गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 872

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव सादर करावा – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई              

मुंबईदि. 21 : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर जि. सांगली येथे उभारण्यासाठी विद्यापीठ कार्यकारी समितीचा अहवाल सकारात्मक आहे. तसेच शासकीय जागाही उपलब्ध आहे. खानापूर येथे विद्यापीठाच्या उपकेंद्र उभारणीमुळे सातारासांगली या भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार असून उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावाअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उपकेंद्र आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीसुहास बाबर आदी उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू दिगंबर शिर्केकुलसचिव व्ही. एन शिंदेप्राचार्य व्ही. एम पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

विद्यापीठाने खानापूर येथील उपकेंद्राचा सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविण्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणालेखानापूर येथे शासकीय गायरान जमिन उपलब्ध आहे. तसेच जलसंपदा विभागाची जमीनही आहे. आवश्यकता असल्यास जलसंपदा विभागाच्या जमिनीचाही उपयोग करता येईल. सांगली येथे तात्पुरते उपकेंद्र सुरू न करता खानापूर येथेच कायमस्वरूपी उपकेंद्र सुरू करावे. प्रस्ताव तातडीने सादर करून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता घेण्यात येईल. तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात येईलअसेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

०००

निलेश तायडे/विसंअ/

सातारा शहरात लोकनेते बाळासाहेब देसाई बेट विकसित करावे – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचना

मुंबईदि. 21 : सातारा शहरातील नगरपालिका हद्दीत पोवई नाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई बेट (आयलँड) विकसित करण्याची कार्यवाही करून शहराच्या सौंदर्यात भर घालावी. याठिकाणी जागेची पाहणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तपणे करावी. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाहीयाची काळजी घ्यावीअशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे याविषयी आढावा बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.  बैठकीस नगर रचना संचालक प्रतिभा भदाणेसातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साताराचे जिल्हाधिकारी प्रदीप डुडीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन  यांनी चर्चेत सहभाग घेतला.

बाळासाहेब देसाई आयलँड विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावाया आयलँडवरील  बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्याचे डिझाईन अंतिम करावे. आचासंहितेपूर्वी काम सुरू करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. सातारा येथील जिल्हा लोकल बोर्ड इमारत हेरीटेज दर्जा असलेली इमारत आहे. या इमारतीचा पुनर्विकास हेरीटेज दर्जानुसार करावयाचा असून त्यासाठी अशा प्रकारचे काम करणारा कंत्राटदार असावा. हेरीटेज कामाला कुठेही धक्का न लागता दुरूस्तीचे काम करावे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम करून काम सुरू करावेअसेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.   

***

कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

मुंबईदि. 21 : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांचे विविध  प्रश्न सोडविण्यासाठी शासन संवेदनशील आहे. यासंदर्भातील न्यायालयीन लढा देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्याने याबाबत समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून सीमावर्ती मराठी भाषिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  संवेदनशील असून त्यांच्या नेतृत्वाखाली शासन सीमावर्ती भागातील 865 गावांतील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेअसे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, सीमावर्ती भागातील मराठी भाषकांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकसहसचिव (विधी) प्रशांत सदाशिवउपसचिव रा. दि. कदम – पाटीलमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेएकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकरसमितीचे दिनेश ओऊळकरप्रकाश मरगाळेॲड एम. जी पाटील आदी उपस्थित होते.

सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणाले,  सीमावर्ती भागातील 865 गावांमधील मराठी भाषिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनामुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या योजनांचा लाभ मिळण्यासाठी तहसिलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला असून शिनोली (ता. चंदगडजि. कोल्हापूर) येथे कार्यालय असणार आहे. कायदेशीर पातळीवर लढा देण्यासाठी समन्वयक मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे जावून नियुकत केलेल्या विधीज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत आग्रही असून सातत्याने त्यांच्या स्तरावरही पाठपुरवा करण्यात येत आहे.

सीमावर्ती भागात नागरिकांचे प्रशासनातील काम जलद गतीने होण्यासाठी मराठी भाषा समजणाऱ्या दुभाषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत कर्नाटक शासनाला पत्र देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र ताकदीने ही लढाई लढणार असून त्यासाठी आणखी दर्जेदार विधिज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. राज्य शासनाने या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी तीन मंत्र्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.  कर्नाटक शासनानेही समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईलअसेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.  

बैठकीत कायदेशीर बाबीसीमावर्ती भागातील मराठी भाषिकांसाठी आरोग्य योजनांचा लाभद्विभाषक अधिकारी नियुक्ती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला समितीच्या शिष्टमंडळातील पदाधिकारीतसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

***

निलेश तायडे/विसंअ/

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी वितरण

मुंबईदि. २१ :  महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारयेत्या गुरूवारीदि. २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवायमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारचित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

वरळी येथील डोमएनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयलउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारशालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकरकौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई शहर उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणीसन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते  मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक  जे. पी. दत्तासन २०२१ साठी ख्यातनाम गायक  सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.

ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. रविंद्र महाजनी (मरणोत्तर)सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना जाहीर झाला आहे. यासोबतच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरेसन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक  रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेमहाराष्ट्र राज्य चित्रपटरंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे यांनी केले आहे. 

000

दीपक चव्हाण/विसंअ/

घरकुल योजनांच्या कामांना गती द्यावी – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबईदि. 21  : प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी राज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येतात. मोदी आवास योजनायशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अहिल्याबाई होळकर धनगर वस्ती योजना या योजनेतून अधिकाधिक नागरिकांना घरकुल मिळाली पाहिजेत. यासाठी या योजनेअंतर्गत करण्यात येणारी घरकुलांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला.

मंत्री श्री. सावे म्हणालेराज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. पात्र लाभार्थ्यांची केंद्र सरकारच्या आवास सॉफ्ट या संगणक प्रणालीमध्ये नोंदणी करावी. या सर्व योजनांमधील प्रलंबित व अपूर्ण असलेली घरबांधणी कामे तातडीने पूर्ण करावीत. इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये या वर्षी पात्र लाभार्थ्यांना तीन लाख घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांना वेळेत घरकुल मिळण्यासाठी व दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यवाही करावी.

या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगलग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ.राजाराम दिघेउपसचिव दिनेश चव्हाण तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

शेतकरी आणि ग्राहकांसाठी पणन महासंघाची कामगिरी अभिमानास्पद – पणन मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 21 : पणन महासंघाने शेती, शेतकरी आणि ग्राहक यांच्या विकासासाठी त्यांच्या हित संरक्षणासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. महासंघ शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवित असून पणन महासंघाने शेतकरी व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरविला असल्याचे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी श्री.सत्तार बोलत होते.यावेळी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारेमहासंघाचे विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि राज्यातील महासंघाच्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पणन मंत्री श्री सत्तार म्हणालेमहासंघ धान, भरडधान्य, कडधान्य व तेलबिया खरेदी आणि खत व पशुखाद्य विक्रीचे काम करत आहे. शेतमालाला चांगला व योग्य भाव मिळावा यासाठी विविध भरडधान्य, तेलबिया कडधान्ये यांची केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीने राज्यात खरेदी केली आहे. नाफेड, शासन व एफ.सी.आय.करिता पणन महासंघामार्फत कडधान्य  व तेलबिया  खरेदी झालेली आहे .आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे.  महासंघ राज्यात सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध खत पुरवठा करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडत आहे.

सहकारी संस्था चालविण्यासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.संस्था सभासदांनी दिलेल्या निवेदनावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल.ज्या संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांना व्यवसायिक स्वरूप देण्याचा विचार केला जाईल. सहकार सक्षम राहिला पाहिजे.महासंघाने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न करावेत, शासन त्यासाठी पूर्णपणे सहकार्य करेल असेही श्री.सत्तार यांनी यावेळी सांगितले. पणन महासंघाच्या 65 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेतील सर्व विषय मंजूर करण्यात आले. पणन मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी संस्था प्रतिनिधींची निवेदने स्वीकारली.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये ४ मार्चपासून कौशल्य विकास केंद्र – महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी             

मुंबईदि. 21 : राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान’ योजनेच्या धर्तीवर राज्यातील 100 महाविद्यालयांमध्ये 4 मार्चपासून कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक- युवतींनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी केले.

एल्फिन्स्टंट तांत्रिक विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आयोजित महाविद्यालयांकरिता कौशल्य विकास कार्यशाळेत आयुक्त चौधरी बोलत होत्या. यावेळी राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अत्तिरिक आयुक्त अनिल सोनवणेराष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाचे  अधिकारी गौरव दिमान यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या कीकौशल्य विकास या संकल्पनेचा लाभ व्हावा यासाठी राज्यातील तीन हजार पाचशेहून जास्त महाविद्यालयाकडून कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याबाबत माहिती मागविण्यात आलेली आहे. कार्यशाळेतून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची नोंदणीकौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सुसंगत अभ्यासक्रम निवडणेमहास्वयंम पोर्टल वर माहिती भरणे यासह सर्व माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते ऑन जॉब ट्रेनिंग पर्यंत कौशल्य विकास विभागाने एक आदर्श कार्यपद्धती तयार केली आहे. जास्तीत जास्त महाविद्यालयाने  कौशल्य विकास केंद्र सुरू करणे या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती चौधरी यांनी केले.

आयुक्त चौधरी म्हणाल्या कीरोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण  होण्यासाठी ग्रामीण भागात 500 कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेअंतर्गत १०१ केंद्रांचा आरंभ करण्यात आला आहे जिल्हास्तरीय रोजगार मिळावे आणि आता विभागस्तरीय होत असलेले रोजगार मिळावे यातून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. कुशल कामगारांचे कौशल्य अधिक विकसित करणे. विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे श्रीमती चौधरी यांनी सांगितले.

राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अत्तिरिक आयुक्त अनिल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेमध्ये 30 महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक यांनी सहभाग घेतला होता.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

जादुई आवाजाचा विनम्र निवेदक ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांना श्रद्धांजली

मुंबईदि. २१ :- ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करूनत्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतातअमीन सयानी यांच्या रसाळ शैलीतल्या निवेदनांमुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यांच्या जादुई आवाजाची भुरळ मागील काही पिढ्यांपासून अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत देखील टिकून आहे. अमीन सयानी हे त्यांच्या आवाजाने करोडो कुटुंबातले सदस्यच झाले होते. त्यांच्या जाण्याने रेडिओच्या चाहत्यांत विनम्र असा आपला माणूस हरपल्याची भावना आहेअसे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

000

कोकणासह कोल्हापुरातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासह काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

काजूबोंड रसावर प्रक्रियेसाठीच्या तंत्रज्ञानाकरिता ब्राझीलसोबत सामंजस्य करार करण्यात यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

काजू प्रक्रिया उद्योगांना ‘एसजीएसटी’चा परतावा ५ मार्चपूर्वी द्या; ‘सीजीएसटी’ची अडीच टक्के रक्कमही तातडीने परत करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. २१ :- कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. त्यासाठी ब्राझील देशाबरोबर सामंजस्य करार करावा. काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा ५ मार्चपूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू व सेवा कराची अडीच टक्के रक्कम देखील राज्य शासनातर्फे तातडीने परत करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वंकष विकासाच्या धोरणातून काजू उद्योगाचा विकास साधण्याच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस पणनमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, काजू उत्पादक विभागातील स्थानिक आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, शेखर निकम, महाराष्ट्र कॅश्यू मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, काजू उत्पादकांना जीएसटीमध्ये सवलत देण्याबरोबरच काजू बोंडूपासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारून काजू पिकाच्या सर्वंकष विकासाच्या धोरणातून काजू उत्पादकांचा विकास साधला जाईल. जीएसटी करप्रणालीमध्ये काजू बियांसाठी पाच टक्के व काजूगराला पाच टक्के असा दुहेरी कर लागला आहे. यापैकी राज्याचा २.५ टक्के कराचा परतावा मिळत असून ‘सीजीएसटी’च्या २.५ टक्के परताव्याची रक्कम देखील राज्य शासनामार्फत दिली जाईल. या अनुषंगाने उद्योग विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या ३२ कोटींच्या प्रस्तावांपैकी २५ कोटींच्या प्रस्तावांना वित्त विभागाने मान्यता दिली असून शिल्लक १५० प्रस्तावांचा परतावा ५ मार्चपर्यंत देण्यात यावा. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोकण आणि कोल्हापूर परिसरात काजूची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून या परिसरात काजू बियांवर प्रक्रिया करणारे उद्योग कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त काजू बोंडूचे सुमारे २२ लाख मे.टन उत्पादन होत असून काजूच्या बोंडूंना विशिष्ट वास येत असल्याने ते प्रक्रिया न होता वाया जाते. ब्राझीलमध्ये यावर संशोधन होऊन अशा बोंडांचा वास घालवला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादने तयार केली जातात. कोकणातील काजू बोंडांवर अशी प्रक्रिया करून उत्पादने तयार करण्यासाठी ब्राझीलसोबत करार करण्यात यावा. यासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादन क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन याबाबतची कार्यवाही करावी. यासाठी काजू मंडळाचे कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू संशोधन केंद्राच्या इमारतीत स्थापन करावे. यासाठी लागणारा निधी वित्त विभागामार्फत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत कोकण विभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यांमध्ये काजू फळपिक विकास योजना लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पणन विभागामार्फत काजू फळ पिकाच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य काजू मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळामार्फत राज्याचा काजू ब्रँड तयार करणे, काजू प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाबाबतच्या कार्यांना चालना देणे, उत्पादनांचे मार्केटिंग करणे आदी कामे करण्यात येत आहेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ काजू उत्पादकांना मिळवून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

०००

अमीन सयानींचा आवाज कित्येक पिढ्यांना आठवणीत राहील – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली संवेदना            

मुंबई, दि. २१ : अनेक पिढ्यांवर आपल्या सुरेल आवाजाची मोहिनी घालणाऱ्या आणि कोट्यवधी रसिकांना खिळवून ठेवणारे ज्येष्ठ आकाशवाणी निवेदक आणि आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचे निधन प्रत्येक रसिकांसाठी दुःखदायक आहे. त्यांचा आवाज कित्येक वर्ष रसिकांच्या कानात गुंजत राहील आणि ही मोहिनी कायम राहील.” अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आपल्या शोकसंदेशात मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणतात की, रेडिओ विश्वातील आवाजाचे जादूगार सुप्रसिद्ध रेडिओ प्रस्तुतकर्ता आणि उद्घोषक अमीन सयानी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. भारतात आकाशवाणीला लोकप्रिय बनविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. ‛बिनाका गीतमाला’ च्या माध्यमातून प्रत्येक घराघरात त्यांचा आवाज पोहोचला होता. अलीकडेच त्यांची मुंबईतील राहत्या घरी भेट घेऊन एका दिग्गज कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य प्राप्त झाले. रेडिओ विश्वातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, लिविंग लिजेंड अवार्ड, पर्सन ऑफ द इयर, अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या जाण्याने आवाजाच्या कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.”

000

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...