रविवार, मे 18, 2025
Home Blog Page 1628

राज्यसभेच्या ७ जागांसाठी २६ मार्चला मतदान; माध्यम प्रतिनिधींनी प्राधिकारपत्रासाठी १२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि. 2 : महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2020 रोजी संपत असल्याने रिक्त होणाऱ्या जागांसाठी 26 मार्च रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीचे वृत्तसंकलन आणि छायाचित्रण करण्याकरिता प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींनी प्राधिकारपत्रांसाठी 12 मार्च 2020 पर्यंत महासंचालक,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मंत्रालय,मुंबई येथे अर्ज सादर करावेत,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणूक–2020  च्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार निवडणुकीचे मतदान गुरुवार 26 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. तसेच मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ह्या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाचे विविध प्राधिकारपत्रे प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना द्विवार्षिक निवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपले नावे,आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मंत्रालय,मुंबई यांच्याकडे 12 मार्च पर्यंत पाठवावीत. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 12 मार्चनंतर या कार्यालयात प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही,असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विधानसभा इतर कामकाज

शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

मुंबई,दि. 2 : राज्य शासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून तालुका स्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा,ग्रामविकास,सहकार,वस्त्रोद्योग या विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना श्री.भुजबळ बोलत होते.

श्री.भुजबळ म्हणाले,शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. शिवभोजन ही प्रायोगिक तत्वावरील योजना असून टप्प्याटप्प्याने तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मुंबई,पुणे,ठाणे,नागपूर यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भोजन केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असून थाळी संख्यादेखील वाढवली आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन असलेल्या लाभार्थ्यांकडे सिलेंडर आहे मात्र ते सिलेंडर पुन्हा भरण्याची त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नसल्याने सिलेंडर विनावापर पडून आहे. अशा लोकांना शिधापत्रिकेवर केरोसिन देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल असेही श्री.भुजबळ यांनी सांगितले.

16 हजार 700 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

ग्रामविकास विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना सुरु राहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यात सध्या 16 हजार 700 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून 10 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत. 15 व्या वित्त आयोगांतर्गत पंचायत समित्यांना आर्थिक अधिकार देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची मानहानी न होता कर्जमुक्ती योजनेचा लाभ

– सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून शेतकऱ्यांची मानहानी न होता त्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी विभागाच्या मागण्या सादर केल्या.

००००

अजय जाधव/विसंअ/2.3.2020

वस्त्रोद्योगाला मदत करण्यासाठी शासनाचे सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई,दि. 2 : वस्रोद्योगामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. अडचणीत असलेला हा उद्योग टिकण्यासाठी  तसेच रोजगार निर्मितीत वाढ होण्यासाठी वस्रोद्योगाला मदत करण्यासाठी शासन सहकार्य करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील,उद्योगमंत्री सुभाष देसाई,वस्रोद्योग मंत्री अस्लम शेख,सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,आमदार भारत भालके,आमदार सुमन पाटील,वस्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज,वित्त सचिव राजीव मित्तल,सहकारी,खासगी सूत गिरण्यांचे प्रतिनिधी,वस्त्रोद्योगाचे प्रतिनिधी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वस्रोद्योगासमोरील अडचणी लक्षात घेता सूतगिरण्यांना वीजदरात सवलत देण्यासंदर्भात सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली वित्त,उर्जा,वस्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव तसेच सहकारी,खासगी सूत गिरण्यांचे प्रतिनिधी यांनी बैठक घ्यावी. इतर राज्यात मिळणाऱ्या वीज दरातील सवलती तसेच महाराष्ट्रातील वीजदर याबाबत चर्चा करून प्रस्ताव सादर करावा,अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था येण्यासाठी शासनाची मदतीची तयारी असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००

जसंअ/उपमुख्यमंत्री कार्यालय/2.3.2020

सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागाच्या निविदा प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक

मुंबई, दि. 2 : सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या  निविदा प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात विधानभवनातील दालनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

श्री.पटोले म्हणाले, लोकहिताच्या दृष्टीने शासनस्तरावरील कामे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.  कामांना विलंब  झाल्यास शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यासाठी प्रकल्प वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाचे  प्रकल्प  वेळेत  पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावे. रस्ते, पूल, इमारती तसेच  जलसंपदा विभागाअंतर्गत येणारी धरणे, कालवे व इतर कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर शुद्धीपत्रक तयार करा, अशा सूचना श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते) चे सचिव सी.पी.जोशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आदी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

