गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 1643

वृक्षसंपदेच्या वैविध्याने समृद्ध नागनगरी (विशेष वृत्त)

नागपूर, दि. 18 :  नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांभोवती 25 हजारांच्या आसपास झाडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून या झाडांनी नागपूरच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील वैविध्य अतिशय समृद्ध असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठीही हे वैविध्य औत्सुक्यपूर्ण ठरत आहे. नागपूरचे विधिमंडळ जेथे आहे; तो परिसर सिव्हिल लाईन्स म्हणून ओळखला जातो. हा परिसरही वृक्षराजीने संपन्न आहे.

रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यासही मदत होत आहे. उन्हाळ्यात तापमानवाढीचे नवे आलेख निर्माण होत असताना नागपूर शहरवासियांनी, विद्यार्थ्यांनी एक चळवळ म्हणून वृक्षलागवड केली आहे, त्यामुळे नागपूर एक हिरवेगार शहर दिसून येत आहे. सिमेंटच्या रस्त्यावरील ही झाडेही रस्ता करताना कापली जाऊ नयेत किंवा मरू नयेत यासाठी विशेष काळजी घेतली आहे. यामध्ये इमारती आणि कार्यालयांच्या भोवतींच्या झाडे, बागबगीचे झाडांची संख्या वेगळीच आहे.

लेक गार्डन’, ऐतिहासिक वारसा असलेला गांधीसागर तलाव, नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन, नागपूरचे फुफ्फुस मानले जाणारे सेमिनरी हिल, फुटाळा तलाव, चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क, गोरेवाडा तलाव अशा विविध वृक्षराजींनी संपन्न असलेल्या ठिकाणांनी नागपूरचे सौंदर्य वाढविले आहे.

रस्त्याच्या दुतर्फा झाडी, रूंद सिमेंटच्या रस्त्याचे विभाजन करणाऱ्या जागेतही झाडे आणि इमारतींचे परिसरही हिरव्या गर्द झाडांनी व्यापलेले अशी ओळख नागपूरच्या सिव्हील लाईनची आहे. विधिमंडळ अधिवेशनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्यांसाठी हा परिसर निश्चितच नयनरम्य आणि स्वप्नवत आहे. मध्य भारतातील एक महत्त्वाचे शहर असलेल्या नागपूरच्या वैशिष्ट्यात भर घालते येथील वृक्षसंपदा. हे शहर केवळ हिरवाईने नटलेले नसून वृक्षसंपदेचे वैविध्यही त्याने जोपासली आहे. त्यामुळेच नागपूरच्या सौंदर्यात ही वृक्षवल्ली निश्चितच भर घालत आहे. अधिवेशनानिमित्त येणाऱ्यांमार्फत संपूर्ण राज्यभर या हिरवाईचा वसा पोहोचविण्यासाठी यावेळी विधिमंडळ परिसरातही वृक्षलागवडीचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावले आहेत.

‘सुखोई’त बसण्याचे धाडस दाखवून प्रतिभाताईंनी देशापुढे आदर्श निर्माण केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार 

नागपूर,दि.18:राष्ट्रपती म्हणून सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घेत असताना आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या’सुखोईतून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर देशापुढे आदर्श निर्माण केला, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय नागपूर केंद्राच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत, खासदार प्रफुल्ल पटेल, खा. कृपाल तुमाने, माजी मुख्यमंत्री सर्वश्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार सर्वश्री अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, दीपक केसरकर व संयोजक गिरीश गांधी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कन्या राष्ट्रपती होणार असतील तर त्यांच्या आड शिवसेना येणार नाही आणि कुणालाही येऊ देणार नाही अशी खंबीर भूमिका तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. अशी भूमिका जाहीर केल्यावर तेव्हाही शिवसेनेवर दबाव होता. मात्र कितीही मतभिन्नता असली तरी राज्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. या भावनेतून प्रतिभाताईंचे समर्थन केल्याचे त्यांनी सांगितले. 1962 मध्ये प्रतिभाताई पहिल्यांदा विधानसभा सदस्य झाल्या, तेव्हा शरद पवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी मी केवळ दोन वर्षांचा होतो. मला अनुभवसंपन्न व्यक्तींचा सहवास आणि आशीर्वाद लाभला. प्रतिभाताईंचा सत्कार करण्याची मुख्यमंत्री म्हणून आपणास संधी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुख्यमंत्री नसतो तरीही या कार्यक्रमाला आलो असतो, कारण प्रतिभाताईंशी माझ्या आजोबांपासूनचे ऋणानुबंध आहेत. मध्यंतरी भेटी झाल्या नाहीत तरी ते नाते घट्टपणे जपले गेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिभाताई राष्ट्रपती असताना त्यांनी स्वतः उपवासाच्या महाराष्ट्रीयन पदार्थांची रेसिपी सांगून उपवासाचे पदार्थ बनवून घेतले होते आणि राष्ट्रपती भवनात ते आग्रहाने खाऊ घातलेत, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

