गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1585

विषमुक्त भाजीपाला उत्पादनाला चालना; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्यादृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका येाजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या कीड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे.

फलोत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पद्धतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. तसेच त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे आणि म्हणूनच भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे.

अशी होते लाभार्थ्यांची निवड

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकिची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी. तसेच लाभार्थी निवडताना महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाते तर महिला गट, महिला शेतकरी द्वितीय आणि भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्यक्रम देण्यात येतो. प्रथम प्राधान्याच्या ज्येष्ठतासूचीतील संपूर्ण अर्जावर कार्यवाही झाल्यानंतरच द्वितीय प्राधन्याच्या ज्येष्ठतासूचीनुसार निवड करण्यात येते.

खाजगी रोपवाटीकाधारक, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेमधून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाहीत.

अनुदान

टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा, इत्यादी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटीकेची उभारणी करण्यात येते. रोपवाटीका उभारणीरिता १००० चौरस मीटरच्या शेडनेट गृह, पॉलिटनेलसह साहित्य खर्चाच्या ५० टक्के २ लाख ७७ हजार ५०० रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. योजना प्रकल्प स्वरुपात राबवायची असल्याने शेडनेट गृह, पॉलिटनेल, प्लास्टिक क्रेट व पॉवर नॅपसॅक स्प्रेअर या चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प उभारणीनंतर प्रथम मोका तपासणी करुन अनुज्ञेय अनुदानाच्या ६० टक्के अनुदान प्रथम हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतो. रोपवाटीकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री, उचल झाल्यावर मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत द्वितीय मोका तपासणी करून उर्वरित ४० टक्के अनुदान दुसरा हप्ता लाभार्थाच्या आधार संलग्न बँक खात्यावर वितरीत करण्यात येतो.

रोपवाटीका धारकास बियाणे कायदा १९६६ अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवान्या अभावी कोणताही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही , याबाबत दक्षता घेण्यात येते. भाजीपाला रोपवाटीकेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, तळेगाव- दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, नाशिक, जालना, कृषी महाविद्यालय, नागपूर आणि उद्यान महाविद्यालय, अकोला येथे तीन ते पाच दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करावेत. अर्ज करताना , ७/१२ व ८ अ चे उतारे, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाकरिता संवर्ग प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. पात्र अर्जानुसार प्रवर्गनिहाय ज्येष्ठतासूची तयार करुन संबंधित शेतकऱ्यांना सोडत प्रक्रियेबाबत अवगत करण्यात येते.

संदीप गावित,

उपसंपादक

जिल्हा माहिती अधिकारी, नंदूरबार

विधानसभा लक्षवेधी

लातूर ते नांदेडपर्यंतच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 24 : लातूर – नांदेड ब्रॉडगेज रेल्वे मार्ग हा मराठवाड्यातील प्रमुख शहरे लातूर व नांदेडला रेल्वे मार्गाने थेट जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पाची लांबी 91.3 कि.मी.असून अंदाजे किंमत 3 हजार 12 कोटी एवढी आहे. लातूर ते नांदेड थेट विद्युतीकरणासह नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात विधानसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी आणि हे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावेत या उद्देशाने निवडक रेल्वे प्रकल्पामध्ये प्रकल्प खर्चाच्या 40 ते 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राजेश पवार, प्रशांत बंब, बालाजी कल्याणकर, अनिल देशमुख, देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सदोष माल पुरवठा केल्याबद्दल तक्रार नाही – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 24 : अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी क्रिती इंडस्ट्रीज इंडिया यांच्याविरुद्ध अहमदनगरच्या तक्रार निवारण आयोग आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सदोष मालाचा पुरवठा केल्याबाबत कोणतीही तक्रार केल्याचे आढळून आले नसल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 अंतर्गत राज्यस्तरावर आणि प्रत्येक जिल्हास्तरावर ग्राहक तक्रार निवारण आयोग या अर्धन्यायिक यंत्रणांची ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापना करण्यात आलेली आहे. क्रिती इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीकडून औरंगाबाद जिल्ह्यातील काही ग्राहकांनी पाइप डिलर मार्फत खरेदी केले होते. त्यात काही सदोष आढळले होते. मात्र, सदोष पाईप पुरवठा केल्याबाबतचे कोणतेही पुरावे देऊ न शकल्याने ही तक्रार निकाली काढण्यात आली.

00000

वृक्षतोड परवानगीसंदर्भात संयुक्त बैठक घेणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 24 : वृक्षतोडीची परवानगी संबंधित वृक्ष प्राधिकरण किंवा वृक्ष अधिकारी यांच्याकडून देण्यात येते. याबाबत वन विभाग, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, नगरविकास आणि सिडको यांच्यासोबत एक संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य धनंजय मुंडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षतोडबाबत निर्णय कोणत्या विभागाने घ्यायचा, किती दिवसांत घ्यायचा हे ठरवले जाईल. शासन नियमानुसार काम करत असून कायद्याच्या चौकटीत नियमात बसणारे निर्णय घेण्यात येतील.

वन (संवर्धन) अधिनियम, १९८० कायद्यातील तरतुदी वन जमिनीकरीता लागू होतात. वनेत्तर क्षेत्रातील (नागरी क्षेत्र वगळून) वृक्षांच्या तोडीकरीता अर्जदारास परवानगी देण्यासाठी महाराष्ट्र झाडे तोडणेबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४ आणि महाराष्ट्र जमीन महसूल (झाडे इत्यादी बाबींच्या हक्काचे विनियमन) नियम, १९६७ अन्वये संबंधित क्षेत्राचे वृक्ष अधिकारी तथा वनक्षेत्रपाल हे सक्षम प्राधिकारी आहेत. तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील तरतूदीनुसार निश्चित केलेला वृक्ष अधिकारी यांना नागरी क्षेत्रातील वृक्षतोडीकरीता परवानगी देण्यास प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ च्या कलम २ (एफ) नुसार नागरी क्षेत्रात अशा अधिसूचित क्षेत्राचाही समावेश होतो ज्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ नुसार विशेष नियोजन/ विकास प्राधिकरणाची स्थापना किंवा नियुक्ती केली जाते. ठाणे वनवृत्तांर्गत अलिबाग वन विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा (काही भाग) या तालुक्यांचा समावेश होतो. या वनविभागाच्या कार्यक्षेत्रात मुंबई महानगर विकास प्राधिकरण, (Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA) करीता नियोजन प्राधिकरण असलेले शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (सिडको) तसेच मुंबई द्रुतगती महामार्गाचे दोन कि.मी. परिसराकरिता नियोजन प्राधिकरण म्हणून नेमण्यात आलेले महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांचा समावेश होतो. त्यामुळे अशा क्षेत्रात वृक्ष तोडीस परवानगी देणेबाबत संबंधित वृक्ष प्राधिकरण/ वृक्ष अधिकारी यांच्याकडून निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अलिबाग वन विभागात नागरी क्षेत्रात येणाऱ्या वृक्षतोडीबाबत परवानगीच्या प्रकरणामध्ये संबंधित दोन खातेदारांना महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ नुसार संबंधित वृक्ष प्राधिकरणाकडे / वृक्ष अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याबाबत सूचित करण्यात आलेले असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

0000

अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली आणणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 24 : राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली लवकरच आणणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी विधानसभा सदस्य ॲड. आकाश फुंडकर, डॉ. देवराव होळी, पंकज भोयर यांनीही प्रश्न उपस्थित केले.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. ड्रोनच्या सहाय्याने अवैध दारुची दुकाने कुठे सुरु आहेत याची माहिती घेण्यात येत आहे. याशिवाय वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांची संख्याही 12 वरुन 25 करण्यात आली आहे. नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री इत्यादी बाबत तक्रार करण्यासाठी व्हॉटसअप क्रंमाक आणि टोल फी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शिवाय राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून हा अहोरात्र कार्यरत असतो. येणाऱ्या काळात महसूल, गृह आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची एक समिती करुन स्थानिक पातळीवर सदर समिती अवैध मद्याची वाहतूक रोखणे यासाठी अधिक काम करेल. वर्धा जिल्ह्यातील अनधिकृत मद्य कारखान्यांबाबतची माहिती घेऊन याबाबत कारवाई करण्याचे निर्देश तत्काळ देण्यात येतील.

राज्य उत्पादन शुल्क विभागात वर्ग 3 आणि वर्ग 4 ची भरती टीसीएस कंपनीमार्फत केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथम इतकी मोठी पदभरती केली जात आहे. टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी 290 पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी 114 पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित 176 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

 

मुंबईतील पाणीप्रश्नासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 24 : मुंबई महानगरपालिकेमार्फत सात जलस्त्रोतांमधून ३,८५० द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा होतो. महापालिकेने सर्वांसाठी पाणी हे धोरण अंमलात आणले आहे. मुंबईतील पाणी प्रश्नासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीची लवकरच बैठक घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात विधानसभा सदस्य आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पाणी चोरी रोखण्यासाठी आणि पाणी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत 110 कि.मी. लांबीच्या जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. 96 हजार 400 ठिकाणी गळती अन्वेषण करून दुरुस्ती करण्यात आली असून 9,824 अनधिकृत जलजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. समान पाणी वाटपाबाबतचा अहवाल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून तत्काळ मागवण्यात येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग मुंबईकरांसाठी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल. तसेच टँकर माफिया संबंधी अतिरिक्त उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्या वर्षा गायकवाड, भारती लव्हेकर, मनीषा चौधरी, सदस्य दिलीप लांडे, रवींद्र वायकर, अतुल भातखळकर, सुनील राणे यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

औद्योगिक वसाहतींमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात बैठक घेणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २४ : पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील कुरकुंभ येथे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक  घटकांमुळे प्रदूषण होत आहे. त्यामुळे यावर तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य ॲड. राहुल कुल यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहत असून यामध्ये जल प्रदूषण करणारे एकूण 69 उद्योग आहेत. यापैकी 29 उद्योग हे प्रक्रिया केल्यानंतर त्यांचे सांडपाणी पुढील प्रक्रियेकरिता सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये पाठविण्यात येते. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधून कोणत्याही उद्योगामधून प्रक्रिया केलेले किंवा प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी नदी पात्रात सोडले जात नाही. कुरकुंभ औद्योगिक वसाहतींमधील 2022 मध्ये दोषी आढळून आलेलया 2 उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश आणि 10 उद्योगांना प्रस्तावित निर्देश आणि 2 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.या प्रदूषणामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत चौकशी करण्यात येईल.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

जळगाव महानगरपालिकेच्या मालकीचे गट आजच ताब्यात घेण्याचे निर्देश देणार –  मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४: जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या गट नंबर ७८ आणि ७९ हे आजच ताब्यात घेण्याचे निर्देश संबंधित महानगरपालिका आयुक्तांना देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य छगन भुजबळ यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

श्री. सामंत म्हणाले की, जळगाव जिल्हाधिकारी यांनी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या औद्योगिक ते वाणिज्य प्रयोजनार्थ अभिन्यास संदर्भात महानगरपालिका यांना स्वतंत्ररित्या अभिन्यास रद्द करण्याची यापूर्वीच मौखिक सूचना दिलेली आहे. त्यामुळे आजच्या आज याबाबत संबंधित जागा ताब्यात घेण्याबाबत निर्देश देण्यात येतील. तसेच येत्या महिन्याभरात याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमार्फत कार्यवाही करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाई करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल. सदर समितीमार्फत या विषयाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही ३० दिवसांच्या आत करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य गणपत गायकवाड यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य प्रमोद पाटील, प्राजक्त तनपुरे यांनीही प्रश्न उपस्थित केले.

श्री. सामंत म्हणाले की, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २७ गावांतील २७ बांधकाम परवानगी पत्र तसेच डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागातील ३८ बांधकाम परवानगी पत्र असे एकूण ६५ बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. या सर्व परवानगी पत्रांची पडताळणी करण्यात आली असून सदर बांधकाम परवानगी पत्रे महापालिकेच्या नगररचना विभागाने दिलेली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये २७ बांधकाम परवानगीबाबत तर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये ३८ बांधकाम परवानगीबाबत परवानगी पत्रावरील नमूद विकासक आणि वास्तुविशारद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणात पोलीस विभागामार्फत विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यामार्फत पुढील तपास सुरु आहे. याशिवाय ६५ प्रकरणातील प्रकल्प नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच रेरा कायद्याच्या तरतूदीनुसार संबंधित बँकांना सदर विकासाची बँक खाते गोठविण्याबाबत कळविण्यात आले आहे. आतापर्यंत १४ विकासकांना अटक आणि ४२ आरोपींवर दोषारोप ठेवण्यात आले आहेत.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

अमरावती जिल्ह्यातील रस्ते बांधकामासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. २४: अमरावती जिल्ह्यातील धानोरा गुरव, नांदसावंगी पापळ वाढोणा रस्त्याच्या कामासंदर्भात तक्रारी येत असल्याने याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य प्रताप अडसड यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य ॲड. आकाश फुंडकर यांनीही प्रश्न उपस्थित केले.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, या रस्त्याच्या बांधकामासाठी 19 कोटी 55 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून 19 कोटी 47 लाख 50 हजार रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामासाठी 10 ऑगस्ट 2022 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या कामाच्या निविदेत बॅच मिक्स प्लांट कामाच्या ठिकाणापासून 60 किमीपर्यंत असावा, अशी अट आहे. कंत्राटदाराचा बॅच मिक्स प्लांट 60 किमी च्या आत नसल्यास तो स्थलांतरित करण्यासाठी 25 लाख रुपयांचा एफडीआर जोडावा अशी अट आहे. कंत्राटदाराचा बॅच मिक्स प्लांट निविदा भरतेवेळी पांढरकवडा येथे होता, त्यामुळे कंत्राटदाराने 25 लाख रुपयांचा एफडीआर जोडला होता. हा प्लांट पांढरकवडा येथून दारव्हा येथे 60 किमी मध्ये स्थलांतरित केला आहे. हे काम मानकाप्रमाणे झालेले असले, तरी विधानसभा सदस्यांच्या तक्रारी येत असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

जात प्रमाणपत्रासंदर्भात येत्या १५ दिवसात बैठक घेणार – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २४: विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षणासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक असते. तिल्लोरी कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र वेळेत दिले जाण्याबाबतची सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांना करण्यात येईल आणि येत्या १५ दिवसात याबाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल, असे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य राजन साळवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य शेखर निकम, योगेश सागर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही प्रश्न उपस्थित केले.

श्री. सावे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तिल्लोरी कुणबी समाजातील व्यक्तींकडून ओबीसी प्रवर्गाची जातीच्या दाखल्यासाठी प्राप्त होणारी प्रकरणे सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून स्वीकारण्याची कार्यवाही गेल्या २ महिन्यांपासून सुरु आहे. येत्या १५ दिवसांमध्ये उर्वरित कुणबी -८३ जातीचे दाखले देण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात येईल.कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

तिल्लोरी कुणबी समाजाच्या संघटनेने राज्य मागासवर्ग आयोगाकडे इतर मागास वर्गाच्या यादीत समावेश होण्याबाबत लेखी विनंती केली आहे. या मागणीनुसार २३ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी येथे आणि १० मार्च २०२३ रोजी पुणे येथे राज्य मागासवर्ग आयोगाने समाज संघटनेसोबत सुनावणी घेतली आहे. आयोगाने संघटनेस पुरावे आणि इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतर राज्य शासनाकडून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

 

आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची स्थापना करणार – डॉ. विजयकुमार गावित

मुंबई, दि. 24 : आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात विधानसभा सदस्य भिमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. गावित म्हणाले की, गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीकरिता नागपूर येथील सुराबर्डी येथे पंधरा एकर जागा उपलब्ध करण्यात आली आहे. या जागेमध्ये आदिवासींचे जीवन व कला संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचे जागतिक दर्जाचे गोंडवान आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती ही अति प्राचीन असून या संस्कृतीला वेगवेगळ्या रूढी परंपरा लाभल्या आहेत या आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी वेगवेगळे उपाय शासनामार्फत केले जात आहेत.

राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विविध संस्कृती, वेशभूषा, अलंकार स्वतंत्र मांडणी करून त्याची जातनिहाय स्वतंत्र दालने उभारुन जागतिक पातळीचे भव्य संग्रहालय तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. गावित यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य आशिष जैस्वाल, सुनील राणे, हिरामण खोसकर,प्राजक्त तनपुरे यांनी सहभाग घेतला होता.

00000

अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि.२४ : राज्यातील शहरांमध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामाची तक्रार केलेल्या व्यक्तीचे नाव हे कायमस्वरूपी गुप्त ठेवले पाहिजे असे निर्देश महानगरपालिकेला दिले जातील  असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात विधानसभा सदस्य समाधान अवताडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री सामंत म्हणाले, मुंबईतील अनाधिकृत बांधकामाबाबत मुंबई शहर व उपनगराचे पालकमंत्री विस्तारित लवकरच बैठक आयोजित करतील. ड्रोन आणि सँटेलाईटद्वारे नजर ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. संगणकाद्वारे आलेल्या काही तक्रारी येत आहेत. यापुढे त्या एका वार्डमध्ये जरी आल्या किंवा बाकीच्या शहराच्या तक्रारी आल्या तर त्याच्यावर कार्यवाही करण्याची यंत्रणा देखील तयार करावी अशा सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, योगेश सागर यांनी सहभाग घेतला होता.

0000

पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणास विलंब करणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 24 : पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणास विलंब करणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून नोटीसाचे उत्तर आल्यानंतर कराराच्या अटी व शर्तीप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, पनवेल बस आगाराच्या नुतनीकरणास काही काळ कोरोनामुळे विलंब झाला आहे. हे काम ज्या कंपनीला देण्यात आले आहे, त्या कंपनीची बाजू ऐकून घेवून जर कारण योग्य असेल तर त्या कंपनीस काम तत्काळ सुरू करण्यास सांगितले जाईल. जर कारण योग्य नसेल तर त्यांना देण्यात आलेले काम रद्द करण्यात येईल आणि नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सांगून प्रवाशांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भातील चर्चेत विधानसभा सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी सहभाग घेतला होता.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

तृणधान्यांचे एकच महत्त्व, मिळतील भरपूर जीवनसत्त्वं

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. मानवी आरोग्यवर्धनात पौष्टिक तृणधान्यांची भूमिका महत्त्वाची असून, तृणधान्य पिकांतील पोषणमूल्ये त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमाणसांत पोहोचण्याची आवश्यकता आहे. याचा वेध घेणारा हा लेख

भारत हा तृणधान्य पिकवणारा जगातील एक प्रमुख देश आहे. भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पौष्टिक तृणधान्य सेवनाला पूर्वापार महत्त्व आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी व शारीरिक तंदुरूस्तीसाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे काळाची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष या संकल्पनेंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांचे पोषण मूल्य व आरोग्य विषयक फायद्यांबाबत जनजागृती करून मानवी आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हा प्रमुख हेतू आहे. तसेच, तृणधान्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढ, निर्यातवृद्धी, नव उद्योगातून व्यावसायिक दृष्टिकोन वाढविणे, प्रचार प्रसिद्धीतून जनजागृती निर्माण करणे, धोरणात्मक निर्णयातून अंमलबजावणी, मूल्यवर्धन, प्रक्रिया व पाककृती विकास यावर भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीने कृषि विभाग व संलग्न विभागांच्या समन्वयाने या वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या अनुषंगाने ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा या तृणधान्यांचे आरोग्याच्या दृष्टीने  महत्त्व जाणून घेऊया.

ज्वारीज्वारीमध्ये भातापेक्षा जास्त पोषक तत्वे असून ती तंतुमय पदार्थांनी युक्त असते. तसेच तिच्यामध्ये  थायमिन, रायबोफ्लेवीन, फोलिक अॅसिड, कॅल्शियम असते, ती लोह, झिंक, सोडियम, फॉस्फरस व बिटा कॅरोटीन यांनी समृद्ध आहे. ज्वारी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते व रक्ताभिसरण वाढवते. हाडांच्या आरोग्यासाठी चांगली असून, तिच्या सेवनाने शरीरातील ऊर्जा पातळी व हृदयाचे आरोग्य सुधारते.

बाजरीबाजरीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, बी, आणि फॉस्फरस अधिक मात्रेत उपलब्ध असते. शिवाय, लोह, फोलेट व मँगेनिज यांची उपलब्धता अधिक असून, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते.

नाचणी नाचणीमध्ये प्रथिने, व्हिटामिन ए, फॉस्फरस, अॅमिनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते. तसेच, कॅल्शियमची उपलब्धताही अधिक प्रमाणात असते.

वरई (भगर) – वरई ही ग्लुटेनमुक्त असून, मँगेनिजने समृद्ध असते. हृदय विकार प्रतिबंधाकरिता उपयुक्त असते. वरई रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित करते. स्तनांच्या कर्क रोगावर गुणकारी असते. ग्लुटेनमुक्त असल्याने सेलिक आजारावर गुणकारी असते.

राळा राळा हे धान्य कॅल्शियम, तंतुमय पदार्थ व तांबे मुलद्रव्याने भरपूर असून रक्तातील साखर व मेद नियंत्रित करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पचन संस्थेच्या विकारावर परिणामकारक असते.  नॉन अॅलर्जिक व पचनास हलके असते.

राजगिरा राजगिरा हा प्रथिनांचा चांगला स्त्रोत असून, त्यामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक ही मुलद्रव्ये भरपूर असतात. त्वचा व केसांच्या आरोग्यास उपयुक्त आहे. पचनसंस्था सुदृढ बनविते. स्नायूंच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त असते.

कोडो/ कोद्रा – लेसिथिन, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक यांनी समृद्ध असते. ते ग्लुटेनमुक्त असून, मज्जा संस्था मजबुतीस उपयुक्त असून पचनास हलके असते.

सावासावा हे धान्य लीनोलिक, पाल्मिटिक, ओलिक अॅसिडचा उत्तम स्रोत असून, रक्तदाब व मधुमेहावर गुणकारी आहे. तसेच, ते आतड्यांच्या आजारावर परिणामकारक असते.

(संकलनजिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर)

विधानपरिषद कामकाज

संसर्गजन्य साथ आजाराच्या उपचारांसाठी नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 24 : मुंबई शहरात संसर्गजन्य साथीच्या आजारावरील उपचारासाठी सध्या कस्तुरबा रुग्णालय उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधान परिषदेत सदस्य विलास पोतनीस यांनी अर्धातास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ज्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा अभाव आहे, तिथे आरोग्य सुविधा देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयासारखेच आणखी एका रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. जिथे जागा उपलब्ध असेल त्यापैकी योग्य जागेचा पर्याय शोधला जाईल.

या चर्चेत सदस्य सुनील शिंदे, सचिन अहिर, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीतील १२३ कुटुंबाचे शिवशाही योजनेअंतर्गत पुनर्वसन करणार उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 24 : चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीमधील १२३ कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार असून शिवशाही योजनेतंर्गत रिक्त असलेली घरे या कुटुंबांना उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

टाटानगर इमारत वसाहतीची तत्काळ देखभाल, दुरुस्ती बाबत कार्यवाही व उपाययोजना बाबत म. वि. प.नियम ९२ अन्वये विधान परिषद सदस्य सचिन अहीर यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित केली होती.

उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीमधील १२३ कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानुसार शिवशाही योजनेमध्ये उपलब्ध असलेली घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चुनाभट्टी येथील टाटानगर वसाहतीच्या विकासासाठी महानगरपालिकेचा अथवा इतर कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही. मुंबई महापालिकेतंर्गत उपकर प्राप्त इमारतींच्या प्रश्नाबाबत मुंबईतील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत म्हणाले.

या चर्चेत विधानपरिषद सर्वश्री सदस्य सुनील शिंदे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

******

संरक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : संरक्षण खात्याशी संबंधित राज्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत राज्यातील कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री यांची भेट घेऊन या प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधानपरिषदेत सदस्य उमा खपरे यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, संरक्षण विभागाने अनेक ठिकाणी संरक्षित ना – विकास क्षेत्र (रेड झोन) जाहीर केले आहेत. त्यामुळे त्या भागातील विकास योजना राबविताना अडचणी जाणवतात. देहू रोड ( जि. पुणे) येथील दारूगोळा कारखान्याच्या या रेड झोन मुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे या विषयावरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्याबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच बैठक घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

या चर्चेत सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

0000

वर्षा आंधळे/विसंअ

 

मुंबईतील पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २४ : मुंबई शहराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी पाणी गळती रोखण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. आतापर्यंत ३ वर्षात ९ हजार २८४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, तर ९६ हजार ४७० ठिकाणची पाणी गळती दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य राजहंस सिंह यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबई शहराला सध्या तानसा, मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय, गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या काळात शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या तीनही प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चेत विलास पोतनीस, महादेव जानकर, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.

0000

सूरजागड येथील लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २४ : सूरजागड, जि. गडचिरोली येथे सुरू असलेल्या लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिक लोकांना प्राधान्याने रोजगार दिला जात आहे, असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. विधानपरिषदेत म. वि. प.नियम ९२ अन्वये झालेल्या चर्चेवर उत्तर देताना ते बोलत होते.

सूरजागड येथे गेले काही वर्षापासून लोह उत्खनन प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामध्ये अवैध उत्खनन सुरू आहे. तसेच स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही. ज्या कंपनीद्वारे येथे उत्खनन होत आहे, तिथे संगणक प्रणालीद्वारे डॅशबोर्ड तयार करणे, जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने उत्खननाचे कार्य  वैधरित्या केले जावे, अशी चर्चा म. वि. प.नियम ९२ अन्वये सदस्य अभिजित वंजारी यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर उपस्थित केली होती.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, सुरजागड – एटापल्ली येथे 1993 पासून लोहखनिज उत्खनन केले जाते. मेसर्स लाईट मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीला २००७ मध्ये काम देण्यात आलेले आहे. लोहखनिज उत्खनन ज्या कंपनीद्वारे सुरू आहे, त्यांच्या पाच वर्षे कामांची रूपरेषा ठरलेली आहे. 2008 -2009 ते 2020-21 मध्ये 4 लाख 49 हजार 463 टन इतके लोह उत्खनन करण्यात आले आहे, तर 2021,22 आणि 23 या वर्षात 57 लाख 59 हजार 528 टन इतके लोह खनिज उत्खनन करण्यात आले आहे. या खाणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जात आहे. 3209 लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.

घुगुसाच्या खाणीत 900 टन दर दिवसाला उत्खनन होते. तिथे 1 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. या प्रकल्पाची क्षमता वाढवून  1300 टन रोज उत्खनन होईल. या ठिकाणी दोन हजार रोजगार वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. घोणसरी प्रकल्प एप्रिल-मे महिन्यामध्ये कार्यान्वित होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1500 लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या ठिकाणी सुरू असलेल्या खाणीमध्ये 50 टक्के स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने कार्यवाही केली आहे. शासनाला या खाणी मधून स्वामीत्वधन पोटी (रॉयल्टी पोटी) 390.10 लाख रुपये मिळाले आहेत. डी. एम. एम. फंडा साठी 107.50 कोटी  निधी प्राप्त झाला आहे. एन मेट या फंडासाठी 6.42 कोटी मिळाले आहेत. सी एस आर मधून 6.25 कोटींची कामे करण्यात आलेली आहेत. या खाण प्रकल्पामध्ये कोणत्या प्रकारच्या त्रुटी असतील, तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असेही  मंत्री श्री. भुसे म्हणाले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

सैन्य दलातील तीन पदक विजेत्यांना राज्य शासनातर्फे अनुदान मंजूर

मुंबई, दि. 24 :- महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदकधारकांना राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते.

राष्ट्रपती सचिवालयाच्या आदेशाप्रमाणे मुंबई उपनगर येथील एअर कमोडोर देवेंद्र पुरुषोत्तम हिराणी यांना दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी शौर्यासाठी युद्ध सेवापदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे श्री.हिराणी यांना 24 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे श्री.हिराणी यांना दिनांक 26 जानेवारी 2015 विशिष्ट सेवापदक प्रदान करण्यात आले होते. त्याकरिता श्री.हिराणी यांना रूपये 34 हजार अनुदान देण्यात येणार आहे.

मुंबई उपनगर येथील  मेजर अनुज वीर सिंह यांना दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी शौर्यासाठी सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार श्री.सिंह यांना 12 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गडचिरोली येथील मेजर अक्षय प्रकाशराव पोतराजे यांना दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी मेन्शन इन डिस्पॅच हे शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार श्री.पोतराजे यांना 6 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपरोक्त तिन्ही पदक धारकांच्या अनुसाठीची 50 टक्के रक्कम शासकीय अनुदानातून तर उर्वरित 50 टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयीकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयाद्वारे कळविले आहे.

000

संजय ओरके/विसंअ

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या 11 वर्षे मुदतीच्या एकूण 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

या कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मान्यता घेण्यात आली असून या शासकीय रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 28 मार्च, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बीडस् दिनांक 28 मार्च, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 29 मार्च, 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून दिनांक 29 मार्च, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी 11 वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 29 मार्च, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 29 मार्च, 2034 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 29 सप्टेंबर व 29 मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 23 मार्च, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे नऊ वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या नऊ वर्षे मुदतीच्या एकूण 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

या कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मान्यता घेण्यात आली असून या शासकीय रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 28 मार्च, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बीडस् दिनांक 28 मार्च, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 29 मार्च, 2023 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बीडर्सकडून दिनांक 29 मार्च, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी नऊ वर्षांचा असेल.

रोख्यांचा कालावधी 29 मार्च, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 29 मार्च, 2032 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 29 सप्टेंबर व 29 मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 23 मार्च, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

००००

न्यूज १८ लोकमतच्या विविध क्षेत्रातील ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कारांचे वितरण; जीवन गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान

मुंबई, दि. 23 : न्यूज 18 लोकमत वृत्त वहिनीच्यावतीने विविध क्षेत्रातील नामवंताना महाराष्ट्र गौरव आणि जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडला. सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ व अध्यात्मिक गुरू तथा जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामन पै यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सोहळ्याला व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, टिव्ही 18 चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौल उपस्थित होते.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हिंदी चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन सुपरस्टार आहेत. त्याप्रमाणेच मराठी चित्रपटांचे अशोक सराफ सुपरस्टार आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिका अजूनही जिवंत आहेत. त्यांच्या कार्याचा हा सत्कार आहे. त्यांचे मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान आहे. प्रल्हाद  पै यांचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. त्यांनी सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. समाजात अनेक व्यक्तिमत्व समाजाच्या कल्याणासाठी झटत असतात. मात्र त्यांचे कार्य समाजासमोर येत नाही.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, न्यूज 18 लोकमत वृत्तवाहिनीने महाराष्ट्र गौरव पुरस्काराच्या माध्यमातून अशी रत्ने शोधून समोर आणली.  अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे महत्त्वाचे कार्य केले.

विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले, ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याला व्यासपीठावर सहभागी होता आले. हे माझे भाग्य समजतो. पुरस्कार प्राप्त सर्वांचे कार्य प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते न्यूज १८ लोकमत वृत्त वहिनीच्या महाराष्ट्र गौरव विशेष पुरस्कार गायिका आर्या आंबेकर, अभिनेत्री अमृता खानविलकर, आशिष पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओक व्यासपीठावर उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/ससं/

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’…

विशेष लेख

गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात 2021 रोजीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मविभषण आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंत 19 जणांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.. तर मग जाणून घेऊया कोण आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्र भूषण’..

महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची ओळख आहे. महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्यास असलेल्या आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वोच्च बहुमान दिला जातो. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या  क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते.  10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप होते. आता या पुरस्काराची रक्कम वाढविण्यात आली असून पुरस्कार रक्कम 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

  1. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु.ल.देशपांडे

साहित्यक्षेत्रातील भरीव योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने 1997 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. मराठी लेखक, नाटककार, नट, कथा आणि पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना अवघा महाराष्ट्र पु.ल.देशपांडे म्हणूनच ओळखतो.

  1. लता दीनानाथ मंगेशकर

आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दीदी आणि भारतीय चित्रपट संगीताला अतिशय वरच्या दर्जावर नेण्याचं काम लता मंगेशकर यांच्या असामान्य आवाजाने केले. म्हणूनच भारतीय चित्रपट संगीतात लता मंगेशकर यांचे स्थान अजोड आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन 1998 मध्ये लता दीनानाथ मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दैऊन गौरव केला. केंद्र सरकारनेही 2001 साली लता मंगेशकर यांचा भारतरत्न देऊन सन्मान केला आहे.

  1. डॉ.विजय पांडुरंग भटकर

परम महासंगणकाचे जनक अशी ओळख असलेले डॉ. विजय पांडुरंग भटकर हे महाराष्ट्रातील मुरंबा या गावचे.  डॉ. विजय भटकर यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळविली. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्वल त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान 2000 मध्ये प्रदान करण्यात आला आहे. तत्पूर्वी सन 1999 मध्ये विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी “महाराष्ट्र भूषण“ हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मानाही डॉ.भटकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

  1. सुनील मनोहर गावस्कर

सुनील मनोहर गावसकर यांना आपण ओळखतो ते भारताचा महान क्रिकेटर म्हणून.   फलंदाजीतल्या तंत्रशुद्धतेचा अंतिम शब्द म्हणजे सुनील गावसकर, एकाग्रतेचा महामेरू म्हणजे सुनील गावसकर. कसोटी सामन्यांच्या रणांगणात दहा हजार रन्सचा पल्ला ओलांडणारा पहिला फलंदाज. सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम जवळजवळ वीस वर्षे मिरवणारा फलंदाज. सन 2000 मध्ये सुनील गावस्कर यांना त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  1. सचिन रमेश तेंडुलकर

गेली जवळपास अडीच दशके भारतासह जगातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांना आपल्या खेळाने परमानंद देणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा सन 2001 चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला. 2014 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

  1. पं.भीमसेन गुरुराज जोशी

लहानपणापासूनच संगीताचा ओढा असलेल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना महाराष्ट्र शासनाने सन 2002 मध्ये संगीत क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला. 60 वर्षाहून अधिक काळ संगीतात योगदान देणाऱ्या पंडितजींनी त्यांच्या गुरुजींच्या नावाने सवाई गंधर्व महोत्सव सुरु केला.  आज राज्य शासन पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने संगीत शिष्यवृत्ती देते.पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने 2008 मध्ये गौरविण्यात आले आहे.

  1. डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.अभय बंग आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. समाजप्रबोधन या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देण्यासाठी 2003 साली या दाम्पत्याला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. गडचिरोलीसारख्या मागास भागात जाऊन तेथील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या या डॉक्टर्सनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्सना घ्यावी लागली आहे.डॉ. अभय आणि राणी बंग यांचं काम एखाद्या रुग्णालयापुरतं सीमित न राहता, खेड्यापाड्यांत, देशा-परदेशात उपयुक्त ठरत आहे यातच त्यांच्या कामाचे यश आहे.

