मी संजय गांगुर्डे. नाशिक येथील रहिवासी. मला स्पर्धा परिक्षेसाठी बार्टीचे सहकार्य मिळाले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी आणि विविध प्रकारचे अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंक इन्स्टिट्यूट म्हणेच बार्टी सध्या आघाडीवर आहे.
मागासवर्गीय समाजातील मुलांच्या भविष्यासाठी कायम तत्पर असणारी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन मुलांना योग्य मार्गदर्शनाचे कार्य करणारी ही एकमेव संस्था आहे. संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातलेले असताना, संस्थेने आपल्या कार्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. आम्हा मुलांना ऑनलाइन शिकवणी वर्गातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम संस्थेकडून चालू आहे.
अधिकारी होण्यासाठी मुलांना योग्य मार्गदर्शन देणारे अनेक शिक्षक आणि अधिकारी या ठिकाणी आहेत. यातूनच भविष्यात अनेक अधिकारी या संस्थेतून घडत राहतील. अनेक विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीला बार्टीचे बळ मिळत असून त्यातून विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होत आहे. मी बार्टीने सुरु केलेल्या विविध सेवा उपक्रमांचा लाभ घेतला आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारी ही संस्था त्यांच्या जीवनात वरदान ठरली आहे.