सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 833

प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

नागपूर, दि.22 : सशक्त लोकशाहीमध्ये मतदानाचे पावित्र्य ठेवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे. याच्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही. नागपूर लोकसभेसाठी मागच्या वेळेस अवघे 54 टक्के मतदान झाले होते हे विसरता कामा नये. याचाच अर्थ 46 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन केले नाही. यावेळेस हे चित्र बदलविण्यासाठी सर्व मतदार राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण 75 टक्यांपर्यंत नेतील, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी  एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केला.

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वतयारीचा आज त्यांनी आढावा घेतला. बचतभवन येथे आयोजित केलेल्या या आढावा बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी तथा नागपूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, रामटेक लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर पाठोपाठ रामटेक मध्ये 64 टक्के मतदान मागच्या वेळेस झाले होते. मतदानाचे प्रमाण हे वाढले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी  एस. चोकलिंगम यांनी व्यक्त केली. मतदानाचे प्रमाण 75 टक्यांवर न्यायचे असेल तर मतदानाचा निर्धार हा शंभर टक्क्यांचा हवा. आदर्श गावांमध्ये शंभर टक्के मतदान होणे शक्य असून त्या दिशेने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी तथा नागपूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत सुरु केलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

*******

 

 

मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त

बीड, 22(जिमाका): मतदानामुळेच लोकशाही सशक्त होणार. बीड जिल्ह्यात 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

बीड जिल्ह्याचे मतदान चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी होणार असून जिल्ह्यात 21 लाखापेक्षा अधिक मतदार आहेत या सर्व मतदारांना जिल्हाधिकारी यांनी आवाहन करून सांगितले, की मतदानाचा हक्क 13 मे ला रोजी बजावावा.

निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडण्याचा लोकशाहीचा महोत्सव  दर पाच वर्षांनी एकदाच येतो. यामध्ये आपले कर्तव्य प्रत्येक सुजाण मतदाराने निभावले पाहिजे.

लक्षात असू द्या सोमवार दिनांक 13 मे

बीडजिल्ह्यात चौथ्या टप्प्यात 13 मे ला निवडणुका होणार असून केवळ निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी शासनाने ही विशेष सुट्टी जाहीर केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा बीडवासियांसाठी कार्यरत असून ही संपूर्ण यंत्रणा विशेष परिश्रम घेत आहे. बीडच्या मतदारांची यात मुख्य भूमिका आहे.

 याकाळात  सहली/ तीर्थाटन  करताना सोमवार दिनांक 13  मे तारीख लक्षात असू द्या. आपल्या तर्जनीला शाई लावण्याची ही संधी गमावू नका. आपले नाव मतदान यादीत आहे का हे तपासावे नसल्यास ते 15 एप्रिलपर्यंत मतदान यादीत आणण्यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन प्रक्रिया पार पाडून घ्यावी.

39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर झालेल्या असून निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख ही 18 एप्रिल आहे तर नामनिर्देशन करण्याची तारीख 25 एप्रिल पर्यंत आहे.  अर्जाची छाननी ची तारीख 26 एप्रिल आणि अर्ज मागे घेण्याची तारीख 29 एप्रिल आहे. मतमोजणी 4 जूनला होणार असून एकूण निवडणूक प्रक्रिया ही 6 जूनला संपणार आहे . तरी मतदानाचा दिवस हा महत्त्वाचा असून मतदान 13 मे ला करून लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

                                                        *****

नांदेड जिल्ह्यात कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये : जिल्हाधिकारी

नांदेड दि. 22 : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी भारत निवडणूक आयोग दक्ष असून जिल्हास्तरावरही दिव्यांगांना कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे दिले.

दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबोधित केले.यावेळी प्रत्यक्ष व दूरदुष्यप्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन गंगाधर इरलोड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी विकास माने, यांच्यासह दिव्यांगाचे प्रतिनिधी प्रशिक्षक नितीन निर्मळ, विशेष शिक्षक पाटील सर आदींची उपस्थिती होती.

दिव्यांगांना मतदानासाठी अडचण जाणार नाही अशा पद्धतीचे मतदान केंद्राकडे जाणारे रस्ते, प्रत्येक मतदान केंद्रावर ज्यांची मतदान आहेत अशांची यादी, त्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही यासाठी प्रतीक्षालय, सुलभ रस्ते, पाणी, शौचालय, दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल लिपी, मुबलक प्रकाश व्यवस्था, उपलब्ध करण्याबाबत सूचित करण्यात आले.

लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्व ठिकाणी ही व्यवस्था करण्यात यावी. सर्व ठिकाणच्या व्यवस्थेबाबतची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले. यावेळी उपस्थित दिव्यांग प्रतिनिधींकडून या संदर्भात आणखी काय काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात याबाबतची माहिती प्रशासनाने घेतली. मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना बेसिक साईन लँग्वेजचे प्रशिक्षण देण्याची सूचना यावेळी करण्यात आली. तसेच दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले. या समितीचे सदस्य सचिव समाज कल्याण अधिकारी डॉ. सत्येंद्र  आऊलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000

शांततापूर्ण व निर्भय  निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

भंडारा दि. २२ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी आज ११ भंडारा- गोंदिया लोकसभा  मतदारसंघाच्या निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण ,निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  कमलाकर रणदिवे यांच्यासोबत गोंदिया जिल्हाधिकारी प्रजीत नायर व पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

आज सकाळी श्री. चोक्कलिंगम यांनी गोपेवाडा आणि पलाडी येथील प्रस्तावित मतमोजणी व्यवस्था केलेल्या केंद्रांना भेट देऊन  व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी कार्यकारी अभियंता पराग ठमके, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वंजारी यांच्या सह पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियंत्रण कक्षातील विविध कक्षांना त्यांनी भेट देऊन कामाची माहिती घेतली.

यावेळी आदर्श आचारसंहिता कक्ष, 1950 हेल्पलाइन नंबर, तसेच नियंत्रण कक्षातील स्थानिक संपर्क क्रमांक याबाबत व अन्य दैनंदिन निवडणूक विषयक कामाची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .रणदिवे यांनी त्यांना दिली. सि- व्हिजिल ॲपवरील येणाऱ्या तक्रारींचे निराकरण दिलेल्या वेळेतच करावे , कक्षाच्या विविध कामांवर संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सनियंत्रण ठेवावे. खर्च खर्च समितीने रोज आलेल्या खर्चांवरती नजर ठेवून अहवाल आयोगास विहित वेळेत सादर करावे. माध्यम प्रमाणीकरण व  सनियंत्रण समितीच्या कक्षांची पाहणी त्यांनी यावेळी केली.

त्यानंतर झालेल्या आढावा  बैठकीत 11, भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी केलेल्या पूर्वतयारीमध्ये प्रामुख्याने मनुष्यबळ व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, खर्च नियंत्रण पथक, सहाय्यक मतदान केंद्र, मतदान केंद्रावरील दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, निवडणूक कार्यासाठीचे  आवश्यक प्रशिक्षण, निवडणूक कार्यासाठीचे साहित्य भंडारा -गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भाग व तेथील संवाद व्यवस्था तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या निधीची मागणी करण्याबाबत त्यांनी सूचित केले .

निवडणूक कार्याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या विविध पुस्तिका प्राप्त करून घेऊन त्या संबंधितांपर्यंत पाठवाव्यात  असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

पोस्टल बॅलेट, जिल्हा निवडणूक आराखडा ,तसेच संपर्क व्यवस्था नसलेल्या ठिकाणी करण्यात आलेल्या पर्यायी संपर्क व्यवस्थेबाबतही त्यांनी आढावा घेतला.

मतदार जागृतीसोबतच नोटा याबाबत देखील नागरिकांना माहिती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तृतीयपंथीय मतदारांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग जिल्हा प्रशासनाने आश्वस्त करावा. ज्या  मतदान केंद्रावरील मतदानाचे प्रमाण कमी आहे, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार विषयक जनजागृती करावी.

खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत मतदानासाठी प्रवृत्त करावे तसेच तेथील कार्यरत कामगारांना मतदानासाठी पगारी सुटी मिळेल याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी आस्थापनांची बैठक घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रावरील वेबकास्टिंग विषय नियुक्त चमुचे सनियंत्रण वेळोवेळी करण्यात यावे, तसेच निवडणुकीदरम्यान नगदी रक्कम तसेच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी करण्यात येणाऱ्या  बाबींच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी भंडारा श्री.कुंभेजकर यांनी संगणकीय सादरीकरण करून जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा त्यांना दिला.

निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी लोकशाहीला बळकट करण्यासाठी सेवा करण्याची ही संधी असून या संधीचा उपयोग करून लोकशाही प्रक्रिया बळकट करावी  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

०००००

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर हिंदुजा रुग्णालयातील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे. दैनंदिन जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार कसा असावा तसेच विशिष्ट आजार झाल्यावर काय काळजी घेणे आवश्यक आहे, ताणतणावाच्या परिस्थितीत आपले मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोजेकर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. रोजेकर यांची मुलाखत शनिवार दि. 23, सोमवार दि. 25 आणि मंगळवार दि.26 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 26 मार्च 2024 रोजी दुपारी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

 

 

मुंबईतील ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. २२ : ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व  संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज येथे दिली.

पॉल मर्फी यांनी गुरुवारी (दि. २१) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत असल्याची माहिती पॉल मर्फी यांनी दिली.

भारतीय विद्यापीठांसोबत पदवी अभ्यासक्रमात सहकार्य, विद्यार्थी आदानप्रदान, परस्पर देशांमधील पदव्यांना मान्यता, ‘कमवा, शिका आणि पर्यटन करा’ आदी योजनांबद्दल विचार विनिमय सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी राज्यपालांना दिली.

पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी ब्रिस्बेन व पर्थ ही शहरे देखील मुंबईशी थेट विमानसेवा सुरु करण्याबाबत विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेट उभय देशांना जोडणारा दुवा : राज्यपाल

क्रिकेट हा भारत व ऑस्ट्रेलियाला जोडणारा सशक्त दुवा असून मर्फी यांच्या न्यू साऊथ वेल्स राज्याने क्रिकेट विश्वाला डॉन ब्रॅडमन, अॅलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीव्ह वॉ यांसारखे महान खेळाडू दिले आहेत असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. भारतातील तीन लाखांच्यावर पर्यटकांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला भेट दिल्याचे सांगून आपल्या कार्यकाळात उभय देशांमधील पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येत असून ऑस्ट्रेलियाने भारतीय विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीला ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील उपवाणिज्य दूत क्रिश्चन जॅक व आर्थिक राजनीतिक अधिकारी गरिमा शेवकानी उपस्थित होते.

0000

New Australian Consul General calls on State Governor

The newly appointed Consul General of Australia in Mumbai Paul Murphy called on State Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Thursday (21 Mar).

Describing India as a trusted partner of Australia, Murphy said apart from enhancing business and trade cooperation, he will strive to promote cooperation between Maharashtra and Australia in the areas of higher education, skill development, audio visual co-production, art and culture.

Stating that cities of Brisbane and Perth are keen to start direct flights to and from Mumbai, he said Australia is keen to promote two way tourism in the years to come.

Welcoming the Consul General to Maharashtra, the Governor expressed the hope that Australia would further enhance cooperation with state universities.

0000

उमरखेड खंड एकमधील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती

यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : पृथ्वी मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या नोंदीनुसार दिनांक २१ मार्च रोजी हिंगोली जिल्ह्यात सकाळी ६ वाजून ८ मिनीटांनी व ६ वाजून १९ मिनीटांनी अनुक्रमे ४.५ रिस्टर स्केल व ३.६ रिस्टर स्केल भुकंपाची नोंद झाली आहे.

तालुका स्तरावरील प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील उमरखेड खंड-१ मधील काही भागात सौम्य भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती प्राप्त असून कोणतीही जिवित व वित्त हानी झालेली नाही.

त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जावू नये, सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000

लोकशिक्षकाच्या भूमिकेतून मतदानाच्या कर्तव्य पालनाचे भान द्या! –  डॉ. विपीन इटनकर यांची सोशल मीडिया इन्फ्लुएर्न्स्सना साद

नागपूर, दि. 21 :  लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक पात्र असलेल्या मतदारांनी मतदान करणे हे अभिप्रेत आहे. प्रत्येक नागरिकाच्या राष्ट्रीय कर्तव्याच्या तो भागही आहे. यावर्षी राज्यात सर्वाधिक युवा मतदारांनी नोंदणी करुन नागपूर मतदार संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रत्येक मतदारांमध्ये मतदानासाठी येत असलेले जबाबदारीचे भान आता प्रत्यक्ष मतदानामध्ये परावर्तीत झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक मतदारांना मतदान करण्यासाठी कर्तव्याचे भान द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरांना केले.

नागपूर मतदार संघात 75 टक्केपेक्षा अधिक मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, वरिष्ठ अधिकारी व सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांची उपस्थिती होती. युवा पिढीला भूरळ घालणाऱ्या इन्स्टाग्राम, रिल्स, फेसबुक पेज, रेडिओ जॉकिज असे सोशल मीडियावर प्रभुत्व असलेल्या इन्फ्लुएंसर यांना या बैठकीसाठी विशेष निमंत्रित केले होते.

आजची युवा पिढी ही रिल्स व इतर सोशल मीडियावरील संदेशांना तात्काळ प्रतिसाद देते. यातील सामाजिक आशय आणि संदेशाचा भाग लक्षात घेतला तर एका अर्थाने इन्फ्लुएंसर हे लोकशिक्षकच आहेत. आपल्या देशाच्या लोकशाहीला सक्षम करणाऱ्या मतदान जनजागृती मोहिमेत आपले उत्तरदायीत्व लक्षात घेवून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी स्वीप अंतर्गत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांनी ही एक देशसेवाच आहे असे सांगून आम्हाला याची संधी मिळाल्याबद्दल उत्स्फूर्त तत्परता दर्शविली.

जिल्ह्यात स्विप अंतर्गत मतदारांच्या जागृती व मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन

जिल्हयामध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागांमध्ये मतदारांचे पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम (SVEEP) प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विशेष पुरस्कारही यासाठी ठेवण्यात आले आहे. रिल मेकींग कॉम्पीटेशन (Reel Making Competition), 18 वर्षावरील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांसाठी माझे पहिले मत देशासाठीमी स्वाभिमानी मतदार, स्पर्धा, अपार्टमेंट/ हाऊसिंग सोसयटीसाठी तीन श्रेणीमध्ये स्पर्धा, औद्योगिक क्षेत्रासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सर्व गटातील युवा व इतर मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

अशा आहेत स्पर्धा

नवमतदारसाठी रिल मेकींग कॉम्पीटेशन

या स्पर्धेचा विषय ” मेरा पहिला वोट देश के ‍लिए ” व “मी आहे स्वाभिमानी मतदार” असा आहे. यामध्ये नागपूर जिल्हयातील सर्व १८ ते ३० वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. आपल्या सोशल मिडिया अकॉऊंटमध्ये रिल्स व इतर निर्मिती अपलोड करतांना यामध्ये चुनाव का पर्व, देश का गर्व, वोट करेगा नागपूर, मेरा पहिला वोट देश के लिए या हॉशटॅगचा वापर करावा. नागपूर स्विप आणि जिल्हा निवडणूक कार्यालय इंस्टाग्राम (डिईओ  नागपूर), फेसबुक(डिईओ  नागपूर), व्टिटर (डिईओ  नागपूर) यांना टॅग करावे. या कार्यक्रमाचा कालावधी ३१ मार्च २०२४ राहील. आणि ज्या रिलला सर्वात जास्त प्रतिसाद मिळेल अश्या रिल जिल्हा निवडणूक विभागामार्फत अंतिम करुन आफिशियल रिल म्हणून प्रसिध्द होणार आहे. आपली नोंदणी सोबत दिलेल्या sveepngp2024@gmail.com या ईमेलवर व https://rb.gy/tlddtv या लिंकवर अपलोड  करण्यात यावी. नागपूर विद्यापीठ अंतर्गत शाळा व महाविद्यालयात व्होटींग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर विद्यापीठ अंतर्गत स्पर्धा