  1. डॉ.मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटे

मुरलीधर देवीदास आमटे यांना त्यांच्या घरातच त्यांना लहानपणी बाबा म्हटले जायचे आणि एका क्षणी कुष्ठरोग्यांसाठी जीवन वेचण्याचा निर्णय घेऊन हा मुरलीधर लाखो कुष्ठरोग्यांना आपलासा वाटणारा ‘बाबा’ झाला. अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे बाबा सदैव आपल्या कर्तव्य पथावर एका कर्मवीर योद्ध्याप्रमाणे अथक लढले. कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत अंगीकारले. 2004 साली महाराष्ट्र शासनाने समाज प्रबोधनासाठी डॉ. मुरलीधर आमटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला.

  1. डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर

अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अत्युच्च पदे डॉ. माशेलकरांनी यशस्वीपणे भूषविली आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ.रघुनाथ माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य केले आहे. 2005 मध्ये विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. माशेलकर यांना महाराष्ट्रभूषण देऊन त्यांचा सन्मान केला.

  1. रतन टाटा

राज्याच्या विकासात टाटा समूहाचे मोठे योगदान आहे. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटा यांना उदयोग क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने 2006 साली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.

  1. रामराव कृष्णराव ऊर्फ रा.कृ.पाटील

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते. तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेल्या पहिल्या प्लॅनिंग कमिशनचे श्री. पाटील सदस्य होते. ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांनी स्वतःला सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन समाजसेवेला वाहून घेतले होते. त्यांचे वयाच्या 99व्या वर्षी, 31 मे, 2007 रोजी निधन झाले. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर 2007 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

  1. नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी

नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. समाजप्रबोधनासाठी 2008 साली महाराष्ट्र शासनातर्फे श्री. धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  1. मंगेश केशव पाडगावकर

मंगेश केशव पाडगांवकर  यांना 2008 साली महाराष्ट्र शासनाने साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबददल महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता खूप गाजली. साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले.

14.सुलोचना लाटकर

मराठी-हिंदी सिनेमांतून सोज्वळ भूमिका रंगवणा-या अभिनेत्री सुलोचना यांचा चेहरा आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. पासष्टहून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत कलाकार-दिग्दर्शक-तंत्रज्ञांच्या अनेक पिढय़ांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी चित्रपटात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सुलोचना लाटकर यांना 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला.

15.डॉ.जयंत विष्णू नारळीकर

जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठा’ हे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे  ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक अशी डॉ. जयंत नारळीकर यांची ओळख आहे. विज्ञानातील सिद्धांत आपल्या लेखणीतून, व्याख्यानातून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. मराठी विज्ञानकथेचे ते प्रणेते आहेत. 2010 मध्ये विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.

  1. डॉ.अनिल पुरुषोत्तम काकोडकर

बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणाऱ्या डॉ. अनिल काकोडकर यांना भारताच्या अणु-कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार मानले जाते. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे दहा वर्षांहून अधिक काळ डॉ. काकोडकर अध्यक्ष होते. 2011 मध्ये डॉ. काकोडकर यांना विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला.

  1. बाबासाहेब पुरंदरे

बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन केले आहे.  पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य आहे. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्यांपुढे ‘जाणता राजा’च्या माध्यमातून नेण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आहे.2015 मध्ये साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

  1. आशा भोसले

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी आणि गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांना संगीत आणि नाटकाचा वारसा लाभला.  बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखले जाते. आशाताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली असून आतापर्यंत त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत.सन 2021 या वर्षीचा पुरस्कार श्रीमती आशा भोसले यांना जाहीर झाला असून 24 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  1. आप्पासाहेब धर्माधिकारी

आप्पासाहेब धर्माधिकारी, जन्मनाव दत्तात्रेय नारायण, हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास कारणीभूत ठरले. 2014 मध्ये डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. 2017 मध्ये, ते चौथा, पद्मश्रीने सन्मानित झाले. सन 2022 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला आहे.

 

  • वर्षा फडके– आंधळे, विभागीय संपर्क अधिकारी (सांस्कृतिक कार्य)

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान; साहित्यिक, लेखक पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. २३ : हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिक आणि उत्कृष्ट वाड्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे तीन वर्षांचे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.

बांद्रा येथील रंगशारदा नाट्यमंदिरात आयोजित हा पुरस्कार प्रदान सोहळा आमदार आशिष शेलार, आमदार राजहंस सिंह, अभिनेता आशुतोष राणा, मनोज जोशी यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखकांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

यावेळी सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ या तीन वर्षातील विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारांतर्गत महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार डॅा. विकास दवे, चित्रा मुद्गल, डॉ. कन्हैया सिंह यांना तर डॉ. राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार डॉ. अनिल मिश्र, आशुतोष राणा, सुधीर पराडकर यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासह विविध प्रकारातील पुरस्कार प्रदान करून पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आले.

०००

पवन राठोड/ससं/

ताज्या बातम्या

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी मिळून लोकाभिमुख कामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याचे निर्देश शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमात वर्धा प्रथम येईल यासाठी प्रयत्न करा वर्धा, दि.२१ (जिमाका) : वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व...

जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाय योजनांबाबत बैठक

0
मुंबई, दि. २१ : अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरीफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेने...

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ – सांस्कृतिक...

0
मुंबई, दि. २१ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच...

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

0
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड रिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप २०२५, रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली...

पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत...

0
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई दि. २१ :- राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD)...