मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 574

आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १० हजार १३४  तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

टीप : सोबत जिल्हानिहाय आणि विभागनिहाय तक्ता सोबत जोडण्यात आला आहे.

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/11/seizure-all-distwise-report-2024-11-20-1732109251-1.pdf” title=”seizure-all-distwise-report-2024-11-20-1732109251 (1)”]

 

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/11/seizure-all-agencywise-report-2024-11-20-1732109233-1.pdf” title=”seizure-all-agencywise-report-2024-11-20-1732109233 (1)”]

000

राजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थाप

राजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न;

राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थाप

मुंबई दि. 20 : गांधी फिल्म्स फाउंडेशन आणि फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्टच्या वतीने कलाकार व विद्यार्थ्यांसाठी राजभवन मुंबई येथे मंगळवारी (दि. १९) एका चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कार्यशाळेला भेट दिली तसेच विद्यार्थी कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला व कलाकार तसेच आयोजकांना कौतुकाची थाप दिली.

या कार्यशाळेत सहभागी कलाकार व विद्यार्थ्यांनी राजभवनातील विविध ऐतिहासिक वास्तू व निसर्गाचे चित्रण केले.

गांधी फिल्म्स फाउंडेशनचे कलाकार व क्युरेटर संजय निकम व ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra Governor pats artists, students

for bringing Raj Bhavan on the canvas

 

Mumbai, Nov 20 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan admired the paintings drawn by the students and artists at a painting workshop organised by Gandhi Films Foundation and Photography Promotion Trust at Raj Bhavan Mumbai on Tue (19 Nov).

The Governor interacted with the students and artists participating in the workshop and complimented them for bringing the heritage and beauty of Raj Bhavan on the canvas.

Senior photographer Sudharak Olwe and Sanjay Nikam of Gandhi Films Foundation had organised the workshop.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान  

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर –  ६१.९५टक्के,

अकोला – ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८  टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,

बीड – ६०.६२ टक्के,

भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४  टक्के,

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे – ५९.७५ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,

गोंदिया -६५.०९  टक्के,

हिंगोली – ६१.१८ टक्के,

जळगाव – ५४.६९ टक्के,

जालना- ६४.१७ टक्के,

कोल्हापूर-  ६७.९७ टक्के,

लातूर – ६१.४३ टक्के,

मुंबई शहर- ४९.०७ टक्के,

मुंबई उपनगर-५१.७६  टक्के,

नागपूर – ५६.०६ टक्के,

नांदेड –  ५५.८८ टक्के,

नंदुरबार- ६३.७२  टक्के,

नाशिक -५९.८५  टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,

पालघर- ५९.३१ टक्के,

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे –  ५४.०९ टक्के,

रायगड –  ६१.०१ टक्के,

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली – ६३.२८ टक्के,

सातारा – ६४.१६ टक्के,

सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे – ४९.७६ टक्के,

वर्धा –  ६३.५० टक्के,

वाशिम -५७.४२  टक्के,

यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान; तरुण मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे केले आवाहन

गडचिरोली दि .२०: गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.

फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती.आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.

भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र फुलमती सरकार या वृद्ध आजीने मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

लोकशाहीच्या उत्सवात तब्बल १११ वय असलेल्या या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला.एवढेच नव्हे, तर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले हे विशेष.

प्रशासनाने शाल-श्रीफळ देऊन केले स्वागत
फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यांनतर शालेय विद्यार्थी,गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले.त्यांनतर आजीने उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती बिनोद सरकार यांना शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले.यावेळी मुलचेराचे गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे,पुरवठा अधिकारी इंगोले,तलाठी रितेश चिंदमवार, ग्रामपंचायतचे सचिव अक्षय कुळमेथे तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

              राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर –  ४७.८५ टक्के,

अकोला – ४४.४५ टक्के,

अमरावती -४५.१३  टक्के,

औरंगाबाद- ४७.०५टक्के,

बीड – ४६.१५ टक्के,

भंडारा- ५१.३२ टक्के,

बुलढाणा-४७.४८  टक्के,

चंद्रपूर- ४९.८७ टक्के,

धुळे – ४७.६२ टक्के,

गडचिरोली-६२.९९ टक्के,

गोंदिया -५३.८८  टक्के,

हिंगोली – ४९.६४टक्के,

जळगाव – ४०.६२ टक्के,

जालना- ५०.१४ टक्के,

कोल्हापूर-  ५४.०६ टक्के,

लातूर _ ४८.३४ टक्के,

मुंबई शहर- ३९.३४ टक्के,

मुंबई उपनगर-४०.८९  टक्के,

नागपूर – ४४.४५ टक्के,

नांदेड –  ४२.८७ टक्के,

नंदुरबार- ५१.१६  टक्के,

नाशिक -४६.८६  टक्के,

उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,

पालघर- ४६.८२ टक्के,

परभणी- ४८.८४ टक्के,

पुणे –  ४१.७० टक्के,

रायगड –  ४८.१३ टक्के,

रत्नागिरी- ५०.०४टक्के,

सांगली – ४८.३९ टक्के,

सातारा – ४९.८२टक्के,

सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,

सोलापूर -४३.४९ टक्के,

ठाणे – ३८.९४ टक्के,

वर्धा –  ४९.६८ टक्के,

वाशिम -४३.६७  टक्के,

यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

 

००

 

 

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत अंदाजे २७.७३ टक्के मतदान

मुंबई, दि. २० नोव्हेंबर, २०२४ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०१.०० वाजेपर्यंत अंदाजे २७.७३ टक्के मतदान झाले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील दुपारी ०१.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)
१७८-धारावी – २४.६५ टक्के
१७९-सायन-कोळीवाडा – १९.४९ टक्के
१८०- वडाळा – ३१.३२ टक्के
१८१- माहिम – ३३.०१ टक्के
१८२-वरळी – २६.९६ टक्के
१८३-शिवडी – ३०.०५ टक्के
१८४-भायखळा – २९.४९ टक्के
१८५- मलबार हिल – ३३.२४ टक्के
१८६- मुंबादेवी – २७.०१ टक्के
१८७- कुलाबा – २४.१६ टक्के

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

 राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 अहमदनगर –  ३२.९० टक्के,

अकोला – २९.८७ टक्के,

अमरावती – ३१.३२ टक्के,

औरंगाबाद- ३३.८९ टक्के,

बीड – ३२.५८ टक्के,

भंडारा- ३५.०६ टक्के,

बुलढाणा- ३२.९१ टक्के,

चंद्रपूर- ३५.५४ टक्के,

धुळे – ३४.०५ टक्के,

गडचिरोली-५०.८९ टक्के,

गोंदिया – ४०.४६ टक्के,

हिंगोली -३५.९७ टक्के,

जळगाव – २७.८८ टक्के,

जालना- ३६.४२ टक्के,

कोल्हापूर- ३८.५६ टक्के,

लातूर _ ३३.२७ टक्के,

मुंबई शहर- २७.७३ टक्के,

मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,

नागपूर – ३१.६५ टक्के,

नांदेड – २८.१५ टक्के,

नंदुरबार- ३७.४० टक्के,

नाशिक – ३२.३० टक्के,

उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,

पालघर-३३.४० टक्के,

परभणी-३३.१२टक्के,

पुणे – २९.०३ टक्के,

रायगड – ३४.८४  टक्के,

रत्नागिरी-३८.५२ टक्के,

सांगली – ३३.५० टक्के,

सातारा -३४.७८ टक्के,

सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,

सोलापूर – २९.४४,

ठाणे -२८.३५ टक्के,

वर्धा – ३४.५५ टक्के,

वाशिम – २९.३१ टक्के,

यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

0000

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे…

अहमदनगर –  १८.२४ टक्के,

अकोला – १६.३५ टक्के,

अमरावती – १७.४५ टक्के,

औरंगाबाद – १८.९८ टक्के,

बीड – १७.४१ टक्के,

भंडारा – १९.४४ टक्के,

बुलढाणा – १९.२३ टक्के,

चंद्रपूर – २१.५० टक्के,

धुळे – २०.११ टक्के,

गडचिरोली – ३० टक्के,

गोंदिया – २३.३२ टक्के,

हिंगोली – १९.२० टक्के,

जळगाव – १५.६२ टक्के,

जालना – २१.२९ टक्के,

कोल्हापूर – २०.५९ टक्के,

लातूर – १८.५५ टक्के,

मुंबई शहर – १५.७८ टक्के,

मुंबई उपनगर – १७.९९ टक्के,

नागपूर – १८.९० टक्के,

नांदेड – १३.६७ टक्के,

नंदुरबार- २१.६० टक्के,

नाशिक – १८.७१ टक्के,

उस्मानाबाद – १७.०७ टक्के,

पालघर – १९ .४० टक्के,

परभणी – १८.४९ टक्के,

पुणे – १५.६४ टक्के,

रायगड – २०.४० टक्के,

रत्नागिरी – २२.९३ टक्के,

सांगली – १८.५५ टक्के,

सातारा – १८.७२ टक्के,

सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,

सोलापूर – १५.६४,

ठाणे – १६.६३ टक्के,

वर्धा – १८.८६ टक्के,

वाशिम – १६.२२ टक्के,

यवतमाळ – १६.३८ टक्के मतदान झाले आहे.

0000

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ मतदान झाले आहे.

अहमदनगर – ५.९१ टक्के,

अकोला – ६.० टक्के,

अमरावती -६.६ टक्के,

औरंगाबाद-७.५ टक्के,

बीड -६.८८ टक्के,

भंडारा- ६.२१ टक्के,

बुलढाणा- ६.१६ टक्के,

चंद्रपूर-८.५ टक्के,

धुळे -६.७९ टक्के,

गडचिरोली-१२.३३ टक्के,

गोंदिया -७.९४ टक्के,

हिंगोली -६.४५ टक्के,

जळगाव – ५.८५ टक्के,

जालना- ७.५१ टक्के,

कोल्हापूर-७.३८ टक्के,

लातूर ५.९१ टक्के,

मुंबई शहर-६.२५ टक्के,

मुंबई उपनगर-७.८८ टक्के,

नागपूर -६.८६ टक्के,

नांदेड -५.४२ टक्के,

नंदुरबार-७.७६ टक्के,

नाशिक – ६.८९ टक्के,

उस्मानाबाद- ४.८५ टक्के,

पालघर-७.३० टक्के,

परभणी-६.५९ टक्के,

पुणे – ५.५३ टक्के,

रायगड – ७.५५ टक्के,

रत्नागिरी-९.३० टक्के,

सांगली – ६.१४ टक्के,

सातारा – ५.१४ टक्के,

सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,

सोलापूर – ५.७,

ठाणे ६.६६ टक्के,

वर्धा – ५.९३ टक्के,

वाशिम – ५.३३ टक्के,

यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

0000

बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी राज्यभरात कायदा व सुरक्षा यंत्रणा सतर्क व सजग

आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफ.आय.आर.

मुंबई, दि. १९ : ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाचा समावेश आहे. या सर्व यंत्रणेला सतर्क आणि सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता कालावधी दरम्यान आचारसंहिता व निवडणूक विषयक विविध तक्रारींच्या अनुषंगाने ५३२ एफ. आय. आर. दाखल झाले आहेत. यापैकी २१० प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून ६३ प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित २५९ प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत.

एफ आय आर बद्दलची जिल्हा निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

१) मुंबई शहर व मुंबई उपनगर :  ३६

२) ठाणे : ३८

३) पालघर : ०५

४) नाशिक : ४९

५) धुळे : ०१

६) बीड : १८

७) अहिल्यानगर : ३२

८) पुणे : ४८

९) छत्रपती संभाजीनगर : २५

१०) जालना : १०

११) जळगाव : १०

१२) नंदुरबार : ०३

१३) कोल्हापूर : २६

१४) रत्नागिरी : १०

१५) सिंधुदुर्ग : ००

१६) सातारा : १५

१७) सांगली : ०८

१८) सोलापूर : २८

१९) लातूर : १२

२०) धाराशिव : ०६

२१) रायगड : १९

२२) परभणी : ०७

२३) नांदेड : १५

२४) हिंगोली : १२

२५) यवतमाळ : ०७

२६) वाशिम: ०३

२७) वर्धा : ०६

२८) अमरावती : १७

२९) अकोला : ०२

३०) बुलढाणा : ०८

३१) चंद्रपूर : ०३

३२) गडचिरोली : ०६

३३) भंडारा : १५

३४) गोंदिया : ०३

३५) नागपूर : २९

लोकशाहीच्या उत्सवासाठी कर्मचारी मतदान साहित्य घेऊन रवाना

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली निवडणूक सज्जतेची पाहणी

सांगली, दि. 19 (माध्यम कक्ष) : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून या उत्सवात जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदार संघातील 2 हजार 482 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे – 281-मिरज (अ.जा.) – 307,             282-सांगली – 315, 283-इस्लामपूर – 290, 284-शिराळा – 334, 285-पलूस-कडेगाव – 285, 286-खानापूर – 356, 287-तासगाव-कवठेमहांकाळ – 308, 288-जत – 287.

मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी एस. टी. बसेस व अन्य वाहनांची सोय करण्यात आली असून या वाहनातून मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील मतदान साहित्य वाटप केंद्रास संयुक्त भेट देऊन मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व मतदान केंद्र सुसज्जतेची पाहणी केली. तसेच साहित्य वितरण व मतमोजणी कक्षास भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे व श्रीनिवास अर्जुन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शामला खोत, सचिन पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

लोकशाहीच्या उत्सवात मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या अधिकारी कर्मचारी यांनी मतदान प्रक्रिया निर्भय, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी योगदान द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मतदारसंख्या 25 लाखांच्यावर

या निवडणुकीत जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील एकूण 25 लाख 36 हजार 65 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 12 लाख 82 हजार 276 पुरूष मतदार, 12 लाख 53 हजार 639 स्त्री मतदार तर इतर 150 मतदारांचा समावेश आहे.

विधानसभा मतदारसंघनिहायनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे –

281-मिरज (अ.जा.) – पुरूष-171‍646, स्त्री-172198, इतर-32, एकूण 343876 मतदार.

282-सांगली – पुरूष-177693, स्त्री-178642, इतर-75, एकूण 356410 मतदार.

283-इस्लामपूर – पुरूष-141698, स्त्री-139152, इतर-6, एकूण 280856 मतदार.

284-शिराळा – पुरूष-156140, स्त्री-150869, इतर-3, एकूण 307012 मतदार.

285-पलुस-कडेगाव – पुरूष-146072, स्त्री-146786, इतर-8, एकूण 292866 मतदार.

286-खानापूर – पुरूष-177542, स्त्री-173435, इतर-19, एकूण 350996 मतदार.

287-तासगाव-कवठेमहांकाळ – पुरूष-159076, स्त्री-153606, इतर-4, एकूण 312686 मतदार.

ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले...

नागपूरलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार...

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी...

किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

0
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व...