या स्पर्धेचा विषय मेरा पहिला व्होट देश के लिए  व  आय एम प्राऊड व्होटर असा राहील. ही स्पर्धा नागपूर जिल्हयातील शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षावरील  विद्यार्थ्यांकरिता आहे. या स्पर्धेत दिलेले उपक्रम दिनांक २१ एप्रिल पर्यंत करावे लागतील. सर्व शैक्षणिक शाळा आणि कॉलेज मधील युवा मतदारांनी १०० टक्के मतदान करण्यासाठी शपथ घेणे. शैक्षणिक संस्थामधील पालक-शिक्षक समितीने “आपले बुथ ओळखा” हा उपक्रम राबविणे. पालक वर्गाला जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी प्रेरित करणे, खाजगी शिकवणी वर्गामधील नवीन मतदारांना सहभागी करणे, विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती वाढविण्यासाठी शाळा व कॉलेज यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करणे हे उपक्रम यात आहेत. याच बरोबर युवा वर्ग आणि सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये SVEEP उपक्रम राबविणे, पूर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान राबविणे, जास्तीत जास्त नाव नोंदणी करणे, त्यांना मतदानाकरिता प्रोत्साहीत करणे व मतदानाची टक्केवारी वाढवून जास्तीत जास्त मतदान होईल याकरिता प्रयत्न करणे आदी बाबी अंतर्भूत असतील. ज्या शाळा व कॉलेजला सर्वात जास्त मतदान होईल त्यामधील तीन शाळा व कॉलेज जिल्हा निवडणूक विभागामार्फत अंतिम करुन त्यांचा स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येईल. नोंदणी  https://rb.gy/grxvem या गुगल ड्राईव्ह लिकला करण्यात यावी. नोंदणी करतांना काही अडचण निर्माण झाल्यास sveepngp२०२४@gmail.com या ई-मेल आयडीवर अडचण नोंदविता येईल.

इमारत उच्च श्रेणी मतदार स्पर्धा

शहरी भागात मतदानाचे प्रमाण कमी असल्याने हाऊसिंग सोसायटीमध्ये  इमारत उच्च श्रेणी मतदार स्पर्धा आयोजित करण्यात  आली आहे. महानगरपालिका किंवा जिल्हयात वेगवेगळ्या नगरपरिषद, नगरपंचायत तसेच पेरी अर्बन ग्रामपंचायतीमध्ये अपार्टमेंट, कॉम्पलेक्स, हाऊसिंग सोसायटी, हॉय राईसेसमध्ये स्पर्धा खालील तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.

प्रथम गट-  50 पर्यंत कुटुंब संख्या असलेल्या फ्लॅट , अपार्टमेंट , हाऊसिंग सोसायटी. द्वितीय गट- 50 पेक्षाजास्त व 100 पेक्षा कमी कुटूंब संख्या असलेल्या फ्लॅट,अपार्टमेंट,हाऊसिंग सोसायटी तर तृतीय गट- 100 पेक्षाजास्त कुटुंब संख्या असलेल्या फ्लॅट, अपार्टमेंट, हाउसिंग सोसायटी असे आहेत.

वरील तिन्ही गटामधील सर्व 18 वर्षावरील मतदार यांना सहभागी होता येईल. सदर स्पर्धेचा अंतीम दिनांक २१ एप्रिल राहील.  प्रत्येक गटामधील ज्या फ्लॅट, अपार्टमेंट,  हाउसिंग सोसायटीमध्ये सर्वात जास्त मतदान होईल, त्या प्रत्येक गटामधील तीन फ्लंट, अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमधील मतदारांनी केलेल्या मतदानाचे प्रमाण लक्षात घेवून  जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत निवड केली जाईल. विजेत्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.

वरील वर्गवारीत मोडणाऱ्या सर्व फ्लॅट अपार्टमेंट, हाउसिंग सोसायटी यांनी आपली नोंदणी https://rb gy/1i94co या गुगल लिंकवर करणे अनिवार्य राहील. नोंदणी करतांना काही अडचण निर्माण झाल्यास sveepngp२०२४@gmail.com या ई-मेल आयडी वर आपली अडचण नोंदवू शकतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त फ्लॅट, अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटी मधील मतदार या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

उद्योग क्षेत्रातील कामगारासाठी मतदान स्पर्धा

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात कारखान्यात काम करणाऱ्या कामगारासाठी मतदान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा विषय आय ॲम प्राऊड वोटर अर्थात मी स्वाभिमानी मतदार असा राहील. यामध्ये नागपूर जिल्हयातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात काम करणाऱ्या ५० पेक्षा जास्त संख्या असलेल्या कामगारांना सहभाग घेता येईल. १८ वर्षावरील औद्योगिक क्षेत्रात कारखान्यात काम करणारे मतदारांना यांना सहभागी होता येईल. या स्पर्धेचा अंतीम 21 एप्रिल असा आहे.

यामध्ये पुढील या बाबींचा समावेश असेल. सर्व औद्योगिक घटक व विविध कामगार संघटना यांनी सहभाग नोंदवावा. पात्र कामगार मतदारांचे नाव नोंदणी करणे, मतदानाविषयी शपथ घेणे, जनजागृती करणे, विविध स्पर्धा आयोजित करणे, त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करणे व मतदानाची टक्केवारी वाढवून जास्तीत जास्त मतदान होईल यादृष्टीने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करणे आदी बाबी यात अंतर्भूत असतील.

ज्या औद्योगिक क्षेत्रात व कारखान्यात सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी होईल. त्यामधील तीन औद्योगिक घटकांना जिल्हा निवडणूक विभागामार्फत अंतिम करुन त्यांना स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येईल.

आपली नोंदणी Registration https://rb gy/n80jv9 या गुगल ड्राईव्ह लिंकवर अपलोड करण्यात यावी. काही अडचण निर्माण झाल्यास sveepngp२०२४@gmail.com या ई-मेल आयडी वर आपली अडचण नोदविता येईल.

00000

राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपिलीय समितीची बैठक संपन्न                                           

            मुंबई, दि. 21 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या  निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपीलीय समितीची Media Certification and Monitoring Committees-MCMC). [Appellate Committee] आढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य एस चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

            मंत्रालयात झालेल्या  राज्यस्तरीय अपिलीय  समितीच्या आढावा बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य. यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

            प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (MCMC) गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यस्तरावर सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली  माध्यम प्रमाणिकरण समिती (State Level Certification Committee) स्थापन करण्यात आलेली आहे. या दोन्ही समित्यांनी दिलेल्या निर्णयांविरुध्दचे अपील तसेच पेड न्यूज संदर्भात दाखल झालेल्या प्रकरणांवर निर्णय देण्यासाठी राज्यस्तरावर एस चोक्कलिंगम (भाप्रसे), प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती Media Certifiaction and Monitoring Committees-MCMC). [Appellate Committee] गठीत करण्यात आलेली आहे.

            सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष व उमेदवार निवडणूक प्रचारासाठी विविध माध्यमांचा वापर करीत असतात. यामध्ये मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमे, जाहिरात फलक तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांचा समावेश असतो. या सर्व माध्यमांचा वापर तसेच त्यासाठी येणाऱ्या खर्चावर सनियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. नामनिर्देशनापासून ते मतदानाच्या दिनांकापर्यंत उमेदवाराकडून वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रचार साहित्यावर निवडणूक आयोगाची नजर असणार असून कुठल्याही मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी जाहिरात प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यासंदर्भातील काम तसेच विनाप्रमाणीकरण प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, पेडन्यूज याबाबत समितीचे नियंत्रण व देखरेख असणार आहे.

            केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने विविध निर्देश दिले आहेत. आयोगाच्या नियमावलीचे काटेकोर पालन सर्व संबंधितांकडून केले जाईल, कुठल्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून आचारसंहिता काळात केले जाणार नाही, यासाठीचे नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची आहे.

            केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे राज्यस्तरीय एमसीएमसी अपिलीय समितीच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन करुन श्री.चोक्कलिंगम यांनी समितीच्या कार्यकक्षेतील सर्व बाबीची कार्यवाही तत्पर आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

००००

वंदना थोरात/विसंअ/

‘आयएसबी’च्या सायबर सुरक्षेबाबत अहवालाचे प्रकाशन

मुंबई, दि. २१ : पायरसी वेबसाइट्स मालवेअरचा प्रसार करण्यासाठी मोठे मध्यम बनले आहेत. ग्राहक केवळ पायरेटेड मुव्ही किंवा टीव्ही शो पाहत नसून ते त्यांच्या ‘डिव्हाइस’शी तडजोड करत आहेत आणि तुमचे ‘ डिव्हाईस’ ‘दुसरे तुम्हीच’ आहात. त्यात तुमची ओळख, तुमचे बँकिंग तपशील, तुमचे मित्र आणि कुटुंबीयांचे तपशील असतो. अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी संदिग्ध होत्या, त्यांचा आता या अहवालात खुलासा करण्यात आला आहे. आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस) चा अहवाल या बदलाची सुरुवात आहे, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझनेस) द्वारे सायबर सुरक्षेबाबत सर्वंकष अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरील अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दक्षिण आशियाचे अमेरिकी बौद्धिक संपदा सल्लागार जॉन कॅबेका, प्रादेशिक संचालन प्रमुख नील गणे आणि आयएसबी ‘ ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स’चे प्रा. मनीष गंगवार आदी मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य दूतावास, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी कार्यकारी संचालक मनीष गंगवार,  ला ट्रोब युनिव्हर्सिटी (मेलबर्न) येथील सायबर सुरक्षा विभागाचे सहायक प्रा. डॉ. पॉल वॉटर्स,  कॅरिन टेंपल यांनीही आपली मते मांडली.

‘आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स’ चे प्रा. गंगवार आणि डॉ. श्रुती मंत्री,  मेलबोर्नच्या ‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी’ येथील सायबर सिक्युरिटीचे सहायक प्राध्यापक डॉ. पॉल वॉटर्स यांनी ‘दि पायरसी- मालवेअर नेक्सस इन इंडिया : अ परसेप्शन आणि अनुभव आणि अनुभवजन्य विश्लेषण’  या कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य दूतावास, मुंबई येथे अलायन्स फॉर क्रिएटिव्हिटी अॅण्ड एन्टरटेन्मेट (एसीई), आयएसबी  इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स (आयआयडीएस ) आणि एसीई यांनी युनायटेड स्टेट्स पेटंट अॅण्ड ट्रेडमार्क ऑफिस (यूएसपीटीओ) च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

अहवालातील निष्कर्ष

अहवालात प्रौढ उद्योग ५७ टक्के आणि जुगाराशी संबंधित जाहिरातीच्या ५३ टक्के तुलनेत पायरसी साइट्समध्ये प्रवेश केल्याने मालवेअर संसर्गाचा ५९ टक्के जास्त धोका उद्भवतो. ‘वायरस टोटल’ चा उपयोग करून १५० वेबसाइट्सच्या विश्लेषणात मालवेअर, संशयास्पद क्रियाकलाप, फिशिंगचे प्रयत्न आणि स्पॅम यासारख्या सायबर जोखीम असल्याचे समोर आले.  मानक पायरसी संकेतस्थळांच्या तुलनेत “स्कॅम पायरसी संकेतस्थळ” उपयोग कर्त्यांना सायबर धोक्यांना समोर आणण्याचा धोका जास्त असतो.

मालवेअर वितरण पायरसी साइट संचालकांसाठी अतिरिक्त महसूल उत्पन्न करण्यासाठी भारतात ऑनलाइन पायरसी फायदेशीर राहिली आहे. भारतीय ग्राहक पायरसी साइट्सचा उपयोग करतांना त्यांच्या खऱ्या सायबर जोखमीला कमी लेखतात, पायरसी संकेतस्थळाशी संबंधित सायबर सुरक्षा धोक्यांकडे लक्ष देण्याची तातडीची गरज आहे यावर भर देतात. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (आयएसबी ) सायबर सुरक्षा तज्ञांनी केलेल्या तळागाळातील धारणा आणि अनुभव अध्ययनात (ग्राऊंड पर्सेप्शन ॲण्ड  एक्सपिरिअन्स स्टडी) मालवेअर संसर्गाचा भारतीय ग्राहकांसाठी ५९ टक्के जोखीम असलेल्या पायरसी वेबसाइट्स एक प्रमुख धोका असल्याचे समोर आले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे १८-२४ वर्षे वयोगटातील उपयोगकर्ते जे या प्लॅटफॉर्मवर जास्त व्यस्त असतात त्यांच्यात सायबर धोक्यांबाबत कमी जागरूकता असल्याचे दिसून आले.

हे सर्वेक्षण हे २३ ते २९ मे २०२३ या कालावधीत करण्यात आले. ‘YouGov’ नॅशनल ऑम्निबसचा भाग म्हणून भारतातील १०३७ उत्तररदात्यांचा यात समावेश आहे. भारतातील प्रौढ नागरिकांच्या वारंवारतेच्या प्रमाणात लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांवर आधारित १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ऑनलाइन लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डेटाचे संतुलन करण्यात आले.

हा संपूर्ण अहवाल https://www.isb.edu/content/dam/sites/isb/India-Piracy-and-Cyber-Threats-Report-DM.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते २२ जुलै रोजी प्रकाशन

0
मुंबई, दि. २१ :-  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या...