गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1055

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कायद्यानुसार पीडितांना निधी वितरित

मुंबई, दि. १० :-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारित अधिनियम, २०१५ व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत पीडितांना  ३१ कोटी ८८ लाख ५०  हजार रुपये इतका निधी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात  उपलब्ध झाला आहे. त्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय कार्यालयाकडून सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९९५ अन्वये अस्पृश्यता पाळणे व ती पाळण्यास उत्तेजन देणे हा गुन्हा असून त्यासाठी या अधिनियमांत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती/जमातींवर होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ लागू करण्यात आलेला आहे. त्या अधिनियमात १९९५ मध्ये केंद्र शासनाने सुधारणा केल्या आहेत. सदर सुधारणा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या आहेत.  अत्याचाराचे प्रकार किंवा गुन्ह्याचे प्रकार व त्यासाठी विहित केलेले सुधारित दर यानुसार नुकसान भरपाई देण्यात येते, असे सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

मुंबई,दि.१०: नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना मदत देण्याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत  दि. ११ जून २०१९ रोजी वादळी पावसामुळे भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेतपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मिळणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने ३.२५ कोटी रुपये अनुदान मंजूर करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकूण ३८५६ बाधित शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे,  अशी माहिती मदत  व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.

0000

संध्या गरवारे‍/विसंअ

पद्मनाभ आचार्य यांना राज्यपाल रमेश बैस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. १० : माजी राज्यपाल श्री. पद्मनाभ आचार्य यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. देशाच्या एकात्मतेसाठी अव्याहतपणे लढणारे ते सच्चे योद्धे होते. अनेक वर्षे उत्तरपूर्व राज्यात राहून तेथील समस्या समजून घेऊन तेथील नागरिकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी व्रतस्थपणे चालवले. नागालँडच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी तेथे अनेक सेवा प्रकल्प राबवले. मुंबई येथे उपनगर शिक्षण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणापासून वंचित घटकांना शिक्षणाची दालने उघडली. पद्मनाभ आचार्य कृतार्थ जीवन जगले, असे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

००००

Padmanabh Acharya lived a purposeful life Maharashtra Governor

Mumbai Dated 10 : The Governor Ramesh Bais has expressed condolences on the demise of former Governor of Manipur, Nagaland, Tripura and Arunachal Pradesh Padmanabh Acharya in Mumbai. In a condolence message, Governor Bais wrote:   “I was deeply saddened to learn about the demise of former Governor of Nagaland Shri Padmanabh Acharya. A true warrior, he dedicated his life for the unity of the country. Spending many years in the North Eastern States, he understood the problems of the people and worked diligently to bring back people into the mainstream of the country. During his tenure as Governor of Nagaland, he implemented various service projects in different parts of the State. As the Founding father of the Upanagar Shikshan Mandal in Mumbai, he opened the gates of education for the marginalised sections of education. Padmanabha Acharya lived a purposeful life. My deepest condolences.”

००००

सौर पंप स्थापित करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर; अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्य अग्रेसर

मुंबई, दि ९ :-  शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून आजपर्यंत ७१ हजार ९५८  सौर पंप स्थापित केले आहे.

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ‘किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान’ म्हणजेच ‘कुसुम’ ही योजना २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी राबवित आहे. या योजनेत राज्यांना ९ लक्ष ४६ हजार ४७१ सौरपंप बसविण्यासाठी मान्यता दिली आहे. देशात यापैकी एकूण २ लक्ष ७२ हजार ९१६ सौर पंप स्थापित झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सौर कृषिपंप महाराष्ट्रामध्ये महाऊर्जामार्फत बसविण्यात आले आहेत.

राज्यनिहाय कुसुम योजनेची सद्यस्थिती

राज्य एकुण मंजूर स्थापित सौर पंप
महाराष्ट्र २,२५,००० ७१,९५८
हरियाणा २,५२,६५५ ६४,९१९
राजस्थान १,९८,८८४ ५९,७३२
उत्तरप्रदेश ६६, ८४२ ३१, ७५२

 

पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे, छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाइन भरण्याची सुविधा देणे, पुरवठादार निवडण्याचे शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुरवठादार निवडल्यानंतर सौर पंप स्थापित करून त्याची आरएमएस प्रणालीद्वारे माहिती घेतली जाते.

नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रातील महाऊर्जास एकूण २ लक्ष २५ हजार सौर पंप आस्थापनेस मान्यता दिली आहे. यापैकी राज्य शासनाने महावितरण कंपनीस त्यांच्याकडील पेड पेंडींगच्या पुढील १ लक्ष सौर पंप आस्थापनेसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे महावितरणकडे कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. महाऊर्जाकडे उर्वरित १ लक्ष २५ हजार सौर पंपाचे उद्दिष्टास अनुसरून राज्यात शेतकऱ्यांकडून ८ लक्ष ७४ हजार ९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १ लक्ष  ४ हजार ८२३ जणांना मान्यता (LOA) देण्यात आली आहे. त्यापैकी ९४ हजार ९१९ जणांना एसएमएस पाठविण्यात आले आहे.  ८३ हजार ४८० शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरला असून  त्यातील ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित झाले आहेत. त्यामुळे महाऊर्जाने ११ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाकडे पुढील १ लक्ष ८० हजार सौरपंपाचे अधिक उद्दिष्टाची मागणीदेखील केली आहे.

सौरपंपासाठी अनुदान

या योजनेंतर्गत  शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येत असुन यात सर्वसाधारण घटकासाठी केंद्र ३० टक्के, राज्य १० टक्के, लाभार्थी १० टक्के तर टोसे ५० टक्के हिस्सा आहे. तर अनुसुचीत जाती आणि जमातीसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के आहे, केंद्र ३० टक्के तर राज्य ६५ टक्के हिस्सा देईल.

यासोबतच राज्य शासनाने स्वत:चे अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२० तयार केले असून  मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली आहे.  १२ मे २०२१ रोजीच्या निर्णयान्वये शासनाने  राज्यात पुढील पाच वर्षांत पाच लक्ष सौर कृषिपंप स्थापित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे केंद्राच्या योजनेसोबतच राज्यही जास्तीत जास्त प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

00000

मनिषा सावळे/विसंअ

मंत्रालयातील प्रदर्शनात महिला बचत गटांकडून ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री

मुंबई दि. १० : महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मंत्रालयात दिवाळीनिमित्त विविध उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे महिला बचत गटांनी सुमारे ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. महिला बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, अल्पसंख्याक विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इन्दु जाखड यांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी महिलांना प्रशस्तिपत्रक प्रदान करून अभिनंदन केले. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयेाजित पणती सजावट स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दिवाळीनिमित्त महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे. ठाणे, मुंबई, पुणे, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, स्वाभिमान प्रकल्प (मालाड) येथून आलेल्या महिला बचत गटांचा यात समावेश आहे. १० स्टॉल असून २० महिलांचा यामध्ये सहभाग आहे. यावेळी त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी पणती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना वस्तू खरेदीत २० टक्के सूट देण्यात आली असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाने दिली आहे.

महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री

मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी फराळ, सेंद्रीय शेतमाल उत्पादनांचा स्टॉल, हस्तकला तोरण, लेदर वर्क, महिलांची सौंदर्य प्रसाधने या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या स्टॉलमधून महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री केली असल्याची माहिती महिला व आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात आली.

००००

संध्या गरवारे/विसंअ

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मिरज, कवलापूरला ‘आनंदाचा शिधा’ वाटप

सांगलीदि. 10 ( जि. मा. का.) : राज्य शासनाने ‘आनंदाचा शिधा’ देऊन सामान्य माणसाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे, अशी भावना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केली.

सोमवार पेठ मिरज आणि कवलापूर येथे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पात्र लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मीना निंबाळकर यांच्यासह परिसरातील मान्यवर पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, आनंदाचा शिधा संचात केवळ १०० रूपयात सहा जिन्नस प्रति लाभार्थी देण्यात येत असल्याने गरजवंतांना सणामध्ये दिलासा मिळाला आहे. आनंदाचा शिधा वितरणात जिल्ह्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. शिधा वितरणामध्ये जिल्हा राज्यात तिसरा आहे. राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात सुमारे 4 लाख 6 हजार 760 कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये सांगली 53392, मिरज  46826, कवठेमहांकाळ  23639,  जत 51047, आटपाडी 22893, कडेगांव 24890,  खानापूर विटा 27088, तासगाव 41612, पलूस 27753, वाळवा 61628 आणि शिराळा तालुक्यात 25992 कुटुंबांना आनंदाचा शिधा संच वाटप करण्यात येत आहे. आनंदाचा शिधा संचात साखर, खाद्यतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येत आहे.

मिरज तालुक्यात प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील 46 हजार 826 लाभार्थी आनंदाचा शिधा संचासाठी पात्र असून आतापर्यंत मिरज तालुक्यात ६२ टक्के कुटुंबांना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आल्याचे तहसीलदार अपर्णा धुमाळ यांनी सांगितले.

कवलापूर येथील आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कवलापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विकास सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

०००००

मिरजच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाची प्रशासकीय प्रक्रिया यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगलीदि. 10 ( जि.मा.का.) : मिरज येथील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालय उभारणीबाबतची प्रशासकीय प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी दोन महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपायुक्त स्मृती पाटील, नगर भूमापन अधिकारी ज्योती पाटील, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे व अनंत गुरव आदि उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जनतेच्या आरोग्यासाठी मिरज येथे या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मिरज येथे १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासन स्तरावर मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ४६ कोटी ७३ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. तरी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, भूमिअभिलेख विभागांनी सकारात्मक भूमिका ठेवत परस्पर समन्वयाने याबाबतची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी. हॉस्पिटलच्या जागेसंदर्भातील अडथळे दूर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

00000

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत

मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्पना अभियान- 2023’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

भारतीय संस्कृतीत  उत्सवांना महत्व असून  दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. नागरिकांनी सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने राज्यभरात जनजागृतीवर  विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानासारख्या मोहिमेतून पर्यावरण संवर्धनासाठी  काम केले जात आहे. या याबाबतची माहिती महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. मोटघरे ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून देणार आहेत.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. मोटघरे यांची ही मुलाखत शनिवार दि. 11 आणि सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, दि. 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

                                                                        ००००

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे मुंबई येथून  प्रयाण

मुंबई, दि. १० :- भूतानचे  राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ, मुंबई येथून भूतानकडे प्रयाण झाले. यावेळी  कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

मुख्यमंत्र्यांचे तिरुपती येथे आगमन; पद्मावती अम्मा मंदिरात घेतले दर्शन

मुंबई दिनांक ९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी उशिराने तिरुपती येथे सहपरिवार आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रथम तिरूचनुर येथे जाऊन श्री पद्मावती अम्मा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून सत्कार केला.

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...