शनिवार, जुलै 26, 2025
Home Blog Page 785

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि, या निवडणुका शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

०००

संजयओरके/स.सं.(मा)

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात येत आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात मिळून एकूण ११ सखी मतदान केंद्रे असणार आहेत. ११ सखी मतदान केंद्रापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात ६ तर मुंबई दक्षिण मतदारसंघात ५ सखी मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असून धारावी मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत. भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मतदान केंद्र क्रमांक १०० आणि धारावी ट्रान्सलेट कॅम्प मनपा शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक ८२ ही धारावी मतदारसंघातील दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत.

सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार आहेत. स्त्री – पुरुष समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या मतदान केंद्राला लग्न मंडपासारखे सजविण्यात येते. जागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे  महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राजभवनातील अधिकारी व  कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली.

०००

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.14 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान  प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
नंदुरबार –  ६७.१२ टक्के
जळगाव –  ५३.६५ टक्के
रावेर – ६१.३६ टक्के
जालना – ६८.३० टक्के
औरंगाबाद  – ६०.७३ टक्के
मावळ – ५२.९० टक्के
पुणे – ५१.२५ टक्के
शिरूर –  ५१.४६ टक्के
अहमदनगर –  ६२.७६ टक्के
शिर्डी – ६१.१३ टक्के
बीड – ६९.७४ टक्के
                        0000

वडाळा विधानसभा मतदारसंघात १०० वर्षाच्या पार्वती शेषानंद यांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील १८०- वडाळा विधानसभा मतदारसंघामधील १०० वर्षाच्या श्रीमती पार्वती शेषानंद यांनी  गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी गृह टपाली मतदान प्रक्रियेविषयी प्रत्यक्ष पाहणी करुन सर्वसाधारण निरीक्षक जी. एस. प्रियदर्शी यांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आज ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदार असे १२४ मतदारांच्या घरोघरी जावून मतदान घेण्यात आले. या सर्व मतदारांनी मा. भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या गृह टपाली मतदान प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

२८- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारसंघात एकूण १८२ ज्येष्ठ आणि ८ दिव्यांग मतदार गृह मतदान करणार आहेत. आजपर्यंत १५० मतदारांनी गृह मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे. १५ तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

१५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघात २८ ज्येष्ठ मतदार आणि ३ दिव्यांग मतदार होते. त्यापैकी एक व्यक्ती मृत झाल्याने ३० मतदारांनी मतदान केले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त पथकाने घरोघरी जाऊन आस्थेने त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याचे १५६ – विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गिता गायकवाड यांनी सांगितले. मतदारांनी एका मतासाठी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी आल्याचे समाधान आणि मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

१६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५८ ज्येष्ठ नागरिक तर एक दिव्यांग मतदार आहेत. यापैकी ५० ज्येष्ठ नागरिक आणि एक दिव्यांग असे एकूण ५१ मतदारांनी गृहमतदान करून आनंद व्यक्त केला असल्याचे समन्वय अधिकारी श्री. वानखेडे  यांनी सांगितले.

१७० – घाटकोपर पूर्व येथे २८ पैकी २७ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती तहसीलदार वृषाली पाटील यांनी दिली आहे.

१५७ – भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३७ मतदार गृहमतदान करणार होते त्यापैकी ३५ जणांनी गृहमतदान केले असल्याची माहिती एस.ए.खानवीलकर यांनी दिली.

१७१ – मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९ मतदार गृह मतदान करणार आहेत. यापैकी सात जणांनी मतदान केले असून, उर्वरित मतदारांचे मतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार सतिश कदम यांनी दिली.

विक्रोळीमधील १०० वर्षीय काशिबाई कुपटे आजीबाईंनी केले मतदान

आजपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आता प्रकृती खालावल्याने कुठेही जाऊ शकत नाही. यावेळी आपले मतदान वाया जाईल असेच वाटत होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन गुप्त पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मत वाया गेले नाही, मतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद काशिबाई या आजीबाईंनी यावेळी व्यक्त केला. तरूणांनीही मतदान नक्की करावे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

१०४ वर्षांच्या आजीबाईंनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई दि. १३ :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय देण्यात आला होता. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात आज गृहमतदान पार पडले. आयुष्याची शंभरी पार केलेल्या 104 वर्ष वयाच्या श्रीमती लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनी दहिसर पश्चिम येथे आज गृहमतदानाचा हक्क बजावला. अत्यंत जबाबदारीने या आजीबाईंनी त्यांचे कर्तव्य पार पाडून इतर मतदारांकरिता आदर्श निर्माण केला आहे. गृहमतदान प्रक्रियेमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान पूर्णतः अडचणमुक्त आणि सुरळीत झाले आहे. 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाकरिता एकूण 68 नोंदणीकृत पात्र मतदार आहेत. यापैकी एकूण ६५ नोंदणीकृत पात्र मतदारांनी आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट 26- मुंबई उत्तर मतदारसंघात समाविष्ट विधानसभेच्या 153-दहिसर मतदारसंघात गृहमतदानासाठी 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली होती. त्यातील आज जे मतदार मतदान करू शकले नाहीत, ते 16 मे 2024 रोजी मतदान करू शकणार आहेत.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसमावेशकतेला चालना देण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या महत्वपूर्ण उपक्रमानुसार, १५३ दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये ८५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी  व दिव्यांगांसाठी घरगुती मतदान यशस्वीरित्या पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र मतदाराला गतिशीलतेच्या समस्या किंवा वयाबाबतच्या आव्हानांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांना पार करून त्यांच्या लोकशाही अधिकाराचा वापर करता येईल हे निश्चित करण्याचा हा प्रयत्न आहे.

लोकसंख्येच्या महत्त्वपूर्ण भागासाठी निवडणुकीतील सहभाग अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि न्याय बनणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासन, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी अतुल सावे, दहिसरचे नायब तहसीलदार बालाजी फोले यांनी ही गृहमतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन केले.

मतदार आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या सोयीप्रमाणे आणि वेळेप्रमाणे प्रशासनाने नियोजन करुन ही गृहमतदान प्रक्रिया पार पाडली. क्षेत्रीय अधिकारी दिनेश सावंत, मतदान अधिकारी सुभाष डुबे, सहायक मतदान अधिकारी आनंद कोळेकर यांच्यासह गिरीश खानविलकर आणि केतन गुजर यांनी प्रत्यक्षपणे संबंधित मतदारांच्या घरी जाऊन ही मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचेल मतदार चिठ्ठी

मुंबई दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट 27- मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. 19 मे 2024 पूर्वी सर्व मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांनी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 20 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे. 27- मुंबई उत्तर- पश्चिम मतदारसंघात विधानसभेचे 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, 164- वर्सोवा, 165- अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘स्वीप’ समितीच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबरोबरच प्रत्येक मतदाराला त्याचे मतदार यादीतील भाग, अनुक्रमांक, मतदान केंद्राचे नाव आणि ठिकाण याविषयीची माहिती व्हावी म्हणून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी (Voter Slips) पोहोचविण्यात येत आहेत.

विधानसभेच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात 1 लाख 8 हजार 201, दिंडोशी मतदारसंघात 1 लाख 93 हजार 796, गोरेगाव मतदारसंघात 1 लाख 24 हजार 277, अंधेरी पश्चिम मतदारसंघात 1 लाख 37 हजार 227 त्याबरोबरच अंधेरी पूर्व, वर्सोवा मतदारसंघात जवळपास प्रत्येक मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच मतदानापूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचलेली असेल. तसेच मतदानाच्या दिवशी बीएलओ मतदारांच्या सहकार्यासाठी मतदान केंद्रांजवळ थांबतील. ते तेथे मतदारांना मार्गदर्शन करतील, असेही श्रीमती सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

 

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा

मुंबई, दि. १३ : मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य व ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांच्यासाठी १४ मे ते १६ मे, २०२४ या तीन दिवसांच्या कालावधीत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपलब्ध करून दिली आहे.

तसेच, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी १७ मे ते १९ मे, २०२४ या कालावधीत अतिरिक्त सुविधा केंद्रावर टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ

३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या अधिनस्त येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील ज्यामध्ये पोलीस व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशा मतदारांना १४, १५ व १६ मे, २०२४ रोजी मतदानासाठी चेंबूर एज्युकेशन सोसायटी, प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, संगणक कक्षाशेजारी, रूम नंबर १ व‌ २, आर. सी. मार्ग, मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृह, चेंबूर नाका, मुंबई येथे दोन टपाली मतदान केंद्रांवर मतदानाची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी स्तरीय मतदान सुविधा केंद्र याच ठिकाणी १७, १८ व १९ मे, २०२४ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांच्यासाठी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात टपाली मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. हे मतदान केंद्र १४ मे, ते १६ मे, २०२४ या तीन दिवसांच्या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांना १७ मे, ते १९ मे, २०२४ या कालावधीत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या अतिरिक्त सुविधा केंद्रात टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. या संपूर्ण टपाली मतदान प्रक्रियेचे छायाचित्रण केले जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित कर्मचारी यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते.

निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी हे टपाली मतदान केंद्रास भेट देऊ शकतात. तसेच त्यांनी आपले मतदान प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित ठेवण्याचे आवाहन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

कोल्हापुरी चप्पल : देशी हस्तकलेचा अनमोल वारसा

0
भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक हस्तकलांपैकी एक असलेल्या अशा कोल्हापुरी चपला आज पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वलयात येत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचं आकर्षण महाराष्ट्रात आणि देशात...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

0
मुंबई, दि.२५ : भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन...

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी

0
गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार, सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीडी स्क्रिनिंगसाठी एआय, अनेक प्रकल्पांना गती नवी दिल्ली, दि. 25 : राज्यातील विविध विकास...

प्राचार्यांचे निवृत्ती वय ६५ करण्यासाठी सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा...

0
अमरावती, दि. २५ :  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीत प्राध्यापक आणि प्राचार्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी धोरणाचे सर्व पैलू...

विदर्भ ज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठ दर्जासाठी सहकार्य करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...

0
अमरावती, दि. 25 (जिमाका) : शहराच्या हृदयस्थानी 167 एकरावर आणि साडेतीनशे विविध वनस्पती असलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी सहकार्य...