मुंबई,दि. 2 : ठाणे जिल्ह्यातील रस्ते,पाणीपुरवठा,आरोग्य,नगरविकास,जलसिंचन,मेट्रो आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष,सर्व स्थानिक आमदार,सर्व संबंधित विभागांचे सचिव,महानगर पालिकांचे आयुक्त आदी उपस्थित होते. यावेळी आमदार,लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागाविषयीच्या मागण्या मांडल्या.

मीरा- भाईंदर शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन चेना नदीचे पाणी अडवून शहराला मिळावे यासाठी मागणी होत आहे. या अनुषंगाने अभ्यास करावा,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.  घोडबंदर,मीरा- भाईंदर खाडीकिनारा (वॉटरफ्रंट) विकास,अंतर्गत जलवाहतुकीसाठी जेट्टींचा विकास,ठाणे शहरामध्ये कोस्टल रोड,उन्नत रस्ते,झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन,समूह पुनर्विकास आदी बाबींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.

सफाई कामगारांच्या पाल्यांना नोकरीमध्ये कायम ठेवण्याची मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. अंबरनाथ- बदलापूर पाणीपुरवठा योजनेवर महिनाभरात तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.

माळशेज घाट येथे उत्कृष्ट असा काचेचा स्कायवॉक विकसित करण्याचा प्रस्ताव असून पर्यटनाच्या दृष्टीने देशातील हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल,असेही श्री. ठाकरे म्हणाले.

          

उल्हासनगर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असतानाही वालधुनी नदीमध्ये कंपन्या प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित झाली आहे. याबाबत तपासणी करुन कार्यवाही करण्यात येईल.

शहापूरला बाहुली प्रकल्पाचे पाणी गुरुत्व पद्धतीने मिळावे यासाठी कार्यवाही करावी. तसेच घाटनदेवी पाणी योजनेसाठी सर्वेक्षण करावे,असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.2.03.2020

माथेरान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

मुंबई दि. 2 : माथेरान नगरपरिषदेस पाणीपुरवठा करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये पंपिंग करावी लागत असल्याने विद्युत देयकावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. तसेच महावितरणने विद्युत दर वाढविल्याने त्यात अतिरिक्त वाढ झाली आहे. त्यामुळे माथेरान पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक निधी संदर्भात  पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली.

माथेरान येथील कुंभे, जुम्मापट्टी, वॉटरपाईप, शारलोट तलाव येथील पंपिंग स्टेशन चालविण्याकरिता दैनंदिन देखभाल दुरुस्ती खर्च अनिवार्य आहे. पर्यटन विभागामार्फत संबंधित योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु हा निधी कमी पडत असल्याने माथेरान नगरपरिषदेने ठराव मंजूर करून पर्यटन व नगरविकास विभागाकडे निधीची मागणी करावी, त्यानंतर पाणीपुरवठा, नगरविकास व पर्यटन विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी असेही निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आदी उपस्थित होते.

याच बैठकीत कर्जत व खालापूर तालुक्यातील आदिवासी  वाड्यांसाठी पाणीपुरवठा योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोहा (कतार) शैक्षणिक केंद्रासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

मुंबई,दि. 2 : दोहा (कतार) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून शैक्षणिक केंद्र सुरू करण्यासाठी कतार शासनाशी सामंजस्य करार झालेला आहे. याबाबत शासन सकारात्मक असून विद्यापीठाने तातडीने प्रस्ताव शासनाला पाठवावा,असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

श्री. सामंत म्हणाले,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून दोहा प्रोफेशनल सर्विसेस होल्डिंग डब्ल्यूएलएल दोहा,कतार या संस्थेने कतार येथील शासनाशी सामंजस्य करार केलेला आहे. या प्रस्तावाला कतार शासनाने परवानगी दिली असून राज्य शासन याबाबत सकारात्मक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा. यासाठी राज्य शासन सहकार्य करेल त्यानंतर विद्यापीठाने केंद्र शासनाच्या परवानगीची प्रक्रिया जलद गतीने करून हे शैक्षणिक केंद्र लवकर सुरू करावे,असे श्री. सामंत यावेळी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले,परदेशामध्ये मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी‘दोहा प्रोफेशनल सर्विसेस होल्डिंग डब्लूएलएल दोहा,कतार’  ही संस्था पुढाकार घेऊन मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाचा विदेशात शुभारंभ करीत आहे. ही आनंदाची बाब आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने कायदेशीर बाबी पूर्ण करून कालबद्ध कार्यक्रम तयार करावा अशा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.

अभ्यासक्रम

 पदवी,पदविका,सांस्कृतिक कार्यक्रम,सहयोगाने भाषा कार्यक्रम,शिक्षक–विद्यार्थी आदान-प्रदान,संयुक्त संशोधन प्रकल्प,शैक्षणिक कार्यक्रम,विविध कार्यशाळा इ. अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

यावेळी आमदार भाई जगताप,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.नितीन करमळकर,संस्थेचे अध्यक्ष हसन चौगुले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जनसंपर्कावरील राष्ट्रीय कार्यशाळा स्तुत्य उपक्रम; सोशल मीडियाचा प्रभावी वापर – डॉ. दिलीप पांढरपट्टे

सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट 

                     

नवी दिल्ली,दि. 16: ‘शासनातील जनसंपर्क’विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करून महाराष्ट्र परिचय केंद्राने राष्ट्रीय राजधानीत उत्तम पायंडा पाडला आहे. सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग करून राज्य शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे कार्य परिचय केंद्र उत्तम प्रकारे करीत असल्याच्या भावना व्यक्त करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी परिचय केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.

डॉ. पांढरपट्टे यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर,उपसंपादक रितेश भुयार आणि कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

परिचय केंद्राच्या वतीने’शासनातील जनसंपर्क’विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. याद्वारे नवमाध्यमांच्या जगात जनसंपर्क क्षेत्रात करावयाचे बदल तसेच विविध राज्यांतील जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांची देवाण-घेवाण होते असे डॉ. पांढरपट्टे म्हणाले.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे तीन भाषेतील अधिकृत व प्रमाणित ट्विटर हँडल,फेसबुक पेजेस,युट्युब चॅनेल,ब्लॉग,इंस्टाग्राम,व्हॉटसॲप ग्रुप,एसएमएस सेवा आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणाऱ्या शासनाच्या प्रसिद्धी कार्याचेही डॉ. पांढरपट्टे यांनी विशेष कौतुक केले.

परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार समन्वय कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय,महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय,प्रकाशित करण्यात येणारी विविध प्रकाशने,दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली.

       

कार्यालयाचे ग्रंथालय आणि विविध विभागांची पाहणी करून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल डॉ. पांढरपट्टे यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. 

०००००

          

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.47/  दिनांक2.03.2020

एकही गिरणी कामगार बेघर राहणार नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या3 हजार 894 सदनिकांची सोडत

मुंबई, दि.1 : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे. या प्रत्येक गिरणी कामगारास घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना दिली. गिरणी कामगारांनी त्यांना मिळालेली घरे इतरांना विकू नयेत आणि मुंबई बाहेर जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर, सभापती विनोद घोसाळकर, झोपडपट्टी पुनर्वसनचे सभापती विजय नाहटा, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मी आज भाषण न करता कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे. गिरणी कामगारांचे ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे. घर मिळाल्यावर मला आपल्या घरी चहा प्यायला बोलवा, आपल्या घरात आनंदी राहा, घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जास्तीत जास्त परवडणारी घरे देणार- डॉ. आव्हाड

यावेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड म्हणाले, मुंबई पालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यामधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. येत्या काळात जास्तीत जास्त परवडणारी घरे मुंबईत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोणीही घरापासून वंचित राहणार नाही. झोपडपट्टीवासीय, गिरणी कामगार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. पुढील काळात पोलीस, शासकीय चतुर्थ कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी 10 टक्के घरांचा समावेश असेल, असेही श्री. आव्हाड म्हणाले.

आता दुःखाचे दिवस संपले असून सुखाचे दिवस आले आहेत, शेवटच्या गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल, असे महापौर श्रीमती पेडणेकर यांना यावेळी बोलतांना सांगितले.

