शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 173

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड, दि.२१ :- महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन नांदेडमध्ये झालेध्वजारोहण माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २१ ते २३ फेब्रुवारी नांदेडमध्ये होत आहेतआज श्रीगुरूगोविंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झालायावेळी खासदार डॉअजित गोपछडेखासदार प्रारविंद्र चव्हाणआमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार बालाजी कल्याणकरआमदार जितेश अंतापूरकरआमदार आनंद तिडकेआमदार श्रीजया चव्हाणअपर मुख्य सचिव राजेशकुमारविभागीय आयुक्त डॉदिलीप गावडे,निवृत्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरेजीएसटीचे सहआयुक्त अभिजीत राऊतजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळहिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयलरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालमनपा आयुक्त डॉमहेश डोईफोडेअपर आयुक्त महसूल नैना बोंदार्डेअपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकरअपर आयुक्त प्रदिप कुलकर्णीनितीन महाजनसहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मामेघना कावली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या सर्व क्षेत्रातील वाटचा गौरवास्पद आहेकर्मचाऱ्यांवरील ताण तणाव हलका करण्यामध्ये क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपयोगी ठरतात. या स्पर्धांना निधी कमी पडणार नाहीअशी तरतूद करण्याची सूचना केलीतत्पूर्वी त्यांनी ध्वजारोहण केलेतसेच खेळाडुंना शिस्त व सांघिक भावनेची शपथ दिली.

महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे– अपर मुख्य सचिव राजेश कुमार

कोणत्याही राज्याचीजिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरतेराज्याचे प्रशासन कसे आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रमवृत्ती व सचोटीवर ठरते महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे व दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहेअसे प्रतिपादन राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना राजेशकुमार यांनी बारा वर्षानंतर या स्पर्धांचे आयोजन होत असल्याचा आनंद व्यक्त केलाया स्पर्धांचे नियोजन करणारे विभागीय आयुक्त दिलीप गावडेनांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेयांनी दर्जेदार स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी कौतूक केलेनांदेडमध्ये असणाऱ्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधानिवासाची व्यवस्था यामुळे याठिकाणी केवळ महसूलच्याच नव्हे तर अंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतातअसे त्यांनी स्पष्ट केले.

महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा असतोयामुळे या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी दर्जेदारच असतात मात्र फायलींमध्ये प्रशासनाचे कसब दाखवणारे आता मैदानावर आपले प्राविण्य दाखविणार असल्याचा आनंद आहेअगदी शिपाई पासून तर अप्पर मुख्य सचिवांपर्यंत आम्ही सगळे मैदानावर एक होऊन खेळतोही आमची एकजूट महसूलला वेगळी बळकटी देत असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी खासदार डॉअजित गोपछडेखासदार रविंद्र चव्हाणआमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार जितेश अंतापूरकरआमदार आनंद तिडकेआमदार बालाजी कल्याणकर यांनी शुभेच्छापर संबोधन केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवारमहाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे प्रतिनिधी पोपंटवारमहाराष्ट्र राज्य नायब तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष किरण अंबेकरमहाराष्ट्र राजपत्रित संघटनेचे प्रतिनिधी डॉसचिन खल्लाळमहाराष्ट्र राज्य अप्पर जिल्हाधिकारी संवर्गाचे प्रतिनिधी दिपाली मोतियेळे यांनीही संबोधित केलेयावेळी अविरत महसूल या राज्यस्तरीय स्मरणिकेचे अनावर करण्यात आलेराज्यातील जवळपास अडीच हजार कर्मचारी या स्पर्धेनिमित्त नांदेडमध्ये आले आहेतपुढील दिवस ही स्पर्धा नांदेड येथे रंगणार असून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

0000

मराठी ही आमची माऊली, अभिजात भाषेची सावली…

“माझा मऱ्हाठाची बोलू कौतुके! परी अमृतातेंही पैंजा जिंके!”

प्रख्यात साहित्यिक पु. ल.देशपांडे म्हणतात, “पंढरीचा पांडुरंग हे जसं महाराष्ट्राचं आध्यात्मिक दैवत आहे, त्याप्रमाणेच कुसुमाग्रज राज्याचा खऱ्या अर्थानं सांस्कृतिक ठेवा आहे”. चला तर, माय मराठीच्या संवर्धनासाठी तसेच मराठीपण व मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आपण सर्वजण एकदिलानं कटिबद्ध होऊया.

1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम-1964 नुसार मराठी भाषा ही राजभाषा म्हणून अमलात आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात म्हणजेच 2010 साली मराठी विभागाची मंत्रालयात निर्मिती करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणं, हे या विभागाचं मुख्य धोरण आहे. सदर धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने मराठी भाषा विभाग अंतर्गत राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ हे विभाग कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन ह्या कार्यक्रमांचे आयोजन राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तनमनधनाने करत आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.

भाषा हे संवादाचे माध्यम असून, आपले विचार व अनुभवांना प्रगट करणारा सुयोग्य मार्ग आहे. त्याद्वारे आपल्या जीवनाची जडणघडण होत असते. मराठी भाषेची थोरवी गातांना कविवर्य सुरेश भट म्हणतात, “आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म -पंथ-जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय म्हणतो मराठी!”

वास्तविक पहाता, कुसुमाग्रज हे माणसात माणूसपण रुजविण्यासाठी व त्याला निर्भय बनविण्यासाठी आपल्या काव्यपंक्तीत सांगतात, गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तिरावरी नदीच्या, गवतातूनी उरावे याशिवाय किनारा, समिधा, मराठी माती, हिमरेषा, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, स्वगत आदी कुसुमाग्रजांचे काव्यसंग्रह मराठी क्षितिजावर खूप गाजले आहेत. ज्ञानेश्वरांनी तर मराठीला अमृताची उपमा दिली आहे. “अमृतासारखी वा त्याहूनही गोड असलेली माझी-तुमची माय मराठी माझा मऱ्हाठीचि बोलू कौतुके, परी अमृतातेंही पैजा जिंके, ऐसी अक्षरें रजिकें, मेळवीन!”

कविवर्य कुसुमाग्रज हे माय मराठीसमोर आदरानं नतमस्तक होतात. ते म्हणतात, मराठी भाषेच्या मस्तकावर राजमुकुट आहे, पण तिच्या अंगावरची वस्त्रे मात्र फाटलेली आहेत. खरंतर, आपली विधिवत प्रतिष्ठापना होईल, या आशेने ती मंत्रालयाच्या पायथ्याशी ताटकळत उभी आहे. या विधानाचा मराठी जनमानसाने अवश्य विचार करून मराठीचा वारसा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध व्हावे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही मराठी मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. अशावेळी देर मगर दुरुस्त असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. महत्वाचं म्हणजे आपल्या राज्यात राहणाऱ्या अमराठी नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना मराठी बोलण्यास प्रवृत्त करावे, जेणेकरून मराठी भाषा गौरव दिन साजरा करणे सार्थक ठरेल.

राज्य शासनाच्या मराठी विभागाने आता वेळ न दवडता, मराठी या राज्य भाषेवर होणारे इंग्रजी, हिंदी भाषांचे अतिक्रमण थांबविण्यासाठी ठोस पावलं उचलावीत. त्याअनुषंगाने बालवयापासूनच मुला-मुलींचे शिक्षण आपल्या मातृभाषेत व्हावं, या दृष्टीने मराठी माणसाने तनमनधनाने प्रयत्न करावेत.

तात्पर्य, माहिती तंत्रज्ञानाच्या (आय.टी.) शिक्षणासाठी इंग्रजी येणं आवश्यक वाटत असलं तरी, मातृभाषेत लिहिणं-बोलण्यात तरबेज असणं त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे, हे विसरता कामा नये. इंग्रजी भाषेचं ज्ञान अवश्य घ्या. परंतु आपल्या मातृभाषेकडे पाठ फिरवू नका, एवढंच मराठी जनमानसाला प्रेमाचं सांगणं आहे.

मराठी भाषेची अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी मराठी माध्यमाच्या शिक्षणावर अधिक भर देणं ही काळाची गरज आहे. मराठी असल्याचा अन मराठी भाषेचा अभिमान बाळगून सकल मराठीजनांनी एकसंध होऊन मराठी चळवळ उभारावी, असे आवाहन मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात येते. योगायोगाने मागील शिंदे सरकारच्या काळात जय..जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. या गौरवपूर्ण गाण्याला राज्यगीताचा दर्जा मिळाला, याचा प्रत्येक मराठी माणसाला सार्थ अभिमान आहे.

सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“माय मराठी चिरायू होवो!”

जय हिंद.. जय महाराष्ट्र!

०००

 – रणवीरसिंह राजपूत, ठाणे, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी

 

 

 मराठी भाषेचा वापर वाढवावा…

भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. भाषेशिवाय आपल्याला जगताच येणार नाही. मग ती भाषा शब्दांची,  डोळ्यांची, किंवा हावभावांची असो. तिच्याद्वारेच आपण आपल्या भावना, विचार व्यक्त करत असतो. या भाषेत मातृभाषेला जास्त महत्त्व आहे. भाषा माणसाने निर्माण केली. तिला चिन्ह, त्याला अर्थ माणसांनी दिले .त्यामुळे हजारो भाषा निर्माण झाल्या. त्यातील एक भाषा म्हणजे आपली मराठी. तिला 2000 वर्षाचा इतिहास आहे. तिच्यातील शिलालेख, ताम्रपट,  लिखित साहित्य आजही उपलब्ध आहे. संत ज्ञानेश्वरांनी तिची तुलना अमृताची करून तिला अमृतापेक्षा सरस आणि मधुर ठरवलेले आहे आणि त्यामुळेच या भाषेचं वेगळेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषा आपल्याला आईसारखीच असते. मराठी इतक्या समृद्ध भाषा फार कमी आहेत. मराठीचे वेगळेपण अनेक प्रकारे सिद्ध करता येते.

मराठीत सुमारे 48 काव्यप्रकार आहेत. ज्या भाषेत आपल्या सगळ्या भावना विचार नेमकेपणाने व्यक्त करता येतात ती भाषा समृद्ध मानली जाते. मराठी अशी समृद्ध भाषा आहे. अगदी एखाद्या क्रियापदाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला तर त्याचा अर्थ बदलत जातो उदाहरणार्थ भरणे.. या क्रियापदाचा वापर जसा तुम्ही कराल तसा त्याचा अर्थ बदलत जातो. नळाचे पाणी भरणे,  मनात एखादी व्यक्ती भरणे, कान भरणे, लक्ष्मी पाणी भरणे, जखम भरणे, अंगाने भरणे, वगैरे वगैरे.. प्रत्येक भरण्याचा अर्थ वेगळा अर्थछटा वेगळ्या. मराठी भाषेला काना, मात्रा, वेलांटी, स्वल्पविराम ,पूर्णविराम,असे अनेक चिन्हे आहेत. यांच्या माध्यमातून ती भाषा अधिक अर्थपूर्ण, सुंदर दिसते. मराठी भाषा संपन्न व समृद्ध आहे पण ‌दुर्दैवाने आज मातृभाषेपेक्षा इंग्रजी भाषा महत्त्वाची ठरत आहे.

इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यामुळे आपण मुलांचे किती नुकसान करत आहोत हे आज आपल्या लक्षात येणार नाही. एक तरी भाषा परिपूर्णरित्या आली तर दुसऱ्या भाषा पटकन शिकता येतात. अलीकडे मुलांचे एकाही भाषेवर प्रभुत्व नसते. त्यामुळे त्यांना आपल्या भावना, विचार व्यक्त करताना नेमके शब्द सापडत नाहीत. हा अनुभव आहे. इंग्रजीमध्ये बोलले म्हणजे आपल्याला कोणीतरी मोठे असल्यासारखे वाटते. पण भाषा ही ऐकून येत असते. घरात वेगळी भाषा, शाळेत वेगळी भाषा, समाजात वेगळी भाषा. असे असेल तर त्या मुलांना कोणत्याही एका भाषेत नीटपणे आपले विचार व्यक्त करता येत नाहीत. उलट आपली जी मातृभाषा असते त्यातच आपण जर शिकलो तर आपल्याला भविष्यात कुठेही अडचण येत नाही. इंग्रजी भाषा फक्त अगदी उच्च पदावर असणाऱ्या व परदेशी जाणाऱ्या व्यक्तींनाच उपयोगी पडू शकते. उलट मातृभाषेबरोबर प्रादेशिक भाषा जरी शिकल्या तर त्याचा जास्त उपयोग होईल. आपले म्हणणे जर योग्य रीतीने मांडता आले नाही तर त्या व्यक्तीची घुसमट होते. अशा मुली, मुले आत्मकेंद्री व एकलकोंडी होतात. ते चार लोकांत मिसळू शकत नाहीत .त्याचा परिणाम त्यांच्या  करिअरवरही होतो. मराठी भाषा इंग्रजी पेक्षा निश्चितच संपन्न व समृद्ध आहे. या भाषेचं वेगळेपण अनेक बाबतीत आहे. त्यामुळे मराठीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

आपली मराठी भाषा आपणच टिकवली पाहिजे. त्यात आवर्जून बोलले पाहिजे. त्यातील भाषिक सौंदर्याचा लाभ घेतला पाहिजे. मराठीतील म्हणी, वाक्प्रचार अतिशय सुंदर आहेत. मराठी भाषेची विशेषणे सुद्धा खूप छान आहेत. उदा. लुसलुशीत पोळी,  खुसखुशीत करंजी,  ठणठणीत तब्येत, चटपटीत मिसळ,  गुटगुटीत बाळ, चुणचुणीत मुलगी.. असे कितीतरी विशेषणे सांगता येतील.

मराठी भाषेचा उपयोग रोजच्या व्यवहारात सुंदर रीतीने केला पाहिजे.. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे संपन्न होत आहे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे.. मराठी अभिजात आहेच.. परंतु ती आता जगन्मान्य झाली आहे.. या भाषेतील समृद्ध साहित्य आता इतर भाषेतही अनुवादित होईल.. मराठीचे क्षेत्र विस्तारत जात आहे.. फक्त अलीकडे बोलीभाषेचा वापर कमी होऊन प्रमाण भाषेचा वापर जास्त होत आहे.. त्यामुळे बोली भाषेतील अनेक म्हणी, वाक्प्रचार काळाच्या ओघात नष्ट होत आहे. अशी भाषा बोलणारी माणसंही कमी झाली आहेत.. मोबाईलमुळे किंवा सोशल मीडियामुळे प्रमाण भाषेचा वापर होत आहे.. परंतु तोही शुद्ध स्वरूपात नाही.. कारण इंग्रजी व हिंदी भाषेचा प्रभाव येणाऱ्या पिढीवर अधिक होत आहे..

त्यामुळे मराठीचे मराठीपण टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरच आहे. यासाठी मराठीतील साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल आणि मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल, याचाच विचार करण्याची गरज आहे.. माहिती जनसंपर्क कार्यालय याविषयी जनजागृती करत आहे, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे.. प्रत्येकानेच आपली भाषा जिवंत ठेवण्यासाठी त्याच भाषेत बोलले पाहिजे. लिहिले पाहिजे आणि त्या भाषेतील साहित्य वाचले पाहिजे.. भाषेत सतत परिवर्तन होतच असते. नवीन शब्द येतच असतात. पण सगळेच नवीन न स्वीकारता काही जुने शब्द, त्यातील गोडवा ही आपण जाणीवपूर्वक जपला पाहिजे.. मराठी भाषेचा वापर वाढवला पाहिजे  तसा संकल्प आपण सगळेच करू यात..

-प्रा. डॉ. श्रुती श्री. वडगबाळकर, सोलापूर

वर्ध्याचे वाङ्मय वैभव

वर्ध्यात १९६९ सालात ४५ वे व जिल्ह्यातील पहिले अ. भा. मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होतेएखाद्या गावात साहित्य संमेलन झाल्यावर त्या क्षेत्रात उत्साह असतोपरंत,१९७० ते १९८० हे दशक यादृष्टीने कोरडे असल्याचा प्रत्यय येतो. तर त्यापुढील दशक साधारणतः १९८० नंतरचा कालखंड वर्धा जिल्ह्यातील साहित्य विश्वाला चळवळीला ऊर्ध्वावस्था प्राप्त करून देणारा ठरला आहे.

प्रा. किशोर सानपप्रा. नवनीत देशमुख यासारख्या समीक्षक- लेखकांनी नोकरीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला आणि जिल्ह्याच्या साहित्य क्षितिज उजळून निघू लागलेसुरुवातीला डॉ. किशोर सानप यांच्या पुढाकाराने विदर्भ साहित्य संघाचे कार्य जोर धरून यातूनच पुढे राजेंद्र मुंढेसतीश पावडेमनोज तायडेप्रशांत पनवेलकरअशोक चोपडे आणि संजय इंगळे तिगावकरांसारखी नवी पिढी पुढे आली. डॉ. हेमचंद्र वैद्य यांचे हिंदी-मराठीतील लेखनडॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे विज्ञान शाखेचे विद्यार्थीत्यांनी केलेले विज्ञान कवितेच्या लेखनाचे प्रयोगपुढे कादंबरीकथाकवितापटकथा संवाद लेखक म्हणूनही नावलौकीक मिळाले.

नवनीत देशमुख यांची अंगणवाडी‘, ‘झेड.पी‘ व माणसाळलेला‘ ह्या कादंबऱ्या, ‘ममी‘, ‘काळा गुलाब‘, ‘टेकओव्हर‘ हे कथासंग्रहतर डॉ. किशोर सानप यांच्या ऋतू‘ कवितासंग्रह, ‘पांगुळवाडा‘, ‘हारास व भूवैकुंठ‘ या कादंबऱ्यातेवीस समीक्षाग्रंथ आणि दोन  कथासंग्रह अशी विपुल ग्रंथसंपदा डॉ. किशोर सानपांनी निर्माण करून एक साक्षेपी समीक्षक व संत साहित्याचे मीमासक म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेली खेळघर’ कादंबरी गाजलीप्रा. डॉ. राजेंद्र मुंढे यांनी कविताकथा, समीक्षा लेखन करीत राष्ट्रसंत तुकडोजी हे चरित्रबंडखोर खेड्यांची गोष्ठ (आष्टीच्या १९४२ लढ्याची गाथा)राष्ट्रसंतांचे मौलिक विचारडॉ. किशोर सानप व्यक्ती आणि वाड्मय, ‘वरदा … वर्धा’. आणि दोन प्रौढ साहित्याची पुस्तकेदोन बालनाटिकाअनुवाद लेखन असे चौफेर मुसाफिरी करीत आहेत त्यांची पाच पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.

डॉ.सतीश पावडे नाटककारनाट‌्य दिग्दर्शकनाट‌्य समीक्षकनाट्यशिक्षक -प्रशिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. नाटकसमीक्षाचरित्रअनुवादरूपांतर तसेच संपादित अशी एकूण २६ पुस्तके आजतागायत प्रकाशित झालेली आहेत. ३८ नाटकांचे दिग्दर्शन, २१ एकांकिका-नाटकांचे लेखन२० नाटकांचे अनुवाद /रूपांतरही त्यांनी केले आहे. “मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर” हे त्यांचे पुस्तक सध्या चर्चेत आहेत.

समीक्षक डॉ. मनोज तायडे यांची कवी नारायण सुर्वे यांची काव्यदृष्टीआस्वादक समीक्षा आणि कर्मयोगी गाडगेबाबा ही पुस्तकेसत्यशोधक साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक चोपडे यांचेही योगदान मोठे आहे. त्यांची आधुनिक मराठी कवितेचे जनक जोतीबा फुलेविदर्भातील सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक व्यंकटराव गोडे कृत साप्ताहिक ब्राह्मणेतर मधील अग्रलेख तसेच त्यांची आठ संपादित पुस्तके सत्यशोधकी साहित्याचे संशोधन आणि अन्वेषण करणारी ठरली आहे. कवी प्रशांत पनवेलकर पूर्वा’ या आपल्या पहिल्या कवितासंग्रहातून आणि अलीकडील नवा पेटता काकडा’ च्या रूपाने काव्यप्रांतात स्थिरावलेले एक महत्त्वाचे नाव ठरले आहे.

समीक्षेच्या क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेले डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांचे सृजनाचे झरेविदग्ध प्रतिभावंत: विश्राम बेडेकरहिंडणारा सूर्यसर्किट परमात्मा हे प्रायोगिक कादंबरी लेखन दखलपात्र ठरले आहेत. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. पुरुषोत्तम कालभूतकविता -गझल लेखनात अग्रेसर असणारे संजय इंगळे तिगावकर यांचे अंगारबीज आणि दोलनवेणा’ हा कवितासंग्रह नंतरचे गझल लेखन उत्साहवर्धक आहे.

युवा कादंबरीकार प्रतीक पुरी यांनी वैनतेयमेघापुरुषवाफाळलेले दिवसपाखंडगाथा  यासारख्या तरुणांच्या मनाची स्पंदने टिपणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आजचे आघाडीचे समीक्षक आणि कवी नीतीन रिंढे यांचे महाविद्यालयीन शिक्षण तसेच वाड्मयीन जडण घडण संस्कार याच भूमीत झालेत. सुप्रसिद्ध कवी – अनुवादक प्रफुल्ल शिलेदार (काही वर्ष) आणि कवी तीर्थराज कापगते यांचे शालेय शिक्षण वर्ध्यातच झालेले आहे.

शिक्षक म्हणून नोकरीसाठी वर्ध्यात राहिलेले कथाकार सतीश तराळसर्वधारा चे संपादक व कवी सुखदेव ढाणकेतांडाकार आत्माराम कानिराम राठोडरवींद्र जवादे, जुन्या पिढीतील रामदास कुहिटे हे बोल अंतरीचेकुरुक्षेत्र हे काव्यम.ना. घाटूर्लेनिसर्गकवी अनंत भिमणवार यांचा रानबोलीप्रभाकर पाटीलप्रभाकर उघडे यांचा स्वप्नातल्या कळ्याभालचंद्र डंभेप्रमोद सलामेदिलीप वीरखेडेचा ऐन पस्तिशीच्या कविता संग्रह उल्लेखनीय आहेप्रशांत झिलपेप्रशांत ढोलेश्रीकांत करंजेकरदिलीप गायकवाडसुरेंद्र डाफचंद्रकांत शहाकारनारायण नखातेवीरेंद्र कडू यांचे उकंड्या आणि कुळस्वामी बळीराजा हे दोन ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहे. हिंगणघाट येथील आशिष वरघने एक कथाकार व कादंबरीकार म्हणून उदयास येत असून अभिजीत डाखोरे कथालेखनात अग्रेसर आहेत.

स्त्रीवादी दृष्टीकोनातून आणि जाणीपूर्वक लेखन करणाऱ्या लेखिका म्हणजे उषाताई देशमुख होतस्त्री लेखनाची परंपरा वर्ध्यात रुजविणाचा आणि अग्रणी लेखिका म्हणून उषा देशमुख यांना मान द्यावाच लागतोत्यांचा दरवळ’ कवितासंग्रह. त्यांनी त्यावेळी केलेले गद्य लेखन तत्कालीन प्रतिष्ठित नियतकालिकातून वाखाणल्या गेले. सुमारे पन्नास वर्षे त्यांनी सातत्यपूर्ण लेखन केलेले दिसते. डॉ. सुनिता कावळे यांनी उत्तर’, ‘कमला लेले‘, ’व्रतस्थ’ व अजिंक्य‘ ‘कॉलनी आजी’ या बाल  कादंबऱ्याबाल नाटकेएकांकिका असे विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन करून स्त्रीलेखनाच्या दालनाला समृद्ध केले. त्यांचा वारसा आणि स्त्री संघर्षाच्या गाथा दीपमाला कुबडेअनुराधा ही कादंबरी तर दीपमाळ गझलांचीस्वप्नगंधाआयुष्याच्या या वळणावर इत्यादी अन्य दोन काव्यसंग्रहातून मांडतांना दिसताततर विदर्भातील एकमेव यशस्वी प्रकाशिका आणि लेखिका अरुणा सबाने यांच्या मुन्नीविमुक्ता आणि मी सूर्याला गिळले ही आत्मचरित्रात्मक कादंबरीतून स्वतःच्या पायावर कर्तृत्वाचं बळ प्राप्त करूनस्वतःसह समचारणीला जगण्याचे उर्जास्रोत ठरणाऱ्या नायिका जोरकसपणे उभ्या केल्या आहेत.

काही वर्षे येथे वास्तव्यात असणाऱ्या इंदुमती जोंधळेतारा धर्माधिकारी आणि लक्ष्मी गेडाम यांनीही कथालेखन केले आहे. सद्ध्या मुंबई स्थित असलेल्या प्रतिभा सराफ याचं जन्मस्थान सेवाग्राम आहे. सुमती वानखेडे यांच्या मनोमनीश्रावण भुलाव्याचेकृष्णडोहजाणता अजाणताबंद उन्हाळसावलीहे वर्तुळ असेच असतेसायलेन्ट ऑब्झर्व्हर या त्यांच्या काव्य व ललित लेखनातून आत्मप्रत्ययाचा सहजोद्गार उमटलेला दिसतोसुनिता झाडे यांच्या कॉमन वुमनआत्मनग्न,  या काव्यातून स्त्रियांच्या अंतर्मनातील हळूवार संवेदनाची स्पंदने टिपल्या गेली आहेतडॉ . स्मिता वानखेडे यांचे समीक्षालेखन प्रगल्भ आहेडॉ. मधुलिका जुननकरडॉ. विजया मोरोणेवीणा कावळे देवप्रा. विमल थोरातमीना कारंजेकर ओंझळभर प्रकाशासाठी कवितासंग्रह व क्रांतिकारी ऋषी विनोबा चरित्रमंजुषा चौगावकरऋता देशमुख खापर्डेकथाकार कल्पना नरांजेनूतन माळवी यांची फुले – आंबेडकरी जाणीवेतून करीत असलेले लेखन लक्षवेधी ठरत आहे- सुषमा पाखरेजयश्री कोटगीरवार वनहरिणी’, किरण नागतोडेसुहास चौधरी यांची घरंट व आभाळ पेलतानाइंदुमती कुकडकर यांच्या दोन कादंबऱ्या गराडाअक्षदा प्रकाशित झाल्या आहेत.

आशा निंभोरकार ह्या वऱ्हाडी कथा लेखिका आहेत. मूळ वर्धेकर असणाऱ्या आता नागपूरकर असणाऱ्या मृणालिनी केळकर यांनी बंगाली लेखिका आशापुर्णादेवी यांच्या साहित्याला मराठीत आणण्याचे महनीय कार्य केले तर रंजना पाठक यांनी गंगोपाध्याय यांच्या साहित्याचा केलेल्या अनुवादाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहेया दोन स्त्री लेखिकांची अनुवादाच्या क्षेत्रातील ही उत्तुंग भरारी लक्षणीय आहे.    

दलित साहित्याची उज्वल परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. पतितपावन दास सारखे काळाराम मंदिर प्रवेश चळवळीतील मुख्य त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रगाढ विश्वास होता तसेच आर्वीचे पुरोहितआंबेडकरी विचारवंत डॉ. मधुकर कासारेनुकतेच निवर्तलेले सुर्यकांत भगत यांची बुद्धकबीर यांचे ह्यांच्या साहित्यावर संशोधन आणि अनुवादाचे मोठे कार्य केले. कथाकार द्वय डॉ. अमिताभ यांचे कथासंग्रह: पड । ललकार । अंधारयात्री। प्रकाशकाकडे प्रकाशनाच्या मार्गावर: ये सोनेका टैम नहींअभ्यास करो। योगेंद्र मेश्राम यांचे तीन कथासंग्रह लोकनुकंपा हे त्रैमासिक संपादन तर  डॉ. प्रदीप आगलावे उगवता क्रांतिदूतफुले फुलली श्रमाची व  रजनी ह्या कादंबर्या डॉ इंद्रजीत ओरके यांचे गद्य लेखन, ‘आग्टकार अशोक बुरबुरे हे आंबेडकरी कवी / गीतकार / गझलकार / नाटककार म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. प्रा. डॉ. सुभाष खंडारे यांचे कविता संग्रह व समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहेत. मनोहर नरांजे यांची. सर्पगंधालोकयात्रा (कविता संग्रह ) पुरात्तत्वविय शोधयात्रासरस्वती प्रवाह आणि प्रतीक ही प्रकाशित पुस्तके आहेत.

विनोद राउत हे कविता व समीक्षा लेखन करीत आहेत. वैभव सोनारकर यांचे ब्लू कवितासंग्रह दलित – आंबेडकरी कवितेचा आजचा आवाज आहे. दीपक रंगारी यांची माय’ ही कविता एक वेगळे वैशिष्ट्य राखून आहे. मनोहर नाईक यांचा युद्धशालाभूषण रामटेके यांचे तीन कवितासंग्रह व समीक्षाग्रंथ प्रकाशित आहेत. सहा कादंबऱ्यातीन कथासंग्रहचार समीक्षा ग्रंथ निर्माण करणारे मिलिंद कांबळे हे लिहिते लेखक आहेत. कृष्ण हरले साहुरकरप्रशान्त ढोलेसंजय ओरके यांचेही कविता लेखनात सातत्य दिसून येते. मोरेश्वर सहारेराजेश डंभारेसंदीप धावडे व प्रमोद नारायणे हे कवी पुढे येत आहे.

जिल्ह्यातील आदिवासी साहित्यिकांनी साहित्यभाषासंशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहेयातील अग्रणी असलेले व्यंकटेश आत्राम प्रभाव दिसून येतो. संस्कृत भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळविले होते. गोंडी संस्कृतीचे संदर्भ‘ (१९८९), ‘दोन क्रांतिवीर‘ (१९६८) आंबेडकरी चळवळ आणि आदिवासी समाज : समज-गैरसमज‘ (१९८७) हे तीन संशोधनग्रंथ त्यांच्या प्रकांड बुद्धिमत्तेची साक्ष देणारे आहेत. बुद्धिनिष्ठ आणि भावनिष्ठ हे दोन्ही लेखनप्रकार हाताळण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या या कार्याला काही अंशी मारोती उईकेडॉ. विनोद कुमरे हे पुढे नेत आहेत. राजेश मडावीमारोती चावरेरेखा जुगनाके व सुनील भिवगडे यांचेही कविता लेखन महत्त्वाचे आहेच.

साहित्य आणि पत्रकारिता एकमेकांच्या हातात हात घालून चालत असते वर्ध्यात याचा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्यंतर आलेले दिसते. जीनदासजी चवडे हे जैन धर्मीय वर्ध्यातील पत्रकार व पहिले प्रकाशक होत. त्यांनी १८९७ साली या व्यवसायाचा आरंभ करून जैन भास्कर हिंदी पत्रिका सुरु केलीतर १९०९ मध्ये जैन बंधू वार्तापत्र सुरु केले. याव्यतिरिक्त साप्ताहिक ब्राह्मणेतरचे पत्रकार- व्यंकटराव गोडेमा. गो. वैद्य व दि. मा. घुमरे हे दोघेही तरुण भारताचे मुख्य संपादक राहिले आहेततर वामनराव घोरपडे व भा. शि. बाभले यांनीही सामाजिक बांधिलकीतून प्रबोधनपर पत्रकारीतेचे धडे गिरवित वृत्तपत्रसृष्टीत आपले स्थान आढळ केलेतर वर्तमान काळात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे आघाडीचे अनुभव’ मासिकाचे संपादक सुहास कुलकर्णी हे देखील वर्ध्याचे सुपुत्र होत.      

साहित्य- संशोधन -वैद्यकीय – कला – राजकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व वरदायिनी वर्धेच्या तीरावर विराजित होती जमनालाल बजाजकमलनयन बजाज,राहुल बजाजडॉ. पांडुरंग खानखोजेबँ. मोरेश्वर अभ्यंकरवसंतराव साठेदत्तोपंत बा. ठेंगडी डॉ . शरद दीक्षितहेमंत करकरेबापूरावजी देशमुख ही उत्तंग व्यक्तिमत्त्वे वर्धामाय’ ची लेकरे होतं.

डॉ. राजेंद्र मुंढे

आर्वी नाकाज्ञानेश्वर नगरवर्धा

चलभाष ९४२२१४००४९

आयुष मंत्रालयाच्या प्रसारासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

धन्वंतरी पुरस्कारांचे वितरण

मुंबई, दि. २० : आयुर्वेद व योगाभ्यास यांच्या प्रचार व प्रसारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाची निर्मिती केली. या आयुष मंत्रालयाच्या कार्याचा प्रचार व प्रसार सर्वत्र होण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

एनसीपीए येथील जमशेद भाभा थिएटर येथे आयोजित धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘देश का प्रकृती परीक्षण’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप कार्यक्रमात श्री. जाधव बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य. राजेश कोटेचा, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य. जयंत देवपुजारी, पद्मश्री देवेंद्र त्रिगुणा, वैद्य. राकेश शर्मा, देश का प्रकृति परीक्षण अभियानाचे सचिव डॉ. आशुतोष गुप्ता, सच्चिदानंद प्रसाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून २६ नोव्हेंबर २०२४ रोजी देश का प्रकृति परीक्षण हे अभियान जाहीर करण्यात आले. या अभियानाचा पहिला टप्पा २५ डिसेंबर २०२४ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला. या अभियान कालावधीत आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकृती परिक्षण केले. या एक महिन्याच्या कालावधीत या अभियानाच्या अनुषंगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून एका महिन्यात सर्वाधिक प्रतिज्ञा व डिजिटल प्रमाणपत्र दाखविणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाईन फोटो अल्बम व समान वाक्य बोलणाऱ्या लोकांचा व्हिडीओ अल्बम तयार करण्यात आला. आयुष मंत्रालयाची व्याप्ती वाढवून आयुर्वेदाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी धन्वंतरी दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचप्रमाणे जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करण्याची कार्यवाहीही करण्यात येत आहे. तसेच भविष्यात आयुष मंत्रालयाच्या कामकाजात ‘एआय’ चा वापर करण्यात येईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले.

धन्वंतरी पुरस्कारार्थी तसेच आयुष मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या विविध पुरस्कारार्थींचे अभिनंदन करताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आयुर्वेद, योगाचा जागतिक पातळीवर प्रचार प्रसार करण्यासोबतच देशात ‘देश का प्रकृती परिक्षण’ अभियान राबविण्यात आले. त्याचपद्धतीने राज्याच्या अर्थसंकल्पातदेखील आयुष किंवा आयुर्वेदासाठी तरतूद करण्यावर भर देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

धन्वंतरी पुरस्कारार्थी :

  1. वैद्य माया राम उनियाल 2. वैद्य ताराचंद शर्मा,3. वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना रुपये 5 लाखाचा धनादेश व स्मृती चिन्ह, कलश व सन्मानपत्र देऊन धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याचप्रमाणे देश का प्रकृती परिक्षण अभियानाच्या कालावधीत :

  1. एका महिन्यात आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 2. एका आठवड्यात आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 3. 24 तासांत आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 4. डिजिटल प्रमाणपत्र दाखवणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बम / पिन बॅज घातलेल्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बम. 5. समान वाक्य बोलणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन व्हिडिओ अल्बम.

या पाच बाबींसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे जाहीर करून त्याबाबतचे प्रमाणपत्र या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आले.

यासोबतच देश का प्रकृति परीक्षण अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांचा व देशातील आयुर्वेदिक महाविद्यालयांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशुतोष गुप्ता यांनी केले तर आभार सच्चिदानंद प्रसाद यांनी मानले.

0000

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

पळस्पे ते कशेडी घाट रस्त्याची केली पाहणी
रायगड जिमाका दि.२०- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. महामार्गावरील प्रत्यक्ष सुरु असलेली कामे, त्यामध्ये होत असलेली दिरंगाई,जमीन हस्तांतरणात येत असलेल्या अडचणी तसेच अन्य सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. तरी सर्व संबंधित यंत्रणानी महामार्गचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.
मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण  कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. पनवेल येथील पळस्पे फाटा येथून या पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली. हा महामार्ग एकूण १२ टप्प्यांत विकसित होत आहे.एकूण ४३९.८८ किमीपैकी पळस्पे फाटा (पनवेल) ते हातखांबा (रत्नागिरी) या २८१ किलोमीटरच्या पल्यावरील कामाची पाहणी करणार आहेत..सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाच्या अधिका-यांकडून त्यांनी या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, त्यासाठी आवश्यक बाबी यांची त्यांनी माहिती घेतली. ही कामे लवकरात लवकर  पुर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील अधिका-यांनी परस्पर समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करावेत अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी  यावेळी दिल्या.
या पाहणी दौऱ्यात मंत्री श्री भोसले यांनी पलस्पे फाटा, पेण, वाशीनाका,गडब,आमटेम,नागोठणे, कोलाड,इंदापूर, माणगाव,लोणारे रोड या विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.  यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपारी सहाय्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत,
प्रवास करताना नागरिकांना  वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार धर्यशील पाटील,आमदार रवींद्र पाटील, सा. बा .(एन एच) मुख्य अभियंता श्री शेलार, मुख्यव्यवस्थापक अंशुमानी श्रीवास्तव,प्रकल्प संचालक यशवंत घोटकर, अधीक्षक अभियंता रा. म.,श्रीमती तृप्ती नाग, सा. बा. अधीक्षक अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड,कार्यकारी अभियंता श्री सुखदेवे, श्री नामदे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री भोसले म्हणाले की,महामार्गावर ज्या ठिकाणी पुलांची कामे चालू आहेत त्याठिकाणी सर्व्हिस रोड नीटनीटके व वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवावेत. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी व  पुढे गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होणार नाही. इंदापूर व माणगाव बायपास पुलाच्या निविदा प्रक्रियेची कार्यवाही  फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल. मार्च महिन्यात काम चालू होईल. महामार्गचे काम करतांना ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा उत्कृष्ट राहील याची विभागाने तपासणी करावी.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तरी संबंधित सर्व यंत्रणानी दर्जेदार व विहित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.परस्पर समन्वय साधावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याबैठकीत उड्डाणपूल, सर्विस रोड, गटारे, पावसाळ्यात तुंबणारे पाणी, वाहतूक कोंडी, पथदिवे यांसह विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली कार्यालयाचा कारभार अधिक प्रभावी व गतिमान करणार

मुंबई, दि. 20 :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी कार्यभार स्वीकारला. डॉ. राजेश देशमुख हे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वं, कुशल मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान प्रभावी करण्यावर आपला भर असेल, असे डॉ. राजेश देशमुख यांनी कार्यभार स्विकारताना स्पष्ट केले आहे.

डॉ. राजेश देशमुख यांनी कार्यभार स्विकारताच उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच कोणतेही प्रकरण किंवा नस्ती प्रलंबित राहू नये, अशा सूचना सहकारी अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या आणि लोकहिताच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यात येईल. धाडसी निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करणारं दूरदृष्टीचं नेतृत्वं ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेस साजेसं काम करण्याचा आपला प्रयत्न राहीला पाहिजे, असेही त्यांनी बैठकीत सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे नुकतीच उत्पादन शुल्क आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यासह आता उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाची जबाबदारीही ते सांभाळणार आहेत. त्याआधी कोकण विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  साखर आयुक्त, हाफकीन इन्टिट्यूटचे संचालक म्हणून यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी सचिवपदाची सूत्रे स्विकारल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय प्रशासन अधिक गतिमान, सकारात्मक पद्धतीने काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. राजेश देशमुख यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर कार्यालयाचे  प्रशासकीय सल्लागार सतीश मोघे, उपसचिव विनायक चव्हाण, डॉ. नवनाथ जरे, उपसचिव विकास ढाकणे, खाजगी सचिव डॉ. अमर भडांगे, अविनाश सोलवट, विशेष कार्य अधिकारी नरेश भैरी, विलास धाईजे, अवर सचिव सचिन बाभळगावकर, कक्ष अधिकारी विजय लिटे आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

०००००

दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा 

मुंबई, दि. 20 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. कोणताही तणाव न घेता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा देण्याचे आवाहन करून शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शालेय शिक्षणमंत्री श्री. भुसे म्हणतात, प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता दहावीची परीक्षा. 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातील 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी 5 हजार 130 केंद्रांवर परीक्षेला सामोरे जात आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी शांत मनाने, नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी. परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा नसून आपली ज्ञानपातळी तपासण्याची संधी म्हणून या परीक्षेकडे पाहावे.

शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता उत्तम कामगिरी करा, असे सांगून शालेय शिक्षणमंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्यात सोडवू बाधितांचे पुनर्वसन लवकरच करु-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. २०- वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत सावनेर तालुक्यातील कोटोडी परिसरात जमीन संपादित केल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लागावा यादृष्टीने एक सर्वंकष समिती नेमण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

सावनेर तालुक्यातील कोटोडी येथे पुनर्वसन व इतर मागण्यांना घेऊन उपोषणास बसलेल्या गावकऱ्यांची महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष जाऊन भेट घेत चर्चा केली. आपल्या सर्व मागण्याबाबत नव्याने निर्माण केली जाणारी समिती सर्व बाबी पडताळून आपला अहवाल एक महिन्याच्या आत सादर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वेस्टन कोलफिल्ड कडुन जमीन संपादन करतांना काही सर्वे क्रमांक अर्थात जमीनीचे तुकडे कायद्याच्या चौकटीत पाडण्यात आले का याचीही समिती माहिती घेऊन प्रत्यक्ष चौकशी करेल. ज्याचे प्लाट सुटलेले आहेत  त्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने  समिती वेकोलीच्या मुख्यालयाला सविस्तर अहवाल पाठवून याबाबत कायद्यानुसार कार्यवाही करेल, असे या चर्चेत निश्चित करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार डॉ. आशिष देशमुख, वेकोलीचे सी.एम.डी द्विवेदी, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मस्के, तहसीलदार रवींद्र होळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक धोटे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

                                                                00000

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी कटिबध्द व्हा- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

नागपूर,दि. २० : नागपूर आणि विदर्भात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प, मिहानसह इतर रोजगार व स्वयंरोजगाराची निर्माण झालेली मोठ्या प्रमाणावर संधी लक्षात घेता सर्वच उत्पन्न गटातील लोकांना मोठ्या प्रमाणात घरांची गरज भासणार आहे. उच्च उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट यांच्यासह सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा कटिबध्द असून यादृष्टीने विविध गृहनिर्माण प्रकल्पांचे नियोजन करण्याचे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विदर्भातील म्हाडाअंतर्गत सूरु असलेल्या विविध विकास योजनांचा आढावा त्यांनी आज घेतला. येथील म्हाडा कार्यालयात आयोजित या बैठकीस मुख्य अधिकारी महेशकुमार मेघमाळे, कार्यकारी अभियंता रेणूका अवताडे, उपमुख्य अधिकारी दक्षता गोळे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विदर्भातील हिंगणघाटसह काही शहरात म्हाडा प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेली घरे शिल्लक आहेत. हिंगणघाट येथे उपलब्ध असलेली घरांची संख्या लक्षात घेता याचा लाभ पोलीसांना देता येऊ शकेल. यादृष्टीने  पोलीस विभागाशी समन्वय साधून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. जुन्या झालेल्या जीर्ण इमारती यांचा पुनर्विकास, विकसित भूखंड व परवडणारी घरे, प्रधान आवास योजनांची यशस्वी अंमलबजावणी या तीन पातळ्यांवर एक दर्जेदार काम म्हाडा निर्माण करु शकते. यादृष्टीने अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेसह हाती घेतल्या जाणाऱ्या योजनांच्या यशस्वीतेसाठी अधिक तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अनेक महानगरांमध्ये म्हाडाच्या योजना मोक्याच्या जागेवर आहेत. अशा योजना फार पूर्वी साकारल्या असून अनेक ठिकाणी याची नाजूक स्थिती झालेली आहे. अशा योजनांचा पुनर्विकास करतांना रोजगार निर्मितीच्या दृष्टीने त्या ठिकाणी व्यावसायासंदर्भात आस्थापनांचे नियोजन करुन आर्थिकदृष्टया हे प्रकल्प सक्षम कसे करता येतील यादृष्टीने भर देण्यास त्यांनी सांगितले.

नागपूर येथे एम्प्रेस मिलमधील जागेवर साकारणारे कापड वाणिज्य संकुल, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये म्हाडांच्या विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रधानमंत्री आवास योजना, नवीन चंद्रपूर, औद्योगिक कामगारांकरीता गृह निर्माण योजना, व्यावसायिक दुकानांची निर्मिती,  व सध्या सुरु असलेल्या विविध योजना, नवीन प्रशासकीय इमारत, प्रधानमंत्री आवास योजना याबाबत मुख्य अभियंता महेश मेघवाळे यांनी सादरीकरणासह माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवस उपक्रमांतर्गत ज्येष्ठांना घरे, पारदर्शकतेसाठी ई आफिस सुविधेवर भर  आपण दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...