शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 768

दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सुविधा उपलब्ध

मुंबई, दि. १३ : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा मिळविण्यासाठी आवश्यक असलेली मागणी सक्षम ॲपवर नोंदवावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना संबधित सुविधा पुरविणाऱ्या शासकीय व स्थान निश्चिती यंत्रणेला दिव्यांग व वयोवृध्द मतदारांच्या मागणीनुसार आवश्यक मदत म्हणजेच गरजेनुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे श्री. यादव यांनी सांगितले. मतदानाच्या दिवसापर्यंत सक्षम ॲपवर दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना मागणी नोंदविता येणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मागणी नोंदविण्यात येत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची जोरदार तयारी सुरू आहे.

दिव्यांग व ज्येष्ठांना सक्षमचे सहाय्य

दिव्यांग आणि वयोवृध्द मतदारांना (८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक) मतदान करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल, असे सक्षम मोबाईल ॲप भारत निवडणूक आयोगाने तयार केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहिम हे विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघास जोडलेले आहेत. तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघास वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा हे विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत.

हेल्पलाईन व व्हिडीओ कॉल सुविधा

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडून १९५० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आला असून ०२२-२४१८३१४४ / ७०३९२९७१९७ हे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या भ्रमणध्वनी क्रमांकावर कर्णबधीर मतदारांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधण्यासाठी व्हिडिओ कॉल सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागातील दिव्यांग मतदार सुविधेसाठीचे नोडल अधिकारी सुनिता मते यांनी दिली.

मतदान केंद्रांवरही सुविधा

भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरही दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, रांगांमध्ये बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आवश्यकतेनुसार व्हिलचेअर, सहाय्यक स्वयंसेवक विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे.

मेडिकल किट, माहितीचे फलक, कर्णबधिरांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधणारे स्वयंसेवक, दृश्य  माहिती, ब्रेललिपीतील सूचना आदी सुविधा देण्यात येणार आहेत. अंध मतदारांना ब्रेललिपीतील मतदार स्लिपचे वाटप करण्यात आले आहे.  तसेच सर्व मतदान केंद्रावर अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीतील डमी मतदानपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दिव्यांग मतदार/वृद्ध मतदार व त्यांच्या सहाय्यकास मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता व्हिलचेअर फ्रेंडली वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ३५ मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत २३०९ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. तसेच, ज्येष्ठ ३३ तर दिव्यांग २ मतदारांनी असे एकूण ३५ मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली.

२८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदान घेण्यात आले. १९० पैकी ३३ ज्येष्ठ नागरिक आणि दोन दिव्यांग अशा ३५ मतदारांनी मतदान केले आहे, तर, २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २३०९ मतदारांनी टपाली पद्धतीने मतदान केले आहे. धुळे मतदारसंघासाठी २२ मतदारांनी टपाल पद्धतीने मतदान केले. दिंडोरीसाठी १० मतदारांनी, नाशिकसाठी ३१, पालघरसाठी ३९, भिवंडीसाठी २४२, कल्याणसाठी २३७, ठाणेसाठी २१०, मुंबई उत्तरसाठी – ७३, मुंबई उत्तर पश्चिमसाठी – ७५, मुंबई उत्तर पूर्वसाठी – ८१६, मुंबई उत्तर मध्यसाठी – १५२, मुंबई दक्षिण मध्यसाठी – ३०६, मुंबई दक्षिणसाठी ९६ असे एकूण २३०९ मतदारांनी मतदान केले आहे.

०००

 

 

खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च)  सुनील यादव (आयआरएस) हे तीन वेळेस 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदींची तपासणी करणार आहेत. मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी 9 मे 2024 रोजी करण्यात आली. या तपासणीत नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय बंडू पाटील आणि अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील हे उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांना सूचना देऊनही ते दुसऱ्या वेळेस उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 171 (आय) मधील तरतुदीनुसार या दोन्ही उमेदवारांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून सुनील यादव (आयआरएस) यांची नियुक्ती केली आहे.  केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. यादव  यांनी दि. ९ मे, २०२४ रोजी उमेदवारांच्या निवडणूक खर्च नोंदवह्यांची प्रथम तपासणी केली. त्यावेळी २८ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक खर्च प्रतिनिधी यांनी निवडणूक खर्च लेखा तपासणीस खर्च नोंदवहीसह उपस्थित राहणे अपेक्षित होते.

तथापि, सदर तपासणीस नॅशनल पीपल्स पार्टीचे  संजय बंडू पाटील  आणि  संजय निवृत्ती पाटील, अपक्ष हे उमेदवार उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांच्या प्रतिनिधीनेही निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर केली नाही.

तपासणीसाठी उपस्थित राहण्यास सर्व उमेदवारांना लेखी कळविण्यात आले होते. मात्र हे दोन उमेदवार  9 मे रोजी उपस्थित न राहिल्याने,  दि. ११ मे, २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पुनश्च उपस्थित राहण्याची एक संधी देण्यात आली होती. तथापि, नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय बंडू पाटील,  आणि अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील यांनी  स्वतः किंवा आपल्या खर्च प्रतिनिधीमार्फत निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर केली नाही.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ मधील कलम ७७ (१) अन्वये निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने स्वतः किंवा त्याच्या खर्च प्रतिनिधीने, निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याच्या दिनांकापासून ते निकाल जाहीर झाल्याचा दिनांक हे दोन्ही दिवस धरून, होणाऱ्या कालावधीच्या दरम्यान उमेदवाराने किंवा त्याच्या खर्च प्रतिनिधीने स्वतः केलेल्या किंवा त्यांनी प्राधिकृत केल्यानुसार झालेल्या निवडणूक खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा विहित नमुन्यात ठेवणे बंधनकारक आहे.

तरी या दोन्ही उमेदवारांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ मधील कलम ७७ (१) मधील तरतूदीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम १७१ (आय) मधील तरतुदीनुसार या दोन्ही उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

➡️ नंदुरबार –  ६०.६० टक्के

➡️ जळगाव –  ५१.९८ टक्के

➡️ रावेर – ५५.३६ टक्के

➡️ जालना – ५८.८५ टक्के

➡️ औरंगाबाद  – ५४.०२  टक्के

➡️ मावळ – ४६.०३ टक्के

➡️ पुणे – ४४.९० टक्के

➡️ शिरूर –  ४३.८९ टक्के

➡️ अहमदनगर-  ५३.२७ टक्के

➡️ शिर्डी – ५२.२७ टक्के

➡️ बीड –  ५८.२१ टक्के

०००

पाळणाघरांचा उपक्रम ठरला उपयुक्त…

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका): लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविले. त्यात लक्षणीय आणि अभिनव उपक्रम ठरला तो मतदान केंद्रांवर पाळणाघरे स्थापित करण्याचा. हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. अनेक मातांनी आपलं कडेवरचं बाळ पाळणाघरात सांभाळायला देऊन आपले लोकशाहीप्रति कर्तव्य बजावले.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’, ही मातेची महती. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मातांनी आपली बालके प्रशासनाने उभारलेल्या पाळणाघरात सोपवून आपला मतदानाचा हक्क बजावला, आणि ही मतदार माऊली लोकशाहीची उद्धारकर्ती झाली.

महिला मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. त्यात हा उपक्रम सर्वात उपयुक्त आणि लक्षणीय ठरला. मतदान केंद्रांवर पाळणाघरे स्थापित करण्याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला निर्देश दिले. त्यानुसार महिला बालकल्याण विभागामार्फत कार्यवाही करुन अंमलबजावणी करण्यात आली. एखादी माता मतदानासाठी आली असता तितकावेळ तिच्या कडेवरील बाळाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ होणे अपेक्षित आहे. किंवा मतदार लहान मुलासह मतदानाला आल्यास त्या मतदाराला मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ त्या बाळाला सांभाळण्यासाठी पाळणा घर सुविधा देण्यामागचा विचार होता.

प्रत्येक पाळणाघर एका अंगणवाडी ताईंकडे सोपविण्यात आले. या ठिकाणी येणाऱ्या बालकाला तिथं अनेक खेळणी, झोपाळ्यात असलेल्या बालकांसाठी प्रत्यक्ष पाळणे, प्यायचे पाणी, बेबी फुड आदींची सज्जता होती. जिल्ह्यात शहरी भागात १८० तर ग्रामिण भागात  १६५० पाळणाघरे सज्ज होते. ज्या इमारतीत अनेक मतदान केंद्र असतील तेथे त्या इमारतीत एक पाळणा घर याप्रमाणे नियोजन होते. पाळणाघराचा लाभ हा स्तनदा माता, लहान बालके असणाऱ्या मातांना खूप झाला.  त्यांनी आपली बालके पाळणाघरात सोपविली. तेथली खेळणी व आकर्षकता पाहून बालकेही तिथे रमली. बागडली. त्यांच्या किलबिलाटाने पाळणाघर गजबजले. लोकशाहीसाठी आपले मतदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या मातांना ही एक चांगली सुविधा होती. त्यामुळे महिलांचा मतदानातील सहभाग होतांना दिसत होता.

०००

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असणार महिला, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र

मुंबई, दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी संचलित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. मतदान केंद्र उभारणीची सर्व तयारी आणि नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत देण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 26 मतदारसंघ आहेत. 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत, तर चेंबूर आणि अणुशक्तीनगर या दोन मतदारसंघांचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लोकसभा मतदारसंघात आहे. या चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 7,384 एवढ्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर मतदारांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एका मतदान केंद्रांचे संचलन महिला, तरुण आणि दिव्यांग अधिकारी व कर्मचारी करणार असून त्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात महिला अधिकारी व कर्मचारी संचलित एकूण 26, तरुण अधिकारी व कर्मचारी संचलित 26, तर दिव्यांग अधिकारी व कर्मचारी (सक्षम केंद्र) संचलित एकूण 26 मतदान केंद्र असतील, असेही जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

०००

११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान

मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.

        चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार –  ४९.९१ टक्के

जळगाव –   ४२.१५ टक्के

रावेर –  ४५.२६ टक्के

जालना – ४७.५१  टक्के

औरंगाबाद  – ४३.७६  टक्के

मावळ – ३६.५४ टक्के

पुणे – ३५.६१ टक्के

शिरूर –   ३६.४३ टक्के

अहमदनगर-  ४१.३५ टक्के

शिर्डी – ४४.८७ टक्के

बीड –  ४६.४९ टक्के

***

संजय ओरके/विसंअ/

 

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – ३७.३३ टक्के
जळगाव- ३१.७० टक्के
रावेर – ३२.०२ टक्के
जालना – ३४.४२ टक्के
औरंगाबाद – ३२.३७ टक्के
मावळ -२७.१४ टक्के
पुणे – २६.४८ टक्के
शिरूर- २६.६२ टक्के
अहमदनगर- २९.४५ टक्के
शिर्डी -३०.४९ टक्के
बीड – ३३.६५ टक्के

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – २२.१२ टक्के
जळगाव- १६.८९ टक्के
रावेर – १९.०३ टक्के
जालना – २१.३५ टक्के
औरंगाबाद – १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे – १६.१६ टक्के
शिरूर- १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड – १६.६२ टक्के

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान            

 मुंबईदि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.

 एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…

नंदुरबार  – ८.४३ टक्के

जळगाव  – ६.१४ टक्के

रावेर    – ७.१४ टक्के

जालना   – ६.८८ टक्के

औरंगाबाद  -७.५२ टक्के

मावळ  – ५.३८ टक्के

पुणे  – ६.६१ टक्के

शिरूर – ४.९७ टक्के

अहमदनगर -५.१३ टक्के

शिर्डी  – ६.८३  टक्के

बीड  – ६.७२ टक्के

 

0000

संध्या गरवारे/ वि.सं.अ

ताज्या बातम्या

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आमचा श्वास मराठी; मुंबईला जगाशी जोडतो...

0
मुंबई दि. १८: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ...

विधानसभा लक्षवेधी

0
सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणार-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मुंबई, दि. १८ :- सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पास राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता घेऊन या...

राज्यात यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण -क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

0
शासनाच्या निर्णयामुळे गोविंदांमध्ये उत्साह मुंबई, दि. १८ : दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचण्याच्या पारंपरिक प्रथेस साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदाचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून...

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना...

अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरातून राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १६ विधेयके मंजूर...

0
मुंबई, दि. १८ : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकासह महत्त्वाची १६ विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरामध्ये महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट...