कामे यावर्षी पूर्ण केली जातील,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य रणजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोण ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामाबाबतचा प्रश्न विचारला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राज्यातील आरोग्यसंस्थांच्या बांधकामाबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले,राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य संस्थांची बांधकामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्यासाठी सुमारे १३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे मुख्यमंत्री  व उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हा निधी मिळाल्यानंतर अर्धवट बांधकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

आरोग्य संस्थांमधील रिक्तपदांबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले,ही पदे भरण्यासाठी प्रधान सचिवांच्या समितीला अधिकार देण्यात आले आहेत. उपकेंद्रामध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची जी पदे आहेत ती ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून भरली जातात. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरावी यासाठी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.

आदिवासी विकास विभागात कार्यरत डॉक्टरांना वेतनासोबत विशेष लाभांश देण्याबाबत विचार केला जाईल,असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री संग्राम थोपटे,रणधीर सावरकर,माणिकराव कोकाटे,नितेश राणे,शामसुंदर पाटील,श्रीमती देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.

००००

अजय जाधव..२८.२.२०२०

आरोग्य विभागात विशेषज्ञांची ५७४ पदे तीन महिन्यात भरणार 

राज्यभरातील ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यासाठी निधी उपलब्ध – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि. २८: आरोग्य विभागात विशेषज्ञांची रिक्त पदे तीन महिन्यात भरण्यात येणार असून सुमारे ५७४ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील आरोग्य संस्थांमधील सुमारे ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यात येणार असून त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य विकास ठाकरे यांनी विदर्भातील तज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की,राज्यात विशेषज्ञांची ९१३ पदे रिक्त आहेत. त्यातील ३०४ पदे सरळसेवेने तर २७० पदोन्नतीने अशी एकूण ५७४ पदे येत्या तीन महिन्यात भरण्यात येतील. त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही पदे भरल्यानंतर त्यांना चक्राकार पद्धतीने नियुक्त्या देण्यात येणार असून विदर्भाला प्राधान्य देण्यात येईल,असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

डॉक्टर,विशेषज्ञांची पदे थेट मुलाखतीच्या माध्यमातून भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असून लोकप्रतिनीधींनी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेही पाठपुरावा करून आपल्या भागातील पदे भरून घ्यावीत. ज्या आरोग्य संस्थेत डॉक्टर अथवा विशेषज्ञांची कमतरता आहे, तेथे रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांची ऑन कॉल सेवा घेता येते असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान,आरोग्य संस्थांमधील ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्याची आवश्यकता असून त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याचे सांगत यावर्षी किमान ५० टक्के रुग्णवाहिका बदलण्यात येतील,असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,सदस्य सुलभा खोडके,सदस्य सर्वश्री किशोर जोरगेवार,सुभाष धोटे यांनी भाग घेतला.

००००

अजय जाधव..२८.२.२०२०

शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेत हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपणाचा समावेश – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई,दि. २८ : राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी नवीन आजारांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यामध्ये हृदय,यकृत,फुप्फुस प्रत्यारोपण,बोन मॅरो ट्रान्सप्लांट,कॉक्लिअर इम्प्लांट यांचा समावेश करण्यात आला आहे,अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी निवेदनात म्हटले आहे की,शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना आतापर्यंत २७ आकस्मिक व पाच गंभीर आजारांसाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देय आहे. तसेच आजारावरील खर्च भागविण्यासाठी अग्रीम देखील अनुज्ञेय आहे. या खर्च प्रतिपूर्तीसाठी आता नवीन आजारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या उपचारांपूर्वी २५ टक्के रक्कम कमाल मर्यादेच्या अधीन राहून अग्रीम मंजूर करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

उपचारांच्या कमाल मर्यादा अशा:

यकृत,हृदय,फुप्फुस प्रतिरोपण प्रत्येकी १५ लाख रुपये,हृदय व फुप्फुस प्रतिरोपण (एकत्र) २० लाख रुपये. बोन मॅरो ट्रान्सप्लांट ८ लाख रुपये. कॉक्लिअर इम्प्लांट ६ लाख रुपये.

००००

अजय जाधव..२८.२.२०२०

ताज्या बातम्या

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

0
यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील...

बोगस बियाणे, लिंकींग, साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही – पालकमंत्री संजय राठोड

0
पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारी आढावा जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना मृद पत्रिका देणार वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्यांना रोखीने परतावा यवतमाळ, दि.17 (जिमाका) : येत्या खरीप...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. त्यांनी आज...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

0
पुणे, दि.१७: जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी...

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील...