शुक्रवार, ऑगस्ट 15, 2025
Home Blog Page 550

महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे  प्रत्येक महिन्यात पाच मासिक  तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५६,७४१ तिकीटांना रू. दोन कोटी ३१ लाख ६३ हजार ९०० ची बक्षिसे जाहीर झाली आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

१ नोव्हेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, २ नोव्हेंबर, २०१४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, ६ नोव्हेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष, १२ डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र दिवाळी भव्यतम, १९ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र गजराज व दि. २०/११/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव या मासिक सोडती दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या आहेत.

या तिकिटांना लॉटरी जाहीर

➡️ महाराष्ट्र सह्याद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2411D/43098 या चिराग एन्टरप्रायझेस, नाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष मालिका तिकीट क्रमांक GS-०६-३८६२ या महाराजा लॉटरी सेंटर, इचलकरंजी यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️ महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत तिकीट क्रमांक DI-05 / 38465 या न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. एक कोटीचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️ महाराष्ट्र गजराज तिकीट क्रमांक GJ 24/7136 या न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.14 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

➡️महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G13/5771 या भारत लॉटरी, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.35 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

➡️  महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. सात लाखाचे प्रथम क्रमांकाची एकूण 10 बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम. दहा हजारावरील वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

०००

मोहिनी राणे/ससं/

 

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतींची संस्मरणीय भेट

जळगाव, दि. 12 (जिमाका)- जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो) योजनेतून शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा याकरीता टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय यावल व दैनिक पुढारी यांच्यावतीने दिल्ली दर्शन व महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रत्यक्ष भेट घडवून देण्यात आली.

यामध्ये यावल प्रकल्पात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वैजापूर येथील सोनिया बारेला, शासकीय आश्रम शाळा लालमाती शाळेतील शितल बारेला, शासकीय आश्रम शाळा गंगापुरी शाळेतील सुरेश बारेला, शासकीय आश्रम शाळा सार्वेतील श्याम पावरा तसेच विद्यार्थ्यांसमवेत पालक अधिकारी म्हणून वैजापूरच्या अधिक्षिका कुमारी श्वेंता टेंभुर्णी यांचा समावेश हाेता.
सर्व विद्यार्थ्यांनी आग्रा येथे ताजमहाल दर्शन व दिल्ली गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, मा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली यांची भेट व राजघाट येथिल महात्मा गांधी म्युझियम, राष्ट्रपती भवनातील जनजाती संग्रहालय इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. राष्ट्रपती भावनात जाऊन महामहीम मा. राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत महामहीम मा. राष्टपतींशी चर्चा केली.

सदर दौरा हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील अशी अपेक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केली व दरवर्षी अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून अशा भेटींची संधी प्रत्येकाने मिळवावी यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा या करीता शुभेच्छा दिल्या.

सहा पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 11 : महाराष्ट्राने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2024 मध्ये सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळवत दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. ओडिशा आणि त्रिपुरा राज्याने प्रत्येकी सात पुरस्कारांसह संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर तर बिहार आणि हिमाचल प्रदेश राज्यांनी प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले.

दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या निकषांवर पंचायतींच्या प्रयत्नांना ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

विज्ञान भवनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात, संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध श्रेणीतील 45 पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, राज्यमंत्री प्रो. एस.पी बघेल, सचिव विवेक भारद्वाज यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान केला. यावेळी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना, श्रीमती मुर्मू यांनी या पुरस्कारांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या मान्यतेचा उद्देश इतर पंचायतींना सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास व ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित करेल, अशी आशाही व्यक्त केली.

पंचायती राज राष्ट्रीय पुरस्कार विविध श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आले यामध्ये दिनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत एकूण 27 पुरस्कार प्रदान करण्यात आले. या श्रेणीत नाशिक जिल्ह्यातील  मोडाळे ग्रामपंचायतीला “स्वच्छ व हरित पंचायत” श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला.

सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी या ग्रामपंचायतीला आज दोन श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पहिली श्रेणी – नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत एकूण नऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात सर्वोत्तम ग्रामपंचायतचा प्रथम पुरस्कार सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला तर याच ग्रामपंचायतीला ग्राम उर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार श्रेणीत अव्वल स्थान प्राप्त झाला व प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.  या श्रेणीत नऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला.

नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्तम ब्लॉक पंचायत या श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील तिरोरा या पंचायत समितीला  तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार तिरोरा पंचायत समितीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला. कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्काराच्या श्रेणीत भंडारा जिल्ह्यातील बेळा ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या  प्रतिनिधींनी स्वीकारला.  तर, पंचायत क्षमतानिर्माण  सर्वोत्तम संस्थान या श्रेणीत पुण्याच्या यशदा अकादमीला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  हा पुरस्कार अकादमीचे उप महासंचालक व संचालक मल्‍लिनाथ कलशेट्टी व वरिष्ठ अधिकारी यांनी स्वीकारला.

यावेळी केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी विजेत्या पंचायतांना डिजिटल स्वरूपात पुरस्काराची रक्कम हस्तांतरित केली. मोडाळे ग्रामपंचातीला 50 लाख, मान्याचीवाडीला 2.5 कोटी (रूपये 1.5 कोटी व रूपये 1.00 कोटी ग्राम ऊर्जा श्रेणीत), तिरोरा पंचायत समितीला 1.5 कोटी, बेळा ग्रामपंचायतीला रूपये 1 कोटी आणि यशदा अकादमीला 50 लाख रुपये प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमात पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी ‘पुरस्कार प्राप्त पंचायतांचे कार्य: सर्वोत्तम प्रथा’ या पुस्तिकेचे अनावरण केले. या पुस्तिकेची पहिली प्रत राष्ट्रपतींना सादर करण्यात आली. याशिवाय, काही पंचायतांच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित एक माहितीपट देखील सादर करण्यात आला.

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये विविध श्रेणींमध्ये पंचायतींना सन्मानित करण्यात आले, त्यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार, ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार, कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्थान पुरस्कार श्रेणींचा समावेश होता.

००००

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 150/ दिनांक 11.12.2024

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

नवी दिल्ली, दि. ११ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा आदर-सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन उपराष्ट्रपती महोदयांचा सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन

मुंबई, दि. ११ :- जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम’तर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पर्यावरणाशी संबंधित बाबींसंदर्भातील सखोल संशोधन, त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीने तर्कशुद्ध मांडणी आणि सक्रीय लोकसहभाग यांच्या माध्यमातून डॉ. माधव गाडगीळ यांनी केलेले कार्य या पुरस्कारामुळे जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि जागतिक जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. पश्चिम घाटासंदर्भात पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी लिहिलेल्या अहवालामुळे या क्षेत्राच्या संवर्धनासाठी शासनासह लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना उभारी मिळाली आहे. डॉ. गाडगीळ यांच्या पुरस्कारामुळे जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, महापूर, क्षारपड जमिनींचे वाढतं प्रमाण यासारख्या समस्यांवर संशोधन, अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या जागतिक पुरस्काराबद्दल डॉ. माधव गाडगीळ यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. भविष्यातील त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

***

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे यूएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन

मुंबई, दि. ११: ‘पर्यावरण रक्षणासाठी अव्याहतपणे झटणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार मिळणे देश आणि राज्यासाठी अभिमानास्पद आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे अभिनंदन केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेच्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कारांमध्ये जगभरातील सहा मान्यवरांच्या यादीत डॉ गाडगीळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरणे हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी गौरस्वापद आहे. यातून डॉ गाडगीळ यांच्या कार्याचा उचित सन्मान झाला आहे. पर्यावरण, जैवविविधतेचे रक्षण हा त्यांचा ध्यास राहिला आहे. त्याला त्यांनी जीवनकार्य मानले आहे. यातूनच ते गेली अनेक दशके या क्षेत्रात अथकपणे संशोधन करत आहेत. विशेषतः पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील, जैवविविधतेबाबत त्यांनी केलेले काम मार्गदर्शक, दिशादर्शक राहिले आहे. यातून आपल्या सर्वांना पर्यावरण रक्षण, जतन संवर्धनासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत राहणार आहे. यापुढेही डॉ. गाडगीळ या क्षेत्रात मोलाची योगदान देत राहतील, असा विश्वास आहे. या आंतररराष्ट्रीय पुरस्कारासाठी डॉ. गाडगीळ यांचे अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा,असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) ३५ प्रकरणांवर सुनावणी

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाद्वारा वरळी येथे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा अन्वये तसेच बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अन्वये, आयोगाकडे प्राप्त तक्रारीबाबत बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) 35 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने पोक्सो कायद्यांतर्गत प्राप्त तक्रारींचा समावेश होता.यावेळी मुंबई शहर व उपनगर परिसरातील संबंधित पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी व शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुनावणीसाठी असणाऱ्या जवळपास सर्वच प्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोप पत्र दाखल केले होते. याबाबत आयोगाने पोलिसांचे कौतुक केले. ही प्रकरणे सदयस्थितीत न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच बऱ्याच प्रकरणांमध्ये तक्रारदारांनी गैरहेतूने खोट्या तक्रारी दाखल केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून आयोग लवकरच मार्गदर्शक सूचना व शिफारशी जारी करणार आहेत, यामुळे कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर वचक  बसेल आणि वेळ वाया जाणार नाही.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन शाह, आयोगाचे सदस्य अॅड. श्री. संजय सेंगर, अॅड. निलिमा चव्हाण, सायली पालखेडकर, अॅड. प्रज्ञा खोसरे यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली.

या सुनावणीमध्ये प्रामुख्याने पोक्स कायद्याअंतर्गत तक्रार प्रकरणांचा समावेश असल्याने विशेष पोलीस निरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग, मुंबई या कार्यालयाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक, सारा अभ्यंकर या उपस्थित होत्या.

 

0000

 

 

 

भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १० : भारतीय सैनिक सीमेवर अतुलनीय शौर्य गाजवीत असतात. त्यांच्या शौर्याचा इतिहास शब्दबद्ध करून ठेवणे आवश्यक असून युवा पिढीला तो प्रेरणादायी असल्याचा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीरचक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंग यादव यांच्या या गौरवाच्या 25व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनायक दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी कारगिल युद्धाच्या प्रसंगी आपण संसद सदस्य असल्याचे सांगत प्रधानमंत्री श्री. वाजपेयी यांना भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्यावर संपूर्ण विश्वास होता याची आठवण सांगितली. कॅप्टन यादव यांनी ग्रेनेडियर म्हणून बजावलेल्या पराक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. जीवनात शिस्त असल्याशिवाय यश मिळत नाही. ‘एनसीसी’ पासूनच तरुण वयात शिस्तीचे धडे शिकायला मिळतात. यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील ‘एनसीसी’च्या बळकटीकरणावर भर दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कॅप्टन यादव यांनी यावेळी कारगिल युद्धप्रसंगाचा घटनाक्रम सांगून उपस्थितांच्या डोळ्यासमोर भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे चित्र उभे केले. कॅप्टन यादव यांच्या लग्नाचा देखील २५ वा वाढदिवस असल्याने राज्यपालांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या पत्नी श्रीमती रीना यादव यांचा यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे ओटी भरून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या आश्रयदाता डॉ. अश्विनी भिडे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.

०००

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गाचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १०: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र (Psychiatry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ., सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Opthalmology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (नंदुरबार), सहयोगी प्राध्यापक, प्रसुती शास्त्र व स्त्रीरोगशास्त्र (Obstetrics & Gynecology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (परभणी), सहायक प्राध्यापक, आय.सी.सी.यु. औषधवैद्यकशास्त्र (I.C.C.U. General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब (सातारा) या परिक्षांचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्गचा निकाल जाहीर

प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्ग  या पदाच्या मुलाखती २८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ चार निकाल जाहीर

सहयोगी प्राध्यापक, शारीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ  या पदाच्या मुलाखती दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ चे निकाल जाहीर

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ  या पदाच्या मुलाखती दिनांक २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या प्रतिक्षायादीच्या निकाल जाहीर

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२२ चा अंतिम निकाल १० ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेच्या अंतिम निकालानुसार प्रतिक्षायादीतून उमेदवार उपलब्ध करुन देण्याची शासनाने मागणी केली आहे. त्यानुसार अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने पदासाठीची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून प्रतिक्षायादीतून गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या शिफारशी शासनाकडे करण्यात येत आहेत.

प्रतिक्षा यादीनुसार शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक

मुंबई, दि. १०: शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रिन्स गोयल, (वय ५३) यांस दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आल्याची माहिती राज्य कर उपआयुक्त यांनी  दिली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीवर वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात कंपनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता खोटी बिले आणि बोगस वाहतूक पावत्या जारी करत असल्याचे आढळून आले. त्याद्वारे कंपनीने रूपये ६४.०६ कोटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून शासनाची फसवणूक केली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या सर्व कामकाजास व व्यवहारास जबाबदार असल्यामुळे  प्रिन्स गोयल यांचा या फसवणुकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळून आले. ही संपूर्ण कार्यवाही षण्मुगाराजन एस. (भा.प्र.से.), राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-क  तसेच नयना गोंदावले, राज्यकर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली,  विलास नाईक आणि अजित विशे, सहायक राज्यकर आयुक्त यांच्याकडून संयुक्तपणे राबविण्यात आली.

०००

वंदना थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी कार्यभार स्वीकारला मुंबई, दि. १४ : मुंबई स्लम-फ्री करायची असेल, पुनर्विकास जलद करायचा असेल, तर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प...

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘प्रभागसंघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळ्यात...

0
नवी दिल्ली, दि.१४ : देशभरातील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (DAY-NRLM) 'प्रभागसंघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कार २०२४'...

जिल्हा विकास निधीचा प्रत्येक रुपया जनहितासाठी — सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0
सामूहिक लाभ, कायमस्वरूपी मालमत्ता आणि उत्पन्नवाढीच्या योजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६९७ कोटी रुपयांच्या आराखड्याचा आढावा गडचिरोली, दि.14 ऑगस्ट (जिमाका):  जिल्हा विकास निधीतील प्रत्येक...

सुलवाडे-जामफळ-कनोली योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार – पालकमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

0
सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे ८१ टक्के काम पूर्ण; पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून कामाचे कौतुक धुळे,दिनांक 14 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व...

धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा धुळ्यातील नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची...

0
पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाचे लोकार्पण संपन्न धुळे, दिनांक 14 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा आहे. धुळे जिल्हा...