मुंबई मंडळातर्फे वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पांतर्गत720 सदनिका, स्प्रिंग मिल येथे 2630 सदनिका आणि लोअर परेल येथील श्रीनिवास मिलच्या जागी 544 सदनिका आहेत. या सदनिका मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी  असून225 चौ. फुटाच्या वन बीएचके स्वरुपातील सदनिका अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत. तसेच आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृह प्रकल्पाच्या आवारात 15 मजल्याचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॅावर) उभारण्यात आले आहे. याकरिता एकूण 1 लाख 74 हजार 36 अर्ज गिरणी कामगार व त्याच्या वारसांकडून प्राप्त झाले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

000

मिल मजदूरों के लिए म्हाडा के  3 हजार 894 घरों की लॉटरी 

एक भी मिल मजदूर घर से वंचित नहीं रहेगा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.1 : संयुक्त महाराष्ट्र की लड़ाई में मिल मजदूरों का बड़ा योगदान है। ऐसे प्रत्येक मिल मजदूर को घर देने के लिए सरकार कटिबद्ध है और एक भी मिल मजदूर घर से वंचित नहीं रहेगा, यह ग्वाही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने मिल मजदूरों को दी। साथ ही उन्होंने मिल मजदूरों से उन्हें मिला हुआ मकान किसी अन्य को न बेचने और मुंबई के बाहर न जाने का आवाहन भी किया है।

म्हाडा के विभागीय  वर्ग रहे मुंबई गृहनिर्माण एवं क्षेत्रविकास मंडल की ओर से चौथे चरण के अंतर्गत मिल मजदूर और उनके वंशों (वारसांसाठी) के लिए  मुंबई के मध्यवर्ती क्षेत्र के बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल और श्रीनिवास मिल की जगह पर बनाए गए 3 हजार 894 मकानों की लॉटरी (सदनिकांची सोडत) आज वांद्रे स्थित  म्हाडा मुख्यालय में  मुख्यमंत्री श्री. ठाकरे की उपस्थिति में और  मजदूर नेता दत्ता इस्वलकर के हाथों निकाली गई, इस अवसर पर वे बोल रहे थे।

इस दौरान गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर, सभापति विनोद घोसालकर, झोपडपट्टी पुनर्वसन के सभापति विजय नाहटा, म्हाडा के उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, पूर्व राज्यमंत्री सचिन अहिर, नवाकाल की संपादिका जयश्री खाडिलकर आदि उपस्थित थे।

मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा कि आज मैं भाषण नहीं करूंगा बल्कि परिवार के एक प्रमुख के रूप में आपसे संवाद साध रहा हूँ। मुझपर मिल मजदूरों को  ऋण है और इसे व्यक्त करने के लिए आज यहाँ पर आया हूँ। उन्होंने कहा कि मकान मिलने के बाद  मुझे अपने घर में चाय पिलाने के लिए जरूर बुलाईए, अपने घर में खुशी से रहें, घर न बेचे और मुंबई में रहने के अधिकार को भी न खोए।

अधिक से अधिक किफ़ायती दरों में मकान दिए जाएंगे – गृहनिर्माण मंत्री

इस दौरान गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड ने कहा कि मुंबई पालिका क्षेत्र की बंद पड़ी हुई मिल के  मिल मजदूरों को मकान देना सरकार का नीतित्मक निर्णय है। भविष्य में अधिक से अधिक किफ़ायती दरों में तथा (परवडणारी घरे) सस्ते मकान मुंबई में उपलब्ध कराए जाएंगे। कोई भी घर से वंचित नहीं रहेगा। झोपडपट्टीवासीय, मिल मजदूरों का सपना पूरा करने के लिए यह सरकार कटिबद्ध है। भविष्य में पुलिस, सरकारी चतुर्थ श्रेणी के कर्मचारियों के लिए भी प्रत्येकी 10 फीसदी मकानों का समावेश होगा, यह भी  श्री. आव्हाड ने कहा।

महापौर श्रीमती पेडणेकर ने कहा कि अब दुख के दिन खत्म हो गए है और सुख के दिन आए है। अंतिम मिल मजदूरों को भी न्याय दिया जाएगा।

