बुधवार, ऑगस्ट 20, 2025
Home Blog Page 1669

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना

मुंबईदि. 2 : केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावायासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेतून सूचना आणि संकल्पना मागविल्या आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष आहे. 27 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असूनलवकरच कामकाज सल्लागार समितीत अर्थसंकल्पीय कामकाजाचे वेळापत्रक ठरेल. महाराष्ट्रात आता अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाश: डीपीसी आणि विभागश: वार्षिक आराखड्यासाठी बैठकी पूर्ण झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्रीगृहमंत्रीविरोधी पक्षनेताउपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली. पणअर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

 अर्थसंकल्प कसा वाचावा’ हे पुस्तक त्यांनी आमदार असतानाच लिहिले आहे. अर्थसंकल्पावर अनेक व्याख्याने सुद्धा त्यांनी दिली आहेत. कालही केंद्रीय अर्थसंकल्पावर त्यांचे मुंबईत व्याख्यान झाले. यंदाच्या आणि आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात जनतेच्या सूचनांचेसंकल्पनांचे प्रतिबिंब असावेम्हणून त्यांनी थेट जनतेतून सूचनासंकल्पना मागविल्या आहेत. http://bit.ly/MahaBudget23 या संकेतस्थळावर जाऊन लोकांना आपल्या संकल्पना मांडता येणार आहेत. त्यामुळेच निश्चित जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात असणार आहे.

००००

स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि. २ : आधुनिक जीवन पद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता फिंगर बोलमध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंत वैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावीअसे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील दंतवैद्यकांना एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री‘ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.  मेडियुष‘ या दंतवैद्यकांच्या संघटनेच्यावतीने हे पुरस्कार देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

स्वच्छ मुख अभियान‘ हा चांगला उपक्रम असून असे अभियान निरंतर राबवावे. वैद्यकीय सेवा हा एक पवित्र व्यवसाय असून त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.  

कार्यक्रमाला मेडीयुषचे सह-संस्थापक डॉ गोविंद भतानेवैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ विवेक पाखमोडे,  ‘ओरल हेल्थ मिशनचे डॉ दर्शन दक्षिणदासडॉ विश्वेश ठाकरे,  इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ अशोक ढोबळेसौंदर्यवर्धक व कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञ  डॉ संदेश मयेकरकालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयलतसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

०००

 Maharashtra Governor presents ‘Excellence in Dentistry Awards’

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Excellence in Dentristry’ awards to dentists from across the State at Raj Bhavan Mumbai. The programme was organised by ‘Mediyush’, an organisation of dentists. 

The Governor also unveiled the Logo and Tagline of Government of Maharashtra’s ‘Swachch Mukh Abhiyan’.

Observing that the modern practice of rinsing hands in a finger bowl after lunch or dinner was harmful for dental care, the Governor called upon dentists to create awareness to stop the practice.

Co Founder of Mediyush Dr Govind Bhatane, Joint Director of Medical Education Dr Vivek Pakhmode, Indian Dental Association’s Dr Ashok Dhobale, Aesthetic and Cosmetic Dental specialist Dr Sandesh Mayekar,  Dr Darshan Dakshindas, Director of Kalika Steel Govind Goyal, Dr Vishwesh Thakre and doctors and specialists from Dentistry were present.

000

मोसंबी पिकासाठी सीट्रस इस्टेट, सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

मुंबई, दि. 2 : बीज गुणन केंद्र इसारवाडी या औरंगाबाद येथील प्रक्षेत्राचे फळ रोपवाटिकेत रूपांतर करून सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स 22.50 हेक्टर क्षेत्रात तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.

सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स पैठणच्या कार्यवाहीबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. भुमरे बोलत होते. यावेळी फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेफलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की,  एकूण क्षेत्रापैकी ४.५० हेक्टर क्षेत्रावर सेंटर ऑफ एक्सलन्स व उर्वरित १८.०० हेक्टर क्षेत्रावर सीट्रस इस्टेट इसारवाडी होणार असून४३ कोटी ७९ लाखसात हजार सातशे रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीट्रस इस्टेट अंतर्गत क्षेत्रात रंपूर लाइमन्यूसेलरकाटोल गोल्डफुले – मोसंबी ही मातृवृक्ष असणार आहेत.

