शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 765

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

मुंबई, दि. १४ : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ या संकल्पानुसार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मतदानासाठी विशेष वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर बेस्टमार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग समन्वयक अधिकारी प्रसाद खैरनार यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांसोबतच दिव्यांग मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात दिव्यांग पुरूष मतदार 9364 तर महिला दिव्यांग मतदार 6750, दिव्यांग तृतीयपंथी मतदार 2 असे एकूण 16 हजार 116 चिन्हांकीत दिव्यांग मतदार आहे. मतदान केंद्रावर जावून मतदान करता यावे यासाठी 1106 व्हिलचेअर मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना 613 ठिकाणाहून वाहतूक व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण 1106 स्वयंसेवकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

दिव्यांग मतदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वयंम ॲपबद्दल जिल्ह्यातील एकूण 13 हजार 888 दिव्यांग मतदारांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येवू नये तसेच मतदानाची प्रक्रिया समजावून सांगणे आणि जनजागृती करणे यासाठी 25 सामाजिक तसेच अपंग संस्थांच्या समन्वयाने 85 मेळावे देखील घेण्यात आले आहेत. तसेच 1321 मतदारांना ब्रेल वोटर स्लीपचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी 25 रिंगरूट व शटल रूटवर दिव्यांग सुलभ बसेस चालविण्यात येणार असून 613 ठिकाणी रिक्षा इको व्हॅनची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही श्री. खैरनार यांनी कळविले आहे.

०००

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील खर्च सादर न करणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीची खर्च निरीक्षकांसमोर 13 मे २०२४ रोजी द्वितीय तपासणी करण्यात आली. 21 उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी आपले खर्च सादर केले. दोन उमेदवारांनी तपासणीसाठी खर्च सादर केले नाहीत.

तपासणीसाठी खर्च सादर केलेले नाहीत, असे मनोज श्रावण नायक, कपिल कांतिलाल सोनी यांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच उमेदवार रवींद्र वायकर यांना खर्चातील तफावतीबाबत नोटीस देण्यात आली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ८२० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत 820 मतदारांनी गृह मतदान केले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ 751 तर दिव्यांग 69 मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली आहे. 15 तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदान घेण्यात आले. 819 पैकी 751 ज्येष्ठ नागरिक आणि 76 पैकी 69 दिव्यांग अशा 820 मतदारांनी मतदान केले आहे. 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये  धुळे मतदारसंघासाठी 19 मतदारांनी टपाल पद्धतीने मतदान केले. दिंडोरीसाठी 5 मतदारांनी, नाशिकसाठी 27, पालघरसाठी 240, भिवंडीसाठी 150, कल्याणसाठी 64, ठाणेसाठी 230, मुंबई उत्तरसाठी 553, मुंबई उत्तर पश्चिमसाठी 196, मुंबई उत्तर पूर्वसाठी 161, मुंबई उत्तर मध्यसाठी 340, मुंबई दक्षिणसाठी 156 तर मुंबई दक्षिण मध्यसाठी 175 असे एकूण 2316  मतदारांनी टपाली मतदान केले आहे.

०००

मुंबई उपनगरात २२९० मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

मुंबई, दि. १४ : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग अशा 2,735 मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी दोन हजार 290 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व आणि 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अशा मतदारांची संख्या दोन हजार 735 एवढी आहे. या मतदारांच्या घरी मतदान पथके पाठवून टपाली मतपत्रिकेद्वारे त्यांच्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदान पथकांमध्ये एक मतदान अधिकारी, सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक पोलिस, एक व्हीडिओग्राफर यांचा समावेश आहे.

नोंदणी केलेल्या 85 वर्षांपेक्षा जास्त वय आणि दिव्यांग मतदारांना मतदानाच्या वेळापत्रकाची माहिती संबंधित उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवार अशा मतदान पथकांसमवेत त्यांचे प्रतिनिधी मतदानाच्या वेळी त्यांचा प्रतिनिधी उपस्थित ठेवू शकतात. गृहमतदानाच्या वेळी मतदाराच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन या सर्व प्रक्रियेचे व्हीडिओ चित्रीकरण देखील करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन हजार 290 मतदारांचे गृहमतदान पूर्ण झाले आहे. गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

०००

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि, या निवडणुका शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

०००

संजयओरके/स.सं.(मा)

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात येत आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात मिळून एकूण ११ सखी मतदान केंद्रे असणार आहेत. ११ सखी मतदान केंद्रापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात ६ तर मुंबई दक्षिण मतदारसंघात ५ सखी मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असून धारावी मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत. भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मतदान केंद्र क्रमांक १०० आणि धारावी ट्रान्सलेट कॅम्प मनपा शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक ८२ ही धारावी मतदारसंघातील दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत.

सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार आहेत. स्त्री – पुरुष समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या मतदान केंद्राला लग्न मंडपासारखे सजविण्यात येते. जागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे  महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राजभवनातील अधिकारी व  कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली.

०००

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.14 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान  प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
नंदुरबार –  ६७.१२ टक्के
जळगाव –  ५३.६५ टक्के
रावेर – ६१.३६ टक्के
जालना – ६८.३० टक्के
औरंगाबाद  – ६०.७३ टक्के
मावळ – ५२.९० टक्के
पुणे – ५१.२५ टक्के
शिरूर –  ५१.४६ टक्के
अहमदनगर –  ६२.७६ टक्के
शिर्डी – ६१.१३ टक्के
बीड – ६९.७४ टक्के
                        0000

वडाळा विधानसभा मतदारसंघात १०० वर्षाच्या पार्वती शेषानंद यांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील १८०- वडाळा विधानसभा मतदारसंघामधील १०० वर्षाच्या श्रीमती पार्वती शेषानंद यांनी  गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी गृह टपाली मतदान प्रक्रियेविषयी प्रत्यक्ष पाहणी करुन सर्वसाधारण निरीक्षक जी. एस. प्रियदर्शी यांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आज ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदार असे १२४ मतदारांच्या घरोघरी जावून मतदान घेण्यात आले. या सर्व मतदारांनी मा. भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या गृह टपाली मतदान प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...