मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 1666

दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवारी, मंगळवारी ‘महात्मा गांधी यांचे विचार व कार्य’ या विषयावर मुलाखत

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात ज्येष्ठ  विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांचा सहभाग असलेली महात्मा गांधीजी यांचे  विचार व कार्यया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून दिलखुलासकार्यक्रमात सोमवार दि.७ ऑक्टोबर आणि मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

विश्वाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार आणि मूल्य, महात्मा गांधीजींच्या जीवनातील तत्त्वे, साहित्यिक गांधी, सत्य, अहिंसा आणि असहकार या विषयीचे विचार या विषयाची माहिती श्री.मोरे यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

००००

विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

मुंबई, दि.5 :  विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 21 ऑक्टोबर 2019 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.5.10.2019

सैन्यदलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी; पूर्वतयारीसाठी मुंबई शहर जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत सोमवारी मुलाखती

मुंबई, दि. 4 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवांराना एसएसबी प्रशिक्षण वर्ग छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक,युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखतपत्रे मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांना एसएसबी मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक10 ते 19 ऑक्टोबर 2019 असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दिनांक 7 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर राहावे असे कळविण्यात आले आहे.

एसएसबी प्रवेश वर्गासाठी खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व ह्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत आणणे आवश्यक आहे.

1) कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

2) एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.

3) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

4) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रं. 0253-2451031 2451032 वर कार्यालयीन वेळेत (स. 10.00 ते सायं. 5.30) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात दर शनिवारी निवडणूक वार्तापत्र

मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विधानसभा निवडणूक- २०१९  या विशेष वार्तापत्राची निर्मिती केली आहे. हे वार्तापत्र आकाशवाणीवरील दिलखुलासकार्यक्रमात दर शनिवारी  सकाळी ७.२५ ते ७.४५ या कालावधीत प्रसारित केले जाणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील २२ आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित केले जाईल.

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांची माहिती

मुंबई, दि. ४ : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्‍ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स या एफएल-II अनुज्ञप्तीविरुध्द कठोर पावले उचलून या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या वैशाली वाईन्स या अनुज्ञप्तीसोबत अवैध मद्याचा पुरवठा होणाऱ्या हॉटेल किनारा या एफएल-III अनुज्ञप्तीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत अटी व शर्थींचे पालन न करणाऱ्या शशी लंच होम, हॉटेल स्वस्तिक या एफएल-III अनुज्ञप्ती निवडणूक कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. २४ लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना हॉटेल एफएल – III अनुज्ञप्ती ह्या ०८ ते १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशान्वये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.

निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एफएल-II, एफएल-III व सीएल –III इ. मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्रीची माहिती भरणे, विहित वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशीने पाळणे, मद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्ययावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

अवैध मद्यविक्रीविरोधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

नागरिकांनी अवैध मद्यविक्री विरोधातील तक्रारीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्र. 18008333333 व व्हॉटसॲप क्रमांक-8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी केले आहे. तसेच सर्व अनुज्ञप्तीधारकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या SCM (E) BOOK या अप्लिकेशनचा वापर करुन दैनंदिन मद्यविक्रीची माहिती भरण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

००००

अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले

मुंबई के छह लाइसेंसधारकों का लाइसेंस रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा की जानकारी

मुंबई : विधानसभा चुनाव निर्भीड और खुले वतावरण में हो, इसके लिए राज्य उत्पादन शुल्क विभाग की ओर से मुंबई में कुछ लाइसेंसधारक शराब विक्रताओं के खिलाफ अवैध शराब आपूर्ति किए जाने से कड़ी कारवाई की गई है. छह लाइसेंसधारकों के लाइसेंस कार्रवाई कर रद्द किए गए हैं. आगे भी अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले या नियमों का भंग करनेवाले लाइसेंस धारक शराब दुकानदारों के खिलाफ लाइसेंस रद्द या निलंबन की कड़ी कार्रवाई करने का इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा ने दिया है. सभी राज्य राज्य उत्पादन शुल्क अधिकारी और कर्मियों को इसके संदर्भ में सतर्के रहने के निर्देश दिए गए हैं.

चुनाव आचारसंहिता नियम तथा मुंबई विदेशी शराब नियमावली1953 अंतर्गत नियमों का भंग करनेवाले और अवैध तरीके से शराब बिक्री करनेवाले मुंबई उपनगर जिलवली के वैशाली वाईन्स, वरायटी वाईन्स एफएल-II दुकानदारों के खिलाफ कड़ी कार्रवाई कर लाइसेंस रद्द किए गए है. अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले वैशाली वाईन्स इस दुकानदार के साथ अवैध शराब की आपूर्ति हो रहे होटल  किनारा एफएल-IIIका भी लाइसेंस रद्द किया है.  साथ ही मुंबई विदेशी शराब नियमावली 1953 अंतर्गत नियम और शर्तों का पालन न करनेवाले शशी लंच होम, होटल स्वस्तिक इन एफएल-III के लाइसेंस चुनाव कालावधि खत्म होने तक निलंबित की है. 24 लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना होटल एफएल – III के लाइसेंस 08 से 15 दिनों तक निलंबित किए गए है.  मुंबई उपनगर जिलाधिकारी मिलिंद बोरीकर के आदेश के बाद मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी के मार्फ़त यह कार्रवाई की गई.

चुनाव के दौरान जिले में अनुचित प्रकार न हो इसके लिए एफएल-II, एफएल-III व सीएल –III आदि शराब बिक्री करनेवाले लाइसेन्सधारक दुकानदारों को सीसीटीव्ही कैमरा लगाने के निर्देश दिए गए है.  ऑनलाईन पध्दति से शराब बिक्री की जानकारी देना, निर्धारित से समय में दुकान खोलने और बंद करने के समय का पालन, शराब बिक्री का पंजीयन, और शराब का स्टॉक अपडेट रखना आदि के बारे में सभी लाइसेंस धारकों को निर्देश दिए गएBअद्यावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

अवैध शराब बिक्री के विरोध में शिकायत के लिए टोल फ्री नंबर

नागरिकों को अवैध शराब बिक्री के विरोध में शिकायत करने के लिए राज्य उत्पादन शुल्क विभाग के टोल फ्री नंबर18008333333 और वाट्सएप नंबर –8422001133 पर संपर्क करने का आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा ने किया है. साथ ही सभी लाइसेंस धारकों को राज्य उत्पादन शुल्क विभाग के मार्फत शुरू किए गए SCM (E) BOOK इस एप्लिकेशन का उपयोग कर रोजाना की जानेवाली शराब बिक्री की जानकारी दी जाने की सूचना की गई है. 

००००

Distribution of liquor by illegal way resulted in to cancellation of license of six license holders in Mumbai

Information by State Excise Commissioner Prajakta Lavangare – Verma

Mumbai, 4.Oct.19:” In order to conduct the assembly elections in a fearless and open environment, strict action was taken against some rules violators by the State Excise Department. License of Six of license holders have been revoked, in Mumbai. Even further, license will be cancelled who involved in illegal provision of liquor and any other rules violation” warned State Excise Commissioner, Prajakta Lavangare-Verma.

She instructed to all State Excise Officers and employees to remain vigilant during election period.

The licenses of FL-II Vaishali wines and Variety wines from suburban area of Mumbai have been revoked under the violation of election code of conduct as well as Mumbai Foreign Alcohol Regulation 1953.  License of Hotel Kinara (FL-III) has been cancelled due to its involvement in illegal liquor distribution along with Vaishali Wines. Also, the Shashi Lunch Home, Hotel Swastika of FL-III, which does not comply with the terms and conditions of the Mumbai Foreign Alcohol Rules 1953, has been suspended till the end of the election period. License of 24 Lounge Bar, Platinum Bar, Shivila Bar, Jarna Hotel of FL-III have been suspended for eight to fifteen days. The proceedings were carried out under the orders of Mumbai Suburban District Collector Milind Borikar through the superintendent of the Mumbai suburban district, Snehalta Shrikar, Inspector Manoj Chaudhary.

Orders have been given to install CCTV camera at the liquor shops of license holders of    FL-II, FL-III and CL -III, in the district during the elections. All licensed holders in the district have been instructed to fill online liquor information, open the liquor license in a timely manner and to comply with the time of closure, keeping liquor sales registers and updating the liquor stock.

Toll free number for complaint against illegal selling of alcohol

The toll free number of the state excise department for citizens to raise the complaint against illegal selling of alcohol. State Excise Commissioner, Prajakta Lavangare-Verma, has appealed to citizen to contact on toll free no. 18008333333 and WhatsApp No. 8422001133 to launch the complaint in this concern. Also, all the license holders have been advised to fill up daily liquor selling information using SCM (E) BOOK application launched by the State Excise Department.

0000

आचारसंहिता कालावधीत ४३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. 4 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आदी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने-चांदी आदी स्वरुपात 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

        

श्री. शिंदे म्हणाले, भरारी पथके (एफएस), स्थ‍िर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत 9 कोटी 53 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भरारी पथके (एफएस), स्थ‍िर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 9 कोटी 71 लाख रुपये किमतीची 11 लाख 88 हजार 400 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे.

        

निवडणूक यंत्रणा आणि अंमली पदार्थ विरोधी दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 15 कोटी 7 लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय 8 कोटी 77 लाख रुपयांचे  सोने, चांदी, जवाहिर आदी जप्त करण्यात आले आहेत.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.4.10.2019

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. ०४ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपली.

सर्वाधिक उमेदवार भोकरमध्ये तर सर्वात कमी उमेदवार माहिम आणि शिवडीमध्ये

अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, आज नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे आजअखेर दाखल केली.   

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या संपूर्ण कालावधीत आजअखेर नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात एकूण ४४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. तर धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७० उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १७५ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ९५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०७ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६३ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १७६ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६४ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५३ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ७० उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७६ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४७ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३६ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ४०२ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५८ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८८ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १५० उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २४७ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २४३ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८० उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ३०० उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ३३५ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात १०६ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ४४१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २०३ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २३२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १३५ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २७३ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४५ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३२ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात २०४ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

००००

इरशाद बागवान / वि.सं.अ. / दि.04.10.2019

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 3 : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस उपसचिव विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव श्रीमती मेघना तळेकर, विधान परिषद  सभापतींचे  सचिव महेंद्र काज, अवर सचिव सोमनाथ सानप, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘सोशल मीडिया व निवडणूक’ या विषयावर पोलीस अधीक्षक डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत

मुंबई,दि. ३  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित’जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात’सोशल मीडिया व निवडणूक’या विषयावर पोलीस अधीक्षक तथा  विधानसभा निवडणूक २०१९ सोशल मीडिया मॉनिटरींगचे  राज्य समन्वयक  डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.४ ऑक्टोबर, २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.      

     

सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी,विधानसभा निवडणूक २०१९ सोशल मीडिया मॉनिटरींगचे कामकाज,फेक जाहिराती कशा ओळखाव्यात,क्रियाशील सायबर संस्कृती म्हणजे काय,सोशल मीडियासंदर्भातील तक्रारीसाठी कुठे संपर्क साधावा, या विषयांची  सविस्तर माहिती डॉ. राजपूत  यांनी’जय महाराष्ट्र’  या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

पनवेलमध्ये सर्वात जास्त, तर वडाळ्यात सर्वात कमी मतदारांची नोंद

मुंबई दि. 3 : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात पनवेल मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 5 लाख 54 हजार 827 आहे तर वडाळा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजेच 2 लाख 3 हजार 935 मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

सर्वाधिक दुसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी चिंचवड मतदारसंघात 5 लाख 17 हजार 004 मतदार आणि तिसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी नालासोपारा मतदारसंघात 5 लाख 12 हजार 434 अशी झाली आहे. सर्वात कमी मतदार असलेल्या दुसऱ्या क्रमांकाची मतदार नोंदणी कुडाळ मतदारसंघात 2 लाख 15 हजार 657 अशी आहे. सर्वांत कमी तिसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी सावंतवाडी मतदारसंघात 2 लाख 24 हजार 934 अशी  झाली आहे.

2009 मध्ये महाराष्ट्रातील एकूण मतदार 7 कोटी 59 लाख 72 हजार 310 होते. तर 2014 मध्ये एकूण मतदार 8 कोटी 35 लाख 15 हजार 425 असल्याची नोंद आहे. राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे.

15 हून अधिक मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 15 हून अधिक मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे. 2019 विधानसभा मतदार नोंदणीत सर्वाधिक कमी मतदारांची नोंद वडाळ्यात असल्याचे दिसून आले आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम,नागपूर मध्य,डहाणू,मुलुंड,कलिना,वांद्रे (पश्चिम),धारावी,वडाळा,माहिम,वरळी,भायखळा,मुंबादेवी,कुलाबा शिवाजीनगर,पुणे कन्टोन्मेंट आणि सोलापूर शहर (मध्य) या मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहेत.

नागपूर दक्षिण -पश्चिममध्ये 2009 मध्ये 3 लाख 51 हजार 021 मतदार असल्याची नोंद आहे,तर 2014 मध्ये 3 लाख 41 हजार 300 मतदार असल्याची नोंद आहे.नागपूर मध्य मतदार संघामध्ये 2009 मध्ये 3 लाख 04 हजार 487 मतदार असल्याची नोंद आहे तर 2014 मध्ये 2 लाख 92 हजार 716 मतदार असल्याची नोंद आहे. डहाणूमध्ये 2009 मध्ये 2 लाख 36 हजार 251 मतदार असल्याची नोंद आहे तर 2014 मध्ये 2 लाख 34 हजार 175 मतदार असल्याची नोंद आहे. याप्रमाणेच इतर बारा मतदारसंघातही 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे.

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...