या सेंटरची मोसंबी फळ पिकाची जातीवंतरोग व कीडमुक्त उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका तयार करणेमोसंबीच्या दर्जेदार उत्पादन व शास्त्रोक्त लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व पीक प्रात्यक्षिक देणे. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन करणेमोसंबी पिकाच्या व्यवस्थापनफळ प्रक्रियाग्रेंडिंगपॅकेजिंगसाठवणमार्केटिंग व निर्यातीला चालना देणेइंडो – इस्राईल तंत्रज्ञानाने उत्पादकता वाढविणेमृद व पाणी परीक्षणऊती व पाने पृथक्करण यासाठी प्रयोगशाळा तसेच निविष्ठा विक्री केंद्रातून शेतकऱ्यांना वाजवी दरात सुविधा देणे ही या सीट्रस इस्टेटची उद्दीष्टे आहेत.

या सीट्रस इस्टेटमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिकाप्रात्यक्षिकेमातीपाणीऊतीव पाने पृथक्करण प्रयोगशाळानिविष्ठा विक्री केंद्रग्रेडिंगपॅकिंगसाठवण व कोल्ड स्टोरेजऔजारे बँकफलोत्पादन तज्ज्ञवनस्पती रोगशास्त्र तज्ज्ञकीटकशास्त्र तज्ज्ञमाती परीक्षण तज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञ यांच्या सेवा विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सुविधा या सीट्रस इस्टेटमार्फत दिल्या जाणार आहेत.

तसेचसेंटर ऑफ एक्सलन्स (मोसंबी) अंतर्गत इंडो इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये कलम काडीच्या आठ जातीची एकूण 154 झाडे, तर मूलकांडच्या तीन जातीची एकूण 80 झाडे असतील. ४.५० हेक्टरवर असलेल्या या सेंटरचा एकूण खर्च १२ कोटी ८३ लाख ५४ हजार एवढा असणार आहे. निर्यातक्षम फळ बागांची वाढ करणेप्रति हेक्टर ३० टनापर्यंत उत्पादकता वाढविणे, गुणवत्तापूर्वक रोपांची निर्मिती करणेआदर्श रोपवाटिकांची स्थापना करणेकाढणीत्तोर व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा तयार करणेयांत्रिकी पद्धतीने बागांची छाटणी व अंतर मशागत करून मजुरीचा खर्च कमी करण्यास चालना देणे ही या सेंटरची ध्येय आहेत.

याशिवाय रोग व्यवस्थापन करणेविविध वाणांची शिफारस करून उत्पादनात वाढ करणेनिर्यातयोग्य वाणांचा विकास करणेपॅकिंगप्रक्रिया यासारख्या काढणीत्तोर व्यवस्थापनावर भर देणेकोल्ड स्टोरेजची उभारणी करून साठवण क्षमता वाढविणेभौतिक व रासायनिक गुणधर्म योग्य असलेली जमिनीची निवडकीड व रोग यांचे एकात्म‍िक व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे ही या सेंटर ऑफ एक्सलन्सची उद्दीष्टे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. 3 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 या वेळेत हा दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.

वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील व श्रीमती मीनल जोगळेकर यांनी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती दिलखुलास कार्यक्रमातून देणार आहे.

000

बेस्टमधील कंत्राटी कामगारांच्या कोविड काळातील थकित मानधनाबाबत त्वरित चौकशी करावी – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

मुंबई, दि. 2 : कोविड काळात बेस्टच्या कंत्राटी वाहनचालकांचे आणि कामगारांचे वेतन कंत्राटदाराकडून करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे कामगारांचे भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी विमा निगमचे हप्ते भरण्यात आले नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत चौकशी करून याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) अंतर्गत कंत्राटी बस चालकांच्या आणि कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत तसेच मे. हिंदुस्थान कोको कोला कंपनीतील कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. या बैठकीत आस्थापना व कामगार या दोन्हीच्या समस्या ऐकून मंत्री डॉ.खाडे यांनी सूचना दिल्या.