भैरोसिंह शेखावत यांच्या जनसंपर्कासमोर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदासाठी लढा देऊ शकतील असे सोनिया गांधींना सांगितलं आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताईंना मिळाला अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. प्रतिभाताईंना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या भेटीला गेल्यावर त्यांनी कोणतीही चर्चा करण्याचे कारण नाही, असे सांगून महाराष्ट्राच्या कन्या असलेल्या प्रतिभाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला. बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेल्या दोन व्यक्ती प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशस्वी झाल्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी मुख्यमंत्री असताना प्रतिभाताईंचा मृदू स्वभाव मला कधीच जाणवला नाही त्यांनी अतिशय आक्रमकपणे विरोधी पक्षनेत्यांची भूमिका पार पाडली अशी आठवण श्री. पवार यांनी सांगितली. देशातील सर्व राज्याच्या कृषिमंत्र्यांची बैठक घेऊन शेतीसमोरील अडचणी आणि उपायांची टिपणे तयार करून प्रधानमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पाठवणाऱ्या त्या देशातील पहिल्याच राष्ट्रपती होत्या. रशियाच्या अतिशय वेगवान अशा सुखोई विमानात सैन्याचा पोशाख घालून प्रवास करणाऱ्याही प्रतिभाताई पहिल्याच महिला राष्ट्रपती ठरल्या असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना प्रतिभाताई म्हणाल्या, लेकीबाळीचे कौतुक आणि सत्कार करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे, आणि ही संस्कृती बाळासाहेबांनी दाखविली. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून व्यस्त असतानाही या कार्यक्रमाला वेळ काढून आलेत, हे बाळासाहेबांचे संस्कार असल्याचे त्या म्हणाल्या. भारताचा व्यापार आणि उद्योग वाढविण्यासाठी राष्ट्रपती असताना परदेश दौऱ्यावर पहिल्यांदा व्यापारविषयक शिष्टमंडळ नेण्याचे काम केले. तेव्हा टीका झाली पण देशातील एसआयए., असोचेम, आणि फिक्की सारख्या संस्थांनी हे योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताचा व्यापार आणि उद्योगवृद्धी  झाल्याचेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

भारताची आंतरिक ताकद मोठी असून महात्मा गांधींच्या नैतिक तत्वावर आणि मानवी मूल्यांवर आधारित आहे. तसेच संविधान ही देशाची गीता असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधींच्या अहिंसात्मक लढा, पंडीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद  यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान व त्याग केला. या देशाच्या पायाचे हे आधारस्तंभ आहेत. या ना आधारस्तंभांना विसरून कसे चालेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवाद, सार्वभौमत्व आणि संविधान दिलेल्यांना विसरून चालणार नाही. राष्ट्रभक्ती आणि विद्वत्ता असणाऱ्या आंबेडकरांशिवाय संविधान लिहिण्याचे काम कोणी करू शकणार नाही, असा विश्वास महात्मा गांधींना होता. त्यांचे मतभेद असले तरी मनभेद नव्हते.

संविधानाची शपथ घेताना संविधानाप्रति खरी श्रद्धा राखील व त्याप्रति प्रामाणिक राहील, असे म्हणत असताना आपण निधर्मी राज्य नाकारतो. संविधानातच स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे.

राष्ट्रपती असताना त्या पदाचा मान आणि गौरव वाढविण्याचे काम करता आले, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती तिन्ही सैन्याचा प्रमुख असतो. म्हणून जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी वयाच्या 74 व्या वर्षी सैन्याचा पोशाख चढवून सुखोइत प्रवास करण्याचे धाडस करता आले, याचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिल देशमुख यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार कृपाल तुमाने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी तर आभार गिरीश गांधी यांनी मानले . कार्यक्रमाला मोठ्या संख्येने खासदार, आमदार व नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख

नवीदिल्ली, 17 : केंद्र शासनानेमहाराष्ट्राचेसुपुत्रले.जनरलमनोजमुकुंदनरवणेयांचीभारतीयसैन्यदलाचे नवेलष्करप्रमुखम्हणूननिवडकेलीआहे.विद्यमानलष्करप्रमुखबिपीनरावतयेत्या31डिसेंबररोजीसेवानिवृत्तहोतअसूनले.जनरलनरवणेहेत्यांचापदभारस्वीकारतील.

श्री.नरवणेयांच्यारुपानेमराठीमाणूसदेशाच्यालष्कराच्यासर्वोच्चपदीविराजमानहोणारआहे.यापदावरीलतेदुसरेमराठीअधिकारीअसतील.यापूर्वीजनरलअरूणकुमारवैद्ययामराठीअधिकाऱ्याला1983ते1986याकालावधीतदेशाच्यालष्करप्रमुखपदाचाबहुमानमिळालाआहे.

केंद्रसरकारवसंरक्षणमंत्रालयातीलउच्चपदस्थसमितीनेसेवाज्येष्ठतेनुसारश्री.नरवणेयांचीदेशाचेआगामीलष्करप्रमुखम्हणूननिवडकेलीआहे.मूळपुण्याचेअसलेलेश्री.नरवणेसध्याभारतीयलष्कराचे उपप्रमुखअसूनविद्यमानलष्करप्रमुखजनरलबिपीनरावतयेत्या31डिसेंबरलानिवृत्तहोतअसल्याने    लष्करप्रमुखम्हणूनत्यांनाबढतीदेण्यातयेतआहे.

ले.जनरलमनोजनरवणेयांच्याविषयी

ले.जनरलनरवणेयांनीयाचवर्षीसप्टेंबरमहिन्यातव्हाइसचीफऑफआर्मीस्टाफपदाचीजबाबदारीस्वीकारलीहोती.त्याआधी तेसैन्याच्यापूर्वेकडच्याभागाचीजबाबदारीसांभाळतहोते.भारताच्याचीनशीसंलग्नसुमारे4,000कि.मी.लांबसीमेच्यारक्षणाचीजबाबदारीनरवणेयांनीसमर्थपणेसांभाळलीआहे.

श्री.नरवणेयांचेवडीलमुकुंदनरवणेहेहवाईदलातीलनिवृत्तअधिकारीआहेत.त्यांच्याआईसुधायाप्रसिद्धलेखिकाआणिआकाशवाणीच्यानिवेदकहोत्या.ले.जनरलनरवणेयांचेशालेयशिक्षणपुण्यातील’ज्ञानप्रबोधिनी’तझालेआहे.चित्रकलेचीआवडजोपासतअसतानाचत्यांनालष्करीसेवेचेवेधलागले.महाविद्यालयीनशिक्षणानंतरराष्ट्रीयसंरक्षणप्रबोधिनीतप्रशिक्षणपूर्णकरूनतेजून1980मध्येते’7सीखलाइटइन्फंट्री’मधूनलष्करातदाखलझाले.

जम्मू-काश्मीरमधीलदहशतवादीकारवायांचाबीमोडकरण्यासाठीकार्यरतराष्ट्रीयरायफल्सचेत्यांनीनेतृत्वकेले.आसामरायफलचेउत्तर-पूर्वविभागाचे’इन्स्पेक्टरजनरल’,स्ट्राइककोअरचेदिल्लीक्षेत्रातील’जनरलऑफिसरइनकमांडिंग’,लष्करप्रशिक्षणविभागाचेप्रमुख,महूस्थितलष्करयुद्धशास्त्रमहाविद्यालयातप्रशिक्षकअशाअनेकपदांचीधुरात्यांनीयशस्वीपणेसांभाळलीआहे.श्री.नरवणेयांनीसोपविण्यातआलेलीप्रत्येकजबाबदारीचोखपणेपूर्णपाडतआपलेकौशल्य,वेगळेपणत्यांनीसिद्धकेले.याकामगिरीचीवेळोवेळीदखलघेण्यातआली.

0000

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.269/  दिनांक17.12.2019

आपदग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे 14 हजार 600 कोटींची मागणी – अर्थमंत्री जयंत पाटील

नागपूर दि. 17 :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2 हजार 100 कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या 6 हजार 600 कोटी रुपयांपैकी 2 हजार 100 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

राज्य शासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 7 हजार 400 कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 7 हजार 200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.

अजय जाधव .. 17..12.2019 0000

आपदा पीड़ित किसान और बाढ़ पीड़ितों की मदद के लिए

केंद्र सरकार की ओर 14 हजार 600 करोड़ की मांग

अर्थमंत्री जयंत पाटिल

नागपुर : राज्य में हुई बेमौसम बारिश के कारण नुकसान हुए किसानों की मदद के लिए राज्य सरकार की ओर से  6 हजार 600 करोड़ रुपये मंजूर किए है, इसमें से 2100 करोड़  रूपये वितरित किए गए है. बेमौसम बारिश से हुए नुकसान पर मदद के लिए और  बाढ़ पीड़ितों की मदद के लिए राज्य सरकार ने केंद्र सरकार की ओर 14 हजार 600 करोड़ रुपयों की मांग की है, ऐसी जानकारी वित्त मंत्री जयंत पाटिल ने आज विधानसभा में दी.

            नुकसान से पीड़ित किसानों और बाढ़ पीड़ितों को मदद की मांग विपक्ष द्वारा की गई थी. इसे उत्तर देते हुए वित्तमंत्री बोल रहे थे. उन्होंने कब की,  राज्य सरकार की ओर से मदद का वितरण शुरू है. मंजूर किए गए 6600 करोड़ रुपयों में से  2100 करोड़ रुपये जिलाधिकारियों के मार्फत वितरित किए गए है. बाकी रकम जमा करने की कार्यवाही शुरू है.

            राज्य सरकार ने बाढ़ पीड़ितों की मदद के लिए  7400 करोड़ रूपये तथा बेमौसम बारिश से नुकसान हुए किसानों की मदद के लिए 7200 करोड़ रुपये ऐसी कुल 14 हजार 600 करोड़ रुपयों की मांग केंद्र सरकार से की है. राज्य के आपदा पीड़ित किसानों को राज्य सरकार दुर्लक्षित नहीं करेगी, ऐसा वित्त मंत्री पाटिल ने इस समय कहा. 

००००

Demand for 14, 600crores to the central government

for afflicted farmers and flood-hit people in the state

– Finance Minister JayantPatil

Nagpur 17.Dec.19: “Around Rs. 6,600 crore has been sanctioned by the state government to help farmers affected by the untimely rains in the state, out of which Rs. 2100 crore has been disbursed. The state government has demanded Rs14,600 crore to the central government to help the flood victims and farmers who faced heavy loss due to untimely rain” stated Finance Minister JayantPatil. 

He was speaking in the Legislative Assembly while responding to opposition parties when they demanded financial assistance for farmers.

Mr. Patil further informed that allocation of assistance through the state government was underway. Out of the approved Rs6600 crore, Rs2100 crore had been disbursed through the Collector. The process of depositing the remained balance was in progress.

“The state government has demanded Rs7400 crore for the help of flood-hit people and Rs14,600 crore for the help of the farmers affected by the untimely rains. The state government will give strong support and help to afflicted farmers in the state” promised Finance Minister.

0000

‘महाराष्ट्र अहेड’सह ‘लोकराज्य’च्या हिंदी, गुजराथी, ऊर्दू आवृत्तींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर,दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘महाराष्ट्र अहेड’सह ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2019 च्या हिंदी,गुजराथी आणि ऊर्दू आवृत्तींचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  हस्ते रामगिरी  येथे करण्यात आले. यावेळी विभागाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह,संचालक ( वृत्त व माहिती) सुरेश वांदिले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा शपथविधी कार्यक्रम,मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय आणि  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 विधानसभा सदस्यांचा थोडक्यात परिचय या मासिकात करून देण्यात आला आहे. याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या विशेष लेखांनी अंक सजले आहेत. गुरूनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर विशेष लेखही समाविष्ट करण्यात आला आहे. हे अंक सर्वत्र उपलब्ध आहेत. 0000

महाराष्ट्र अहेडसहित लोकराज्यकी हिंदी, गुजराती, उर्दू

संस्करणों का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के हाथों प्रकाशन

नागपुर, दि. 17: सूचना और जनसंपर्क महानिदेशालय द्वारा प्रकाशित महाराष्ट्र अहेडसहित लोकराज्य मासिक पत्रिका के नवंबर-दिसंबर 2019 के हिंदी, गुजराती और उर्दू संस्करण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के हाथों रामदगिरी में प्रकाशित किए गए। इस अवसर पर विभाग के सचिव और महानिदेशक, बृजेश सिंह, संचालक (समाचार एवं सूचना) सुरेश वंदिले उपस्थित थे।

 मुख्यमंत्री श्री. ठाकरे की शपथविधी कार्यक्रम, मुख्यमंत्री सहित मंत्रिमंडल के सभी सदस्यों का परिचय और हाल के विधानसभा चुनावों में जीतने वाले 288 विधानसभा सदस्यों का संक्षिप्त परिचय इस मासिक पत्रिका में प्रकाशित किया गया है। इसके अतिरिक्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस के विभिन्न पहलुओं पर प्रकाश डालने वाले विशेष लेखों को सजाया गया है। गुरुनानक के 550वें जन्मदिन पर एक विशेष लेख भी शामिल किया गया है। यह अंक हर जगह उपलब्ध हैं।

००००

CM Uddhav Thackeray launches ‘Maharashtra Ahead’

and Hindi, Gujarati and Urdu editions of ‘Lokrajya’

Nagpur, date.17th: ‘Maharashtra Ahead’ and ‘Lokrajya’ magazines are published by the Directorate General of Information and Public Information.  CM Uddhav Thackeray at Ramgiri unveiled ‘Maharashtra Ahead’ and Hindi, Gujarati, and Urdu editions of ‘Lokrajya’- issue November- December 2019. Secretary of the department and Director General Brijesh Singh, Director (News & Information) Suresh Wandile were present at that time.

The magazine includes articles on CM Shri. Thackeray’s oath ceremony, introduction of Chief Minister, all state cabinet members, and the short introduction of 288 MLA won in recent state assembly elections. The magazine also includes various articles that shed light on various aspects of Bharat RatnaDr.BabasahebAmbedkar, on the occasion of his Mahaparinirvan Day. A special article about Guru Nanak on his birth anniversary is included in the issue. These issues are available everywhere.

0000

दुर्मिळ लोकराज्य अंक प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

नागपूर,दि. 17 : नागपूर विधानभवन परिसरात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘लोकराज्य’चे दुर्मिळ विशेषांक पाहून समाधान व्यक्त करतानाच या प्रदर्शनाच्या आयोजनाचे कौतुकही श्री. ठाकरे यांनी केले. ‘लोकराज्य’चे अंक संग्रही ठेवण्यासारखे आहेत, असे प्रशंसोद्गारही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी काढले.खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

विधानभवन परिसरातील ‘लोकराज्य’ मासिकाच्या दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शन स्टॉलला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी यांच्यावरील विशेषांकासह नुकताच प्रकाशित झालेला सर्व नवनिर्वाचित आमदारांचा परिचय असलेल्या ‘लोकराज्य’च्या अंकाला वाचकांची मोठी मागणी आहे. प्रदर्शनातील जुने आणि दुर्मिळ अंक विशेष आकर्षण ठरत आहेत. अधिवेशन संपेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

शून्य मैल दगडाची वेगळी गोष्ट! (विशेष वृत्त)

नागपूर,दि 17 : महाराष्ट्राची उपराजधानी,संत्र्यांचे शहर अशी विविध वैशिष्ट्ये सांगणाऱ्या नागपूर शहराची ओळख ठळक केली जाते ती शून्य मैलाच्या दगडाने.अर्थातच झिरो माईल्स स्टोनमुळे.  1907 मधील हा दगड नागपूरचे भौगोलिक स्थान ठळक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या  शून्य मैलाच्या शेजारीच असलेला जीटीएस दगड हा तत्कालीन विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचा एक साक्षीदार म्हणून आजही उभा आहे. ब्रिटिशकालीन सर्वेक्षणावेळी संपूर्ण देशभरात असे साधारणत: 80 शून्य मैलाचे दगड उभारले गेले असले तरी देशाचा मध्य म्हणून नागपूरच्या शून्य मैलाच्या दगडाचे वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे.

देश चालविण्यासाठी महसूल गोळा करणे आवश्यक असते. त्यामुळे महसूल गोळा करण्यास सुविधा निर्माण व्हावी यासाठी आणि स्थल व उंच-सखलपणा दाखवणारे नकाशे अचूक सर्वेक्षण करून बनवण्याच्या मुख्य उद्देशाने जीटीएस हा प्रकल्प राबविण्यास  19 व्या शतकाच्या प्रारंभीच सुरुवात झाली. कालांतराने इस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटीश राजवटीत ते सर्वेक्षण पूर्ण झाले. सध्या नागपुरात झिरो माईल्स च्या शेजारी असलेल्या जीटीएस या दगडावरही त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची फुटामध्ये 1020.171 अशी कोरण्यात आली आहे. आपल्या साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे आणि त्यातून आपले राज्य बळकट करणे हा जरी ब्रिटिशांचा या सर्वेक्षणामागे उद्देश असला;तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. या सर्वेक्षणाच्या माध्यमातूनच त्यांनी एव्हरेस्ट,कांचनगंगा,के.टू यांसारख्या शिखरांची उंची निश्चित केली होती.

नागपूरमध्ये असलेल्या शून्य मैलाच्या दगडाच्या माध्यमातूनही त्याच्या चारही बाजूला असलेल्या कवठा,हैदराबाद,चंदा,राजपूर,जबलपूर,सीओनी,छिंदवाडा,बैतुल शहरांची अंतरे दर्शविली आहेत.  सध्या  हा दगड आपल्या ऐतिहासिक खुणा घेऊन उभा आहे.  या ठिकाणी असलेले चार घोड्यांचे शिल्प या स्मारकाच्या सौंदर्यात भर घालते.

पालघर जिल्हा परिषदेसाठी ७ जानेवारीला मतदान

मुंबई, दि. 17 : पालघर जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान;तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 18 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 22 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्‌टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 24 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसल्यास 30 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी 1 जानेवारी 2020 रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

पालघर जिल्हा परिषदेंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक होईल. त्यातील 57 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम

·      नामनिर्देशनपत्र सादर करणे-18 ते 23 डिसेंबर 2019

·      नामनिर्देशनपत्रांची छाननी-24 डिसेंबर 2019

·      अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे-30 डिसेंबर 2019

·      अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे-1 जानेवारी 2020

·      मतदानाचा दिनांक-7 जानेवारी 2020

·      मतमोजणीचा दिनांक-8 जानेवारी 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर दि.17: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी कोणतीही स्थगिती कुठल्याही कामांना दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त14गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येईल. तसेच चंद्रपूरसह,गडचिरोली,गोंदिया नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये कृषिपंपांना दिवसा ओलीत करण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

नागपूर अधिवेशनादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थित अधिकाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीला गृहमंत्री एकनाथ शिंदे,सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) डॉ. नितीन राऊत यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार,विजय वडेट्टीवार,सुभाष धोटे,किशोर जोरगेवार,कीर्तीकुमार भांगडीया,प्रतिभा धानोरकर,मुख्य सचिव अजोय मेहता,महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी,विकास खारगे,जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहेल,विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्वच आमदारांनी जिल्ह्यांमध्ये कृषिपंपांना रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे जंगलाशेजारील शेतकऱ्यांना आपल्या जीवाला धोक्यात घालावे लागत असल्याबाबतची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात  विद्युत विभाग व अन्य विभागाची बैठक लावून निर्णय घेण्याचे निर्देशित केले.

चंद्रपूरच्या बाबुपेठ पुलाचा निधी लवकर वितरित केला जाईल. महाकाली मंदिराचा कृती आराखडा पूर्ण होईल.14वादग्रस्त गावांचा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल. तसेच कार्यादेश देण्यात आलेल्या कोणत्याही कामांना स्थगिती दिली गेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी बैठकीच्या सुरुवातीला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांधकाम नगर विकास व अन्य महत्त्वाच्या विभागातील विकासकामांवर स्थगिती आणली असल्याचे प्रशासनाकडून पत्र मिळाल्याचे सांगितले. महाकाली मंदिरासारख्या प्रकल्पाला देखील निधी देण्यास स्थगिती आल्याचे कारणे सांगत असल्याचे स्पष्ट केले. तसेच चांदा ते बांदा योजनेला तीन वर्ष मुदतवाढ द्यावी,हुमन प्रकल्प पूर्णत्वास न्यावा,चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यासाठी राज्यपालांनी मंजूर केलेल्या500कोटी मधील कामांना स्थगिती देऊ नये,सैनिकी शाळा अन्य विकासकामे निधीअभावी रखडू नये अशी विनंती केली.

आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील रेतीचा उपसा थांबल्यामुळे आवास योजनेच्या कामावर झालेल्या विपरित परिस्थितीची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून दिली तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचे विविध काम अधिक गतीने पूर्ण व्हावे,यासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली. ब्रह्मपुरी येथे नवीन एमआयडीसी द्यावी,जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे तातडीने वितरण व्हावे,अशी मागणी केली.

आ. अशोक धोटे यांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रखडलेली कामे पूर्ण व्हावी. वनहक्क कायद्यामुळे जुन्या शेतकऱ्यांना वहिवाटीत येत असलेली समस्या सुटावी,ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीला गती मिळावी. भंडारा प्रकल्प पूर्ण व्हावा. वन्यजीव व मानव यांतील संघर्ष यामध्ये लक्ष घालण्याचे तसेच गडचांदूर रेल्वेच्या प्रलंबित मार्गाकडे लक्ष देण्याची विनंती केली. याशिवाय14वादग्रस्त गावांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी त्यांनी प्रामुख्याने केली.

आ.बंटी भांगडिया यांनी गोसीखुर्द व शिवनाला योजना निधीअभावी रखडला असून घोडाझरी तलावावरील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच नागभीड उपजिल्हा रुग्णालयाला निधी देण्यात यावा,नागभीड,तळोधी येथील नवीन पोलीस स्टेशन तयार करण्यात यावे. भेंडाळा प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली.

आ. किशोर जोरगेवार यांनी बाबूपेठ उड्डाणपुलाची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. या पुलाचे काम लवकर सुरू करण्यात यावे. चंद्रपूर शहरासाठी इरई धरणाशिवाय पाणीपुरवठ्यासाठी धानोरा धरणाची निर्मिती व्हावी. अमृत योजनेला गती मिळावी. महाकाली मंदिर व क्रीडा संकुलाचे थांबलेले बांधकाम निधी देऊन गतिशील करण्यात यावे. जिल्हा सामान्य रुग्णालयात औषध पुरवठा नियमित व्हावा. आरोग्य विभागातील पदभरती व्हावी. औद्योगिक जिल्हा असतानासुद्धा वेगळे कामगार आयुक्त नसल्यामुळे होणारी हेळसांड थांबवावी. याच जिल्ह्यासाठी हे पद द्यावे,अशी मागणी केली.

आ. प्रतिभा धानोरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती,भद्रावती,वरोरा येथील समस्या मांडल्या. वरोरा येथील दिंडोरा बॅरेज पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, (सीटीपीएस ) प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेण्याची मागणी केली. यासोबतच ग्रामीण भागाची आवश्यकता असणाऱ्या तलाठी पदांना मुख्यालयी राहणे अनिवार्य करावे,या मागण्या मांडल्या.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सुरुवातीला जिल्ह्याचा आढावा सादर केला जिल्ह्याला विविध योजनांमध्ये मंजूर झालेल्या60टक्के निधी खर्च झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

000

No development works in Chandrapur district given any ‘stay’- Chief Minister Uddhav Thackeray

*Action Plan of Mahakali Temple will be completed

*Special meeting to be conducted for 14 disputed villages on border

*Electricity supply for agricultural pumps will be reinstated at the daytime in Naxal prone areas

Nagpur, December 17:- No development works in the entire Chandrapur district has been give any stay and all such works that are in progress will be completed within the stipulated time. For resolving the dispute of 14 villages on Telangana- Maharashtra border, a special meeting will be organized. Similarly a meeting will be conducted for providing electricity to the agricultural pumps in Chandrapur, Gadchiroli and Gondia district which are Naxal infested assured Chief Minister Mr Uddhav Thackeray.

He was speaking in a meeting of legislatures of Chandrapur district during the Nagpur session. He gave positive response to the demands of the legislatures of the district and directed the administrative officers to response in a positive way. Home minister Eknath Shinde, Minister for Public Works Department Dr Nitin Raut, MLA Sudhir Mungantiwar, Vijay Wadettiwar, Subhash Dhote, Kishore Jorgewar, Kirtikumar Bhangdiya, Pratibha Dhanorkar chief secretary Ajoy Mehta, additional chief secretary of Revenue Department Manu Kumar Srivastava, Principal secretary of the Chief Minister Bhushan Gagrani, Vikas Kharge, principal secretary of water resources department I S Chahal, Divisional Commissioner Dr Sanjeev Kumar, District Magistrate Dr Kunal Khemnar, chief executive officer Rahul Kardile and all senior officers of the district were present during the meeting conducted by Chief Minister Mr Uddhav Thackeray.

Almost all the legislatures of the district said that agricultural pumps in the district should be supplied electricity in the daytime. It is very difficult for farmers to go in the farms in the night as they face threat for life from the Naxalites. Giving a responsive ear to the matter, the chief minister directed the energy department and other related departments to take positive decision on this issue. The Chief Minister said that the funds for Babu Peth bridge in Chandrapur will be distributed soon. He said that the action plan of Mahakali Temple will be completed and high level meeting will be organized for resolving the issue of 14 disputed villages on border. He clarified that all the development works, the ‘work orders’ of which were released will be carried forward and no stay orders have been given.

At the beginning of the meeting former minister Mr Sudhir Mungantiwar said that he has received a letter from the administration that the construction of Urban Development and other important departments have been stayed and the administrative officers also told him that the projects like Mahakali Temple have also went deferred. He also requested that the duration of Chanda Te Banda scheme should be e extended by three years. the Hoomen project should be completed and requested that the 500 crore development works in Gadchiroli, Chandrapur and Gondia district approved by Governor should not be stayed. He asked that the work of Military School and other development works should not be lamenting because of lack of funds.

 MLA Vijay Wadettiwar said that because of the ban on the sand mining, the Housing Development schemes have come to an stand still and the situation is worsening. He said that the development works of Gosi Khurd project should be speeded up and for this, additional funds should be released. He also demanded to sanction a new MIDC area in Brahmpuri and requested the chief minister to distribute the compensation to the farmers who have suffered a lot of loss in the recent unseasonal rains.

सूरजागड लोह खनिज उत्खनन प्रकल्पाला चालना देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनांवरही तातडीने कार्यवाही होणार

नागपूर दि.17 : गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोह खनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रेल्वे सुविधा, अन्य दळणवळण, वीज पुरवठा यासारख्या विकास कामांना चालना मिळून नक्षलवाद कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे या प्रकल्पास चालना द्यावी,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. या बैठकीस उपस्थित असलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेल्या मुद्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विदर्भातील जिल्हानिहाय बैठका घेऊन श्री. ठाकरे हे आढावा घेत आहेत. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याचा आज आढावा घेण्यात आला. या बैठकीस राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री धर्मरावबाबा आत्राम, देवराव होळी, रामदास आंबटकर, कृष्णा गजभिये तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव यांचीही उपस्थिती होती.

या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील पदभरती, दूरसंचार समस्या, शेतीविषयक समस्या, धान खरेदी याबाबतचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही समस्या असल्यास हक्काने माझ्याकडे या. धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्याआधीच भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्याचे नियोजन करावे,असे निर्देशही त्यांनी दिले आहे.

लगतच्या तेलंगाणाराज्यातील कालेश्वरम येथे होत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजच्या कामामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही क्षेत्र बुडीत झाल्याने स्थानिक आदिवासींचे नुकसान झाले आहे. मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाचीही एका समितीमार्फत तपासणी करुन राज्याच्या हद्दीत झालेल्या परिणामांची पाहणी करावी. ही माहिती एकत्र करुन अहवाल तयार करावा,अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सचना

या आढावा बैठकीतविधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनीसूरजागड लोह उत्खनन प्रकल्प, धान खरेदीमेडीगट्टा बॅरेज या विषयावर शासनाला सेचना केल्या. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कामांबाबत सद्यस्थिती बैठकीत सांगितली. 0000

Impel the Surjagad Iron Mineral Excavation Project

Chief Minister Uddhav Thackeray’s instructions

* Quick action will take place on instructions given by the Speaker of the Legislative Assembly, Nana Patole.

Nagpur, 17.Dec.19: “The Surajagad iron mineral excavation project in Gadchiroli is the catalyst for the development of the district. The project would help in reducing the naxalism by promoting development works like railway facilities, other transport and electricity supply in the district.  Quick action should take place on the instructions raised by the Speaker Nana Patole” said Chief Minister Uddhav Thackeray.

He was speaking in a meeting organized to take review of development works in Gadchiroli district, today.  According to the winter session of the State Legislature, Mr. Thackeray is reviewing district wise development work in Vidarbha region.

During the meeting, Chief Minister Thackeray learned about various problems in the Gadchiroli district. He directed the administration to immediately resolve the issues related to recruitment in the district, problems in telecommunication, agricultural, procurement of Dhan and prepare the strategy to resolve future problem in the process of procurement of Dhan

“Due to the work of the Medigatta Barrage at Kaleshwaram in Telangana state, some areas in Gadchiroli district have been submerged resulted in to loss of local tribes. The Medigatta irrigation project should also be examined by a committee and examine the results within the boundaries of the state and prepare the report by collecting all the information in this concern” instructed honorable Chief Minister.

State Assembly Speaker Nana Patole, Home Minister EknathShinde, MP of Gadchiroli-ChimurLokSabha constituency Ashok Nete, MLA Dharmarao Baba Atram, DevraoHoli, RamdasAmbtkar, Krishna Gajbhiye and local office bearers were present in the meeting.

Assembly Speaker Nana Patole’s suggestion

VidhanSabha Speaker Nana Patole attended this review meeting. During this time he advised the government on the Surajagad iron excavation project, Dhan procurement and Medigatta Barrage. Gadchiroli District Collector Shekhar Singh informed about the various works implementing in the district in the meeting.

००००

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...