दिवेआगर येथे विस्तारित सुपारी संशोधन केंद्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

0
35
रायगड (जिमाका) दि-10:-  डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुरू असलेले श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राचे दिवेआगर येथील 2 हेक्टर क्षेत्रावर विस्तारित संशोधन केंद्र  असून यासाठी 5 रु कोटी निधी उपलब्ध झाला आहे.  या सुपारी केंद्राचे भूमिपूजन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते  आज संपन्न झाले.
यावेळी खासदार सुनिल तटकरे,महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, दिवेआगर सरपंच सिद्धेश कोसबे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शिणगारे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठ अभियंता निनाद कुलकर्णी,  उपसंचालक डॉ.अरुण माने, डॉ राजेश धोपावकर, प्रभारी अधिकारी संशोधन केंद्र डॉ सिद्धेश्वर सावंत, तांत्रिक सल्लागार डॉ.किरण माळशे, उपअभियंता राहुल घाडगे, यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कृषिमंत्री धंनजय मुंडे म्हणाले की, सुपारी या फळाला आपल्या जीवनात वेगवेगळ्या स्वरूपात महत्व आहे. श्रीवर्धनच्या सुपारीला तसेच रोहाच्या वाल यांना भौगोलिक मानांकन देण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, भाताची शेती करीत असलेल्या शेतकरी कधीच आत्महत्या करीत नाही, यामध्ये कोकणातील शेतकरी अतिशय समाधानाने शेती करीत समृद्ध होत आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाचे आंतराराष्ट्रीय कंपन्या सोबत करारबद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कृषिमंत्री असल्याच्या आताच्या काळात कृषी विभागाने मोठी क्रांती केली असून महाराष्ट्रातील सर्वात सामान्य शेतकऱ्याची सुद्धा आर्थिक उन्नती होईल असेही  कृषिमंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
खासदार सुनील तटकरे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारकीर्दीमध्ये दिवेआगर येथे होत असलेले सुपारी संशोधन केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे हे आमचे स्वप्न असल्याचे सांगितले.
यावेळी आपल्या मनोगतामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, सुपारी संशोधन केंद्राचा पर्यटनाच्या वाढीसाठी देखील फायदा होईल.  तर महिलांसाठी शेती उद्योगासाठी विशेष उपक्रम राबवावे जेणेकरून महिलांना शेती व्यवसायाकडे वळविता येईल व त्यातून महिला सक्षमीकरणाला हातभार लागेल असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने वसंतराव नाईक कृषिभूषण देऊन  शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here