या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक यांचे सल्लागार प्रकाश खवरे तसेच संबंधित कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री डॉ.खाडे म्हणाले की, कामगारांना नियमित आणि वेळेत वेतन देणे, हे प्रत्येक आस्थापनेचे कर्तव्य आहे. कामगारांच्या वेतनातील भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विम्याचे हप्ते कपातीमध्ये नियमितता ठेवून आस्थापनांनी त्यांचा हिस्सा विनाविलंब द्यावा. कामगारांना सक्तीची स्वेच्छानिवृत्ती देवू नये. मर्जीने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांना नियमानुसार निवृत्ती वेतनाचे लाभ द्यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

कंपनीने कामगारांना दिलेल्या स्वेच्छानिवृत्ती विषयक सूचना, पूर्वकल्पना, स्वेच्छानिवृत्तीचे भरून घेतलेले अर्ज, दिलेली रक्कम आदींची माहिती तात्काळ विभागाला सादर करावी. त्याचप्रमाणे या प्रकरणाची चौकशी करून स्वेच्छानिवृत्तीची रक्कम नियमानुसार दिलेली नसल्यास ती कामगारांना तातडीने अदा करावी. कामगारांचे हीत जोपासले जाईल, असे निर्णय घेण्याच्या सूचना मंत्री डॉ.खाडे यांनी दिल्या.

000

संजय ओरके/विसंअ/

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राष्ट्रीय छात्र सैनिकांनी डोळ्यापुढे ठेवावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 2 : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राष्ट्रीय छात्र सैनिकांना उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्र्यांचे ध्वजनिशाणासह सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा पुरस्कार पटकावल्याबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचा महाराष्ट्रातील छात्र सैनिकांना आज राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.

दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत छात्रसैनिकांनी महिनाभर अथक परिश्रम करुन सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल छात्रसैनिकांचे कौतुक करुन छात्रसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नेहमी डोळ्यांपुढे ठेवावा, अशी सूचना राज्यपालांनी केली. शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी जीवनकार्य आठवल्यास कुठल्याही आव्हानाला धैर्याने तोंड देता येईल, असेही राज्यपालांनी सांगितले.

छात्रसैनिकांनी परिश्रमासोबतच आयुष्यभर शिस्त पाळावी व चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करावा असेही राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांनी महाराष्ट्राच्या पथकाला मिळालेल्या वैयक्तिक तसेच सांघिक करंडकांची पाहणी केली. तसेच महाराष्ट्राच्या अधिकारी, प्रशिक्षक व छात्रसैनिकांना सन्मानित केले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र छात्रसैनिकांचे अपर महासंचालक मेजर जनरल योगेंद्र प्रसाद खंडूडी, प्रशिक्षण प्रमुख कर्नल निलेश पाथरकर तसेच प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी झालेले १११ छात्रसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या पथकाला मिळालेले सन्मान

  • प्रधानमंत्री ट्रॉफी – सर्वश्रेष्ठ विजेता
  • सर्वोत्तम निदेशालय प्रधानमंत्री रॅली
  • सर्वोत्तमCadet Sw (Navy)
  • सर्वोत्तम निदेशालय(Vayu Sena Competition)
  • सर्वोत्तम उद्योजकNaval Unit
  • सर्वोत्कृष्ट निदेशालय (G.O.H) RDC Contingent
  • सर्वोत्कृष्ट परेड कमांडर(प्रधानमंत्री रॅली )
  • आंतर निदेशालयFlag Area competition
  • सर्वोत्तम तुकड़ी (Flying Competition)

 

०००

 

Governor Koshyari pats Maha NCC for winning PM’s Banner,

Champion Directorate Trophy

Mumbai, 2nd Feb : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari hosted a reception for the victorious contingent of Maharashtra NCC returning from the Republic Day Camp 2023, at Raj Bhavan Mumbai.

The Maharashtra NCC Directorate Contingent, comprising 111 Cadets, won the prestigious Prime Minister’s Banner for the 19th time and also won the Champion Directorate Trophy at the Republic Day Camp 2023.

Complimenting the Maharashtra NCC contingent for winning several individual and team trophies, the Governor asked them to keep the inspiring example of Chhatrapati Shivaji Maharaj. He appealed the cadets to observe discipline in their chosen walks of life and become good citizens of the nation.

Additional Director General of NCC Directorate Maharashtra Maj Gen Y P Khanduri, Col Neelesh Patharkar, senior officers of Maharashtra NCC and the Cadets were also  present.

Trophies won by Maharashtra NCC

Prime Minister’s Trophy

Best Directorate in March Past and PM Rally

Best Cadet SW (Navy)

Best Directorate Air Wing Competition

Most Enterprising Naval Unit

Best Directorate Guard of Honour RD contingent

BEST Commander (PM’s Rally)

Inter Directorate Flag Area Competition presented by Director General NCC 1963

Best SQN IN FLYING

०००

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

मुंबई, दि. 2 : राज्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वाढ, पूर्ण वेळ काम याबरोबरच इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

मंत्रालयात ग्रामरोजगार सेवकांच्या समस्यांविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, रोहयोचे वरीष्ठ अधिकारी, यांच्यासह ग्रामरोजगार सेवकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

मंत्री श्री भुमरे म्हणाले, ग्रामरोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात येते. त्यांच्याकडून विलंब झाल्यास १५ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी  सांगितले. मानधनाबाबत अन्य राज्यातील कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात येईल.  त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मनरेगा’ योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम ग्रामरोजगार सेवकांनी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना सक्षम करण्यासाठी आणि न्याय मागण्यांसाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.

000

राजू धोत्रे/विसंअ/

 

रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – रोहयो मंत्री संदीपान भुमरे

मुंबई दि. 2 : रोजगार हमी योजने (‘रोहयो’)  अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.

राज्यातील रोहयो अंतर्गत कार्यरत असलेल्या ३५०० कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री श्री. भुमरे बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, संजय गायकवाड, संजय बनसोडे, महेंद्र दळवी, अपर मुख्य सचिव नंदकुमार, यांच्यासह कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, राज्यातील ‘रोहयो’अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी असलेली समिती स्थापन करून त्यावर तातडीने अहवाल मागविण्यात येईल. मानधन वाढ तसेच इतर मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना सांगितले तसेच राज्यभर सुरू असलेला संप मागे घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत

मुंबई, दि. २ : मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले आहेत.

मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी विविध मुद्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावेत असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे एअर प्युरिफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करावी

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या आहेत. मुंबईतील सुमारे २७ टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी त्यांचा डाटा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे येणारा ताण कमी करण्याकरिता बाह्ययंत्रणांची मदत घेतानाच खिडक्यांची संख्या वाढवावी. तसेच एमआरआय, सीटीस्कॅन आणि निदान केंद्र वाढविण्याच्या तसेच डायलिसीस केंद्र उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

महापालिका शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करावे

महापालिकेच्या प्रत्येक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करावे, मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत.

मुंबईकरांना सुशासनाचा अनुभव यावा

मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी प्रयत्न करावेत. महापालिकेकडून लागणाऱ्या इमारत परवाना, मालमत्ता कर, दुकान नोंदणी परवान्याचे नूतनीकरण या आवश्यक त्या परवानग्या आणि परवाने ऑनलाईन देताहेत त्याच बरोबर नागरिकांना सर्व सुविधा सुलभ आणि सहज मिळतील अशा पद्धतीने प्रशासनाकडून सुशासन असावे, यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मुंबई महानगराच्या सुशोभिकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण याबाबतीत सामान्य मुंबईकरांना दिलासा देतानात महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तरतूद करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

०००

राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर

मुंबई, दि. 2 (मावज) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे असणार आहे. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक होते. सध्या प्रचलित असलेल्या या गीतातील दोन चरण मिळून त्यांचे नव्याने ध्वनीमुद्रण करून ते मर्यादित वेळेत म्हणजेच दीड ते पावणे दोन मिनिटात बसविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात येत आहे. हे गीत 1.41 मिनिटे वाजविता / गाता येईल.

 

राज्यगीताचे गायन/वादन करण्याबाबत शासनाने राष्ट्रगीताप्रमाणे नियमावली तयार केली आहे. राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन /वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादीमध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.

राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.

वाद्यसंगीतावर आधारित या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

सर्व शासकीय कार्यालये/ निम शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम, स्वयंसेवी संस्था व खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे हे पुढीलप्रमाणे राज्यगीत असेल:-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥1॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥ 2॥

०००

प्रवीण भुरके/स.स

 

शासन निर्णय

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2023/02/202302011900108407.pdf”]

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री गिरीश महाजन

0
नांदेड दि. १९ : राज्यात मागील ४ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव,...

मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

0
“जिथे मुलींचा आवाज ऐकला जातो, तिथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते…” उपक्रमाचा उगम ग्रामीण भागातील मुलींच्या समस्या अनेकदा घरात, समाजात किंवा ग्रामपंचायतीच्या सभेत हरवून जातात. त्यांच्या अडचणी...

राज्यातील बहुतांश भागात २० ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरणार 

0
मुंबई शहरात २० ऑगस्टच्या दुपार पर्यंत काही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता, तर पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता.  मुंबई, दि:...

राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १९ : - राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. जीवितहानी, पशूधन आणि घरांचे नुकसानीसाठी तातडीने मदतीसाठी...

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

0
मुंबई, दि. १९ : - गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार...