बुधवार, मे 7, 2025
Home Blog Page 1662

‘आपलं मंत्रालय’चा निवडणूक विशेषांक प्रकाशित

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह अंकाचे अतिथी संपादक

मुंबई, दि. 19 : ‘आपलं मंत्रालयच्या सप्टेंबरच्या विधानसभा निवडणूक 2019’च्या विशेषांकाचे प्रकाशन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या हस्ते आज येथे झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (वृत्त/माहिती) सुरेश वांदिले, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या विशेषांकात निवडणूकविषयक विविध माहितीपूर्ण लेखांचा समावेश आहे. आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता काळात घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करू नये, निवडणुकीतील सोशल मीडिया, सी-व्हिजील अॅप, निवडणूक चिन्ह, निवडणुकीत वापरली जाणारी शाई, घ्यावयाची खबरदारी, जनजागृती मोहीम, निवडणूक प्रक्रिया याबाबतच्या माहितीपूर्ण लेखांचा यात समावेश आहे.

निवडणुकीत १ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅटचा होणार वापर

मुंबई, दि.19 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक-व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) 288 मतदारसंघात पाठविण्यात आले आहेत.

या निवडणुकीसाठी288 मतदारसंघातील 96 हजार 661 मतदान केंद्रावर 1 लाख 80 हजार मतदान यंत्र (ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन), 1 लाख 27 हजार नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट) आणि 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक) आणि  राखीव यंत्रेही पाठविण्यात आली आहेत.

निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट महत्त्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून सर्वप्रथम2019च्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर  करण्यात आला होता.

मतदार ओळखपत्र नसल्यास ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य

मुंबई, दि. 19 : येत्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

          

मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी11 पुरावे :  पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार,आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही उद्या ऐका ‘विशेष निवडणूक वार्तापत्र

मुंबई, दि. 18 : प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअरया ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  विशेष निवडणूक वार्तापत्र  दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७. ४५या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आकाशवाणीवरील’दिलखुलासकार्यक्रमात विशेष निवडणूक वार्तापत्रशनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४५या वेळेत प्रसारित होणार आहे. राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, ‍नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या २२आकाशवाणी केंद्रावरून हे प्रसारित केले जाईल.

कंपन्या, खासगी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा सवलत

मुंबई, दि. 18 :  खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत.

राज्य शासनाने याविषयी दिनांक25 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृहे आदी ठिकाणी काम करणारे मतदानादिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलतीस पात्र असतील. मतदारसंघातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत असल्यास त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे आवश्यक राहील. अशी सवलत मिळत नसल्यास तसेच मतदानासाठी सुट्टी दिल्यानंतर त्या दिवशीचे वेतन कपात केल्यास जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता येईल.

मुंबईमधील खासगी आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा वेळेची सवलत मिळत नसल्यास त्यांना स्वत:चे नाव, मतदान क्षेत्राचा तपशील, आस्थापनेचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनी, आस्थापना मालकाचे किंवा व्यवस्थापकाचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी, दूरध्वनी या तपशीलासह तक्रार करता येईल.

प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका (दूरध्वनी क्र. 022-24311751) व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयामध्ये तक्रार नोंदविता येईल. तसेच राज्याचे कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-20, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई (दूरध्वनी क्र. 26573733, 26573844) येथे तक्रार नोंदविता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.18.10.2019 0000

कंपनियां, निजी कारखाने के कर्मचारियों को

मतदान के लिए पगार सहित अवकाश तथा रियायत

मुंबई, दि. 18 : निजी कार्यालय, आस्थापना, दुकान, कारखाना और अन्य जगहों पर  काम करनेवाले अधिकारी, कर्मचारी एवं कामगारों को विधानसभा चुनाव में मतदान कर सके, इसके लिए दि. 21 अक्तूबर 2019  को पगार सहित अवकाश तथा रियायत दी जाए, यह निर्देश राज्य के कामगार आयुक्त ने दिए है।

