शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 1068

भिक्षेकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगरच्या धर्तीवर प्रकल्प उभारणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबईदि. 30 : भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे,  या प्रकल्पाच्या धर्तीवर  राज्यात  अन्यत्र प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी यासाठी विभागाने पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयात महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळअहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या  भिक्षेकरी पुर्नवसन प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे  सचिव डॉ.अनुपकुमार यादवमहिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीभिक्षेकरी समाज बांधवांना सन्मानाने  जगता यावेकष्टाची भाकरी मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे विविध विभागांच्या सहकार्याने सुरू असलेला हा प्रकल्पशाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राज्यात इतर ठिकाणी देखील भिक्षेकरी गृह आहेत. त्या भागाचाही विकास होण्याकरिता महिला व बालविकास विभागाने सर्वसमावेशक अभ्यास करावा आणि नव्याने काही भागांचा देखील यामध्ये समावेश करता येईल का याबाबत पाहणी करून प्रस्ताव सादर करावाअसे निर्देशही मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

000

संध्या गरवारे/विसंअ/

उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबईदि. 30 – महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांशी परस्पर समन्वय वाढण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेतस्टार्ट अप आणि नवोपक्रम सुरु करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावेगुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ उपक्रम अधिक व्यापकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवावाअसे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्योग विभागाला दिले. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला नागपूर येथे महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे आणि त्यात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात करत असलेल्या प्रगतीचा आढावा प्रदर्शनाच्या माध्यमातून घ्यावाअशा सूचनाही त्यांनी आज केल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवनात भारत आणि विविध देशांतील व्यापार-उद्योगास चालना देण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्माग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशीमहाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजपुणे चे सदस्य डॉ. विजय मालापुरेश्री. सागर नागरे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योग विकास आयुक्त श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या बैठकीत उद्योगाशी निगडित असणाऱ्या उद्योजकांच्या विविध संस्था व उद्योग विभागांमध्ये समन्वय साधून व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावाया अनुषंगाने चर्चा झाली. यापूर्वी महाराष्ट्र आणि विविध देश यांच्यात झालेले सामंजस्य करारसद्यस्थिती याबाबतही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आढावा घेतला. आफ्रिकेत व्यवसायसंबंधी काय काम करता येईल. महिला उद्योजकांना उद्योग सुरु करण्याच्या अनुषंगाने अधिक सुलभता देणेत्याअनुषंगाने धोरण राबविणेपरदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुविधाविविध विद्यापीठे आणि शासकीय विभाग यांच्यामध्ये आदानप्रदान वाढवून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशीप प्रोग्राम राबविणे आवश्यक असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्यातील पर्यटनवाढीच्या संधी लक्षात घेऊनही काम व्हायला हवे. उद्योजकांच्या संघटना आणि राज्य शासन यांनी यासंदर्भातील कार्यक्रम हाती घेऊन त्यासंदर्भातील  कामाला गती द्यावी. महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये शासनाच्या विभागामार्फत कार्यशाळा आयोजित केली जावी. महिला उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नागपूर येथे अधिवेशन काळात परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

प्रधान सचिव डॉ. कांबळे म्हणाले कीराज्याचे स्वत:चे उद्योग धोरण आहे. अधिकाधिक गुंतवणूक राज्यात यावी यासाठी विविध माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. या प्रक्रियेत येथील उद्योजक संघटनांचे तसेच जगभरातील महाराष्ट्र मंडळ आणि तेथील स्थानिक महाराष्ट्रीयन मंडळींचे सहकार्य निश्चितपणे महत्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

तैवानजपान यांसह दक्षिण आशियाई देशांसोबत दर 15 दिवसांनी आढावा बैठक होत असतात. व्यवसाय संबंधित विविध परिषदांमध्ये उद्योग विभाग नेहमीच सहभाग घेत आलेला आहे. राज्याच्या विभागनिहाय उद्योगाची रणनीती ठरविण्यात आली आहे. लवकरच मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. जोशी यांनी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तर डॉ. विजय मालापुरे यांनी राज्यातील उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी आणि उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य असेलअसे सांगितले. 

000

दीपक चव्हाण/विसंअ/

राजधानीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा

नवी दिल्ली, दि. ३० : महाराष्ट्र सदन येथे  आज ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. या  यानिमित्त भ्रष्टाचारविरूद्ध लढा देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

            राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात येतो. यावर्षी 30 ऑक्टोबर ते  5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा : राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’ ही संकल्पना घेऊन हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.

            याअंतर्गत कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारविरूद्ध लढा देण्याची प्रतिज्ञा दिली. सोबतच ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (प्र.) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

०००

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • मा.न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन.

मुंबई, दि. ३०: मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त न्यायमूर्ती श्री.भोसले, श्री.गायकवाड आणि श्री.शिंदे यांची समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि ते न्यायालयात टिकण्यासंदर्भात मार्गदर्शन करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीचा अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाईल.

न्या. शिंदे समितीने आतापर्यंत १ कोटी ७३ लाख ७० हजार ६५९ नोंदी तपासल्या असून ११ हजार ५३० कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्यातल्या जुन्या नोंदी तपासताना उर्दू आणि मोडी भाषेतील कागदपत्रांचे मराठी भाषांतर करून घेण्याचे काम सुरू आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्यास संमती दिल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचे काम सुद्धा अधिक गतीने सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी स्थापन केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या टास्क फोर्सची बैठकसुद्धा लवकरच घेण्यात येईल. मात्र, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळताना जी निरीक्षणे नोंदविली तिचा अभ्यास मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती श्री. निरगुडे करतील.

मराठा आरक्षणावरून राज्यात जी काही आंदोलने व उपोषणे सुरू आहेत त्याकडे आम्ही अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. सरकारला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे, कायद्याला, नियमाला धरून आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे यासाठी सर्व बाजूंचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल. हे आरक्षण देत असताना इतर घटकांवर अन्याय होणार नाही. यापूर्वी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही, असे पुन्हा घडू नये यासाठी काळजीपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. यामुळे आंदोलकांनी देखील सरकारची भूमिका समजून घेत सहकार्य करावे. मराठा समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, पाणी प्यावे. आंदोलकांनी शांततेचा मार्ग सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

०००

कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीसाठीचे १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी, सिंचनासाठी आरक्षित करण्याचा ठराव – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे  

– सांगली, सोलापूर जिल्ह्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

– वेळेत समन्यायी पाणीवाटप, वंचित तालुक्यांच्या ट्रिगर २ मध्ये समावेशाचाही ठराव

– आठवडाभरात राज्यस्तरीय बैठक होणार

 

        सांगलीदि. 29, (जि. मा. का.) संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थिती लक्षात घेता, कोयना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातील वीजनिर्मितीच्या ३५ टीएमसीपैकी १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे, तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण कायद्यामधील तरतुदीनुसार नदीखोऱ्यातील समन्यायी पाणीवाटपाच्या तरतुदीनुसार सांगली व सोलापूर जिल्ह्याला वेळेत समन्यायी पाणीवाटप व्हावे तसेच वगळलेल्या तालुक्यांचा ट्रिगर २ मध्ये समावेश करण्यासाठी तोडगा काढावा, या ठरावांसह याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी राज्य स्तरावर उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सांगली व सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आठवडाभरात बैठक घ्यावी, असा ठराव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज येथे करण्यात आला. तसेच या बैठकीत शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक यंत्र सामग्री, ट्रान्सफॉर्मरसाठी महावितरण कंपनीस अतिरीक्त निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

            कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार सर्वश्री गोपीचंद पडळकर, अरूण लाड, अनिल बाबर, विश्वजीत कदम, विक्रमसिंह सावंत, शहाजी पाटील, समाधान आवताडे, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, माजी आमदार प्रशांत परिचारक व दीपक साळुंखे पाटील, विशाल पाटील, शिवानंद पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.

            टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांच्या रब्बी व उन्हाळी हंगाम सन २०२३ – २४ साठी सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी कालवा सल्लागार समितीची ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे वार्षिक पाणी नियोजन करण्यात आले. तसेच, मागील हंगामाच्या पीआयपी अनुपालनांचा आढावा आणि चालू हंगामातील पाण्याच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली.

            कोयना धरणाचा दि. १५ ऑक्टोबर रोजीचा पाणीसाठा लक्षात घेता, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी पाणीवापराचे एकत्रित धोरण निश्चित करण्यात येते. यामध्ये तूट, आगामी वर्षातील टंचाईसदृष्य परिस्थिती लक्षात घेऊन पाणीवापराचे नियोजन करण्यात येत असल्याचे सी. एच. पाटोळे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी केलेल्या सादरीकरणात सांगली जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणीसाठे, टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांची माहिती, प्रकल्पनिहाय मंजूर पाणीवापर, प्रकल्पीय सिंचन क्षेत्र/सिंचन क्षमता, सन २०२२-२३ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, खरीप/टंचाई आवर्तन २०२३-२४ मध्ये तालुकानिहाय देण्यात आलेले पाणी, सन २०२३-२४ मधील रब्बी हंगाम/उन्हाळी हंगाम साठी प्रस्तावित पाणीवापर, रब्बी व उन्हाळी आवर्तन नियोजन, सिंचन योजना आकारणी, वसुली व थकबाकी, वीजदेयक या बाबींचा आढावा घेण्यात आला.

पाणीवापराचे नियोजन

            सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गतवर्षी याच कालावधीत ८८ टक्के होता. सद्यस्थितीत कोयना धरणामध्ये ८९.०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. टेंभू, ताकारी – म्हैसाळ योजना, नदीवरील सिंचन व बिगर सिंचन योजना याकरिता कोयना, वारणा धरण व इतर स्त्रोतातून एकूण उपलब्ध होणारे ४७.०५ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे. याअंतर्गत टेंभू योजनेचा नियोजित पाणी वापर 11.55 टीएमसी आहे. यामध्ये कोयना धरण 8.91 टीएमसी तर इतर स्त्रोतापासून 2.64 टीएमसी (वांग 0.97 + तारळी 1.67 टीएमसी) तसेच ताकारी योजनेचा कोयना धरणातून 4.70 टीएमसी नियोजित पाणीवापर आहे. म्हैसाळ योजना 12.80 टीएमसी नियोजित पाणीवापर आहे. यामध्ये कोयना धरणातून 3.80 टीएमसी व वारणा धरणातून 8.58 टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे. कृष्णा नदीचा नियोजित पाणीवापर 18 टीएमसी असून, यामध्ये कोयना धरणातून 14.59 टीएमसी, वारणा धरणातून 3 टीएमसी व पुनर्भरण 0.41 टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे. यामध्ये कोयना धरणातून 32 टीएमसी, वारणा धरणातून 11.58 टीएमसी, इतर स्त्रोत 2.64 टीएमसी व पुनर्भरण 0.41 टीएमसी आहे.

            त्याशिवाय, टेंभू योजनेतून 2 टीएमसी, ताकारी योजनेतून 0.90 टीएमसी, म्हैसाळ योजनेतून 3 टीएमसी, कृष्णा नदी 3 टीएमसी अशी एकूण 8.90 टीएमसी अतिरीक्त पाणी मागणी आहे. कोयना धरणाच्या वार्षिक पाणी वापरातील ११.७१ टीएमसी अपेक्षित तूट आहे.

ताकारी – म्हैसाळ – टेंभू उपसा सिंचन योजनांचे आगामी नियोजन

            ताकारी योजनेंतर्गत रब्बी हंगामासाठी २ आणि उन्हाळी २ अशी चार आवर्तने देण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. सन २०२३-२४ अंतर्गत खरीप (टंचाई) साठी एक आवर्तन दि. २३ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत याआधीच देण्यात आले आहे. तर दि. १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ आणि दि. १० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रब्बीची दोन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच, दि. १५ मार्च ते २५ एप्रिल २०२४ आणि दि. १५ मे ते १५ जून २०२४ या कालावधीत दोन उन्हाळी आवर्तने देण्याचे निश्चित करण्यात आले.

 तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून सन २०२३ – २४ अंतर्गत दि. १८ जुलै ते २० ऑक्टोबर या कालावधीत खरीप हंगामाचे एक आवर्तन पूर्ण करण्यात आले असून, दि. १ नोव्हेंबर २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रब्बी हंगाम आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दि. १ मार्च ते ३० जून २०२४ या कालावधीत एक उन्हाळी आवर्तन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेतून सन 2023-24 अंतर्गत रब्बीसाठी दि. 15 डिसेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत तर उन्हाळी आवर्तन दि. 1 एप्रिल ते 31 मे 2024 या कालावधीत देण्याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान रब्बीसाठीचे आवर्तन लवकर सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली.

या बैठकीस जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

000000

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी

बारामती, दि.29: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यासाठी आदर्शवत असून राज्यात या क्रीडा संकुलाला मॉडेल मानून अन्यत्र संकुलाची कामे करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा क्रीडा संकुलातील विविध प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन प्रशिक्षक व खेळाडूंसोबत संवाद साधला. खेळाडूंसाठी असणाऱ्या सोई सुविधा, स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

 श्री. बनसोडे यांनी शासनाच्यावतीने खेळाडूंसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली. खेळाडूंना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी त्यांच्या हस्ते संकुलातील विविध प्रशिक्षण केंद्रावरील राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला. तसेच क्रीडा संकुलातील प्रशासकीय बाबी चांगल्या पद्धतीने हाताळल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर,  माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, नवनाथ बल्लाळ आदी उपस्थित होते.

0000

 

स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबत पुणे शहरात चांगले कार्य  – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणेदि. 28: महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातल्या उत्तम कार्यपद्धती राबविण्यात पुणे शहराचा समावेश होईल असे काम इथे झाले आहे. शहर स्वच्छता आदींच्या अनुषंगाने गुणवत्ता जाणीव तळागाळात निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून शहरात पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघ आणि नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी संस्थेमार्फत चांगले काम होत आहेअसे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

 सहकार विभागपुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण आणि अपार्टमेंट महासंघनॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (एनएससीसी) आणि पुणे महानगरपलिका यांच्यावतीने आयोजित हाऊसिंग सोसायटी अँड क्वालिटी सिटी‘ परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसहकार आयुक्त अनिल कवडेपुणे महानगरपालिकेचे उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदमपुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धनएनएससीसीच्या अध्यक्षा शामला देसाईसचिव मैथिली मनतवार आदी उपस्थित होते.  

 पुणे शहरात अनेक वर्षापासून नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (एनएससीसी) तसेच गृहनिर्माण महासंघाचे चांगले काम झाले आहेअसे सांगून उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याशहरातील टेकड्या वाचविण्याचे काम संस्थेने केले आहे.  प्रत्येक बाबतीत शहर स्वच्छ असावेपर्यावरणप्रशासन स्वच्छ असावेसुप्रशासन असावे या भूमिकेतून संस्थेचे काम होत असून विविध उपक्रमात नागरिकांचा सहभाग घेतला आहे.

 शहरातील वाड्यांचाजुन्या इमारतींचा पुनर्विकास असे प्रश्न आहेत. शहरात गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट यांचे सुनियोजन करण्यासाठी संस्था करत असलेले काम महत्वाचे आहे. राज्यातील मुंबई प्रमाणेच अन्य मोठ्या शहरात अशा परिषदा आणि प्रदर्शनाचे आयोजन व्हावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुणे शहरात सर्वाधिक दुचाकी वापर असताना तसेच संगणकीय क्षेत्रात बेंगळुरूशी स्पर्धा करत असताना या बाबतच्या पायाभूत सुविधावाय-फाय यंत्रणाइंटरनेट जोडणी व्यवस्थित मिळावी अशी या उद्योगातील मागणी आहेअसेही त्यांनी सांगितले.

 नदीकिनारा विकासघनकचरा व्यवस्थापनरिकाम्या जागांचे संरक्षणहरित विकास आराखडाजैव विविधता पार्क असे विविध विषय असून टेकडी संरक्षणात अनेक लोक काम करत असताना मूळ मालकांना त्याचा मोबदला मिळावा. वन विभागाने अतिशय चांगल्या प्रकारे भांबुर्डा वन विहाराचे निर्माण केले आहेअसे चांगले प्रयत्न व्हावेत. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या ज्येष्ठ नागरिक सेवा तक्रार प्राधिकरणाचा प्रचार व्हावा. वाहतुकीची व्यवस्थापुरवठादार धोरणमतदार नोंदणीनिवडणुकीत लोकांचा सहभाग वाढविणे आदी सर्व बाबतीत महासंघाला सहकार्य करण्यात येईलअसेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

 

शासकीय निधी व लोकसहभागातून गृहनिर्माण संस्थांतील सुविधा निर्मितीसाठी प्रयत्न करू – चंद्रकांत पाटील

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले2014 ते 19 या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना शासनाची एकही इमारत यापुढे रेन वॉटर हार्वेस्टिंगसौर ऊर्जा निर्मिती करणारी नसेलसांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यास त्यांना अर्थसंकल्पात निधी मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आला. पुणे महानगर पालिकेनेही यापुढे नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना मान्यता ती ग्रीन अपार्टमेंटसोसायटी नसेल तर परवानगी मिळणार नाही असा निर्णय घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शहर निर्मितीच्यादृष्टीने याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अगोदर झालेल्या सोसायट्यातही त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक निधी शासकीय तसेच लोकसहभागातून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलअसेही ते म्हणाले.

 कोथरूडच्या 500 सोसायट्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग व ते नष्ट करणाऱ्या मशीन बसवण्यासाठी प्रयत्न असून आतापर्यंत 10 सोसायट्यात ते बसवले आहेत. सोसायटीनिहाय अशा बारीक सारीक बाबींचा विचार झाला पाहिजे. असे उपक्रम शासकीयजिल्हा वार्षिक योजना अथवा नगरविकासच्या योजनेत बसवता येईल का यासाठी प्रयत्न सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा बागागाडी धुण्यासाठी उपयोग असे करण्याचा विचार करावाअसे आवाहन श्री.पाटील यांनी केले.

 सौर पॅनेलउत्तम जिमनॅशियमइनडोअर खेळांचे कोर्टसुक्या व ओल्या कचऱ्याची निर्गती होतेसांडपाण्याचे पुनर्प्रक्रिया होऊन वापर होतो अशी एक सोसायटी महासंघाने निवडावी. या सोसायटीला लागणाऱ्या सर्व बाबी सोसायटीचा निधी तसेच अन्य निधी मिळवून पूर्ण करू असेअसे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात 17 हजार सोसायट्या व पूर्ण महाराष्ट्रात 1 लाख गृहनिर्माण संस्था व 1 लाख अपार्टमेंट असल्याने त्यांना कोणतेही अभियान दिल्यास वेगाने ते राबविले जाऊ शकतेअसेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.

 प्रास्ताविकात शामला देसाई म्हणाल्या50 वर्षापूर्वी शंतनुराव किर्लोस्कर यांनी शहर स्वच्छसुंदर असावे या भूमिकेतून विविध संस्थाप्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून काम व्हावे यासाठी एनएससीसी संस्थेची स्थापना केली. शहर सौंदर्यीकरणकचरा व्यवस्थापन आदींमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुहास पटवर्धन यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली. महासंघ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना या परिषदेचे व प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. महासंघाने सोसायट्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ग्रिव्हन्स पोर्टल सुरू केले आहे. संस्थांना विविध सेवा घरबसल्या मिळाव्यात यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेतअसे ते म्हणाले.

 प्रारंभी उपसभापती डॉ. गोऱ्हे आणि मंत्री श्री. पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. या प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थांना उपयुक्त विविध सेवा पुरवठादारउपयुक्त साधनेसंरक्षण उपकरणेबँका आदींचे स्टॉल समाविष्ट आहेत.

0000

‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातून अमृत कलश यात्रा दिल्लीत दाखल

नवी दिल्ली, 28:  ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत महाराष्ट्रातील  विविध गावांमधून  एकत्र  केलेल्या मातीचे  अमृत कलश यात्रा आज दिल्लीत   निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर दुपारी 2.30 वाजता दाखल झाली.  

याबाबतचा राज्यस्तरीय सोहळा शुक्रवारी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीतीत ऑगस्ट क्रांती मैदनावर पार पडला होता.

अमृत कलश यात्रेसाठी राज्यातून 414 कलश घेऊन आलेल्या 881 स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वेने  शुक्रवारी  मुंबई सेंट्रल रेल्वे येथून दिल्लीकडे मार्गस्थ झाली होती.  मुख्यमंत्री यांनी या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

अमृत कलश यात्रा आज दिल्लीत निजामुद्दीन येथे दाखल झाली. यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार व दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने स्वयंसेवकांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्यने दिल्लीस्थित मराठी बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेल्या देशव्यापी मेरी माती मेरा देश मोहिमेची सांगता 31 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. देशभरातून  गोळा केलेले अमृत कलश दिल्लीतील कर्तव्यपथ इथल्या अमृतवाटिका इथे संकलित करून समारंभपूर्वक स्थापन केले जाणार आहेत.  यावेळी सांस्कृतिक  कार्यक्रम आणि ध्वनिसंगीताचा समारंभ होणार आहे.

000000

लोकसेवेची पवित्र संधी म्हणून मिळालेल्या नोकरीकडे पहा –  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

▪ ५१ हजारांपेक्षा अधिक युवकांना शासकीय सेवेतील नियुक्तीपत्र बहाल

▪ देशभरात ३७ ठिकाणी रोजगार मेळावे; यात नांदेडचा समावेश

नांदेड (जिमाका) दि. 28 :- दीड वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 10 लाख युवकांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली तेंव्हा यावर काही जणांचा विश्वास बसला नाही. या दीड वर्षांत देशभरात टप्याटप्याने रोजगार मेळावे घेऊन प्रत्येक मेळाव्यात 50 हजारापेक्षा अधिक युवक-युवतींना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर शासकीय नोकरीची संधी त्यांना बहाल करण्यात आली. यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, अभ्यास, मेहनत हे अधिक महत्त्वाचे ठरले. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, ज्या विभागात आहात त्या क्षेत्रात काम करण्याची मिळालेली ही संधी केवळ शासकीय नोकरी पुरतीच मर्यादीत आहे असे समजू नका तर ती एक लोकसेवेची मिळेलेली पवित्र संधी आहे, असे समजून कार्यरत रहा, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

नांदेड येथे दहाव्या रोजगार मेळाव्यानिमित्त आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते. विभागीय रेल्वे कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापिका निधी सरकार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, देविदास राठोड, दिलीप कंदकुर्ते व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आजचा हा दहावा रोजगार मेळावा आहे. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात शासनाच्या सेवेत मिळालेली ही संधी योगायोग असून युवकांच्या दृष्टीने अमृतकाळ सुरू झाल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. अत्यंत मेहनत व कष्टाच्या बळावर आपण ही संधी मिळविली आहे. या संधीमुळे तुम्ही आता अधिक जबाबदार झाला असून तुमच्या हातून राष्ट्र विकासाचे अधिकाधिक काम व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी युवकांना दिल्या. ज्या क्षेत्रात आपल्याला संधी मिळाली आहे तिथे मानवतेसाठी काम करा. तुमचे नवे जीवन सुरू होत असून सेवाचा अर्थ आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही हा असून इतरांसाठी जे काही अधिक चांगले करता येईल त्याच्याशी कटिबद्ध होणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

तंत्रकुशलतेसाठी, कौशल्य विकासासाठी आपल्या सरकारने भरीव काम केले आहे. कर्मयोगी पोर्टलचा प्रारंभ केला असून त्यात सुमारे 750 पेक्षा अधिक ईलर्निंग पाठ्यक्रम देण्यात आलेले आहेत. या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून नवनियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरिबांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी, मातृवंदन योजना व इतर योजनांमुळे गत 9 वर्षात भारतातील 13.5 कोटीपेक्षा अधिक लोक दारिद्रयरेषेच्या वर आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार असून यासाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान तेवढेच लाखमोलाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारत आताही एक ताकद झाली आहे.

कोरोना काळात संपूर्ण जगापेक्षा वेगळे काम आपण धैर्याने उभे करून दाखविले आहे. 2 हजार करोड लस ही नागरिकांना शासनातर्फे उपलब्ध करून त्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत करून संपूर्ण जगाचे लक्ष भारताने वेधून घेतले. प्रत्येक क्षेत्रात भारत आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली यश संपादन करत असून विकसीत राष्ट्रासाठी प्रत्येक नागरिक हे भारताचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजचा दिवस युवकांसाठी महत्त्वाचा असून त्यांच्या आनंदात आपण सहभागी होऊन शुभेच्छा देऊ, असे सांगितले. शासकीय सेवक म्हणून असलेली जबाबदारी मोठी आहे. यातील सत्व जपा असे त्यांनी सांगितले. रेल्वे विभागीय व्यवस्थापक निधी सरकार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. आज प्रातिनिधीक स्वरूपात 55 युवकांना नियुक्तीपत्रे बहाल करण्यात आली. यात 17 मुलींचा समावेश आहे.

यात केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश सरकार समर्थित उपक्रमांमध्ये भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सरकारमध्ये नियुक्तीपत्र दिलेले युवक रुजू होतील.

0000

आगामी हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी महिला उद्योजिकांची परिषद – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड `मायटेक्स एक्स्पो` प्रदर्शनास उपसभापती डॉ. गोऱ्हे व उद्योगमंत्री सामंत यांची भेट

पुणे, दि. २८: उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन चांगले काम करत असून हे एकमेव राज्य आहे जिथे महिला उद्योग धोरण तयार करण्यात आले आहे. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्योजक महिलांची परिषद आयोजित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर येथील सिंचन भवन मैदानावर आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड `मायटेक्स एक्स्पो` या प्रदर्शनाला डॉ. गोऱ्हे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देऊन उद्योजकांसोबत संवाद साधला. यावेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, आयोजित करण्यात येणाऱ्या परिषदेत विदर्भातील महिला आणि उद्योग क्षेत्रातील यशस्वी महिला त्यांना आलेले अनुभव मांडतील. येत्या ३० ऑक्टोबर रोजी व्यापार आणि उद्योजकांच्या प्रश्नावर सचिवांसोबत बैठक घेतली जाईल. ऑनलाईन व्यापाराच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकारकडून काय मदत करता येईल याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

डायमंड ज्वेलरीचा हब स्थलांतरित होत असल्याचा प्रचार चुकीचा – उद्योगमंत्री उदय सामंत

डायमंड ज्वेलरीचा हब गुजरात राज्यात स्थलांतरित होत असल्याचा प्रचार चुकीचा आहे, असे सांगून उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्र शासनाने डायमंड ज्वेलरीमध्ये उत्तम काम करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी धोरण आणले. नवी मुंबई येथे नव्याने विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळानजिक २५ एकरची जागा डायमंड ज्वेलरी पार्कसाठी दिली आहे. पुढील वर्षीपासून महाराष्ट्रातील डायमंड ज्वेलरी मधील व्यापार प्रचंड वाढणार असून जगातील या क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावर राज्य असेल असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

शासन शंभर टक्के उद्योजक आणि व्यापाऱ्यांसोबत आहे. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरच मुंबईत संबंधित सर्व विभागांचे अधिकारी, सचिवांसोबत बैठक घेतली जाईल. या बैठकीतून उद्योग, व्यापाराचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

श्री. सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर राज्यातील व्यापार आणि उद्योगांच्या वाढीसाठी संयुक्तपणे काम करत आहे. महाराष्ट्र चेंबरच्या कामाचा फायदा शासनालाही होत असून महसूल वाढीबरोबरच, तरुणांना रोजगार मिळत आहे. राज्यात उद्योग, व्यवसायांना मोठे प्रोत्साहन मिळत आहे. उद्योगांचे अनेक प्रश्न शासनाकडून मार्गी लागले आहेत आणि उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील. विविध सवलती, प्रोत्साहनाचे ७ हजार ५०० कोटी रुपये उद्योजकांच्या खात्यात वर्ग केला आहे.

प्रकल्प उभारताना त्या गावातील स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य दिल्यास वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. उद्योग व व्यापाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे शासनाची भूमिका आहे. खासगी क्षेत्रात सेमी कंडक्टरचा प्रकल्प उभारण्यासाठी आर्यन ग्रुप ऑफ कंपनीने घेतलेल्या पुढाकाराला पाठबळ दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर व्यापारी आणि उद्योजकांसाठी कार्यरत आहे. मायटेक्सच्या माध्यमातून राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना, प्रोत्साहन देण्यात येत आहे. शासनाकडून तात्काळ निर्णय घेतले जात असल्याने उद्योगक्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी उद्योगमंत्री सावंत यांच्या माध्यमातूनच मायटेक्सची संकल्पना रूजली, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात मायटेक्स एक्स्पो मुंबई २०२४ च्या माहितीपत्रिकाचे अनावरण करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे चेअरमन मनोहर जगताप, महाराष्ट्र चेंबरचे मायटेक्सचे पुणे विभागाचे मुख्य संयोजक दिलीप गुप्ता आदींचा सत्कार झाला.

शिवाजीनगरातील सिंचन भवन येथील मैदानावर २९ ऑक्टोबर पर्यंत प्रदर्शन असून दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत अशी वेळ आहे.

००००

ताज्या बातम्या

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५: विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधिज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब...

विद्यार्थी नात्याने नवीन विषयांचा प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५:  विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्याने प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

0
पंढरपूर, दि. ५ (जिमाका): आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट...

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...