शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 18

उद्योगांना आवश्यक कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी शासन कटिबद्ध- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका)- उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ आणि उपलब्ध प्रशिक्षण अभ्यासक्रम यातील तफावत दूर करुन उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येऊन उद्योगांना कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांच्यावतीने आज उद्योजकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाळूंज औद्योगिक वसाहतीतील मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सभागृहात आज हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष रविंद्र वैद्य, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, मनोज पांगारकर, उद्योजक राम भोगले, मुनिश शर्मा, विनय झोटे, प्रवीण घुगे आदी उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य यातील तफावत दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी उद्योजकांकडून या सुचना मागविण्यात येत आहेत. शासनाच्या ४२७ आणि खाजगी ५५० आयटीआय मध्ये उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षणाची सुविधा दिली जाईल. उद्योजकांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम द्यावेत. त्यानुसार युवक युवतींना प्रशिक्षण दिले जाईल व हे कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ हे उद्योगांसाठी उपलब्ध करुन देता येईल. यातून बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध होईल व उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ. त्यामुळे उद्योगजगत व शासन यांनी सोबत येऊन हा उपक्रम राबवावा,असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले. प्रा. मुनिष शर्मा यांनी तयार केलेल्या स्किल गॅप स्टडी रिपोर्टचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. उद्योजकांच्या प्रश्नांना श्री. लोढा यांनी उत्तरे दिली.

०००००

श्री क्षेत्र कौंडण्यपूर शक्तिपीठ महामार्गाला जोडणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. २७ (जिमाका) :शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपर्यंत जाणार आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्रीक्षेत्र कौंडण्यपुरला जाण्याची सुविधा निर्माण व्हावी, या श्रीक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे शक्तिपीठ पुढील काळात महामार्गाला जोडण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला.

श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वर्दीनी नदीचे (वर्धा नदी) पूजन करून 211 मीटरची अखंड साडी नदीला अर्पण केली. ही साडी सूरत येथे तयार करण्यात आली. नदीला आपल्या भारतीय संस्कृतीत माता मानतात. मातेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून हा सोहळा साजरा करण्यात आला.

आमदार राजेश वानखडे, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, सुमीत वानखडे, दादाराव केचे, प्रवीण पोटे-पाटील, शेखर भोयर, रविराज देशमुख, किरण पातुरकर, राज राजेश्वर माऊली सरकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे  श्रीक्षेत्र विदर्भाची पंढरी, भगवान श्रीकृष्णाचे सासर तसेच माता रुख्मिणीचे व पंच सतीचे माहेरघर म्हणून सर्वश्रृत आहे.  ही भूमी अत्यंत पवित्र आहे. या भूमीला पाच हजार वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. विठू रुख्मिणी मातेचे पूजन करून मला अधिक सकारात्मकतेने कार्य करण्याचे ऊर्जा मिळाली आहे. या आशीर्वादाने माझे जनसेवेचे कार्य अव्याहतपणे सुरू राहील.

ते पुढे म्हणाले, हे शासन लाडक्या बहिणी व शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर राहील. अमरावती जिल्ह्यातील पांदण रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. श्री क्षेत्र कौंढण्यपूरचा विकास करण्यासाठी पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून येथील विकासकामे सुरु करण्यात येईल,असेही ते यावेळी म्हणाले.

अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव व विठ्ठल रुख्मिणी संस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल रुख्मिणी रथयात्रा, नगर प्रदक्षिणा, एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी महिला भजनी मंडळाच्या शंभरहून अधिक दिंड्या सामील झाल्या होत्या. भक्तिमय वातावरणात विठु रखमाईचा जयघोष करीत, टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक भक्तगण, वारकरी, ग्रामस्थ यात सामील झाले होते.

****

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबईदि. २७ : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना 5000 रुपये मानधन देण्यात येते. या योजनेसाठी १ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे आणि दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे करण्यात आली आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक आहे. विधवापरित्यक्त्यादिव्यांग व वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्यांची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून आहेअशा कलाकारांनाच प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही नियमित पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा. तसेचमहाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक असणे या पात्रतेच्या अटी आहेत.

अर्जदाराने अर्जासोबत वयाचा दाखलाआधार कार्डउत्पन्नाचा दाखलारहिवासी प्रमाणपत्रप्रतिज्ञापत्रपती-पत्नी एकत्रित छायाचित्र (लागू असल्यास)बँक पासबुकची प्रतअपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)शासनाचे इतर प्रमाणपत्रे (लागू असल्यास)नामांकित संस्था किंवा व्यक्तीकडून शिफारसपत्र (लागू असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी आपले सरकार’ पोर्टलवर 31 जुलैपूर्वी अर्ज दाखल करावाअसे आवाहन मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. सुभाष काकडे यांनी केले आहे.

000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना: शेतकऱ्यांसाठी एक आधार

शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात. कधी वीज पडतेकधी पूर येतोतर कधी सर्पदंश किंवा विंचू दंश होतो. याशिवायविजेचा शॉकरस्त्यावरील अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा ते अपंग होतात. घरातील कर्त्या व्यक्तीला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते आणि अडचणी येतात. अशा अपघातग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे.

*योजनेची उद्दिष्ट्ये:

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे.

शेती व्यवसायातील धोके कमी करणे.

शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणे.

या योजनेत राज्यातील वहितीधारक खातेदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (आई-वडीलपती/पत्नीमुलगा व अविवाहित मुलगी) पात्र आहेत.

अर्जदाराचे वय 10 ते 75 वर्षे असावे.

अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा दोन डोळेदोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपयांची मदत मिळते.

एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत मिळते.

अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

*आवश्यक कागदपत्रे:*

7/1 उतारा

मृत्यूचा दाखला (अपघाती मृत्यू झाल्यास)

तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद

शेतकऱ्याच्या वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखलाआधार कार्डनिवडणूक ओळखपत्र)

प्रथम माहिती अहवाल (FIR)

स्थळ पंचनामा

पोलिस पाटील माहिती अहवाल

अपघाताच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रे

*अपघात –

या योजनेत रस्ता अपघातरेल्वे अपघातपाण्यात बुडून मृत्यूजंतुनाशके हाताळताना विषबाधाविजेचा धक्कावीज पडून मृत्यूखूनउंचावरून पडून झालेला अपघातसर्पदंशविंचूदंशनक्षलवाद्यांकडून हत्याजनावरांच्या हल्ल्यात मृत्यूबाळंतपणातील मृत्यूदंगल आणि अन्य कोणत्याही अपघातांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या कृषी सहाय्यककृषी पर्यवेक्षकमंडळ कृषी अधिकारीतालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

                                                                   –जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर.

आषाढी वारी कालावधीत महिला भाविकांच्या सुरेक्षेबाबत आवश्यक दक्षता घ्यावी- उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

पंढरपूर, दि. २७ : – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा ०६ जुलै २०२५ रोजी होणार असूनया यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर तसेच यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात व परिसरात सर्व पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध  कराव्यात.  तसेच पालखी सोहळ्यासोबत महिला भाविकांची  संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने  त्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत त्यांच्या सुरक्षेबाबत विशेष दक्षता घ्यावी अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. यांनी दिल्या.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री रुक्मिणी मंदीर देवस्थान  व  जिल्हा प्रशासनासोबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे  यांनी सूचना दिल्या.  यावेळी  ऑनलाईन बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमअप्पर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकरप्रांताधिकारी सचिन इथापेकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगारजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेमहावितरणचे श्री मानेकार्यकारी अभियंता अमित निमकरभीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री हरसुरेतहसीलदार सचिन लंगुटेमहिला बाल विकास अधिकारी रमेश काटकरमुख्याधिकारी महेश रोकडे  उपस्थित होते.

                 यावेळी  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्यापालखी मार्गावर हिरकणी  कक्षचेंजिंग रूमसॅनिटरी नॅपकिनवेडींग मशीन आदी व्यवस्थेची मुबलक उपलब्धता ठेवावी. पालखी मार्गावर लहान दिंड्यांनसाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करावी  स्वच्छता कर्मचाऱ्यांच्याही आरोग्य सुरक्षेची काळजी घेऊन त्यांना आवश्यक साधनांचा पुरवठा करावा. चंद्रभागा नदीपात्रात वाळूचे खड्डे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच धोक्याच्या ठिकाणी माहिती फलक व लाल रंगाच्या झेंड्याच्या निशाणी लावाव्यात. घाट दुरुस्तीची कामे करावीत. वारी कालावधीत अखंडित वीजपुरवठा राहील याची दक्षता घेऊन आवश्यक ठिकाणी मुबलक प्रकाश व्यवस्था करावी. वारी कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात पाणी पातळी योग्य प्रमाणात राहील याचे नियोजन करावे वारी कालावधीत शहरातील नागरिकांना तसेच भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी. घनकचरा व्यवस्थापनाबाबत पंढरपूर शहर योग्य नियोजन करावे. परिवहन विभागाने पालखी मार्गावर अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी पथके तैनात ठेवावीत कोविडच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटर व्यवस्था सुस्थितीत ठेवावी.

तसेच एसटी महामंडळाने  महिला भाविक प्रवाशांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. वारी कालावधीत एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते यासाठी महिला भाविकांसाठी काही अडचणी आल्यास तसेच  महिला व बालके हरवल्यास टोल फ्री हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करावा तसेच तो प्रत्येक एसटी बस मध्ये लावावा. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या एसटी बस मध्ये रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवाव्यात. चंद्रभागा नदीपात्रा लगत असणाऱ्या दत्तघाटावर अनाथ मुले वयस्कर व मतिमंद नागरिकांना सोडून देण्यात येते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिला बाल विकास व सामाजिक न्याय विभागाने पथके नेमावीत या पथकात महिला पथकांचाही समावेश करावा अशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले,आषाढी यात्रा सोहळ्यात वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून व स्वच्छतेला प्राधान्य देऊन आषाढी वारीचे नियोजन करण्यात आले आहे.वारी कालावधीत पाऊस जास्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व पालखीतळांवर मुरमीकरण करण्यात आले आहे. तसेच पालखी मार्गावर भाविकांच्या सुविधेसाठी जर्मनी हँगरवॉटरप्रूफ मंडप उपलब्ध करण्यात येणार आहेत.  पालखी मार्गावर व तळांवर शहरात मुबलक टॉयलेट पाणीपुरवठासुरक्षामहिला भाविकांसाठी सुलभ शौचालय ,स्नानगृह ,हिरकणी कक्षसॅनिटरी नॅपकिनचेंजिंग रूमवेंडिंग मशीन यांची  उपलब्धता ठेवण्यात येणार आहे.

तसेच आरोग्य सुरक्षेसाठी मुबलक औषधे सुसज्ज रुग्णवाहिका आरोग्य केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहेत.

पंढरपूर शहरात वारकरी भाविकांना अडथळा येऊ नये यासाठी अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच शहरात वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी साडेतीनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आले आहेत असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

यावेळी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन संवर्धनच्या कामाबाबतची माहिती घेतली.

तसेच वारकरी भाविकांसाठी पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात करण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत विस्तृत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.

                                              0000

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने आयोजित ‘आरोग्यवारी’ उपक्रम स्तुत्य- क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि.२७: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने आयोजित ‘आरोग्यवारी’ उपक्रम स्तुत्य असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमूद केले. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आयोगाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज्य महिला आयोग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे आयोजित ‘आरोग्य वारी’ उपक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्य सचिव नंदिनी आवडे, उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, आरोग्य उपसंचालक प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी सचिन खुडे आदी उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना त्रास होणार नाही, त्यांना चांगल्या प्रकारच्या आरोग्यविषयक सोई-सुविधा मिळाव्यात याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन, बालकांना स्तनपानाकरिता हिरकणी कक्ष, न्हाणीघर, शौचालय, स्वच्छतागृह, दामिनीपथक, प्राथमिक उपचार, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण आणि सन्मानाकरिता राज्यशासन कार्यरत

राज्य शासनाच्यावतीने महिलांसाठी आरोग्याविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महिलांच्या प्रश्नाबाबत राज्य शासन जागरूक असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाकरिता काम करीत आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यांना रोजगार मिळावा याकरिता बचतगटाची चळवळ उभारण्यात आली आहे, बचतगटाच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महिलांना सन्मानाची वागणूक द्या
आपल्यामुळे इतराला त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, एकमेकाला प्रेम, आनंदाची, विचारांची देवाणघेवाण करण्यासोबतच महिलांना सन्मानाची वागणूक द्या. मनमोकळेपणाने संवाद साधावा. ‘हुंडा घेणार किंवा देणार नाही’ असे चांगले संकल्प करूया, असे आवाहन श्री. भरणे म्हणाले.

आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज इंदापुर तालुक्यात आगमन होत असून नागरिकांनी वारकऱ्यांची उत्तमपणे सेवा करुन तालुक्याचे नाव राज्यात उज्वल करण्याचे काम करुया, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, संत जनाबाई, संत मुक्ताबाईंनी स्त्री मुक्तीची चळवळ वारीच्या माध्यमातून दिली. देहू, आळंदी, मुक्ताईनगर यांसह विविध भागातून वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत वारीत वारकरी सहभागी होतात. अशा या सहभागी महिलांच्या मासिक पाळीचा आदी आरोग्य आणि स्वच्छताविषयक बाबींचा विचार करुन महिला आयोग आणि पुणे, सातारा तसेच सोलापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ४ वर्षापासून ‘आरोग्य वारी’ प्रशासनाच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत तिन्ही जिल्ह्यात १९८ हिरकणी कक्ष, ३० हजार ९८८ शौचालय, ३ हजार ४५४ न्हाणीघर, २२३ वैद्यकीय पथक, ३१७ रुग्णवाहिका, १८९ आरोग्यदूत, २२६ स्थानिक उपचार केंद्र, १२ उपजिल्हा रुग्णालय आणि ४६६ उपकेंद्राचा समावेश आहे. तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर केल्या आहेत.

महिलांना सुरक्षिततेचा, प्रगतीचा विश्वास देण्यासाठी आयोग प्रयत्न करत आहे. स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह विरोधात आई म्हणून महिलांनी भूमिका बजावावी. हुंडाबळी, अंधश्रद्धा, विधवाप्रथा आदी प्रवृत्तीविरोधात सक्षमपणे उभे रहावे. सामाजिक चळवळ म्हणून महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी. याकरिता अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा कार्यकर्त्या शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहचविण्याचे काम करीत असतात, वारीसोबतच विचारांची वारी प्रगतीकडे घेऊन जायची आहे. वारीच्या माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृती करत आरोग्याची काळजी घेऊया. आपले तन आणि मन सक्षमपणे सदृढ करण्याकरिता एकत्रितपणे प्रयत्न करु या. महिलांची वारी भक्तिमय असण्यासोबतच आरोग्यमय करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केला.

महिलांना कोणाकडूनही त्रासाला, गुन्हेगारीला सामोरे जावे लागल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने ‘भरोसा सेल’ काम करते. समस्या न सुटल्यास आयोगाकडे संपर्क साधावा, आयोग आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही श्रीमती. चाकणकर यांनी दिली.

श्रीमती आवडे म्हणाल्या, राज्य महिला आयोग महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्याकरिता कटिबद्ध आहे. राज्य शासनाच्यावतीने वारकऱ्यांकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती आवडे यांनी केले.

इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. रेश्मा गार्डे आणि रिटेनर लॉयर संजय चंदनशिवे यांनी महिलांकरिता असलेले कायदे, विधी सेवा प्राधिकरणाच्या सेवांबाबत माहिती दिली.

यावेळी श्री. भरणे यांच्या हस्ते आरोग्य उपक्रमाअंतर्गत हिरकणी कक्ष, औषधोपचार केंद्र, कर्करोग जनजागृती वाहनाचे उद्घाटन करण्यात आले, येथील सोई-सुविधांची माहिती जाणून घेतली.

यावेळी निर्माण संस्थेच्यावतीने ‘हुंडा’ विषयावर जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, सरपंच प्रवीण डोंगरे, ग्रामविकास अधिकारी आबा जगताप आदी उपस्थित होते.
0000

गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही देणार भर – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

नागपूर,दि.२७ : ज्या विश्वासाने पालक शासकीय आश्रमशाळेत मुलांना दाखल करतात त्या विश्वासाला सार्थकी लावण्याची जबाबदारी ही शिक्षक व शाळेवर असते. पालकांच्या मनात आपल्या मुलांप्रती असलेल्या उज्वल भविष्याला साकार करण्यासाठी आश्रम शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कवडस येथे आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात पालकांशी साधलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच उषा रविंद्र सावळे, आदिवासी विकासाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, उपायुक्त दिंगबर चव्हाण, आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर व मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत व शासन अनुदानित ज्या काही शाळा, शिक्षण संस्था आहेत त्यात शिकणाऱ्या आदिवासी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाहीत. शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांमुळे आपण आहोत हे शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तसमवेत त्यांच्या आहारातील गुणवत्ता ही चांगलीच असली पाहिजे. याबाबत मुख्याध्यापक, संस्थाप्रमुख हे योग्य ती खबरदारी घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिक्षण क्षेत्रातील बदलांना व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीबाबत प्रक्रियेचा मी स्वत: एक भाग राहिलो आहे. विद्यार्थ्यांप्रती प्रत्येक शिक्षकांच्या मनात जी कणव असते ती अधिक समर्थपणे जपणे आवश्यक आहे. शिक्षकांनी पालकांशीही मनमोकळा संवाद साधला पाहिजे. या विश्वासार्हतेतून विद्यार्थ्यांना बळ मिळते. मुलांच्या अंगातील सुप्त गुण हे गुरुजणांनी लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही शाळेच्या केंद्रबिंदू ही मुलेच आहेत असे त्यांनी स्पष्ट केले

आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी 1751 प्रलंबित जागा येत्या शैक्षणिक सत्रापर्यंत भरती केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी विभागासाठी कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता नसून 17 विभागाद्वारे आदिवासी विभागाच्या योजना या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आदिवासी विभागाने संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील कोणताही आदिवासी व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी “प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” हाती घेतले आहे. हे अभियान अधिक सक्षमपणे संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविले जात असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
00000

सहकार पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर १८ जुलै पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

पुणे,दि.२७ : राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकार पुरस्कारासाठी संस्थांची निवड करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सहकारी संस्थांनी १८ जुलै २०२५ पर्यंत संबंधित तालुका सहायक निबंधक, उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केले आहे.

या पुरस्कारांतर्गत ‘सहकार महर्षी’ पुरस्कार-१ , ‘सहकार भूषण’- २१ तसेच ‘सहकार निष्ठ’- २३ असे एकूण ४५ संस्थांना पुरस्कार देण्यात येणार असून अनुक्रमे रुपये १ लाख, रुपये ५१ हजार व २५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

पात्र संस्थांच्या निवडीसाठी संस्थाप्रकारनिहाय नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा-तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखापरीक्षण, व दोषदुरुस्ती अहवाल, निवडणूक,व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक, प्रशिक्षण, सादर करावयाची प्रतिज्ञापत्रे यासाठी ५० गुण, संस्था प्रकारनिहाय निश्चित केलेल्या विशेष निकषांसाठी ३५ गुण व सहकारी संस्थेसाठी योगदान, जनतेसाठी दिलेले योगदान, सहकार चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न, सहकारी, सार्वजनिक, धर्मादाय प्रयोजनासाठी केलेली मदतीसाठी २० गुण देण्यात येणार आहेत.

शासन स्तरावरील समितीमार्फत २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत पुरस्कार प्राप्त संस्थांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराविषयी अधिक माहिती सहकार विभागाच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

0000

कोल्हापूर चित्रनगरीत मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण

मुंबईदि. २७ : कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते २८ जून २०२५ रोजी सकाळी ११:५० वाजता होणार आहे. या सोहळ्याकरिता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर,  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराज्यमंत्री तथा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध विकास कामांमध्ये रेल्वे स्टेशन चित्रीकरण स्थळनवीन वाडाचाळमंदिरअंतर्गत रस्तेदोन वस्तीगृहे इत्यादी कामांचा समावेश आहे. या कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. भविष्यातील बदलत्या तंत्रज्ञानाचा कल लक्षात घेता चित्रनगरीमध्ये सुसज्ज अशा पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास तसेच भूमिपूजन समारंभास चित्रपट क्षेत्राशी आणि नाट्य क्षेत्राशी निगडित कलाकार व मान्यवर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीमध्ये तीन चित्रीकरणे सुरू असून अनेक जाहिरातीमालिका आणि चित्रपटाचे चित्रीकरण नियमितपणे या चित्रनगरीमध्ये होत आहे. चित्रनगरीमध्ये झालेल्या विविध विकास कामांचा थेट सकारात्मक परिणाम इथल्या रोजगारावर व कलाकार तंत्रज्ञ यांना मिळणाऱ्या विविध संधीवर होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीनागरिकांसाठी दिनांक २८ जून रोजी पाहण्यासाठी नि:शुल्क खुली ठेवण्यात येत असल्यानेयाचा लाभ नागरिकांनी घ्यावाअसे कोल्हापूर चित्रनगरी मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर चित्रनगरी मार्फत शाहू स्मारक येथे दिनांक २८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता “चित्रसूर्य” या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे असून निवेदन श्रीरंग देशमुख व सीमा देशमुख हे करणार आहेतया कार्यक्रमामध्ये कार्तिकी गायकवाडमयूर सुकाळेअभिषेक तेलंगमाधुरी कुंभारशेफाली कुलकर्णीपियुषा कुलकर्णी हे नावाजलेले कलाकार सूर्यकांत यांच्या जीवनावर व त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवर गाण्यांमधून प्रकाश टाकणार आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार व अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य तथा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापूर चित्रनगरी मधील विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम चित्रसूर्य या कार्यक्रमास उपस्थित राहावेअसे आवाहन कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक तथा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

000

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट

मुंबईदि. २७ : रायगडरत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाटसातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे २६ जून २०२५ रोजीचे ५.३० पासून ते २८ जून २०२५ रोजी ११.३० पर्यंत ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेतअसे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) वाशिम जिल्ह्यात ५२.८ मिमी पाऊस झाला आहे. तर बुलढाणा  जिल्ह्यात ४४.८वर्धा जिल्ह्यात ३९.२ मिमीजळगाव २८.२आणि रायगड जिल्ह्यात २६.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २७ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  १६.४रायगड २६.७रत्नागिरी १२.८,  सिंधुदुर्ग १३.६पालघर १९.३नाशिक ८.२धुळे १०.५नंदुरबार २जळगाव २८.२अहिल्यानगर १.२पुणे ८.६,  सातारा ४सांगली १.७कोल्हापूर ८.९छत्रपती संभाजीनगर १७.४जालना १५.२बीड १.६लातूर १.२धाराशिव ०.४नांदेड ३परभणी ९.१हिंगोली १४.८बुलढाणा ४४.८अकोला ११.९वाशिम ५२.८अमरावती १४.८यवतमाळ १९.७वर्धा ३९.२नागपूर ११.२गोंदिया ०.२चंद्रपूर ८.२ आणि गडचिरोली जिल्ह्यात १२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

            रत्नागिरी जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे शेड पडून यवतमाळ जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यूवर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्ती व एक प्राण्याचा मृत्यूबुलढाणा जिल्ह्यात पुरात वाहून एक व्यक्ती व दोन प्राण्यांचा मृत्यू आणि मुंबई शहर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे.

सातारा जिल्ह्यात निरा नदीत माउलींच्या पादुका शाही स्नानासाठी घेऊन गेले असताना एका बुडणाऱ्या तरुणाला रेस्क्यू टीमद्वारे वाचवण्यात आले.

वर्धा जिल्ह्यातील देवळीमधील दिगडोह येथे तीन शाळकरी मुले पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती त्यांना देवळी नगरपालिका व फायर ब्रिगेड यांनी सुरक्षितपणे वाचवले.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्ग साब्रा-फर्दापूर इंटरचेंजजवळ पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटीसारख्या मुसळधार पावसामुळे पुलाखाली पाणी साचलेज्यामुळे पाणी वाहताना दिसू लागल्याने वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. तसेच याठिकाणी जवळच्या शेतीचे नुकसान झाले असल्याचे राज्य आपत्कालीनकार्य केंद्राने कळविले आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...