शनिवार, जुलै 26, 2025
Home Blog Page 516

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

              राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर –  ४७.८५ टक्के,

अकोला – ४४.४५ टक्के,

अमरावती -४५.१३  टक्के,

औरंगाबाद- ४७.०५टक्के,

बीड – ४६.१५ टक्के,

भंडारा- ५१.३२ टक्के,

बुलढाणा-४७.४८  टक्के,

चंद्रपूर- ४९.८७ टक्के,

धुळे – ४७.६२ टक्के,

गडचिरोली-६२.९९ टक्के,

गोंदिया -५३.८८  टक्के,

हिंगोली – ४९.६४टक्के,

जळगाव – ४०.६२ टक्के,

जालना- ५०.१४ टक्के,

कोल्हापूर-  ५४.०६ टक्के,

लातूर _ ४८.३४ टक्के,

मुंबई शहर- ३९.३४ टक्के,

मुंबई उपनगर-४०.८९  टक्के,

नागपूर – ४४.४५ टक्के,

नांदेड –  ४२.८७ टक्के,

नंदुरबार- ५१.१६  टक्के,

नाशिक -४६.८६  टक्के,

उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,

पालघर- ४६.८२ टक्के,

परभणी- ४८.८४ टक्के,

पुणे –  ४१.७० टक्के,

रायगड –  ४८.१३ टक्के,

रत्नागिरी- ५०.०४टक्के,

सांगली – ४८.३९ टक्के,

सातारा – ४९.८२टक्के,

सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,

सोलापूर -४३.४९ टक्के,

ठाणे – ३८.९४ टक्के,

वर्धा –  ४९.६८ टक्के,

वाशिम -४३.६७  टक्के,

यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

 

००

 

 

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत अंदाजे २७.७३ टक्के मतदान

मुंबई, दि. २० नोव्हेंबर, २०२४ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०१.०० वाजेपर्यंत अंदाजे २७.७३ टक्के मतदान झाले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील दुपारी ०१.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)
१७८-धारावी – २४.६५ टक्के
१७९-सायन-कोळीवाडा – १९.४९ टक्के
१८०- वडाळा – ३१.३२ टक्के
१८१- माहिम – ३३.०१ टक्के
१८२-वरळी – २६.९६ टक्के
१८३-शिवडी – ३०.०५ टक्के
१८४-भायखळा – २९.४९ टक्के
१८५- मलबार हिल – ३३.२४ टक्के
१८६- मुंबादेवी – २७.०१ टक्के
१८७- कुलाबा – २४.१६ टक्के

