गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 495

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे आवाहन

अमरावती, दि. 19 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता उद्या, 20 नोव्हेंबर रोजी सर्वत्र मतदान आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरु होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानुषंगाने अमरावती विभागातील सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले आहे.

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीत सहभाग नोंदवत लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी पुढे यावे. मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर पोहोचून शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करावे, असेही आवाहन डॉ. पाण्डेय यांनी सर्व मतदारांना केले.

000

सी -व्हिजिल ॲप आता मराठीमध्ये देखील

मतदारांसाठी आणि उमेदवारांकरिता विविध ॲप्लिकेशन्स

मतदारांसाठी आणि उमेदवारांकरिता विविध ॲप्लिकेशन्स… सी -व्हिजिल ॲप आता मराठीमध्ये देखील उपलब्ध
भारत निवडणूक आयोगाने मतदारासांठी आणि उमेदवारांकरिता सी-व्हिजिल, सुविधा ॲप, ॲफिडेविट पोर्टल, व्होटर टर्नआऊट ॲप, व्होटर हेल्पलाइन ॲप, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांकरिता सक्षम ॲप, केवायसी ॲप आणि 1950 क्रमांकाची हेल्पलाइन आदी आयटी ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून सुविधा दिल्या आहेत, त्यांची थोडक्यात माहिती…

सी-व्हिजिल (cVIGIL)
सी-व्हिजिल हे ॲप हे आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्याकरिता एक अभिनव असे मोबाइल ॲप्लिकेशन आहे की, ज्याद्वारे प्रत्येक नागरिकाला निवडणुकीच्या वेळी आपल्या स्मार्टफोनचा उपयोग करून छायाचित्रे, श्राव्य, किंवा दृक चित्रण अपलोड करता येते. ’सी-व्हिजिल’चा अर्थ ‘सतर्क नागरिक’ असा आहे. हे ॲप आता मराठी भाषेत पण उपलब्ध आहे.या ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल झाल्यानंतर आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे ठिकाण शोधण्यासाठी जी.पी.एस.चा उपयोग करता येतो.तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेवून 100 मिनिटांत स्थितीची माहिती देते.
सी-व्हिजिल ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक.
गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil&hl=en_IN
ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541 वर उपलब्ध आहे.

सुविधा ॲप 2.0
भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अ‍ॅप अद्यावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे. सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणे, प्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणे, अर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. त्याचबरोबर या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.

गुगल प्ले
स्टोरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.

ॲफिडेविट पोर्टल
‘ॲफिडेविट पोर्टल’ निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनाची संपूर्ण यादी पाहता येते. कोणताही नागरिक ‘ॲफिडेविट पोर्टल’चा उपयोग करून उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र पाहू शकतो व डाउनलोड ही करू शकतो. नागरिकांच्या सुविधेसाठी नामांकन दाखल, स्वीकारले,नाकारले, मागे घेतले, स्पर्धेत आहे याची माहिती मिळते.
पोर्टलची लिंक : https://affidavit.eci.gov.in

व्होटर टर्नआऊट ॲप
व्होटर टर्नआऊट ॲप प्रत्येक राज्य, जिल्हा आणि मतदारसंघासाठी अंदाजित मतदानाच्या टक्केवारीची दर दोन तासांनी माहिती देते. हे अॅप्लिकेशन फक्त विधानसभा, लोकसभा आणि पोटनिवडणुकीच्या वेळी सक्रिय होते.
‘व्होटर टर्नआऊट’ ॲपमध्ये प्रत्येक राज्य, जिल्हा आणि मतदारसंघाची अंदाजित मतदान टक्केवारी दाखवते.भारत निवडणूक आयोगाच्या सर्व्हर वरून ‘रिअल-टाइम’ डेटाचा उपयोग करण्यात येतो.निवडणूक प्रकार, राज्य, जिल्हा आणि मतदारसंघानुसार यामध्ये मतदानाच्या टक्केवारीची माहिती मिळते.एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील मतदानाचा अंदाज मिळवण्याचा हा एक जलद आणि सोपा असा पर्याय आहे
‘व्होटर ट्रर्नआऊट अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN
ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882
व्होटर हेल्पलाइन ॲप
मतदारांना आपले मतदार यादीत नाव आहे याची माहिती व्होटर हेल्पलाईन ॲप मध्ये मिळते. हे ॲप प्रत्येकासाठी अधिक सोयीस्कर आणि महत्वाचे आहेत. व्होटर हेल्पलाइन ॲपमध्ये मतदारयादीत नावाची शहानिशा करणे,नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे, दुस-या मतदारसंघात स्थलांतरित करणे,परदेशात राहणारे मतदार, मतदारयादीतील नाव हटवणे किंवा आक्षेप घेणे,नोंदींची दुरुस्त करणे,तुमच्या क्षेत्रातील निवडणुकीचे वेळापत्रक शोधणे.,सर्व उमेदवार, त्यांचे प्रोफाइल, उत्पन्न विवरण, मालमत्ता, गुन्हेगारी प्रकरणे शोधणे.बीएलओ, ईआरओ, डीईओ आणि सीईओ यांची माहिती मिळवता येते व संपर्क साधता येतो
व्होटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक :
गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&hl=mr&pli=1
ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

सक्षम ॲप
भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.
सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.
गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp
ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568

केवायसी ॲप :- (know your Candidate)
मतदारांना त्यांच्या उमेदवारांबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती इत्यादी पाहता येऊ शकते.
गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.ksa
ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/kyc-eci/id1604172836

1950 क्रमांकाची हेल्पलाइन

निवडणूक विषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

संध्या गरवारे,
विभागीय संपर्क अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

यंत्रणेची झाली पूर्ण तयारी, मतदार राजाची आता जबाबदारी

लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.     

मतदार नोंदणीत वाढ; राज्यात ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ५ कोटी २२ हजार ७३९,  तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या आहेत, ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.

राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार

राज्यात 4,69,96,279 महिला मतदार  आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग (PwDVoters) मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांची  संख्या 1,16,170 आहे.

राज्यात एकूण 4136 उमेदवार

राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण ४ हजार १३६ उमेदवार आहेत. ज्यामध्ये ३,७७१  पुरूष, ३६३  महिला आणि तर अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मतदानासाठी 2,21,600 बॅलेट युनिट

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,186 इतक्या मतदान केंद्रांसाठी  2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5166 बॅलेट युनिट, 5166 कंट्रोल युनिट  व  5165 व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत  एकूण  185 विधानसभा  मतदाररसंघात  एक  बॅलेट  युनिटची  आवश्यकता  आहे.  तर  100  मतदारसंघात  दोन  बॅलेट  युनिट आणि तीन  मतदारसंघांमध्ये  तीन  बॅलेट  युनिट  लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी  1  लाखांहून अधिक मतदान केंद्र सज्ज

विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता येण्यासाठी राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.

महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र राहणार आहेत. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात मतदान केंद्रे 

मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात  एकूण मतदान केंद्रे 1,00,186 आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र 42,604  तर ग्रामीण मतदान केंद्र 57,582 इतकी आहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत.  झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आली असून सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 इतकी आहे.

आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष

यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

मतदान केंद्रांची संख्या  जिल्हानिहाय

1. पुणे – 8462 2. मुंबई उपनगर – 7579 3. ठाणे – 6955
4. नाशिक – 4922 5. नागपूर – 4631 6. अहमदनगर – 3765
7. सोलापूर – 3738 8. जळगाव – 3683 9. कोल्हापूर – 3452
10. औरंगाबाद – 3273 11. सातारा – 3165 12. नांदेड – 3088
13. रायगड – 2820 14. अमरावती – 2708 15. यवतमाळ – 2578
16. मुंबई शहर – 2538 17. सांगली – 2482 18. बीड – 2416
19. बुलढाणा – 2288 20. पालघर – 2278 21. लातूर – 2143
22. चंद्रपूर – 2077 23. अकोला – 1741 24. रत्नागिरी – 1747
25. जालना – 1755 26. धुळे – 1753 27. परभणी – 1623
28. उस्मानाबाद – 1523 29. नंदूरबार – 1434 30. वर्धा – 1342
31. गोंदिया – 1285 32. भंडारा – 1167 33. वाशिम – 1100
34. हिंगोली – 1023 35. गडचिरोली – 972 36. सिंधुदुर्ग – 921

विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक

शाईच्या बाटल्यांची तरतूद

 विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे.    राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये  १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.

४२६ मतदान केंद्र ‘महिला नियंत्रित 

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.  नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे  असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.

महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेतली आहे.

जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद १३, बीड ८, भंडारा ८, बुलढाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५,  जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १२, नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४,  उस्मानाबाद ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७,  ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.                         

घरबसल्या जाणून घ्या आपल्या मतदान केंद्राची माहिती

मतदारांना सहजतेने आपला मतदानाचा हक्क बजावता यावा,यादृष्टीने निवडणूक यंत्रणेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर तसेच वोटर्स ॲपवर मतदारांना आपला निवडणूक ओळखपत्राचा अंक टाकून किंवा स्वतःचे नाव किंवा मतदार नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे या ॲपवर आपले नाव मतदार यादीत शोधणे तसेच मतदान केंद्र याची माहिती सहजतेने मिळू शकते. मतदानासाठी जाताना ॲपच्या सहाय्याने मतदारांनी आपले मतदान केंद्र, आपले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा केल्याने कमी वेळेत मतदान करणे सहजतेने शक्य आहे.

                                                १९५० क्रमांकाची हेल्पलाइन

निवडणूकविषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर १९५० या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

सक्षम ॲप

भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता  हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.

सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.

 गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp

ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568

मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी प्रवेशसुविधा रॅम्पच्या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देखील उपलब्ध असतील. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, मतदार स्लिप ब्रेल लिपीमध्ये वाटण्यात आलेली आहे. अंध मतदारांकरिता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ब्रेल डमी, डमी मतपत्राला प्रत्येक मतदार केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

 मतदान केंद्रावर हे पुरावे असणार ग्राह्य

आपले नाव मतदार यादीत असेल मात्र मतदान केंद्रावर निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेले मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान केंद्रावार त्याच्याशिवाय पुढील ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामध्ये  १) आधार कार्ड २) वाहन चालक परवाना ३) पॅन कार्ड ४) भारतीय पारपत्र ५) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ६) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र ७) संबंधित शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या  मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मूळ प्रमाणपत्र ९) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मूळ प्रमाणपत्र १०) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानासाठीची सर्व तयारी झालेली आहे. आता जागरूक मतदार म्हणून लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करुयात.

वंदना रघुनाथराव थोरात,

विभागीय संपर्क अधिकारी,

मंत्रालय, मुंबई.

दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०७ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांनी राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची सर्वांनी शपथ  घेतली.

राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, राज्यपालांच्या सह सचिव (प्रशासन) श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

0000

Maha Governor offers floral tribute to Indira Gandhi

Mumbai, 19th Nov : Maharashtra Governor C P Radhakrishnan offered floral tributes to the portrait of the Former Prime Minister of India Late Indira Gandhi at Raj Bhavan Mumbai on the occasion of her 107th birth anniversary on Tuesday (19th Nov).

The Governor also read out the ‘National Integration Pledge’ to the staff and officers of Raj Bhavan on the occasion.

Principal Secretary to the Governor Pravin Darade, Joint Secretary Shweta Singhal, Comptroller of the Governor’s Households Jitendra Wagh and officers and staff of Raj Bhavan were present.

आचारसंहिता भंगाच्या ९,२६५ तक्रारी निकाली; ६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. १९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ९ हजार २९३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९ हजार २६५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/11/seizure-all-distwise-report-2024-11-19-1731994276.pdf”]

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज – अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

  • मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन
  • मुंबई शहर जिल्ह्यात २५ लाख ४३ हजार ६१०
  • २ हजार ५३८ मतदान केंद्रे

मुंबई, दि. १९ : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. मतदान मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक व शांततामय वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती श्री. यादव यांनी सांगितले.

दहा विधानसभा मतदारसंघात एकूण १०५ उमेदवार

मुंबई शहर जिल्ह्यात २५ लाख ४३ हजार ६१० मतदारतर २ हजार ५३८ मतदान केंद्रे

मुंबई शहर जिल्ह्यात मतदानासाठी सुमारे १२ हजार ५०० कर्मचारी

विधानसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या दहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदार केंद्राला प्रत्येकी एक असे २५३८ बीएलओ आहेत. एकूण ३६४ क्षेत्रीय अधिकारी (Z.O) आहेत. जवळपास १२ हजार ५०० पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती

एकूण मतदार :- २५ लाख ४३ हजार ६१०

  • महिला  –  ११ लाख ७७ हजार ४६२
  • पुरुष – १३ लाख ६५ हजार ९०४
  • तृतीयपंथी– २४४
  • ज्येष्ठ नागरिक (८५+) – ५३ हजार ९९१
  • नवमतदार संख्या (१८-१९ वर्ष)– ३९ हजार ४९६
  • दिव्यांग मतदार – ६ हजार ३८७
  • सर्व्हिस वोटर – ३८८
  • अनिवासी भारतीय मतदार – ४०७

विधानसभा मतदार संघनिहाय मतदार संख्या

धारावी – २६१८६९

सायन-कोळीवाडा  – २८३२७१

वडाळा – २०५३८७

माहिम – २२५९५१

वरळी – २६४५२०

शिवडी – २७५३८४

भायखळा – २५८८५६

मलबार हिल – २६११६२

मुंबादेवी – २४१९५९

कुलाबा – २६५२५१

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रे

एकूण मतदान केंद्र – २५३८

उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र –   १५६

सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र – १००

झोपडपटटी परिसरात मतदान केंद्र – ३१३

मुंबई शहर जिल्ह्यात मंडपातील मतदान केंद्र – १०१

पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्र – १७

एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०१

एकूण सखी महिला मतदान केंद्रः- १२

नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- १२

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८

ईव्हीएम

अ) Ballot Unit – ३०४१

ब)  Control Unit – ३०४१

क)  VVPAT –  ३२९४

मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध 

मुंबई शहर जिल्ह्यात २५३८ मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी प्रशासनातर्फे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. किमान सुविधा (Assured Minimum Facilities) अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदारांसाठी स्वच्छतागृह, प्रतिक्षालय, रांगा लागल्यास ठराविक ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, मदतीसाठी दिव्यांग मित्र स्वयंसेवक, मैदानाच्या ठिकाणी मंडप, कचरापेटी, पंखे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, मोकळ्या मैदानाच्या ठिकाणी मंडप, दिशादर्शक फलक, मेडिकल किट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाच्या दिवशी सुविधा 

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक (८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक) मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या मतदारांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली. या ॲपवर नोंदणीकृत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना संबंधित सुविधा पुरविणा-या शासकीय व स्थान निश्चिती यंत्रणेला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या मागणीनुसार आवश्यक मदत म्हणजेच गरजेनुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मागणी नोंदविण्यात येत असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय  मोफत बस प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी नेमले आहेत. मोफत बस सुविधेकरिता बेस्टकडून मतदान केंद्राच्या लोकेशननुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी रूट प्लान तयार करण्यात आला आहे. समन्वय अधिकारी व रूट प्लान एका क्लिकवर मतदारांना मिळण्यासाठी क्युआर कोड तयार करण्यात आला आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई 

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश मा. भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने होईल याकडे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव असणार आहे.

मतदार यादीत नाव तपासून घ्या  

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे.

मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

मतदानासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल.

         मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी  मतदार ओळखपत्र सादर करतील.   मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये

१) आधार कार्ड,

२) मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,

३) बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक,

४) कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,

५) वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),

६) पॅन कार्ड,

७) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड

८) भारतीय पारपत्र (पासपोर्ट)

९) निवृत्तीवेतनाची दस्तावेज

१०) केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र

११) संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र

१२) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

         मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.

KYC App – उमेदवारांबाबत माहिती या ॲपवर उपलब्ध होऊ शकेल

Cvigil ॲप च्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे १०० मिनिटांत निराकरण केले जाते.

मतदार हेल्पलाईन क्रमांक  १९५०

जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्रमांक  ०२२-२०८२२७८१

निवडणूक नियंत्रण कक्ष  ७९७७३६३३०४

000

यंत्रणेची झाली पूर्ण तयारी…मतदार राजाची आता जबाबदारी

लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.     

मतदार नोंदणीत वाढ; राज्यात ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ५ कोटी २२ हजार ७३९,  तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या आहेत, ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.

राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार

राज्यात 4,69,96,279 महिला मतदार  आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग (PwDVoters) मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांची  संख्या 1,16,170 आहे.

राज्यात एकूण 4136 उमेदवार

राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण ४ हजार १३६ उमेदवार आहेत. ज्यामध्ये ३,७७१  पुरूष, ३६३  महिला आणि तर अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मतदानासाठी 2,21,600 बॅलेट युनिट

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,186 इतक्या मतदान केंद्रांसाठी  2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5166 बॅलेट युनिट, 5166 कंट्रोल युनिट  व  5165 व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत  एकूण  185 विधानसभा  मतदाररसंघात  एक  बॅलेट  युनिटची  आवश्यकता  आहे.  तर  100  मतदारसंघात  दोन  बॅलेट  युनिट आणि तीन  मतदारसंघांमध्ये  तीन  बॅलेट  युनिट  लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी  1  लाखांहून अधिक मतदान केंद्र सज्ज

विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता येण्यासाठी राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.

महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र राहणार आहेत. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात मतदान केंद्रे 

मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात  एकूण मतदान केंद्रे 1,00,186 आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र 42,604  तर ग्रामीण मतदान केंद्र 57,582 इतकी आहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत.  झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आली असून सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 इतकी आहे.

आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष

यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

मतदान केंद्रांची संख्या  जिल्हानिहाय

1. पुणे – 8462 2. मुंबई उपनगर – 7579 3. ठाणे – 6955
4. नाशिक – 4922 5. नागपूर – 4631 6. अहमदनगर – 3765
7. सोलापूर – 3738 8. जळगाव – 3683 9. कोल्हापूर – 3452
10. औरंगाबाद – 3273 11. सातारा – 3165 12. नांदेड – 3088
13. रायगड – 2820 14. अमरावती – 2708 15. यवतमाळ – 2578
16. मुंबई शहर – 2538 17. सांगली – 2482 18. बीड – 2416
19. बुलढाणा – 2288 20. पालघर – 2278 21. लातूर – 2143
22. चंद्रपूर – 2077 23. अकोला – 1741 24. रत्नागिरी – 1747
25. जालना – 1755 26. धुळे – 1753 27. परभणी – 1623
28. उस्मानाबाद – 1523 29. नंदूरबार – 1434 30. वर्धा – 1342
31. गोंदिया – 1285 32. भंडारा – 1167 33. वाशिम – 1100
34. हिंगोली – 1023 35. गडचिरोली – 972 36. सिंधुदुर्ग – 921

विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिकशाईच्या बाटल्यांची तरतूद

विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे.    राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये  १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.

४२६ मतदान केंद्रमहिला नियंत्रित 

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.  नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे  असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.

महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेतली आहे.

जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद १३, बीड ८, भंडारा ८, बुलढाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५,  जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १२, नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४,  उस्मानाबाद ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७,  ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.

घरबसल्या जाणून घ्या आपल्या मतदान केंद्राची माहिती

मतदारांना सहजतेने आपला मतदानाचा हक्क बजावता यावा,यादृष्टीने निवडणूक यंत्रणेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर तसेच वोटर्स ॲपवर मतदारांना आपला निवडणूक ओळखपत्राचा अंक टाकून किंवा स्वतःचे नाव किंवा मतदार नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे या ॲपवर आपले नाव मतदार यादीत शोधणे तसेच मतदान केंद्र याची माहिती सहजतेने मिळू शकते. मतदानासाठी जाताना ॲपच्या सहाय्याने मतदारांनी आपले मतदान केंद्र, आपले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा केल्याने कमी वेळेत मतदान करणे सहजतेने शक्य आहे.

१९५० क्रमांकाची हेल्पलाइन

निवडणुकविषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर १९५० या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

सक्षम ॲप

भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता  हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.

सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.

गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp

ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568

मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी प्रवेशसुविधा रॅम्पच्या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देखील उपलब्ध असतील. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, मतदार स्लिप ब्रेल लिपीमध्ये वाटण्यात आलेली आहे. अंध मतदारांकरिता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ब्रेल डमी, डमी मतपत्राला प्रत्येक मतदार केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

मतदान केंद्रावर हे पुरावे असणार ग्राह्य

आपले नाव मतदार यादीत असेल मात्र मतदान केंद्रावर निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेले मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान केंद्रावार त्याच्याशिवाय पुढील ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामध्ये  १) आधार कार्ड २) वाहन चालक परवाना ३) पॅन कार्ड ४) भारतीय पारपत्र ५) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ६) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र ७) संबंधित शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या  मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मूळ प्रमाणपत्र ९) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मूळ प्रमाणपत्र १०) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानासाठीची सर्व तयारी झालेली आहे. आता जागरूक मतदार म्हणून लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करुयात.

०००

  • वंदना रघुनाथराव थोरात, विभागीय संपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.

उमेद’कडून मतदानाबाबत १.७५लाख कुटुंबांचे समुपदेशन

सातारा, दि. १९: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सातारा शंभर टक्के मतदान या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद जिल्हा कक्षाने जोरदार जनजागृती मोहीम राबवून जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर कुटुंबांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण कुटुंबाने मतदान करावे, असे आवाहन केले असल्याची माहिती स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.

गुगल मीटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उमेद अंतर्गत ग्रामीण भागात कार्यरत 2 हजार प्रेरिकांशी ई- संवाद साधत मतदार जनजागृतीबाबत प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी मतदान शंभर टक्के होण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही केली जावी याबाबत सविस्तर माहिती दिली होती. या बैठकीत उमेद अभियानात कार्यरत प्रेरीकांनी गावोगावी प्रत्यक्ष गृह भेट घेऊन मतदारांना मतदान करण्याविषयी समुपदेशनाबाबत अवाहन केले होते.

याला प्रतिसाद देत जिल्हा अभियान सहसंचालक विश्वास सिद व जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील 2 हजार प्रेरिकांनी दि. १५ ते १७ नोव्हेंबर रोजी अभियानांतर्गत स्थापित बचत गट, ग्रामसंघ व प्रभागसंघ यांच्या बैठकांचे आयोजन करून त्यामध्ये १०० % मतदारांनी मतदान करण्याबाबत समुपदेशन केले. या  समुदाय स्तरीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मतदार जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आले. या संपूर्ण उमेद समूहाच्या जाळ्यातून जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर  हजार  कुटुंबाना प्रत्यक्ष गृह भेट देऊन समुपदेशन करण्यात आले. यावेळी संबंधित कुटुंबातील कुटुंब प्रमुखांनी आम्ही मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभागी होऊ, अशी ग्वाही दिली.

ही मोहीम यशस्वी होणेसाठी जिल्हा व्यवस्थापक मनोजकुमार राजे, स्वाती मोरे, संजय निकम तसेच उमेद अभियानात कार्यरत सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी मेहनत घेतली.

०००

ECI 360-degree outreach to Nudge Urban & Young Voters

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/11/ECI-360-degree-outreach-to-Nudge-Urban-Young-Voters-18.11.2024.pdf” title=”ECI 360-degree outreach to Nudge Urban & Young Voters 18.11.2024″]

२० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मुंबई, दि. 18 : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी 7:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र. मतदार संघांची संख्या मतदान केंद्रे सहाय्यक मतदान केंद्र

क्रिटीकल मतदान केंद्रे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या बॅलेट युनिट (बीयु) कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट
1 288 100186 241 990 4,136 1,64,996 1,19,430 1,28,531

राज्यातील एकूण 1,00,427 इतक्या मतदान केंद्रांपैकी, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान 67,557 इतक्या मतदान केंद्रांवर वेबकास्टींग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

  1. मतदारांची संख्या
अ.क्र. मतदारांचा तपशील. (दिनांक 30.10.2024 रोजी) पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकूण
1 मतदारांची संख्या 5,00,22,739 4,69,96,279 6,101 9,70,25,119
2 दिव्यांग (PwD) मतदार 3,84,069 2,57,317 39 6,41,425
3 सेना दलातील मतदार (Service Voters) 1,12,318 3,852 1,16,170

  1. राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकूण निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या
1 16 नांदेड लोकसभा मतदार संघ 9,78,234 9,30,158 154 19,08,546 19

  1. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे.
  2. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे सरमिसळीकरण (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

III.                    मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही        सरमिसळीकरण (Randomization) देखील झाले आहे. तसेच या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची   विधानसभा मतदारसंघनिहाय सिलींग करण्यात आले आहे.

  1. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
  2. मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
  3. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी 86,462 अर्ज मंजूर करण्यात आले. दिनांक 16.11.2024 पर्यंत गृह मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

VII.                  आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाले तर उचित कार्यवाही करण्यात येत आहे.

VIII.                 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता  मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

  1. मतदान करण्याकरीता सर्वसाधारण वेळ सकाळी 07.00 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत आहे. तसेच संध्याकाळी 06.00 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन क्रमांक देऊन त्यांना मतदान करु देण्यात येईल.
  2. मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी सर्व 288 विधानसभा मतदार संघामध्ये शांतता काळ आहे. सबब या विधानसभा मतदार संघांमध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच त्या मतदार संघातील रहिवासी नसलेली व राजकीय प्रचारासाठी आलेली राजकीय व्यक्ती त्या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.
  3. राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता सर्व तयारी झालेली आहे. या निवडणूकीमध्ये मोठया प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

4)                 राज्याची माहिती:-

अ)  Law and Order (कायदा व सुव्यवस्था):- दिनांक  17.11.2024  पर्यंतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. तपशील संख्या
1. राज्यातील वितरीत केलेले एकूण शस्र परवाने 78,267
2. जमा करण्यात आलेली शस्रास्रे 56,604
3. जप्त करण्यात आलेली शस्रे 235
4. जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रात्रे 2,206
5. परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली  शस्रे 611
6. परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे 20,495
7. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून बीएनएसएस कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या इसमांची संख्या 79,856

 विधानसभा सार्व‍त्रिक निवडणूक, 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदार संघासाठी 142 सामान्य निरीक्षक (General Observer) 41 पोलीस निरीक्षक (Police Observer) व 72 खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली आहे. तसेच, 288 मतदार संघांमध्ये 146 अतिरिक्त  मतमोजणी निरीक्षक मतमोजणीसाठी उपस्थित असणार आहेत.

ब)            राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती :-

राज्यामध्ये दि. 15.10.2024 ते दि. 17.11.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध  अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. जप्तीची बाब परिमाण रक्कम (कोटी मध्ये)
1 रोख रक्कम 153.01
2 दारु 68,51,364 लिटर 68.63
3 ड्रग्ज 1,01,42,452 ग्राम 72.00
4 मौल्यवान धातू 1,64,72,596  ग्राम 282.49
5 फ्रिबीज 57,949  (संख्या) 3.78
6 इतर 13,73,775 (संख्या) 75.60
  एकुण 655.53

क)         दि. 15.10.2024 ते 17.11.2024 या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजील ॲप वर आचारसंहिता भंगाबाबतच्या 8386 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 8353 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टल वरील  13,807 तक्रारीपैकी 9,132 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

ड)       माध्यम देखरेख व संनियत्रण समिती (PRE CERTIFICATION / APPELLATE – MCMC):- राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने दि. 17.11.2024 पर्यंत 228 प्रमाणपत्रे देण्यात आली असून 1559 जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

००००

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

0
मुंबई, दि. १६:  भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप...

नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

0
मुंबई, दि. १६: नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे...

विधानसभा इतर कामकाज

0
अर्धा तास चर्चा ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. १६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक...

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १६: "एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी...

अंबादास दानवे हे विधानपरिषदेत चर्चेची उंची वाढवणारे विरोधी पक्षनेते – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. १६ : अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...