इस अवसर पर जानकारी में बताया गया है कि मुंबई मंडल की ओर से वडाला स्थित बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्प के अंतर्गत 720 मकान (सदनिका), स्प्रिंग मिल स्थित 2630 मकान और लोअर परेल स्थित श्रीनिवास मिल के जगह पर 544 मकान है। यह मकान मुंबई के सबसे अच्छी जगह पर है और 225 चौ.फीट के वन बीएचके मकान अत्याधुनिक सुविधाओं युक्त है और आधुनिक समय की आवश्यकता को ध्यान में रखते हुए वडाला स्थित बॉम्बे डाईंग मिल गृह प्रकल्प के जगह पर 15 मंजिली वाहनतल इमारत (पार्किंग टॅावर) का निर्माण किया गया है। इसके लिए कुल 1 लाख 74 हजार 36 आवेदन मिल मजदूर एवं उनके वारिसों (वारसांकडून) की ओर से प्राप्त हुए है।

000

Lottery of 3, 894 Houses of Mhada for mill workers                                          

No mill worker will remain without home – Chief Minister Uddhav Thackeray

 MUMBAI, 1.Mar.20: “The mill workers have a major role in the struggle of the United Maharashtra. State government was committed to provide housing to every mill worker and no mill worker will be deprived of home. Mill workers should not sell their houses to others and should not move out of Mumbai” said Chief Minister of Maharashtra, Uddhav Thackeray.

He was speaking during lottery organized for 3, 894 Houses of Mhada for mill workers, at headquarter of Mhada, Bandra. Mumbai Housing and Area Development Board had organized the program of lottery scheme of fourth phase of housing which will be available for mill workers and their heir at central area of Mumbai Bombay Dyeing, Spring mill and Shriniwas Mill.   Labor leader Datta Eswalkar was prominently present

Housing Minister Dr. Jitendra Awhad, Mayor Kishori Pednekar, Chairman Vinod Ghosalkar, Slum Rehabilitation chairperson Vijay Nahata, MHA vice-president Milind Mhaiskar, former state minister Sachin Ahir and new editor of Nawakal, Jayshree Khadilkar were present on this occasion.

I will talk to you today as the head of the family without giving speech. I have debt of mill workers and I have come to express it. Call me to have tea at your house when you get home, be happy in your house, don’t sell houses, don’t lose your right in Mumbai, “appealed Chief Minister to Mill workers.

  

Will provide maximum affordable housing- Housing Minister Dr. Jitendra Awhad

”It was the government’s strategic decision to provide houses to the workers of closed mills in the Mumbai municipal area. In the coming period, the maximum number of affordable homes will be made available in Mumbai. No one will be deprived of their homes. This government is determined to fulfill the dream of slum dwellers, mill workers. In the coming days, 10 % share will be of houses for the police, Government class IV employees” said Jitendra Awhad, Minister of Housing.

“Now the bad days are over and the days of happiness have come. The last mill workers will get justice and own house” said Mayor Mrs. Pednekar.

Under this housing project, the Mumbai Board has 720 homes at Bombay Dyeing Mill at Wadala, 2630 in Spring Mill and 544 in the Srinivas mill at Lower Parel. This house is the high societies in Mumbai. This 225 Sq. 1 BHK houses are full of modern amenities. In view of the need of modern times, a 15-storey building (parking tower) has been erected in the premises of the Bombay Dyeing Mill house project at Wadala. Total of 1,74,036 applications have been received from the mill workers and their heirs for this purpose.

०००

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

नाशिक येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवाशी कोरोनासाठी निगेटीव्ह

मुंबई, दि. 1 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या एका प्रवाशाचे कोरोनासाठीचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. राज्यात सध्या सातजण निरीक्षणाखाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 515 विमानांमधील  61 हजार 939 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या 10 देशातील प्रवाशांसोबतच आता इराण आणि इटली या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 370 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 241 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 125 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 121 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर 4 जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या 125 प्रवाशांपैकी 118 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 5 जण मुंबईत तर प्रत्येकी 1 जण पुणे आणि नाशिक येथे भरती आहे.

ताज्या बातम्या

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. १८: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची...

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

0
यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील...

बोगस बियाणे, लिंकींग, साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही – पालकमंत्री संजय राठोड

0
पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारी आढावा जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना मृद पत्रिका देणार वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्यांना रोखीने परतावा यवतमाळ, दि.17 (जिमाका) : येत्या खरीप...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. त्यांनी आज...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

0
पुणे, दि.१७: जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी...