शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 484

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरूवात

नागपूर, दि. १६ : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात  वंदे मातरम्‌ व  ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानपरिषदेच्या कामकाजास सुरुवात झाली.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पीठासीन अधिकारी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नवनियुक्त मंत्री, राज्यमंत्री व विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.

००००

विधानसभेत मंत्री, नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय

नागपूर, दि. १६ : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मंत्री व नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.

यामध्ये मंत्री म्हणून सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे- पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, ॲड. आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, ॲड. माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर – साकोरे, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांचा समावेश होता.

तसेच सर्वश्री शेखर गोविंदराव निकम, मनोज पांडुरंग जामसुतकर, वरूण सतीश सरदेसाई या सदस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला परिचय करून दिला.

०००००

‘संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 16 : बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, सदस्य दिनकरराव जाधव यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. 16 :  महाराष्ट्राचे माजी राज्यपाल दिवंगत एस. एम. कृष्णा आणि विधानसभेचे दिवंगत सदस्य दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी  माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, माजी विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

नागपूर, दि. 16 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आज नागपूर येथे प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व  ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभेचे  अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्रीमहोदय व सदस्य यावेळी उपस्थित होते.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 15 (शिबिर कार्यालय) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित मंत्रिपरिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल, अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यांवर चर्चा, सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असे कामकाज होणार असून त्यासोबत जवळपास वीस विधयेके मांडण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरिता मतदान केले आहे, म्हणून आमचे सरकार हे ‘ईव्हीएम’ सरकार आहे, पण त्या ईव्हीएमचा अर्थ ‘एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र’ असा आहे. आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घडविण्याकरिता या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कामकाज करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसासाठी भावांतर योजना राबवून बाजारभाव व हमीभाव यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. तसेच धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी 20 हजार रुपये दिले. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणारे शासन आहे, असेही त्यांनी सांगितले.

परभणीमधील घटना ही एका मनोरुग्णामुळे घडली असून मनोरुग्णाच्या कृत्यावर कोणतेही असंविधानिक उद्रेक करणे योग्य नाही. हे शासन संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे आहे. संविधानाच्या बाहेर तसूभरही वेगळे काम करणार नाही. आमचे सरकार संविधानाचा गौरव करणारे आहे. बीड जिल्ह्यातील घटनेची विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून आरोपी कोणीही असले तरी त्यांना सोडले जाणार नाही. अशा घटना महाराष्ट्रात गांभीर्यानेच घेतल्या जातात व यापुढेही घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

मिशन समृद्ध महाराष्ट्रसाठी काम करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आम्ही मागील अडीच वर्षे टीम म्हणून काम केले आहे. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रति आम्ही उत्तरदायी आहोत. ‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहोत. शेतकऱ्यांच्या, जनतेच्या हिताचे प्रकल्प सुरू करून त्यांना चालना दिली. एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना यांची सांगड घातली. लोकाभिमुख आणि गतिमान शासन आणून यापुढेही गतिमानतेने निर्णय घेऊ. या पुढील काळात सर्वसामान्य जनतेसाठी व राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यास महाराष्ट्र शासन हातभार लावणार आहे.

जनतेच्या विश्वासाला पात्र राहून सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार – अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्याला पात्र राहून महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न चर्चेला आले तर त्यावर निश्चितपणे उत्तर दिले जाईल. विरोधकांचा योग्य सन्मान ठेवला जाईल.

मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी झालेल्या चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवनियुक्त मंत्री, विधीमंडळ सदस्य उपस्थित होते.

 

हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार 20 विधेयके

राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे.

विधेयकात रूपांतरित होणारे अध्यादेश:-

(१) सन २०२४ चे वि.स.वि.क्र… महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२४ (नगर विकास विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ५ चे रुपांतरीत विधेयक) अप्रत्यक्षपणे निवडलेल्या नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा पदावधी पाच वर्षे करणे,

(२) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२४ (सामान्य प्रशासन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ६ चे रुपांतरीत विधेयक) (सर्वसाधारण बदलीसाठीच्या कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची तरतूद)

(३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा, विधेयक, २०२४. (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ७ चे रुपांतरीत विधेयक) (दंडाच्या कमाल मर्यादेत वाढ)

(४) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रदद् करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ८ चे रुपांतरीत विधेयक) (अनधिकृत हस्तांतरण नियमित करणेबाबत)

(५) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, २०२४ (वित्त विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ९ चे रुपांतरीत विधेयक) (केंद्रीय अधिनियमाच्या अनुषंगाने सुसंगत सुधारणा करणे)

(६) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. … महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयक, २०२४ (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १० चे रुपांतरीत विधेयक) (अपराधांच्या शिक्षेत वाढ अधिनियमाच्या तरतुदीच्या उल्लंघनाबद्दल कडक शिक्षा व दंड वाढविण्याबाबत)

(७) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या ढकलणे विधेयक, २०२४ (ग्रामविकास विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ११ चे रुपांतरीत वि (जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापती इत्यादी पदांच्या निवडणूका पुढे ढकलणे

(८) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वनविभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १२ चे रुपांतरीत विधेयक) (शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने अनुसूची एकच्या अनुच्छेदामध्ये सुधारणा करणेबाबत)

(९) सन २०२४ चे वि.प.वि.क्र… महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सुधारणा) विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १३ चे रुपांतरीत विधेयक) (वाचन संस्कृतीचा व ग्रंथालय चळवळीचा विकास करण्यासाठी अधिनियमाच्या विवक्षीत कलमांमध्ये सुधारणा करणेबाबत)

(१०) सन २०२४ चे वि.स.वि.क्र… महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १४ चे रुपांतरीत विधेयक) (जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजनाचे नियमाधीकरण करण्यास परवानगी देणे आणि नियमाधीकरण अधिमुल्य कमी करुन बाजारमुल्याच्या ५ टक्के इतके निश्चित करणे)

(११) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. .. श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी,

(सुधारणा) विधेयक, २०२४ (विधि व न्याय विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १५ चे रुपांतरीत विधेयक) (विश्वस्थ समितीचा कार्यकाळ आणि समिती सदस्यांची संख्या वाढविणे)

(१२) सन २०२४ चे वि.प.वि.क्र… महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १६ चे रुपांतरीत विधेयक) (समुह विद्यापीठ घटित करणेच्या तरतुदीमध्ये सुधारणा)

(१३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४( उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १७ चे रुपांतरीत विधेयक) (नविन महाविद्यालय उघडण्यासाठी इरादापत्र मागविण्यासाठी कालावधी वाढवून देणेबाबत)

(१४) सन २०२४ चे वि.प.वि.क्र. .. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४ (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १८ चे रुपांतरीत विधेयक)

 

प्रस्तावित विधेयके:-

 

(१) सन २०२४ चे वि.प.वि.क्र… महाराष्ट्र खाजगी विद्यापीठं दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(२) सन २०२४ चे वि.स.वि.क्र… महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विधेयक, २०२४ (गृह विभाग)

(३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. (महसूल विभाग) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२४

(४) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. हैदराबाद अतियात चौकशी (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल विभाग)

(५) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. विधेयक, २०२४ (महसूल विभाग) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा)

(६) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२४ (वित्त विभाग)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांच्या वतीने अभूतपूर्व स्वागत

नागपूर, दि. १५ : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे आगमनप्रसंगी नागपूरकरांनी विमानतळावर अलोट गर्दी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभूतपूर्व स्वागत केले. नागपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करीत त्यांच्या निवासस्थानाजवळ छत्रपती चौक येथे शुभेच्छा दिल्या.

विमानतळावर त्यांनी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, सुभाष पारधी ॲड. राहूल झामरे, अनुसूचित जाती मोर्चाचे सतीश शिरसवान व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासमवेत होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ मार्गावर प. पू. हेडगेवार स्मारकास भेट देऊन या ठिकाणी स्वातंत्र्य देवीच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. या भव्य विजयी मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. सोमलवाडा चौक, राजीव नगर, छत्रपती चौक, खामला, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, बजाज नगर, शंकरनगर, लक्ष्मी भुवन चौक या ठिकाणी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व मोठ्या संख्येत लाडक्या बहीणींनी मिरवणुकीत सहभाग घेऊन मुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या.

०००

 

 

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिपरिषदेची बैठक संपन्न

नागपूर, दि. १५: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात नवनियुक्त सदस्य मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते.
या बैठकीच्या प्रारंभी राज्याचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसा शोकप्रस्ताव मंत्रिपरिषदेने मंजूर केला.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ३३ मंत्री व ६ राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ

नागपूर, दि. १५ : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.

समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे- पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अॅड.आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, अॅड.माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरतशेठ गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबीटकर यांचा समावेश आहे.

सोबतच 6 सदस्यांना राज्यपालांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यात माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर – साकोरे, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याचे संचलन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. सोहळ्यास खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

००००

33  Cabinet  and 6 Minister of State inducted in first Cabinet Expansion in Maharashtra

In the first major expansion of Maharashtra state cabinet, 39 ministers and ministers of state were given the oath of office and secrecy by Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at a Swearing in Ceremony held at Raj Bhavan, Nagpur.

Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar were among those present.

Those given oath by the Governor included Chandrashekhar Bawankule, Radhakrishna Vikhe Patil, Hasan Mushrif, Chandrakant Patil, Girish Mahajan, Gulabrao Patil, Ganesh Naik, Dadaji Bhuse, Sanjay Rathod, Dhananjay Munde, Mangal Prabhat Lodha, Uday Samant, Jayakumar Rawal, Pankaja Munde, Narhari Zirwal etc.

0000

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्री यांनी शपथविधी सोहळ्यात केला मातृत्वाचा सन्मान !

मुंबई दि. १५ : महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर वीरांगणांनी जन्म घेतला असून, त्यांच्या कर्तृत्वाने आणि त्यागाने या भूमीला अभिमान मिळवून दिला आहे. या थोर माता-भगिनींच्या उपकारांची जाणीव ठेवत महाराष्ट्राने नेहमीच महिलांचा सन्मान राखला आहे. आजही नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्री यांनी शपथविधी सोहळ्यात मातृत्वाचा सन्मान केला आहे.

राज्य शासनाने चौथे महिला धोरण लागू करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या धोरणाअंतर्गत शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. ही फक्त नियमांची अंमलबजावणी नसून मातृत्वाचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी दृष्टिकोन प्रकट होणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. विशेष म्हणजे, राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात माननीय मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी शपथ घेताना आपल्या नावासोबत वडिलांआधी आईचे नाव प्राधान्याने घेतले. या कृतीने महाराष्ट्राने देशभरात मातृत्वाचा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. मातृत्वाचा सन्मान जपण्याचा हा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या सामाजिक विकासासाठी प्रेरणादायी ठरेल.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी

0
बारामती, दि.१९: शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा...

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...