सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 1678

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवूया!

मुंबई, दि. २५ :- ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील वीर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या परिवारांप्रति कृतज्ज्ञता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ‘आज भारत जगातील एक सशक्त आणि सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे राष्ट्र आहे. विविधतेने नटलेला खंडप्राय भारत जगासाठी कुतुहलाचा विषय आहे. भारतातील आघाडीचे राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राविषयीही जगभरात मोठी उत्सुकता आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत आपल्या महाराष्ट्रानेही मोठे योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीच्या आलेखात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिनही म्हटलं जाते. भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्रच अग्रभागी आहे, याचाही आनंद आहे. यापुढेही सर्वच आघाड्यांवर भारताची प्रगती व्हावी यासाठी एकजूट करावी लागेल. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांचे घटक असणारे कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा यांच्याबरोबर देशातील समृद्ध साधनसामुग्रीचे, निसर्गसंपदेचेही जतन आणि संवर्धन करण्यासाठी सजग-संवेदनशील राहावे लागेल. सार्वजनिक शिस्त, सामाजिक सलोखा, आर्थिक-सामाजिक दायित्त्व याचे भान बाळगावे लागेल. तरच येणाऱ्या पिढ्यांतही बांधिलकी निर्माण होईल. अशा पिढीकडे हे प्रजासत्ताकाचे संचित सुपूर्द करणे हीच आपली जबाबदारी आहे, हेच आपले राष्ट्र कर्तव्य आहे. त्यासाठी आपण सर्व कटीबद्ध राहूया.

भारतीय प्रजासत्ताक चिरायू व्हावे यासाठी समता-बंधुता आणि एकात्मता या भावना वाढीस लावूया. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! या मनोकामनेसह पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

000

महाराष्ट्रातील ४ जवानांना होमगार्ड आणि नागरी संरक्षण राष्ट्रपती पदक जाहीर

नवी दिल्ली, दि. 25 : होमगार्ड (एचजी) आणि नागरी संरक्षण (सीडी)  सेवेमध्ये गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी महाराष्ट्रातील  4 जवानांना “राष्ट्रपती पदक” आज जाहीर झाले आहेत.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला होमगार्ड  आणि नागरी संरक्षणामध्ये  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवानांना राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून “राष्ट्रपती पदक” जाहीर केले जातात. यात राज्यातील 4 जवानांचा समावेश आहे.

होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदक विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे :

  • श्री काशिनाथ रडका कुरकुटे, सहायक उपनियंत्रक (सीडी)
  • श्री.  एकनाथ जगन्नाथ सुतार,  प्लाटून कमांडर (एचजी)
  • श्री. परमेश्वर केरबा जवादे, ऑफिसर कमांडिंग
  • श्रीमती मोनिका अशोक शिंपी, होमगार्ड

000

महाराष्ट्राला ७४ ‘पोलीस पदक’ जाहीर

नवी दिल्ली, दि. 25 :पोलीस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला. यातील चार पोलीस अधिका-यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) 31 ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी  एकूण 901 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 93  पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 140 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 668 पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाले असून यात महाराष्ट्राला एकूण 74 पदके जाहीर झाली आहेत.

देशातील 93 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना  उत्कृष्ट सेवेकरिता  ‘राष्ट्रपती  विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्राच्या चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

चार राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)

  1.  श्री.देवेन त्रिपुरारी भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राज्य सुरक्षा कोऑपरेशन, मुंबई
  2. श्री.अनुप कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई,
  3. श्री. संभाजी नारायण देशमुख, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी (पोलिस उपनिरीक्षक), मुंबई,
  4. श्री.दीपक धनाजी जाधव, पोलिस उपनिरिक्षक, ठाणे

राज्यातील एकूण 31 पोलिसांना पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी)

  1. मनीष कलवानिया,आयपीएस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (1st BAR To PMG)
  2. संदिप पुंजा मंडलिक,सहाय्यक पोलीस निरीक्षक (2nd BAR To PMG)
  3. राहूल बाळासो नामाडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक
  4. सुनिल विश्वास बागल,पोलीस उपनिरीक्षक
  5. देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम,नाईक-पोलीस हवालदार
  6. गणेश शंकर दोहे,पोलीस हवालदार
  7. एकनाथ बारीकराव सिडाम,पोलीस हवालदार
  8. प्रकाश श्रीरंग नरोटे,पोलीस हवालदार
  9. दिनेश पांडुरंग गावडे,पोलीस हवालदार
  10. शंकर दसरू पुंगटी,पोलीस हवालदार
  11. योगीराज रामदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक
  12. अमोल नानासाहेब फडतरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक
  13. सदाशिव नामदेव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक
  14. प्रेमकुमार लहु दांडेकर,पोलीस उपनिरीक्षक
  15. राहूल विठ्ठल आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक
  16. देवाजी कोटूजी कोवासे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
  17. राजेंद्र अंतराम मडावी,मुख्य हवालदार
  18. नांगसू पंजामी उसेंडी,नाईक पोलीस हवालदार(1st BAR To PMG)
  19. देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, नाईक पोलीस हवालदार (1st BAR To PMG)
  20. प्रदिप विनायक भासरकर, नाईक पोलीस हवालदार
  21. सुधाकर मानु कोवाची, पोलीस हवालदार
  22. नंदेश्वर सोमा मडावी, पोलीस हवालदार
  23. सुभाष भजनराव पाडा, पोलीस हवालदार
  24. भाऊजी रघू मडावी, पोलीस हवालदार
  25. शिवाजी मोडु उसेंडी, पोलीस हवालदार
  26. गंगाधर केरबा कऱ्हाड, पोलीस हवालदार
  27. रामा मैनु कोवाची, पोलीस हवालदार
  28. महेश पोचम मदेशी, पोलीस हवालदार
  29. स्वप्नील केसरी पाडा, पोलीस हवालदार
  30. तानाजी दिगंबर सावंत, पोलीस निरीक्षक
  31. नामदेव महिपती यादव, पोलीस हवालदार

राज्यातील 39 पोलीसांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक’ (PM)

  1.  श्री जयकुमार सुसाईराज, विशेष पोलीस महानिरीक्षक,कुलाबा, मुंबई
  2. श्री लखमी कृष्ण गौतम, पोलिस अधिक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय,कुलाबा, मुंबई
  3. श्री निशीथ वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपाडा, मुंबई
  4. श्री संतोष गणपतराव गायके, पोलीस उपअधिक्षक, गोरेगाव ,मुंबई
  5. श्री चंद्रकांत विठ्ठल मकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, दादर (पूर्व),मुंबई
  6. श्री दिपक राजाराम चव्हाण, पोलीस निरीक्षक, मांटुगा (पूर्व) ,मुंबई
  7. श्री. रमेश विठ्ठलराव कठार, पी.डब्ल्यु.आय (इजिनिंअर) औरंगाबाद परीक्षेत्र
  8. श्री. देविदास काशीनाथ घेवारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
  9. श्री. सुधाकर पंडितराव काटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
  10. श्री. शैलेश दिगांबर पासलवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई
  11. श्री. मनोज श्रीकांत नेर्लेकर,पोलीस उपअधिक्षक, वरळी , मुंबई
  12. श्री. शाम खंडेराव शिंदे , पोलीस निरीक्षक, नवी मुंबई
  13. श्रीमती अलका सदाशिव देशमुख, पोलीस निरीक्षक, ठाणे शहर

14.श्री. दत्तात्रय भंगवतराव पाबळे, पोलीस निरीक्षक, डी.एन. रोड, मुंबई

  1. श्री. बापू तुळशीराम ओवे,पोलीस निरीक्षक, गोरेगांव (पूर्व), मुंबई
  2. श्री. प्रसाद दशरथ पांढरे, पोलीस निरीक्षक, ठाणे
  3. श्री. शिरीष क्रिशनाथ पवार,पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस स्टेशन
  4. श्री. सदाशिव एलचंद पाटील,कमांडंट, धुळे
  5. श्री. सुरेश पुंडलिकराव गाठेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाशिम
  6. श्री. दिलीप तुकाराम सावंत,गुप्तचर अधिकारी, एस.आय.डी, मुख्यालय, मुंबई
  7. श्री. संतोष सखाराम कोयंडे, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई
  8. श्री. चंद्रकांत गुणवंतराव लांबट,पोलीस उपनिरीक्षक, रामनगर, चंद्रपूर
  9. श्री. झाकिरहुसेन मौला किल्लेदार,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, घाटकोपर , मुंबई
  10. श्री. भरत अप्पाजी पाटील, पोलीस निरीक्षक, मुंबई
  11. श्री. प्रमोद गंगाधरराव कित्ते,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती
  12. श्री. आनंद भिमराव घेवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रायगड

27.श्री. सुखदेव खंडू मुरकुटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक

  1. श्री. गोकुळ पुंजाजी वाघ, मुख्य हवालदार, औरंगाबाद
  2. श्री. धनंजय छबनराव बारभाई,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर
  3. श्री. सुनील विश्राम गोपाळ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
  4. श्री. दत्तात्रय राजाराम कडनोर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक शहर
  5. श्री. ज्ञानेश्वर पंढरीनाथ आवारी,पोलीस निरीक्षक, मुंबई
  6. श्री. रामकृष्ण नारायण पवार,पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे
  7. श्री. ओमप्रकाश गंगाधर कोकाटे, पोलीस निरीक्षक, नागपूर ग्रामीण
  8. श्री. सुभाष भीमराव गोईलकर,पोलीस उपनिरीक्षक, विरार (पूर्व) पालघर
  9. श्री. संजय सिध्दू कुपेकर,पोलीस उपनिरीक्षक लव्हलेन रोड, मुंबई

37.श्री. प्रदीप केडा अहीरे, पोलीस उपनिरीक्षक ,ठाणे

  1. श्री. प्रकाश हरीबा घाडगे,पोलीस उपनिरीक्षक, कांदीवली पोलीस स्टेशन ,मुंबई
  2. श्री. विजय उत्तम पवार,पोलीस उपनिरीक्षक,फोर्ट, मुंबई

०००

संवर्धन मराठी भाषेचे

मराठी भाषा -विशेष लेख :

मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभागाकडून घेण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णय व उपक्रमांची माहिती देणारा विशेष लेख.

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कला यांना एक दीर्घ परंपरा व स्वतंत्र ओळख आहे. महाराष्ट्राच्या या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन मुंबई येथे अलीकडेच मराठी भाषा विभागाकडून आयोजित करण्यात आले होते. या विश्वसंमेलनाला जगभरातील मराठी प्रेमींकडून उर्त्स्फुत प्रतिसाद लाभला. मराठीच्या संवर्धनासह प्रचार प्रसारासाठी विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

मराठी भाषेचा विकास प्रचार-प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी या दृष्टीने ‘पुस्तकाचे गाव’ विस्तार ही योजना व्यापक स्वरुपात सुरु करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुस्तकांचे गाव ही योजना विस्तारित स्वरुपात सुरु करताना पहिल्या टप्प्यात पुस्तकाचे गाव विभागीय स्तरावर सहा महसूली विभागात सुरु करण्यात येणार आहे. अमरावती व नाशिक या महसूली विभागात पुस्तकाचे गाव सुरु करण्यात येणार आहे.

वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी/अमराठी लोकांमध्ये मराठी बाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून या वर्षी महानगरपालिका स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेचे संवर्धन प्रचार प्रसार यांच्याशी संबंधित उपक्रमांमध्ये वापरण्यात येणारी भित्तिपत्रके, पताका इत्यादींमध्ये विभागाने प्रायोजकत्व स्वीकारलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि प्रसिद्धीमाध्यमांमध्ये द्यावयाच्या विभागाच्या जाहीरातींमध्ये वापरण्यासाठी  बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना/ मंडळांना अर्थसहाय्य/अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसहाय्य’ हा उपक्रम म्हणून या विभागाच्या अधिनस्थ राज्य मराठी विकास संस्था यांचेमार्फत राबविण्यात येणार आहे यात मराठी साहित्याची ओळख व्हावी. मराठी साहित्याविषयी वाचकांचे प्रेम वाढावे म्हणून महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांतील नामवंत साहित्यिक, विचारवंत, कथाकार, कवी यांची व्याख्याने आयोजित करणे तसेच मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करुन देणे, संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेतील संस्कारक्षम पुस्तके अल्प दरात वाचकांना उपलब्ध करुन देणे, ना नफा ना तोटा तत्वावर मराठी भाषेतील पुस्तकाच्या प्रकाशनास मदत करणे, पुस्तके विक्रीस उपलब्ध करून देणे, मराठी बाल, युवा व प्रौढ साहित्य संमेलनांचे आयोजन करणे, सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा विषयक स्पर्धा परीक्षा आयोजित करणे व त्यासाठी अभ्यासिका केंद्राची उभारणी करणे आदींचा समावेश आहे

सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, मराठी पाठ्यपुस्तके इत्यादींमध्ये तसेच ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतो अथवा भविष्यात केला जाणार आहे अशा सर्व ठिकाणी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादींसाठी देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमालेचा, अक्षरमालेचा व अंकांचा शासनाने स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने वर्णमालेच्या संदर्भातील स्पष्टीकरणे तसेच विशिष्ट अक्षरांच्या लेखनाबाबतच्या सूचना स्वरचिन्हे, जोडाक्षरे, वर्णक्रम, लेखनात वापरावयाची विरामचिन्हे व अन्य चिन्हे, अंक, अंकांचे अक्षरी लेखन इत्यादीविषयी सविस्तर व सोदाहरण सूचना करण्या आल्या  आहेत. मराठी भाषेच्या लेखनात एकरूपता राखण्यासाठी सर्वांसाठी या सूचना देण्यात आल्या आहेत.

 राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. 14 ते दि.28 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आश्वासक पाऊले उचलली जात आहेत. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी भाषेचा जागर करण्यात आला. भाषा प्रेम जागृत करणारे विविध उपक्रम यावेळी राज्यभरात आयोजित करण्यात आले होते.  मराठी भाषा ही राज्याचा अभिमान असून तिच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभाग विविध उपक्रमांमधून सातत्याने कार्य करीत आहे व यापुढेही कार्यरत राहील.

अर्चना शंभरकर

०००

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता; मंत्रालयातील प्रदर्शनात सहा लाख रुपयांच्या ग्रंथांची विक्री

मुंबई दि. 25: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनात तब्बल 6 लाख रुपयांच्या ग्रंथाची विक्री करण्यात आली. यासोबत प्रदर्शनादरम्यान मंत्रालयीन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मराठी अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली असून या स्पर्धेत शिल्पा नातू यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव आणि मराठी भाषा अभ्यासक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. अभिवाचन स्पर्धेत दुसरा क्रमांक श्वेता सूर्यवंशी, तृतीय पुरस्कार चित्रा चाचवड, उत्तेजनार्थ पुरस्कार पूजा भोसले, संगिता बेडेकर यांना प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत सुमारे 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या  प्रदर्शनात 6 लाख 14 हजार 505 रुपये  किंमतीच्या पुस्तकांची विक्री झाली आहे.  या प्रदर्शनात आत्मचरित्रात्मक, ऐतिहासिक, सकारात्मकता, स्पर्धा परीक्षा यासारख्या विषयांच्या पुस्तकांना तसेच दुर्मिळ, ग्रंथांना मागणी होती.

मंत्रालयाच्या प्रांगणात दिपाली केळकर यांच्या “हास्यसंजीवनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील विनोदाच्या हास्य तुषारांनी मंत्रालयातील वातावरण हर्षोल्हासित झाले होते.

राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. 14 जानेवारी ते दि.28 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.

मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने मंत्रालयात आयोजित कार्यक्रमांची आज सांगता झाली.

००००

विसअ/अर्चना शंभरकर/मराठी भाषा

‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची २७, २८, आणि ३० जानेवारीला मुलाखत

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नाशिक विभागाच्या राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार  दि. 27, शनिवार दि. 28, सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान, कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याविषयी सविस्तर माहिती आयुक्त चित्रा  कुलकर्णी यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा, लोकसेवा हक्क आयोगाची कार्यपद्धती अशा विविध विषयांची माहिती त्यांनी या मुलाखतीतून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधिन करणाऱ्या अधिनियमात सुधारणा

मुंबई, दि. २५ : उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकास कामे नियमाधीन करणाऱ्या अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. या सुधारित अधिनियमास राज्यपालांची संमती मिळाली आहे. त्यामुळे हा अधिनियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या अधिनियमास उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे (सुधारणा) अधिनियम २०२२ असे म्हणण्यात येणार आहे.  तसेच अधिनियमातील कलम तीनमध्ये पोट कलम तीन मधील खंड ‘ क ‘ तील ‘ पुढील तक्त्यानुसार निर्धारित केलेली ‘ या मजकुरा ऐवजी ‘ विहित करण्यात येईल अशी ‘ हा मजकूर दाखल करण्यात येईल. तसेच फिचा तक्ता वगळण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे मुख्य अधिनियमाच्या कलम चारमध्ये पोट कलम तीन मधील खंड ‘ क’ च्या परंतुकामधील ‘४.०० हून  अधिक तलपृष्ठ निर्देशांक (एफ.एस.आय) ‘ या मजकुराऐवजी ‘ उल्हासनगर शहर महानगरपालिकेला लागू असलेल्या महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन विनियमांमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे तलपृष्ठ निर्देशांक (एफ.एस.आय) पेक्षा अधिक तलपृष्ठ निर्देशांक ‘ हा मजकूर दाखल करण्यात येईल. अशी सुधारणा करण्यात आलेला अधिनियम प्रसिद्ध करण्यात आला आहे.

000

निलेश तायडे/ससं

महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

नवी दिल्ली, दि.25: दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 43  मान्यवरांना ‘जीवन रक्षा पदक’  पुरस्कार आज जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2022’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील रविराज अनिल फडणीस यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर महेश शंकर चोरमले  आणि  सय्यद बाबू शेख यांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाला.

तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले असून, देशातील 43 नागरिकांचा समावेश आहे. यातील सात नागरिकांना ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’, दोन नागरिकांना मरणोपरांत पुरस्कार, आठ नागरिकांना  ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. एकूण 28 नागरिकांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि पुरस्कार राशी असे आहे.

000

विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 25: परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकलेसह इतर उपक्रमांमध्येही सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.

‘परीक्षा पे चर्चा’ पर्व 6 या उपक्रमाअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांतील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आर्यन एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय, गिरगाव, मुंबई या शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

या स्पर्धेमध्ये मुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागातील ६३१ शाळेतील २३ हजार ९६७ विद्यार्थी, शिक्षण निरीक्षक उत्तर विभागातील ४३० शाळेतील ५८९० विद्यार्थी, शिक्षण निरीक्षक दक्षिण विभागातील १३० शाळेतील २७२८ विद्यार्थी, ठाणे जिल्ह्यातील ६५६ शाळेतील १७ हजार ८७६ विद्यार्थी, रायगड जिल्ह्यातील ५७३ शाळेतील ९८८८ विद्यार्थी व पालघर जिल्ह्यातील ३३७ शाळेतील ८६४७ विद्यार्थी असे एकूण २७५७ शाळेतील ६८९९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली. यावेळी शिक्षण निरीक्षक देविदास महाजन उपस्थित होते.

या चित्रकला स्पर्धेकरिता देण्यात आलेल्या विषयांमध्ये G-२० जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोस्तव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणमध्ये भारत नं. 1, प्रधानमंत्री जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योगदिन मोदीजीनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाओ, बेटी पढाओ, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला मोदींचा संवेदनशील निर्णय, हे विषय देण्यात आले होते.

या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना व उत्तेजनार्थ पंचवीस विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

000

वर्षा आंधळे/विसंअ

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा!

मुंबई, दि. २५ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमिताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या या मंगलदिनी थोर स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, क्रांतीकारक, शहीद, समाजसुधारक व देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांप्रति मी आदर व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे. २६ जानेवारी १९५० या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्य कारभार सुरू झाला. रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत. अशा विविधतेतूनही एकता, समानता, बंधुत्व जपणाऱ्या, अनेक संस्कृतींनी, परंपरांनी नटलेला आपला देश आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रदान करणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहूया, असे आवाहनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

000

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...