बुधवार, जुलै 16, 2025
Home Blog Page 759

२३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर युवा, महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रे – निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव

ठाणे, दि. १५ (जिमाका):    लोकसभा निवडणुका येत्या 20 मे 2024 रोजी होत आहे, या निवडणुकांसाठी सर्व लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू आहे. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून  23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहे.  यामध्ये युवा, महिला संचलित मतदान केंद्र आणि दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात युवा, महिला व दिव्यांग अशी मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

युवा मतदारसंघात मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी हे युवा असणार आहेत. युवा मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे 134 भिवंडी ग्रामीणमध्ये मतदान केंद्र क्रमांक 10 वाडा नगरपंचायत वाडा, मतदान केंद्र क्रमांक 291 ओसवाल इंग्लिश मीडियम हायस्कूल अंजुर, मतदान केंद्र क्रमांक 91 शिशुविहार शाळा दांडेकर पोस्ट ऑफिस जवळ, मतदान केंद्र क्रमांक 197 न्यू हायस्कूल जोशीबाग कल्याण, मतदान केंद्र क्रमांक 308 न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड, मतदान केंद्र क्रमांक 157 युवा मतदार केंद्र खाडे विद्यालय शहापूर या ठिकाणी युवा मतदान केंद्र असणार आहेत.

सखी महिला मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी या सर्व महिलाच असणार आहेत. महिला मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे महिला संचलित  135 शहापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्र क्रमांक 170 जिल्हा परिषद शाळा,वाशिंद, मतदान केंद्र क्रमांक 208 जिल्हा परिषद शाळा कांबे, मतदान केंद्र म्हणून 258 होली मेरी हायस्कूल राहनाळ, 136 भिवंडी विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्र क्रमांक 166 महिलां कर्मचारी संचलित  राईस हायस्कूल, भिवंडी, 137 भिवंडी पूर्व  मतदान केंद्र म्हणून 299 माध्यमिक विद्यालय नवीन बिल्डिंग भादवड, 139 मुरबाड अंतर्गत महिलांकरता मतदान केंद्र क्रमांक 238 हेवेनबल कॉन्व्हेंट स्कूल शिरगाव, आपटेवाडी बदलापूर याठिकाणी महिला मतदान केंद्र असणार आहेत.

तर दिव्यांग मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी हे सर्व दिव्यांग कर्मचारी असणार आहेत.दिव्यांग मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे केंद्र 154 मतदान केंद्र खाडे विद्यालय शहापूर, मतदान केंद्र क्रमांक 66 प.रा. विद्यालय, मतदान केंद्र 145 विस्डम अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल, अंसार नगर नागाव,  138 कल्याण पश्चिम मतदान केंद्र 6 महर्षी रघुनाथ कर्वे महापालिका शाळा क्रमांक 12 उंबर्डे, मतदान केंद्र क्रमांक 353 जिल्हा परिषद शाळा नांदप, मतदान केंद्र क्रमांक 60 राजश्री शाहू महाराज विद्यालय पवार कॉम्प्लेक्स बेलवली येथे असणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

०००

कल्याण पूर्वेतील खासगी आस्थापना, हॉटेलमधील मतदारांमध्ये स्वीपने केली मतदान जागृती

ठाणे,दि.१५ (जिमाका): येत्यालोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी कल्याण पूर्व येथील दुकानदार, हॉटेलचालक तसेच खासगी आस्थापनांमध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा मतदार संघातील 142 कल्याण (पूर्व) विघानसभा मतदार संघाचे  सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकाच्या (मतदार जनजागृतीपथक )  माध्यमातून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो… लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मत अमूल्य आहे .. तेव्हा सर्वानी मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन यावेळी दुकानदार, हॉटेलचालक व खाजगी आस्थापनांमधील मतदारांमध्ये स्वीप पथकाने केली. महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली मलंग रोड येथील महेश डेअरी, हॉटेल जयमल्हार, आहेर होंडा बाईक शोरुम, रंगीला बार ॲण्ड रेस्टॉरंट, कशीश बार ॲण्ड रेस्टॉरंट,  हॉटेल 50-50 धाबा इत्यादी खाजगी आस्थापनांमध्ये  जाऊन मतदान विषयक पत्रके वितरीत करुन तेथील कर्मचाऱ्यांना व नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच येत्या 20 मे रोजी मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी प्रणव देसाई, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, भारती डगळे उपस्थित होते.

०००

१४२ कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून ७ लाखांची रोख रक्कम जप्त

ठाणे, दि. १५ (जिमाका) :  24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) पथकाने काल रुपये 7 लाख इतकी संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांच्याकडे आढळलेल्या बेकायदेशीर वस्तू जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी या पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथे काल दि. 14 मे 2024 रोजी एसएसटी पथकातील कर्मचारी प्रवासी पुलावरील टिकीट खिडकीजवळ प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत असताना जयेश पोटे (रा.पुना लिंक रोड कोळसेवाडी, कल्याण (पूर्व)) यांच्याकडे असलेल्या बॅगेबाबत विचारणा केली. त्यावेळी बॅगेमध्ये रोख रक्कम असल्याचे संबंधितानी सांगितले. परंतू, सदर रोख रक्कमेबाबत संबंधितांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदरची रक्कम रुपये 7 लाख पंचनामा करून जप्त करण्यात आली. जप्त केलेली रक्कम कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सीलबंद करून जमा करण्यात आले असल्याची माहिती 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे पथकप्रमुख दीपेश राठोड यांनी दिली आहे.

०००

दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये १३३३ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

मुंबई, दि. १५: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या पाचव्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने निवडणूक विषयक अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात पार पडले. या दोन दिवसीय प्रशिक्षणात 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

येत्या 20 मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी चारही लोकसभा मतदार संघांतर्गत मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील दहिसर विधानसभा मतदारसंघात क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. हे प्रशिक्षण दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले.

प्रशिक्षण सत्राचा उद्देश मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना निवडणुकीसंबंधित आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करून निवडणुकांचे निर्विघ्न आणि विनाविलंब संचालन सुनिश्चित करणे हे होते. प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रिया, मतदार पडताळणी, मतदार व्यवस्थापन, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट  मशीनचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि संकट व्यवस्थापन इत्यादी विषय अंतर्भूत होते. दिनांक 14 आणि 15 मे या 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

अधिकाऱ्यांना प्रशिक्षणामार्फत प्रदान केलेल्या ज्ञानाचे कितपत आकलन झाले हे ऑनलाईन परीक्षेद्वारे पडताळण्यात आले. या प्रशिक्षणासाठी उपस्थितांनी सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना निवडणूक व्यवस्थापनाबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली.

 

मुंबई शहरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ५४३ ज्येष्ठ नागरिक व ९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणाले, टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते. ३०-मुंबई दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात अर्ज केलेल्या ३१० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ०९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेत टपाली मतपत्रिकेद्वारे घरून मतदान केले. ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात २३३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सुविधेचा लाभ घेत घरून मतदान केले आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवार (दि.१४ मे) पासून गृह मतदानास प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय २ टीमची नियुक्ती केली आहे. ही टीम मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहे.

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात ७७३ ज्येष्ठ नागरिक व ४८ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली असून ३०-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ६०४ ज्येष्ठ नागरिक व २९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती श्री. यादव यांनी दिली.

मुंबई शहरात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत १९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला सोमवार, १४ मे पासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी १९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले अत्यावश्यक सेवेतील १३७३ कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले.

तर ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ६०१ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला. १६ मे, २०२४ पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे.

टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित कर्मचारी यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे स्वागत

मुंबई, दि. १५ : त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे आज भारताच्या दौऱ्यावर मुंबईत आगमन झाले.  पंतप्रधान डॉ. रॉली व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांचे ओबेरॉय हॉटेल येथे राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलींद हरदास यांनी स्वागत केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक  पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळात त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे परिवहन मंत्री रोहन सिनानन, क्रीडा व समुदाय विकास मंत्री शामफा कुडजो लेविस, भारतातील उच्चायुक्त डॉ. रॉजर गोपॉल आदींचा समावेश आहे.

००००

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था; मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई, दि. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ वयावरील असलेले ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघानिहाय दिव्यांग मतदार समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समन्वयक अधिकाऱ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
१५२ बोरीवली- कृतिका गंधारे- ९८३३४४०४२३,
१५३ दहिसर- वंदना हरीनामे- ९८२०११८४५७
१५४ मागठाणे- दिलिप दुर्गे-८७७५७२२४६० / स्मिता परमार- ९८२०४५७३२७
१५५ मुलुंड- राजाराम शेळके-९६५३१५८०७८ / कैलास जाधव- ९५६१४५८७९४
१५६ विक्रोळी- सुनिल पावळे-७२७६००९१४७ / सुप्रिया मोरे- ९८९२६६९५३०
१५७ भांडुप- निखिल मराठे- ८८८८८२४९५० / नम्रता कुलकर्णी – ७७३८३७६५७३
१५८ जोगेश्वरी- नुतन वंजारा- ९१६७१६६४१२ / स्मिता परब- ९८१९३६८८२७
१५९ दिंडोशी- प्रमोद पाटील-९८६९७२८१०० / योगेंद्र वसंत भांड-८०८७५००८९७
१६० कांदिवली- राजेंद्र माळवे-९९७०२३४९०९ / बिपीन वडे – ९०४९३६५०१८
१६१ चारकोप- रेखा गांगुडे – ९८२०९११२९०
१६२ मालाड- अर्चना लाळगे- ९९६९७९५०७८
१६३ गोरेगाव-  मंजू वैश्य-८३६९३०६८६० / साक्षी लाड- ९८३३३१७२१२
१६४ वसोवा- बालाजी कांबळे- ९९६०२८३१३१ / राजेश्री सदावर्ते- ७०५८७०६७८७
१६५ अंधेरी प- सचिन कटके- ८६२३९५२२८६ / अर्चना जाधव- ९९३०९९०७८९
१६६ अंधेरी पूर्व- सुनिता चव्हाण- ७९७७७६३४८७
१६७ विलेपार्ले- गोविंद पेडेकर- ९३२१९८२८०६
१६८ चांदिवली- बालाजी जानते-९८६९५६१७५६, ९७०२९५३८१५ / उज्वला चव्हाण- ९९६९३५०७६७
१६९ घाटकोपर (पश्चिम)- माधवी सावरकर- ८८५००७६६८२ / अश्विनी पळशीकर- ९८१९९३७८३७
१७० घाटकोपर (पूर्व)- प्रफुल्ला पुरबिया-९९१९७४८४५५ / संजीवनी पाटील- ७२०८०१८०४६
१७१ मानखुर्द- बाळू खोमणे- ९८९००००९०५  / सुरेश चव्हाण- ९२२१७७६९६१
१७२ अणुशक्ती- रेखा भोजने- ९८२०५८९७६१ / सुनिल आडे- ९८३३०२४९७६
१७३ चेंबुर- रश्मी तावडे- ९६१९८९७८९८  / सुनिता चिंदरकर- ९८२१४३४४६८
१७४ कुर्ला- संजू सोनावणे- ८९७६२३१९९० /  प्रशांत गर्गे – ९५२७०७६५६३
१७५ कलिना- सोमनाथ मठपती- ९८७२६५९६१९, ८०८७१०२९३२ / दौलतसिंग चव्हाण- ९८६ ०८७१५४६
१७६ बांद्रा (पूर्व)- सुभाष गढरी- ९८६९९४४४०५ / निलेश वांळूज- ९८९०३४२७६०
१७७ बांद्रा (पश्चिम)- अनिता ताटे- ९९६९००६७२४/ मिलिंद पांजरी- ८८०५७६८९२४

०००

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई  दि. १५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे  रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. विक्रोळी येथील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी १४ मे पासून टपाली मतदान सुरू झाले आहे. दोन दिवसात ७७० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर यांनी दिली .

गुरुवार १६ मे  रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दातकर यांनी केले आहे.

विक्रोळी पूर्व येथील फिरोजशहा नगर, सांस्कृतिक सभागृहातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  मतदान करावे. त्यांच्या सुविधेसाठी विक्रोळी येथील कार्यालयात मतदान केंद्रे उभारण्यात आले आहे. तसेच ओळखपत्रांची तपासणी करण्यासाठी व आलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले .

०००

 

 

मुंबई उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १५: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व  तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेचे 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण सात हजार 384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्णत्वास आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघात एकूण 7384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 40 लाख 02 हजार 749 पुरुष, 34 लाख 44 हजार 819 महिला, तर 815 तृतीयपंथी असे एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

यामध्ये 26- मुंबई उत्तर मतदारसंघात विधानसभेचे बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली (पूर्व), चारकोप, मालाड (पश्चिम) या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 1702 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 68 हजार 983 पुरुष, 8 लाख 42 हजार 546 महिला, तर 443 तृतीयपंथी असे एकूण 18 लाख 11 हजार 942 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात विधानसभेचे जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात  1753 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 38 हजार 365 पुरूष मतदार तसेच 7 लाख 96 हजार 663 महिला मतदार तर 60 तृतीयपंथी असे एकुण 17 लाख 35 हजार 088 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

28- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात विधानसभेचे मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व तसेच मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1682 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 8 लाख 77 हजार 855 पुरूष मतदार तसेच 7 लाख 58 हजार 799 महिला मतदार तर 236 तृतीयपंथी असे एकूण 16 लाख 36 हजार 890 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात विधानसभेचे विलेपार्ले, चांदीवली, कुर्ला एससी, कलीना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1698 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 41 हजार 288 पूरूष मतदार तसेच 8 लाख 2 हजार 775 महिला मतदार तर 65 तृतीयपंथी असे एकूण 17 लाख 44 हजार 128 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

30 मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात अणुशक्ती नगर आणि चेंबुर या मतदारसंघात 549 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 2 लाख 76 हजार 258 पुरूष मतदार तसेच 2 लाख 44 हजार 036 महिला मतदार तर 41 तृतीयपंथी असे एकूण 5 लाख 20 हजार 335 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

०००

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा

 सांगली दि.१४ (जिमाका) : टंचाई परिस्थिती उद्भवलेल्या भागातील जनतेला पिण्याचे पाणी  उपलब्ध करून देण्यास  प्राधान्य द्यावे, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी  जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठकीत दिल्या.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, नगर प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उपयुक्त समीक्षा चंद्राकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले, जलसंपदा  विभागाने धरणातील पाणीसाठा  व उपसा सिंचन योजना मधील पाण्याचे योग्य नियोजन करावे. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून उपलब्ध पाण्याचे स्त्रोत निश्चित करावेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सादरीकरणाद्वरे जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती माहिती दिली. जिल्ह्यात सद्यस्थितीत ९८ टँकर सुरू असून यामध्ये जत तालुक्यात 86,  आटपाडी 11 आणि एक टँकर शिराळा तालुक्यात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासन निकषानुसार दुष्काळ परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या आठ उपाय योजना लागू करण्यात आल्याची माहिती देवून जिल्ह्यात सद्यस्थितीत आवश्यक चारा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

०००

माझी वसुंधरा अभियानाचा  विभागीय आयुक्तांकडून आढावा

जिल्ह्यात स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवा  – पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली दि. १४ (जिमाका) : गावे व शहरे स्वच्छ व्हावीत, लोकांना स्वच्छतेची सवय जडावी, नागरिकांनी स्वच्छतेची जीवन पध्दती अंगीकारावी यासाठी जिल्ह्यात स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी माझी वसुंधरा अभियानातील कामांचा आढावा घेतला.  बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, नगर प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उपयुक्त समीक्षा चंद्राकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

डॉ.  पुलकुंडवार म्हणाले, नागरिकांना स्वच्छतेची सवय लागणे महत्वाचे आहे. स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षण व संवर्धन होते. माझी वसुंधरा अभियानात भूमि, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पाच घटकांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम होत आहे. यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेवून आपला भाग स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी शालेय विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावतो. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात स्वच्छतेचा संदेश पोहचवावा.         स्वच्छतेसाठी ग्रामस्तरापर्यंत मजबूत टीम असावी. तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी स्वच्छतेसंदर्भात नियमित बैठका घ्याव्यात. जिल्हास्तरावरून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी जिल्ह्यात त्यांच्या विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

०००

 

०००

 

ताज्या बातम्या

श्री गुंडी यात्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती 

0
मुंबई, दि. १६ : राजभवनातील प्राचीन श्री गुंडी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. १५) देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले व भाविकांसमवेत...

लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’चे विश्र्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून...

0
मुंबई, दि. 16:- 'केसरी'चे विश्र्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य...

लोकाभिमुख सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला

0
मुंबई, दि. १६:- 'लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक...

विधानसभा इतर कामकाज

0
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून देणार -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १५: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संजय देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

0
मुंबई, दि. १२ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत संजय देशमुख यांच्या कुटुंबियांची वरळी येथील ‘दर्शना’ या शासकीय निवासस्थानी सांत्वनपर भेट...