शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1514

शेततळे अस्तरीकरणातून बागायत फळपीक लागवड

पावसाळ्यात ओढे, नाले, नदी आदींद्वारे बरेच पाणी वाहून जाते. हे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करता येऊ शकते. यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाल्याने मिनाज मुजावर यांचा पिकाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

गुंजेगाव (ता. द. सोलापूर) येथील मिनाज इसमुद्दीन मुजावर यांनी भारतीय सैन्य दलात जवान म्हणून 16 वर्षे २ महिने सेवा बजावली आहे. त्यांच्या घरी आई व कुटुंबातील एकूण पाच सदस्य आहेत. गत वर्षी भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीची आवड असल्याने त्यांनी 3.19 हे. इतकी शेतजमीन खरेदी केली.

याबाबत श्री. मुजावर म्हणाले, सैन्य दलात सेवा बजावल्याने जय जवान जय किसान या उक्तीप्रमाणे व शेतीची आवड असल्यामुळे मी शेती कसत आहे. शेतीमध्ये फळबाग लागवड व ठिबक सिंचन करुन उपलब्ध पाण्यामध्ये मी बागायत शेती करित आहे. उन्हाळ्यामध्ये शेती व जनावरासाठी तीव्र पाणी टंचाई भासत होती. त्यामुळे शाश्वत पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. त्यासाठी 25x25x3.00 मी. आकारमानाचे शेततळे मी खोदलेले होते.

दरम्यान, कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत शेततळे प्लास्टीक अस्तरीकरण घटकासाठी अनुदान मिळत असल्याची माहिती श्री. मुजावर यांना मिळाली. त्यांनी त्यासाठी  सन 2022-23 वर्षासाठी ऑनलाईन अर्ज केला. ऑनलाईन सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर 25x25x3.00 मी. आकारमानाचे शेततळे प्लास्टीक अस्तरीकरण केलेले आहे.

श्री. मुजावर म्हणाले, माझ्यासारख्या नव शेतकऱ्याला कृषि विभागाने पूर्ण सहकार्य केले. शेततळे प्लास्टीक अस्तरीकरणसाठी मला एकूण रक्कम रु.58 हजार 700 अनुदान मिळाले आहे. सध्या उपलब्ध एका बोअरवेलद्वारे शेततळ्यामध्ये पाणी साठवणूक करत आहे. शेततळ्याच्या उपलब्ध पाण्यावर मी डाळिंब 0.80 हे, पपई 1.60 हे. बागायत फळपीक लागवड केलेली असून ठिबक सिंचनव्दारे पाणी व्यवस्थापन करत आहे. याचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळण्यास अजून 4 ते 5 महिने अवधी असला तरी शेततळ्याच्याच जीवावर मी शेती करू शकत आहे. व शेततळ्यामुळेच आमचा उन्हाळा सुसह्य झाला आहे. सद्य स्थितीमध्ये शाश्वत पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे फळबाग व इतर बागायत पिकासाठी माझी पाण्याची समस्या सुटलेली आहे. मला या योजनेसाठी कृषि विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी मार्गदर्शन व मदत केलेली आहे.

सदर शेततळे अस्तरीकरणास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे व तालुका कृषि अधिकारी रामचंद्र माळी यांनी भेट देऊन शेतकऱ्याला मार्गदर्शन केलेले आहे.

  • अविनाश गरगडे, जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

चंद्रपूर परिसरातील गरीब कुटुंबांना अल्पदरात घर मिळणार याचे समाधान– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर/ मुंबई, दि. 14 : चंद्रपूर शहरातील गरिबांसाठी, असंघटित कामगारांसाठी हक्काची घरे बांधण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.  घरकुल बांधण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आणि  महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्यादीत (महाप्रीत) यांच्यात सामंजस्य करार झाल्याने अत्यंत समाधान झाले असून वेगाने हे काम पूर्ण होईल, असा विश्वास वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे 12 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत  तीन हजार घरे तयार करण्यासंदर्भातील सामंजस्य करार ‘महाप्रीत’ चे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांच्यात झाला.

चंद्रपूर परिसरातील गरजू, गरीब कुटुंब तसेच असंघटित कामगार यांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल आहे असे मी मानतो, असेही ना मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. चंद्रपूर येथे  गरिबांना हक्काची घरे मिळावी यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना करण्यात आल्या होत्या. प्रधानमंत्री आवास योजनेतून खाजगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती याअंतर्गत घरकुल बांधण्याचे नियोजन आहे. या योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरांबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे  निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार दिले होते.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे या बाबतीत महाप्रीतचा प्रस्ताव आणि चंद्रपूर महानगर पालिकेअंतर्गत ऊर्जा संरक्षण आणि संवर्धनसंदर्भात त्यांनी अनेक वेळा चर्चा केली होती.   चंद्रपूर येथे श्रमसाफल्य योजना राबविण्यात येत असून सदर योजना अंमलबजावणीसाठी महाप्रीत  (महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्यादीत) यांच्याकडे देण्यात याव्यात असा प्रस्ताव आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत करण्यात येणारा सार्वजनिक पाणीपुरवठा, दिवाबत्ती, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र तसेच वीज बचत करण्याच्या दृष्टीने अक्षय ऊर्जेचा वापर करणे व त्यासंदर्भातील संवर्धन आणि संरक्षण उपाययोजना करण्याबाबतचा आराखडा तयार करण्याबाबत निर्देश यापूर्वीच्या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

         पुणे दि. १४ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

        यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, हेमंत रासने, गणेश बिडकर आदी विविध संघटनांचे पदधिकारी उपस्थित होते.

           श्री. पाटील म्हणाले, सामाजिक अन्यायाविरुद्ध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाज उठवला, वंचित-शोषितांना न्याय मिळवून दिला. वंचित समाजाने शिक्षण घेतले पाहिजे, त्यांनी संघर्ष केला पाहिजे, त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह होता. त्यामुळे त्यांचे ऋण अनेक पिढ्या विसरु शकणार नाहीत.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित देशाची राज्यघटना जगातली सर्वात चांगली घटना मानली जाते. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले तरी आजही देशाला दिशा देण्याचे कार्य राज्यघटना करीत आहे. आगामी काळातही राज्यघटना आपल्यासाठी दिशादर्शक, मार्गदर्शक राहील, असेही श्री. पाटील म्हणाले.

        पालकमंत्री श्री.पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या १ लाख नागरिकांसाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते मिसळ व ताक बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला.

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न एक महिन्याच्या आत सोडविणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी,दि.१४ एप्रिल (उमाका वृत्तसेवा) – सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनरआकारणी न करता वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात येतील.अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.

राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील ७ कोटी ७८ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनी विखे-पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,‌ तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,  राहता पंचायत समितीचे उप अभियंता देविदास धापटकर, सावळीविहिरचे सरपंच ओमेश साहेबराव जपे‌, बाळासाहेब जपे आदी यावेळी उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री.विखे-पाटील, महापुरुषांच्या जयंती साजरी करतांना त्यांच्या आचार-विचारांवर कार्यकर्त्यांनी काम करावे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेआज आपला देश जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे भव्य स्मारक उभे राहत आहे‌. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे‌. बेरोजगारी कमी होत आहे. कोवीड काळात सतत दोन वर्ष देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य वाटप करण्यात आले. मोफत लसीकरण करण्यात आले.

परिसरातील तरूणांना रोजगाराच्या संधी

नवीन होणारा ग्रीन फिल्ड कॅरिडार, मुंबई -नागपूर समृध्दी महामार्ग पहिला टप्पा सुरू झाला आहे‌. मुंबई ते शिर्डी दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लॅडिंग सुरू झाले आहे. शिर्डी विमानतळाचा विस्तार करत नवीन टर्मिनल इमारत होणार आहे. साविळीविहिर मध्ये नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे‌. सावळीविहिरमधील सोनवाडी येथे पाचशे एकर जागेत लॉजिस्टिक्स पॉर्क, आयटी पार्क  होणार आहे. यामुळे या परिसरातून देशभरातमालाची ने-आण करणे शक्य होणार आहे. यातून येत्याकाळात येथील परिसरातील तरूणांना रोजगारांच्या अनेकसंध्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे येथील तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता एकत्र येत स्वत:चा व्यवसाय सुरू करावेत. असे आवाहन ही महसूलमंत्री श्री‌. विखे-पाटील यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात १ मे पासून डेपोतून ६०० रूपये ब्रास वाळू मिळणार आहे‌‌. अशा प्रकारे ६०० रूपयांत वाळू वाटप करणारा अहमदनगर राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.  जून अखेर जमिनमोजणीचे साडेतीन हजार प्रकरणे निकाली काढून आपणास घरपोच नकाशे देणार आहे. असे ही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सूशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन ही यावेळी महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनींना सायकल, तसे अस्थिव्यंग विद्यार्थ्यांनीना व्हीलचेअर वाटप करण्यात आले.

राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नवी दिल्लीदि. 14 : महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती आज  महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रात उत्साहात साजरी करण्यात आली.

 कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह  महाराष्ट्र  सदनाच्या  अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र सदनातील अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

             महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री विजय कपाटे  यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यांच्यासह  परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर, अधीक्षक रघुनाथ सोनवणे, किशोर वानखेडे, प्रशांत शिवरामे या कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

            सकाळी संसद भवन परीसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समवेत   उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय सामजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, यांच्यासह केंद्रीय मंत्री,  खासदार सर्वश्री, सोन‍ीया गांधी,  मल्लिकार्जून खरगे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचे अुनयायी मोठया संख्येने उपस्थित होते.  

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

            मुंबईदि.14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

           मुंबईदि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

             यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि वर्षा निवासस्थान येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

            मुंबईदि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            याप्रसंगी महाराष्ट्र विधासभेचे माजी सदस्य रामभाऊ गुंडीलेमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव विलास आठवलेउप सचिव ऋतुराज कुडतरकरउप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळीमहाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काजमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती यांच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती सुप्रिया घोटाळेमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे संचालकवि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्रजनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.          

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. १४ : दादरच्या इंदू मिल येथे होत असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.

            दादरस्थित चैत्यभूमी येथील आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस बोलत होते.

            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री अविनाश महातेकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम, आनंदराज आंबेडकर, सुजात आंबेडकर, अखिल भारतीय भिक्खू संघांचे उपाध्यक्ष भदंत डॉ. राहुल बोधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितिचे महासचिव नागसेन कांबळे, चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे, भारतीय बौद्ध महासभाचे अध्यक्ष उत्तम मगरे यावेळी उपस्थित होते.

            राज्यपाल रमेश बैस म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व होते. वंचित आणि उपेक्षित समाज बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी ते अहोरात्र लढले.  मुंबई शहर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. इथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि जागतिक स्तरावरचे नेतृत्व म्हणून इथेच ते नावारुपास आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी मुंबई दर्शनच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘टुरिझम सर्किट’साठी बस सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शासन या माध्यमातून उपक्रम राबवत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. समता, बंधुता व न्याय ही तत्व समाजामध्ये रुजविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीवर आपण सर्वांनी चालले पाहिजे असेही ते म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी दाखविलेल्या मार्गामुळेच आज आपल्या देशाचे नाव जगात आघाडीवर आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना नव्याने सुरू करत आहोत. त्यासाठी राज्य शासन २०-२२ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. बार्टीच्या वतीने  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती साठी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. विविध महामंडळाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते शिक्षण देत आहोत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची व्यवस्था करण्यात येत आहे. इंदू मिल येथील जागतिक दर्जाचे स्मारक लवकरच पूर्ण करणार आहे. बौध्दजन पंचायत समितीच्या इमारतीसाठी २५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार असून वरळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे देखील लवकरच वितरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यात ‘आनंदाचा शिधा’ आपण वितरण करत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,आज आपला देश जगात एक सशक्त लोकशाही म्हणून उभा आहे, याचे श्रेय बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला जाते. समाज सुधारणा केल्यामुळे  आज एक सुधारलेला देश म्हणून आपण ओळखले जातो. समाजातील सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध संस्था स्थापन केल्या आहेत. सारथी, महाज्योती या संस्थांमधून त्या-त्या समाजघटकांसाठी आपण काम करतोय.शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मंत्र त्यांनी समाजाला दिला. त्यादृष्टीने शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आम्ही करत आहोत. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात ४४१ वसतीगृहे व ९० निवासी शाळांमध्ये ६१ हजार ५०० विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली जाते. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणास प्रोत्साहन देत आहोत. त्या शिष्यवृत्तींची संख्या दहा वरून पन्नास करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला मार्गच खरा विकासाचा मार्गउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी भारताला दिलेले सविंधान हे अनमोल देणगी आहे. भारत वेगाने विकास करत आहे याचे सर्व श्रेय आपल्या संविधानाला जाते. संविधान ही जगात आपल्याला पुढे नेणारे ठरेल. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण काम केले पाहिजे. इंदूमिल येथील स्मारकांचे काम वेगाने सुरु आहे. कामात येणाऱ्या अडथळ्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेवून अडथळे दूर करण्यात येईल. पुढील वर्षभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पूर्ण करणार आहोत. जगाच्या पाठीवर हेवा वाटेल असे स्मारक होणार आहे. लंडन मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहीलेले घर महाराष्ट्र सरकारने आपल्या ताब्यात घेतले असून त्या घरामध्ये संग्रहालय सुरू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            नागपूर येथील दीक्षाभूमी येथे अनेक सोयीसुविधा उपलब्ध करीत आहोत. त्यासाठी भरीव निधी दिला आहे. त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘टुरिजम सर्किट’ तयार करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला मार्गच खरा विकासाचा मार्ग असून त्याच मार्गाने राज्य शासनाची वाटचाल सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील अशोक स्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

       मुंबईदि 13 : चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेखासदार राहुल शेवाळेमाजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

            खासदार राहुल शेवाळे यांच्या स्थानिक विकास निधीतून या अशोक स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. या लोकार्पणप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...