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

 राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 अहमदनगर –  ३२.९० टक्के,

अकोला – २९.८७ टक्के,

अमरावती – ३१.३२ टक्के,

औरंगाबाद- ३३.८९ टक्के,

बीड – ३२.५८ टक्के,

भंडारा- ३५.०६ टक्के,

बुलढाणा- ३२.९१ टक्के,

चंद्रपूर- ३५.५४ टक्के,

धुळे – ३४.०५ टक्के,

गडचिरोली-५०.८९ टक्के,

गोंदिया – ४०.४६ टक्के,

हिंगोली -३५.९७ टक्के,

जळगाव – २७.८८ टक्के,

जालना- ३६.४२ टक्के,

कोल्हापूर- ३८.५६ टक्के,

लातूर _ ३३.२७ टक्के,

मुंबई शहर- २७.७३ टक्के,

मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,

नागपूर – ३१.६५ टक्के,

नांदेड – २८.१५ टक्के,

नंदुरबार- ३७.४० टक्के,

नाशिक – ३२.३० टक्के,

उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,

पालघर-३३.४० टक्के,

परभणी-३३.१२टक्के,

पुणे – २९.०३ टक्के,

रायगड – ३४.८४  टक्के,

रत्नागिरी-३८.५२ टक्के,

सांगली – ३३.५० टक्के,

सातारा -३४.७८ टक्के,

सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,

सोलापूर – २९.४४,

ठाणे -२८.३५ टक्के,

वर्धा – ३४.५५ टक्के,

वाशिम – २९.३१ टक्के,

यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

0000

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे…

अहमदनगर –  १८.२४ टक्के,

अकोला – १६.३५ टक्के,

अमरावती – १७.४५ टक्के,

औरंगाबाद – १८.९८ टक्के,

बीड – १७.४१ टक्के,

भंडारा – १९.४४ टक्के,

बुलढाणा – १९.२३ टक्के,

चंद्रपूर – २१.५० टक्के,

धुळे – २०.११ टक्के,

गडचिरोली – ३० टक्के,

गोंदिया – २३.३२ टक्के,

हिंगोली – १९.२० टक्के,

जळगाव – १५.६२ टक्के,

जालना – २१.२९ टक्के,

कोल्हापूर – २०.५९ टक्के,

लातूर – १८.५५ टक्के,

मुंबई शहर – १५.७८ टक्के,

मुंबई उपनगर – १७.९९ टक्के,

नागपूर – १८.९० टक्के,

नांदेड – १३.६७ टक्के,

नंदुरबार- २१.६० टक्के,

नाशिक – १८.७१ टक्के,

उस्मानाबाद – १७.०७ टक्के,

पालघर – १९ .४० टक्के,

परभणी – १८.४९ टक्के,

पुणे – १५.६४ टक्के,

रायगड – २०.४० टक्के,

रत्नागिरी – २२.९३ टक्के,

सांगली – १८.५५ टक्के,

सातारा – १८.७२ टक्के,

सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,

सोलापूर – १५.६४,

ठाणे – १६.६३ टक्के,

वर्धा – १८.८६ टक्के,

वाशिम – १६.२२ टक्के,

यवतमाळ – १६.३८ टक्के मतदान झाले आहे.

0000

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ मतदान झाले आहे.

अहमदनगर – ५.९१ टक्के,

अकोला – ६.० टक्के,

अमरावती -६.६ टक्के,

औरंगाबाद-७.५ टक्के,

बीड -६.८८ टक्के,

भंडारा- ६.२१ टक्के,

बुलढाणा- ६.१६ टक्के,

चंद्रपूर-८.५ टक्के,

धुळे -६.७९ टक्के,

गडचिरोली-१२.३३ टक्के,

गोंदिया -७.९४ टक्के,

हिंगोली -६.४५ टक्के,

जळगाव – ५.८५ टक्के,

जालना- ७.५१ टक्के,

कोल्हापूर-७.३८ टक्के,

लातूर ५.९१ टक्के,

मुंबई शहर-६.२५ टक्के,

मुंबई उपनगर-७.८८ टक्के,

नागपूर -६.८६ टक्के,

नांदेड -५.४२ टक्के,

नंदुरबार-७.७६ टक्के,

नाशिक – ६.८९ टक्के,

उस्मानाबाद- ४.८५ टक्के,

पालघर-७.३० टक्के,

परभणी-६.५९ टक्के,

पुणे – ५.५३ टक्के,

रायगड – ७.५५ टक्के,

रत्नागिरी-९.३० टक्के,

सांगली – ६.१४ टक्के,

सातारा – ५.१४ टक्के,

सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,

सोलापूर – ५.७,

ठाणे ६.६६ टक्के,

वर्धा – ५.९३ टक्के,

वाशिम – ५.३३ टक्के,

यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

0000

बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी राज्यभरात कायदा व सुरक्षा यंत्रणा सतर्क व सजग

आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफ.आय.आर.

मुंबई, दि. १९ : ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाचा समावेश आहे. या सर्व यंत्रणेला सतर्क आणि सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता कालावधी दरम्यान आचारसंहिता व निवडणूक विषयक विविध तक्रारींच्या अनुषंगाने ५३२ एफ. आय. आर. दाखल झाले आहेत. यापैकी २१० प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून ६३ प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित २५९ प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत.

एफ आय आर बद्दलची जिल्हा निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

१) मुंबई शहर व मुंबई उपनगर :  ३६

२) ठाणे : ३८

३) पालघर : ०५

४) नाशिक : ४९

५) धुळे : ०१

६) बीड : १८

७) अहिल्यानगर : ३२

८) पुणे : ४८

९) छत्रपती संभाजीनगर : २५

१०) जालना : १०

११) जळगाव : १०

१२) नंदुरबार : ०३

१३) कोल्हापूर : २६

१४) रत्नागिरी : १०

१५) सिंधुदुर्ग : ००

१६) सातारा : १५

१७) सांगली : ०८

१८) सोलापूर : २८

१९) लातूर : १२

२०) धाराशिव : ०६

२१) रायगड : १९

२२) परभणी : ०७

२३) नांदेड : १५

२४) हिंगोली : १२

२५) यवतमाळ : ०७

२६) वाशिम: ०३

२७) वर्धा : ०६

२८) अमरावती : १७

२९) अकोला : ०२

३०) बुलढाणा : ०८

३१) चंद्रपूर : ०३

३२) गडचिरोली : ०६

३३) भंडारा : १५

३४) गोंदिया : ०३

३५) नागपूर : २९

लोकशाहीच्या उत्सवासाठी कर्मचारी मतदान साहित्य घेऊन रवाना

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली निवडणूक सज्जतेची पाहणी

सांगली, दि. 19 (माध्यम कक्ष) : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून या उत्सवात जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदार संघातील 2 हजार 482 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे – 281-मिरज (अ.जा.) – 307,             282-सांगली – 315, 283-इस्लामपूर – 290, 284-शिराळा – 334, 285-पलूस-कडेगाव – 285, 286-खानापूर – 356, 287-तासगाव-कवठेमहांकाळ – 308, 288-जत – 287.

मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी एस. टी. बसेस व अन्य वाहनांची सोय करण्यात आली असून या वाहनातून मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर रवाना झाले.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील मतदान साहित्य वाटप केंद्रास संयुक्त भेट देऊन मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व मतदान केंद्र सुसज्जतेची पाहणी केली. तसेच साहित्य वितरण व मतमोजणी कक्षास भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे व श्रीनिवास अर्जुन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शामला खोत, सचिन पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

लोकशाहीच्या उत्सवात मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या अधिकारी कर्मचारी यांनी मतदान प्रक्रिया निर्भय, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी योगदान द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मतदारसंख्या 25 लाखांच्यावर

या निवडणुकीत जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील एकूण 25 लाख 36 हजार 65 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 12 लाख 82 हजार 276 पुरूष मतदार, 12 लाख 53 हजार 639 स्त्री मतदार तर इतर 150 मतदारांचा समावेश आहे.

विधानसभा मतदारसंघनिहायनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे –

281-मिरज (अ.जा.) – पुरूष-171‍646, स्त्री-172198, इतर-32, एकूण 343876 मतदार.

282-सांगली – पुरूष-177693, स्त्री-178642, इतर-75, एकूण 356410 मतदार.

283-इस्लामपूर – पुरूष-141698, स्त्री-139152, इतर-6, एकूण 280856 मतदार.

284-शिराळा – पुरूष-156140, स्त्री-150869, इतर-3, एकूण 307012 मतदार.

285-पलुस-कडेगाव – पुरूष-146072, स्त्री-146786, इतर-8, एकूण 292866 मतदार.

286-खानापूर – पुरूष-177542, स्त्री-173435, इतर-19, एकूण 350996 मतदार.

287-तासगाव-कवठेमहांकाळ – पुरूष-159076, स्त्री-153606, इतर-4, एकूण 312686 मतदार.

मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना  

  • २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान
  • ५० टक्के मतदान केंद्रावर असणार वेब कॅमेराची नजर
  • १५२३ मतदान केंद्रावर होणार मतदान
  • मोबाईल मतदान केंद्रास घेऊन जाण्यास प्रतिबंध

धाराशिव, दि.१९ (माध्यम कक्ष)  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर  रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्हयातील उमरगा, तुळजापुर,उस्मानाबाद आणि परंडा या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज १९ नोव्हेंबर रोजी रवाना झाले.

 २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक सामान्य, खर्च व पोलीस यांनी १७ नोव्हेंबर रोजी आयोजित आढावा सभेत घेतला.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील १५२३ मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना झाली.१५२३ मतदान केंद्रापैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंगद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. निवडणूकविषयक गैरप्रकारांच्या तक्रारीबाबत नागरिकांना सी-व्हिजिल अँपद्वारे तक्रार दाखल करता येईल.

निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघात १२७ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड असे एकूण ३१५७ कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ३  तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहे.

उमेदवार,उमेदवारांचे प्रतिनिधी,मतदान प्रतिनिधी व मतदार यांना मोबाईल (भ्रमणध्वनी) घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करु नये अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिली.

मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना; प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज  

  • 21 लाख 34 हजार 500 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
  • जिल्ह्यात 2 हजार 288 मतदान केंद्र
  • निवडणूकीसाठी 9 हजार 152 अधिकारी व कर्मचारी
  • 51 हजार 155 नवमतदार   

बुलढाणा, दि.19 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघासाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. मतदारसंघात एकूण 21 लाख 34 हजार 500 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 2 हजार 288 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात आले असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.

जिल्ह्यात 21 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार : दि. 30 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 21 लक्ष 34 हजार 500 असून यामध्ये पुरुष मतदार 11 लक्ष 9 हजार 791, महिला मतदार 10 लक्ष 24 हजार 671 तर तृतीयपंथी मतदार 38 आहे.  विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : 21-मलकापूर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 50 हजार 56, महिला मतदार 1 लक्ष 38 हजार 326 तर तृतीयपंथी 6 असे एकूण 2 लक्ष 88 हजार 385 मतदार आहेत. 22- बुलढाणा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 452, महिला मतदार 1 लक्ष 47 हजार 638 तर तृतीयपंथी 16 असे एकूण 3 लक्ष 7 हजार 106 मतदार आहेत. 23- चिखली विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 57 हजार 170, महिला मतदार 1 लक्ष 48 हजार 546 तर तृतीयपंथी 2 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 718 मतदार आहेत. 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 68 हजार 601, महिला मतदार 1 लक्ष 54 हजार 393 तर तृतीयपंथी 1 असे एकूण 3 लक्ष 22 हजार 995 मतदार आहेत. 25-मेहकर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 378, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 578 तर तृतीयपंथी 4 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 960 मतदार आहेत.26- खामगांव विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 55 हजार 632, महिला मतदार 1 लक्ष 42 हजार 285 तर तृतीयपंथी 5 असे एकूण 2 लक्ष 97 हजार 922 मतदार आहेत. तर 27-जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 505, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 905 तर तृतीयपंथी 4 असे एकूण 3 लक्ष 6 हजार 414 मतदार आहेत.

जिल्ह्यातील सातही मतदारसंघात 85 वर्षावरील जेष्ठ मतदार 29 हजार 201, दिव्यांग 18 हजार 26 तर या निवडणूकीत प्रथमच मतदान करणारे 51 हजार 155 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

जिल्ह्यात 2 हजार 228 मतदान केंद्र : जिल्ह्यात लोकसभेसाठी 2 हजार 265 मतदान केंद्र होती. यात 23 नविन मतदान केंद्रांची वाढ होऊन विधानसभा निवडणूक 2024 साठी जिल्ह्यामध्ये 2 हजार 288 मतदान केंद्र आहे. जिल्ह्यात 350 सर्वाधिक मतदान केंद्र मेहकर येथे असून सर्वात कमी 305 मतदारसंघ मलकापूर येथे  आहे. बुलढाणा येथे 337, चिखली 317, सिंदखेड राजा 340, खामगांव 322 तर जळगाव जामोद येथे 317 मतदान केंद्र आहे. एकूण मतदान केंद्राच्या 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कॉस्टींग केल्या जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला व दिव्यांग मतदान केंद्र स्थापित करण्यात आले असून युवासाठी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी सहा मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात 115 उमेदवारांमध्ये लढत : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात 115 उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. मतदारसंघनिहाय उमेदवारांची माहिती याप्रमाणे : मलकापूर येथे 15, बुलढाणा येथे 13, चिखली येथे 24, सिंदखेड राजा येथे 17, मेहकर येथे 19, खामगांव येथे 18 व जळगांव जामोद येथे 9 असे एकूण 115 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

मतदान पथकांच्या वाहतुकीसाठी व्यवस्था : मतदान पथके नेमुन दिलेल्‍या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मुख्यालयावरुन नियोजित मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले असून मतदान पथकांचे परिवहन व्यवस्थेकरीता एस.टी महामंडळाची   बसेस 268,  स्कुल बस 56, जीप 359 व ट्रक 17 वाहन वापरण्यात येणार आहेत.

ओळखीसाठी 12 पुरावे ग्राह्य : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे. त्यामध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

मतदानाच्या दिवशी सुट्टी : प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे याकरिता शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. ही  सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व स्थापना कारखाने दुकाने इत्यादींनाही लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता, येईल असेही शासनाने जाहीर केले आहे.

मतदानासाठी मुनष्यबळ व बंदोबस्त : मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सातही मतदारसंघातील 2 हजार 288 मतदान केंद्रासाठी 9 हजार 152  मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले असून मतदारसंघनिहाय माहिती याप्रमाणे : मलकापूरसाठी 1 हजार 220, बुलढाणासाठी 1 हजार 348, चिखलीसाठी 1 हजार 268, सिंदखेड राजासाठी 1 हजार 360, मेहकरसाठी 1 हजार 400, खामगांवसाठी  1 हजार 288 तर जळगाव जामोदसाठी 1 हजार 268 अधिकारी व कर्मचारी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे. तर 702 मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनामार्फत आवश्यक प्रमाणात पोलीस बल तैनात ठेवण्यात आला असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीकरीता मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी आठवडी बाजारामुळे मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी होऊन मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा पोहोचू नये म्हणून संबंधित गावांतील आठवडी बाजार दि. 20 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहे.

वोटर हेल्पलाईन ॲप सुविधा : मतदारांच्या सोयीसाठी व त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्याकरीता वोटर हेल्पलाईन ॲप, हेल्पलाईन व लिंक तयार करण्यात आले आहे.  https://electoralsearch.eci.gov.in  या लिंकवरुन किंवा 1950 किंवा Voter Helpline App: https://play.google.com/store/apps/details?id =com.eci.citizen चा वापर करावा.

 विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील 1 हजार 144 मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

0000

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे आवाहन

अमरावती, दि. 19 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता उद्या, 20 नोव्हेंबर रोजी सर्वत्र मतदान आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरु होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानुषंगाने अमरावती विभागातील सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले आहे.

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीत सहभाग नोंदवत लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी पुढे यावे. मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर पोहोचून शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करावे, असेही आवाहन डॉ. पाण्डेय यांनी सर्व मतदारांना केले.

000

सी -व्हिजिल ॲप आता मराठीमध्ये देखील

मतदारांसाठी आणि उमेदवारांकरिता विविध ॲप्लिकेशन्स

मतदारांसाठी आणि उमेदवारांकरिता विविध ॲप्लिकेशन्स… सी -व्हिजिल ॲप आता मराठीमध्ये देखील उपलब्ध
भारत निवडणूक आयोगाने मतदारासांठी आणि उमेदवारांकरिता सी-व्हिजिल, सुविधा ॲप, ॲफिडेविट पोर्टल, व्होटर टर्नआऊट ॲप, व्होटर हेल्पलाइन ॲप, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांकरिता सक्षम ॲप, केवायसी ॲप आणि 1950 क्रमांकाची हेल्पलाइन आदी आयटी ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून सुविधा दिल्या आहेत, त्यांची थोडक्यात माहिती…

सी-व्हिजिल (cVIGIL)
सी-व्हिजिल हे ॲप हे आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्याकरिता एक अभिनव असे मोबाइल ॲप्लिकेशन आहे की, ज्याद्वारे प्रत्येक नागरिकाला निवडणुकीच्या वेळी आपल्या स्मार्टफोनचा उपयोग करून छायाचित्रे, श्राव्य, किंवा दृक चित्रण अपलोड करता येते. ’सी-व्हिजिल’चा अर्थ ‘सतर्क नागरिक’ असा आहे. हे ॲप आता मराठी भाषेत पण उपलब्ध आहे.या ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल झाल्यानंतर आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे ठिकाण शोधण्यासाठी जी.पी.एस.चा उपयोग करता येतो.तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेवून 100 मिनिटांत स्थितीची माहिती देते.
सी-व्हिजिल ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक.
गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil&hl=en_IN
ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541 वर उपलब्ध आहे.

सुविधा ॲप 2.0
भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अ‍ॅप अद्यावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे. सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणे, प्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणे, अर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. त्याचबरोबर या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.

गुगल प्ले
स्टोरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.


ॲफिडेविट पोर्टल
‘ॲफिडेविट पोर्टल’ निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनाची संपूर्ण यादी पाहता येते. कोणताही नागरिक ‘ॲफिडेविट पोर्टल’चा उपयोग करून उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र पाहू शकतो व डाउनलोड ही करू शकतो. नागरिकांच्या सुविधेसाठी नामांकन दाखल, स्वीकारले,नाकारले, मागे घेतले, स्पर्धेत आहे याची माहिती मिळते.
पोर्टलची लिंक : https://affidavit.eci.gov.in

व्होटर टर्नआऊट ॲप
व्होटर टर्नआऊट ॲप प्रत्येक राज्य, जिल्हा आणि मतदारसंघासाठी अंदाजित मतदानाच्या टक्केवारीची दर दोन तासांनी माहिती देते. हे अॅप्लिकेशन फक्त विधानसभा, लोकसभा आणि पोटनिवडणुकीच्या वेळी सक्रिय होते.
‘व्होटर टर्नआऊट’ ॲपमध्ये प्रत्येक राज्य, जिल्हा आणि मतदारसंघाची अंदाजित मतदान टक्केवारी दाखवते.भारत निवडणूक आयोगाच्या सर्व्हर वरून ‘रिअल-टाइम’ डेटाचा उपयोग करण्यात येतो.निवडणूक प्रकार, राज्य, जिल्हा आणि मतदारसंघानुसार यामध्ये मतदानाच्या टक्केवारीची माहिती मिळते.एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील मतदानाचा अंदाज मिळवण्याचा हा एक जलद आणि सोपा असा पर्याय आहे
‘व्होटर ट्रर्नआऊट अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN
ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882
व्होटर हेल्पलाइन ॲप
मतदारांना आपले मतदार यादीत नाव आहे याची माहिती व्होटर हेल्पलाईन ॲप मध्ये मिळते. हे ॲप प्रत्येकासाठी अधिक सोयीस्कर आणि महत्वाचे आहेत. व्होटर हेल्पलाइन ॲपमध्ये मतदारयादीत नावाची शहानिशा करणे,नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे, दुस-या मतदारसंघात स्थलांतरित करणे,परदेशात राहणारे मतदार, मतदारयादीतील नाव हटवणे किंवा आक्षेप घेणे,नोंदींची दुरुस्त करणे,तुमच्या क्षेत्रातील निवडणुकीचे वेळापत्रक शोधणे.,सर्व उमेदवार, त्यांचे प्रोफाइल, उत्पन्न विवरण, मालमत्ता, गुन्हेगारी प्रकरणे शोधणे.बीएलओ, ईआरओ, डीईओ आणि सीईओ यांची माहिती मिळवता येते व संपर्क साधता येतो
व्होटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक :
गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&hl=mr&pli=1
ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

सक्षम ॲप
भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.
सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.
गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp
ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568

केवायसी ॲप :- (know your Candidate)
मतदारांना त्यांच्या उमेदवारांबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती इत्यादी पाहता येऊ शकते.
गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.ksa
ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/kyc-eci/id1604172836

1950 क्रमांकाची हेल्पलाइन

निवडणूक विषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

संध्या गरवारे,
विभागीय संपर्क अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

ताज्या बातम्या

कोल्हापुरी चप्पल : देशी हस्तकलेचा अनमोल वारसा

0
भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक हस्तकलांपैकी एक असलेल्या अशा कोल्हापुरी चपला आज पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वलयात येत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचं आकर्षण महाराष्ट्रात आणि देशात...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

0
मुंबई, दि.२५ : भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन...

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी

0
गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार, सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीडी स्क्रिनिंगसाठी एआय, अनेक प्रकल्पांना गती नवी दिल्ली, दि. 25 : राज्यातील विविध विकास...

प्राचार्यांचे निवृत्ती वय ६५ करण्यासाठी सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा...

0
अमरावती, दि. २५ :  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीत प्राध्यापक आणि प्राचार्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी धोरणाचे सर्व पैलू...

विदर्भ ज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठ दर्जासाठी सहकार्य करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...

0
अमरावती, दि. 25 (जिमाका) : शहराच्या हृदयस्थानी 167 एकरावर आणि साडेतीनशे विविध वनस्पती असलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी सहकार्य...