राज्य सरकार ने इस संदर्भ में दिनांक25 सितंबर को परिपत्रक जारी किया है। उसके अनुसार सभी दुकान, निजी कार्यालय, आस्थापना, सूचना प्रोद्योगिकी  कंपनियां, कारखाना, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृह आदि जगहों पर काम कर रहे कर्मचारी मतदान के दिन पगार सहित अवकाश तथा रियायत के लिए पात्र रहेंगे। निर्वाचन क्षेत्र के मतदार रहे अधिकारी, कर्मचारी काम के सिलसिले में निर्वाचन क्षेत्र के बाहर कार्यरत होने पर उन्हें मतदान का अधिकार निभाने  के लिए पगार सहित अवकाश दिया जाए।

अपवादात्मक परिस्थिति में पूरा दिन अवकाश देना संभव नहीं होने पर संबंधित जिलाधिकारी की अनुमति से मतदान क्षेत्र के कामगारों को अवकाश के अलावा दो  या तीन घंटे की पगार सहित सहूलियत देना आवश्यक होगा। इस तरह की सहूलियत नहीं मिलने पर एवं मतदान के लिए अवकाश देने के बाद उस दिन का वेतन में कपात करने पर जिला कामगार अधिकारी की ओर शिकायत दर्ज कर सकते है।

मुंबई के निजी आस्थापन के अधिकारी, कर्मचारी एवं कामगारों को मतदान के लिए पगार सहित अवकाश तथा समय की सहूलियत नहीं मिलने पर उन्हें स्वयं का नाम, मतदान क्षेत्र का विवरण, आस्थापना का नाम, पता, भ्रमणध्वनी तथा दूरध्वनी, आस्थापना मालिक का तथा व्यवस्थापक का नाम और उनका भ्रमणध्वनी, दूरध्वनी इस विवरण के साथ शिकायत की जा सकती है।

सूचित किया गया है कि प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका (दूरध्वनी क्र. 022-24311751) और उनके अधिपत्य में महानगरपालिका के प्रभागनिहाय कार्यालय में शिकायत दर्ज की जा सकती है। राज्य के कामगार आयुक्त का कार्यालय, कामगार भवन, सी-20, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई (दूरध्वनी क्र. 26573733, 26573844) में शिकायत दर्ज की जा सकती है।

००००

Employees of private companies and factories

should be given full pay leave or facility for voting

Mumbai, October 18:- The officers, employees and workers working with private offices, establishments, shops, factories, firms and other places should be given full pay leave or facility of 3 hours on 21st October 2019 so that they can exercise their franchise for the Assembly elections in the state. The directions were given by the State Labour Commissioner.

The state government has published a notification to  this effect on 25th September 2019. According to that, all the officers and employees of shops, private offices, establishments, IT companies, factories and industries, malls, business complexes, residential hotels, theatre and other places are liable to get full pay leave on the polling day. If the officers and employees, who are voters of the constituency, are working in other places, they should be given full pay leave for casting their votes.

   In exceptional cases, if it is not possible to give full day leave, facility of two to three hours can be given to them with prior permission of the district magistrate , so as to enable them for voting. If such sort of facility is not given and if the salary of the election day holiday is deducted, complaint can be filed with the district labour officer. If the private establishment officers, workers and employees in Mumbai are not given the benefit of full pay leave,  they can type the name of the constituency, name of establishment, itd address, the phone number or mobile numbers, name of the owner of establishment, or that of manager, their phone number or mobile number and file the complaint with the chief facilitator, Greater Mumbai Municipal Corporation, (phone number 022 24311751) The complaint can also be filed with the zone offices under the Municipal Corporation. Similarly, the complaint can be given to the office of state Labour Commissioner, Kamgar Bhavan, C-20‘ E- Block’ Bandra Kurla Complex’ Bandra East, Mumbai. Telephone number 26 573733 or 26573844.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

मुंबई, दि. 18 : राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 108 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासह पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदार संघांच्या 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 6 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

राज्यात ६२ हजारांहून अधिक अंध मतदारांची नोंद

मुंबई, दि. 18 : राज्यात 62 हजार 366 अंध मतदारांची 23 हजार 101 मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. या दिव्यांग मतदारांमध्ये 38 हजार 763 मूकबधीर, हालचाल करण्यास अक्षम असे व्यंग असलेले 1 लाख 76 हजार 615 आणि अन्य स्वरुपाचे 1 लाख 18 हजार 929 दिव्यांग यांचा समावेश आहे.

राज्यातील96 हजार 661 मतदान केंद्रांपैकी 65 हजार 483 मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात 17 हजार 957 मतदान केंद्रावर मूकबधीर, 42 हजार 905 मतदान केंद्रावर हालचाल करण्यास अक्षम असे दिव्यांग आणि 20 हजार 465 हजार मतदान केंद्रावर अन्य स्वरुपाचे व्यंग असलेल्या मतदारांची नोंद झाली आहे.

         

या सर्व मतदान केंद्रांवर किमान अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येतील. मतदान खोलीपर्यंत सुलभतेने जाण्यासाठी रॅम्प, इव्हीएमवर ब्रेल भाषेतील मतपत्रिका, व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येईल. मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था असेल. त्यांना मदत करण्यासाठी दिव्यांग मित्र स्वयंसेवकअसतील. दिव्यांग मतदारांना सुलभ निवडणुकीचा आनंद मिळेल यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

००००

सचिन गाढवे/विसंअ/18.10.2019

More than 62,000 blind voters registered in the state

Mumbai, 18.Oct.19: Around 62, 366 blind voters have been registered at 23, 101 polling booths for the coming assembly election in the state. In this year 3, 96,673 disabled voters have been registered their names in the state for the election. These handicapped voters include 38,763 deaf persons, 1, 76, 615 persons with disabilities, and 1, 18, 929 persons with other forms of disability.

Out of the 96, 661 polling booths in the state, 65,483 polling stations have registered disabled voters. Of them, 17,957 polling booths have deaf and dumb voters while 42,905 polling booths have such voters who are unable to move, and 20,465 polling booths have voters with other forms of disability.

All these polling stations will have the minimum required facilities for disable voters. Braille language ballots on EVM, wheelchairs and ramps will be provided, on the day of election. Separate queues will be made for the disable and senior citizen voters at the polling station. There will be ‘Disable Friend Volunteers’ available to help them. Special efforts are being made by the Election Commission of India to ensure that the handicapped voters enjoy easy elections and increase the numbers of voters.

0000

विधानसभा निवडणुकीसाठी ३ लाखांहून अधिक सुरक्षा जवान सज्ज

मुंबई, दि. 18 : विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून सुमारे तीन लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्था केली असून तीन हेलिकॉप्टर व ड्रोन तैनात करण्यात आले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक तथा विधानसभा निवडणुकीसाठीचे सुरक्षा विषयक नोडल अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिली.

मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, शांततेत सर्व प्रक्रिया पार पाडावी, यासाठी राज्य पोलीस दलातील 2 लाख पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, नागालँडचे महिला पोलीस दल आदी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 350 कंपन्या (प्रत्येक कंपनीत शंभर अधिकारी/जवानांचा समावेश), राज्य राखीव पोलीस दलाच्या 100 कंपन्या, राज्य गृहरक्षक दलाचे 45 हजार जवान अहोरात्र तैनात करण्यात आल्या आहेत. याबरोबरच इतर राज्यातील सुमारे 20 हजार गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात आली आहे.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/18.10.2019 000

विधानसभा चुनाव के लिए

3 लाख से अधिक सुरक्षा जवान सुसज्ज

मुंबई, दि. 18 : विधानसभा चुनाव शांतिमय के वातावरण में पूरी हो सकेइसके के लिए राज्य और केंद्र के पुलिस दल सुसज्ज हो गए है और तकरीबन तीन लाख से अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात किए जाएंगे। गढ़चिरोली जिले में विशेष सुरक्षा व्यवस्था की है और तीन हेलिकॉप्टर और ड्रोन तैनात किए गए है, यह जानकारी विशेष पुलिस महानिरीक्षक तथा विधानसभा चुनाव के सुरक्षा विषयक नोडल अधिकारी मिलिंद भारंबे ने दी है।

मतदान और मतगणना के समय कोई भी अनुचित घटना न हो, शांतता में  सभी प्रक्रिया पूरी हो, इसके लिए राज्य पुलिस दल के 2 लाख पुलिस अधिकारी, कर्मचारी तैनात किए गए है। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पुलिस दल, नागालँड के महिला पुलिस दल आदि केंद्रीय सुरक्षा दल के 350 कंपनियां (प्रत्येक कंपनी में सौं अधिकारी/जवान शामिल है), राज्य राखीव पुलिस दल की 100 कंपनियां, राज्य गृहरक्षक दल के 45 हजार जवान दिनरात (अहोरात्र) तैनात किए गए है। इसके साथ ही अन्य राज्यों के तकरीबन 20 हजार गृहरक्षक दल के जवानों की भी मदद ली गई है।

००००

 

Over 3 lakh security personnel deployed for Assembly elections

Mumbai, Oct 18: In order to conduct peaceful and fair polling over three lakh security personnel of State and Center police forces will be deployed in the state. Special security arrangements have been made in Gadchiroli district with the deployment of three helicopters and drone, said Special IGP and Nodal Officer of Security for these Assembly elections, Milind Bharambe.

Two lakh state police personnel have been deputed to ensure peaceful polling and counting of votes. 350 Companies (Each Company consists of 100 officers/Jawans) of Central Industrial Security Force, Central Reserve Police Force, Nagaland Women Police Force etc., 100 companies of State Reserve Plice Force, 45000 jawans of State Home Guards have been deployed on 24 hour duty. In addition to this, services of 20000 Home Guard Jawans of other states are also sought for the peaceful conduct of elections.

0000

‘इंडिया अँड द नेदरलँड्स इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई, दिनांक. १७ : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांतया प्रदर्शनाचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई इथे उद्घाटन करण्यात आले.

शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई व रिज्क्स म्युझियम, ॲमस्टरडॅम यांच्यातील हा एक संयुक्त उपक्रम आहे. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, प्रदर्शन दालनात दि. १७ ऑक्टोबर २०१९ ते १६ डिसेंबर २०१९या कालावधीत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे.

शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक श्री. सब्यासाची मुखर्जी, माध्यम व विकास रिज्क्स म्युझियमचे संचालक, हेन्द्रीज क्रीबोल्दर व नेदरलँड्चे भारतीय राजदूत गिडो टीलमन यावेळी उपस्थित होते.

नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमा यांची मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला भेट

मुंबई, दि. 17 : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. त्यांच्या पाच दिवसीय भारत भेटीतील हा एक भाग होता. भारत व नेदरलँड यांच्यातील भूतकालीन, वर्तमान व भविष्यकालीन मैत्रीचे प्रतीक म्हणून गेट वे ऑफ इंडियाला डच राष्ट्रीय रंग असलेल्या भगव्या दिव्यांनी प्रज्वलित करण्यात आले. त्याचबरोबर डच राष्ट्रीय फूल- ट्युलिपने या परिसरात सजावट करण्यात आली. स्थानिक इतिहासकार सिमीन पटेल यांनी शाही दांपत्याला स्मारकाची माहिती दिली.

ताज्या बातम्या

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

0
मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी...

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ‘ब्लॉकचेन प्रणाली’ प्रभावी – बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ...

0
मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

0
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नवी दिल्ली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

0
अहिल्यानगर, दि. ६ : - चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू...

0
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते...